तू दिल्या जखमांत मी हरवून गेलो | Tu Dilya Jakhmat | Marathi Gazal | Gazal Nawaz Bhimrao Panchale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • शेख साहेब : मेरे हमदम , मेरे दोस्त ...
    प्रिय मित्रांनो...अपार स्नेह !
    गालावरची बट अवखळ...अवखळ अवखळ
    अन त्यावर हसणे खळखळ..खळखळ खळखळ...
    काय अनोखी..नाजुक , मुलायम गज़ल !
    सुरेल असा गायकीचा आवाज , उत्तम तर्ज आणि बहारदार पेशकश ...
    व्वा ! मजा आ गया ...
    कधी एकदा मुशायरा संपतो आणि या शायराला भेटतो असे झाले होते मला ...
    असे भेटले मला ए.के.शेख , अवचितपणे .
    आजपर्यंत का भेटलो नाही आपण , हा अफसोस करत-करत आम्ही दोघे कधी दोस्त झालो ते कळलेच नाही .
    त्यानंतर मग पनवेल - बोरीवली , बोरीवली - पनवेल असा चौपदरी रस्ता तयार झाला ज्यावरून येरझारा करतांना खूप मोठे अंतर किंवा भयंकर ट्रॅफिकचा त्रास आम्हाला कधीच झाला नाही .. कारण -
    ती राह होती -
    दिल से दिल तक ...
    नर्म मुलायम मनाचा हा नेक , संवेदनशील माणूस सदैव गज़ल मध्येच असतो .. त्यांच्यासाठी -
    गज़ल एके गज़ल आणि ,
    गज़ल दुणेही गज़लच ...
    दुस्वास , रुसवे-फुगवे , अहंकार या गोष्टी वाऱ्यालाही उभ्या रहात नाहीत एकेंच्या .
    गज़ल सागर प्रतिष्ठानच्या गज़ल चळवळीतील आमचे हमसफर उस्ताद ए .के .शेख उर्फ एके यांनी वयाची पंचाहत्तरी गाठली यावर यकीनच होत नाही .
    आमच्या मैत्रीला झाली - ३० वर्षे , आणि शेख साहेबांचा जन्मदिवस - ३० मार्च ...
    या प्रसंगी शुभेच्छा देताना सांगू इच्छितो की ,
    शेख साहेबांकडे बघून मला माझ्या सत्तरीचा विसर पडत असे .
    आता मात्र मी मोजत राहणार - एकाहत्तर ... बाहत्तर ...
    मित्रांनो , आज या निमित्ताने एकेंची एक झकास गज़ल , जी आष्टगाव मुक्कामात साथ-संगती शिवाय मी रेकॉर्ड केली होती , तुम्हाला ऐकवणार आहे .. तुमची दाद हवी ...
    ना पडायाचे कधी प्रेमात ' एके '
    एवढे हज्जारदा ठरवून गेलो ..
    तू दिल्या जखमांत मी हरवून गेलो
    अन तुला विसरायचे -
    विसरून गेलो ..!
    आपल्या या विशाल गज़ल परिवाराच्या तुम्हाला मनभरून शुभेच्छा शेख साहेब..!
    स्नेहांकित ,
    गज़लनवाज़ भीमराव पांचाळे
    Gazal Nawaz #BhimraoPanchale​​
    For More Updates Follow Me At -
    ______________________________________________________________
    ★ Facebook bit.ly/Bhimrao...
    ★ Twitter bit.ly/Bhimrao...
    ★ Instagram bit.ly/Bhimrao...
    Subscribe To My TH-cam Channel -- ‪@gazalnawazbhimraopanchale6816‬
    marathi gazal , Marathi Ghazal , Gazal Nawaz Bhimrao Panchale , Bhimrao Panchale Gazal , Bhimrao Panchale Live , Ghazal Nawaz Bhimrao Panchale

ความคิดเห็น • 117

  • @creativeartstudio7518
    @creativeartstudio7518 3 ปีที่แล้ว +24

    ही गजल जेव्हा जेव्हा म्हणून ऐकतो, तेव्हा तेव्हा कित्येकदा ठरवूनही हरवून जातोच...
    ही कमाल आहे ए. के. शेख साहेबांच्या लेखणीची आणि दादा तुमच्या गायनाची...
    आप दोनो को मेरी उम्र लग जाये...

