महाराष्ट्रातील एक अनोखे आदिवासी गाव | Kumshet Village | Kumshet Village Akole | Konkankada Kumshet

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2023
  • महाराष्ट्रातील एक अनोखे आदिवासी गाव | Kumshet Village | Kumshet Village Akole | Konkankada
    ▬▬▬▬Social Media▬▬▬
    follow me on --
    Instagram- / somnath.nag. .
    Facebook- / somnathnagaw. .
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Google Map Link :------Pune to Kumshet : goo.gl/maps/kX8nbiwcFk18hKF8A
    सरपंच सयाजीराव आसवले - +91 99222 57664
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    KumshetKalki waterfall is one of the biggest and most spectacular waterfall in Akole , Kumshet Village . One Can reach this waterfall by a private vehicle via Road.
    अकोले तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वांत उंच डोंगरी शिखर कळसूबाई, भंडारदरा धरण, निळवंडे धरण आणि प्रवरा नदी आहेत.
    याच तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं कुमशेत गाव आहे. सह्याद्रीच्या कुशीतल्या एका गर्द जंगलात रोजच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून आम्ही ही अनोळखी पायपीट केली. निबीड अरण्यातून नदी, ओढे पार करत सह्याद्रीच्या उंच कड्यावरून झेपावणारा कळकी वॉटर फॉल पाहिला . तिथे पाहिलेली प्रत्येक फ्रेम नयनरम्य व तेवढीच मनमोहक होती. हे सर्व अनुभवताना भरून आलेली सुरम्य संध्याकाळ मनपटलावर असंख्य आठवणी करून गेली. ह्या व्हीडीओ मध्ये देवराईतला निसर्गायन, धबधबा आणि सह्याद्रीच्या सांज गारव्यातली संध्याकाळ दाखवली आहे. पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.हे सर्व या व्हिडीओत पाहता येईल
    ▬▬▬▬Equipment▬▬▬▬
    Equipments Used During Video :
    Sony DSLR Camera : amzn.to/2Tnordq
    Gimbal : amzn.to/2ZAcmWf
    Camera Lense : amzn.to/36mwxs2
    DJI Pocket Camera : amzn.to/2HYwsmd
    iphone : amzn.to/2XecPKR
    Drone : amzn.to/2WMYmX7
    Audio Recorder : amzn.to/3e6mHNr
    Mic : amzn.to/36fFvXY
    Action Cam : amzn.to/3cSrxh3
    Editing Machine : amzn.to/2zh5Fxl

ความคิดเห็น • 735

  • @rameshkumre3887
    @rameshkumre3887 ปีที่แล้ว +111

    आम्ही आदिवासी आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.सर्व आदिवासी समाज हा निसर्ग पुजक आहे.अन,हिच आमची संस्कृती तिला जपुन ठेवने हेच आमचे आदय कर्तव्य.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  ปีที่แล้ว

      Thank you

    • @deepaktawde9763
      @deepaktawde9763 ปีที่แล้ว +1

      Tasech Raha.. kadhich jamini viku naka 🙏🙏

    • @K-K-007
      @K-K-007 ปีที่แล้ว +1

      Great❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @ashokdhumal5217
      @ashokdhumal5217 11 หลายเดือนก่อน +5

      अतिशय छान सुंदर चित्रीकरण . मी कृषी विभागाच्या माध्यमातून कुमशेत गावात काम करीत असताना सरपंच सयाजी आसवले व गावकऱ्यांचा माझा फार जवळून संबंध आला. जितका निसर्ग, देवराई सुंदर तितकीच माणसं प्रेमळ, स्वच्छ मनाची,आपुलकीने वागणारी , संस्कृती परंपरा जपणारी मी म्हणेन ही इथली नुसती चांगली माणसं नाहीत तर देवमाणसं आहेत.

    • @balasahebmagar767
      @balasahebmagar767 8 หลายเดือนก่อน +1

      खूप छान वाटले.

  • @thatsmyname6846
    @thatsmyname6846 ปีที่แล้ว +117

    आजच्या ह्या आधुनिक काळात...ह्या माझ्या सह्याद्रीला देवासारखे पुजनारे आणि आईसारखे सभाळणारे हे आदिवासी बांधव , त्यांची कला, संस्कृती ,मेहनत, कष्ट बघून मन तृप्त झाले❤️🏞️🌾✨

  • @thatsmyname6846
    @thatsmyname6846 ปีที่แล้ว +56

    खूपच सुंदर💫...आदिवासी गरीब असले तरी त्यांच्याकडे निसर्गाची 🏞️आणि मनाची ❤️श्रीमंती खूप आहे😇⛰️🌾✨

