इस्त्रायल-अरब संघर्ष आणि ओपरेशन एंटेबी | Avinash Dharmadhikari (IAS) | Operation Entebbe | Israel

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2023
  • या कथामलेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: • नव्या वैभवाचीच स्वप्ने...
    दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्रायल देशावर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री. अविनाश धर्माधिकारी सरांच्या 'नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी' या व्याख्यानमालेतील 'इस्त्रायल-अरब' संघर्ष आणि ओपरेशन एंटेबी वर आधारित संपूर्ण व्हिडिओ पुन्हा एकदा आमच्या श्रोत्यांसाठी सादर करीत आहोत.
    ऑपरेशन एंटेबे हे 1976 मध्ये युगांडामधील इस्रायलने राबविलेले दहशतवादविरोधी अभियान होते. तेल अवीव आणि पॅरिस या शहरांदरम्यान एअर फ्रान्सने चालवलेल्या आंतरराष्ट्रीय नागरी प्रवासी फ्लाइटचे ( एअरबस ए३०० ) पॅलेस्टिनी नेतृत्वाखालील अपहरणाला प्रतिसाद म्हणून हे सुरू करण्यात आले. अथेन्समध्ये थांबण्याच्या वेळी , दोन पॅलेस्टिनी PFLP-EO अतिरेक्यांनी आणि दोन जर्मन RZ अतिरेक्यांनी विमानाचे अपहरण केले, ज्यांनी फ्लाइट लिबिया आणि नंतर युगांडाकडे वळवली, जिथे ते इतर अतिरेकी सामील होण्यासाठी एंटेबे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. युगांडामध्ये या गटाला युगांडाचा हुकूमशहा इदी अमीन यांचे समर्थन लाभले होते.
    4 जुलै 1976 रोजी रात्रीच्या वेळी ऑपरेशन सुरू करून, इस्रायली वाहतूक विमानांनी 100 कमांडोना 4,000 किलोमीटर (2,500 मैल) पेक्षा जास्त अंतरावरून युगांडामध्ये बचाव प्रयत्नासाठी उड्डाण केले. 90 मिनिटांच्या कालावधीत, 102 ओलिसांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली. या बचाव कार्याची चित्तथरारक कहाणी धर्माधिकारी सरांनी या व्याख्यानात सांगितली आहे..
    #israel #israelpalestine #israelwar #israelconflict
    For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
    चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyamandalpariwaroff...
    आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    chanakyamandalpariwar
    आमचे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    play.google.com/store/apps/de...
    आमच्या TH-cam चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
    / @chanakyamandalpariwar
    आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    t.me/chanakyamandalpariwaroff...
    फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    / chanakyamandalpariwar
    For further details contact us on chanakyamandal.org/
    For Online Courses, visit: lms.chanakyamandal.org/
    To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
    To get more study materials & important information, join our official telegram channel :
    t.me/chanakyamandalpariwaroff...
    Subscribe and follow us on TH-cam: / @chanakyamandalpariwar
    For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

ความคิดเห็น • 368

  • @dhananjoshi
    @dhananjoshi 7 หลายเดือนก่อน +16

    किती स्पष्ट, आणि प्रवाही एकदाही अं..अं...नाही ! अविनाश सरांची विद्वत्ता आणि स्मरणशक्ती .... अद्वितीय !!

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 8 หลายเดือนก่อน +48

    अविनाश धर्माधिकारी म्हणजे,कधीही नाश न पावणारे.
    धर्माधिकारी म्हणजे धर्म ज्यांना समजला व त्या अनुषंगाने धर्म रक्षणासाठी जो सतत कार्यरत असतो.तोच धर्माधिकारी.
    फारचं छान सर,आपण मानवतावादी दृष्टिकोनातूनच हिंदु व हिंदुत्व धर्म जगात का श्रेष्ठ आहे हे समजावून सांगितलं पण
    सतत कार्यरत राहुन धर्म रक्षणासाठी जागृत राहण्याचा बहुमोल मार्गदर्शन आपणाकडून हिंदुस्थान जनतेला देत आहात यासाठी भारतीय जनता आपलं कोटी कोटी धन्यवाद स्विकारत आहे.
    जय हिंद, जय श्रीराम, भारत माता की जय!