  • @ravidhole8994
    @ravidhole8994 ปีที่แล้ว

    🎉🎉🎉amravati che shan🎉🎉🎉🌹🌹🌹🙏🙏🙏🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔💐💐💐🚩🚩🚩

  • @SanjayNaik-wy9op
    @SanjayNaik-wy9op ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर

  • @जाणीवगर्भ
    @जाणीवगर्भ 3 ปีที่แล้ว +3

    वाह दादा अप्रतिम गझल आणि गायन सुध्दा खूपच अप्रतिम 👌🌹💐

  • @sadanandjoshi530
    @sadanandjoshi530 2 ปีที่แล้ว +7

    भीमराव,,,,, अन तुला विसरातचे विसरून गेलो
    तुमच्या स्नेहाबद्दल।असच म्हणावं वाटत खूपच सुंदर 👍👍💐

  • @bhaisahebinamdar5840
    @bhaisahebinamdar5840 2 ปีที่แล้ว +1

    पुर्ण गजल लेखन ,
    कुणी तरी इथे लिहून ठेवायला हवी.
    वाचता वाचता, ऐकून तादात्म्य होवूनच अनुभवावे असे वाटते.

  • @navnathkharat1597
    @navnathkharat1597 3 ปีที่แล้ว +1

    ग्रेट गझल दादा👌👌👌🏽
    निवांत वेळी अनेकदा ऐकू
    नही मन भरत नाही👍👍👍👍

  • @pathantw8972
    @pathantw8972 10 หลายเดือนก่อน

    Absolutely classic

  • @GAZALVINOD
    @GAZALVINOD 3 ปีที่แล้ว +1

    लाजवाब दादा...👌👌👌
    ए.के.शेख साहेबांच्या लेखणीला सलाम...

  • @flowwithsoul645
    @flowwithsoul645 2 ปีที่แล้ว +9

    💞 प्रीती प्रतिसाद प्रत्येक क्षण म्हणजे जीवन.. चढ उतार जिवाचा भाग... आणि मग जीवन उन्नति साधते..🙂🚀👍🚀🙏🏼

  • @KRaj-si2yf
    @KRaj-si2yf ปีที่แล้ว

    भीमरावांनी स्वीकारलेले वृत्तच मराठी गझलेला खरी संजीवनी देऊ शकते.

  • @devidaskamble5539
    @devidaskamble5539 ปีที่แล้ว

    आदरणीय सुरेशजी भट यांची लगेच आठवण आली . गझलकार मा . ए .के . शेख यांचे शब्द अविस्मरणिय आहेत . गझल गायक मा . भिमराव पांचाळे यांच्या आवाजाने शब्दांचे सोने झाले . मस्त .... मस्त .... आणि मस्त !!❤

  • @bhadrakalimusicentertainme2168
    @bhadrakalimusicentertainme2168 3 ปีที่แล้ว +1

    वाह क्या बात है सर 🙏
    - डीके

  • @dipalisushant9202
    @dipalisushant9202 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम गझल आ.अऄ.के.शेख सर एक अतिशय उत्तूंग व तितकेच गोड ,प्रेमळ व्यक्तीमत्व आणि भिमराव दादा..तेवढेच उत्तूंग आहेत गझल गायनात..
    वाह...म्हणजे एकूणच सगळंचं‌ अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम! 🌹🌹🌹दोघांनाही खूप खूप शुभेच्छा!

