काय उरले..दुःख करण्यासारखे... | Kay Urale | Marathi Gazal | Gazal Nawaz Bhimrao Panchale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.พ. 2021
  • " काय उरले..दुःख करण्यासारखे..."
    प्रिय मित्रांनो...अपार स्नेह !
    काय अफलातून मिसरा आहे हा...व्वा !
    दुःख करण्यासारखे काहीच उरले नाही .., म्हणजे ही कुठली अवस्था म्हणायची !
    सुख आणि दुःख दोन्हीही जिथे
    निर्वात होतात अशी ही शून्यावस्था असेल काय ?
    गजूकडे याचे उत्तर असावे निश्चित .
    असे लिहिणे फक्त दोनच प्रकारे शक्य असते . एक तर स्वतः भोगून किंवा मग तीव्रतेने महसूस करून.
    हे दोनच मार्ग आहेत ...
    कर्करोगाचा दर्द भोगून त्या दुर्धर आजारावर मात करणाऱ्या या आपल्या प्रतिभाशाली गज़लकाराच्या तोंडी असे शब्द म्हणूनच शोभून दिसतात..
    म्हणूनच , ' वेदनेची जाणली औकात मी ' असे लिहून वेदनेचीही लायकी काढणाऱ्या आणि , ' आपले नाहीच जमण्यासारखे.. ' हे सुखालाच बजावणाऱ्या गजाननचे म्हणणे मला वावगे वाटत नाही आणि उद्धटपणाचे तर मुळीच वाटत नाही .
    " दर्द का हद से गुजरना है दवा हो जाना.."
    किती खरे आहे हे !
    आज ही अनोखी गज़ल पेश आहे,
    याच गज़ल मधील या एका अगदी वेगळ्या शेरासह -
    दुःख मोठे याहुनी नाहीच कोठे
    एकट्याने पीत बसण्यासारखे..
    मुलाहिजा हो...!
    मुलाहिजा हो...!
    स्नेहांकित ,
    ग़ज़ल नवाज़ भीमराव पांचाळे
    Subscribe - ‪@gazalnawazbhimraopanchale6816‬
    Gazal Nawaz #BhimraoPanchale​
    For More Updates Follow Me At -
    ______________________________________________________________
    ★ Facebook bit.ly/BhimraoPanchaleFB​
    ★ Twitter bit.ly/BhimraoPanchaleTweet​
    ★ Instagram bit.ly/BhimraoPanchaleInsta​
    ______________________________________________________________
    Useful Words -
    Ghazal , Ghazal Singer , Marathi Gazals , Marathi Gazal Singer , Marathi Ghazals , Marathi Ghazals Singer , Ghazal Nawaz Bhimrao Panchale , Bhimrao panchale ghazals , urdu ghazals , Gazal Nawaz , Bhimrao Panchale ghazals, Bhimrao Panchale gazals live
  • เพลง

ความคิดเห็น • 98

  • @sureshjadhav2327
    @sureshjadhav2327 หลายเดือนก่อน

    राहिले आयुष्य हसण्यासारखे ❤❤😊

  • @renukadasghirnikar8044
    @renukadasghirnikar8044 หลายเดือนก่อน

    किती गाणार , स्तुती करण्यासारखे
    जिवंत राहणार, का - न ऐकण्यासारखे

  • @nirbhayindia3089
    @nirbhayindia3089 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच हृदयस्पर्शी शब्द रचना केली आहे. भाऊ आपण...!! खूपच छान..!

  • @sachinkamble7373
    @sachinkamble7373 3 ปีที่แล้ว +10

    जगाचा निरोप घेताना मानूस इथुन काहीही नेऊ शकत नाही , यावर मझा विश्वास नाही . आयुष्यभर ठसठसत असलेली पन सांगता न येणारी असंख्य दू : खं तो आपल्याबरोबर नेतो . मग काय उरले दू :खं करण्या सारखे

  • @madhukarnakat5490
    @madhukarnakat5490 ปีที่แล้ว

    अति वेदना दाई गझल.

