इतुकेच मला जाताना | स्मशानात पेश केलेल्या मैफिलीची हकीकत ... | Gazal Nawaz Bhimrao Panchale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 เม.ย. 2021
  • ती यादगार मैफिल , स्मशानातली ...
    प्रिय मित्रांनो ... अपार स्नेह !
    मागे मी तुम्हाला बोललो होतो ना ,
    माझ्या गज़लेच्या आयुष्यातील दोन विशेष यादगार मैफिलींबद्दल !
    त्यापैकी पुण्याच्या येरवडा कारागृहातील बंदी बांधवांसाठी सादर केलेल्या मैफिलीबद्दल मी लिहिले होते .
    आज सांगणार आहे , स्मशानात पेश केलेल्या मैफिलीची हकीकत ...
    आपले जानदार गज़ल रसिक ऐकायला असतील तिथे पेश होणे हा आनंदाचा भाग असल्यामुळे कुठेही मैफिल करण्यात कधीच दिक्कत वाटली नाही .
    अं.नि.स. वर्धा यांनी आयोजित केलेल्या ' लोकजगर ' हॉलिकोत्सवाचे ( मार्च , २०१६ ) निमंत्रण आले .
    मैफिलीचा मंच होता - स्मशानभूमी .
    मी खुशी खुशी हो म्हटले ...
    मनात राजनिशांचे शब्द रुंजी घालत होते - " जीवन अगर उत्सव है , मृत्यू भी उत्सव होना चाहिये ."
    तेव्हापासूनच जीवनाच्या 'मृत्यू' या अटळ सत्याचं आणि 'स्मशान' या शाश्वत विसाव्याचं भान मनात रुजायला लागलं होतं ...
    पूर्वसूचना मृत्युने कोणा दिली
    वेळ झाली की , निघावे लागते ...
    मित्रांनो , जेंव्हा-केंव्हा निघायची वेळ येईल तेंव्हा ' त्या ' अपूर्व घटनेला समाधानाने सामोरं जाण्यासाठी रियाज तर हवाच ना !
    शिवाय या शांत आणि अपरिहार्य जागेबद्दलची आपल्या सर्वांच्या मनातली भीती सुद्धा जायला हवी .
    लोकजागर चे निमंत्रण म्हणजे ,
    त्या रियाजाचाच एक भाग वाटला मला ...
    काय यादगार क्षण .., काय नजारा होता तो ..!
    छोटंसं स्टेज , रसिकांची तुडुंब गर्दी , मुलं-स्त्रिया-माणसं असे सगळेच जमलेले...
    दोन चिता जळत होत्या , वारा वाहता असल्यामुळे मधेच झुळुक यायची व प्रेतांच्या जळण्याचा तीव्र वास नाकातोंडात जायाचा . तरी पण
    मलाच काय , कुणालाच काही वाटलं नाही त्याचं ...
    मनसोक्त गायलो , ... उचंबळून दाद दिली रसिकांनी ...
    अखेरची गज़ल पेश केली ती अशा एका बुलंद शायराची - सुरेश भटांची , ज्याने जिवंतपणीच साक्षात मृत्यूची अनुभूती कथन केलेली आहे ...
    मी एकटाच त्या रात्री , आशेने तेवत होतो
    मी विझलो तेंव्हा सारे आकाश उजळले होते
    इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते
    मरणाने केली सुटका , जगण्याने छळले होते ...
    त्या ' ऐतिहासिक ' मैफिलीतली
    ही रचना तुम्हीही जरूर ऐका -
    मित्रांनो !
    आपला ,
    गज़लनवाज़ भीमराव पांचाळे
    Gazal Nawaz #BhimraoPanchale​​
    For More Updates Follow Me At -
    ______________________________________________________________
    ★ Facebook bit.ly/BhimraoPanchaleFB​​
    ★ Twitter bit.ly/BhimraoPanchaleTweet​​
    ★ Instagram bit.ly/BhimraoPanchaleInsta​​...
    Subscribe To My TH-cam Channel -- ‪@gazalnawazbhimraopanchale6816‬
    marathi gazal , Marathi Ghazal , Gazal Nawaz Bhimrao Panchale , Bhimrao Panchale Gazal , Bhimrao Panchale Live , Ghazal Nawaz Bhimrao Panchale , Suresh Bhat
  • เพลง

ความคิดเห็น • 81

  • @arjunpanchale
    @arjunpanchale หลายเดือนก่อน

    The best one

  • @rahulwaghmare5182
    @rahulwaghmare5182 หลายเดือนก่อน

    दादा अप्रतिम 🌹🌹🌹

  • @SURESHPATIL-ig4oo
    @SURESHPATIL-ig4oo 3 หลายเดือนก่อน

    Wah wah sir

  • @sangitakavle3870
    @sangitakavle3870 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @surendrachavan8074
    @surendrachavan8074 ปีที่แล้ว