  • @harshad24
    @harshad24 3 ปีที่แล้ว +2

    मस्त❤️👍

  • @uttamsonkamble5576
    @uttamsonkamble5576 ปีที่แล้ว

    खूप वास्तव
    आणि खूप चांगली रचना
    खूप छान सादरीकरण

  • @atulwankhade1045
    @atulwankhade1045 3 ปีที่แล้ว +2

    माननीय ए. के. शेख साहेबांच्या प्रेमळ लेखणीला आणि दादा आपल्या हृदयशील गायनाला.......सलाम. 🌷🌷🌷👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @masudpatel400
    @masudpatel400 3 ปีที่แล้ว +3

    दादा जेव्हा कुणी मला " गझलियत " म्हणजे काय असा प्रश्न विचारतो तेव्हा मी त्याला शेख साहेबांचा हा मतला हमखास ऐकवतो आणि सांगतो की या ओळी ऐकल्यावर तुम्हाला आलेली विशेष अशी अनुभूती , निर्माण झालेली एक वेगळीच कैफियत , अंतर्मनातील एक घालमेल जी जाणवते पण शब्दात मांडता येत नाही. तीच गझलेतील " गझलियत " असते.
    आणि दादा इतक्या तरल अशा शब्दांना जेव्हा आपला सुरमई आवाज लाभतो तेव्हा नक्कीच एक अजरामर रचना जन्मास येते.
    ही अजरामर रचना रसिकांना अर्पित केल्या बद्दल दादा आपले आणि शेख साहेबांचे तमाम गझल प्रेमीं च्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो!
    दादा निवेदन तर अगदी सोनेपे सुहागा!

  • @DonchndU2585
    @DonchndU2585 3 ปีที่แล้ว +2

    ला जवाब

  • @divakarv5602
    @divakarv5602 2 ปีที่แล้ว

    हया स्वरांना ऐकताना मी पुरा
    हरवून गेलो

  • @jagannathsurwade4160
    @jagannathsurwade4160 ปีที่แล้ว

    ए के शेख यांनी गझलेतून मराठी शब्दांना प्रेमळ अर्थ दिला की त्या शब्दांनी शेख साहेबांना प्रेम दिले हे कळत नाही ,इतके ते एकमेकांत एकरुप वाटतात. म्हणून ए के साहेब,त्यांचे शब्द आणि त्यांची गझल फक्त प्रेमळ गंध रसिकांना देतात.

  • @sureshpadhye6391
    @sureshpadhye6391 ปีที่แล้ว +3

    शेख साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ....अप्रतीम गज़ल आणि अप्रतीम स्वरसाज ....वा विलक्षण योग

  • @swapnilmogarkar384
    @swapnilmogarkar384 ปีที่แล้ว

    अप्रतिम गझल आणि अप्रतिम सादरीकरण सलाम सर 🙏🙏🙏

  • @rajsunilsuchitra8060
    @rajsunilsuchitra8060 2 ปีที่แล้ว

    खरच हरवून गेलो मी गझलमधे

  • @girishharade4398
    @girishharade4398 3 ปีที่แล้ว +1

    बे सक...ला जबाब...!

  • @chandanjadhao7225
    @chandanjadhao7225 3 ปีที่แล้ว +4

    फारच सुंदर ❤️❤️❤️👍
    गायकी मधून शब्द ह्रुदयात भिडतात🙏

  • @dr.alkanaik9931
    @dr.alkanaik9931 3 ปีที่แล้ว +4

    अतिशय भावपूर्ण शब्द आणि मनमोहक गायकी यांचा सुंदर संगम.... धन्यवाद आणि अभिनंदन!!

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar4854 ปีที่แล้ว +3

    शब्दांच्या मोहात आणि स्वरांच्या डोहात चिंब भिजवणारी गझल👏👌🙏

  • @pankajtayde9919
    @pankajtayde9919 3 ปีที่แล้ว +3

    तुमच्या गझलेत मी स्वतःला विसरून गेलो लवकरात लवकर या गझलेवर आधारित मैफिल प्रसारित करा💃🎤💃🎤
    क्या बात है दादा!

  • @parashramharale1972
    @parashramharale1972 2 ปีที่แล้ว +1

    Excellent

  • @rajuathawale3020
    @rajuathawale3020 2 ปีที่แล้ว

    दादा, आपण ए. के. शेख सरांच्या अप्रतिम गझलेचे गायन डोळे मिटून शांतपणे ऐकतच रहावेसे वाटते.