  • @vasantsonule6101
    @vasantsonule6101 7 หลายเดือนก่อน

    एक उत्तम गजल..

  • @TheKiran9867
    @TheKiran9867 3 ปีที่แล้ว +4

    राहिले आयुष्य हसण्यासारखे♥️♥️👌
    अप्रतिम

  • @ganeshgabhane9931
    @ganeshgabhane9931 ปีที่แล้ว

    हृदयात श्रावणाला ना कोसळू दिले मी, या काळजास माझ्या नुसते जळू दिले मी..
    रडलो किती मजेने कैसे कळेल तुजला. माझ्याच पापण्यांना कोठे कळु दिले मी...
    काय उरले दुःख करण्यासारखे,
    राहिले आयुष्य हसण्यासारखे...काय उरले दुःख करण्यासारखे..
    बोललो हसून बस इतकेच ना,
    काय आहे यात खुपण्यासारखे..
    ती म्हणाली सहज,मज विसरून जा,
    हेच तर नाही विसरण्यासारखे...
    मी सुखाला बोललो हे कईकदा
    आपले नाहीच जमण्यासारखे...
    हासलो अन पाहिले डोळ्यात मी,
    वेदनेची जान ही औकात मी..
    दुःख मोठे याहुनी नाही कुठे,
    एकट्याने पित बसण्यासारखे..
    काय उरले दुःख करण्यासारखे...
    राहिले आयुष्य हसण्यासारखे...

  • @sitakantpalaskar
    @sitakantpalaskar 3 ปีที่แล้ว +5

    गजानन दादा...सर्व प्रथम, कर्क रोगावर आपण जी मात केली त्याकरिता अभिनंदन आणि पुढील आयुष्य आनंददायी होवो...
    आणि गझल म्हणताल तर लाजवाब दादा म्हणतात तसं दुःखाची औकात नाही ...आणि दादा ..देवाची प्राणप्रतिष्ठा करतात तसा..एक एक शेर.जिवंत केलात...❤️❤️❤️❤️

  • @kavivssonawane
    @kavivssonawane 6 หลายเดือนก่อน

    ए जिंदगी इतनी भी तकलीफ़ ना दे
    तेरे साथ चलू या तुझे छोड़ जाऊ
    इसी सोच में रह जाऊ

  • @prashantpednekar9858
    @prashantpednekar9858 9 วันที่ผ่านมา

    Emotional 😢

  • @ankushgajbhar1208
    @ankushgajbhar1208 ปีที่แล้ว

    खूप छान दादा

  • @madhukarnakat5490
    @madhukarnakat5490 3 ปีที่แล้ว +4

    भिमराव जी चा आवाज मनाला मोकळे करते अप्रतिम कवि व गायक धन्यवाद

  • @creativeartstudio7518
    @creativeartstudio7518 3 ปีที่แล้ว +5

    दादा, तुमच्या गजल गायकीने शब्दांच्या पाकळ्या इतक्या सहज उमलतात की, या हृदयीचा त्या हृदयी सुगंधी प्रवास सुरु होतो... वाह!!! क्या कहने
    आणि गजानन भाऊ , वेदनेलाही तिची औकात दाखवत तुझा गझल प्रवास असाच समृद्ध होत जावो सर्व अडचणींवर मात करत. खूप खूप अभिनंदन 👍

  • @vinodmankar4428
    @vinodmankar4428 ปีที่แล้ว

    क्या बात...

