वेळ आली होती पण काळ आला नव्हता | कशी वाचली आजी या प्रसंगातून? निसर्ग धावला मदतीला YouTube Mi Vatsaru

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 มิ.ย. 2024
  • असा कुठला प्रसंग आजीवर आला होता जो तिच्या जीवावर बेतला असता, केवळ निसर्गामुळे तिचे प्राण वाचले? कसे? जाणून घेऊया या व्हिडिओ मधून.
    वयाच्या शंभरी कडे झुकलेली आजी गेली ४० वर्षे रानात एकटी कशी राहते. आपली दैनंदिन कामे ती या वयात कशी करते, कोणत्याही संकटाला आणि प्रसंगाला न घाबरता कशी सामना करते. TH-cam Mi Vatsaru.
    आजीचा पहीला व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक👇.
    • गावापासून दूर राहणारी ...
    The time had come but the time had not come How did the grandmother survive this incident? Nature came to the rescue.
    वयाचं शतक करण्याच्या मार्गावर असून देखील कोणत्याही प्रकारचा आजार नाही, चष्मा नाही, सांधे दुखी नाही आणि शुगर बीपी तिला माहित सुद्धा नाही. अशिक्षित असुन देखील जगाची इतंभुत माहिती आहे.
    #maharashtra_village_life
    #marathinews
    #life_in_the_wilderness
    #dhangarijivan
    #graminjivan
    #abpmajha
    #saamtvmarathi
    आपले काही प्रसिद्ध Popular /viral videos.
    1. • गावापासून दूर राहणारी ...
    2. • पावसाचं अचूक भाकीत करण...
    3. • पाण्याखालचे शिवमंदिर प...
    4. • नासा चे शास्त्रज्ञ हैर...
    5. • पाण्याखालील शिरकाई देव...
    मिलिंद भोसले, मी वाटसरू
    For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id.
    Email : milindrajebhosale@gmail.com
    Facebook : mi.vatasaru
    _______________________________________________
    © All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission. ‪@Mivatsaru‬

ความคิดเห็น • 278

  • @rajeshjadhav-rt4tg
    @rajeshjadhav-rt4tg 9 วันที่ผ่านมา +5

    आजी तुला दीर्घ आयुष्य लाभो कारण येणाऱ्या पिढीला तुझी खूप गरज आहे पांडुरंग नेहमी तुझ्या पाठीशी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  9 วันที่ผ่านมา

      ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालते बोलते विद्यापीठ, आजकालच्या तरुण पिढीला बरेच काही शिकण्यासारखे आहे, परंतु ही आनंदी आणि समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @ranipawer6406
    @ranipawer6406 22 วันที่ผ่านมา +43

    दादा व्हिडिओ खूप छान आहे. वाकडेतिकडे हा भाव करत नाचाचे रील करण्यापेक्षा, आजीचा व्हिडिओ केल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ चे शब्द देखील इतके सुंदर आहे की ते मनाला भिडते भावते. नवीन पिढीने बघावा असा हा व्हिडिओ आहे.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา +1

      अगदी मनापासून आभार 🙏जे आपल्या मातीतला आहे जे आपल्याला आवडतं ते करण्याचा मी प्रयत्न करतोय , आपल्या शुभेच्छा मला नेहमी प्रेरणा देतील.

  • @vg-kf8kg
    @vg-kf8kg 22 วันที่ผ่านมา +65

    खूप छान... आलतू फालतू vlog करण्यापेक्षा हे थेट माणसाच्या काळजाला भिडणारे (ओढून ताणून नाही) vlog करताय हे चांगले आहे. तुमच्यामुळे आम्हीही आजीच्या सहवासात असल्यासारखे वाटते, तुमच्याबरोबर आम्हीही आजीशी गप्पा मारतोय असे आम्हाला वाटतेय. निवेदन खूप छान आहे. साऊंड चांगला आहे.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา +7

      अगदी मनापासून आभार जे आपल्या मातीतला आहे ते दाखवण्याचा प्रयत्न मी करतो. तुमच्यासारख्या प्रेरणा मिळाल्या की नवीन कार्य करायला अधिक उत्साह येतो.
      मनःपुर्वक धन्यवाद

    • @vg-kf8kg
      @vg-kf8kg 22 วันที่ผ่านมา

      @@Mivatsaru ♥️🙏 we want more. Keep it up.

    • @geetanaidu4431
      @geetanaidu4431 16 วันที่ผ่านมา +1

      Khup chan , aaji cha bhutkal ( past ) ekayala nakkich avdel prekshakana

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  16 วันที่ผ่านมา

      @@geetanaidu4431 उद्या सकाळी नवीन व्हिडिओ येणार आहे. नक्की पहा👍

  • @nishantchitrao6225
    @nishantchitrao6225 21 วันที่ผ่านมา +23

    सगळयांनी एकत्र येऊन कठीण परिस्थितीत राहणाऱ्या आजीसारख्या व्रुध्दांना त्यांची उतार वयातील गरज भागेल एवढी तरी मदत केली पाहिजे.देश जगाच्या अनेक प्रगत राष्ट्रांन बरोबर आर्थिक प्रगती करतोय पण गरिबीचा वाढणारा टक्का व व्रुध्दांचे प्रश्र्न हे अजुनही अनुत्तरित आहे.दादा वास्तव परिस्थितीस अनुसरुन व्हिडिओ केला तुमचे मनापासून आभार

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 วันที่ผ่านมา +2

      वास्तविक पाहता आज आपला देश 4g 5g सेवा देण्यास प्राधान्य देतो पण गरिबांना भाकरी आणि भाजी देण्याचे प्राधान्य अजून आपण देऊ शकत नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल आणि त्यामध्ये वृद्धांचे प्रश्न तर अजूनही अनुत्तरितच आहेत याच्यावर काहीतरी कार्य करायलाच पाहिजे किंवा काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन थोडेफार लक्ष देण्याची गरज आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

