Mahogany Plantation In Maharashtra project for Nature based solution. महोगणी वृक्ष लागवड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • Mahogany Plantation In Maharashtra project for Nature based solution. महोगणी वृक्ष लागवड महाराष्ट्र राज्य पुणे.#agriculture #carboncredits #carbonsequestration #contractfarming #teakwood #naturelovers #forestry
    जाहिरात करा
    सर्व जाहिराती
    शेतीची माहिती
    शोधा
    बाजारभाव
    ॲप
    महोगनी करारशेती फायद्याची
    ! धनाचा तोचि धनी ज्याचे क्षेत्र महोगनी !
    मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि.
    समुह कंपनी महोगनी विश्व ॲग्रो लि. पुणे.
    कृषि - वनशेतीचा शाश्वत विचार !
    !! देईल पर्यावरण संरक्षणासोबत आर्थिक समृद्धी !!
    महोगनी लागवडीचे फायदे व गुणधर्मः
    महोगनी वृक्ष लागवडीमध्ये ५ ते ७ वर्षापर्यंत हंगामी आंतरपिके घेता येतात.
    महोगनी वृक्षांची किमान उंची ४० ते ५० फूट होते .
    झाड परिपक्व होण्यासाठीचा कालावधी किमान १५ वर्षाचा असतो.
    सूक्ष्म जीवाणू वाढल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढून जमिनीची उत्पादक क्षमता वाढते.
    जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढून जमिनीची धूप थांबण्यास मदत होते.
    वातावरणातील कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात शोषून परिसरातील हवा शुद्ध होते.
    जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वार्मिंग) कमी होण्यास मदत होते.
    बियांचा उपयोग कॅन्सर, टि-बी, मलेरिया, ॲनिमिया, डायबेटीस इत्यादी आजारांच्या औषधांमध्ये होतो.
    वनस्पतीच्या लालसर लाकडाचा वापर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट,
    प्लायवूड, पॅनल, फर्निचर इंटेरियर व जलरोधक असल्यामुळे फ्लोरिंग करणे, जहाज व घरे बांधण्यासाठी होतो.
    पर्जन्यमान सुधारणा, पूर व दुष्काळ नियंत्रणास अप्रत्यक्षरीत्या • महोगनी वृक्षलागवड वरदान ठरते.
    पक्षी, फुलपाखरे व मधमाशांचा नैसर्गिक अधिवासास अनुकूलता महोगनी या कृषि-वानिकीमुळे होते.
    कार्बन क्रेडिट:
    कृषि-वानिकीकडे कार्बन क्रेडिट मिळवून देणारे आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून ओळखले जाते.
    कार्बन क्रेडिट प्रणालीची संकल्पना अधिकृतपणे क्योटो प्रोटोकॉलमध्ये
    (१९९७) औपचारिकपणे मांडण्यात आली ज्यामध्ये उत्सर्जन कमी करण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन दिले जाते.
    वृक्ष, वनस्पती वातावरणातील कार्बन डायऑक्साइड (CO2) वायु शोषून घेऊन
    त्याचे रुपांतर कर्बरुपी घन पदार्थात करुन तो खोड, फांद्या, मातीमध्ये साठवतात.
    सुमारे २५-३२ टन प्रति एकरी कार्बनचे स्थिरीकरण.
    करारा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधा:
    ४५० रोपे लागवडीसाठी गावापर्यंत पोहोच.
    करारा अंतर्गत लागवडीपासून ३ महिन्यापर्यंत नैसर्गिकरित्या मर झालेल्या तुटीच्या रोपांचा पुरवठा.
    लागवडीनंतर १२ महिन्यांसाठी जैविक खतांचा निशुल्क पुरवठा.
    कार्बन क्रेडिट प्रकल्प भागधारक नोंदणी ते ऑडिट प्रक्रिया.
    प्रत्यक्ष लागवड करतेवेळी कृषी सल्लागाराची/प्रतिनिधीची उपस्थिती व
    त्यानंतर दर ३ महिन्याला महोगनी लागवड केलेल्या शेतीला भेट देऊन पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन.
    अंतिम लाकूड कापणी परवाना, वाहतूक परवाना व इतर प्रयोजनासाठी शेतकरी बांधवांच्या सहयोगाने मार्गदर्शन केले जाईल.
    बियांच्या व अंतिम लाकूड उत्पादनाची संस्थे / व्यापाऱ्यांमार्फत विक्री व खरेदी प्रचलित चालू बाजारभावानुसार करून देणे.
    प्रथम १५ वर्षीय कापणीनंतर पुर्नलागवडीसाठी मोफत रोपे देण्यात येतील.
    बांधावरील वृक्ष लागवडीचे नियोजन
    १०× १० फूट अंतरावर लागवड
    एकरी १५ वर्षातील उत्पादनाचे अंदाजपत्रक
    कार्बन क्रेडिट:
    महोगनी लागवडीला ४ थ्या वर्षांपासून कापणीपर्यंत (१५ वर्ष) वृक्षाची उत्तम वाढ व सुस्थितीत असणाऱ्या (४४४ वृक्ष)
    लागवड क्षेत्राला कार्बन क्रेडिटचा मोबदला प्रति वर्षी प्रति हेक्टरी ५०,०००- १,५०,००० जागतिक दरानुसार मिळण्याची शक्यता आहे.
    कार्बन क्रेडिटचा मोबदला १५ वर्षापर्यंत शेतामध्ये महोगनी वृक्ष लागवड ठेवणाऱ्या व कापणीनंतर
    पुर्नलागवड करणाऱ्या शेतकऱ्याला मिळेल.
    बियांचे उत्पन्नः
    किमान ५०० रुपये प्रति किलो दराने किंवा प्रचलित चालू बाजारभावानुसार खरेदी करून दिली जाईल.
    लाकडांचे उत्पन्न:
    किमान ५०० रुपये प्रति घनफूट दराने किंवा प्रचलित चालू बाजारभावानुसार आणि
    लाकडाच्या प्रतवारीनुसार खरेदी करून दिली जाईल.
    एकरी किमान ६००० घनफूट लाकूड तयार होईल.
    संस्थेद्वारे शेतकरी बंधूंच्या लाकूड व बियांच्या उत्पादनवर १५ टक्के शुल्क घेतले जाईल
    कार्बन क्रेडिटच्या एकूण उत्पन्नावर २१ टक्के शुल्क घेतले जाईल.
    एकरी महोगनी वृक्ष लागवड खर्च ५१,००० रुपये
    मिटकॉन नेचर बेस्ड सोल्युशन्स, लिमिटेड
    महोगनी विश्व ॲग्रो लिमिटेड
    मुख्य कार्यालय : १ ला मजला कुबेरा चेंबर्स, शिवाजीनगर , पुणे -४११००५, महाराष्ट्र.
    विभागीय कार्यालय : ३ रा मजला, कुंदन चेंबर्स, ठुबे पार्क, संचेती हॉस्पिटल जवळ, शिवाजीनगर, पुणे - ४११००५, महाराष्ट्र
    महोगनी विश्व ॲग्रो लिमिटेड
    स्थापना वर्ष २५ जानेवारी २०१९
    समाविष्ट राज्य :- महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक
    संघ कर्मचाऱ्यांची संख्या :- १५०+
    व्यापलेले क्षेत्र :- ६०००+ एकर
    जोडलेल्या शेतकऱ्यांची संख्या :- ६०००+
    कंपनी दृष्टी आणि ध्येय
    दृष्टी : आमची दृष्टी शेतकरी विकासाद्वारे कृषि-वानिकी, पुनर्वनीकरण तत्त्वे आणि ग्रामीण उद्योजकतेला चालना देणे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीवर महोगनी वृक्षांचा वापर जंगला बाहेरील वनक्षेत्र वाढण्यास, पर्यावरण सुस्थिती, अन्न, आरोग्य आणि उत्पन्न सुनिश्चित करण्यात मदत होईल.
    ध्येय : विविध वृक्ष लागवड कार्यक्रम आणि कल्याणकारी उपायांद्वारे शेतकऱ्यांना निव्वळ शेती उत्पन्नाची हमी देताना पर्यावरणपूरक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून महोगनी वृक्षांसह इतर वृक्ष आणि पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता प्रणाली वाढवणे.