  • @pratapkasar514
    @pratapkasar514 8 หลายเดือนก่อน +26

    ईतकी तंतोतंत माहिती इतका परिपक्व अभ्यास सर भारावून गेलो❤

  • @nihalkothari3222
    @nihalkothari3222 8 หลายเดือนก่อน +5

    Maa Saraswati ज्यांना पावली आहे, अश्या अविनाश सरांना भेटण्याचा योग आला याच्या मध्ये मी स्वतःला धन्य समजतो. Thanks to Ketan Thakur

  • @vijaygopal376
    @vijaygopal376 8 หลายเดือนก่อน +6

    मान. श्री अविनाशजी धर्माधिकरी साहेब आपणास सप्रेम नमस्कार. विनंती की आपले जाज्वल्य राष्ट्रप्रेम व देशभक्तीचे विचार व त्यासाठी देशावर झालेल्या युध्द आक्रमणा बाबतची भारतीय फौजेची आत्मनिर्भरता व संरक्षणावर आपण देशास दिलेला मोलाचा सल्ला पाहून मन उत्साहीत व प्रफुल्लीत झाले. आपणा सारखी देश सीमे वरील संरक्षण सिध्दता व आत्म निर्भरता या विषयाचा प्रचंड अभ्यासू IAS आधिकार्यास सदर बाबतीत केंद्र सरकारने संरक्षण सल्लागार म्हणून नेमणूक केल्यास ते देशास व आम जनतेस नक्कीच भल्याचे व फायदेशीर ठरेल असे वाटते, धन्यवाद व आभार. जयहिंद 🚩

  • @raginibagwe4120
    @raginibagwe4120 8 หลายเดือนก่อน +7

    Sir तुमचे आपल्या देशातील अंतर्गत स्थिती बद्दल..I guess आणीबाणी काळाबद्दल...अस्वस्थ दशकाची डायरी हे खूप पूर्वी वाचनात आले होते ... तुम्हीं आणि तुमच्या मंडल परिवाराने देशभरात फिरून केलेल्या अभ्यासपूर्ण भ्रमंती वाचून मी अचंबित झाले होते...
    आता आम्हाला नगण्य माहित असलेल्या भूप्रदेश इस्राईल, ज्यू , Palestinians etc तेथील नेते... इस्राईल च्या स्थापने पासून ईतके लीलया सांगितले त्याला मनोमन सा नमस्कार... परत एकदा ऐकावे लागेल...You are simply great Sir🙏🙏God bless you 🎉

  • @ravindragore8127
    @ravindragore8127 8 หลายเดือนก่อน +5

    आ.अविनाशी धर्माधिकारी सर आपण
    अवलिया आहात .आपणास ग्रेट सॅल्युट
    त्रिवार वंदन .जय श्रीराम.

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 8 หลายเดือนก่อน +5

    मन थरारून गेले 👏👏👏आपले तिन्ही दलातील लढवय्ये इस्राईलच्या तोडीस तोड, सक्षम होतेच व आहेत कमी पडत होते त्या काळात ते राजकीय नेतृत्व 👎🏿धन्यवाद 🙏सर, आपल्यामुळे तांत्रिक बारकावे, इतर संबंधित देशातील परिस्थिती समजले वाक्या वाक्यातून आपला देशाभिमान प्रकट होतो 👌👌👌🙏

  • @ravindrakale5302
    @ravindrakale5302 8 หลายเดือนก่อน +49

    वा वा खरच देशभक्ती रक्तात असली की आशा विस्मयकारक थरारक गोष्ठी घडतात..! संदर व्याख्यान..!❤

  • @rameshlahade7429
    @rameshlahade7429 7 หลายเดือนก่อน +18

    हा कोणी व्यक्ती नसून साक्षात श्रीकृष्ण भगवंताचा दुसरा अवतारच आहे.सर कोटी कोटी प्रणाम ❤💐🙏

    • @sureshthakkar291
      @sureshthakkar291 6 หลายเดือนก่อน

      Namaskar. R S S che Pracharak hyani CHADA KADUN BADA KADE hi book lihili aahe. Hua book madhye Israel chi sampurna mahiti aahe. Hi book Israel madhye Hibru bhaset bhashantar karun Israel madhye Text book aahe. Hindusthan aur Israel BHAI BHAI They. Hai. Rahege... Jay Hindu Rastra... Hari Om.

    • @sureshthakkar291
      @sureshthakkar291 6 หลายเดือนก่อน

      R S S che Pracharak. N ANA PALKAR.. Dhanyawad.... Om.

