८८ वर्षांची माझी आई म्हणते हे पीठ वापरले तर अळू वडी कधीच सुटणार नाही | अळू वडी | Alu Vadi Recipe |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2022
  • ८८ वर्षांची माझी आई म्हणते हे पीठ वापरले तर अळू वडी कधीच सुटणार नाही | अळू वडी | Alu Vadi Recipe |
    चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
    / vaishalideshpande
    Please subscribe to our channel for more videos
    #vaishalideshpande #aluvadi #अळूवडी #aluvadirecipe #aluvadirecipemarathi #breakfastrecipe #वैशाली #वैशालीदेशपांडे #अळूच्यापानांचीवडी #patra #patrarecipe
    Maharashtrat Alu Vadi ha paramparik padarth ahe.Aluchya pannancha wapar karun Alu Vadi keli jate. Aaj aapan hi Alu Vadi banwanar ahot. 88 vardhanchi mazi aai ya Alu Vadya sadhya sopya paddhatine kashya karayachya tr ya video madhr sanganar ahe.
    महाराष्ट्रात अळू वडी हा पारंपरिक पदार्थ आहे.
    अळूच्या पानांचा वापर करून अळू वडी केली जाते. अळू वडी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. आज आपणही अळू वडी बनवणार आहोत. ८८ वर्षांची माझी आई या अळू वड्या साध्या सोप्या पद्धतीने कशा करायच्या ते या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे.
    अळू वडी साहित्य आणि प्रमाण :
    (मध्यम आकाराच्या २७ वड्या)
    १० अळू पाने काळ्या देठांची
    १/४ कप चिंच
    १ कप + २ टेबलस्पून पाणी
    १ टीस्पून तीळ
    १ टीस्पून ओवा
    १ टीस्पून धने पावडर
    १ टीस्पून जीरे पावडर
    २ टीस्पून दाण्यांचा कूट
    १/४ टीस्पून हिंग
    १ टीस्पून हळद
    ३ टीस्पून तिखट
    ४ टीस्पून काळा / गोडा मसाला
    १५ टेबलस्पून डाळीचे पीठ
    ४ टेबलस्पून तांदूळ पीठ
    २ टेबलस्पून गहू पीठ
    ४ टेबलस्पून गूळ पावडर
    ३ टेबलस्पून तेल
    मीठ चवीनुसार
    Alu Vadi is a traditional dish in Maharashtra. It is made from leaves of Alu. Today, we are going to make Alu Vadi. In the video, my 88-year-old mother is going to explain how to make this delicious dish in the simplest way.
    Alu Vadi Ingredients and Quantity: (27 Alu Vadis of medium size)
    10 Alu leaves with black stalk
    1/4 cup tamrind
    1 cup + 2 tablespoons water
    1 tea spoon sesame seeds
    1 tea spoon celery seeds
    1 tea spoon coriander powder
    1 tea spoon cumin powder
    2 teaspoons of crushed peanuts
    1/4 tea spoon asafoetida
    1 tea spoon turmeric
    3 tea spoon chili powder
    4 tea spoon black/sweet masala
    15 tablespoons of dal flour
    4 tablespoons of rice flour
    2 tablespoons wheat flour
    4 tablespoons jaggery powder
    3 tablespoons oil
    Salt as per taste requirement
    Topics Covered :
    alu vadi
    alu vadi recipe
    alu vadi recipe in marathi
    alu vadi recipe from leaves
    alu vadi recipe Vaishali
    marathi padartha
    traditional recipe
    अळू वडी
    अळू वडी रेसिपी
    अळू वडी रेसिपी मराठी
    अळूच्या पानांची वडी
    आळू वडी
    आळू वडी रेसिपी
    आळू वडी रेसिपी मराठी
  • แนวปฏิบัติและการใช้ชีวิต

ความคิดเห็น • 552

  • @archanadahale7483
    @archanadahale7483 10 วันที่ผ่านมา +4

    वैशाली ताई खूप छान आहे तुमची आई प्रमाने बोलतात.