  • @anildusane6449
    @anildusane6449 3 ปีที่แล้ว +3

    Wàa...
    क्या बात है...
    फारच सुंदर शब्द... अन्
    आपल्या स्वरात म्हणजे......
    चार चाँद.
    धन्यवाद.👍
    🙏

  • @divakarv5602
    @divakarv5602 2 ปีที่แล้ว +2

    शेख सरांचे शब्द सुकोमल
    आशय त्यांचा असे खोलवर
    त्यात लाभली साथ तयांना
    भीमरावांच्या सात सुरांची
    अशा गजलचे कौतुक करता
    सर्वांना अभिवादन करतो।
    दिवाकर

  • @atulkumardhone7937
    @atulkumardhone7937 3 ปีที่แล้ว +3

    दादा,जेव्हा या गझलेचा मतला आपल्या आवाजात ऐकतो तेव्हा मी हरवून जातो..ऐकताना माणूस वेगळ्याच भावविश्वात गेल्याशिवाय राहत नाही..
    मसूद पटेल सरांनी जी प्रतिक्रिया दिली ती खरंच पटेबल आहे.लिहिताना माझ्या बाबतीत तसं घडलं आहे.
    नितांत सुंदर दादा..👌🌹❤️🌹

  • @mugdhakulaye5004
    @mugdhakulaye5004 ปีที่แล้ว +2

    शेख सरांची अप्रतिम गझल... भीमराव दादांचे अप्रतिम सादरीकरण 👌👌👌🙏💐

  • @infinitymusically3250
    @infinitymusically3250 2 ปีที่แล้ว

    Gr8 singing on nice lyrics by Shaikh uncle ..stay blessed both of you ..keep doing more ..All the best

  • @madhukarnakat5490
    @madhukarnakat5490 3 ปีที่แล้ว +2

    तुमच्या गझला ऐकून हुदय हेलावते मला गझला खुप आवडतात धन्यवाद

  • @yogitaraipure8243
    @yogitaraipure8243 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम

  • @anitakhairnar548
    @anitakhairnar548 3 ปีที่แล้ว +2

    वाह ...
    अप्रतिम रचना आणि अप्रतिम गायकी.......आदरणीय ऐ के साहेब यांच्या लेखणीला आणि आपल्या गायकीला सलाम दादा ...🙏🙏

  • @allinonecreationad9932
    @allinonecreationad9932 2 ปีที่แล้ว +1

    वाह..वाह..वाह.. कमाल ची गायकी.. अणि लेखन...,🙏 कलावंत द्वय चे अभिनंदन ..... सौ. रेखा अडसुळे

  • @bhagwanwanjare9925
    @bhagwanwanjare9925 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम शब्द रचना आणि अप्रतीम गझल नवाजांचा सुर. मनमुराद आस्वाद.Thanks.

  • @swarupthakur6276
    @swarupthakur6276 ปีที่แล้ว +1

    Guruji

  • @suhasveerkar5668
    @suhasveerkar5668 3 ปีที่แล้ว +1

    Ajunhi km tu dilelya jakhama MI visaru shaklelo nahi kaym tuzi aathavan mareparyant rahil

  • @gazalakshare700
    @gazalakshare700 3 ปีที่แล้ว +2

    ज़िंदाबाद दादा ज़िंदाबाद..
    दिल जीत लिया.
    बेशक लाजवाब 🌺🌺

  • @tanvi-ei6qt
    @tanvi-ei6qt 3 ปีที่แล้ว +2

    Khuuuupach sundar👌👌👌👌👌👌👌

  • @vamanpandagle8908
    @vamanpandagle8908 ปีที่แล้ว

    Welcome and best wishes by representative of law college of Osmanabad wamanrao pandgale and director of the soot mill tuljapur and future member of m l a or m l c wamanrao pandgale and in your village I given one gazzal of Marathi please present in this function

  • @prakashkamble9825
    @prakashkamble9825 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @sheetalpawade2907
    @sheetalpawade2907 2 ปีที่แล้ว +1

    आपण म्हटल्याप्रमाणे मैफिलीत ऐकण्याची संधी मिळण्याची वाट पहात आहोत. ए. के. शेख साहेबांची गझल आणि आपले गझलगायन याचे प्रत्यक्षात भावोत्कट दर्शन असेल ते!