  • @rajendramadaye5106
    @rajendramadaye5106 10 หลายเดือนก่อน

    Khubsurat bhetarain

  • @sharadgore
    @sharadgore 2 ปีที่แล้ว

    दादा अप्रतिम सुंदर गझल व तिथकेच गोड गायन

  • @rajuathawale3020
    @rajuathawale3020 3 ปีที่แล้ว +1

    माझ्याच पापण्यांना कोठे कळू दिले मी....👌👌👌👌👌👌👌👌

  • @marathimulga5390
    @marathimulga5390 ปีที่แล้ว

    काय घडले दु़ख कळण्यासारखे

  • @nikhilfuse2794
    @nikhilfuse2794 3 ปีที่แล้ว +8

    खूप छान... जगतांना किती दुःख असेल तरी तुमची गजल ऐकली तरी दुःखासोबत आनंदान जगता येत...आणि किती दुःख पचवता येत...

  • @srgamingyt9789
    @srgamingyt9789 ปีที่แล้ว

    Kya baat hai sir

  • @anilkoshe9994
    @anilkoshe9994 3 ปีที่แล้ว +1

    दादा,🙏🙏🙏, गजाननराव मनापासून अभिनंदन🌹🌹🌹

  • @VinodDevarkar
    @VinodDevarkar 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम गझल👌👌.. दादांच्या गझल गायनाने चार चांद लावलेत 💐💐💐

  • @saritaingle1625
    @saritaingle1625 ปีที่แล้ว +1

    👌👌सर,अप्रतिम गायन!अप्रतिम शब्दरचना!!
    एक एक शब्द ऐकताना पुढे काय असेल त्या शब्दांची आतुरता ही तितकीच लागूनच राहते!! अप्रतिम .....अगदीच निशब्द करून टाकले शब्दांनी आणि गायनाने!!🙏🙏💐💐

  • @marutivk950
    @marutivk950 ปีที่แล้ว

    Apratim sir

  • @avinashdeshpande320
    @avinashdeshpande320 ปีที่แล้ว

    वाह… फारच छान
    हे आहे अविरत ऐकण्यासारखे ….👌🏼👌🏼👌🏼

  • @SURESHPATIL-ig4oo
    @SURESHPATIL-ig4oo ปีที่แล้ว

    🙏🙏🙏 thanks

  • @naushadusman1354
    @naushadusman1354 ปีที่แล้ว

    दुख मोठे याहुनी नाही कुठे
    एकट्यानेच पीत बसण्यासारखे

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 3 ปีที่แล้ว

    भिमराव पांचाळेग्रेट गजल🙏🌷💅🌷💅🌷💅🌷💅🌷💅🌷 वाह उस्ताद

  • @sanjaybamnikar8043
    @sanjaybamnikar8043 3 ปีที่แล้ว +1

    काय उरले दुःख करण्यासारखे?व्वा!क्या बात है!..राहिले आयुष्य..हसण्यासारखे....व्वा...बोललो हासुन बस इतकेच ना?..काय आहे यांत..खुपण्यासारखे?खूप छान..ती म्हणाली सहज...मज विसरुन जा!..सुंदर..हेच तर नाही विसरण्यासारखे..मी सुखाला बोलो हे कैकदा...आपले नाहीच..जमण्यासारखे..वाह...हासलो अन् पाहिले डोळ्यात मी...दुःख मोठे याहुनी नाही कुठे...एकट्याने.पित बसण्यासारखे...बढिया...खूप सुंदर गझल दादा!...👌👌👌

  • @sachindhuldhvaj2707
    @sachindhuldhvaj2707 ปีที่แล้ว

    खरंच दादा हे गझल एकदम जबरदस्त मनाला भिडणारी

  • @muktapanchal409
    @muktapanchal409 ปีที่แล้ว

    निशब्द

  • @SHIKALDASD
    @SHIKALDASD ปีที่แล้ว

    apratim

  • @rameshburbure1487
    @rameshburbure1487 3 ปีที่แล้ว +1

    लाजवाब गायकी गझल नवाज दादा.......सुपर्ब गजू भौ छान गुन्फिलेस शब्द तू पण

  • @anilpatil2591
    @anilpatil2591 3 ปีที่แล้ว +1

    व्व्व्वाह दादा वा !

