मराठी भाषेवर शिवरायांचे अतूट प्रेम...! । मराठी राजभाषा दिन | Shivaji Maharaj

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, महाराष्ट्रातील जनतेला स्वतंत्र केलं, पण खरं स्वातंत्र्य तेव्हा प्राप्त होतं जेव्हा मानसिक गुलामी झुगारून टाकली जाते... आणि त्यासाठी आपली संस्कृती जोपासणं खूप महत्वाचं असतं. भाषा हे असं एक माध्यम आहे ज्यातून संस्कृती व्यक्त होते, पुढच्या पिढ्यांमध्ये रुजवली जाते... छत्रपती शिवाजी महाराजांना हे माहिती होतं आणि म्हणूनच शिवरायांनी मराठी भाषेचं रक्षण केलं. आपली गोड, अमृतातेंही पैजा जिंके अशी मराठी भाषा शिवरायांनी समृद्ध केली...!!
    ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुआरी हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित करण्यात आला

ความคิดเห็น •