  • @avinashbhoye2274
    @avinashbhoye2274 ปีที่แล้ว +26

    मला गर्व आहे आदिवासी असल्याचा

  • @nikhilkhamkar6315
    @nikhilkhamkar6315 ปีที่แล้ว +31

    मी महादेव कोळी जमातीचा आहे ज्या वैशिष्टपूर्ण पद्धतीने तुम्ही बोलता आणि तुमची व्हिडिओ editing अप्रतिम... तुम्ही आमची संस्कृती आणि जगणं इतर लोकांना अतिशय उत्तम पद्धतीने दाखवलं त्या बद्दल खूप आभार..keep it up

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  ปีที่แล้ว +1

      Thank you

    • @namdevhulawale5928
      @namdevhulawale5928 4 หลายเดือนก่อน +2

      फार उत्तम निसर्ग सुंदर मी अकोले तालुक्यातील च आहे पणं हे गाव माहित नाही कारण मुंबईत असल्याने ok far छान

  • @mandargujar500
    @mandargujar500 ปีที่แล้ว +18

    मी एक आदिवासी मुलगा आहे ..माझ्यासाठी निसर्गरम्य वातावरण काही नवीन गोष्ट नाही .पण तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओ मध्ये गोष्टी दाखवल्या खरंच अप्रतिम ..मी व्हिडीओ न स्क्रिप्ट करता बघितला..

  • @amitwayal8788
    @amitwayal8788 ปีที่แล้ว +9

    आमची संस्कृती आमचा अभिमान,
    मी आदिवासी माझा स्वाभिमान... 🙏🏼

  • @ramapathave5468
    @ramapathave5468 ปีที่แล้ว +15

    खूप आभारी आहोत की आपण आमच्या अकोले तालुक्यातील निसर्ग महाराष्ट्रातील जनतेला दाखवल्याबद्दल आणि आमच्या रूढी परंपरा

  • @sanjaybhoye6281
    @sanjaybhoye6281 ปีที่แล้ว +10

    मला गर्व आहे आदिवासी असल्याचा जय जोहार ,,,,जय आदिवासी ,,,,

  • @gulabnimbekar8475
    @gulabnimbekar8475 ปีที่แล้ว +15

    आदिवासी समाज भोळा भाबडा इमानदार आणि खूप कष्टाळू असतो

  • @thamarawate4103
    @thamarawate4103 ปีที่แล้ว +31

    विकासाच्या नावाखाली जंगल तोड करून सपाटी करणाचा तडाखा लावणाऱ्या लोकांनी खरंच आदिवासी समाजाचा आदर्श घेऊन निसर्ग जपला पाहिजे .
    आज आदिवासी समाजा मुळेच जल जंगल जमीन टिकून आहे . निसर्ग पूजक असणाऱ्या आदिवासी समाजाला सलाम केला पाहिजे .
    खूप छान विश्लेषण केले सर तुम्ही .
    अतिशय सुंदर व्हिडिओ आहे .

  • @sandipabhale4083
    @sandipabhale4083 ปีที่แล้ว +6

    मी अकोल्याचा रहिवासी असून आजपर्यंत अनेकांचे व्हिडिओ पहिले परंतु आपला व्हिडिओ खूपच सुंदर वाटला..छानच छायाचित्रण केले असून सुंदर शब्द रचनेत माहिती मांडली आहे. पुन्हा पुन्हा येऊन हवा हवा सा वाटणारा अकोले तालुका... म्हणजे महाराष्ट्राचे काश्मीर...❤❤❤🎉

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  ปีที่แล้ว

      मनःपुर्वक आभार

  • @ashokgabhale8011
    @ashokgabhale8011 ปีที่แล้ว +8

    खुप छान माझा आदिवासी माणूस हा प्रामाणिक आणि मेहनती आहे. माणुसकीचं दर्शन देणारा

  • @graminvlogkatta4657
    @graminvlogkatta4657 ปีที่แล้ว +6

    बिताका गाव,खुप भारी आहे, शेजारी बितान गड पण आहे.
    सांगायचे झाले तर 10/15 वर्षापूर्वी हे गाव नकाशात सुद्धा नवतं.खुप गरीब लोक आहेत तिथे.
    गाव बिताका, ता,अकोले,जि-अहमदनगर.
    ( 1 )जाण्याचा मार्ग-ईगतपुरी-घोटी-सर्वतीर्थ टाकेद-ते बिताका.
    ( 2 ) राजुर-वाकी बंगाल-देवगाव-खिरविरे-ते बिताका.