    REALLY GREAT

  • @shubhangigorile3945
    @shubhangigorile3945 ปีที่แล้ว

    Apratim ❤

  • @dharmeshpalve342
    @dharmeshpalve342 5 หลายเดือนก่อน

    स्वरांचा जादूगार.... भिमराव पांचाळ
    मन हेलावणरी गझल.. छान अप्रतिम

  • @vinayakkamble2436
    @vinayakkamble2436 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम कलाकृती, काळजाला भिडणारा आवाज, खूपच छान ऐकताना डोळे भरून आले..नुसते ऐकत राहावे....

  • @dhanajijadhav6322
    @dhanajijadhav6322 ปีที่แล้ว +2

    शब्दप्रभू सुरेश भटसाहेबांची ही गझल तन्मयतेने गाणारा 'गझलनवाज' कोण हे पहाण्यासाठी जळणारी प्रेतेही सरणावर उठून बसतील, एवढी कलात्मकता 'भीम'रावच्या सादरीकरणात आहे. बहोत खूब.

  • @yashwantchavan1835
    @yashwantchavan1835 11 หลายเดือนก่อน

    Agab Lajabap sur

  • @vikrampositive9879
    @vikrampositive9879 2 ปีที่แล้ว +5

    एक उत्कृष्ट कलाकृती, काळजाचा ठाव घेणारा जबरदस्त आवाज, शब्द व्यक्त होतात अशी ही भावना ... फक्त एकच लाजवाब

    • @rameshwarshinde4878
      @rameshwarshinde4878 ปีที่แล้ว

      ग्रेट सलाम भट सर व भीमराव पांचाळे सर

  • @prafullabhujade
    @prafullabhujade 3 ปีที่แล้ว +8

    याचेच रडू आले की...
    अथांग कल्पना...
    भटांच्या काळजाचा ठाव घेण्यासाठी दादांच्या सुरांची होडी आणि आलापांची गोताखोरी हवीच....
    मग हाती माणिक मोती लागलेच म्हणुन समजा....
    शुक्रिया..दादा
    🙏🙏

    • @musicallaroundpravinpm462
      @musicallaroundpravinpm462 3 ปีที่แล้ว

      तुमचे शब्द देखील मला खूप आवडले

  • @vijaykotnake9979
    @vijaykotnake9979 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान संकल्पना, अप्रतिम गझल, धन्यवाद पांचाळे सर व यामागे मेहनत घेणारी पूर्ण टीम

  • @tanvidhurve8783
    @tanvidhurve8783 3 ปีที่แล้ว +2

    स्वर्गाचा मार्ग सुकर करण्याचा मार्ग म्हणजे ही गझल आपण पण काय गायलात खरंच खूप हृदयस्पर्शी

  • @balasahebdeshmukh9934
    @balasahebdeshmukh9934 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गझल

  • @sitakantpalaskar
    @sitakantpalaskar 3 ปีที่แล้ว +30

    "दुर्गुण गळून पडले माझे, मी सद्गुणांचा पुतळा आहे.! नव्याने ओळख झाली माझीच माझ्याशी, आज माझ्या मरणाचा सोहळा आहे"

  • @amolpatil3293
    @amolpatil3293 3 ปีที่แล้ว +2

    सर, नेहमी प्रमाणे अप्रतिम 💚

  • @abijitthamke1135
    @abijitthamke1135 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान , अप्रतिम गझल.. स्मशानात ही शब्दांचे सोने झाले..

    • @sanjaybarve2410
      @sanjaybarve2410 ปีที่แล้ว

      स्मशानात कोणाच्या
      ग्रेवयार्डमध्ये की दफनभूमीत

  • @chandrakantkakde2532
    @chandrakantkakde2532 2 ปีที่แล้ว +5

    Great👍👍👍👍 voice नमो budhay

    • @aakashthorve6428
      @aakashthorve6428 ปีที่แล้ว

      मि हिंदू आहे पण मि गौतम बुद्ध चे विचार follow करतो
      नमो बुध्दाय

    • @ajaymahajan8342
      @ajaymahajan8342 11 หลายเดือนก่อน

      याचेच रडू आले की रडणे न मला जमले खूपच सुंदर जीवनदर्शन

    • @ajaymahajan8342
      @ajaymahajan8342 11 หลายเดือนก่อน

      याचेच रडू आले की रडणे न मला जमले खूपच सुंदर जीवनदर्शन

  • @dinkarpingulkar501
    @dinkarpingulkar501 2 ปีที่แล้ว +1

    काय बोलावे समजत नाही खरच खुप सुंदर

  • @gsthakur1210
    @gsthakur1210 3 ปีที่แล้ว +2

    वा वा अप्रतिम!!