    • @jayashreeKadam-oz4ot
      @jayashreeKadam-oz4ot 15 วันที่ผ่านมา

      Wp Www​@@Mivatsaru

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 22 วันที่ผ่านมา +27

    आजी तूमाला कधी काही होनार नाही तुम्ही साक्षात जिजाऊ हात खूप छान आजी साठी चपल आणली मिलींद दादा आजी ची काळजी घेत जा

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา +1

      म्हातारपण म्हणजे बालपणच असतं एखाद्या निरागस बालकाप्रमाणे यांची काळजी घ्यावी लागते.
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @SangitaShivale-wm3bg
    @SangitaShivale-wm3bg 22 วันที่ผ่านมา +11

    माझी आजी पण अशीच होती आता नाही राहीली असच कडक बोलन कमरेत वाकलेली तुम्ही आजीला चप्पल आणली तिला किती बरं वाटलं असेल ना असाच प्रत्येकाने आपल्या आजीला जीव लावला तर त्या जुन्या माणसांना किती समाधान वाटेल धन्यवाद आजीला भेटवल्याबद्दल

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา +1

      ही जुनी माणसं ट्यूबलाइट इतका प्रकाश देत नाहीत परंतु देवघरातील समई सारखं त्यांचं तेवत राहणं महत्त्वाचं असतं. म्हातारपण म्हणजे बालपणच असतं त्यांना एखाद्या निरागस बालकाप्रमाणे सांभाळावे लागतात.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @shinderamdas5714
    @shinderamdas5714 20 วันที่ผ่านมา +6

    खुप छान व्हिडिओ आहे। शक्यतो असे व्हिडीओ दुर्मिळ पहायला मिळतात। दादा तुम्ही आजींची खरी जीवनगाथा समोर मांडली। आजी सुध्दा खूप जिद्दी आहेत। आजींना चांगले आरोग्य व भरपूर आयुष्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना।

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  20 วันที่ผ่านมา +1

      आजीला असे निरोगी आयुष्य लाभला त्याला कारणीभूत निसर्गच असणार, रानात गेली 50 वर्षे राहिल्यामुळे, निसर्गाच्या सानिध्यात तिने जीवन व्यतीत केल्यामुळे बहुदा तिला अशी अद्भुत शक्ती प्राप्त झालेली असणार असे मला वाटते.
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 22 วันที่ผ่านมา +8

    खुप अर्थ पूर्ण व्हिडिओ. आजीच बोलन एखाद्या प्राध्यापकाला लाजवेल आसे.
    जगातील आचकट विचकट हा व्हिडिओ बघा जगण्याची कला अवगत होईल.
    धन्यवाद भाऊ.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      ही जुनी माणसं म्हणजे चालते बोलते विद्यापीठ असते. त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे आजकालच्या पिढीला, आपण त्यांना खरंच जुनं सोनं म्हणूया.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      ही जुनी माणसं म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ जणू, त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आजकालच्या पिढीला, थोडं जरी ज्ञान आपल्याला मिळालं तर आपण धन्य होऊ.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @mayakankal1548
    @mayakankal1548 22 วันที่ผ่านมา +11

    आईला सोबतच घेऊन जायला हवे आता त्यांना नाही होत कामं वया नुसार चुलीवर स्वयंपाक सुचत नसेल बरं झालं थोडक्यात वाचला जिव

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา +1

      आजीच्या आयुष्याची दोरी बळकट असणार किंबहुना निसर्गानेच तिला वाचवलेले असणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजीचा मुलगा गावात राहतो परंतु आजीला गावात राहायला अजिबात आवडत नाही कारण गेली 50 वर्षे ते निसर्गासोबत रानात राहते.
      मनःपुर्वक धन्यवाद.

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 22 วันที่ผ่านมา +10

    अग आजी तू आमच्या कडे येतेस का? का एकटी रहाते तेथे जंगलात, हो आज आजी वेगळाच वाटते, 🙏💐

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา +1

      निसर्गच आजीची काळजी घेतो आणि निसर्गामध्ये राहिल्यामुळे आजीला एक प्रकारचे अद्भुत शक्ती प्राप्त झालेली आहे आणि म्हणूनच त्या 100 वर्षे सुद्धा जगलेली आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @sforbhosale
    @sforbhosale 10 วันที่ผ่านมา +2

    खरं आयुष्य ओळख आहे हा व्हिडिओ बघितला आणि आजीच्या खोलीत ईश्वर शक्ती प्रसंगी उपस्थित होतं हेच बोलणार. . आजीच्या विशेष कौतुक केलं पाहिजे जीवन जगण्यासाठी काही नसेल तरी आजी एकटं जगत आहे.उद्या काय झालं तरी कोणीही नाही आजीची जगण्याची कला खूपच अस्मरणीया आहे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 วันที่ผ่านมา +1

      तसं पाहिलं तर आजी खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घेत आहे, निसर्गासोबत राहून ती खरे अनुभव घेत आहे, शहरात राहून आपला श्वास गुदमरला आहे परंतु आजी रोज स्वच्छ हवा घेते आणि पूर्णपणे सेंद्रिय खतापासून बनवलेलं धान्य खाते म्हणून ती आजपर्यंत अगदी खमकी आहे यालाच खरं आयुष्य म्हणायचं. जे निसर्गासोबत राहून जगायचं परंतु आज माणूस निसर्गाच्या विरुद्ध वागत चाललेला आहे आणि निसर्गावर आक्रमण करत चाललेला आहे त्यामुळे काय होऊ शकते हे आपण दोन वर्षांपूर्वी कोरोना काळामध्ये पाहिलंच असेल.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