  • @sunilwathore1045
    @sunilwathore1045 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान ❤️❤️🎉🎉....

  • @pramodkharade3950
    @pramodkharade3950 3 ปีที่แล้ว +1

    आहाहा..!
    अप्रतिम गजल! तुम्ही गायल्याने चार चांद लागले..

  • @TNO369
    @TNO369 3 ปีที่แล้ว +1

    मी मरण्या अगोदर,तुमच्या पायी नतमस्तक व्हायचे आहे नी रडायच आहे मनसोक्त ☺️
    I'm ur biggest biggest biggest fan sir🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @musicallaroundpravinpm462
    @musicallaroundpravinpm462 3 ปีที่แล้ว +1

    क्या बात है
    बहुत खूब

  • @gazalakshare700
    @gazalakshare700 3 ปีที่แล้ว +1

    दादा .. अतिसुंदर गायन..
    खूप खूप आवडली गजल.
    गजू भाऊ अभिनंदन 🌹🌷🌺

  • @dattakhalapure1898
    @dattakhalapure1898 3 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान......

  • @amolsonawale-cy5kg
    @amolsonawale-cy5kg ปีที่แล้ว

    ❤❤❤

  • @ashokkamble3730
    @ashokkamble3730 ปีที่แล้ว

    अति सुंदर गझल गायली आहे...

  • @devidasmurgulwad8901
    @devidasmurgulwad8901 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम 👌 हृदयस्पर्शी शब्दरचना

  • @maheshmore1851
    @maheshmore1851 3 ปีที่แล้ว

    माझ्याच पापण्यांना कोठे कळू दिले मी
    क्या बात क्या बात क्या बात

  • @drmadhurijoshi
    @drmadhurijoshi 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर दादा 😊

  • @sunilmungekar7748
    @sunilmungekar7748 2 ปีที่แล้ว +1

    Beautiful ❤️ really ❤️ best ❤️ Song ❤️ Thanks to you 🙏🙏❤️❤️🔯❤️❤️🙏🙏🙏👍

  • @nandukamble1592
    @nandukamble1592 ปีที่แล้ว

    ❤❤❤❤❤

  • @niteenborseofficial3420
    @niteenborseofficial3420 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सर

  • @gulzar74g
    @gulzar74g 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम नेहमीच

  • @naushadusman1354
    @naushadusman1354 ปีที่แล้ว

    हासलो अन् पाहिले डोळ्यांत मी,
    वेदनेची जानली औकात मी।।
    क्या बात है!

  • @bharataswar3157
    @bharataswar3157 3 ปีที่แล้ว

    Gazal ekdam best ani bhimraoji kya bat hai👌👌👌💐💐

  • @onkargurudeo9034
    @onkargurudeo9034 2 ปีที่แล้ว

    दादा तुम्हाला नमस्कार सदैव , ज्यानी लिहुन आपली भावना आपल्या द्वारे व्येक्त केली त्या करीता पण नमन

  • @GAZALVINOD
    @GAZALVINOD 3 ปีที่แล้ว +1

    दुःखाची वेगळी परिभाषा सांगणारी गझल...
    👍👍👍👍👍👍👍
    दादा,आपल्या आवाजाने आणखी ती काळजाला भिडली.

    • @bharatborade9869
      @bharatborade9869 3 ปีที่แล้ว

      बरीचशी subscribe channel सारखी आहेत ..!

  • @harshad24
    @harshad24 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान ❤️👍

  • @atulwankhade1045
    @atulwankhade1045 3 ปีที่แล้ว +1

    सर, खुप छान. अप्रतिम!! रचना, अप्रतिम!!! गायन.

