ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

भजन शिकू या... सुंदर ते ध्यान उभे विटेवरी.. श्री मिसाळ गुरूजी आळंदी.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ค. 2023
  • सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...
    """"""""""'''''’'’’’''''''''''''’''’''’'’'’'''''''’''''''''''
    सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
    कर कटावरी ठेवुनिया ॥१॥
    तुळसी हार गळा कासे पीतांबर ।
    आवडे निरंतर तेची रूप ॥ध्रु॥
    मकर कुंडले तळपती श्रवणी ।
    कंठी कौस्तुभमणी विराजित ॥
    तुका म्हणे माझे हेची सर्व सुख ।
    पाहीन श्रीमुख आवडीने ॥३॥
    तुळसी हार गळा कासे पीतांबर ।
    आवडे निरंतर तेची रूप ॥ध्रु॥
    *************************************************
    भजन शिकू या...(उद्देश).
    ********************
    या उपक्रमात आम्ही अनेक श्रोत्यांच्या मागणी नुसार शिकवणुकीच्या भजनांची vdo टाकणार आहोत. मित्रहो भजन हा आपल्या जीवनात निर्मळ आनंद देणारा भाग आहे.यातून भगवंताचे स्तवन होते तसेच स्वतः बरोबर इतरांनाही आनंद देता येतो.
    समाजात दोन प्रकारचे गाणारे असतात...*१.उपजत गाणारे *२.शिक्षण घेऊन गाणारे.यापैकी उपजत गाणारे मोठ्या प्रमाणात आहेत.यांना थोडं जरी सांगितलं तर छान भजन होऊ शकते.
    जे लोक शास्त्रीय संगीत शिकलेत त्यांना नोटेशन काढता येते तसेच ते नोटेशन नुसार हार्मोनियम वाजवून भजन म्हणू शकतात, मात्र जे लोक शास्त्रीय संगीत शिकलेले नाहीत आणि उपजत ज्ञानाने हार्मोनियमवर भजन म्हणतात,अशा भजनप्रेमींना वेगवेगळी भजने म्हणताना अडचण येते, तेंव्हा अशा भजनप्रेमींना आपल्या घरीच मोबाईलद्वारा थोडंसं मार्गदर्शन झालं तर भजन अधिक रंजक आणि भावपूर्ण होऊ शकते. असा उद्देश मनात ठेवून साध्या -सोप्या पद्धतीने साधी-सोपी भजने म्हणता येईल,यासाठी आमचा हा प्रयत्न आहे.ज्यांच्यापर्यंत जाणकार पोहचू शकत किंवा जे जाणकारांपर्यंत जाऊ शकत नाहीत,अशांपर्यंत मोबाईल द्वारा पोहचण्याचा हा लहानसा प्रयत्न केला आहे.
    *************************************************

ความคิดเห็น • 166