ही मुलाखत मी अपघातानेच ऐकली आणी डाॅ. साळुंखे हे ज्ञानतपस्वी मला आधी कसे कळले नाही याचे आश्चर्य करीत राहिलो. नंतर लगेचच त्यांची दहा पुस्तके आणून वाचली व मी स्तिमित झालो. नंतर यु ट्युबवर त्यांची काही व्याख्यानेही ऐकली आणी एका अत्यंत ज्ञानी, संपूर्ण तटस्थ, अतिशय नम्र, करूणेने युक्त, सुडाची भावना अजिबात नसलेल्या, माणूस बदलण्यावर ठाम असलेल्या, कसल्याही प्रलोभनाला बळी न पडलेल्या अशा एका अलौकीक व्यक्तीमत्वाशी आपली ओळख झाली आहे हे लक्षात आले. डाॅक्टरांचे संस्कृतवरचे प्रभुत्व व त्यांचे शुद्ध मराठी ऐकणे हे अगदी विशेष आहे. आता त्यांची बाकीची सर्व पुस्तके लवकरच वाचायची आहेत. तात्यांना मनापासून त्रिवार नमस्कार. 🙏🙏🙏
प्रिय परुळेकर सर, नितांतसुंदर मुलाखत. परंतू त्याहून सुंदर तुम्ही जी प्रस्तावना तात्यांच्या बद्दल केली ती होय. मानवता जपणारा हर ऐक व्यक्ति आपला कृतज्ञ आहे. धन्यवाद ❤❤
अतिशय ज्ञानवर्धक मुलाखत आहे. आ. ह. साळुंखे सर विचारवंत लेखक आहेत. म. बुद्धांनंतर म. बसवेश्वर समतावादी क्रांतिकारक होते, वचन साहित्याचा वारकरी संप्रदायावर खूप मोठा प्रभाव पडला आहे हे सर्वश्रुत आहे. म. बसवेश्वरांचा उल्लेख हवा होता अशी छोटी अपेक्षा होती. परूळेकर सरांनी उत्तम मुलाखत घेतली. धन्यवाद
डॉ. आ. ह. साळुंखे यांना राष्ट्रीय स्तरांवरील सर्वोत्तम पुरस्कारांनी सन्मानित केलंच पाहिजे जेणेकरुन सर्व समाजातील सर्व लोकांपर्यंत त्याचे अभ्यासपुर्ण लेखन पोहोचेल. श्री राजु परुळेकर सरांचे खुप खुप धन्यवाद. 💐🙏🏻
अशिक्षित पालक व ग्रामीण भागातून आल्याने मी तरुण वयात अनेक बाबतीत भांबावलेला,confused, अर्धवट होतो. पण तात्यांची पुस्तके तरुण वयातच वाचल्याने माझं जीवन जास्त enlightened झाले व विचारपद्धती जास्त चौकस, तर्कावर आधारित झाली. तात्यांना माझं वंदन.
ही मुलाखत ऐकून खरोखरच वाटते की गेली हजारो वर्षे बहुजनांचे किती मानसिक शोषण केले गेले आहे आणि अजूनही चालू आहे. तपस्वी साळुंखे सरांचे विचार प्रत्येक बहुजनापर्यंत पोहोचण्याचे काम होणे गरजेचे आहे.
माझ्या सारख्या पुरोगामी विचारांच्या तरूणाचे आर्दश असलेल्या प्रा.हरी नरके सर , डा. आ.ह. साळुंखे सर यांची आपण मुलाखत घेतली, ती अतिशय प्रेरणादायी होती. अशीच प्रा. रावसाहेब कसबे सरांची मुलाखत घ्यावी ही विनंती 🙏 त्याचे विचार ऐकण्याची संधी मिळावी.
अतिशय सुंदर मुलाखत परुळेकर सर आपण या महान ज्ञानरूपी सागराची ओळख करून दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार .साळुंखे सर व आपल्यासारखे काही लोक समाजात आरसा, सत्य दाखवण्याचे काम करत आहेत यामुळेच एका आदर्श समाजाची निर्मिती होण्याची स्वप्न आम्ही चिकित्सक व सत्यशोधक विचारांची लोक पाहू शकतो. आपण आपले काम असेच चालू ठेवावे . आदर्श मानवतावादी, विज्ञानवादी विचार असणाऱ्या एक समाज आपणास आदर्श मानतो. फुले ,शाहू ,आंबेडकर ,बुद्ध हे पुन्हा निर्माण होऊ शकत नाही मात्र त्यांचे आदर्श विचार जिवंत ठेवण्याचे काम आपल्या माध्यमातून होते त्यामुळेच आपण आमचे आधुनिक आदर्श आहात.
आ. राजू परुळेकर सर आपले मनःपूर्वक आभार. डॉ. आ. ह. साळुंखे या महान तपस्वीची घेतलेली ही मुलाखत आम्हा सामान्यांच्या जीवनात उजेडाच्या नवीन वाटा घेऊन येणारी ठरते. 🙏🏻💐
राजू परुळेकर सर, तुम्ही आधुनिक काळातसुद्धा तात्यासाहेबांची सखोल मुलाखत घेऊन निखळ सत्य आपण उजागर करून खूप महान कार्य तात्यासाहेबांच्या माध्यमातून केलेले आहे. मी आपणास नमस्कार करतो.
त्यांना ऐकणं हाच एक अनुभव होता.तुमचे प्रश्न, त्यातून आपल्या सारया समजुतीना लागणारे तडे हे सगळं विलक्षण होतं.हि मुलाखत पुन्हा पुन्हा ऐकवी.मनापासून आभार राजू परूळेकर सर.
मला खूप कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं...की माझ्या आयुष्यात आज या क्षणी मला अशा विचारवंतांना, लेखकांना ऐकता आलं...ही मुलाखत मी अनावधानाने पाहिली आणि पूर्ण झाल्यावर असं वाटतं की नक्की काहीतरी चांगलं हरवून बसलो असतो.तेव्हा खूप खूप धन्यवाद ह्या अश्या व्यक्तीमत्त्वांशी अंशतः का होईना ओळख करून दिली.
आमच्यासारख्या अल्पशिक्षित आणि अल्पवाचन असलेल्या लोकांना डॉ. साळुंखे याचा इतका सुंदर परिचय करून दिल्याबद्दल किती आभार मानावेत? राजू भाई, ही फक्त त्यांची ओळखच नाही, तर त्यात तुमचेही विचार समजतात आणि त्यासाठी देखील तुम्हाला सलाम. तुमच्यासारखे जाती-धर्मच्या भिंतीपलीकडे जाऊन वास्तव समजावून घेणे फारच थोड्यांना जमते. समाजाला चांगुलपणाची दिशा दाखविण्यासाठी डॉ. साळुंखे आणि तुमचे आभार.
आदरणीय तात्या,ज्या प्रकारे मुस्लिम धर्मा मध्ये २-३ महिने ते आपल्या मुलांना मुस्लिम धर्म जाणून घेण्यासाठी जमात ला जातात त्याच प्रमाणे आम्ही सर्व बहुजन लोकं आपल्या मुलांना हे सर्व ज्ञान कमविण्यासाठी आपल्या सारख्या ज्ञानी लोकांकडे पाठवू माझी विनंती. आहे तात्या तुम्ही आहात हरी नरके सर या सारखे असंख्य प्रेरणादायी लोकांनी असे व्यासपीठ सुरू करावे ज्या ठिकाणी आम्ही आमचे मूल शिकायला पाठवू ही विनंती
त्या माणसाला म्हातारपणात तरी थोडीशी विश्रांती मिळू द्या. ऊस गोड लागला म्हणून मूळासकट खाऊ नका. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातूनही पुष्कळसे प्रबोधन होऊ शकते. आता आपणच एकत्र येत अभ्यासने उभारायला हवीत.