  • @rajendradeshpande2533
    @rajendradeshpande2533 8 หลายเดือนก่อน +8

    अद्भुत स्मरणशक्ती,आणि समोर चित्र उभे करण्याची जबरदस्त हतोटी!

  • @purushottamthakare6839
    @purushottamthakare6839 8 หลายเดือนก่อน +6

    आपला व्याख्यान ऐकलं डोळ्यासमोरून गाझा आणि इजराईल यांच्या चाललेल युद्ध दिसत होते एक प्रकाराचं चित्रपट, आपल्या मतीला तोड नाही सर सॅल्यूट आहे आपणाला.

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 8 หลายเดือนก่อน +19

    एक तास एक्केचाळीस मिनिटांचा थरार केव्हा संपला कळलच नाही ... व्वा अविनाशजी u r simply great...

  • @prasadpatake4610
    @prasadpatake4610 8 หลายเดือนก่อน +5

    आज लढाई चं तंत्र कळलं असं म्हणणं उंचीत होणार नाही परंतु ज्ञाना मध्ये प्रचंड भर पडली , सर सलाम तुम्हाला!!! मस्तच

  • @bharatjadhao3233
    @bharatjadhao3233 8 หลายเดือนก่อน +6

    अतिशय चित्तथरारक वर्णन केले सर आपण आज वयाच्या चाळीसाव्या वर्षी सुद्धा वाटतं की तुमचा विद्यार्थी म्हणून यावं तुमच्याकडे

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 8 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद,
    धर्माधिकारी
    अतिशय सुंदर अभ्यास पूर्ण शौर्य कथा ती पण खरी सांगीतली ते सुद्धा खाणा खुणांसह
    खरा इतिहासाचा अभ्यासक च सांगु शकतो. ऐकत असतांनाही असे वाटतं होत की प्रत्येक वेळी तुम्ही तेथे हजर होतात की काय?
    फक्त एक च गोष्ट म्हणजे
    तुंम्हाला सलाम आणि तुमच्या लक्षात ठेवण्याच्या पध्दतीला.
    चाणाक्ष बुध्दीमत्ता. काय असते ते अत्ता कळते.
    जय हो

  • @kishorvengurlekar6080
    @kishorvengurlekar6080 8 หลายเดือนก่อน +18

    आमच्या सारख्या सामान्य ज्ञान असणाऱ्यांनाही हा विषय लिलया समजवून सांगितला.यासाठी आपण किती परिश्रम घेतले असतील यांची कल्पना येते.असेच अभ्यासपूर्ण विषय कृपया वरील माध्यमातून कृपया आमच्या पर्यंत पोहचवावे.ही आपणांस नम्र विनंती
    🙏🙏🙏🙏🙏.

  • @bapujoshi
    @bapujoshi 8 หลายเดือนก่อน +4

    ज्ञानात भर घालणारे असाधारण असे भाषण. ज्ञानाचे भांडार म्हणजे अविनाश ध्रमाधिकारी सर.

  • @deepaknawale9065
    @deepaknawale9065 7 หลายเดือนก่อน +3

    किती हे ज्ञान, अथांग बुद्धिमत्ता आहे तुमची.

  • @anilkhalkar5925
    @anilkhalkar5925 7 หลายเดือนก่อน +3

    प्रज्ञावान होण्याकरता अशा व्याख्यानांची खूप आवश्यकता आहे

  • @user-fb7tg6es8d
    @user-fb7tg6es8d 8 หลายเดือนก่อน +40

    मोदींनी इजरायला दिलेला पाठींबा दिला तो इतक्या कमी वेळात की त्याची प्रशन्सा करावी तेवढी थोडी या उलट रशिया युद्धात घेतलेली तटस्थ भूमिका खरंच इंडिया च्या फोरेन नितीला सॅल्यूट

  • @sahebraowaghmare9534
    @sahebraowaghmare9534 7 หลายเดือนก่อน +3

    सर आपली प्रचंड बुद्धिमत्ता भरपूर अभ्यास, आणि अप्रतिम व्याख्यान, एकदम चांगली स्मरण शक्ती,सर आपणास मनापासून धन्यवाद

  • @shekhardandekar7435
    @shekhardandekar7435 8 หลายเดือนก่อน +3

    खूप छान अभ्यासपूर्ण कथन इस्रायलची खूपच प्रेरणादायी अभिमान वाटावा अशी देशभक्ती आणि साहस.

  • @gurunathpatil9159
    @gurunathpatil9159 7 หลายเดือนก่อน +2

    छान काय ही विद्वत्ता, सरांची बौध्दीक कामास येवो ही प्रार्थना!

