सरदार पानसे वाडा सोनोरी पुरंदर | Sardar Panase wada Sonori Purandar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 มี.ค. 2021
  • सरदार पानसे वाडा सोनोरी पुरंदर
    सासवडपासून साधारण ५ किमी असणाऱ्या सोनोरी गावातील मराठा साम्राज्याचे तोफखानाप्रमुख, सोनोरी आणि आसपासच्या प्रदेशाचे जहागीरदार, सरदार भिवराव पानसे यांचे निवासस्थान व कार्यालय असणारा भव्य वाडा.
    वाड्याकडे येताना बरीच मंदिरे पाहायला मिळतात. पुढे भव्य दगडी कमान आपले स्वागत करते.
    वाडयाचे मुख्य सागवानी दरवाजातून आत गेल्यावर एक विस्तीर्ण पटांगण पाहायला मिळते.
    पूर्वीच्या काली ३ मजले असणाऱ्या या उत्तुंग वास्तूचे सध्या एकच मजली बांधकाम शिल्लक असून पानसे कुटुंबाची आजची पिढी येथे राहत आहे.
    आतमध्ये एक मोठा सभामंडप आहे. सभामंडपाचे काम सागवानी लाकडाचे असून त्याच्यावर नक्षीदार लाकडी कमानी होत्या. समोरील बाजूला देवघर पाहायला मिळते. याच देवघरात गोकुळाष्टमीचा उत्सव पूर्वीपासून चालत आलेला असून आजही उत्साहात साजरा होतो. या १० दिवसात येथे श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन केली जाते आणि दूरदूरहून समस्त पानसे कुटुंब या उत्सवासाठी एकत्र येते. सागवानी बांधकाम वाड्याचे वैभव दाखवतो. मोजक्या ठिकाणी असणारे लाकडी नक्षीकाम आजही पाहायला मिळते. मातीपासून बनवलेल्या या भेंड्याच्या भिंतींना मजबुती मिळण्यासाठी त्यात चुना, दोऱ्या, मानवी केसाबरोबर, लाकडाचा, ज्वारीचा किंवा गव्हाचा भुसा कालवलेला दिसून येतो . छताची केलेली डागडुजी दिसून येते.
    कालौघात ३०० वर्षांपूर्वीचा हा वाडा नष्ट होत चालला आहे. आता फक्त वाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या, काही ठिकाणी कोसळलेल्या भिंती व सुरक्षिततेसाठी असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे. वाड्याच्या प्रेमापोटी आजही पानसे कुटुंबीय तेथे राहत आहे, जमेल तशी डागडुजी करत आहे .
    ऐतिहासिक संदर्भ : पुरंदरचे धुरंधर
    श्री शिवाजीराव एक्के, जेष्ठ इतिहास संशोधक
    Sardar Panase wada Sonori Purandar
    #purandar #sonori #panasewada ‪@MarathiMatter24‬

ความคิดเห็น • 33

  • @rkakade
    @rkakade 3 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर आणि अप्रतिम वाडा आहे.. तुमच्या व्हिडिओ मधून आम्हाला अशीच ऐतिहासिक आणि आपल्या पूर्वजांची आठवण असलेली वाडे, मंदिरे, पाहिला मिळत एवढीच अपेक्षा 👍

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद. आपल्या अपेक्षा नक्कीच पुर्ण करू. शेअर आणि सबस्क्राईब करून आमच्या कार्यास सहकार्य करावे हीच विनंती😊

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर वर्णन व आपला आवाज सुंदर आहे.

  • @sunitakadam4007
    @sunitakadam4007 ปีที่แล้ว +1

    Mast🙏🙏🙏👌👌👌👌

  • @sanketangal5686
    @sanketangal5686 2 ปีที่แล้ว +2

    Our grandmother village and thanks value maama

  • @sunitajadhav9842
    @sunitajadhav9842 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती सांगितली आणि अजूनही इथे सगळे सण उत्सव पानसे कुटुंबीय साजरा करतात हे ऐकून समाधान वाटते असच पुढच्या पिढीनेही करावं

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊
      अशा अनेक व्हिडिओसाठी कृपया Subscribe करा.

  • @ashwinikale9436
    @ashwinikale9436 3 ปีที่แล้ว +3

    Mazhe village ahe he....sonori😊👍

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 3 ปีที่แล้ว +2

    आता हे दुरुस्त करणे खरच कठीण आहे. लोकांनी देवळांना मदत करण्याबरोबरच यांना द्यावी.

  • @samadhanshinde9652
    @samadhanshinde9652 2 ปีที่แล้ว +1

    khup junya ani baryach janana mahit naslelya vadyachi mahiti sangitle Dada. thanks👌👍

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว

      Thanks 😊
      Please share and subscribe 😊

  • @sanketangal5686
    @sanketangal5686 2 ปีที่แล้ว +1

    Very good information

  • @yuvrajkunjir3843
    @yuvrajkunjir3843 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे

  • @shivanyabittu-33
    @shivanyabittu-33 2 ปีที่แล้ว +1

    Amcha vadhyala pn bhet dya shrimant sardar shitole wada
    Ankali

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว +1

      Nakki deu.
      Saswadmadhye sudhha aamche ek mitra Bhushan Shitole ahet😊

  • @artorcraft6045
    @artorcraft6045 2 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ अच्छा बनाया लेकिन बॅकग्राऊंड म्युझिक बहुत जादा है इसलिये मजा कम हो गया

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว

      Ok. Will take care of that in d next video

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  3 ปีที่แล้ว

      Thank you. Please share and subscribe 😊

  • @akashdeshmukh1023
    @akashdeshmukh1023 3 ปีที่แล้ว +1

    Superb ❤️

  • @aditibedekar8604
    @aditibedekar8604 11 หลายเดือนก่อน +1

    हा वाडा कोणालाही जाण्यासाठी खुला आहे का? नसेल तर कोणाशी संपर्क करावा लागतो?

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  11 หลายเดือนก่อน

      हो वाडा सर्वांसाठी खुला आहे. येथे पानसे कुटुंब राहते. आपण त्यांची परवानगी घेऊन वाडा पाहू शकता

  • @shivanyabittu-33
    @shivanyabittu-33 2 ปีที่แล้ว +1

    Punya madhlya pn sardar shitole wada la bhet dya kasba peth pune

  • @shubhamtirmale4290
    @shubhamtirmale4290 3 ปีที่แล้ว +2

    सर तुमच्या मोबाईल नंबर मिळेल तर बरे होईल