  • @sitakantpalaskar
    @sitakantpalaskar 3 ปีที่แล้ว +12

    दादा....क्या बात...आणि भट साहेब...
    "शब्द आणि स्वरसाज" एकत्र आल्यावर स्मशानातील वातावरण देखील "स्वर्गीय" झालं...दादा🙏🙏🙏

  • @nikitajadhav7461
    @nikitajadhav7461 ปีที่แล้ว

    Khup khup sundar gazal aani ti tumchya aawajat, sonepe suhaga👍👍👌🙏🙏

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 ปีที่แล้ว +1

    *जगण्याने छळले होते, मरणाने सुटका केली* व्वा, गजल नवाज!

    • @pratimjadhav4762
      @pratimjadhav4762 ปีที่แล้ว +1

      *जिवंतपणे छळायचे, मरणानंतर रडायचे*

  • @govardhanbhasme7662
    @govardhanbhasme7662 ปีที่แล้ว

    अती सुंदर गायकी शतशः नमन

  • @rajukedar6673
    @rajukedar6673 ปีที่แล้ว

    अप्रतिम दादा..... ह्रदयस्पर्शी....👌

  • @milindwagh3962
    @milindwagh3962 2 ปีที่แล้ว +3

    सर, नावाप्रमानेच ग़ज़ल गायनात "भिम" आहात।🙏

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 2 ปีที่แล้ว +1

    ह्रदयस्पर्शी खूप छान

  • @sakharammandavgade7426
    @sakharammandavgade7426 2 ปีที่แล้ว +1

    Lovely flute

  • @bramhadassukhdeve4332
    @bramhadassukhdeve4332 2 ปีที่แล้ว

    Apratim DADA... GREAT... GAZALLKAR..

  • @sanjaybarve2410
    @sanjaybarve2410 ปีที่แล้ว

    वाह खूप सुंदर 👌👌👌👌

  • @suryawanshidnyandev8430
    @suryawanshidnyandev8430 ปีที่แล้ว

    अप्रतिम 👌

  • @Shantabaimusic
    @Shantabaimusic 2 ปีที่แล้ว

    ग्रेट दादा

  • @musicallaroundpravinpm462
    @musicallaroundpravinpm462 3 ปีที่แล้ว +1

    क्या बात है सर

  • @satwajihole4531
    @satwajihole4531 3 ปีที่แล้ว

    क्या बात है सर!
    स्मशानात मैफिल!

  • @sharvariwagh4262
    @sharvariwagh4262 ปีที่แล้ว +1

    सर जेव्हा जेव्हा आपल्या गझल आयकते तेव्हा तेव्हा तुमचे चरण स्पर्श करण्याची इच्छा होते🙏🙏एकदातरी तुम्हाला भेटायचे आहे

  • @creativeartstudio7518
    @creativeartstudio7518 3 ปีที่แล้ว +22

    दादा, काळजाचा कान करून तुम्हाला ऐकण्यासाठी रसिक जमले होते स्मशानात...
    "होलिकोत्सव" च्या निमित्ताने...
    या मैफिलीचा मला साक्षीदार होता आलं आणि चित्रीकरणही करता आलं. त्या यादगार क्षणांची आठवण या निमित्ताने ताजी झाली...
    आयोजन होतं अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वर्धा यांचे.

    • @utkarshadambhare7687
      @utkarshadambhare7687 3 ปีที่แล้ว

      सर आम्हाला गझल चा कार्यक्रम वधेंचा तो ऐकायचा कधीतरी कस माहिती पडेल त्याबद्दल माहिती असेल तर कळवाल 🙏🙏आम्ही वधेंकर🙏🙏

    • @sanjaybarve2410
      @sanjaybarve2410 ปีที่แล้ว

      मरण सरणावर असते
      ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा?

  • @bhagojiranvir7908
    @bhagojiranvir7908 3 ปีที่แล้ว +1

    मस्त दादा👌👌👌

  • @prafulzadekar2426
    @prafulzadekar2426 2 ปีที่แล้ว

    Khup sundar sir

  • @harshad24
    @harshad24 3 ปีที่แล้ว +1

    सरजी छान❤️👍

  • @pradeepsakpal7156
    @pradeepsakpal7156 3 ปีที่แล้ว +4

    शब्द प्रभू सुरेश भट यांच्या या गजलेचे सादरीकरण फक्त गजल नवाज यांनीच करावे.

