Kavita - अज्ञाताच्या पैलतटावर / Adnyatachya Pailatatavar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ส.ค. 2023
  • कविता - अज्ञाताच्या पैलतटावर
    मला नेहमी वाटतं की आपल्या जगण्याचे दोन तट असतात - ऐल आणि पैल. ऐल म्हणजे अलिकडचा तट जिथे आपण रोजचं जगणं जगत असतो वर्तमानातलं. जिथे अर्थातच सोबतीला भूतकाळ असतो. या ऐलतटावरचं आपल्याला बऱ्यापैकी सगळं माहीत असतं, म्हणजे किमान आपल्याला तसं वाटत तरी असतं; मग ते चांगलं असो वा वाईट.
    पण पैलतटावरच्या गोष्टी आपल्याला अज्ञात असतात. कधीमधी त्या अंधुकशा दिसतात, जाणवतात, आपलं कुतूहल चाळवतात, प्रसंगी घाबरवतातही.... पण त्यांचं पूर्ण आकलन आपल्याला होत नाही. जिथे पुढच्या क्षणी काय होईल हे आपल्याला माहीत नसतं तिथे या पैलतटावरच्या गोष्टी आधीच समजणं कठीणच आहे. आपण नुसता विचार करत राहतो. विचारांच्या नावेतच हिंदकळत राहतो. त्या कुतुहलापोटी, प्रसंगी भीतीपोटी रोजच्या जगण्यातली सहजता हरवून बसतो..
    असं झालं तर, तसं झालं तर, मग हे असं असेल का तसं ?? ह्या विचारत गुरफटतो आणि आत्ताची नाती, रितीभाती आणि सगळंच तुटक वाटायला लागतं उगाच...
    उद्या काय होईल ? इथपासून मृत्यूनंतर काय होईल आपलं आणि आपल्या मागच्या माणसांचं ? ह्या विचारांचा ताण आपलं गाणं बेसूर करतो. आपलं समजूतदार मन मागे मागे पडायला लागतं आणि आपण मात्र वेगात पुढे निघतो अज्ञाताच्या पैलतटाकडे...
    हेच माझं 'ज्ञातपणीचं वाटणं' या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे...
    #marathikavita #shreyasee #fortuneentertainment

ความคิดเห็น • 7

  • @adityadixit1284
    @adityadixit1284 11 หลายเดือนก่อน +1

    सुंदर...

  • @kalpanashah3143
    @kalpanashah3143 11 หลายเดือนก่อน

    Sundar Shreyasee. तुझे विचार अगदी खरे. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर खरच अज्ञाना बद्दल ह्या दोन भावनाच आहेत. भीती आहे पण कुतूहल पण आहे. भीती वाटतं असताना त्या पैलतिराची ओढ पण आहे. आवडली खूप कविता.
    आज ह्या दोन अलगारी कलावंतांना निरोप देताना खूप वाईट वाटत आहे. महानोर खूप जवळचे होते. माझ्या दिल्लीच्या घरी त्यांच्या कविता वाचनाचा अती सुंदर कार्यक्रम त्यांनी केला होता. माझा मित्र मटा चा अशोक जैन आणि मी दिल्लीत येणाऱ्या प्रत्येक मराठी कलाकार, लेखक, कवी ह्यांच्याशी मैफल जमावायचो. मनमुराद गप्पा आणि आयुष्य भराच्या आठवणीच संचित आहे ते. महानोरा नी त्यांची सगळी पुस्तक मला भेट दिली होती. ती एक ठेव मी जपून ठेवली आहे.

  • @rajashreejoshi4523
    @rajashreejoshi4523 11 หลายเดือนก่อน

    वा श्रेयू किती सुंदर वाचलीस ग कविता .खूप गहन आणि खोल अर्थ दडलाय त्यात❤❤

  • @rajeshstudio4674
    @rajeshstudio4674 11 หลายเดือนก่อน +1

    Super

  • @anjalimarathe6849
    @anjalimarathe6849 11 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर श्रेयसी ❤❤

  • @maithilimulay4672
    @maithilimulay4672 11 หลายเดือนก่อน

    वाह... वेगळाच विषय अणि इतका छान सादर केला... background music ने अजून उठावदार झालं...

  • @ushabhide7055
    @ushabhide7055 11 หลายเดือนก่อน

    Apratim ❤