  • @sheetaljadhav9513
    @sheetaljadhav9513 ปีที่แล้ว +16

    अतिशय सुंदर वैशाली ताई
    आईंकडे बघून फार कौतुक वाटले
    त्यांना परमेश्वर दिर्घायुष्य देओ 🙏

  • @rohinibhonsle7962
    @rohinibhonsle7962 9 วันที่ผ่านมา +2

    या वयात फारच सुंदर आळवाडी तयार झाली आभारी आहे❤❤❤

  • @anjaliscorner8223
    @anjaliscorner8223 ปีที่แล้ว +6

    Hat's of काकु तुमचा या वयात उत्साह बघून खूप छान वाटते वैशाली ताई काकु ना असेच निरोगी आयुष्य लाभो ही ईशवरचरणी प्रार्थना

  • @priyajoshi7723
    @priyajoshi7723 ปีที่แล้ว +4

    फारच छान पद्धधतीने सांगितली कृती वैशालिताई तुमच्या आईने फारच सुंदर

  • @GeetaPhadke
    @GeetaPhadke 8 วันที่ผ่านมา +1

    The great... खरेच. Vashali Tai tumhi khup lucky ahat... Ashi आईं तुम्हाला दीर्घकाळ लाभली आहे... त्यांचा सहवास तुम्हाला असा च भरपूर लाभुदे.हीच प्रार्थना.

  • @manishadeshpande4431
    @manishadeshpande4431 ปีที่แล้ว +11

    खूप छान पद्धतीने सांगितले ताई , व काकूंचे खूप कौतुक वाटले या वयात सुद्धा इतका उत्साह ...नमस्कार🙏

  • @snehankitabhosale3676
    @snehankitabhosale3676 ปีที่แล้ว +5

    आजीनां खूप खूप धन्यवाद 🙏🏻 खूप छान आणि अगदी सर्वांना करता येतील इतक्या सोप्या पद्धतीने अळुवडीची रेसिपी सविस्तरपणे सांगितली, आजींना दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻😊

  • @rohinigokhale2099
    @rohinigokhale2099 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार आजी.. खूपच छान पद्धतीने सगळं सविस्तर सांगितले
    त.. नक्की करून बघू

  • @mitalibane8991
    @mitalibane8991 ปีที่แล้ว +5

    हा vedio बघताना खूप भरून आले. त्यांच्या कडून करवून घेतानाची पद्धत खूपच छान आहे. दोघांमधील संवाद ऐकताना माय लेकितील अतूट नात्याचा परिचय आला डोळ्यात पाणी आले. माझ्या आईची आठवण झाली. हा video मी फक्त माय लेकितील नात्याचा उत्तम नमुना म्हणून पाहते/ऐकते.रेसिपीकडेलक्ष कमी आणि संवादाकडे जास्त लक्ष. सद्यस्थितीत वृद्धांशी कसे वागावे त्यांना समजून घेणे व त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी काय करावे याचा उत्तम नमुना म्हणजे हा vedio आहे. प्रत्येकाला पाहिलाच पाहिजे.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  ปีที่แล้ว

      🙏

    • @chitramalkhare716
      @chitramalkhare716 ปีที่แล้ว

      @@VaishaliDeshpande Chitra Malkhare. Vaishalitai alu vadi recipe khup chhan. tumha doghincha sanvad mastch.

  • @shailavirkar9062
    @shailavirkar9062 6 หลายเดือนก่อน +1

    तुम्हा दोघींचीही सांगण्याची आणि समजवण्याची पद्धत अतिशय श्रवणीय आणि सुंदर 👌👌👍👍🙏🙏धन्यवाद 🙏

  • @vinitapatwardhan3219
    @vinitapatwardhan3219 ปีที่แล้ว +5

    खूप छान! वडीसाठी पानाचा रोल करण्याची पद्धत फार आवडली 👌👍

  • @ShamalPuranik-uu2zk
    @ShamalPuranik-uu2zk 14 วันที่ผ่านมา +1

    हो खुपच छान दाखवले मी आजच केली अळुवडी आणि नंतर हा विडीओ बघितला पण हरकत नाही दुसऱ्या वेळेस नक्की या पद्धतीने करून बघेन धन्यवाद काकु आणि ताई

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  14 วันที่ผ่านมา

      धन्यवाद शामल ताई

  • @sangeetakhale1937
    @sangeetakhale1937 ปีที่แล้ว +1

    वैशाली ताई व आईंचे खूप आभार ! अप्रतिम रेसिपी !