खुप छान मुलाखत, डाॅ आ ह साळुंखे यांचे विचार ऐकणे ही पर्वणीच, प्रवाहा विरूध्द लिहिणारा लेखक,विचारवंत म्हणून आणि आपली बाजू खंबीरपणे, अभ्यासपूर्ण मांडणारा लेखक म्हणून मला ते आवडतातच,पण काळा चश्मा डोळ्यावर चढवलेल्या लोकांना ते सहन होणे कठीण. राजू परूळेकर यांनी मुद्देसूद मुलाखत घेऊन तीची ऊंची वाढवली. दोघांचेही खूप खूप आभार
डॉ. आ. ह. साळुंखे सरांना पहिल्यांदा ऐकल....आज कळाल ही एवढी मोठी माणसे असतात पण किती ते संयमी आणि नेहमी या लोकांचे पावले जमिनीवर असतात. सरांसारखे लोक या काळात क्वचितच बघायला मिळतात. सर्वात म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहणे हे कुणालाही नाही जमत. ❤
सन्माननीय परुळेकर साहेब या क्षणी मी आपण घेत असलेल्या तात्यासाहेब आ. ह.साळुंखे सरांची जी मुलाखत घेत आहात ती मी बघतोय आणि ऐकतोय. आज दुपारीच मी दिवंगत हरी नरके सर यांची जी मुलाखत आपण घेतलीत टी मी संपूर्ण बघितली.पुरोगामी,सत्यशोधक,परिवर्तनशील विचारवंत लेखक,साहित्यिक यांच्या मुलाखती घेऊन सत्य समोर आणण्याचं जे कार्य आपण समाजाच्या समोर आणण्याचं कार्य करीत आहात बहुजन समाजाला जागृत करण्याचे काम आपण करत आहात हे अतिशय पवित्र असं मानवतावादी भूमिकेतून करत आहेत त्या बद्द्ल आपले अभिनंदन आणि आभार. निर्मीक आपणास उदंड आयुष्य आणि आरोग्य प्रदान करो हीच मनोकामना.
राजु भाऊंनी घेतलेली आ.हं.ची दिर्घ मुलाखत, आज ऐकली. खूप आवडली.एका बाजुला आ.हं.ची नम्रता तर दुसरीकडे राजु भाऊंना वाटणारा त्यांच्याविषयीचा आदर या दोन भावनांच्या स्पंदनावर ही मुलाखत हिंदोळे घेत होती आणि त्यातुन मानवी प्रज्ञेचा चार्वाक ते आंबेडकर असा प्रवास उमलंत होता व तिचा वैचारिक सुवास ऐकणाऱ्यांच्या मनात दरवळत होता. ज्यांना इतरांना प्रबुद्ध करायचे आहे व ज्यांना प्रबुद्ध व्हायचे आहे त्यांच्यासाठी हा झालेला विवेकानंदी खटाटोप आहे. हा खटाटोप यशस्वी होणं अखिल मानवजातीसाठी गरजेचं आहे. या दोघांनाही मी नम्रतापुर्वक धन्यवाद देतो आणि आ.हं.ना अजून पुरेसं आयुष्य व आरोग्य लाभावे अशी सदिच्छा व्यक्त यासाठी करतो की आ.हं.च्या उत्क्रांतीतुन राजु भाऊंना क्रांती व्हावी. जय भारत ! जय संविधान !!
श्री राजू परुळेकर जी, तुम्ही अत्यंत अप्रतिम मुलाखत घेतली आहे. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या सारख्या ज्ञानसूर्याची प्रतिभा अफाट आहे...हे यातून जाणवले.....एकच विनंती तात्यांच्या मुलाखती ची एक मालिका ( जमले तर त्याच्या निवडक आणि महत्त्वाच्या ग्रंथावर) सादर करू शकाल का?? जेणे करून त्यांनी लिहून ठेवलेल्या साहित्याची चर्चा आणि ओघाने त्याचे विचार मंथन करून....पर्यायाने निघालेले ज्ञानामृत आमच्या सारख्या सर्वसाधारण माणसांना ग्रहण करता येईल ही एकच आणि कळकळीची विनंती.
मी प्रथम धन्यवाद राजू परुळेकर सर यांना धन्यवाद देतो कारण ही मुलाखत you tube la टाकली अशी मुलाखत पाहणे हा अंतर्मुख करणारी आहे. तात्या विषयी धन्यवाद शब्द अपुरे आहेत, त्यांचे उपकार आहेत.
आजच्या वाचन संस्कृती लोप पावत चाललेल्या काळात या मुलाखती च्या माध्यमातून का होईना डॉ. आ. ह.साळुंखे (तात्या) यांचं विचारधनं आमच्या तरुणांपर्यंत पोहण्यासाठी आपण केलेला प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद..👍 अजुनही त्यांच्या मुलाखत घेऊन पुढे हा प्रयत्न केला तर आपले खूप आभार..
ज्ञानतपस्वी सत्यशोधक आ.ह.साळुंखे सर, तुम्हीं शोधलेलं सत्य आणि आता आमच्या धडावर आमचंच धड राहील यासाठी आपण घेतलेलं कष्ट हे अखंड बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आणि उत्थानासाठी सतत अत्यावश्यक असतील... जय जिजाऊ..जय शिवराय..जयभीम..! ✊
हा संवाद संपूच नये असं वाटत होतं.अतिशय सुंदर शांत संवाद. तात्यांबद्धल आदर आणखी वाढला. येणाऱ्या काळात त्यांनी लिहिलेली सर्व पुस्तके वाचून काढणार नक्की. खूप खूप धन्यवाद ही पर्वनी दिल्या बद्धल 🙏❤
हा प्रचंड अभ्यास आहे, ज्या बद्दल आमच्या पिढीला खूप कमी माहीत आहे हे खूप खेदजनक आहे. आम्ही खरचं तात्यांचे खूप ऋणी आहोत की त्यांनी आम्हाला त्यांचा अभ्यास आणि ज्ञान उपलब्ध करून दिले आहे 🙏🙏
मानव विवेक बुद्धी व विचारवादी होण्यासाठी आपण करीत आहात त्याबाबत धन्यवाद. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठे्वणार्या तरुण पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोन, बुध्दीवादी होण्याचीअत्यंत निकड आहे तरच जगाचा आदर्श होईल.
शेवट फार अप्रतिम केला परुळेकर सर. तात्यासाहेब यांचे विषयी काही बोलणं म्हणजे सुर्यास दिवा दाखवल्या सारखं होईल. मन कसं प्रसन्न झालं. खुप खुप धन्यवाद 🌹🌹🌹🙏🙏🙏
प्रिय राजु, टि.व्ही. न पहावे असेच दिवस आहेत . अश्या वेळी एका ज्ञानतपस्व्याचे मनोज्ञ दश॔न घङवले. धन्यवाद. या नंतर तात्याचे जे नायक आहेत त्यांच्या बाबतीत एक एक भाग करावेत. संत बसवेश्र्वर , श्रीकृष्ण आणि राम यांना तात्यानी वेगळ्या भूमिकेत मांडले आहे. ते ही तुम्ही तात्याना बोलते करून आमच्या समोर आणावे ही विनंती.
डॉ.अ.ह.सांळुके यांची पुस्तके मी वाचली आहेत परंतु यूट्यूब मुलाकात ऐकताना मला राजु परुळेकर हेही मला कळाले तसे नांव एकून होतो त्यांनंतर यूट्यूब तुम्हांला पाहिले तुमचे विचार पटले तुम्हचे अभिनंदन
🙏🙏🙏. Sir. मला तुम्हाला तात्या असे बोलताना फारच आनंद होत आहे. कारण मी तुम्हाला आज पहिल्यांदा पहिले. खरंच सांगते मला तुमचे साहित्य अलीकडेच माहित झाले आणी माझी वाचनाची आवड आजून वाढली. तुम्ही ग्रेट आहात. तुमच्या मुळे आम्हाला खरा इतिहास समोजतो आहे. नही तर आमची आवस्ता मेंढरा सारखीच.
अस म्हणतात की, कोणतेही पुस्तक वाचताना त्या लेखकाच्या/लेखिकेच्या विचारधारेत वाहायला लागत आणि त्यामुळे सत्य दूर जाण्याची शक्यता असते किंबहुना आपण सत्यापासुन दूर जाण्याची शक्यता असते. पण इथे लेखकानेच कोणतेही पुस्तक लिहिताना सत्याची काठ सोडली नसल्याने विचारधारेत जरी वाहत गेलो तरी देखील योग्य ठिकाणी पोहोचनार याची भीती मात्र नाहीशी झाली. असो, राजू सरांचे खुप खुप आभार आणि डॉ. सालुंखे सरांना विनम्र अभिवादन.
मी कॉलेज ला असताना बहुजनवादी विरोधी संघटना, संस्थांच्या संपर्कात आलो.... त्यावेळेस त्यांनी तीन नावे सांगितली की जी हिंदु धर्म विरोधही आणि नास्तिक आहेत.... आणि जणू काही ती दहतशद्वाद्यांपेक्ष्याही भयानक आहेत असं बिंबवले गेले....मी त्यातील दोघांचे विचार व्हिडिओ मार्फत पाहिले, ऐकले तेंव्हा खुप आश्र्चर्य वाटले कारण जसं सांगितलं तसे काहीच आढळले नाही उलट संत तुकाराम महाराजांना मानणारे आहेत हे समजले....ती दोन नावे होती - दाभोलकर, श्याम मानव आणि आज तिसरे नाव असणारे महान व्यक्ती ऐकले - आ. ह. साळुंके.... खुप छान वाटले मुलाखत ऐकून... विशेषतः परुळेकर सरांना खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा.....
