ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

सरदार पुरंदरे वाडा सासवड | Sardar Purandare Wada from Tumbbad |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2020
  • Sardar Purandare Wada from Tumbbad movie Finally Revealed
    मी पुरंदरे वाडा बोलतोय : • सरदार पुरंदरे वाडा सास...
    सासवडच्या इतिहासातील मानाचे स्थान : सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांचा वाडा.
    तुंबाड या नुकत्याच आलेल्या भयपटामधील बराचसा भाग चित्रित केलेल्या, गेली ३०० वर्ष मानाने उभ्या असलेल्या या वास्तूविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमधून.
    पुण्यापासून पूर्वेस तीस किलोमीटर अंतरावर सासवड गावी, कऱ्हा नदीच्या काठावर सरदार पुरंदरे यांचा भुईकोट वाडा आहे. अंबारीसह हत्ती जाईल अशा सुमारे पंचवीस फूट उंचीच्या दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर पुण्याच्या शनिवारवाड्याचा जणू जुळा भाऊ असा पुरंदऱ्यांचा वाडा दिसतो. शनिवारवाड्याच्या २० वर्षे आधी १७०७ साली बांधलेला हा वाडा.
    दोहो बाजूंस अष्टकोनी बुरुजांची वास्तुरचना, दहा फूट उंचीची चौकट आणि तिला घट्टारलेली गजखिळ्यांनी युक्त दारे वाड्याच्या संरक्षणासाठी सज्ज आहेत जणू! दोहो बाजूंस तटबंदीच्या सुमारे पंचवीस फूट उंचीच्या रुंद भिंती, त्यास जोडणारे बुरुज आणि प्रत्येक कोपऱ्यावर व मध्यभागी पंचकोनी सज्जे हे तत्कालीन वास्तुरचनेचे वैशिष्ट्य सांगून जातात. दरवाज्यावरील गणेशपट्टी आणि नक्षीकाम मनास सुखावते. मात्र वाड्यात एकही वास्तू शिल्लक दिसत नाही. परंतु वाड्याचे विस्तीर्ण स्वरूप पाहिल्यावर त्याची त्या काळी असलेली ऐतिहासिक उभारणी लक्षात येते.
    वाड्याचे पूर्ववैभव अंशत: जरी शिल्लक असले तरी त्यात एकेकाळी वास्तव्य करणाऱ्या अंबाजीपंत व त्र्यंबकपंत पुरदऱ्यांच्या स्वराज्यनिष्ठेचा व कर्तृत्वाचा वैभवशाली इतिहास अक्षय टिकून राहिला आहे. निष्ठा, नम्रता, ऋजुता, सर्जनशीलता, सुसंस्कृतता लेखणीने, वाणीने आणि समशेरीने सिद्ध करणारा पुरंदरे घराणे मराठ्यांच्या इतिहासात अपूर्व व अजोड असे होऊन गेले.
    #saswad #tumbbad #purandarewada #purandar

ความคิดเห็น • 30

  • @minglish24
    @minglish24 3 ปีที่แล้ว +1

    Sardar Purandare Wada Saswad : th-cam.com/video/hQfGp0TyCeg/w-d-xo.html
    मी पुरंदरे वाडा बोलतोय. पुरंदरे वाड्याचे मनोगत पहा आमच्या चॅनेलवर😊

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 ปีที่แล้ว +1

    Khoop. Sundar.

  • @nitinbankar2892
    @nitinbankar2892 2 ปีที่แล้ว +1

    पूणे येथील विमानतल जैसे पूणे पासून दूर आहे तसेच पुरंदर चे विमानतल सासवड पासून 25 किलोमीटर दूर हवे तेव्हा सासवड रेड झोन पासून वाचेल व पूणे सारखी महानगरपालिका होईल याचा कोणीच विचार केलेला नाही

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว

      कदाचित आपले विचार प्रतिनिधी वाचतील

  • @artjaydeep3568
    @artjaydeep3568 3 ปีที่แล้ว +1

    ♥️♥️♥️

  • @ronakpatil1
    @ronakpatil1 10 หลายเดือนก่อน +1

    Tumbaad picture ne ya vadya la vegla drishtikon dila😅

  • @nileshgurav5897
    @nileshgurav5897 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ दर्जा वाडवण्याचे पर्याय नाही येत आहे. तुम्ही कमी दर्जाची फाईल upload केली आहे का? जर हो तर कृपया उच्च quality ची फाईल upload करा.

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  ปีที่แล้ว

      Thanks for letting us know Nileshji. We are in the process of creating a new video for the same as we have some more video recording that is not a part of this video. We are taking care of the quality as all videos are uploaded in 4k now.

  • @MrYtbr-vv9ie
    @MrYtbr-vv9ie 2 ปีที่แล้ว +1

    Sir mukhya Ambari darvajyachi chawi konakade aste. Tithlya sthanik lokankade asti ka jar amhi tithe alo tar Detil ka main wadya chya aat nahi pan Fakt Baherun baghnyachi tari ichha ahe sir plz sanga

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว

      दादा मुख्य दरवाजाची चावी पुरंदरे परिवाराकडेच असते. सध्या स्थानिक लोकांनाही जाण्यास परवानगी नाही. मी या वाड्याशेजारीच राहतो. सध्या वाडा सगळ्यांसाठी बंद आहे.

    • @MrYtbr-vv9ie
      @MrYtbr-vv9ie 2 ปีที่แล้ว

      @@MarathiMatter24 sir mandir chya side cha darvaja pan band ahe ka me TH-cam var Khup videos pahilhe tyat Loka blue gate chya aat jat ahet

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว

      हो सध्या दोन्ही बाजुंनी प्रवेश बंद आहे. दरवाजा कधी उघडतील सांगू शकत नाही.

    • @sinchanfan8188
      @sinchanfan8188 2 ปีที่แล้ว

      @@MarathiMatter24 aho dada opposite side ne jithe Ghara ahet tithun Jau shakto na apan Fakt main gate jar pahayycha asel tar Karan tummabd movie madhe main gate dakhavla ahe na tya mule main gate Khup lokanna pahaycha asta me gelo hoto tar opposite side ne buildings ahet tithun mokla rasta hota jayla
      th-cam.com/video/BskrhuAhxTg/w-d-xo.html
      Yat drone view madhe apan Bgu shakta white-red building samorun apan Jau shakto te. Hona sir?

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 ปีที่แล้ว

      Kadhi Gela hotat aapan?