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर काव्य रचना
    दादा
    दादा तुम्ही माझ्या शक्ती हीन झालेल्या पायां मध्ये बळ निर्माण केले. दादा तुमच्या शब्दांत खूप सामर्थ्य दड लेल आहे.
    अभिनंदन दादा 🌹🌹🍫🍫
    शब्दांतीत काव्य सादरीकरण केले दादा तुम्ही
    कवि सुरेश भट म्हणतात असुवांनो माझिया डोळ्यातून वाहू नका अंतरी च्या वेदना साऱ्या जगा दावू नका आयुष्य ही हसते पाहुनी माझी दशा तुम्ही का? हसता हसू नका
    घाव माझे गुलाबी मोह रया लागले.
    स्वप्न माझे भंगले अन गीत माझे संपले
    हाय बाजारात माझा हुंदका आणू नका
    असुवांनो माझिया डोळ्यातून वाहू नका
    खरच काही माणसं खूप ताठर असतात.
    माणसाच्या आयुष्यात येणारे संकट माणसाला
    बळकट बनवतात.
    धन्यवाद दादा 🙏😊

  • @flowwithsoul645
    @flowwithsoul645 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम गझल ❣

  • @satish_Guttedar
    @satish_Guttedar ปีที่แล้ว

  • @sureshpadhye6391
    @sureshpadhye6391 3 ปีที่แล้ว

    वा.खुप सुंदर रचना आणि अप्रतिम गायकी.

  • @bhagwatgheware
    @bhagwatgheware 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर ...

  • @anantmankar8133
    @anantmankar8133 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर... अप्रतिम

  • @shankarkhalsode701
    @shankarkhalsode701 2 ปีที่แล้ว

    वाह दादा !

  • @rajurathod5759
    @rajurathod5759 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @bhagyashripatankar8744
    @bhagyashripatankar8744 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम गझल . सर आपण गायल्याने गझलेला सोनेरी झालर लागली आहे . आपले खुप खुप अभिनंदन

  • @flowwithsoul645
    @flowwithsoul645 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम आपला आवाज आणि...

  • @ujjwalsardar4505
    @ujjwalsardar4505 3 ปีที่แล้ว

    दादा तुम्ही गायल्याने
    अप्रतिम गझल सहज शक्य होते 🙏🏼🙏🏼

  • @jaywantwankhade4821
    @jaywantwankhade4821 3 ปีที่แล้ว

    वाह .. अप्रतिम गझल व गायन !

  • @suchetagodbole2027
    @suchetagodbole2027 3 ปีที่แล้ว

    Radalo kiti majene....
    Greatt gazal, gayaliy apratim. 👌

  • @subhashghodke6529
    @subhashghodke6529 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @anaghamehendale3107
    @anaghamehendale3107 3 ปีที่แล้ว

    Klass shbd ani tyt tumcha awj v sangit ..khup sunder mann shant jal hi gazal ekun

  • @samatatomar1168
    @samatatomar1168 3 ปีที่แล้ว

    Apratim.touched 💓

  • @manojmanchekar
    @manojmanchekar 3 ปีที่แล้ว

    बहोत खूब

  • @rajanisambodhi544
    @rajanisambodhi544 3 ปีที่แล้ว

    अतिश़ सुंदर गज़लगायन सर👍👍👍
    #URJARAJANI

  • @tanvi-ei6qt
    @tanvi-ei6qt 3 ปีที่แล้ว

    Apratim Sir 👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @aviash01
    @aviash01 3 ปีที่แล้ว

    👌👌👌👍💐

  • @maheshumrani9009
    @maheshumrani9009 3 ปีที่แล้ว

    Superb

  • @RAGHUVEERPAWAR
    @RAGHUVEERPAWAR 3 ปีที่แล้ว +1

    खुप मोठा चाहता आहे मि!