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 ปีที่แล้ว +19

    सर्वप्रथम कुमशेत गावचे गावकरी ह्यांना खूप खूप धन्यवाद, त्यांनी ही जैवविविधता व निसर्ग अतिशय सुंदरपणे जपून ठेवलाय. कोकणकडा पाहून मन अतिशय भारावून गेले. आणी सोमनाथ जी, ही अनुभूती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. High class Video 👍👍👌👌

  • @sanketbendal7881
    @sanketbendal7881 ปีที่แล้ว +8

    kharch आयुष्य असं असावं..जिथं पैसा नाही तर माणुसकी आणि समाधानाच सुख असावं...❤😍

  • @balnathsonawane7060
    @balnathsonawane7060 ปีที่แล้ว +33

    सर खूप छान!!! खूप मेहनत घेतली आहे आपण.. आदिवासी लोकांना नक्कीच याचा फायदा होईल... खूप आभारी आहोत..

  • @rohanthorat871
    @rohanthorat871 ปีที่แล้ว +13

    त्यांनी केलेल्या सत्काराच्या प्रसंगी गावकऱ्यांच्या
    मुखावरचा निरागस भाव बघून डोळ्यात टचकन पाणी आलं 🙏👏👏 जय महाराष्ट्र

  • @anandvanjare6808
    @anandvanjare6808 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर आहे आदिवासी मनाने खूप श्रीमंत आहे निसर्गाशी त्यांचं नातं अतुट आहे आणि आपलेही अभिनंदन

  • @SUSHanTM01
    @SUSHanTM01 ปีที่แล้ว +5

    मी एक आदिवासी मुलगा आहे आणि मी खूप दूर आलो होतो निसर्ग पासून पण दादा आज तुझा vlog पाहिला आणि पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात परत आलो..!
    Thank you 😊🙏❤️

  • @manishakawate4567
    @manishakawate4567 8 หลายเดือนก่อน +3

    jay adivashi Jay ragoji bhanghare

  • @rahulpatil2035
    @rahulpatil2035 ปีที่แล้ว +4

    खूप छान ठिकाण आहे . मी स्वतःच थोडा दिवसा आधी या गावाला भेट दिली खूप सुंदर ठिकाण आहे .आणि तितली लोक पण खूप प्रेमळ आहे आमची भेट सरपाचांशी झाली त्यांनी आमची जेवणाची सोय केली व अप्रतिम रित्या तिथला ठिकाणचं वर्णन करून सागितलं

  • @sagarshibe8965
    @sagarshibe8965 9 หลายเดือนก่อน +2

    सर तुम्ही ज्या पद्धतीने आदिवासी समाज जीवन दाखविले आहे ते अप्रतिम आहे

  • @vitthalchavan5160
    @vitthalchavan5160 ปีที่แล้ว +8

    मन भारावून गेले माझे..... इतका सुंदर video मी कधीच पहिला नाही... खुप मस्त वाटत मला हे गाव पाहून.
    आणि तुमच्या ज्या शैलीने हा video बनवला खूपच अप्रतिम.... आणि व्हिडिओ मध्ये जो तुमचा आवाज आहे तो तर इतका चांगला आहे की ऐकतच रहावं वाटत...
    आणि मला या गावाला भेट द्यायची इच्छा झाली आहे....
    🙌🙌🙌🙌🙌🙌❣️❣️❣️❣️❣️❣️👏👏👏👏👏👏👏🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  ปีที่แล้ว

      आपले मनापासून आभार

  • @sonaliadhari8783
    @sonaliadhari8783 9 หลายเดือนก่อน +2

    गर्व आहे मला मी आदिवासी असल्याचा...

  • @maheshpagare1353
    @maheshpagare1353 ปีที่แล้ว +4

    जितका निसर्ग अफलातून, अप्रतिम आहे तितक्याच ताकदीचा अगदी जीव ओतून हा व्हिडीओ बनवला; मस्तच!👍

  • @sanjeevpatil4346
    @sanjeevpatil4346 ปีที่แล้ว +7

    आदिवासी लोककल्याणकारी शिवकार्य आपल्याकडून जोपासले जात असल्याने मन भारावून गेले। अत्यन्त मानभावक भाग पाहून समाधान झाहले।।

  • @kirangavandhe9831
    @kirangavandhe9831 ปีที่แล้ว +4

    🇲🇨🏹❤️जय आदिवासी निसर्ग पुजक 🌾🌿🏹

  • @m.b.sagbhor6010
    @m.b.sagbhor6010 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर चित्रीकरण... सुंदर योग्य माहिती... आमच्या तालुक्यातील एक अनेक गावे या निसर्गाने नटलेले आहेत... त्यात हे एक कूमशेत....
    जय आदिवाशी....,,, 👏👏👏🌹

  • @aamchiagashi352
    @aamchiagashi352 9 หลายเดือนก่อน +2

    मी कोकण कडा येथे जाऊन आलो तिथे गेल्यावर स्वर्गात आल्यासारखं वाटत होत खूप छान वाटते.❤ 🏞️

  • @ManisHKumbhare91
    @ManisHKumbhare91 ปีที่แล้ว +3

    सहजच कोकणचे व्हिडिओ बघत असताना तुमचा व्हिडिओ मिळाला... आणि आता अस झालं.की रोज तुमचे विडिओ बघितल्याशिवाय होत नाही...! खुप सुंदर होता व्हिडिओ sir .!

