#अनामप्रेम

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • अनामप्रेम -सत्यमेव जयते ग्राम ,निंबाळक येथे मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन.
    **********************************************
    #अनामप्रेम#गणेशोस्तवानिमित्त आवाहन.
    #गणेशोत्सवात अनामप्रेम संस्थेला द्या मदतीचा हात*
    अहमदनगर, दिनांक 16/09/2023
    गणेशोत्सवानिमित्ताने अनामप्रेम संस्थेस अन्नदानाचे आवाहन करण्यात आले आहे. समाजातील प्रत्येक दिव्यांग हा दयेच्या भावनेने न जगता त्याला स्वाभिमानाचे जगणे मिळावे या भावनेने अनामप्रेम संस्था 300 शे दिव्यांग व कार्यकर्ते अशा परिवाराचे संगोपन करीत आहे. केवळ समाज सहयोगावर चालणाऱ्या या सेवाकामाला आपल्या मदतीची आवश्यकता आहे.
    अनामप्रेम नगर , पुणे व छ. संभाजी नगर (औरंगाबाद) जिल्ह्यात दिव्यांग पुर्नवसनाचे काम करीत आहे. मागील 18 वर्षांपासून अंध-अपंग-मूकबधिर-अस्थिव्यंग मुला-मुलींच्या शिक्षण-प्रशिक्षण-रोजगार-पुनर्वसन या उद्दिष्टे पूर्ती साठी अनामप्रेम संस्था काम करते.कोणतेही सरकारी अनुदान नसताना केवळ लोकांच्या मदतीवर अनामप्रेम संस्थेचे काम सुरू आहे.
    अनामप्रेम संस्थेचे नगर,निंबळक,पुणे येथे प्रकल्प आहेत. दिव्यांग मुला-मुलींसाठी हॉस्टेल,जॉब ट्रेनिंग सेंटर,शाळा,प्रशिक्षण केंद्र,शेती , उद्योग केंद्र असे निवासी स्वरूपाचे संस्थेचे सेवाकाम आहे.
    आज संस्थेत 300+ लाभार्थी गट निवासी आहे. अनामप्रेम च्या माध्यमातून 2000 दिव्यांग मुले-मुली शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत. 150 दिव्यांग मुले-मुली सरकारी नोकरीत आहेत. 1500 पेक्षा जास्त दिव्यांग खाजगी कंपनी उद्योग क्षेत्रात आहेत. आजवर संस्थेने 40 हुन अधिक दिव्यांग यांचे विवाह लावले आहेत. केवळ लोक सहयोगावर संस्थेचे हे सेवाकाम सुरू आहे.
    महाराष्ट्र राज्यातून शिक्षणासाठी असंख्य दिव्यांग मुले नगर- पुणे येथे येतात. दिव्यांगत्व, घरची गरीबी, अशिक्षित पालक यामुळे अनंत अडचणी या दिव्यांगांना येतात. रोजगारच्या वाटा दिव्यांग यांना संस्थेच्या माध्यमातून मिळत आहेत. जीवनातील शिक्षणाची संधी व महत्त्व दिव्यांग यांना समजले तर अतिशय मोठी क्रांती दिव्यांग पुर्नवसन विषयात होऊ शकते, यासाठी आम्ही कार्यरत आहोत. केवळ सामाजिक भावना व तळमळ हृदयी ठेवून अनामप्रेम संस्थेचे सेवाकाम सुरु आहे.
    #सेवादान मासिक सत्कार्य*
    अनामप्रेम च्या सेवादान योजनेचा आपण फॉर्म भरून मासिक ठराविक रक्कम संस्थेच्या दैनंदिन खर्चास देऊ शकता. यथाशक्ती कितीही रक्कम आपण संस्थेस देणगी म्हणून देऊ शकता. यासाठी संस्थेने एक फॉर्म बनवला आहे. तो आपण स्वेच्छेने भरून दर महिन्याला आर्थिक मदत संस्थेला करू शकता.
    #ऑर्केस्ट्रा चे आयोजन*
    अनामप्रेम संस्थेचा दिव्यांग मुलांनी बनवलेला ऑर्केस्ट्रा म्हणजे सामाजिक प्रबोधन आहे. भक्तीगीत,भावगीत,चित्रपट गीत, लावण्या आदींचे सादरीकरण ही अंध-दिव्यांग कलाकार करतात. आपण आपल्या कॉलनीत, गणेश तरुण मंडळात या संगीत मंच ला निमंत्रण देऊन संस्थेच्या कार्याला मदत करू शकता.
    #स्क्रॅप बँक ला सहयोग*
    अनामप्रेम संस्थेच्या कामास आपण घरातील पेपर रद्दी, कपडे,स्क्रॅप,वापरयोग्य वस्तू देणगी स्वरूपात देऊ शकता. या सर्व वस्तूंचे संकलन संस्थेमार्फत केले जाते. या स्क्रॅप च्या विक्रीतून अनामप्रेम संस्थेच्या भोजनालय करिता किराणा साहित्य,स्वयंपाक गॅस यांचा खर्च भागवला जातो. आपण संस्थेला मदत करण्यासाठी आजचे आपले स्क्रॅप देणगी स्वरूपात देऊ शकता.
    #अन्नदाते- आधारस्तंभ*
    अनामप्रेम संस्थेला मासिक खर्च 12 ते 15 लक्ष रुपये येतो.संस्थेचे 4 प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग यांना आधार आहेत. आपण अनामप्रेम संस्थेला वाढदिवस व स्मृतिदिन निमित्ताने अन्नदान तिथी बुक करून दिव्यांग यांना जेवण देऊ शकता. अन्नदान देणारे दाते संस्थेला हवे आहेत. संस्थेला आर्थिक मदत देण्यासाठी 9011020174/9011918786/
    7350013801/9011670123 संपर्क करावा,
    -------------------------------------------------------------------
    #anamprem
    अधिक माहितीसाठी संपर्क ....👇
    उमेश सर Mo+ 9011670123
    विष्णू सर Mo+ 9766259581
    पत्ता:-👉 अनामप्रेम, गांधी मैदान,स्नेहालय भवन मागे,अहमदनगर
    --------------------------------------------------------------------
    Like👍share🤝, if you like the video And
    subscribe🔴,and hit the bell icon🔔
    --------------------------------------------------------------------
    👇Description👇
    Anamprem is a branch of the parent organization Snehalaya established in the year 2005 in Ahmednagar district. A team of dedicated and responsible citizens of Ahmednagar realized a need for a centre to address the needs of the differently abled from nearby areas, including the rural areas, as they were forced into beggary due to lack of education facilities as well as employment facilities. Thus, started the journey of Anamprem. Anamprem came forward to help bring the differently abled at par with society and to make society more sensitive towards the needs of their differently abled brothers and sisters. Since its inception, Anamprem has never received any government support and relies on private donors. Also, Anamprem never charges any of it's beneficiaries.ANAMPREM ORGANIZATION

ความคิดเห็น • 1