  • @pkarwade
    @pkarwade 3 ปีที่แล้ว +2

    Excellent Sir, want to hear you again live!

  • @rakeshkale4891
    @rakeshkale4891 ปีที่แล้ว

    Tumchi Gaiki Khoob chhan aahe, but Ghazal meaningless aahe

  • @kirandhanedhar9416
    @kirandhanedhar9416 3 ปีที่แล้ว +1

    शब्दांची अप्रतिम मांडणी आणि गायकी अत्यंत सुखद....

  • @jyotisarvade3276
    @jyotisarvade3276 ปีที่แล้ว

    Heart touching ❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 ปีที่แล้ว

    A K Sheikhhey yek utkrust gazal Ani kavitet khupach mahi aahet

  • @vijayjokare6575
    @vijayjokare6575 ปีที่แล้ว +1

    भीमराव जी आपला आवाज खूप छान आहे....गझल म्हणजे भीमराव जी❤

  • @dilipshejwal961
    @dilipshejwal961 ปีที่แล้ว

    क्या बात है दादा ,बेहतरीन पेशकश

  • @ganeshbedse503
    @ganeshbedse503 3 ปีที่แล้ว +1

    गुरुवर्य कृपा करुन मला आपला संपर्क क्रमांक द्या ना ..

  • @rdtayade9850
    @rdtayade9850 3 ปีที่แล้ว +2

    वाहह

    • @ssshinde1000
      @ssshinde1000 2 ปีที่แล้ว

      Hmm छान गाण झाल आहे.

  • @rushabtodasm
    @rushabtodasm 3 ปีที่แล้ว +1

    Kya bat hai Guruji va

  • @mohiddinnadaf1703
    @mohiddinnadaf1703 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम!!!

  • @dipakbhamre
    @dipakbhamre ปีที่แล้ว

    Katalawar, vadalawar, mrugjalawar………xxxx …..awesome

  • @rakeshkale4891
    @rakeshkale4891 ปีที่แล้ว

    वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे....

  • @babakokewar9348
    @babakokewar9348 หลายเดือนก่อน

    यालाच जीवन हे नाम.हरवले ते मिळाले मिळालेले हरवले.

  • @javedkhan-dg2cz
    @javedkhan-dg2cz หลายเดือนก่อน

    bahut khoob janab bheerao sahab

  • @mangeshjanbandhu
    @mangeshjanbandhu 3 ปีที่แล้ว +1

    वाह वाह मस्त

  • @sitakantpalaskar
    @sitakantpalaskar 3 ปีที่แล้ว +1

    लाजवाब दादा...शेख साहेब❤️❤️❤️

  • @KRaj-si2yf
    @KRaj-si2yf ปีที่แล้ว

    ए. के. शब्द नीट वापरत भरीचे शब्द वगळण्याचा त्यांनी बराच प्रयत्न केला
    ही गझल अप्रतिमच आहे
    असे नव्हे की दादांनी गाईलेली प्रत्येक गझल अप्रतिम असेल
    ते एक गझल शोधण्यासाठी हजारो पुस्तके वाचतात

  • @manisha.bhosale.739
    @manisha.bhosale.739 ปีที่แล้ว

    Superb

  • @sachintilak1578
    @sachintilak1578 2 ปีที่แล้ว

    ॳ के शेख यांना भेटलो ते महाड ला . ते बाबांना कै उदय टिळकांच्या आमच्या घरी आले तेव्हा. रात्रीचे ३ कधी वाजले कळले नाही. त्यांच्या मुळे गझल सम्राटांची माहीती मिळाली त्याला साधारण तिस वर्ष झाली असतील.