सातारा येथील असून सुद्धा आजवर ह्या थोर माणसा बद्दल माहिती न्हवती तसेच त्यांचे साहित्य वाचले नाही याबद्दल वाईट वाटते. असो, आता माहिती झाली आहे त्यांची सगळी पुस्तके वाचायचे ठरविले आहे. साताऱ्यात गेल्यावर भेटण्यासाठी जरूर प्रयत्न करेन. चांगले आरोग्य लाभो ही सदिच्छा 💐🙏
मी मुलाखत ऐकत असताना खरं म्हणजे की मुलाखत नव्हती तर मानवी जीवनाचा प्रवाह कसा असावा मानवी जीवनावर कसे आघात झाले आणि मानवी जीवन घडण्यासाठी काय करावे लागते या गोष्टीच तात्या आपल्यासमोर मांडत होत्या हे आपण मन लावून ऐकले असेल हा बोध होतो तात्या आपणाला खूप खूप धन्यवाद
तुमच्या मुलाखती मधूनच खरी माहिती,खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मदत होईल. साळुंखे सर, पूर्णपणे अभ्यास करून विचार मांडले आहेत. बहुजनांना जागे केले आहे.धन्यवाद सर.🙏🙏🙏🙏 परूळेकर सर, तुमच्या मुलाखती मधूनच खरी माहिती खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचला.🙏🙏👌👌
तात्यासाहेब ऊर्फ डॉ. आ.ह. साळुंखे म्हणजे एक थोर विचारवंत तपस्वी इतिहास संशोधक. तात्यासाहेबाची प्रत्येक साहित्य कलाकृती म्हणजे ज्ञानाचा खजिनाच. प्रत्येक पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावे इतके सुंदर आहेत. तात्यासाहेबाना मानाचा मुजरा
खूपच अर्थपूर्ण मुलाखत! डॉ. आ. ह. साळुंखे सरांचे विचार जितके सम्यक तितकीच मुलाखतही सम्यक होऊन खुलत गेली त्याबद्दल परूळेकर सरांचे अभिनंदन व धन्यवाद!💐💐 डॉ. आ. ह. साळुंखे सरांच्या लेखनकार्यास सलाम!💐💐👌👌
आह साळुंखे म्हणजे काय बोलणार! दि ईनसायडरवरच्या मुलाखती पहातो आहे एकेक करुन. अत्यंत सुंदर उपक्रम राबवत आहात. एक मात्र पुन्हा म्हणेन, मुलाखतकाराने अत्यंत कमी शब्दात समोरच्या व्यक्तीला जास्तीत जास्त बोलतं करायला हवं. ही मुलाखत आहे, चर्चा नव्हे. आम्हाला परुळेकर ऐकायचे असतील तेंव्हा आम्ही स्वतंत्रपणे ऐकू. आणि चर्चेच्या स्वरुपात ही मुलाखत आहे असं समजलं तरी ती चर्चा ही चर्चा असावी. बाळबोध भाषेत असावी. अत्यंत जड विषय देखील सामान्यांपर्यंत सहज पोहचायला हवेत. चर्चा ही चर्चा असते, पांडित्य प्रदर्शन नव्हे. असं मला वाटतं. शेवटचं वाक्यच पहा परुळेकरसर तुम्ही. "होर्डिंग्ज आणि फ्लेक्स पाहुन रक्त आत वहात नाही, भळभळत नाही. एक शांत करुणेचा स्त्राव होत असलेला विद्रोही अनुस्फोट आमच्या मनात तुम्ही तुमच्या लिखाणातनं करत रहा… …" वगैरे वगैरे. आता जर तुम्हीच तुमच्या अशा वाक्यांवर खुश असाल तर मग पुढे बोलणंच खुंटले. जे वाटलं ते स्पष्ट लिहिलेय. कारण सुरेख एपिसोड आहेत सर्व. ते आणखी सुंदर व निर्दोष व्हावेत ही ईच्छा आहे. तसे तर मग शेकडो चॅनेल रोज मुलाखतींचे रतिब घालतच आहेत युट्युबवर. दि ईनसायडरच्या पुढील सर्व भागांना शुभेच्छा!
सध्याचे कीर्तनकार अभंग गाथा हरिपाठ यांचा अभ्यास आणि पाठांतर करतात या बरोबर अ ह साळुंखे यांची पुस्तके अभ्यासणे महत्त्वाचे आहे जेणेकरून संतांचा विचारांचा उद्देश लक्षत यऊन जनतेपर्यंत पोहोचवणे सोपे जाईल
अतिशय चिकित्सक व विवेचक मांडणी केलीत सर; उत्तुंग आंतरज्ञानाचा समाधानी आदर्श निकोप जीवनपद्धतीचा माउली मार्गच अतिव जिव्हाळयाने मांडलात सर. अनेक तर्क व इतिहास विष्णूच्या किंवा वामणाचया बाबतीत मिळतील मात्र पण विठोबाच्या विशुद्ध पवित्र, प्रसन्न समाधानी चैतनयदायी जीवनपद्धती च्या भावाची सर वरील दोघांच्या बाबतीत किंचितही येणार नाही. अगणित असंख्य नैसर्गिक आंतरिक उर्मी हजारो वर्षे प्रयत्न करूनही मुळासकट उखडुन टाकता येत नाहीत. अन् एखाद्या माणसाकडे किंवा वयवसथेकडे अफाट संपत्ती, सत्ता असुनही मुलभूत नैसर्गिक आंतरिक पावित्र्य, प्रसन्नता व परजेचया समाधानी जीवनात अडसर जाणीवपुर्वक निर्माण करित असेल तर तिच्या अस्तित्वाला काहिही अर्थ उरत नाही. लोक त्या व्यवस्थेला यत्किंचितही कल्याणकारी राज्य म्हणत नाहित. असंख्य गुलामीचे प्रयत्न केले तरी 'अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी 'याप्रमाणेच असंखय वारकरी संत व जगद्गुरू तुकोबाराय यांनी तो उत्कट भाव ओळखला, फुलवला, फळवला असंख्य पुढच्या पिढ्यांना स्वाधीन केला त्यामुळेच जगातली कुठलीही ताकद विठोबाच्या चैतनयदायी तत्वज्ञानभावाला पराभूत किंवा अस्तित्वहिन करू शकली नाही. एकीकडे जगातील वैदिक यज्ञसंसकृती व विविध विषमतावादी हुकुमशाहया व कुराजये लोकांनी उलथून टाकल्याचे व त्यांना विस्मृतीत टाकत असल्याचे दिसून येत आहे. पन याउलट विठोबांचा विश्व आदर्श समताततवज्ञाननभाव अभंग व अखंड लोककल्याणकारी पृथ्वीच्या ज्ञात इतिहासात ऐकमेवादवितीय राहिल्याचे दिसुन येते आहे असे मला वाटते.फुलाशिवाय सुगंध नाही मणजेच तथागत गोतम बुध्द सांगतात त्याप्रमाणे कारणाशिवाय कार्य नाही. हि बूधदांची कार्यकारणभावाची बाबच विठोबाच्या भक्ती किंवा भावामागे आहे अन् याच कारणकारयभावाचा शोध संशोधन 2005 मध्येच 'संत, लोकायत चार्वाक, विठोबा, तुकोबा,वैरोचणी बुधद्, तथागत वैरोचण शिवधरमगाथाकार ,विठ्ठलगाथाकार,मावेली व संविभागी साहित्य माउली डाॅ. आ. ह. साळुंखे सर यांनी 'बळीवंश 'या 'संविभागी विठठलगाथेतुन 'लावलेला आहे असे माझे ठाम मत आहे. विठ्ठलाचे पणजोबा, आजोबा वडिल, दोन चुलते, पंजी व आईचा व विठोबाच्या मुलाचा अर्थात शरीरवंशाचा, विचारवंशाचा "सर्वोत्तम समताभुमी सिंधु संस्कृतीशी ",शिव पार्वतीशी, निऋतिशी चार्वाक प्रल्हाद, विरोचन, सांखय प्रवर्तक कपिल अन् "तथागत वैरोचण ",'वैरोचणीबुध्द 'यांचा विश्व आदर्श एकमेवाद्वितीय वसुनिषठ इतिहास सिध्द केला आहे यात मला तिळमात्रही शंका वाटत नाही.
आदरणीय डाॅ.आ. ह. साळुंखे सर आपणास मी कोटी कोटी वंदन करतो. आपल्या सारखे सत्य इतिहास लेखक मी पाहिला नाही. एकदा शिंदखेड मध्ये मला आपले व्याख्यान ऐकण्याचे सौभाग्य लाभले, धन्य झालो. माझ्या मनात प्रत्यक्ष भेटण्याची तीव्र ईच्छा होत आहे.