  • @DipakChaughule
    @DipakChaughule 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान, मस्तच एकदम झकास व्हिडीओ

  • @madanthite7701
    @madanthite7701 7 หลายเดือนก่อน +1

    आजच्या काळात धावत्या जगात पण गावात राहून आपल्या परंपरेनुसार येथील लोक निसर्गाच्या सान्निध्यात आनंदाने राहतात आणि वास्तव जिवन जगतात निसर्गा ला पुजत आहेत आणि या सह्याद्रीच्या सेवा करत आहेत खूप छान विडिओ बनवलाय दादा ❤❤

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  7 หลายเดือนก่อน

      मनःपुर्वक आभार

  • @ramanthpachore505
    @ramanthpachore505 6 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏सयाजी खूपच मस्त कुमशेत गावातील वेगवेगळ्या पॉईंटचे दर्शन आम्हाला घडले🌷🌷🌷

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 👍🏻

  • @BRANDSHIRUFF
    @BRANDSHIRUFF 3 หลายเดือนก่อน +1

    मी अकोले तालुक्यातील राजूर गावचा आहे खूप छान व्हिडिओ बनवला आहे असेच निसर्गरम्य व्हिडिओ बनवत जा
    Best Of Luck❤❤

  • @ASK-vp8ll
    @ASK-vp8ll ปีที่แล้ว +6

    हरवत चाललेली जीवन शैली दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏💐

  • @sureshshelke3074
    @sureshshelke3074 หลายเดือนก่อน

    श्री.सोमनाथ नलावडे आपण निसर्गाच्या कुशीत लपलेल्या गाव व तेथील निसर्ग सौंदर्य दाखवले इतिहास हि उत्तम रितीने सांगीतला आपल्याला धन्यवाद.

  • @user-ln9pq1ij3e
    @user-ln9pq1ij3e 9 หลายเดือนก่อน +1

    माझ्या तालुक्यात जाऊन, माझ्या निसर्गावर, संस्कृती वर, माझ्या आदिवासी बांधवांवर व्हिडिओ बनवला त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तो भाग आणखीन explore करून वेगवेगळे व्हिडिओ बनवा अशी विनंती करेल.

  • @eknathagiwalevlogs
    @eknathagiwalevlogs ปีที่แล้ว +2

    खुप छान सर तुम्ही आमच्या आदिवासी अकोले तालुक्यात येऊन आमचे आदिवासी जीवन व निसर्ग दाखवला त्याबद्दल खुप खुप धन्यवाद... असेच व्हिडिओ बनवत राहा सर best of luck 👍👍👍

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 9 หลายเดือนก่อน +2

    पृथ्वीवरच स्वर्ग आहे फक्त गरज आहे त्याला शोधण्याची व त्याची अनुभूती घेण्याची

  • @santoshborude6192
    @santoshborude6192 9 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य

  • @sudamchipat.8402
    @sudamchipat.8402 ปีที่แล้ว +4

    जय आदिवासी जय जोहार

  • @sunilborade-xg6fc
    @sunilborade-xg6fc 9 หลายเดือนก่อน +1

    मस्त निसर्गरम्य वातावरण

  • @user-rv1ir3np6d
    @user-rv1ir3np6d 5 หลายเดือนก่อน +1

    मी हे गावातून. हरिश्चन्द्र गडावर गेलो होतो. व कोकण कडा. बघितला. फार समाधान झाले

  • @vilasshelar6843
    @vilasshelar6843 หลายเดือนก่อน +1

    खूप छान एक नंबर छान माहिती मिळाली

  • @adimnews2886
    @adimnews2886 6 หลายเดือนก่อน +1

    सर
    शब्द अपूरे पडतात
    तुमचे कौतुक करायला
    तुमचा अभ्यास, मांडणी, शब्दांकन, आणि आवाज आणि अर्थातच एडिटिंग...
    100पैकी 100गुण...
    अभिमान आहे मला आदिवासी असल्याचा...
    आणि
    ऋणी आहोत आम्ही तुमचे तुम्ही आमच्या समाजाला, संस्कृतीला, निसर्गाला नेमक्या पद्धतीने अभिमानास्पद पद्धतीने जगासमोर आणल्याबद्दल...!
    👌👌👌👌💐💐

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  6 หลายเดือนก่อน

      तुमच्या छान अशा प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक आभार मानतो. ☺️