  • @maheboobshaikh8700
    @maheboobshaikh8700 2 ปีที่แล้ว

    Sundar 🎉🎉🎉

  • @shorts-vo7pz
    @shorts-vo7pz 3 ปีที่แล้ว +1

    👍👌👌🌹🌹💐💐

  • @rishisathetabla1112
    @rishisathetabla1112 2 ปีที่แล้ว

    🙇🏻‍♂️♥️♥️♥️

  • @nileshkamble2634
    @nileshkamble2634 3 ปีที่แล้ว

    आयुष्य असच असते का?

  • @NitinBorseGeo
    @NitinBorseGeo 2 ปีที่แล้ว

    सर , आपण माझी एखादी तरी गझल गावी अशी इच्छा आहे.

  • @shivakamble3051
    @shivakamble3051 ปีที่แล้ว

    𝓜𝓪𝓼𝓽 𝓶𝓪𝓼𝓽 𝓶𝓪𝓼𝓽...........𝓼𝓽

  • @kalpanabapat8684
    @kalpanabapat8684 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम गझल किती वेळा ऐकली तरी समाधान होत नाही

  • @TNO369
    @TNO369 3 ปีที่แล้ว +1

    काही बंधनांत मी,पूर्ण कैद माझ्यात मी,
    दररोज तर्क पडतात , मनातून नकळत
    फेटाळ त्यांचाच करतो,माझ्यात मी.....
    .
    मग्न तुझ्यात होऊन,डोळ्यांनी गीत गाऊन,
    मनाने तुझ पाहुन,कविता आली लिहून,
    होते लगेच जान,अबोल,बधिर, पांगळा माझ्यात मी,
    फेटाळ त्यांचाच करतो,माझ्यात मी.....
    .
    लिहाया बघतो,सात जन्माच्या या गाठी,
    कळते लगेच,अडकू परत आपन बंधनांन पाठी,
    एक कारावास ,रोवला आहे माझ्यात मी,
    फेटाळ त्यांचाच करतो,माझ्यात मी.....
    .
    गांभीर्य शब्दांचे विचारांत अडकवून बघ,
    जाणशील प्रिये सगळे,बंधनांन विना ही थोड जग,
    मीच का बांधले,वादळ माझ्यात मी,
    फेटाळ त्यांचाच करतो,माझ्यात मी.....
    .
    समजु नकोस या शब्दांना,हे रडवतील तुला,
    हत्यारांपेक्षा जीवघेणे टोचतील तुला,
    वसवले आहे जखमांचे शहर,माझ्यात मी,
    फेटाळ त्यांचाच करतो,माझ्यात मी.....
    .
    ..
    चिकु ♥️

  • @deepashribhumkar2608
    @deepashribhumkar2608 2 ปีที่แล้ว

    सर मला आपली गायकी खुप जवळची वाटते
    जणु काही माझ्या मनातल्या भावना व दुःख कुणी तरी सांगतय
    सर आपण आमच्या अहमदनगर मध्ये कार्यक्रम कराल का
    खुप खुप वर्षापूर्वी आपला कार्यक्रम झाला होता

  • @skumarwahurwagh3709
    @skumarwahurwagh3709 3 ปีที่แล้ว

    दादा यांचा पुर्ण पत्ता द्या कृपया

  • @jayantathavade9153
    @jayantathavade9153 ปีที่แล้ว +1

    Jaise koi subah ka Riyaz karta hai
    Bilkul usi tarah ghazal apni gai hai.
    Dhol Baja shehnai tabla
    Music director
    Kahan mar Gaye sab.

  • @vaishalideshmukh2047
    @vaishalideshmukh2047 ปีที่แล้ว

    Natin deshmukh jagnarayan Jivan Karle Palna Nahin Ki Gazal

  • @Suha_Deshmukh
    @Suha_Deshmukh 2 ปีที่แล้ว

    गझलरंग पुणे
    th-cam.com/video/J3jhjQcs3sI/w-d-xo.html

  • @udayphatale6121
    @udayphatale6121 2 ปีที่แล้ว

    itaka goad awaj kanana trupta karato nusate aikat rahawe waatate.