  • @gotiramavhad7736
    @gotiramavhad7736 8 หลายเดือนก่อน +4

    खूप खूप अभ्यासपूर्ण खूप खूप धन्यवाद सर ऐकताना सुद्धा आमच्या अंगावर रोमांच आले आज जी परिस्थिती इजराइल आली आहे त्यातून इजराइल पुन्हा बाहेर पडलो ही ही ईश्वर चरणी प्रार्थना❤

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 8 หลายเดือนก่อน +2

    फारच छान वर्णन आणि विश्लेषण ! यापासून भारताने पुलवामा प्रकरणात बोध घेतलेला दिसतो आहे .

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 8 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार सर.अतिशय.सखोल..अभ्यासपूर्ण.विश्लैषण.सलाम.तुमच्या.बुध्दीला

  • @ajitbrahmadande703
    @ajitbrahmadande703 7 หลายเดือนก่อน +3

    संघर्षाच्या या वास्तव ऐतिहासिक माहितीसाठी खुप - खूप धन्यवाद सर !

  • @balasahebchavan1143
    @balasahebchavan1143 8 หลายเดือนก่อน +2

    खुप छान. सर्व संघर्ष डोळ्यासमोर घडतो आहे, असं विवेचन.

  • @sambhajikambire7183
    @sambhajikambire7183 7 หลายเดือนก่อน +2

    शहरातील प्रचंड बुद्धिमत्ता भरपूर अभ्यास आणि अप्रतिम व्याख्यान एकदम चांगली स्मरणशक्ती एक नंबर वक्तृत्व सर आपणास मनापासून धन्यवाद❤❤❤❤

  • @ulhasbile7010
    @ulhasbile7010 7 หลายเดือนก่อน +3

    सर, आपल्या बुध्दिमतेला सलाम.

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 8 หลายเดือนก่อน +5

    अविनाश धर्माधिकारी जी नमस्कार . आपले इस्त्राईल अरब संघर्ष व्याख्यान ऐकून आम्हाला बरीच माहिती समजली . ज्ञानात मोठी भर पडली .

  • @DattaprasadSant
    @DattaprasadSant 8 หลายเดือนก่อน +3

    सर, अतिशय क्लिष्ट विषय आपल्या ओघवत्या वाणीतून सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत सांगायचं.... खरंच आपल्याला त्रिवार वंदन🙏🏻🙏🏻🙏🏻 फोटोजनिक मेमरी म्हणजे काय? याचा प्रत्यय आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून पदोपदी जाणवतो.
    संपूर्ण व्याख्यान ऐकताना अंगावर शहारे येतात.... संपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो...
    जाज्वल्य देशाभिमान , निस्सीम राष्ट्रभक्ती व देशाप्रती निष्ठा असल्यावर काहीही अशक्य नाही...याची प्रचिती येते...
    पुनश्च धन्यवाद 🙏

  • @rajarammishra4198
    @rajarammishra4198 7 หลายเดือนก่อน +1

    धर्माधिकारी जी आप ने सविस्तर जो विशलेशन किया है उसके लिए बहुत धन्यवाद।

  • @prashantc1
    @prashantc1 7 หลายเดือนก่อน +4

    तुमच्या बद्दल खूप आदर वाढला सर,🙏🙏

  • @nimabhanu8325
    @nimabhanu8325 8 หลายเดือนก่อน +12

    आपल्या सारखे लोक आमच्यात आहेत आम्ही खूप भाग्यवान आहोत 🙏

  • @santoshnarvekar7283
    @santoshnarvekar7283 8 หลายเดือนก่อน +11

    एकदम झक्कास!!! धर्माधिकारी साहेब.खूपचं सुंदर कट्टरदेशप्रेम,जाज्वल्य देशाभिमान म्हणजे काय ते ह्या आपल्या व्याख्यानाने समजतं.

  • @deshpandesohamshirishviiic5733
    @deshpandesohamshirishviiic5733 7 หลายเดือนก่อน +1

    Sir grt work असच आपल्या लोकांना अशा गोष्टी सागीतल्या जाव्यात.मी नुकताच गोल्डआ हे विनगवणकरच पुस्तक वाचलं आणि तुमचं हे व्याख्यान आईकण्यात आल .खरंच खूप. देशभक्त लोक आहेत ही.
    हिंद भूमीत या लोकांचं देशप्रेम सांगितलं पाहिजे. आणि असाच आपणही देशासाठी एक झालं पाहिजे

  • @shobhanakale2980
    @shobhanakale2980 8 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम ! थरारक गोष्टी सांगण्याची शैली खरोखरच अप्रतिम ! बारीक सारीक तपशीलांसह माहिती ऐकत असताना सर्व चित्र डोळ्यासमोर उभे राहत होते .