  • @sanjayjadhav5970
    @sanjayjadhav5970 8 หลายเดือนก่อน +1

    फार सुंदर VDO, आहे,खूप आवडला.सोमनाथ तुमचे अनोखे पर्यटन VDO खूप देखणे असतात. मला पण असेच उठावे आणि बाहेर पडावे असे वाटते परंतु व्यवसाय मुळे कुठे जाता येत नाही खूप वाईट वाटते तेव्हा तुमचे VDO पाहून आनंद मिळतो

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🏻

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 5 หลายเดือนก่อน +1

    सोमनाथ नागवडे सर, अहमदनगर जिल्ह्यातील बर्याच गावात असं निसर्ग सौंदर्य आहे,मी ऐकलंय
    कामशेत प्रमाणेच इतर गावांचे दर्शन घडवावे
    आपणास विनंती करतो ❤❤
    संजय शिंदे तालुका जत जी. सांगली

  • @SS-zd9mf
    @SS-zd9mf ปีที่แล้ว +2

    पुण्यात राहायला आहे पण असे वाटले कुमसेत ला जाऊन आलो आभारी आहे सर व्हिडिओ मस्त होता.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  ปีที่แล้ว

      आपले मनापासून आभार

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 ปีที่แล้ว +5

    सोमनाथ मस्तच प्रत्येक एपिसोड वेगवेगळा त्यामुळे आनंद मिळतो स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या आवाहनाबद्दल आभारी आहे देवरायांचे महत्त्व त्या गावाने जपले आहे त्या गावाचे खरोखरच आपण ऋणी आहोत त्याचे महत्त्व अतोनात आहे धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @tribal_aadivasi_mh_1597
    @tribal_aadivasi_mh_1597 ปีที่แล้ว +3

    खरंच खूप सुंदर माहिती दाखवली आज आदिवासी भागातील निसर्ग देव संस्कृती खुप चांगल्या प्रकारे दाखवली आदिवासी भाग तील पाडे , वस्ती येथील लोक याच्या बद्दल जेवढे बोलावे ठेवढे कमीच आहे कारण हा निसर्ग एकदा पाहून मनात भरणारा नसून सारखा पाहात राहावे असा आहे आणि आदिवासी भाग म्हटल की निसर्ग आणि आदिवासी च नात हे जणू काही एक वेगळच आहे
    खूप छान व्हिडिओ दाखवला भाऊ आज आदिवासी संस्कृती आणि निसर्ग जपण्याची खूप गरज आहे असेच नव नवीन व्हिडिओ घेऊन येत जा.
    कारण आदिवासी टिकला तर जंगल टिकेल आणि जंगल टिकेल तर आदिवासी टिकेल.
    जय जोहार जय आदिवासी 😍🏹🇵🇱🌍🌾🌱

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 ปีที่แล้ว

    अप्रतिम निसर्ग पर्यावरण आणि सौंदर्य
    फोटोग्राफी, बॅकग्राऊंड साऊंड आणि आवाज एक नंबर

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  ปีที่แล้ว

      मनपासुन आभार 😊

  • @surajmoule47
    @surajmoule47 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सादरीकरण व आवाज तूमचा दादा खुप छान

  • @kiranshirsat9344
    @kiranshirsat9344 4 หลายเดือนก่อน +1

    Far sunder khup avdale

  • @yogeshagivale2943
    @yogeshagivale2943 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर व्हिडिओ दादा 👌🏻

  • @Vishalnagre823
    @Vishalnagre823 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सर मन प्रसन्न झालं आपला महाराष्ट्राचं खूप सुंदर आहे आपली स्वस्कृती आपली भाषा आपले खेड्यातले लोक माझी ड्रीम असेल या गावाला जाण्याची thyanku sir ❤️

  • @pandurangsabale9376
    @pandurangsabale9376 8 หลายเดือนก่อน +1

    निसर्गाच्या सान्निध्यात रहाण्यासाठी भाग्य लागते, खूप छान परिसर आहे मी गेलो आहे एकदा या ठिकाणी

  • @maheshlalit8769
    @maheshlalit8769 ปีที่แล้ว +1

    नेहमी प्रमाणे उत्कृष्ट छायाचित्रण, उपलब्ध अशी‌ माहिती, ओघवती भाषाशैली,
    खूप खूप धन्यवाद,🙏

  • @santoshtaware3146
    @santoshtaware3146 3 หลายเดือนก่อน +1

    फार सुंदर

  • @sadhanapacharne5235
    @sadhanapacharne5235 9 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार दादा, खूप सुंदर वाटलं तुमचा हा व्हिडिओ. तुम्हाला आवडेल असं बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद जवळ सालाईबन निसर्गरम्य वातावरणात नटलेल आहे. विनोबा ना भूदान मध्ये मिळालेली 72 एकर चा परिसर आहे हा . आणि तिथे आमचे मजित भाई 9 वर्षापासून या धरती मातेची सेवा करत आहे.त्यांनी दीड दोन लाख झाड लावली व जतन केली आहे.. तिथे एक वीज घरांचे आदिवासी गाव पण आहे.... दादा या ठिकाणाला भेट द्या.....

