छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र रक्षा पूजली जाते चार कुटुंबात | शिवसमाधी जीर्णोद्धार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ค. 2021
  • शिवरायांची पवित्र रक्षा आहे कुठे ?
    १० मे १८१८ रोजी इंग्रजांनी रायगड ताब्यात घेतला. गडाची लूट करुन इंग्रजांनी गड वन खात्याच्या ताब्यात दिला. काही कालावधीत रायगड दुर्लक्षित झाला. झाडाझुडपांनी वेढलेल्या रायगडावर शिवरायांची समाधीही विस्मरणात गेली. इ. स. १८६९ मध्ये महात्मा फुले यांनी रायगडावर जाऊन झुडपांनी वेढलेल्या गडावर शिवरायांची समाधी शोधली आणि फुले वाहून पूजा केली. याचवर्षी त्यांनी कुळवाडीभूषण हा प्रदीर्घ पोवाडा लिहिला. या पोवाड्याच्या प्रेरणेतून मुंबई येथील मराठा ऐक्येच्छू मंडळाने १८८५ पासून शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली. इंग्रज अधिकाऱ्यांनी १८८६ मध्ये सर्वप्रथम शिवरायांच्या समाधाची डागडुजी केली. त्यानंतर १९०६ मध्ये पुन्हा एकदा शिवसमाधाची दुरुस्ती करण्यात आली. १९१२ मध्ये लाँघर्स्ट यांच्या प्रयत्नामुळे तिसऱ्यांदा जीर्णोद्धार करण्यात आला. लोकमान्य टिळक यांनी १८९६ मध्ये रायगडावर शिवजयंती उत्सव साजरा केला. त्यासाठी शिवाजी फंड समिती स्थापन केली. पण, त्यांच्याकडून शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण होऊ शकले नाही. इंग्रजांनी १९२६ मध्ये शिवसमाधीचा जीर्णोद्धार सुरू केला. तेव्हा अष्टकोनी समाधीत पवित्र रक्षा असलेल्या दगडी पेट्या सापडल्या होत्या. बांधकाम करणारे तात्यासाहेब सुळे यांनी त्या पुन्हा व्यवस्थित ठेवल्याचे पुरावे आहेत. सुळे यांनी उपस्थित असलेल्या काही लोकांनी शिवरायांची पवित्र स्मृती म्हणून थोडी रक्षा स्वत:कडे घेतली होती. सध्या चार कुटुंबात ही रक्षा पूजली जाते. प्रसिद्ध इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी उलगडलेला हा शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचा इतिहास.
    #Historyinpoint
    #छत्रपतीशिवाजीमहाराज
    #शिवसमाधी
    #रायगडकिल्ला
    #Shivajimaharaj
    #Shivsamadhi
    #महाराष्ट्रदर्शन
    #मराठासाम्राज्य
    #इंद्रजित सावंत
    #Historyresearch
    All the photos used in the video belong to their respective owners and I or this channel does not claim any right over them
    Copyright Disclaimer under section 107 of the copyright act of 1976, allowance is made for fair use for purpose such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.

ความคิดเห็น • 164

  • @ramakantnande4487

    अतिशय उत्तम माहिती सर

  • @bbn22100
    @bbn22100 ปีที่แล้ว +6

    बहुत बढ़िया जानकारी। जय शिवराय।

  • @arunshirgaonkar4720
    @arunshirgaonkar4720 2 ปีที่แล้ว +5

    फारच सुंदर आणी अभ्यासपूर्ण.

  • @gajadhav
    @gajadhav ปีที่แล้ว +5

    नुकतीच मी तिन चार दिवसा पूर्वीच रायगडावर जावून महाराजांच्या समाधीच दर्शन घेवून आलो आहे आपण जी माहीती दिली त्यामुळे अनेक गोष्टींचा प्रश्नांचा उलघडा झाला धन्यवाद महाराजांच्या समाधी पुढे जी कुत्र्याची समधी संबोधली जाते ती नक्की कुणाची आहे याचेही अस्सल कागद पत्राद्वारे संशोधन व्हावे कींवा झाले असेलतर त्याचाही एक व्हीडीओ करावा

  • @sagarninja
    @sagarninja 2 ปีที่แล้ว +4

    माहीती खुपच छान आहे आम्हाला महाराजांच्या आस्थींचे दर्शन मिळाले तर बरे होईल

  • @SHK-Hindi
    @SHK-Hindi 2 ปีที่แล้ว +40

    खरंच खूप सुंदर माहिती दिलीत सर तुम्हीं त्या पवित्र अस्थींचे दर्शन आम्हाला कधी होईल का? छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ शहाजीराजे जय शंभुराजे 🙏🙏🙏🙏🙏

  • @sagarninja
    @sagarninja 2 ปีที่แล้ว +8

    छत्रपति शिवाजी महाराज यांच्या समाधी मधे अस्थी आहेत का नाहीत काय सगळ्यांनीच वाटुन घेतल्या

  • @uttamraojadhav1561
    @uttamraojadhav1561 ปีที่แล้ว +1

    सुंदर अप्रतिम

  • @yogeshghodke8927
    @yogeshghodke8927 2 ปีที่แล้ว +3

    सत्य आणि काल निष्ठ माहिती दिल्या बद्दल धन्यावाद

  • @Redmotion1223
    @Redmotion1223 ปีที่แล้ว +1

    Khup Chan Sir Mast Apan Japta Itihaas Apla Mala khup chan Vatle Ani Mala Garv Ahe Ya Maticha Mee Ya matimadhe Ani Tyatlya tyat Shivjanmabhi Madhe Janmala Alo Manun Jai Jijau Jay shivray Jay Shambhuraje

  • @bhimraodoke8461
    @bhimraodoke8461 2 ปีที่แล้ว +3

    अत्यंत महतवाची माहीती दिली धनयवाद

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 ปีที่แล้ว +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @sunilbhaukotkar2064
    @sunilbhaukotkar2064 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏

  • @rahulkhairnar9231
    @rahulkhairnar9231 ปีที่แล้ว +2

    Aho chhatrpati shivaji maharaj mhana

  • @suryakantjamdar8923
    @suryakantjamdar8923 2 ปีที่แล้ว +1

    Khup chaan. Mahiti milali maharajancha samadhi baddal dhanywad

  • @aniruddhapatil4346
    @aniruddhapatil4346 2 ปีที่แล้ว +5

    अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आणली आहे ।धन्यवाद। आपण अशा बहुमोल माहितीचे प्रकाशन केलेस, महाराजांच्या बद्दल आणखी आदरभाव आणि देशभक्ती बाबतीत जाज्वल्यता वाढणे प्रेरणा मिळेल। नमस्कार। उत्तरोत्तर यश लाभो ही सदिच्छा आणि प्रार्थना।

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 ปีที่แล้ว +7

    ज्या कोणत्याही आधारविना कथा मेंदूत पेरल्यात त्या लोकांना हे पटणार नाही..

  • @sandeepmore6040
    @sandeepmore6040 ปีที่แล้ว +1

    Sir Khup Chan Mahiti ,,,, thank you , thank you & again thank you

  • @gajanandhoble5116
    @gajanandhoble5116 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर माहिती दिली सर 🙏

  • @harshalgawali6071
    @harshalgawali6071 2 ปีที่แล้ว +2

    Nice information, Thanks sir.