  • @sudhirtalegaonkar6627
    @sudhirtalegaonkar6627 4 วันที่ผ่านมา

    आई ना नमस्कार।।।
    एकदम अप्रतिम रेसिपी दाखवली आहे ।
    धन्यवाद

  • @yatinghatkar4198
    @yatinghatkar4198 4 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर रेसीपी आहे,ताई तुमच्या आई साक्षात अन्नपूर्णा देवी आहेत,अगदी सुरेख पदार्थ करण्याचा त्यांचा हातखंडा आहे, ह्याला तोड नाही शेवटी एवढ्या वर्षांचा त्याचा स्वयंपाक घरातला अनुभव दांडगा आहे,

  • @ujwalaabhyankar7651
    @ujwalaabhyankar7651 12 วันที่ผ่านมา

    आजींना🙏.काय उत्साह ,तो बघून फार छान वाटल.वडी करण्याची ही पध्दत आणि तुमच बोलण दोन्ही छान आहे.असेच जुन्या जाणत्या लोकांच्या रेसिपीज आणि टीप दुर्मिळ झालय.अशाच पारंपरिक पदार्थ घेऊन भेटाल अशी आशा करते.धन्यवाद.

  • @atuldeshmukh1440
    @atuldeshmukh1440 ปีที่แล้ว +4

    वडी गुंडाळण्याची पद्धत खूप छान वाटली. त्यामुळे पीठ कडेने बाहेर आलं नाही. आजी खरंच great आहेत. उत्साहाने खूप बारकावे सांगितले...तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजींना नमस्कार कळवा🙏....मिसेस देशमुख

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @shraddhadeshingkar1058
      @shraddhadeshingkar1058 ปีที่แล้ว

      हो वडी गुंडाळण्याची पद्धत परफेक्ट आहे.

  • @kamalkamble5355
    @kamalkamble5355 6 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान वड्यांची रेसिपी झाली ... वैशाली.. आई चा ह्या वयात एवढा उत्साह आहे , खूपच शिकण्या सारखे आहे..... आईचं खूप,खूप आभार आई... धन्यवाद ....💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @meenabhosale5226
    @meenabhosale5226 5 หลายเดือนก่อน +1

    आई तुम्ही या वया मध्ये सुद्धा कीती उत्सुक आहेत कीती छान अळु वडी बनवली 😊 खुप छान माहिती सांगितली 🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद आई ताई खुप छान आई सोबत शेअर करत आहे आभारी आहे

  • @vidyavatinair6327
    @vidyavatinair6327 ปีที่แล้ว +5

    God Bless your mother and you also for your excellence in preparation of delicious dishes 🙏

  • @mrshantanu9751
    @mrshantanu9751 ปีที่แล้ว +1

    वैशाली ताई hats off आई च्या एवढ्या वयात खुप सूंदर आता अस्या रेसिपी पाहायला मिलत नाही

  • @shalinijogdeo6682
    @shalinijogdeo6682 9 วันที่ผ่านมา

    आजी पाहूनच दिसते छान झाल्या आहेत. तुमच्या उत्साहाला नमस्कार🎉

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 ปีที่แล้ว +6

    खुपच छान 👌 अळुवडी आणि आई खुप छान उत्साही आईला धन्यवाद आणि नमस्कार, नमस्कार, नमस्कार...🌹🙏🙏🙏शुभेच्छा आणि दंडवत.

  • @nilimabangar7530
    @nilimabangar7530 ปีที่แล้ว +2

    Aai आणि मुलीचा संवाद खूपच छान.रेसिपी आवडली

  • @mukundphanasalkar3887
    @mukundphanasalkar3887 11 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान! आणि मायलेकींमधला संवादही खूप हृद्य आहे! मला मी माझ्या आईशी तिच्या शेवटच्या आजारपणात वगैरे बोलायचो त्याची आठवण झाली. तुमच्या आवाजात व्यक्त होणारी आत्मीयता आणि त्यांच्या वयोमानानुसार वाटणारी त्यांची काळजी जाणवते, तीही फार छान आहे...

  • @arunasapkale7073
    @arunasapkale7073 ปีที่แล้ว +1

    आजीचा या वयातला उत्साह खरचं दांडगा आहे. खूपच सुगरण आहे.त्यांना साष्टांग दंडवत.

  • @lilyhatiskar1246
    @lilyhatiskar1246 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर अप्रतिम 👌👍

  • @bhagwanjoshi2112
    @bhagwanjoshi2112 ปีที่แล้ว

    वैशाली ताई तुमच्या रेसिपी खूप खूप छान असतात मी त्या डाऊन लोड करुन ठेवते

  • @bhaiyyasalve1810
    @bhaiyyasalve1810 ปีที่แล้ว

    खुप छान वड्या झाल्यात फार चवीष्ट सांगीतल्या बदल धन्यवाद आजी

  • @shivalipatil4338
    @shivalipatil4338 ปีที่แล้ว +2

    आईना नमस्कार खूप छान दोघींचा बोलणे आवाज गोड

  • @archanagawade9551
    @archanagawade9551 ปีที่แล้ว +2

    रेसिपी सांगण्याची पद्धत खूप आवडली.