  • @godisgreat53
    @godisgreat53 8 หลายเดือนก่อน +8

    शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले.😮

  • @vilasbondre9437
    @vilasbondre9437 8 หลายเดือนก่อน +7

    छान माहिती ,स्मरण शक्ती दांडगी.

  • @ps.dhananjaysarvagode4888
    @ps.dhananjaysarvagode4888 8 หลายเดือนก่อน +3

    परमेश्वर तुम्हांला अनेक ठिकाणी नेऊन आशीवार्दी त करो

  • @Sudhir-tp2hz
    @Sudhir-tp2hz 8 หลายเดือนก่อน +2

    सर, हॅट्स off to you, हा अभ्यास अणि प्रवचन कौशल्य

  • @sr.adv.k.kmuley1893
    @sr.adv.k.kmuley1893 8 หลายเดือนก่อน +4

    Top most Oratory Intelligence Sir you are Dimond of Bharat Mata

  • @Ekjagatwashiarya
    @Ekjagatwashiarya 3 หลายเดือนก่อน +1

    हे व्याख्यान एकूण निःशब्द झालो अद्वितीय,अद्भुत स्मरण शक्ती जय हो❤ साष्टांग दंडवत प्रणाम धर्माधिकारी सर❤

  • @karnavirbhurase3874
    @karnavirbhurase3874 8 หลายเดือนก่อน +6

    आपल्यासारखी बुद्धि आमच्या मुलांना यावी,साहेब!!!!!

  • @sandeepghorpade9424
    @sandeepghorpade9424 6 หลายเดือนก่อน +1

    धर्माधिकारी म्हणजे काय चीज असते ते आज समजले...
    प्रणाम सर...!!

  • @dilipraul2797
    @dilipraul2797 8 หลายเดือนก่อน +72

    परमेश्वराने तुम्हाला आयुष्य भरपूर देवो, ही शुभेच्छा

    • @vidyakulkarni2379
      @vidyakulkarni2379 8 หลายเดือนก่อน +1

      अगणित धन्यवाद,शुभेच्छा👍

    • @ashokpagare622
      @ashokpagare622 8 หลายเดือนก่อน

      ​@@vidyakulkarni2379ap

    • @vinayakamane8211
      @vinayakamane8211 7 หลายเดือนก่อน +2

      .छान माहिती दिली. आभार.

    • @ashokjadhav7797
      @ashokjadhav7797 7 หลายเดือนก่อน

      00⁰

    • @surendratodankar7651
      @surendratodankar7651 7 หลายเดือนก่อน +1

      😊theday of jakle movies

  • @raosahebmohite4229
    @raosahebmohite4229 8 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद धन्य होतो जेव्हा आपले लेक्चर ऐकतो.

  • @neelakanthtilak6243
    @neelakanthtilak6243 3 หลายเดือนก่อน

    सर आपल्या व्यक्तीमत्वाला तोड नाही. सलाम. एक असं व्याख्यान दुसऱ्या महायुद्धावर द्यावे ही नम्र विनंती

  • @kishoraundhakar6265
    @kishoraundhakar6265 8 หลายเดือนก่อน +7

    "Udhhasya katha rammamyam". Katha varnan karave te Avinash sarannich.
    Avinash ji, one of the best patriot of our time.
    I am Ex Indian Navy JCO.
    Whole of the world is telling that Israel's Irondome has failed but it's partially true.
    Our Maharashtrian family lady in her personal letter explained that system has reasonably performed.
    Israel is bound to win over in present crises.
    I am proud to see India for the first time with out any fear has announced that we are with the Israel solidly.
    SATYAMEV JAYATE.
    JAY HIND. KAY ISRAEL.

  • @snehaltikam987
    @snehaltikam987 8 หลายเดือนก่อน +2

    Kiti chan mahiti dili tumhi Avinash sir God bless you

  • @chitraborude5161
    @chitraborude5161 8 หลายเดือนก่อน +3

    Proud of Sir.Excellant.Shat shat naman

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 8 หลายเดือนก่อน +1

    सलाम धर्माधिकारी साहेब.फारच आभ्यासू विश्लेषण.

