वाघनख
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025
- वाघनख : एक अभ्यास
'वाघनख' श्री शिवरायांनी अफजलखान महंमदशाही या आदिलशाही सेनापतीचा कोथळा ज्या शस्त्राने बाहेर काढला ते लेजेंडरी शस्त्र! खान म्हणजे शरीराने धिप्पाड, अजस्त्र.तत्कालीन जगातील एक विख्यात सेनानायक,अनेक लढाया जिंकणारा, प्रचंड शारीरिक सामर्थ्य असणारा, बुद्धीने कझाक आणि कपटी अशा खानाला समोरासमोरच्या द्वंदयुद्धात श्री शिवरायांनी धूळ चारली. खान मारला तो या वाघनखासारख्या लहानशस्त्राने. शिवरायांना वाघनखासारखे शस्त्र यावेळी वापरण्याचे सुचले यातच त्यांची महानता सामावली आहे. योग्य वेळी अचूक शास्त्राची निवड हा तर शिवरायांचा हातखंडा!
अफजलखानाचा खात्मा करणारी वाघनख सध्या खूप गाजत आहेत. महाराष्ट्र शासन हे लंडनच्या संग्रहालयात असणारे वाघनख परत आणण्याचा मोठा इव्हेंट करत आहे. व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात असणारी ही वाघनख श्री शिवरायांनी अफजलखान वधावेळी वापरलेलीच वाघनख आहेत का? तर त्याचे स्पष्ट उत्तर आहे - "नाही!"
तर ही वाघनखं तिथे कशी गेली याचा मागोवा घेणारा एक निबंध मी तब्बल पंधरा सोळा वर्षांपूर्वीच लिहिला होता. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी ही वाघनखं भारतात परत आणणार अशी घोषणा केल्यानंतर मला अनेक मित्रांकडून या वाघनख बाबतची माहिती विचारली जात आहे. खरंतर मी या विषयावर काही व्हिडिओ ही केले आहेत; अशाच पैकी हि एक मुलाखत.
आता भारतात परत येणाऱ्या वाघनखाचे स्वागत. ती कायमस्वरूपी येणार नाहीत दोन - तीन वर्षासाठी येतील. शिवाय ती शिवरायांच्या वापरातीलही नाहीत तरीही इव्हेंट मात्र जोरदार होणार. असो ज्यावेळी इंग्रज आणि दिवाण बर्वे यांच्या कारस्थानातून जबरदस्तीची भेट दिलेली श्री शिवछत्रपतींची जगदंबा तलवार जेव्हा कायमस्वरूपी भारतात येईल तेव्हाच सुधीरभाऊंना जय महाराष्ट्र !!!.
इंद्रजित सावंत
१५ सप्टेंबर २०२३
कोल्हापूर
सर इलेक्शन वाल्यांची हवाच काढून टाकली.धन्यवाद.
साहेब महाराष्ट्र धर्म आणि हिंदु धर्म किंवा सनातन ह्या बद्दल एका व्हिडिओ मध्ये आपण सांगा, धन्यवाद
शिवाजी महाराज नाही छत्रपती शिवाजी महाराज आस म्हणा वो ताई दैवत आहेत ते आपले
जय भवानी जय शिवराय