  • @shyamalashetti7105
    @shyamalashetti7105 ปีที่แล้ว +1

    खुप छान पद्धतीने समजावून सांगितले.

  • @deepalisohani9728
    @deepalisohani9728 ปีที่แล้ว

    वाह खूप छान रेसिपी समजाऊन सांगितली आहे आणि आजीना नंमस्कार

  • @mugdhamalvankar1763
    @mugdhamalvankar1763 ปีที่แล้ว

    खूप छान व उपयुक्त माहिती. अनुभवी व्यक्ती चे मार्गदर्शन व लहान बारकावे खूप उपयुक्त ठरतात मला पण अळूवडी छान बनवता येत नव्हती ।आता मी प्रयत्न करीन। दोघींचे आभार व आईला व आपल्याला उदंड आयुष्य लाभो ही प्रार्थना

  • @sanmanchavan7565
    @sanmanchavan7565 ปีที่แล้ว

    Aprateem recipie aaina thsnks

  • @chetanpai8150
    @chetanpai8150 21 วันที่ผ่านมา

    Apart from energy of Aai, her innocent character , (which is lost after this generation ) and so loving conversation by daughter to mother. Is amazing. माझा दोघानाही आदर्पुर्वक् नमस्कार् . चेतन् पै

  • @chayatarapurkar4082
    @chayatarapurkar4082 ปีที่แล้ว

    खुप खुप खुप छान आजी धन्यवाद रेसिपी छान सांगितली

  • @praganashah8177
    @praganashah8177 ปีที่แล้ว +2

    खूप छान आणि अगदी व्यवस्थित माहिती पण सांगितली.खूप मधुर आवाजात शांत पणे आणि संयमाने..,धन्यवाद🙏

  • @ujwalaraje7250
    @ujwalaraje7250 ปีที่แล้ว +1

    वड्या करायची पद्धत तुमच्या आईने खूप छान करून दाखवले त्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा ,

  • @manjushadudhane4727
    @manjushadudhane4727 ปีที่แล้ว +15

    खूप छान. या वयातही व्यवस्थित काम करण्याची पद्धत पाहून नवल वाटते. 👍👌🏽🙏

  • @meenalkandharkar3579
    @meenalkandharkar3579 11 หลายเดือนก่อน +1

    आई ना नमस्कार खूपच छान सांगितले धन्यवाद .

  • @sangeetahanamshet1241
    @sangeetahanamshet1241 11 หลายเดือนก่อน

    आईंनी खूप छान पद्धतीने अळू वडी बांधायला शिकवलं आहे आता करताना अशाप्रकारे करेन, छान घट्ट बांधली गेली, धन्यवाद ❤

  • @sarojkasote2000
    @sarojkasote2000 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आहे,घरी करणार, धन्यवाद,

  • @manjushakedari8696
    @manjushakedari8696 11 วันที่ผ่านมา

    आजीनीं खुप छान आळु वडी करून दाखवली आहे या वयात खुपचं कमाल आहे. ❤❤

  • @sonalibhise1814
    @sonalibhise1814 9 หลายเดือนก่อน

    रेसिपी छानच समजून सांगितली
    धन्यवाद आजी आणि ताई

  • @rajanivader6191
    @rajanivader6191 ปีที่แล้ว

    Masth vadya.mouth watering.

  • @sangeetadalvi32
    @sangeetadalvi32 ปีที่แล้ว +4

    किती सुंदर केल्या आहेत वड्या. आईना नमस्कार.त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो.

    • @sangeetakarande7080
      @sangeetakarande7080 ปีที่แล้ว

      Sz, the first one was in s a day is in e eeeeeee indkujkm eeeee week weeeeeeeeeeee w a

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 11 หลายเดือนก่อน

    खुपच छान झाल्या आहेत आळूवड्या.आजींना नमस्कार. खुप उत्साहाने त्या सर्व पदार्थ करतात तसेच त्याबद्दल ची माहिती सांगतात.आळूच्या पानावरून लाटणे फिरवुन घेतले तरी चालते.धन्यवाद.