  • @narayanpatil468
    @narayanpatil468 8 หลายเดือนก่อน +5

    सगळ्यात भारी आपला सनातन❤

  • @shrikanttapas8296
    @shrikanttapas8296 8 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर व खूपच अदभुत माहिती दिल्या बद्दल आपले खूप खूप आभार व धन्यवाद 🙏🙏

  • @dhananjaypatil972
    @dhananjaypatil972 7 หลายเดือนก่อน

    केवळ त्या प्रसंगाचे वर्णन किंवा भाकड कथा कथन न करता सर्व श्रोत्यांना प्रत्यक्ष त्या त्या सर्व जागी नेवून उभे करून तंतोतंत सेकंदवेळेनुसार बारकाईने सर्वांगाने समजेल अशी सुसंगत मांडणी करून ज्ञानात वाढ करण्याची
    अप्रतिम असामान्य अभ्यासपूर्ण शैली श्रवणीय व खिळवून ठेवणारीआहे.
    सर,आम्ही आपले आभारी आहोत.

  • @sudeshchavan218
    @sudeshchavan218 8 หลายเดือนก่อน +2

    सुंदर ..अप्रतिम शब्दात वण॔ण . सर .. . तुम्हाला शतशा प्रणाम

  • @sumersingpatil5806
    @sumersingpatil5806 7 หลายเดือนก่อน +1

    ऐकत रहावं असा चित्तथरारक अनुभव आपण आपल्या शब्दात मांडतलात या बद्दल धन्यवाद

  • @dhondiramlimkar6078
    @dhondiramlimkar6078 8 หลายเดือนก่อน +5

    खूप छान आणि सविस्तर माहिती दिली आहे....

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 7 หลายเดือนก่อน +1

    खरोखरच आपण फार मोठी मांडणी केली आहे प्रचंड अभ्यास सर आपण केला आहे मनपूर्वक शुभेच्छा

  • @vijayshrishiraskar9293
    @vijayshrishiraskar9293 8 หลายเดือนก่อน

    सर आपले भाषण ऐकताना असे वाटत होत की प्रत्येक्ष आपल्या समोर घटना घडत आहे याला म्हणतात देशभक्ती आपले विचार मांडन्याची पध्दत याला तोडच नाही इतरांचे उणे धुणे काढण्यापेक्षा आपण देश्यासाठी काय करू
    शकतो याचा विचार करावा असे वाटते

  • @sunandajoshi128
    @sunandajoshi128 8 หลายเดือนก่อน +3

    खूपच सुंदर व्याख्यान!
    राष्ट्रभक्ती कशी असावी हे इस्त्रायल कडून शिकावे ..

  • @anildoke6757
    @anildoke6757 7 หลายเดือนก่อน +11

    How thrilling!
    How interesting!
    Blinds description.
    Hats off. Sir🙏🙏🙏

  • @surekhashingade8933
    @surekhashingade8933 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली सर अजून कथा आयकायला आवडतील धन्यवाद जयहिंद

  • @prabhakarinamdar680
    @prabhakarinamdar680 8 หลายเดือนก่อน +15

    Hats off to Dharmadhikariji, your command on the subject, your way of expression and your mastery on the subject makes me think to be a 20 year student and sit with you study International politics. I am a Doctorate in Pharma Chemistry , a retired scientist in Drug Discovry, 84 years old. Highly impressed by your authority on the subject.

    • @sunilkhandare4088
      @sunilkhandare4088 8 หลายเดือนก่อน +2

      सर .. खूप प्रवाहीपणे आपण समजून सांगत आहात .ग्रेट सर ..👏👏👏🙏🙏🙏

  • @prakashpatil828
    @prakashpatil828 8 หลายเดือนก่อน +1

    सॅल्यूट सर, उत्कृष्ट मांडणी.

  • @KrishnaMhaskar24
    @KrishnaMhaskar24 8 หลายเดือนก่อน +8

    सर खुपच छान माहीती दिलीत. कीती काटेकोर प्लॅनिग केले होते ते आपल्या अभ्यासातून समजले.

  • @sudhakardashputre3559
    @sudhakardashputre3559 8 หลายเดือนก่อน

    सर त्रिवार अभिनंदन.खरोखर गर्व आहे. अत्यंत सविस्तर माहिती दिली. मोदीजी ना नम्र विनंती की. जस आपण मि. डोवल, मी. अश्विनी वैष्णव,आणि इतर अनेक व्यक्तींना जस सामावून घेतले. तसे आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून घेता येईल.