  • @मृणालिनी-ब6ब
    @मृणालिनी-ब6ब ปีที่แล้ว

    वाह क्या बात है सर.
    आ शेख सरांची गझल म्हणजे सायीसारखे दुख मुलायम.
    सरांचा स्वभाव तर सायी पेक्षा निर्मळ मुलायम.
    त्यात ही गझल आपल्या आवाजात ऐकायला मिळाली.
    भाग्य माझे.शब्द शब्द जिवंत झालाय.
    अहाहा दुग्धशर्करा योग.🙏

  • @vaishalitayade1365
    @vaishalitayade1365 ปีที่แล้ว

    वाह फारच सुंदर👌👍👍

  • @akashingale666
    @akashingale666 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम...🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @gautamdawarenwc7530
    @gautamdawarenwc7530 ปีที่แล้ว

    खूप छान आहे
    गजल लेखन आवाज

  • @omeshgawai6968
    @omeshgawai6968 ปีที่แล้ว

    I like it....~~ll

  • @ashapande4394
    @ashapande4394 ปีที่แล้ว

    सुंदर🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @अपूर्वाकाव्यसंग्रह

    सुंदर.. सुंदर.. आणि सुंदर!!

  • @rakeshkale4891
    @rakeshkale4891 ปีที่แล้ว

    Meaningless ghazal

  • @vivekshete4119
    @vivekshete4119 ปีที่แล้ว

    Khup sunder 👌❤️

  • @nishadalvi2507
    @nishadalvi2507 ปีที่แล้ว

    क्या बात है! बढियाॅं सरजी!...हॅटस् ऑफ यू सरजी!...

  • @pradipnandeshwar5825
    @pradipnandeshwar5825 3 ปีที่แล้ว +1

    व्हा जखमा न भरून निघणाऱ्या 🙏

  • @ParmarthPrerna
    @ParmarthPrerna ปีที่แล้ว

    खरचं अप्रतिम .....

  • @srushtichinnawar3191
    @srushtichinnawar3191 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गझल👌👌👌👍

  • @yaminimarchande1433
    @yaminimarchande1433 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर गझल सर

  • @jayeshgawade264
    @jayeshgawade264 2 ปีที่แล้ว +1

    best tumhi sir

  • @drpadminishinde7820
    @drpadminishinde7820 ปีที่แล้ว

    very great

  • @dr.vijayalaxmiwankhede4559
    @dr.vijayalaxmiwankhede4559 3 ปีที่แล้ว +1

    वाह!👍

  • @nareshgharat66
    @nareshgharat66 ปีที่แล้ว

    सुर साज नसला तरी सर आपले गाणे अतिशय अप्रतिम वाटले धन्यवाद सर

  • @vijayan2344
    @vijayan2344 2 ปีที่แล้ว

    आ . ए . के . शेख सरांची अप्रतिम गझल आ . भिमराव पाचाळे यांच्या भावपूर्ण , सुंदर आवाजात ऐकताना खरेच आपण स्वतःला हरवून जातो .

  • @RajaramWaidande-bt4tn
    @RajaramWaidande-bt4tn ปีที่แล้ว

    Verynice

  • @kundazope3478
    @kundazope3478 2 ปีที่แล้ว

    व्वाह, खूप सुंदर..
    कितीवेळा एकावे असे वाटते..

  • @sandhyakilnake877
    @sandhyakilnake877 3 ปีที่แล้ว +1

    किती अप्रतिम गझल

  • @VaibhavBabalsurkar
    @VaibhavBabalsurkar ปีที่แล้ว

    ❤❤❤❤

  • @vishwasshirsath3597
    @vishwasshirsath3597 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम 👍👍

  • @sidhunavture6215
    @sidhunavture6215 3 ปีที่แล้ว +1

    लाजबाब...👌

  • @eknathardad9987
    @eknathardad9987 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम दादा

  • @nishadalvi2507
    @nishadalvi2507 ปีที่แล้ว

    सुरेख गायलात ! गायकाला अभ्यासही सुरेख!...भारी!

  • @bhagojiranvir7908
    @bhagojiranvir7908 3 ปีที่แล้ว +1

    मस्तं

  • @jyotisarvade3276
    @jyotisarvade3276 ปีที่แล้ว

    Woooooooooow superb excellent 🔥🔥🔥🔥😍😍❤️🌹🌹❤️

  • @jitendradongre8478
    @jitendradongre8478 3 ปีที่แล้ว +1

    Heart broken

  • @meenakadam9148
    @meenakadam9148 ปีที่แล้ว

    💐🙏

  • @abdullatifshaikh4749
    @abdullatifshaikh4749 3 ปีที่แล้ว +1

    मनापासुन माझा सलाम..