    • @sforbhosale
      @sforbhosale 10 วันที่ผ่านมา +1

      @@Mivatsaru आपण बरोबर बोलत आहे

  • @Monikas4053
    @Monikas4053 22 วันที่ผ่านมา +32

    आजी बोलली होती येताना बिस्कीट आन मग ते राहील की आणायचं

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา +11

      आजीला चार बिस्कीटचे पुढे आणि चार खारीचे पुढे आम्ही आणले होते परंतु प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही त्यामुळे शूट नाही केलं.
      मनःपुर्वक धन्यवाद

    • @SK12390
      @SK12390 22 วันที่ผ่านมา

      ​@@Mivatsaru 😊😊

    • @user-gc6te6pt1s
      @user-gc6te6pt1s 13 วันที่ผ่านมา +2

      खुप छान आई ची काळजी घ्या दादा

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  13 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद, अगदी मनापासून 🙏

    • @rajashrikarande7653
      @rajashrikarande7653 10 วันที่ผ่านมา +1

      Khup chan

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 22 วันที่ผ่านมา +10

    आजी जपून रहा...ऐकुन रडू आले😢😢😢😔💝

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      शेवटी निसर्गानेच आजीला वाचवलं असं म्हणावं लागेल.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 22 วันที่ผ่านมา +7

    येवढ्या गुरांच कोण पहात आजी तर थकलीय पण आजीला पाहील की मला माझी आईच आठवली आणि नकळत डोळ्यांत पाणी आल

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา +3

      गुरांचा आणि हा जनावरांचा करण्यासाठी मुलगा असतो आणि तो आईची अगदी श्रावण बाळाप्रमाणे काळजी घेतो.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @PushpaTamse
    @PushpaTamse 22 วันที่ผ่านมา +9

    त्या आजी आई रडताना पाहून खूप वाईट वाटलं तिकडे कोण नाही का त्या गावांमध्ये देवाला एवढंच सांगते असं कोणाचं नको त्या पावसाच्या पाण्यामध्ये कशा राहत असते

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา +3

      आजीचे नातेवाईक गावामध्ये राहतात आणि त्यांचा मुलगा संध्याकाळी जंगलामधील त्या घरामध्ये तिच्या सोबत असतो, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही दिवसभर जरी ती एकटी असली तरी रात्री सोबत कोणतरी असतच.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @easycooking7510
    @easycooking7510 21 วันที่ผ่านมา +3

    खूप छान आजी खरचं खुप हिम्मत आहे आजीची
    अधून मधून आजी ची भेट करून देत जा

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  20 วันที่ผ่านมา +1

      आजीकडून खूप शिकण्यासारखं आहे. अधून मधून म्हणजे आठवड्यातून एक दिवस आजीची आम्ही नक्की भेट घेत असतो आणि खुशाली विचारतो.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @swatibhosale8963
    @swatibhosale8963 22 วันที่ผ่านมา +9

    आजीचा स्वभाव आणि शरिर दोन्ही काटक आहे हो ❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา +1

      या आजीने 80 वर्षाचे पावसाळे बघितले आहे त्यामुळे हे जुनं खोड जरा निबार असतं.
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @akshatagholap6840
    @akshatagholap6840 14 วันที่ผ่านมา +2

    माझी खूप इच्छा झालीय ह्या आजिना भेटायची ह्या आजीना बघून डोळ्यात पाणी आलं ❤❤❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  13 วันที่ผ่านมา +1

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 22 วันที่ผ่านมา +12

    दादा पुन्हा आजीला भेटायला जाल तेव्हा तिला खायला घेऊन जा 🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา +4

      मी आजीला खायला पण घेऊन गेलो होतो परंतु प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी मर्यादा असतात म्हणून ते दाखवू शकलो नाही.
      मनःपूर्वक धन्यवाद

  • @user-ne9ne5lh2n
    @user-ne9ne5lh2n 18 วันที่ผ่านมา +2

    काय वाटलं हे शब्दात सांगू शकत नाही.... खूप खूप भावनिक व्हायला झालयं...

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  17 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद 🙏अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो.

  • @sangitabarge9144
    @sangitabarge9144 16 วันที่ผ่านมา +4

    खूप छान मला माझ्या आजी ची आठवण आली❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  16 วันที่ผ่านมา

      हि जूनी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, २४ कॅरेट सोनं जणू. 🙏

  • @AnandShidture
    @AnandShidture 16 วันที่ผ่านมา +4

    हृदयस्पर्शी व्हिडिओ ❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  16 วันที่ผ่านมา +1

      अगदी मनापासून धन्यवाद, अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की काम करायला अजून उत्साह येतो. मनःपुर्वक धन्यवाद🙏

  • @doatgamer8160
    @doatgamer8160 22 วันที่ผ่านมา +8

    खूप स्ट्रॉंग आहात आजीबाई तुम्ही

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      निसर्गासोबत राहून सुद्धा आजी बळकट झालेली आहे. एक प्रकारची शक्तीचा अंगामध्ये आली असं मला वाटतं
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @nandabhosalevlogs299
    @nandabhosalevlogs299 22 วันที่ผ่านมา +5

    अतिसुंदर दादा खूपच छान व्हिडिओ बनवला आपण म्हणतो ना वरची दोरी तुटल्या शिवाय इथून परवानगी नाही तसेच काहीसे झाले असावा आजीच्या बाबतीत खूप छान😊

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      ही आजी निसर्गाशी एवढी एकरूप झालेली आहे ना तर बहुदा निसर्गानेच तिला वाचवलं असणार कारण तिने आजूबाजूला लावलेली झाडे निसर्गाची घेतलेली काळजी या सर्व गोष्टीतून तिला एक प्रकारची अद्भुत शक्ती प्राप्त झालेली असणार असं मला वाटतं.
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 22 วันที่ผ่านมา +4