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533 8 หลายเดือนก่อน +3

    छान माहिती, प्रत्येक हिंदुनी बोध घ्यावा.. 🙏❤🇮🇳🚩

  • @satishkasture9471
    @satishkasture9471 8 หลายเดือนก่อน +3

    सर अत्यंत उत्कृष्ठ निवेदन,
    युगंडच्या एटेंबे विमानतळावरून सुटका, हा इस्राइली लष्कराचा ९० मिनिटाचा प्लॅन, तसाच इराकची ऑसीराक अणूभट्टी ४५ मिनिटात उडवली हे दोन्ही प्रसंग, इस्राईल यू द्ध यू द्ध आणि यूद्ध या पुस्तकात वाचायला मिळते,

  • @ashokbhandarebhandare7394
    @ashokbhandarebhandare7394 7 หลายเดือนก่อน

    सर काय काय विवेचन केले मला जशी माझी आई लहानपणी गूज गोष्टी सांगायची आणि मी कधी झोपी गेलो मलाच samjayac नाही अशी शांत झोप.लागायची तुम्ही अरब ezhralay बाबत जे संनगाया सुरुवात केली waa kiti sundar tarikh वेळ साल मला फार ऐकण्यासाठी माझे कान तृप्त झाले तुम्ही जसे जसे प्रसंग सांगत होता तसे तसे पुढे काय पुढे काय होणार याची मनाला utkhandha लागून राहिली काय तुमची shabhadh रचना samjawanayachii पद्धत खूप सुंदर मी कोणत्या शब्दात सांगू काय तुमचा abyas काय बुद्धिमत्ता काय shabad fhek kharo khar लाखोमे एक fhar सुंदर. अति सुंदर मी तुमचे bhshan ऐकताना भान विसरून गेलो विषय पण सध्या स्थिती वर addhrit होता मी परमेश्वरा जवळ तुमच्यासाठी parfhana करतो की तुम्हाला उतम आरोग्य लाभो आणि असेच लाखो करोडो lakakana जनतेला prbhodhan करून परिवर्तन करावे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @tanajighatage2707
    @tanajighatage2707 7 หลายเดือนก่อน +1

    अफाट स्मरण शक्ती. इतिहासातील मुस्लिम नावे, तारखा वेळ आणि ठिकाणे क्रमवार सांगणे खूप अवघड. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @pandurangkhedkar9240
    @pandurangkhedkar9240 8 หลายเดือนก่อน +12

    नमस्कार सर धन्य ते तुमचे माता पिता त्यांना माझा दंडवत का ते तुमच्या बुद्धीमतेला माझा शेतकऱ्यांचा सलाम शुभ रात्री

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 8 หลายเดือนก่อน +55

    सर तुमची प्रचंड बुद्धीमत्ता व शब्द मांडणी यामुळे प्रत्यक्ष थरारक घटना घडत असल्याची जाणीव होते . ज्यूंची एकता , राष्ट्रभक्ती , धर्म प्रेम समजले . भारतीयानी यातून सर्व आदर्श घ्यायला पाहीजेत .

    • @deshkarkishor
      @deshkarkishor 8 หลายเดือนก่อน +6

      Sir salute to u and your parivar

    • @gopalnaik7274
      @gopalnaik7274 8 หลายเดือนก่อน +3

      Sir hats off you. Wow great.

    • @pawarvijay6328
      @pawarvijay6328 8 หลายเดือนก่อน

      U. 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮. . We 😊 Yes
      Pp

    • @vaishalishindekar7361
      @vaishalishindekar7361 7 หลายเดือนก่อน +1

      P

    • @madhukarkadam6934
      @madhukarkadam6934 7 หลายเดือนก่อน

      Aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa@aaaaaaaaaaaaa

  • @vijaysalve5310
    @vijaysalve5310 8 หลายเดือนก่อน +2

    सर खूप खूप छान माहिती दिली, धन्यवाद अभ्यासपूर्ण माहिती बद्दल 🙏🙏🙏🙏

  • @maheshtribhuvane3988
    @maheshtribhuvane3988 7 หลายเดือนก่อน +3

    To good explanation of story.. commanding approach.. brilliant personality..my spl. salute,, hats off..sir.😅😅😅

  • @vasantraokulkarni4002
    @vasantraokulkarni4002 7 หลายเดือนก่อน

    संपूर्ण व्याख्यान ऐकले. संपूर्ण व्याख्यान थराराचा अनुभवा शिवाय अन्य संवेदना नव्हती.
    खूप खूप धन्यवाद!