सरांची वाणी, विचार इतकी स्पष्ट, रसाळ, नम्र, परखड आहे की ही मुलाखत संपूच नये, असं वाटत होतं. जीवनाच्या, समाजाच्या विविधांगी पैलूंना, विषयांना स्पर्श करत भाष्य ऐकतच रहावे आणि हा ज्ञानाचा स्रोत अखंड वाहत राहो असं मनापासून वाटत होतं. हे विचार पुढील अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचावे अशीच कामना...💐
मी फक्त aikun होतो तात्या baddal parantu खुप खुप धन्यवाद parulekar साहेब आपल्या मुळे आज एवढ्या मोठ्या dnyan tapsvi la aikyache bhagya मिळाले व त्यांची pustkanbaddal माहीती mialali
खूपच सुरेख!!! अगदी करकरीत उन्हातून आल्यावर वर माठातले थंडगार पाणी पिल्यावर जसे तृत्प झाल्यासारखे वाटते तसाच अनुभव होता. इतक्या प्रेमळ भाषेत कुणी विद्रोही विचार सांगितला असेल असे वाटत नाही.
अप्रतिम. आपल्यासारखे ज्ञानतपस्वी आपल्या समाजात आहेत हेच समाजाचे मोठेपण आहे. आपण असेच लिहित असावे हीच अपेक्षा. आपल्याला निरागी दिर्घआयुष्य लाभो हिच प्रार्थना.
अभ्यासपूर्ण ज्ञानाच भांडार जवळ असूनही इतक्या विनम्रपणे आणि विशेषतः कोणाचाही अनादर होणार नाही याचे भान ठेवून व्यक्त होणारा साळुंखे सरांसारखा विचारवंत विरळाच!
मी ही आणि आमचे काही मित्र पत्रकार आम्ही भेटलो होतो तात्यांना आणि आम्हाला अभिमान वाटतो आम्ही कुठं ही भरकटलो नाही त्यांच,, विद्रोही तुकाराम " हे पुस्तक आहे थोडफार वाचलं आहे, तात्यांना खर तर महाराष्ट्र भुषण पुरस्कार द्यायला हवा पण देशातील राजकारण फारच घाणेरडया स्थितीत आहे,, तात्यांना आणि पुरुळेकर sir तुम्हाला प्रणाम 🎉
पुरुळेकर सर खूप खूप धन्यवाद आपण ही मुलखात उपलब्ध करून दिली....मुलाखत बघत असताना साळुंखे सरासारख्या लेखकांचे साहित्य आपण वाचलेच नाही ..ही कमी पणाची भावनाक्षणोक्षणी येत होती
मी त्या सर्व श्रोत्यांचे अभिनंदन आणि धन्यवाद करेन ज्यांनी ही मुलाखत सुरुवात ते शेवट सलग पाहिली. विचार करायला भाग पाडते ही मुलाखत. आपण आणि नव्या पिढीने पुस्तकांशी मैत्री करणे खूप गरजेचे आहे.
th-cam.com/video/pL5L7b4HRXo/w-d-xo.html
,
ही मुलाखत मी अपघातानेच ऐकली आणी डाॅ. साळुंखे हे ज्ञानतपस्वी मला आधी कसे कळले नाही याचे आश्चर्य करीत राहिलो. नंतर लगेचच त्यांची दहा पुस्तके आणून वाचली व मी स्तिमित झालो. नंतर यु ट्युबवर त्यांची काही व्याख्यानेही ऐकली आणी एका अत्यंत ज्ञानी, संपूर्ण तटस्थ, अतिशय नम्र, करूणेने युक्त, सुडाची भावना अजिबात नसलेल्या, माणूस बदलण्यावर ठाम असलेल्या, कसल्याही प्रलोभनाला बळी न पडलेल्या अशा एका अलौकीक व्यक्तीमत्वाशी आपली ओळख झाली आहे हे लक्षात आले. डाॅक्टरांचे संस्कृतवरचे प्रभुत्व व त्यांचे शुद्ध मराठी ऐकणे हे अगदी विशेष आहे. आता त्यांची बाकीची सर्व पुस्तके लवकरच वाचायची आहेत. तात्यांना मनापासून त्रिवार नमस्कार. 🙏🙏🙏
अत्यंत सुंदर मुलाखत!
हीच माझीही भावना आहे...
@Mharattha for a new
@Mharattha for
@Mharattha ok
परुळेकर सर तुमच्या निष्पक्ष विचारवंताच्या मुलाखती व आपले निष्पक्ष विचार ऐकावेसे वाटतात. सर खूप खूप धन्यवाद.
डॉ.आ.ह.साळुखे थोर विचारवंत आहेत, बहुजन समाजातील लोकांनी अभिमानाने स्विकारले पाहिजे
प्रिय परुळेकर सर,
नितांतसुंदर मुलाखत. परंतू त्याहून सुंदर तुम्ही जी प्रस्तावना तात्यांच्या बद्दल केली ती होय.
मानवता जपणारा हर ऐक व्यक्ति आपला कृतज्ञ आहे.
धन्यवाद ❤❤
❤👍
तात्या साहेबांना साष्टांग दंडवत, राजू सरांना नमस्कार .
डॉ. आंबेडकर जयंती दिवशी तात्या साहेबांची मुलाखत ऐकायला मिळाली . राजू सर खूप आभारी आहोत .
तुम्हाला ऐकणे म्हणजे अमृताहून मधुर व विचार वजराहून टणक, कृज्ञतापूर्वक नमस्कार.
राजू जी तुम्हाला ही सलाम
श्री आ.ह. साळुंखे हे फार अभ्यासू लेखक आहेत. सर्वांनी त्यांची पुस्तके जरूर वाचावीत. सत्याची ओळख होईल.
द्वेषातून लिहिले गेलेले साहित्य हे कधीच परिपूर्ण नसते, त्याचा वाचक वर्गही मर्यादितच असतो.
परुळेकर सर तुम्ही आदरणीय साळुंखे सरांची मुलाखत घेऊन बहुजन समाजातील लोकांच्या ज्ञानात भर टाकली आहे. धन्यवाद.
अतिशय ज्ञानवर्धक मुलाखत आहे. आ. ह. साळुंखे सर विचारवंत लेखक आहेत. म. बुद्धांनंतर म. बसवेश्वर समतावादी क्रांतिकारक होते, वचन साहित्याचा वारकरी संप्रदायावर खूप मोठा प्रभाव पडला आहे हे सर्वश्रुत आहे. म. बसवेश्वरांचा उल्लेख हवा होता अशी छोटी अपेक्षा होती. परूळेकर सरांनी उत्तम मुलाखत घेतली. धन्यवाद
घरातील गहाण ठेवलेला दागीणा लवकर सोडवण्याची तगमग सर्वसामान्यांना असते .मात्र दुस-याकडे गहाण ठेवलेल डोकं आतातरी सोवळ्यातुन लवकर सोडवाव.
खूप छान
चिमणीला देखील चिव चिव न्या चा अधिकार असतो , खूप खूप छान
डॉ. आ. ह. साळुंखे यांना राष्ट्रीय स्तरांवरील सर्वोत्तम पुरस्कारांनी सन्मानित केलंच पाहिजे जेणेकरुन सर्व समाजातील सर्व लोकांपर्यंत त्याचे अभ्यासपुर्ण लेखन पोहोचेल.
श्री राजु परुळेकर सरांचे खुप खुप धन्यवाद. 💐🙏🏻
अशिक्षित पालक व ग्रामीण भागातून आल्याने मी तरुण वयात अनेक बाबतीत भांबावलेला,confused, अर्धवट होतो. पण तात्यांची पुस्तके तरुण वयातच वाचल्याने माझं जीवन जास्त enlightened झाले व विचारपद्धती जास्त चौकस, तर्कावर आधारित झाली. तात्यांना माझं वंदन.
परुळेकर साहेब फार सुंदर मुलाखत आपण घेतली मी साळुंके साहेब ाची मीभुमीपुत्र हा ग्रंथ वाचले आहे धन्यवाद 1:11:06
डाॅ.आ.ह.साळुंखे सरांच्या लिखानाबद्दल नितांत आदर आहे, सरांची ही मुलाखत अभ्यासपूर्ण वाटली.
अतिशय अप्रतिम मुलाखत!👍🏻
आ. ह. सालुंखे सर great!
ही मुलाखत ऐकून खरोखरच वाटते की गेली हजारो वर्षे बहुजनांचे किती मानसिक शोषण केले गेले आहे आणि अजूनही चालू आहे. तपस्वी साळुंखे सरांचे विचार प्रत्येक बहुजनापर्यंत पोहोचण्याचे काम होणे गरजेचे आहे.
धन्य झालो.राजू परुळेकर उत्तम,आतापर्यंत पाहिलेलं अतिशय माहितीपूर्ण मुलाखत.