    Drisht lagte asha swabhimani mansala....deva rakshan kr aajiche 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      निसर्गाच्या रूपाने देवानेच रक्षण केले असे म्हणावे लागेल, गेली 50 वर्षे आजी या निसर्गासोबत असल्यामुळे तिच्यामध्ये अद्भुत प्रकारची शक्ती आहे असं मला वाटतं.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @shrinivaskamble159
    @shrinivaskamble159 22 วันที่ผ่านมา +7

    छान आजी खूप काटक आहेत त्यांना आहे तिथेच राहू द्यावे कदाचित शहरामध्ये त्यांना तो आनंद मिळणार नाही

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา +2

      रानात राहून आजीला एक प्रकारची अशी दैवी शक्ती प्राप्त झालेली आहे किंबहुना त्यामुळे तिला दीर्घायुष्य प्राप्त झालेला आहे. शहरामध्ये असं वातावरण मिळत नाही. मनःपुर्वक धन्यवाद 🙏

    • @MaheshPatil-tl7xr
      @MaheshPatil-tl7xr 21 วันที่ผ่านมา +1

      Right

  • @nileshmhatre9389
    @nileshmhatre9389 22 วันที่ผ่านมา +9

    दादा मि परवाच बोलो तुम्हाला आजीची व्हिडिओ येऊ देत. आज व्हिडीओ आला. पण आज आजी जरा ह्या प्रसंगानी दुःखी वाटली. काळजी घ्या आजीची.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา +1

      आजी सोबत घडलेला प्रसंग खरोखरच खूप कठीण होता त्यामुळे थोडावेळ ती घाबरली होती परंतु नंतर आम्ही तिच्यासोबत थोड्यावेळ घालवला आणि तिला बरं वाटलं कारण आम्हाला पाहून तिला खूप आनंद झाला आणि ती एकटे असल्यामुळे खूप दुःखी होती.
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @swapnilsagar438
    @swapnilsagar438 22 วันที่ผ่านมา +6

    Khup sundar ❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @user-hg8ei9pj4d
    @user-hg8ei9pj4d 18 วันที่ผ่านมา +2

    खूप छान वाटले

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  18 วันที่ผ่านมา

      अगदी मनापासून धन्यवाद 🙏 आपल्या शुभेच्छा नेहमी नवीन काम करायला प्रेरणा देतात.

  • @guruvaryasameeragurushamdi5628
    @guruvaryasameeragurushamdi5628 10 วันที่ผ่านมา +1

    Kiti vishwas aahe aajjicha waghjaiwar kharach june te sone. Khup Chan dada. Asach aajjinchi aani aamchi gath bhet ghalun det ja. Dhanyawad.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 วันที่ผ่านมา +1

      गेली 50 पेक्षा अधिक वर्ष आजीने रानात घालवलेले आहेत, त्यामुळे निसर्गाचं आणि आजीचं एक प्रकारचं अतूट असं नातं तयार झालेले आहे आणि निसर्गामध्ये राहून तिच्यामध्ये एक प्रकारची अद्भुत शक्ती आलेली आहे असं मला वाटतं.
      प्रत्येक आठवड्याला एक तरी व्हिडिओ तयार करण्याचा माझा प्रयत्न आहे पुढचा व्हिडिओ लवकरच येणार आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @sagarrenuse4415
    @sagarrenuse4415 22 วันที่ผ่านมา +2

    खुप छान ! ❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 20 วันที่ผ่านมา +3

    एक हृदय स्पर्शी व्हिडीओ , आ आधीचा आजीचा व्हिडीओ पाहिला होता , दादा माझे गाव तळ कोकणात आहे आठ दिवसा पूर्वी गेलो होतो तो आज पुण्याला आलो , मागील व्हिडीओ मध्ये दाखविल्या प्रमाणे माझ्या गावची ही तीच परिस्थिती आहे , छान घरे बांधलेली आहेत पण सगळी कुलूप लावून बंद , दादा गावात पिंडाला शिवायला कावळा सुद्धा नाही , अर्थात ते तरी कश्याला राहातील तिथे , वस्ती नाही त्या मुळे अन्न नाही , फारच विदारक परिस्थिती आहे गावची 😢😢

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  20 วันที่ผ่านมา +1

      सर्वप्रथम आपले मनापासून आभार🙏 तुम्ही व्हिडिओ अगदी मनापासून पाहिला.
      मलाही असंच वाटतंय की ग्रामीण भागातील परिस्थिती आज अत्यंत विदारक अशीच आहे. गावात घर आहेत पण राहायला माणूसच नाहीत आणि ही जुनी पिढी, ही आनंदी पिढी आपल्याला सोडून जात आहे, ज्यांनी खरं ऐश्वर्य आणि खरे आनदी जीवन जगली ती पिढी कुठेतरी आता आपल्याला सोडून जात आहे. ही नऊवारीतील किंवा धोतर नेसणारी पिढी आपल्यापासून कायमची दूर होत चाललेली आहे. आज गावात सगळ्या सुख-समृद्धी सगळ्या सोयीसुविधा आल्या परंतु समाधान मात्र कुठेतरी हरवून बसलो, ही जुनी पिढी म्हणजे आपल्याला मार्गदर्शक होते परंतु तेच नाही आता या जगामध्ये. खरंच आज आपल्याकडे सगळं आहे 4g आहे 5g सेवा आहे टेक्नॉलॉजी आहे परंतु असं ज्ञान देणारी माणसं आपल्यात नाहीत. खरं पाहिलं तर असं निसर्ग सोबत राहणं हेच खरं जीवन परंतु आपण शहराकडे वळलो ते पैशासाठी कारण शेवटी सगळं सुख हे पैसे सोबतच मोजले जाते परंतु वास्तविकता अशी आहे की तुम्ही समाधानी किती आहात, शेवटी पैशापेक्षा मनाचं समाधान मोठं.