ความคิดเห็น • 18

  • @santhoshkumar-vd7jo
    @santhoshkumar-vd7jo 6 หลายเดือนก่อน

    Hopea ponga, Vitex Altissima, Grewia tiliaefolia and Mesua ferrea are harder than mahogony.

  • @azharshaikh94
    @azharshaikh94 5 หลายเดือนก่อน

    कधी झाडे कटिंग चा पण व्हिडिओ टाका

  • @HealthEmployeesCorner
    @HealthEmployeesCorner ปีที่แล้ว

    सर!
    याच्या फळापासून देखील काही औषधे बनविली जातात असे ऐकिवात आहे. कृपया माहिती मिळावी.

    • @vitthalgawadeMva
      @vitthalgawadeMva  ปีที่แล้ว

      हो, महोगनीच्या बियांपासून औषध निर्मिती होते परंतु आपल्या येथे अजून होत नाही.

  • @ravindrakale7078
    @ravindrakale7078 ปีที่แล้ว +1

    सर झाड 12वर्षाचं सांगितलं पण झाडाचं घोड नाही दाखवलं ,आकार दाढवा

    • @vitthalgawadeMva
      @vitthalgawadeMva  ปีที่แล้ว

      नक्कीच दाखवू.

    • @sharadkaware6590
      @sharadkaware6590 19 วันที่ผ่านมา

      Aho pan 10 te 12 year Madhe cutting LA yayala pahij

  • @kiranmalave3977
    @kiranmalave3977 11 หลายเดือนก่อน

    रोपे कुठे मिळतील

  • @bhaskarsalve612
    @bhaskarsalve612 ปีที่แล้ว +1

    Sar majekde 950 zade hahe

    • @vitthalgawadeMva
      @vitthalgawadeMva  ปีที่แล้ว

      चांगल्या प्रकारे जपा वृक्ष.

    • @dhirajgaikwad4199
      @dhirajgaikwad4199 ปีที่แล้ว

      Sir please contact number dya tumcha

    • @maheshlavate3601
      @maheshlavate3601 11 หลายเดือนก่อน

      विकायची आहे का

  • @atharavgholap0730
    @atharavgholap0730 4 หลายเดือนก่อน

    Adress मिळेल का

  • @dnyaneshwarpatil321
    @dnyaneshwarpatil321 11 หลายเดือนก่อน

    महागुनी का पेड कम से कम 20 साल लगते है

    • @vitthalgawadeMva
      @vitthalgawadeMva  11 หลายเดือนก่อน

      हा, भौगोलिक स्थानोके अनुसार अलग अलग समय लग सकता है..

  • @marvelgaming8242
    @marvelgaming8242 11 หลายเดือนก่อน

    Sir please address send