माझ्या सारख्या पुरोगामी विचारांच्या तरूणाचे आर्दश असलेल्या प्रा.हरी नरके सर , डा. आ.ह. साळुंखे सर यांची आपण मुलाखत घेतली, ती अतिशय प्रेरणादायी होती. अशीच प्रा. रावसाहेब कसबे सरांची मुलाखत घ्यावी ही विनंती 🙏 त्याचे विचार ऐकण्याची संधी मिळावी.
अतिशय सुंदर मुलाखत परुळेकर सर आपण या महान ज्ञानरूपी सागराची ओळख करून दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार .साळुंखे सर व आपल्यासारखे काही लोक समाजात आरसा, सत्य दाखवण्याचे काम करत आहेत यामुळेच एका आदर्श समाजाची निर्मिती होण्याची स्वप्न आम्ही चिकित्सक व सत्यशोधक विचारांची लोक पाहू शकतो.
आपण आपले काम असेच चालू ठेवावे . आदर्श मानवतावादी, विज्ञानवादी विचार असणाऱ्या एक समाज आपणास आदर्श मानतो. फुले ,शाहू ,आंबेडकर ,बुद्ध हे पुन्हा निर्माण होऊ शकत नाही मात्र त्यांचे आदर्श विचार जिवंत ठेवण्याचे काम आपल्या माध्यमातून होते त्यामुळेच आपण आमचे आधुनिक आदर्श आहात.
आ. राजू परुळेकर सर आपले मनःपूर्वक आभार. डॉ. आ. ह. साळुंखे या महान तपस्वीची घेतलेली ही मुलाखत आम्हा सामान्यांच्या जीवनात उजेडाच्या नवीन वाटा घेऊन येणारी ठरते. 🙏🏻💐
राजू परुळेकर सर, तुम्ही आधुनिक काळातसुद्धा तात्यासाहेबांची सखोल मुलाखत घेऊन निखळ सत्य आपण उजागर करून खूप महान कार्य तात्यासाहेबांच्या माध्यमातून केलेले आहे. मी आपणास नमस्कार करतो.
माननीय परुळेकर सर यांना खूप खूप अभिनंदन अशा मुलाखती क्षेत्रात समाज परिवर्तनाची मोठी जबाबदारी तुमच्यावर धन्यवाद सर
साळुंखेसरांचं वय वाढलेलं बघत असतांना त्रास होतो आहे.. सरांवर खूप प्रेम आहे लोकांचं.. काय शानदार असतात हो अशी माणसं.. सलाम!
त्यांना ऐकणं हाच एक अनुभव होता.तुमचे प्रश्न, त्यातून आपल्या सारया समजुतीना लागणारे तडे हे सगळं विलक्षण होतं.हि मुलाखत पुन्हा पुन्हा ऐकवी.मनापासून आभार राजू परूळेकर सर.
मला खूप कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं...की माझ्या आयुष्यात आज या क्षणी मला अशा विचारवंतांना, लेखकांना ऐकता आलं...ही मुलाखत मी अनावधानाने पाहिली आणि पूर्ण झाल्यावर असं वाटतं की नक्की काहीतरी चांगलं हरवून बसलो असतो.तेव्हा खूप खूप धन्यवाद ह्या अश्या व्यक्तीमत्त्वांशी अंशतः का होईना ओळख करून दिली.
प्रस्थापितांच्या रत्न हारा पेक्षा सर्व सामान्य लोकांच्या पायाची धुळ मला मोठी वाटते यातच सरांचे मोठेपण आहे.
सत्य कळाले . मनातील विचार / प्रशनाचे उत्तर मिळण्यास मदत झाले . पुस्तक वाचन करून अधिक सत्यता कळेल. धन्यवाद.
आमच्यासारख्या अल्पशिक्षित आणि अल्पवाचन असलेल्या लोकांना डॉ. साळुंखे याचा इतका सुंदर परिचय करून दिल्याबद्दल किती आभार मानावेत?
राजू भाई, ही फक्त त्यांची ओळखच नाही, तर त्यात तुमचेही विचार समजतात आणि त्यासाठी देखील तुम्हाला सलाम.
तुमच्यासारखे जाती-धर्मच्या भिंतीपलीकडे जाऊन वास्तव समजावून घेणे फारच थोड्यांना जमते.
समाजाला चांगुलपणाची दिशा दाखविण्यासाठी डॉ. साळुंखे आणि तुमचे आभार.
th-cam.com/video/mas1ZZHwQeg/w-d-xo.html
आपले शब्द हे अमृतवाणी प्रमाणे आहेत आ. ह. साळुंखे साहेब खूप छान विज्ञान वादी विचार
आणि तितकीच वैचारिक मुलाकात घेतली आपण परुळेकर सर आपलेही आभार
आदरणीय तात्या,ज्या प्रकारे मुस्लिम धर्मा मध्ये २-३ महिने ते आपल्या मुलांना मुस्लिम धर्म जाणून घेण्यासाठी जमात ला जातात त्याच प्रमाणे आम्ही सर्व बहुजन लोकं आपल्या मुलांना हे सर्व ज्ञान कमविण्यासाठी आपल्या सारख्या ज्ञानी लोकांकडे पाठवू माझी विनंती. आहे तात्या तुम्ही आहात हरी नरके सर या सारखे असंख्य प्रेरणादायी लोकांनी असे व्यासपीठ सुरू करावे ज्या ठिकाणी आम्ही आमचे मूल शिकायला पाठवू ही विनंती
त्या माणसाला म्हातारपणात तरी थोडीशी विश्रांती मिळू द्या. ऊस गोड लागला म्हणून मूळासकट खाऊ नका. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातूनही पुष्कळसे प्रबोधन होऊ शकते. आता आपणच एकत्र येत अभ्यासने उभारायला हवीत.
अ. ह. साळुंखे हे सत्यशोधक महान संशोधक म्हणून महानायक आहेत. परूळेकर सर आपणही सत्य मांडत आहात.
खुप छान मुलाखत, डाॅ आ ह साळुंखे यांचे विचार ऐकणे ही पर्वणीच, प्रवाहा विरूध्द लिहिणारा लेखक,विचारवंत म्हणून आणि आपली बाजू खंबीरपणे, अभ्यासपूर्ण मांडणारा लेखक म्हणून मला ते आवडतातच,पण काळा चश्मा डोळ्यावर चढवलेल्या लोकांना ते सहन होणे कठीण. राजू परूळेकर यांनी मुद्देसूद मुलाखत घेऊन तीची ऊंची वाढवली. दोघांचेही खूप खूप आभार
डॉ. आ. ह. साळुंखे सरांना पहिल्यांदा ऐकल....आज कळाल ही एवढी मोठी माणसे असतात पण किती ते संयमी आणि नेहमी या लोकांचे पावले जमिनीवर असतात. सरांसारखे लोक या काळात क्वचितच बघायला मिळतात. सर्वात म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहणे हे कुणालाही नाही जमत. ❤
सन्माननीय परुळेकर साहेब या क्षणी मी आपण घेत असलेल्या तात्यासाहेब आ. ह.साळुंखे सरांची जी मुलाखत घेत आहात ती मी बघतोय आणि ऐकतोय. आज दुपारीच मी दिवंगत हरी नरके सर यांची जी मुलाखत आपण घेतलीत टी मी संपूर्ण बघितली.पुरोगामी,सत्यशोधक,परिवर्तनशील विचारवंत लेखक,साहित्यिक यांच्या मुलाखती घेऊन सत्य समोर आणण्याचं जे कार्य आपण समाजाच्या समोर आणण्याचं कार्य करीत आहात बहुजन समाजाला जागृत करण्याचे काम आपण करत आहात हे अतिशय पवित्र असं मानवतावादी भूमिकेतून करत आहेत त्या बद्द्ल आपले अभिनंदन आणि आभार. निर्मीक आपणास उदंड आयुष्य आणि आरोग्य प्रदान करो हीच मनोकामना.
राजु भाऊंनी घेतलेली आ.हं.ची दिर्घ मुलाखत,
आज ऐकली. खूप आवडली.एका बाजुला आ.हं.ची नम्रता तर दुसरीकडे राजु भाऊंना वाटणारा त्यांच्याविषयीचा आदर या दोन भावनांच्या स्पंदनावर ही मुलाखत हिंदोळे घेत होती आणि त्यातुन मानवी प्रज्ञेचा चार्वाक ते आंबेडकर असा प्रवास उमलंत होता व तिचा
वैचारिक सुवास ऐकणाऱ्यांच्या मनात दरवळत होता. ज्यांना इतरांना प्रबुद्ध करायचे आहे व ज्यांना प्रबुद्ध व्हायचे आहे त्यांच्यासाठी हा
झालेला विवेकानंदी खटाटोप आहे. हा खटाटोप यशस्वी होणं अखिल मानवजातीसाठी गरजेचं आहे. या दोघांनाही मी नम्रतापुर्वक धन्यवाद देतो आणि आ.हं.ना अजून पुरेसं आयुष्य व आरोग्य लाभावे अशी सदिच्छा व्यक्त यासाठी करतो की
आ.हं.च्या उत्क्रांतीतुन राजु भाऊंना क्रांती व्हावी.