  • @amolmd7
    @amolmd7 8 หลายเดือนก่อน +5

    Very informative video 👍 Everyone must listen to this to know recent Israel Hamas conflict

  • @mangeshshewale5946
    @mangeshshewale5946 8 หลายเดือนก่อน +4

    खूप अभ्यासपूर्ण माहिती सर, धन्यवाद

  • @VinayKumar-fj2kg
    @VinayKumar-fj2kg 7 หลายเดือนก่อน +3

    Absolutely fantastic speech Sir. Golda Meir has a statement when she had to deal with such a situation - "They are just unfortunate citizens of Israel. Israel cannot give up for sentiments of people. We need to learn patriotism from them

  • @dr.gajananzadey9160
    @dr.gajananzadey9160 8 หลายเดือนก่อน +2

    Very nice informative speech.thanks to have on you tube

  • @sanjayparanjape1454
    @sanjayparanjape1454 8 หลายเดือนก่อน +7

    अप्रतिम विश्लेषण 👍

  • @santoshkulkarni82
    @santoshkulkarni82 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान वा मुद्देसुर माहिती. एंतंबे ऑपरेशन मधला एक कॅमांडो माझ्या ओळखीचा आहे.

  • @umakantkante6339
    @umakantkante6339 8 หลายเดือนก่อน +21

    What a nice precipitation present in simplified form sir. Salute you sir... 🙏🙏

    • @romykehimkar205
      @romykehimkar205 7 หลายเดือนก่อน

      GREAT OF YOU BHAU NAMASKAR.SALUTE YOU.

  • @gregorydsouza5275
    @gregorydsouza5275 7 หลายเดือนก่อน +4

    Sir very deep study of History You are great sir salute to you Sir

  • @namratagupte625
    @namratagupte625 8 หลายเดือนก่อน +4

    खूप खूप great व्यक्तिमत्त्व 🙏🙏🙏

  • @mandapawar2
    @mandapawar2 8 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan abhyas koti koti pranam🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💪🏿💪🏿💪🏿💪🏿🚩🚩🚩🚩

  • @sadashivsathe2062
    @sadashivsathe2062 7 หลายเดือนก่อน

    अविनाश धर्माधिकारी साहेब.अती उत्तम विषलेक्षण

  • @deshpandesohamshirishviiic5733
    @deshpandesohamshirishviiic5733 7 หลายเดือนก่อน

    खरंच खूप माहितीपूर्ण आणि तंतोतंत माहिती अगदी डोळ्यापुढे सगळं चित्र उभे राहिले .स्वतः अनुभवलं अस वाटतं आहे.भारावून गेले ऐकून.

  • @valerianalmeida2230
    @valerianalmeida2230 7 หลายเดือนก่อน +4

    Big salute sir , just superb

  • @shibupillai6744
    @shibupillai6744 7 หลายเดือนก่อน +2

    Beautiful talk !
    Thanks for this information ! 👍

  • @Master-x-gamerz3310
    @Master-x-gamerz3310 7 หลายเดือนก่อน +2

    How exclent is this... very great sir... proper knowledge..perfect word building .....great intelligence.....

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 8 หลายเดือนก่อน +5

    Super duper explanation 👌 👍 very well 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍 ❤

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 8 หลายเดือนก่อน +2

    शतायुषीाह्वा! असंच सांगत रहा🎉

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 8 หลายเดือนก่อน +1

    सर खरच आपला अभ्यास धन्यवाद. पोपट चव्हाण पिंपरखेड ता आष्टी जी बीड

  • @ganeshbhate7064
    @ganeshbhate7064 8 หลายเดือนก่อน +1

    Khup khup dhanyavad,adhicha mahiti milat rahude.❤❤❤❤❤

  • @ashokdawande9542
    @ashokdawande9542 7 หลายเดือนก่อน +1

    सर, ईद्रायलविषयी फारच सुंदर माहिती दिली ः भारतातल्या विरोधी पक्षांना हे का समजत नाही. अशोक दवंडे, वर्धा.

  • @subhashsawant6329
    @subhashsawant6329 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @bhaskarnayak5764
    @bhaskarnayak5764 7 หลายเดือนก่อน +3

    Excellent well studied well crafted presentations.