  • @balkrushnaraut9898
    @balkrushnaraut9898 ปีที่แล้ว

    फारच सुंदर आळू वड्या वआई,मुलीचा संवाद.👌

  • @dadasahebnalawade4914
    @dadasahebnalawade4914 ปีที่แล้ว

    आजीने फारच छान पध्द्तीने आळु वडी करावयास शिकवली आहे आजीचे मनापासून आभार.

  • @chaskarmukund
    @chaskarmukund หลายเดือนก่อน

    मी करून पाहिल्या ताई ,फारच छान झाल्या.आजिना खूप धन्यवाद! आणि तुम्हाला सुध्दा!

  • @kundapawaskar4983
    @kundapawaskar4983 10 หลายเดือนก่อน

    खूप च सुंदर आणि झटपट होणारी रेसिपी, गव्हाच्या पिठाचा वापर केल्यामुळे वडी खूप छान झाली आईंना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 ปีที่แล้ว

    फारच स्वादिष्ट वाटते।

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 ปีที่แล้ว +2

    खुप छान रेसिपी आजी👌👌👌

  • @smitajadhav5874
    @smitajadhav5874 4 หลายเดือนก่อน

    खुपच छान अळुवडी आवडली रेसिपी छान समजावून सांगितले ट्राय करीन 👌👌

  • @vinayabapat7101
    @vinayabapat7101 ปีที่แล้ว +1

    खूप छान रेसिपी.आजींना नमस्कार.

  • @sunitabapat376
    @sunitabapat376 ปีที่แล้ว

    आजी वड्या खूपच छान झाल्या आहेत तुमचा उत्साह पाहून कौतुक वाटतं तुमचा रेसिपी फार छान असतात

  • @sujataaukirkar4608
    @sujataaukirkar4608 ปีที่แล้ว

    छान टीप्स सांगितल्या काकी मस्तच 👌👍

  • @DaisyDaniel01
    @DaisyDaniel01 ปีที่แล้ว +2

    Superb!!!

  • @sangeetpremi55
    @sangeetpremi55 ปีที่แล้ว

    खूप छान zalya आहे आलू vadi एकदम मस्त

  • @bharatibhide9281
    @bharatibhide9281 ปีที่แล้ว +2

    Khupch chhan 👌🙏 kaku

  • @madhavighag7826
    @madhavighag7826 10 หลายเดือนก่อน

    खूप छन झंकान ठेऊ लुवक्सय शॅलो फराह कर नयची कल्पना आवडली

  • @swatimhatre1001
    @swatimhatre1001 ปีที่แล้ว +4

    Apratim aluvadi👌👌👌👌
    Aaina 🙏

  • @hrk3212
    @hrk3212 11 หลายเดือนก่อน

    खूप छान आणि तुम्ही तिघी खूप छान recipes दाखवतात.

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 9 หลายเดือนก่อน +1

    Wa.khupach mast❤❤

  • @aryangupte
    @aryangupte ปีที่แล้ว

    आजींनी वड्या न सुट्याण्यासाठी छान टीप दिली आहे
    धन्यवाद आजींना 🙏

  • @meeraitraj1848
    @meeraitraj1848 ปีที่แล้ว

    खूप छान दिसतायत वड्या
    खमंग पण असतील नक्की करून बघेन

  • @ashwinidiwekar2227
    @ashwinidiwekar2227 9 วันที่ผ่านมา

    आपली अळू वडी करायची पद्धत मला आवडली,,, मी नक्की करून बघेन

  • @chandaranikhandare3105
    @chandaranikhandare3105 ปีที่แล้ว

    Alu. Wadi..👌wa. Wa. Wa. 👌mustch🎉👍🎉❤️

  • @sheelagujale2261
    @sheelagujale2261 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती आहे

  • @colourful12300
    @colourful12300 ปีที่แล้ว +5

    अगदी निगुतीने केली अळु वडी भारी🙏😍

  • @rajanigiradkar2287
    @rajanigiradkar2287 ปีที่แล้ว +2

    खूप छान ❣️आईला नमस्कार

  • @meenaCholkar
    @meenaCholkar 10 หลายเดือนก่อน +1

    Mam aaji has shown us this rec very nicely.we need lot of patience to do all this.aaji is very great.may god bless her.we must kearn from her.thanku aaji