जय भारत ! जय संविधान !!
श्री राजू परुळेकर जी, तुम्ही अत्यंत अप्रतिम मुलाखत घेतली आहे. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या सारख्या ज्ञानसूर्याची प्रतिभा अफाट आहे...हे यातून जाणवले.....एकच विनंती तात्यांच्या मुलाखती ची एक मालिका ( जमले तर त्याच्या निवडक आणि महत्त्वाच्या ग्रंथावर) सादर करू शकाल का?? जेणे करून त्यांनी लिहून ठेवलेल्या साहित्याची चर्चा आणि ओघाने त्याचे विचार मंथन करून....पर्यायाने निघालेले ज्ञानामृत आमच्या सारख्या सर्वसाधारण माणसांना ग्रहण करता येईल ही एकच आणि कळकळीची विनंती.
th-cam.com/video/mas1ZZHwQeg/w-d-xo.html
आदरणीय डाॅ. आ.ह. साळुंखे सरांना मुलाखतीच्या माध्यमातून नवीन पिढीसमोर आणल्या बद्दल खूप आनंद झाला.
अशा तपस्वीचे ज्ञान तुषार आपल्या जीवनावर पडणे यासारखे दुसरे भाग्य नाही...... धन्य झालो...
मी प्रथम धन्यवाद राजू परुळेकर सर यांना धन्यवाद देतो कारण ही मुलाखत you tube la टाकली अशी मुलाखत पाहणे हा अंतर्मुख करणारी आहे.
तात्या विषयी धन्यवाद शब्द अपुरे आहेत, त्यांचे उपकार आहेत.
आजच्या वाचन संस्कृती लोप पावत चाललेल्या काळात या मुलाखती च्या माध्यमातून का होईना डॉ. आ. ह.साळुंखे (तात्या) यांचं विचारधनं आमच्या तरुणांपर्यंत पोहण्यासाठी आपण केलेला प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद..👍
अजुनही त्यांच्या मुलाखत घेऊन पुढे हा प्रयत्न केला तर आपले खूप आभार..
खरोखर तात्या / आ ह साळुंखे यांच मनोगत, तसेच राजू परुळेकर यांनी तात्यांची घेतलेली मुलाखत चिंतनीय आहे
प्रत्येकान आवर्जून ऐकाव,आसच मनोगत आहे.धन्यवाद ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
ज्ञानतपस्वी सत्यशोधक आ.ह.साळुंखे सर,
तुम्हीं शोधलेलं सत्य आणि आता आमच्या धडावर आमचंच धड राहील यासाठी आपण घेतलेलं कष्ट हे अखंड बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आणि उत्थानासाठी सतत अत्यावश्यक असतील...
जय जिजाऊ..जय शिवराय..जयभीम..! ✊
हा संवाद संपूच नये असं वाटत होतं.अतिशय सुंदर शांत संवाद. तात्यांबद्धल आदर आणखी वाढला. येणाऱ्या काळात त्यांनी लिहिलेली सर्व पुस्तके वाचून काढणार नक्की. खूप खूप धन्यवाद ही पर्वनी दिल्या बद्धल 🙏❤
हा प्रचंड अभ्यास आहे, ज्या बद्दल आमच्या पिढीला खूप कमी माहीत आहे हे खूप खेदजनक आहे. आम्ही खरचं तात्यांचे खूप ऋणी आहोत की त्यांनी आम्हाला त्यांचा अभ्यास आणि ज्ञान उपलब्ध करून दिले आहे 🙏🙏
मानव विवेक बुद्धी व विचारवादी होण्यासाठी आपण करीत आहात त्याबाबत धन्यवाद. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठे्वणार्या तरुण पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोन, बुध्दीवादी होण्याचीअत्यंत निकड आहे तरच जगाचा आदर्श होईल.
शेवट फार अप्रतिम केला परुळेकर सर.
तात्यासाहेब यांचे विषयी काही बोलणं म्हणजे सुर्यास दिवा दाखवल्या सारखं होईल.
मन कसं प्रसन्न झालं.
खुप खुप धन्यवाद 🌹🌹🌹🙏🙏🙏
साळुंखे सरांची मुलाखत घेतली आणि ती यू ट्यूबवर टाकली.राजूसर आपल्याला खूप धन्यवाद .
कमी शब्दात खुप काही सांगणे... अचूक आणि महत्वपूर्ण भाष्य....!!!
प्रिय राजु,
टि.व्ही. न पहावे असेच दिवस आहेत . अश्या वेळी एका ज्ञानतपस्व्याचे मनोज्ञ दश॔न घङवले. धन्यवाद.
या नंतर तात्याचे जे नायक आहेत त्यांच्या बाबतीत एक एक भाग करावेत. संत बसवेश्र्वर , श्रीकृष्ण आणि राम यांना तात्यानी वेगळ्या भूमिकेत मांडले आहे. ते ही तुम्ही तात्याना बोलते करून आमच्या समोर आणावे ही विनंती.
डॉ.अ.ह.सांळुके यांची पुस्तके मी वाचली आहेत परंतु यूट्यूब मुलाकात ऐकताना मला राजु परुळेकर हेही मला कळाले तसे नांव एकून होतो त्यांनंतर यूट्यूब तुम्हांला पाहिले तुमचे विचार पटले तुम्हचे अभिनंदन
Charvak great
तात्या आपण लीहलेली पुस्तके मिळत नाहीत???
डॉ आहे ह सांळुखे म्हणजे बहुजन समाजाचे विद्यापीठ
राजू परुळेकर सर आपण साळुंखे कवि ची फार चांगली प्रकारे सविस्तर पणे मुलाखत घेऊन ती प्रचारीत केल्या बद्दल धन्यवाद 👌🏻हयाचा बोध घेणं जरुरी आहे.
बहुजन नायकांचा वारसा चालवणारे आपले विचार ऐकून धन्य वाटले,आपण थोर विचारवंत आहात सर,फार छान मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद.
आपण दोघेही ज्ञानी विचारवंत लेखक आपल्या मुलाखती मुळे आमच्या ही ज्ञानात भर पडली आपल्याला मनापासून धन्यवाद आणि सप्रेम नमस्कार 🙏🙏🙏🌹
🙏🙏🙏. Sir. मला तुम्हाला तात्या असे बोलताना फारच आनंद होत आहे. कारण मी तुम्हाला आज पहिल्यांदा पहिले. खरंच सांगते मला तुमचे साहित्य अलीकडेच माहित झाले आणी माझी वाचनाची आवड आजून वाढली. तुम्ही ग्रेट आहात. तुमच्या मुळे आम्हाला खरा इतिहास समोजतो आहे. नही तर आमची आवस्ता मेंढरा सारखीच.
Very Good
अस म्हणतात की, कोणतेही पुस्तक वाचताना त्या लेखकाच्या/लेखिकेच्या विचारधारेत वाहायला लागत आणि त्यामुळे सत्य दूर जाण्याची शक्यता असते किंबहुना आपण सत्यापासुन दूर जाण्याची शक्यता असते. पण इथे लेखकानेच कोणतेही पुस्तक लिहिताना सत्याची काठ सोडली नसल्याने विचारधारेत जरी वाहत गेलो तरी देखील योग्य ठिकाणी पोहोचनार याची भीती मात्र नाहीशी झाली.
असो, राजू सरांचे खुप खुप आभार आणि डॉ. सालुंखे सरांना विनम्र अभिवादन.
मी कॉलेज ला असताना बहुजनवादी विरोधी संघटना, संस्थांच्या संपर्कात आलो.... त्यावेळेस त्यांनी तीन नावे सांगितली की जी हिंदु धर्म विरोधही आणि नास्तिक आहेत.... आणि जणू काही ती दहतशद्वाद्यांपेक्ष्याही भयानक आहेत असं बिंबवले गेले....मी त्यातील दोघांचे विचार व्हिडिओ मार्फत पाहिले, ऐकले तेंव्हा खुप आश्र्चर्य वाटले कारण जसं सांगितलं तसे काहीच आढळले नाही उलट संत तुकाराम महाराजांना मानणारे आहेत हे समजले....ती दोन नावे होती - दाभोलकर, श्याम मानव आणि आज तिसरे नाव असणारे महान व्यक्ती ऐकले - आ. ह. साळुंके....
खुप छान वाटले मुलाखत ऐकून... विशेषतः परुळेकर सरांना खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा.....