  • @dattatraykondhavalw1348
    @dattatraykondhavalw1348 4 หลายเดือนก่อน +1

    Khup ch chhan

  • @dhondu7kawate
    @dhondu7kawate 10 หลายเดือนก่อน +1

    खुफ सुन्दर

  • @ashokvarhadi4887
    @ashokvarhadi4887 4 หลายเดือนก่อน +1

    Best Nature village.
    Thanks lot sir
    Regards
    Ashok@pune

  • @bhaskarlogade5521
    @bhaskarlogade5521 4 หลายเดือนก่อน +1

    Khuup khup chan

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 ปีที่แล้ว +1

    सुन्दर ठिकान। जाने आहे

  • @baban20111
    @baban20111 5 หลายเดือนก่อน +2

    Very nice village life and beautiful Nature

  • @laxmanide4863
    @laxmanide4863 8 หลายเดือนก่อน +1

    सर तुमचे आभार कोणत्या शब्दांमध्ये व्यक्त करू
    प्रत्येक भागातील प्रत्येक अडाणी लोकांना सामान्य माणसांना सुद्धा समजेल अशा शुद्ध मराठी भाषेत सोप्या शब्दांत वक्तव्य केलंय...
    अतिशय सुंदर 👌

  • @irfanmomin4702
    @irfanmomin4702 ปีที่แล้ว +1

    Manmohak Khoob Chand video hai

  • @sudhirgawade6196
    @sudhirgawade6196 ปีที่แล้ว +2

    काय बोलु मीत्रा शब्दच नाहीत ऐवढ
    अप्रतिम 👍👍👍👌✌️

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 13 วันที่ผ่านมา

    खुप छान वातावरण आहे दादा ❤

  • @user-xu9tg7qz2k
    @user-xu9tg7qz2k 6 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम 💐💐

  • @kirankondar4076
    @kirankondar4076 ปีที่แล้ว +2

    सर ,माझा आकोले तालुक्यातीलच फोपसंडी गावचा पन वीडियो बनवा आनी हो जवलच त्या डोंगरावर असनारा कुंजुरगड(कोंबड किल्ला ला पन जा)

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  ปีที่แล้ว +1

      तुम्ही हा चॅनेल सबस्क्राइब केला नसेल त्यामुळे तो दिसत नाहीये. फोपसंडी व्हिडीओही केला आहे. हा पहा व इतरांना शेअर करा.: th-cam.com/video/NfR0E0ZtSZ0/w-d-xo.html

  • @sagarshibe8965
    @sagarshibe8965 9 หลายเดือนก่อน +1

    असेच नवनवीन पर्यटन स्थळे पाहायला मिळतात तुमच्यामुळे सर

  • @nidhishirsat6441
    @nidhishirsat6441 ปีที่แล้ว +1

    Khoop chaan

  • @VIJAYNADEKAR-hr2iq
    @VIJAYNADEKAR-hr2iq 8 หลายเดือนก่อน

    धन्यवाद साहेब🙏,
    आदिवासी शब्दाला highlight केल्याबद्दल. भरपूर पर्यटक येतात फक्त अकोले तालुक्यातच नाही तर कुठल्याही निसर्गरम्य आदिवासी भागात. निसर्गाचा आस्वाद घेतात मौज करतात परंतु वाईट या गोष्टीचं वाटत की ते तेथील निसर्ग राखणाऱ्या, निसर्गाला देव मानणाऱ्या आदिवासी समाजाबद्दल काही बोलत नाही. पर्यटकांना खुणावणारं निसर्ग राखणारा आदिवासी समाज डोंगरदऱ्यात खडतर आयुष्य जगतो भरपूर अडचणींना मात देत असतो. काही नैसर्गिक घटना घडली तर वैद्यकीय मदत मिळणे अवघड असते या गोष्टींचाही इतरांनी विचार करायला हवा. अचानक सरकारने काही निर्णय घेतला तर आदिवासींची पूर्ण गावाच्या गावं उठवली जातात.
    तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझी सर्व व्हिडिओ पाहणाऱ्यांना आणि पर्यटकांना विनंती आहे की तुम्ही कधीही, कुठेही निसर्गाने नटलेल्या घनदाट परिसरात जालं तेंव्हा त्या भागात राहणारे लोक कोणत्या समाजाचे आहेत याचा कृपया नक्की अभ्यास करा, आणि आदिवासी समाजाचा अप्रत्यक्ष आपल्याला काही फायदा होतो का आणि आदिवासी समाज नसेल तर काय होईल याचा विचार करा.
    बाहेरील जगापासून अलिप्त असलेल्या आदिवासी समाजाला निसर्ग जपत विकासाच्या मुख्य धारेत येण्याची गरज आहे पण जळणाऱ्यांना फक्त आदिवासींचं आरक्षण दिसतं. पण तुम्ही काही प्रमाणात त्यांचं जीवन दाखवलं त्यांची संस्कृती, रुढीपरंपरा appreciate केल्या 👌.
    काही लोकं या लोकांना पैसे देतानाचे व्हिडिओ बनवतात त्या भोळ्या आदिवासी लोकांनाही माहीत नसतं की अनोळखी लोकांकडून विनामोबदला कोणतीही वस्तू किंवा पैसे घेणे ही आदिवासींची संस्कृती नाही तसेच पारंपरिक शस्त्रे वापरून इंग्रजांना सळो की पळो केलेल्या आदिवासींचा मोठा स्वाभिमानाचा दुर्लक्षित इतिहास आहे. पण तुम्ही मात्र असे पैसे देऊन त्यांना लाचारासारखे न दाखवता तेथील पर्यटनाला चालना मिळेल या दृष्टीने लोकांना तेथे पर्यटनासाठी यायला सांगितले त्याबद्दल पुन्हा खूप खूप आभार 🙏🙏🙏
    🏹🌿🌾जय आदिवासी, जय बिरसा🌾🌿🏹