  • @urmilagirase9887
    @urmilagirase9887 19 วันที่ผ่านมา

    अतिशय उत्तम मार्गदर्शन केले आजिनीं आळुवळी रेसिपी खूप छान लाख लाख धन्यवाद आजि आणि ताई तुम्ही सुद्धा आईंना रेसिपी लाख मदत केली गोंड शब्दात मार्गदर्शन केले तूंम्हाला पण खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏💐💐💗💗🌹🌹👌👍💯

  • @shailakotwal4824
    @shailakotwal4824 11 หลายเดือนก่อน

    Khup chhaan explain kele aahe. Aajina maza namaskar

  • @prajaktapalsule7139
    @prajaktapalsule7139 ปีที่แล้ว

    Khupch chan aaji

  • @shubhanginerlekar9971
    @shubhanginerlekar9971 ปีที่แล้ว +119

    आईंचा या वयातला उत्साह आणि ऊर्जा थक्क करणारी आहे. त्यांचे आरोग्य उत्तम राहो हीच प्रार्थना.वैशाली ताई तुमच्या सासूबाई आणि आई दोघीही आम्हाला खूप आवडतात.God bless them

  • @taheraansari7837
    @taheraansari7837 ปีที่แล้ว

    Khupach chhan

  • @zensalonandacademy....
    @zensalonandacademy.... ปีที่แล้ว +3

    Proud of you aai , chakli recipe खूप मस्त आहे , मी ट्राय केली🙏🙏🙏

  • @aparnasawant9713
    @aparnasawant9713 ปีที่แล้ว

    खूप छान काकूंमुळे नवीन ट्रीक कळाली धन्यवाद.

  • @ranjanahande5176
    @ranjanahande5176 ปีที่แล้ว

    khupch chhan

  • @svr463
    @svr463 ปีที่แล้ว

    आजी खूप छान वड्या शिकवल्या.
    धन्यवाद. ❤

  • @ashwinimudigonda2146
    @ashwinimudigonda2146 ปีที่แล้ว

    Khup chan 👌🏻👌🏻👌🏻

  • @savitakalokhe9289
    @savitakalokhe9289 ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @yogeetapatil8116
    @yogeetapatil8116 ปีที่แล้ว

    खूपच छान रेसिपी दाखवलित ताई

  • @sumedhadikshit8523
    @sumedhadikshit8523 ปีที่แล้ว

    Vadi gundalanyachi padhat khupch Chan. Aajina 🙏🙏

  • @gurunathkumbhar808
    @gurunathkumbhar808 8 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर वैशालीताई खींचे बार कौतूक

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 ปีที่แล้ว +2

    खुप छान अळु वडी 👌👌

  • @savitasalve921
    @savitasalve921 ปีที่แล้ว +2

    💞appreciate mum .yummy 😊God bless both of U 🙏

    • @jyotipawade4539
      @jyotipawade4539 ปีที่แล้ว

      अळुच फदफदा कसा करतात ते सांगा. देठाची कोशिंबीर ही कल्पना फारच छान.

  • @dhanashrideshpande1685
    @dhanashrideshpande1685 11 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती सांगितली

  • @mdlk602
    @mdlk602 ปีที่แล้ว +1

    मस्त अळूवडी 👌 आईंना 🙏

  • @arunadesai6879
    @arunadesai6879 ปีที่แล้ว +14

    वैशालिताई प्रथम तुमचया आईला नमसकार अळुवडया सोपया पदधतीने दाखवलया आवडलया शिकवताना तुमही गोड शबदात शिकवता😊🙏

  • @oldsongshindi5501
    @oldsongshindi5501 14 วันที่ผ่านมา

    खूप छान आईला बघितल्यावर माझी आई आठवली.तुम्हाला आईचा सहवास भरपूर लाभो.❤सौ शुभांगी देसाई

  • @neetagawade4461
    @neetagawade4461 ปีที่แล้ว

    धन्यवाद आजी

  • @reshmadeshmukh5350
    @reshmadeshmukh5350 11 หลายเดือนก่อน

    Tai khupch chan dakhaval mi aata aasch karun baghen thankyou aai❤

  • @dipaksawant4376
    @dipaksawant4376 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम.

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @arunaphatak880
    @arunaphatak880 10 หลายเดือนก่อน +1

    अळूवडया अतिशय सुंदर झालेल्या दिसत आहेत. खूप खूप धन्यवाद मावशी..❤🎉🎉😂😊

  • @SuhasJoshi-nm6ov
    @SuhasJoshi-nm6ov 11 หลายเดือนก่อน

    Atishy sunder