    • @pratibhagathadi2928
      @pratibhagathadi2928 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank you dada very inspiring

    • @vilaskubal6954
      @vilaskubal6954 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Mivatsaru धन्यवाद 🙏🙏

  • @archanasrecipecreativity7816
    @archanasrecipecreativity7816 22 วันที่ผ่านมา +2

    Khup chan

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद

  • @meghagade4450
    @meghagade4450 21 วันที่ผ่านมา +1

    खुप छान

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 วันที่ผ่านมา

      अगदी मनापासून धन्यवाद🙏

  • @pankajgavit4638
    @pankajgavit4638 21 วันที่ผ่านมา +2

    Great khupch chaan jivan Aahe

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 วันที่ผ่านมา

      माणसाने निसर्गावर आक्रमण केले परंतु माणसाची खरी प्रगती निसर्गासोबत राहण्यातच आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @plcandrlcprogramingbasicto7516
    @plcandrlcprogramingbasicto7516 22 วันที่ผ่านมา +2

    मस्त 😊

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @shobhajadhav3401
    @shobhajadhav3401 17 วันที่ผ่านมา +1

    भाऊ या आजीच गाव कोणते फार सुंदर आजी बोलतात त्याच कोणी नाही का

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  16 วันที่ผ่านมา

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 19 วันที่ผ่านมา +3

    नायलाॅन टेरीकाॅट पाॅलीस्टर च्या साड्या लगेच पेट घेतात शक्यतो चुलीपुढं तरी काॅटनचीच साडी कपडे असावेत निदान त्वरीत तरी पेट घेऊन पसरणार नाही

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  18 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर 👍
      आजीच्या आयुष्याची दोरी बळकट म्हणावी लागेल.
      धन्यवाद 🙏

  • @Kokneaprnakhandu
    @Kokneaprnakhandu 22 วันที่ผ่านมา +2

    Nice

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @archanakharat9108
    @archanakharat9108 8 วันที่ผ่านมา +1

    आजीला बघून मनाला खूप हळहळ वाटली

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  8 วันที่ผ่านมา

      ही जुनी माणसं खरंच खूप मायाळू, एकदा कुणाला जीव लावला की अगदी शेवटपर्यंत...

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  8 วันที่ผ่านมา +1

      ही जुनी माणसं खूप मायाळू, एकदा जीव लावला की शेवटपर्यंत....

  • @smitsalokhe
    @smitsalokhe 22 วันที่ผ่านมา +3

    दादा आजीला मुलगा मुलगी कोण आहे की नाही वाईट वाटले आजीची व्यथा बघुन

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      आजीला एक मुलगा आहे सून पण आहे परंतु आजीला गावात अजिबात करमत नाही त्यामुळे ती गावाबाहेर असलेल्या वाड्यामध्ये राहते. गेली पन्नास वर्षापेक्षा जास्त काळापासून तिथे रानात एकटीच असते.
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @madhavikhatate6775
    @madhavikhatate6775 16 วันที่ผ่านมา +2

    Khup chan dada ajji ahe tumhi parat jaun bheta

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  16 วันที่ผ่านมา

      रविवारी पुन्हा एकदा भेटलो.
      उद्या सकाळी नवीन व्हिडिओ येणार आहे आजीचा.
      धन्यवाद 🙏

  • @SK12390
    @SK12390 22 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @Jayashreegunjal24
    @Jayashreegunjal24 13 วันที่ผ่านมา +1

    खूप छान वाटत आहे असे व्हिडिओ khada

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  13 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला अधिक उत्साह येतो.

  • @atharvlimhan7055
    @atharvlimhan7055 22 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @sushamavarak8017
    @sushamavarak8017 22 วันที่ผ่านมา +10

    दररोज विडिओ बनवा आजीचा

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      दररोज चा व्हिडिओ बनवणे शक्य होणार नाही का तर मी शहरांमध्ये कामाला असतो आणि आजी गावाकडे असतात. परंतु प्रत्येक आठवड्याला व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न नक्की करीन.

    • @amolhinge4031
      @amolhinge4031 20 วันที่ผ่านมา +1

      ​@@Mivatsaru konta gaav aahe aajicha?? Aani takat java video week madun 1da tari

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  20 วันที่ผ่านมา

      @@amolhinge4031 आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @user-fx1ku8rt4i
    @user-fx1ku8rt4i 19 วันที่ผ่านมา +2

    आजीला मुलबाळ नाही का मागच्या मुलाखतीत तर धडाधकट मुलगा दाखवला होता

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  18 วันที่ผ่านมา +2

      आजीला एक मुलगा आहे, नातू आहे, सुनबाई पण आहेत आणि त्यांचा मुलगा अगदी श्रावण बाळाप्रमाणे त्यांची काळजी घेतो, परंतु आजीला गावात करमत नाही म्हणून ती एकटी राहते रानात आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्री त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा असतो.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @dipalimhatre1219
    @dipalimhatre1219 22 วันที่ผ่านมา +1

    Nice❤❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      Thanks 🤗

  • @manishanair196
    @manishanair196 3 วันที่ผ่านมา +1

    I really loved the way aajji is taking her life.
    I would like to meet her once

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  3 วันที่ผ่านมา

      These people are motivation and inspiration to us. 🙏

  • @shailajatodkar3761
    @shailajatodkar3761 22 วันที่ผ่านมา +1

    खुप छान आहे आजी.....❤😊

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      ही आजी म्हणजे आजकालच्या पिढीला प्रेरणास्थान आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @gayatrisonawane2813
    @gayatrisonawane2813 4 วันที่ผ่านมา +1

    आजी ❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 วันที่ผ่านมา

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @laxmithakre1287
    @laxmithakre1287 19 วันที่ผ่านมา +2

    आजी कडे पाहून आपले जगणे जगणे नव्हेच

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  19 วันที่ผ่านมา

      निसर्गाच्या सोबत राहणे म्हणजे खरे जीवन... परंतु निसर्गाच्या विरोधात नाही
      मनःपुर्वक धन्यवाद🙏

  • @pratibhathakur962
    @pratibhathakur962 15 วันที่ผ่านมา +1

    खूप रडू आले आजी ला रडताना पाहून, दादा pls काळजी घ्या तिची तुम्ही पण खूप छान आहात. धन्यवाद.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  15 วันที่ผ่านมา

      या प्रसंगामुळे आजी जरा घाबरली होती कारण तिच्या जीवावर बेतलं होतं पण थोडा वेळ सोबत घालवल्यामुळे तिलाही जरा बरं वाटलं.