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  8 หลายเดือนก่อน +1

      आपले मनापासून आभार . अश्या प्रतिक्रिया वाचून कामांचा उत्साह वाढतो, धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sahyadritourismsandhanvall6679
    @sahyadritourismsandhanvall6679 ปีที่แล้ว +2

    अतिशय चांगल्या प्रकारे सर तुम्ही काम करत आहात त्या बद्दल तुमचं आभार आणि असेच आदिवासींच्या परंपरा जगा समोर तुमच्या यूट्यूब चायनल द्वारे पोहविण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा आभार.👍👍👏

  • @user-bx5tj6vl8k
    @user-bx5tj6vl8k ปีที่แล้ว +3

    खुपच छान वाटलं सर्व पाहून. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल आहे येथे अनेक आदिवासी बांधवांचे धर्मांतर केले जात आहे याचे खुप दुःख होतंय. परप्रांतीय लोक सुद्धा इथल्या मुलींशी लग्न करतात ही खुप चिंताजनक गोष्ट आहे. आपल्या महान हिंदू धर्माचे महत्व यांना पटवून सांगितले पाहिजे आणि जी काही धर्मांतर, जिहादी कृत्य आहेत ती थांबवण्यासाठी ठोस पाऊले उचलली पाहिजेत. माझी सर्व हिंदू समाजाला विनंती आहे कुणीही धर्मांतर करू नका, आपला समाज सोडून इतरांशी लग्न करू नका. स्वधर्माचा अभिमान बाळगा..
    🚩🚩हर हर महादेव. जय शिवराय.🚩🚩

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  ปีที่แล้ว

      👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻

    • @dnyaneshwargabhale2960
      @dnyaneshwargabhale2960 ปีที่แล้ว +3

      आदिवासी हा निसर्ग पूजक असून त्यांची वेगळी अशी संस्कृती आहे. दुसरे धर्मच नव्हे तर हिंदू धर्माशी सुद्धा आदिवासींचा काहीही संबंध नाही. विनाकारण आदिवासी लोकांना वेगवेगळ्या धर्मांत ओढले जात आहे.

    • @user-bx5tj6vl8k
      @user-bx5tj6vl8k ปีที่แล้ว

      @@dnyaneshwargabhale2960 ते निसर्ग पूजक आणि हिंदुही आहेत..

    • @dnyaneshwargabhale2960
      @dnyaneshwargabhale2960 ปีที่แล้ว +2

      फक्त निसर्ग पूजक आणि निधर्मी

    • @user-bx5tj6vl8k
      @user-bx5tj6vl8k ปีที่แล้ว

      @@dnyaneshwargabhale2960 होय हिंदूच🚩🚩

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 ปีที่แล้ว +3

    आमहाला टोपली घ्याची आहे खूपच सुंदर आहे. तर कुठे व कशी मिळेल

  • @shashikantmasane2294
    @shashikantmasane2294 ปีที่แล้ว +17

    Dear Somnath Sir, you are the real natural ambassador of our tourism ,curtal heritage, nature of our world. The way you narrate beauty of heaven nature with your golden word's I am always speechless, & feel we are blessed with mother nature. I wish to join with you always during your travel nature journey. Hats off to you

  • @surajrade1641
    @surajrade1641 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान। निसर्ग सौंदर्य आहे।जय जोहार