छानच मुलाखत. ❤❤
सातारा येथील असून सुद्धा आजवर ह्या थोर माणसा बद्दल माहिती न्हवती तसेच त्यांचे साहित्य वाचले नाही याबद्दल वाईट वाटते. असो, आता माहिती झाली आहे त्यांची सगळी पुस्तके वाचायचे ठरविले आहे. साताऱ्यात गेल्यावर भेटण्यासाठी जरूर प्रयत्न करेन. चांगले आरोग्य लाभो ही सदिच्छा 💐🙏
एवढ्या मोठ्या समकालीन व्यक्तीला ( सर्व प्रचार प्रसार माध्यम साधने उपलब्ध असताना) अनुल्लेखाने कसं लोकांपर्यंत पोहचू दिल नाही
मी मुलाखत ऐकत असताना खरं म्हणजे की मुलाखत नव्हती तर मानवी जीवनाचा प्रवाह कसा असावा मानवी जीवनावर कसे आघात झाले आणि मानवी जीवन घडण्यासाठी काय करावे लागते या गोष्टीच तात्या आपल्यासमोर मांडत होत्या हे आपण मन लावून ऐकले असेल हा बोध होतो तात्या आपणाला खूप खूप धन्यवाद
राजू परुळेकर साहेब तुमचे खूप खूप आभार तुम्ही तात्यांना बोलत केल.. आणि आम्हाला हया वैचारिक महाकुंभाची चव चाखता आली
तुमच्या मुलाखती मधूनच खरी माहिती,खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मदत होईल.
साळुंखे सर, पूर्णपणे अभ्यास करून विचार मांडले आहेत. बहुजनांना जागे केले आहे.धन्यवाद सर.🙏🙏🙏🙏
परूळेकर सर, तुमच्या मुलाखती मधूनच खरी माहिती खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचला.🙏🙏👌👌
I like your interview of Respected A.H. Salunke by Shri Raju parulekar. Thank you both.
तात्यासाहेब ऊर्फ डॉ. आ.ह. साळुंखे म्हणजे एक थोर विचारवंत तपस्वी इतिहास संशोधक. तात्यासाहेबाची प्रत्येक साहित्य कलाकृती म्हणजे ज्ञानाचा खजिनाच. प्रत्येक पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावे इतके सुंदर आहेत. तात्यासाहेबाना मानाचा मुजरा
खुप मोठ व्यक्तीमत्व सादर प्रणाम
फार परखड मुलाखत सर खूप आभार , आपल्या उपक्रमास खूप शुभेच्छा आणि पुढील मुलाखती साठी उत्सुक ही 🙏
खूपच अर्थपूर्ण मुलाखत!
डॉ. आ. ह. साळुंखे सरांचे विचार जितके सम्यक तितकीच मुलाखतही सम्यक होऊन खुलत गेली त्याबद्दल परूळेकर सरांचे अभिनंदन व धन्यवाद!💐💐
डॉ. आ. ह. साळुंखे सरांच्या लेखनकार्यास सलाम!💐💐👌👌
बुध्द धम्माची मूलभूत, अचूक माहिती साळुंखे तात्यांनी दिली
शतश आभारी
नमो बुधाय
जय भीम🙏
जय अर्जुन
जय श्री राम 🔥
आह साळुंखे म्हणजे काय बोलणार! दि ईनसायडरवरच्या मुलाखती पहातो आहे एकेक करुन. अत्यंत सुंदर उपक्रम राबवत आहात.
एक मात्र पुन्हा म्हणेन, मुलाखतकाराने अत्यंत कमी शब्दात समोरच्या व्यक्तीला जास्तीत जास्त बोलतं करायला हवं. ही मुलाखत आहे, चर्चा नव्हे. आम्हाला परुळेकर ऐकायचे असतील तेंव्हा आम्ही स्वतंत्रपणे ऐकू. आणि चर्चेच्या स्वरुपात ही मुलाखत आहे असं समजलं तरी ती चर्चा ही चर्चा असावी. बाळबोध भाषेत असावी. अत्यंत जड विषय देखील सामान्यांपर्यंत सहज पोहचायला हवेत. चर्चा ही चर्चा असते, पांडित्य प्रदर्शन नव्हे. असं मला वाटतं. शेवटचं वाक्यच पहा परुळेकरसर तुम्ही.
"होर्डिंग्ज आणि फ्लेक्स पाहुन रक्त आत वहात नाही, भळभळत नाही. एक शांत करुणेचा स्त्राव होत असलेला विद्रोही अनुस्फोट आमच्या मनात तुम्ही तुमच्या लिखाणातनं करत रहा… …" वगैरे वगैरे. आता जर तुम्हीच तुमच्या अशा वाक्यांवर खुश असाल तर मग पुढे बोलणंच खुंटले. जे वाटलं ते स्पष्ट लिहिलेय.
कारण सुरेख एपिसोड आहेत सर्व. ते आणखी सुंदर व निर्दोष व्हावेत ही ईच्छा आहे. तसे तर मग शेकडो चॅनेल रोज मुलाखतींचे रतिब घालतच आहेत युट्युबवर.
दि ईनसायडरच्या पुढील सर्व भागांना शुभेच्छा!
माझा सर्वात आवडता लेखक म्हणजे आ. ह. साळूँखे या लेखका मुळे मी तर्कवादी झालो, वास्तववादी झालो!
सत्यशोधक महापंडीत डाॅ.आ.ह.साळुंखे सरांना ऐकणं म्हणजे खुप आनंदाची गोष्ट वाटते.. सरांना ऐकणं म्हणजे बौद्धिक पर्वणी असते.
अत्यंत सुंदर
@@bhagyashreekarle349 XD swwssswssswwswwwswwwwswwsswwwswswwwswwwwwswwwwwwwwwwwwwwwwwwwwswww aw wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwswwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwzwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwswwwwwwwwwwwwswwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwzwwwwwwwwwwwwwwwwwwzwwwwswwwwwwszwwwwwwwwwwwwwwwzwwwwwwwwwwwwwwwzwwwzwwwwwwwwwwwwwwwwwwwzwwwwwswwwwwwwwwwwzwwwwwwswwzwwwwswwwwwwwwwwsssww ws wswsswwwswsswwwswswswwwwwwwwwwwwsssswwswswwwwwwsswwswwwssssss XD ssawsssssss xD zswswwwsdzs ws ssssszwszwwwwzwszsswsswwssswswswsswsswswwwsswwwswwwwwwswswsswswwsswwwwwwwwwwwxwwxww dc wwwwxwxxxw xD wwwxxwwwwxxwxwxxxxxx xD wwwwwwwwwwxwxwwwxwwxxxwwxwwxxwwwww
Khupch sundar
P
mast
डॉ.आ.ह साळुंखे सर (तात्या) म्हणजे विचाराला चालना देणार व्यक्तिमत्त्व...... 🌱
हे ज्ञान आत्ताची पिढी आत्ताचे नेते.आत्ताचे वारकरी या सर्वांना नितांत गरज आहे.
धन्यवाद साळुंखे सर 🙏
सरांची क्रांती हि लेखनातुनच घडली आहे.🙏
सध्याचे कीर्तनकार अभंग गाथा हरिपाठ यांचा अभ्यास आणि पाठांतर करतात या बरोबर अ ह साळुंखे यांची पुस्तके अभ्यासणे महत्त्वाचे आहे जेणेकरून संतांचा विचारांचा उद्देश लक्षत यऊन जनतेपर्यंत पोहोचवणे सोपे जाईल
वारकऱ्यांना नाही...त्यांना तुमच्या जातीवादी राजकारणातून सोडा कृपया
खुप सुंदर मुलाखत, आत्तापर्यंत मी आपल एकही पुस्तक वाचले ल नाही, पण आत्ता खुप उत्सूकता निर्माण झाली आहे
अतिशय महत्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक ही मुलाखत आहे...
अप्रतिम मुलाखत.
डॉ. आ.ह.साळुंखे सरांना शतशः वंदन!
सर, वंदन करून त्यांचे विचार मारु नका!
Dr.. आ. ह. साळुंखे. एक महान. व्यक्तिमत्व.
परंतु. मराठा समाजाला. त्यांची किंमत नाही. ही शोकांतिका आहे.