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 22 วันที่ผ่านมา +4

    आजी 🙏🙏🙏 एकच नंबर
    प्रेमळ आहेत आजिंचे गाव कोणते आहे भाऊ आजींचा पहिला व्हिडिओ पण पाहिला होता त्यांनी बिस्किटे सांगितली होती आणायला तुम्ही विसरलात का

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา +2

      आजीचे गाव राजगड तालुका म्हणजे पूर्वीचा वेल्हे तालुक्यातील विंझर गाव. तुम्ही आठवण करून दिल्याप्रमाणे मी आजीला चार बिस्कीटचे पुढे आणि चार खारीचे पुढे आणले होते परंतु सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवू शकत नसल्यामुळे ते मी दाखवले नाही आणि त्यांना खूप बरं वाटलं आम्ही त्यांना परत भेटायला आल्यामुळे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

    • @SudamKolte-yj7sc
      @SudamKolte-yj7sc 22 วันที่ผ่านมา +1

      ही माझी खरी आज्जी. ती कुठंच जाणार नाही. शेवटचा दिस गोड व्हावा, आई जिजाऊ तिची काळजी घेईल.

  • @deepakkadam4423
    @deepakkadam4423 9 วันที่ผ่านมา +1

    आजीचं बालपण,नंतर लग्न आणी कुंटूंब ते आतापर्यंतचं आयुष्य व आजीच्या आठवणी यावर व्हिडीयो बनवा.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  9 วันที่ผ่านมา

      हो नक्कीच, आजीच्या बालपणाचा आणि तिच्या बालविवाहाचा व्हिडिओ उद्या सकाळी येणार आहे तुम्ही नक्की पहा.

  • @vijayanerlekar9410
    @vijayanerlekar9410 10 วันที่ผ่านมา +2

    इतकी वाकलेली आजी. एव्हढ्या कठीण परिस्थितीत एकटी रहाते. तीला एखाद्या वृध्दश्रमात आसरा कोणी देऊ शकतनाही का?

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 วันที่ผ่านมา

      आजीला मुलगा, सून, नातू, नातवंडे परतुंडे पण आहेत आणि आजीचं घर गावात सुद्धा आहे परंतु तिला गावात राहायला अजिबात आवडत नाही त्यामुळे ती शेतामध्ये असलेल्या घरात राहते. कारण गेली 50 वर्षांपासून ते रानामध्ये एकटीच राहते.
      निसर्गाच्या सानिध्यात राहुन तिला एक प्रकारची शक्ती प्राप्त झाली आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @YashrajGurav-jo6yv
    @YashrajGurav-jo6yv 21 วันที่ผ่านมา +2

    Khup chhan video dada❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 วันที่ผ่านมา

      अगदी मनापासून धन्यवाद, आपल्या शुभेच्छा नेहमी नवीन काम करायला उत्सव देतात, प्रेरणा देतात

    • @YashrajGurav-jo6yv
      @YashrajGurav-jo6yv 21 วันที่ผ่านมา

      @@Mivatsaru श्री स्वामी समर्थ नेहमी तुमच्या पाठीशी आहेत

  • @indumatishirsat
    @indumatishirsat 22 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @ovbhosalevlogs
    @ovbhosalevlogs 21 วันที่ผ่านมา +2

    Nice video 🥰

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 วันที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @namdeotulsankar6562
    @namdeotulsankar6562 19 วันที่ผ่านมา +2

    Bhai tumhala salute. ashich ranjalya ganjalya lokana madat kara. Deo apale bhale karo.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  18 วันที่ผ่านมา

      अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो. मनःपूर्वक धन्यवाद. 🙏

  • @meeraamin4310
    @meeraamin4310 18 วันที่ผ่านมา +1

    Aadhchya videot fresh hotya aaji...Aata ashakt vatlya...Tyana ektila theu naye...Kalji ghyavi javalchyani..

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  17 วันที่ผ่านมา

      तुम्हाला काळजी वाटणं साहजिकच आहे, परंतु त्या दिवशी आजीच्या जीवावर बेतलं त्यामुळे जरा घाबरलेली होती परंतु थोडा वेळ आमच्यासोबत गेल्यानंतर तिला जरा बरं वाटलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्यासोबत तिचा मुलगा असतो, दिवसभर नसला तर रात्री झोपायला असतो तो त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही.
      धन्यवाद,🙏

  • @ragnandinipatil1302
    @ragnandinipatil1302 5 วันที่ผ่านมา +1

    आजी तुम्हाला तुमच्या घरी नेण्यासारखे असेल शक्य असेल तर घेऊन जा

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 วันที่ผ่านมา

      आजीचे गावात घर आहे परंतु तिला तिथे अजिबात करमत नाही म्हणून ती रानात राहते. बहुधा त्यामुळे ती निरोगी आणि दीर्घायुषी आहे. 👍

  • @sayli3727
    @sayli3727 15 วันที่ผ่านมา +1

    दादा खूप छान आहे आजी गाव कुठल आहे.खूप स्वाभिमानी आहे आजी.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  15 วันที่ผ่านมา