  • @theTribefarm
    @theTribefarm ปีที่แล้ว +3

    खुप च छान 👌🏻👌🏻भीमाशंकर च्या परिसरात भोरगिरी.... कोंढवळ....जुन्नर कडे आंबे हातवीज... आंबोली...ह्या गावांना नक्कीच भेट देण्याचा प्रयत्न करावा

  • @sunilm.3224
    @sunilm.3224 8 หลายเดือนก่อน +2

    Really thank you very much for bringing our culture in the front of world, for letting word know the hard work and simple lifestyle of our tribal peoples. ❤❤❤❤

  • @ajaypatil-fz7tt
    @ajaypatil-fz7tt 6 หลายเดือนก่อน +1

    डोंबिवली मध्ये उंब्राली हे गाव निसर्गरम्य कुशीत आहे. कावळ्यांचा गावं म्हणून प्रसिद्ध आहे.तरी तुम्ही ह्या वर व्हिडिओ बनवावा.कारण हिंदू संस्कृती मध्ये कावळ्यांना खूप महत्व आहे. आपले पूर्वज यांचे स्मरण करण्यासाठी आपण सर्वपित्री ला जेवण बनवतो.

  • @Sushantdk
    @Sushantdk ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर व्हिडिओ आहे कुमशेतचा, निसर्ग सौंदर्याने नटलेलले हे गाव खुप सुंदर आणि तेथील लोकांनी सुंदर जपले आहे हे सौंदर्य.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  ปีที่แล้ว +2

      अनेक धन्यवाद ! तुम्हाला हे सर्व आवडतं हे पाहुन फार छान वाटतं. 😊

  • @rajeshravte803
    @rajeshravte803 ปีที่แล้ว +3

    जगल, आनी, जमीन, आनी, पाणी, आदिवासी टिकवली आहे, जय, आदिवासी, जय, जोहार

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 5 หลายเดือนก่อน +2

    Beautiful video

  • @Firastaa9
    @Firastaa9 ปีที่แล้ว

    खूप सुंदर बनवलाय व्हिडिओ. ❤️❤️

  • @dattatraybande7752
    @dattatraybande7752 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर..... एवढ्या सुंदर पध्दतीने आमच्या अकोले तालुक्यातील सर्वात शेवटचे गाव म्हणजे कुमशेत गावचे वर्णन केल्याबद्दल
    मनःपूर्वक धन्यवाद

  • @harishranaware0
    @harishranaware0 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर वीडियो दादा रायरेश्वरावरती पण असाच वीडियो बनू शकतो गडावरति अजुनही काही कुटुंभ राहतात .

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  ปีที่แล้ว

      कधीच बनवलाय -th-cam.com/video/jq5CarfTgmE/w-d-xo.html

  • @sajeetmulani307
    @sajeetmulani307 8 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan mahiti detay . Gawach gawpan japal pahije

  • @chandanmahale4352
    @chandanmahale4352 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @ajaypandharipande1067
    @ajaypandharipande1067 ปีที่แล้ว +1

    खूप निसर्गरम्य आणि दुर्गम भागाचे दर्शन झाले, धन्यवाद, सोमनाथ जी

  • @vishwasshinde961
    @vishwasshinde961 5 หลายเดือนก่อน +1

    आपण निसर्गाचे चित्रीकरण छान केले आहे, तसेच स्थानिक सरपंच यांनी सुद्धा सहकार्य केले आहें. पर्यंतकांनी कोणत्या प्रकारचा कचरा व प्लास्टिक टाकू नये, सर्व एका पिशवीत घेऊन जाणे.

  • @nileshkurhade9748
    @nileshkurhade9748 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सर एकदम मस्त

  • @khandujadhav250
    @khandujadhav250 7 หลายเดือนก่อน

    तुमचं मनापासून आभार... आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले तुम्ही... निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने निसर्ग सौंदर्य न्याहाळता येते...

  • @pratibhachavan2842
    @pratibhachavan2842 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा

  • @MrSunandsand
    @MrSunandsand 9 หลายเดือนก่อน +1

    khupach chan,,,!!

  • @creatimages760
    @creatimages760 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आपले हार्दिक अभिनंदन

  • @Vijaydeshmukh2407
    @Vijaydeshmukh2407 ปีที่แล้ว +2

    खूपच छान सुंदर व्हिडिओ !!! आपल्या महाराष्ट्रात इतके निसर्ग सौंदर्य आहे ते तुम्ही तुमच्या कष्टातून व कॅमेरा मधून दाखवता त्या बद्दल खूप आभार. Really nice hats off 👌👌👌

  • @vipullanghi2550
    @vipullanghi2550 ปีที่แล้ว +2

    आमचा तालुका... जय आदिवासी..