अतिशय चिकित्सक व विवेचक मांडणी केलीत सर; उत्तुंग आंतरज्ञानाचा समाधानी आदर्श निकोप जीवनपद्धतीचा माउली मार्गच अतिव जिव्हाळयाने मांडलात सर. अनेक तर्क व इतिहास विष्णूच्या किंवा वामणाचया बाबतीत मिळतील मात्र पण विठोबाच्या विशुद्ध पवित्र, प्रसन्न समाधानी चैतनयदायी जीवनपद्धती च्या भावाची सर वरील दोघांच्या बाबतीत किंचितही येणार नाही. अगणित असंख्य नैसर्गिक आंतरिक उर्मी हजारो वर्षे प्रयत्न करूनही मुळासकट उखडुन टाकता येत नाहीत. अन् एखाद्या माणसाकडे किंवा वयवसथेकडे अफाट संपत्ती, सत्ता असुनही मुलभूत नैसर्गिक आंतरिक पावित्र्य, प्रसन्नता व परजेचया समाधानी जीवनात अडसर जाणीवपुर्वक निर्माण करित असेल तर तिच्या अस्तित्वाला काहिही अर्थ उरत नाही. लोक त्या व्यवस्थेला यत्किंचितही कल्याणकारी राज्य म्हणत नाहित. असंख्य गुलामीचे प्रयत्न केले तरी 'अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी 'याप्रमाणेच असंखय वारकरी संत व जगद्गुरू तुकोबाराय यांनी तो उत्कट भाव ओळखला, फुलवला, फळवला असंख्य पुढच्या पिढ्यांना स्वाधीन केला त्यामुळेच जगातली कुठलीही ताकद विठोबाच्या चैतनयदायी तत्वज्ञानभावाला पराभूत किंवा अस्तित्वहिन करू शकली नाही. एकीकडे जगातील वैदिक यज्ञसंसकृती व विविध विषमतावादी हुकुमशाहया व कुराजये लोकांनी उलथून टाकल्याचे व त्यांना विस्मृतीत टाकत असल्याचे दिसून येत आहे. पन याउलट विठोबांचा विश्व आदर्श समताततवज्ञाननभाव अभंग व अखंड लोककल्याणकारी पृथ्वीच्या ज्ञात इतिहासात ऐकमेवादवितीय राहिल्याचे दिसुन येते आहे असे मला वाटते.फुलाशिवाय सुगंध नाही मणजेच तथागत गोतम बुध्द सांगतात त्याप्रमाणे कारणाशिवाय कार्य नाही. हि बूधदांची कार्यकारणभावाची बाबच विठोबाच्या भक्ती किंवा भावामागे आहे अन् याच कारणकारयभावाचा शोध संशोधन 2005 मध्येच 'संत, लोकायत चार्वाक, विठोबा, तुकोबा,वैरोचणी बुधद्, तथागत वैरोचण शिवधरमगाथाकार ,विठ्ठलगाथाकार,मावेली व संविभागी साहित्य माउली डाॅ. आ. ह. साळुंखे सर यांनी 'बळीवंश 'या 'संविभागी विठठलगाथेतुन 'लावलेला आहे असे माझे ठाम मत आहे. विठ्ठलाचे पणजोबा, आजोबा वडिल, दोन चुलते, पंजी व आईचा व विठोबाच्या मुलाचा अर्थात शरीरवंशाचा, विचारवंशाचा "सर्वोत्तम समताभुमी सिंधु संस्कृतीशी ",शिव पार्वतीशी, निऋतिशी चार्वाक प्रल्हाद, विरोचन, सांखय प्रवर्तक कपिल अन् "तथागत वैरोचण ",'वैरोचणीबुध्द 'यांचा विश्व आदर्श एकमेवाद्वितीय वसुनिषठ इतिहास सिध्द केला आहे यात मला तिळमात्रही शंका वाटत नाही.
खूप महत्त्वाची मुलाखत उपलब्ध करून दिलीत. धन्यवाद!!!
मी तात्यांची अनेक पुस्तके वाचली आणि, धन्य झालो, महान विचारवंत, सांळुखे सर,
आ. ह. साळुंखे सर , यू आर सिंपली ग्रेट !
आदरणीय डाॅ.आ. ह. साळुंखे सर आपणास मी कोटी कोटी वंदन करतो. आपल्या सारखे सत्य इतिहास लेखक मी पाहिला नाही. एकदा शिंदखेड मध्ये मला आपले व्याख्यान ऐकण्याचे सौभाग्य लाभले, धन्य झालो. माझ्या मनात प्रत्यक्ष भेटण्याची तीव्र ईच्छा होत आहे.
खूप छान मुलाखत.माणसाला विचार करायला लावतो.धन्यवाद परुळेकर साहेब
आ ह साळुंके सर तुमची पुस्तके मी वाचली आहेत तुमचे मनापासून आभार .तसेच ही मुलाखत घेणारे परुळेकर सर तुमचे ही आभार .
डॉक्टर साळुंखे साहेब आपली अभ्यास पूर्ण महिती बद्दल आपले धन्यवाद
सरांची वाणी, विचार इतकी स्पष्ट, रसाळ, नम्र, परखड आहे की ही मुलाखत संपूच नये, असं वाटत होतं. जीवनाच्या, समाजाच्या विविधांगी पैलूंना, विषयांना स्पर्श करत भाष्य ऐकतच रहावे आणि हा ज्ञानाचा स्रोत अखंड वाहत राहो असं मनापासून वाटत होतं. हे विचार पुढील अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचावे अशीच कामना...💐
मी फक्त aikun होतो तात्या baddal parantu खुप खुप धन्यवाद parulekar साहेब आपल्या मुळे आज एवढ्या मोठ्या dnyan tapsvi la aikyache bhagya मिळाले व त्यांची pustkanbaddal माहीती mialali
खूपच सुरेख!!! अगदी करकरीत उन्हातून आल्यावर वर माठातले थंडगार पाणी पिल्यावर जसे तृत्प झाल्यासारखे वाटते तसाच अनुभव होता. इतक्या प्रेमळ भाषेत कुणी विद्रोही विचार सांगितला असेल असे वाटत नाही.
ही मुलाखत हिंदी व इंग्रजीमधे डब झाली पाहिजे, २०२४ साठी अत्यावश्यक.
भाजपाला 400 पार नेण्यासाठी का☺️?
2024फिक्स झालंय
2029चीं वाट बघा
अप्रतिम. आपल्यासारखे ज्ञानतपस्वी आपल्या समाजात आहेत हेच समाजाचे मोठेपण आहे. आपण असेच लिहित असावे हीच अपेक्षा. आपल्याला निरागी दिर्घआयुष्य लाभो हिच प्रार्थना.
पुर्व महाराष्ट्रात अनेक जण तात्यांना वाचत नाहीत त्यांच्या साहित्याचा प्रसार व प्रसार होणे गरजेचे आहे.....
डॉ आ.ह.साळूंखे सरांच्या तोडीचे लेखक महाराष्ट्राला लाभलेले एक दिव्य रत्नच म्हणावं लागेल, अनेक शुभकामना व मनापासून अभिनंदन आहे 🎉
एखाद्या विचारवंत,संशोधकांनी किती विनम्र असावं याचं साळुंखे सर हे उत्तम उदाहरण आहे.
या मुलाखतीसाठी परुळेकर यांचे मनःपूर्वक आभार.
बीग्रेडी कावळा आहे साळुंखे
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे थोर समाजसुधारक आणि विचारवंत, आहे, आ. ह. सांळूके
अभ्यासपूर्ण ज्ञानाच भांडार जवळ असूनही इतक्या विनम्रपणे आणि विशेषतः कोणाचाही अनादर होणार नाही याचे भान ठेवून व्यक्त होणारा साळुंखे सरांसारखा विचारवंत विरळाच!
विणयवंतच आहेत तात्या.
मी ही आणि आमचे काही मित्र पत्रकार आम्ही भेटलो होतो तात्यांना आणि आम्हाला अभिमान वाटतो आम्ही कुठं ही भरकटलो नाही त्यांच,, विद्रोही तुकाराम " हे पुस्तक आहे थोडफार वाचलं आहे, तात्यांना खर तर महाराष्ट्र भुषण पुरस्कार द्यायला हवा पण देशातील राजकारण फारच घाणेरडया स्थितीत आहे,, तात्यांना आणि पुरुळेकर sir तुम्हाला प्रणाम 🎉
पुरुळेकर सर खूप खूप धन्यवाद आपण ही मुलखात उपलब्ध करून दिली....मुलाखत बघत असताना साळुंखे सरासारख्या लेखकांचे साहित्य आपण वाचलेच नाही ..ही कमी पणाची भावनाक्षणोक्षणी येत होती
आयुष्यात सगळ्याच गोष्टी हव्या तशा घडत नाही. पण काहीका असेना, आतातरी साळुंखेंची पुस्तके वाचता येतील.
"एकला चलो रे!" हा अत्यंत प्रभावशाली आणि प्रेरणादायी विचार!
मी त्या सर्व श्रोत्यांचे अभिनंदन आणि धन्यवाद करेन ज्यांनी ही मुलाखत सुरुवात ते शेवट सलग पाहिली.
विचार करायला भाग पाडते ही मुलाखत.
आपण आणि नव्या पिढीने पुस्तकांशी मैत्री करणे खूप गरजेचे आहे.