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 22 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏
    हा नमस्कार फक्त आजी साठी

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      ही जुनी माणसं म्हणजे अडगळीतल्या फर्निचर नसून देवाच्या मंदिराचा कळस आहेत.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @PratimaKasare
    @PratimaKasare 20 วันที่ผ่านมา +1

    Aaji khup chan ahe Tila bghun mla maza aajichi athvn Ali khup mst ahe hi pithi mla khup athvn yete maza aaajichi 😢

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  20 วันที่ผ่านมา

      नऊवारीतील आणि धोतर नेसणारी बहुदा शेवटची पिढी असणार आहे, ही आनंदी आणि समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @suhasmore8899
    @suhasmore8899 20 วันที่ผ่านมา +1

    खूप छान काम करताय❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  20 วันที่ผ่านมา

      म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असतं या लोकांना एखाद्या लहान मुलाप्रमाणे सांभाळावं लागतं.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  20 วันที่ผ่านมา

      म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असतं या लोकांना एखाद्या लहान मुलाप्रमाणे सांभाळावं लागतं.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 22 วันที่ผ่านมา +2

    Chan aahe aaji che video. Kiti mehanaat karat aahe. Aaji chi mule kuthe aahe? Aani jau ka nako bolu Yeu ka ase bol.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      आजीला एक मुलगा आहे आणि तो आजीची अगदी श्रावण बाळाप्रमाणे काळजी घेतो. तो गावात राहतो परंतु आजीला गावात राहायला अजिबात आवडत नाही.
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @maheshgaming6749
    @maheshgaming6749 21 วันที่ผ่านมา +2

    बिस्कीट राहिलं भाऊ

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 วันที่ผ่านมา +2

      दादा, आम्ही आजीला न विसरता दोन बिस्कीट चे पुढे आणि दोन खारीचे पुढे घेऊन दिलेले आहेत, कसं आहे की सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये दाखवता येत नसल्यामुळे आम्ही शूटिंग नाही केलं.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @sonalisuralakar8514
    @sonalisuralakar8514 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    आजीला मेस मध्ये टिफीन लावा

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 20 วันที่ผ่านมา +3

    Kaalji ghya Aaji chi Dada

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  20 วันที่ผ่านมา

      हो नक्कीच, आम्ही आता आजीची काळजी घेत आहे आणि आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही आज तिला परत भेटायला गेलो होतो.
      परंतु आजीला गावात राहायला आवडत नाही, तिचं अजिबात मन रमत नाही, तिचा निसर्गासोबत जे नातं निर्माण झालेले आहे त्यामुळे ती रानातच राहायला पसंद करते
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @hemrajmasal9035
    @hemrajmasal9035 21 วันที่ผ่านมา +2

    पुढच्या पिढीला अशी आजी दिसणार नाही

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 วันที่ผ่านมา

      नऊवारी नेसणारी आणि धोतर घालणारी ही पिढी बहुदा शेवटची पिढी असणार कारण ही आनंदी आणि समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं खूप दुःख आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @Vikas.thorat640
    @Vikas.thorat640 22 วันที่ผ่านมา +4

    दादा आजींनी बिस्किट्स पुडा मागितलं होत
    तुम्ही म्हणालात दोन देतो पण व्हिडिओ मध्ये नाय दाखवले दिलेलं

    • @rohiniparbat7111
      @rohiniparbat7111 22 วันที่ผ่านมา

      Aaji 2 biscuit pude mhanalya..dada mhanale 4 aanto

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      आम्ही जाताना दोन बिस्कीट चे आणि दोन खारीचे पुढे घेऊन गेलो होतो परंतु प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये दाखवणे शक्य होत नाही त्यामुळे शूट करायचं राहून गेलंय
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @sonalisuralakar8514
    @sonalisuralakar8514 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    आजीला शेतात का ठेवलं आहे

  • @namdeolimhan3112
    @namdeolimhan3112 22 วันที่ผ่านมา +1

    Waragal, 57, Indrayani...junya athavani...

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      हो अजून पण या पद्धतीने भात शेती केली जाते.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @rohiniparbat7111
    @rohiniparbat7111 22 วันที่ผ่านมา +3

    Aajini biscuit pude sangitle hote 2 aannyas dile ka?

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา +1

      खरं सांगायचं तर मी आजीला दोन बिस्कीटचे पुढे आणि दोन खारीचे पुढे आणले होते पण प्रत्येक गोष्ट आपण व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही त्यामुळे मी ते रेकॉर्डिंग केलं नाही.
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @renukamakar60
    @renukamakar60 22 วันที่ผ่านมา +1

    जुन ते सोन

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      ही जुनी माणसं म्हणजे 24 कॅरेट सोन्ं आहे
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @anujapatil8220
    @anujapatil8220 22 วันที่ผ่านมา +1

    Kuthy rahity aaji

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @InduSasane-of5rh
    @InduSasane-of5rh 20 วันที่ผ่านมา +2

    Gavat neun ghala na dada aaji la lek nahi ka tya aajila deva nkore Aashi aavlad😢

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  20 วันที่ผ่านมา

      आजीला सर्व कुटुंब आहे मुलगा आहे सुना नातवंड पण आहेत परंतु आजीला गावात अजिबात करमत नाही त्यामुळे ती गावाबाहेर असलेल्या आपल्या वाड्यामध्ये एकटी राहते आणि आजीचा मुलगा अगदी श्रावण बाळाची काळजी घेतो रात्री झोपायला पण त्यांच्याबरोबरच असतो.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @user-kp2ny1wr6p
    @user-kp2ny1wr6p 22 วันที่ผ่านมา +2

    Kontye gav te sanga.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 วันที่ผ่านมา

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @subhashgawade6756
    @subhashgawade6756 22 วันที่ผ่านมา +4

    जुनं ते सोनं............❤️❤️❤️

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา +1

      जुनी माणसं म्हणजे 24 कॅरेट सोनं

  • @Kokneaprnakhandu
    @Kokneaprnakhandu 22 วันที่ผ่านมา +3

    Aji che ajhun video taka bhau khup shikayla betl video madhun

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา +1

      हो नक्कीच.
      मी पुन्हा आजीला भेटायला जाणार आहे त्यावेळेस काहीतरी नवीन शिकून येईल हे मात्र नक्की.