  • @navnathdhage7609
    @navnathdhage7609 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर आवाज आहे

  • @sagartamboli5368
    @sagartamboli5368 ปีที่แล้ว

    याचेच रडू आले की जमले ना मला रडणे ही. .👌👌

  • @shantaramjagadale8599
    @shantaramjagadale8599 ปีที่แล้ว

    Good gazal

  • @rahultadas2491
    @rahultadas2491 3 ปีที่แล้ว

    खूप छान दादा....👍

  • @ravindrataiwade5440
    @ravindrataiwade5440 2 ปีที่แล้ว

    अप्रतीम दादा

  • @ummedraut3274
    @ummedraut3274 2 ปีที่แล้ว

    Farcha sunder vichar

  • @sadashivhade4179
    @sadashivhade4179 2 ปีที่แล้ว

    नि शब्द भीमराव जी निशब्द मी

  • @latabayaskar7296
    @latabayaskar7296 ปีที่แล้ว

    आवडते गझल गायक

  • @rameshpotdar8382
    @rameshpotdar8382 ปีที่แล้ว

    छान 👌

  • @shajarsantosh2384
    @shajarsantosh2384 3 ปีที่แล้ว +13

    ही गजल , अंगावर शेहारे आणते , तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे गायली की , सुरेश
    भट्ट साहेब जिथे भी असतील तिथे त्यांना
    ऐकून आनंद झाला असेल , खूप छान , अति
    उत्तम ,

  • @sagartamboli5368
    @sagartamboli5368 ปีที่แล้ว

    ❤❤❤

  • @atulwankhade1045
    @atulwankhade1045 3 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम संकल्पना , अप्रतिम " होलिकोत्सव " चितेच्या अग्नित जीवनांचे वास्तववादी दर्शन, तेवढेच गझलप्रिय दर्शक , यात आपला सुरमय आवाज, सर्वच छान.

  • @madhukarnakat5490
    @madhukarnakat5490 3 ปีที่แล้ว

    एक नंबर गझला

  • @jagannathkaluram699
    @jagannathkaluram699 2 ปีที่แล้ว

    kya kahu dada koi lafj nahi bhatt sahab ko koti koti naman

  • @Bapukalesir
    @Bapukalesir 3 ปีที่แล้ว +4

    कितीही ऐका.....कान निवत नाहीत

  • @clayworldstudios7164
    @clayworldstudios7164 2 ปีที่แล้ว

    रूदय सपरशी आवज

  • @kishorbali4521
    @kishorbali4521 3 ปีที่แล้ว +14

    मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूत मिसळले होते ...
    मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते ...
    जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते ...
    असे एकाहून एक सरस शेर आणि मुळात अत्यंत प्रभावी मतला. अशा काव्याला दादांचा स्वर लाभावा आणि तो रसिकांचे काळीज चिरत आरपार जावा, असंच काहीसं झालं आहे. मनापासून ऐकत गेलात तर दादांच्या काही प्रसिद्ध रचनांपुरते दादा नसून त्यांच्या गायकीचं सामर्थ्य अशा वेगळ्याच रचनांमध्ये अधिक विखूरलेलं आहे, हे आपल्याला जाणवतं. एकेक गझल नव्हे तर एकेक अजरामर कलाकृतीच.

  • @gazalakshare700
    @gazalakshare700 3 ปีที่แล้ว +4

    अतिशय स्तुत्य मैफल दादा..
    अप्रतिम अप्रतिम 🌷🌺

  • @pradeepsohoni9503
    @pradeepsohoni9503 2 ปีที่แล้ว

    Aprateem gaykee

  • @musicallaroundpravinpm462
    @musicallaroundpravinpm462 3 ปีที่แล้ว +4

    आयुष्य संपल्यावर आयुष्यावर बोलतात ती ही योग्य जागा
    कमीतकमी कमी इथे तरी ऐकणाऱ्यांनी जीवन काय आहे हे समजून घ्यावं
    माझ्या मते भ्रष्टाचाऱ्यांना इथे आणून बसवाव .
    सर ,
    ते वेशीवर तयांना टांगायला हवे हे का कुणी फुलांना सांगायला हवे हे त्यांना ऐकवावे

  • @naturetalk-rc4gd
    @naturetalk-rc4gd 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान गजल आहे पण रेकॉर्डींग आणखी व्यस्थित आ
    असायला हवी होती

  • @thoughtsharingmedia8578
    @thoughtsharingmedia8578 2 ปีที่แล้ว

    ❤️❤️❤️