ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

संतश्रेष्ठ सोपानदेव समाधी सासवड | Sant Sopandev Samadhi Saswad |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ส.ค. 2024
  • संतश्रेष्ठ सोपानदेव समाधी सासवड : • संत सोपानदेव समाधी सास...
    Sant Sopandev Samadhi Saswad | #marathivloghttps
    ज्यासी घडेना काशी त्याने यावे सासुवडाशी ।
    जेथे गुप्त गंगा सोपानाच्या पायाशी ।।
    मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी शके १२१८ रोजी, पुण्यभूमी सासवड (saswad) येथील संतश्रेष्ठ सोपान महाराज (Sant Sopandev) यांनी चरणावती (चांबळी) नदीच्या तीरावरील समाधी घेतली. नागेश्वर मंदिराच्या पश्चिमेस संत सोपानदेवांनी वयाच्या १९ व्या वर्षी समाधी घेतली. याप्रसंगी अनेक संत मंडळी उपस्थित होती. आपल्या अत्यल्प जीवनात या संतकवीने 'सोपानदेवी' हा ग्रंथ लिहिला असून तो संगमरवरी फरशीवर नागेश्वर मंदिरात कोरलेला आढळतो.
    मंदिरासमोर दिसणाऱ्या पारावरती जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून समाजप्रबोधनाचे काम करत. अशी ही पुण्यभूमी. मंदिराच्या भोवती भरभक्कम दगडी बांधकाम पाहायला मिळते.
    नागेश्वर शिव मंदिर
    सर्वप्रथम आपल्याला समोर पाहायला मिळते पुरातन नागेश्वर शिव मंदिर. संत सोपानदेवांच्या सोपानदेवी या ग्रंथातील रचना नागेश्वर मंदिराच्या आतील भिंतीवर कोरलेल्या पाहायला मिळतात. आतील गाभाऱ्यात सुंदर शिवपिंड आपले लक्ष वेधून घेते.
    नागेश्वर मंदिराच्या बाहेर आल्यावर बाजूला नवीन बनवण्यात आलेले भक्तनिवास, तसेच दगडी ओव्या पाहायला मिळतात. समाधी मंदिर आणि नागेश्वर मंदिराच्या मध्ये असणाऱ्या सुंदर सभामंडपाचे छतावरील नक्षी आपले लक्ष वेधून घेते. समोर वीर हनुमानाची भव्य मूर्ती पाहायला मिळते
    निवृत्ती मुक्ताई घेतला सोपान,
    जातो नारायण करहा तीरी
    नामा म्हणे गंधर्व सुगरण
    चालिले सोपान समाधीसी
    मंडपाचे नक्षीदार खांब, त्यावरील पक्षी, बालके, फळे, फुले, यांचे सुंदर कोरेगाव अतिशय बोलक आहे. हे खांब आणि संपूर्ण लाकूड पुरंदरचे सरदार कृष्णराव पानसे यांनी सोपानदेव चरणी अर्पण केलेले केल्याचे सांगण्यात येते. समोरील भिंतीवरील सुंदर पेंटिंग्स आपले लक्ष वेधून घेतात
    देव म्हणे नाम्या मार्गशीर्ष गाठा,
    जावे सासवडा उत्सवासी,
    आम्ही दिधले वचन,
    चला अवघे समुदाय
    समाधी मंदिराचे प्रवेशद्वार चंदेरी नक्षीकामाने सजवलेले पाहायला मिळते. सोपानदेवांचे समाधीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची लगबग चालू आहे
    मुख्य मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला श्री दत्ताच्या नवीन मंदिराचे आपण दर्शन घेतो
    समाधी मंदिराच्या उजव्या बाजूला नव्यानेच बांधण्यात आलेल्या, सोपानदेवाच्या धाकट्या बहिणीचे मुक्ताई मंदिराचे आपण दर्शन करतो.
    गणेश वृक्ष
    आता समोर पाहायला मिळतो गणेश वृक्ष. याच विशाल चिंचवृक्षापासून श्री संत सोपान देव यांनी आपल्या अवतार कार्य संपवून संजीवन समाधीस प्रवेश केला. या वृक्षापासूनच सोपान देवांच्या समाधीचे प्रवेशद्वार आहे. या वृक्षाचे बारकाईने निरीक्षण केले तर त्याच्या बुंध्यावर आपल्याला अनेक ठिकाणी स्वयंभू श्री गणेशाचे दर्शन होते म्हणून याला गणेश वृक्ष असेही म्हणतात गणेश वृक्षाच्या खाली माऊलींनी भिंत चालवत वाघावर ती आलेल्या संत चांगदेवांची भेट घेतल्याचे चित्र कोरलेले पाहायला मिळते.
    सोपनाच्या पायाशी आलेल्या भोळ्या भाबड्या वारकऱ्यांचे दर्शन आपल्याला सुखावून जाते. मंदिरामध्ये फिरताना सतत अभंगवाणी, संतांचे विचार कानी पडतात. भक्तीने भरलेल्या या सुंदर वातावरणामध्ये वारकरी कृतकृत्य होतो.
    चला तर मग मंडळी हरिनामाचा गजर, या पालखी सोहळ्यामध्ये, ब्रह्मपुरी मधील संत सोपानदेवांच्या या नव्याने घडवलेल्या दर्शन घ्यायला विसरू नका.
    Timeslots:
    00:00 - Start
    00:46 - Sant Sopandev Samadhi Surrounding
    01:00 - Bhagirathi Kund
    01:34 - Sant Tukaram Par
    02:06 - Entrance of Sant Sopankaka Samadhi
    02:29 - Nageshwar Shiva Temple
    03:15 - Whispering corner Nageshwar Shiva Temple
    04:20 - Sabhamandap
    03:15 - Whispering corner Nageshwar Shiva Temple
    04:20 - Sabhamandap
    04:53 - Hanuman
    05:00 - Saints of Maharashtra
    05:26 - Pillars of Sabhamandap
    06:00 - Paintings of Sant Sopandev
    07:15 - Sant Sopandev Samadhi
    07:25 - Sant Sopandev Palakhi
    08:15 - Datta Mandir
    08:49 - Sant Muktabai Mandir
    09:40 - गणेश वृक्ष
    11:17 - वारकरी
    sant sopandev mahiti, sant sopandev,
    sant sopandev yanchi mahiti,sant sopandev samadhi, sopandev maharaj samadhi saswad,pune places to visit,
    sopandev maharaj samadhi saswad,सोपानदेव समाधी मंदिर सासवड,purandar,pune,maharashtra,sopandev,saswad,samadhi,dnyaneshwar,sopan kaka samadhi,sopandev samadhi,sant sopankaka,sant dnyaneshwar,palkhi,ashadi ekadashi,palkhi sohala,nivrutti maharaj,dnyandev maharaj,muktabai,changdev,namdev,tukaram,saswadmdhil prasidha sthale,bajirao peshve,shahu maharaj,shivaji maharaj,sardar panase,travel,temple,सासवड,सोपानकाका,पालखी,पालखीसोहळा,आषाढी एकादशी,samadhi mandir
    #sopandev #saswad #purandar #marathimatter #palkhi2024

ความคิดเห็น • 2

  • @sunildhawale4175
    @sunildhawale4175 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  หลายเดือนก่อน

      राम कृष्ण हरी 😊