    • @Kokneaprnakhandu
      @Kokneaprnakhandu 22 วันที่ผ่านมา

      Dada Jatana ajila khup kahi khayal geun ja khup happy hoeil aji

  • @siddeshsagar1449
    @siddeshsagar1449 22 วันที่ผ่านมา +2

    आम्ही विंझरकर ❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      मनःपूर्वक धन्यवाद विंझर कर

  • @qamrunissasayed1104
    @qamrunissasayed1104 7 วันที่ผ่านมา +1

    He kythly gaw aahy te tari sanga

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  6 วันที่ผ่านมา

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @marutisalunkhe7851
    @marutisalunkhe7851 14 วันที่ผ่านมา +1

    मित्रा हा विडिओ कोणत्या जिल्ह्य़ातील तालुक्यातील गावातील आहे.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  14 วันที่ผ่านมา

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @YogitaJadhav-xo7qz
    @YogitaJadhav-xo7qz 20 วันที่ผ่านมา +1

    Dada Ajji ch kont gav ahe

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  20 วันที่ผ่านมา

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852

  • @rohiniparbat7111
    @rohiniparbat7111 22 วันที่ผ่านมา +1

    Konte gav aahe aani che.. address?

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @sushmaghotge1703
    @sushmaghotge1703 22 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही म्हणींचा उलटा वापर केला आहे. खरी म्हण "काळ आला होता पण वेळ आली नव्हती "अशी आहे.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      हो बरोबर मलाही तसंच वाटलं होतं परंतु या जुन्या म्हणी पाठ करायला आजी सारखी हुशारी च पाहिजे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @shobhajadhav3401
    @shobhajadhav3401 17 วันที่ผ่านมา +1

    मी फार छान सा॑भाळेन मला तुमचं काही नको माझ्या कडे यायचा असेल तर मला पत्ता पाठवा मी माझ्या आई म्हणुन साभाळेन

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  16 วันที่ผ่านมา

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @kisanraut684
    @kisanraut684 21 วันที่ผ่านมา +1

    कोणत्या. भागातील हा व्हिडीओ आहे सांगत चला

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 วันที่ผ่านมา

      पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील विंझर गाव.
      धन्यवाद

  • @nishawalse4177
    @nishawalse4177 22 วันที่ผ่านมา +2

    Ajjiche gaon konte aahe

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @ashabagayatkar2741
    @ashabagayatkar2741 22 วันที่ผ่านมา +1

    Aaji na vrudhhashramat theva. Tya aata thakalya.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      आजी पोरगी नाहीये तिला एक मुलगा आहे आणि तो त्या आईची अगदी मनापासून अगदी श्रावण बाळाप्रमाणे काळजी घेतो परंतु गोष्ट अशी आहे की आजीला गावात राहायला आवडत नाही.
      मनःपूर्वक धन्यवाद

  • @sangitavichare3921
    @sangitavichare3921 22 วันที่ผ่านมา +1

    Aaji cha address pathvalka pls

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 18 วันที่ผ่านมา +1

    आज जी माणसे ६०ते ६५ वयाची आहेत त्यांच्या घरी असे म्हातारे नातलग जरुर असणार, त्यांनी एक दा जरी त्याची भेट घेतली तरी आपल्या ह्या व्हिडिओ केलेल्या मेहनती चे सार्थक होईल. धन्यवाद. 😅श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  18 วันที่ผ่านมา

      म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असतं, अगदी लहान मुलासारखं ह्या लोकांना सांभाळावं लागतं आणि घराला एक आधार असतो, ज्ञानाचे भांडार असतात ती जुनी लोकं.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @Animalplanet0711
    @Animalplanet0711 21 วันที่ผ่านมา

    दादा मी पण vlogger आहे... आपण सोबत फिरून वलॉग बनवू शकतो .. आपण भेटू शकाल का 😊

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  21 วันที่ผ่านมา

      हो नक्कीच मला आनंद होईल तुझ्याबरोबर काम करायला. 😍

  • @chitraloke8364
    @chitraloke8364 22 วันที่ผ่านมา +1

    Aajiche video khup cham vatat ...motivational aastat❤😢

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @reshmakamble-3228
    @reshmakamble-3228 20 วันที่ผ่านมา +1

    He kont gav ahe sanga na dada

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  20 วันที่ผ่านมา

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @rohidasshinde2551
    @rohidasshinde2551 20 วันที่ผ่านมา +1

    कोणते गाव आहे हे कुठला जिल्हा आहे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  20 วันที่ผ่านมา

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @SamirRenuse-zq7xu
    @SamirRenuse-zq7xu 16 วันที่ผ่านมา +1

    गाव कोणते आज्जी चे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  16 วันที่ผ่านมา

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 22 วันที่ผ่านมา +2

    हा व्हिडिओ कुठल्या गावातून आहे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      पुणे जिल्ह्यातील राजगड तालुका पूर्वीचा वेल्हे तालुक्यातील विंझर हे गाव
      मनःपूर्वक धन्यवाद

  • @c.khadse5204
    @c.khadse5204 22 วันที่ผ่านมา +1

    ,,,,,,,,,,,🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  22 วันที่ผ่านมา

      मनःपुर्वक धन्यवाद