आषाढी एकादशी निमित्ताने भक्तिमय वातावरणात दिव्यांगांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #anamprem_organization #Ganeshgund #snehalaya
    आषाढी एकादशी निमित्ताने अनामप्रेमच्या सत्यमेव जयते ग्राम प्रकल्पात भक्तिमय वातावरणात दिव्यांगांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न...
    अखंड संत संस्कृतीचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्र भूमीत आषाढी वारी म्हणजे एक आनंदाचा आणि श्री विठुरायाच्या भक्ती भावाचा एक भव्य दिव्य सोहळा असतो, आणि हाच भव्य-दिव्य सोहळा आज अनामप्रेमच्या सत्यमेव जयते ग्राम प्रकल्पात पहावयास मिळाला.
    अनामप्रेम संचलित गौरांग अभिनव शाळेच्या लहान दिव्यांग बालकांसह प्रकल्पातील सर्व लहान-मोठे दिव्यांग वारकरी दिंडीत सहभागी होऊन पांडुरंगाच्या भक्तीत लीन होऊ गेले होते.
    या दिंडीत लिंगतीर्थ मंदिर, निंबळक येथील वारकरी संप्रदायाचे विठ्ठलभक्त देखील सहभागी झाली होते. टाळ मृदुंगाच्या गजरात विठुरायाचा गजर करत प्रकल्पाच्या परिसरात दिंडीची मिरवणूक काढण्यात आली.
    श्री विठ्ठलाची वेशभूषा साकारणारा गौरंग अभिनव शाळेचा अंध विद्यार्थी तेजस डोळझाके व रुक्मिणीची वेषभूषा साकारणारी गौरांग शाळेची अंध मुलगी गौरी अरगडे हे दिंडीचे प्रमुख आकर्षण होते.
    शाळेच्या मैदानात सर्व विद्यार्थ्यांनी रिंगण करून त्यांच्यातील अंध, अस्थिव्यंग व मूकबधिर गटातील विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील कलेचे सादरीकरण केले. यावेळी फुगडी, डान्स, गायन व भजन अशा विविध कलांचे सादरीकरण करण्यात आले.
    यावेळी अनामप्रेम संचलित प्रकाशगान संगीत रजनी मंचची टीम देखील उपस्थित होती. त्यांच्या भजनाने सर्व परिसर भक्तीमय झाला होता. तसेच उपस्थित मान्यवर व भक्तगण देखील मंत्रमुग्ध झाले होते.
    कार्यक्रमाच्या शेवटी लिंगतीर्थ संस्थान येथून आलेल्या सर्व वारकऱ्यांचा अनामप्रेम संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
    हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळा टीम सोबतच ग्राम टीम यांनी सुद्धा विशेष परिश्रम घेतले.
    सर्व उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते, वारकरी व विद्यार्थ्यांना यावेळी फळ वाटप व फराळ देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
    अधिक माहितीसाठी .............👇
    संपर्क: 9011670123, 9011004576, 7350517778.
    पत्ता:-👉 अनामप्रेम, गांधी मैदान,स्नेहालय भवन मागे,अहमदनगर
    --------------------------------------------------------------------
    👇आमच्याशी बोला 👇
    ☑️Website -
    www.anamprem.gon
    ☑️TH-cam-
    / @anampremorganization
    ☑️Iinstagram
    www.instagram....
    ☑️Facebook
    www.facebook.c...
    -----------------------------------------------------------------------
    Like👍share🤝, if you like the video And
    subscribe🔴,and hit the bell icon🔔
    --------------------------------------------------------------------
    👇Description👇
    Anamprem is a branch of the parent organization Snehalaya established in the year 2005 in Ahmednagar district. A team of dedicated and responsible citizens of Ahmednagar realized a need for a centre to address the needs of the differently abled from nearby areas, including the rural areas, as they were forced into beggary due to lack of education facilities as well as employment facilities. Thus, started the journey of Anamprem. Anamprem came forward to help bring the differently abled at par with society and to make society more sensitive towards the needs of their differently abled brothers and sisters. Since its inception, Anamprem has never received any government support and relies on private donors. Also, Anamprem never charges any of it's beneficiaries.ANAMPREM ORGANIZATION

ความคิดเห็น •