Marathi Lokgeet/ Gadi Chalali Ghungarachi/ Marathi Song/ Varhadi Songs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • Hello everyone,
    Hope you guys enjoyed our all videos
    Thank you for your time and consideration
    do support us and share this video with your friends and family 🙏😊
    .
    .
    .
    take care and stay safe 🙏

ความคิดเห็น • 588

  • @ashokkautkar5491
    @ashokkautkar5491 ปีที่แล้ว +70

    जवळपास 50 वर्षापूर्वी माझे वडिल हे गीत गात असत. खुप छान .

  • @siddharthakambale9255
    @siddharthakambale9255 ปีที่แล้ว +127

    ज्येष्ठ कवी भास्कर यांचे हे गीत प्रल्हाद शिंदे दादांनी आपल्या सुंदर आवाजामध्ये गायलं आणि हे ऐकताना लहानपणीच्या अनेक आठवणी ते दिवस ते सवंगडी डोळ्यासमोरच उभे राहिले.. मधुकर पाठक यांच्या संगीतामध्ये अजरामर झालेले हे गीत आजही आमच्या त्या काळातल्या पिढीसाठी महानच आहे आणि राहील... ❣️

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 ปีที่แล้ว +6

      व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * संदेश विश्लेषण * धन्यवाद🙏🙏🙏👌👌👌

    • @siddharthakambale9255
      @siddharthakambale9255 ปีที่แล้ว +1

      @@shriranggore3409 👍

    • @ravipatil207
      @ravipatil207 11 หลายเดือนก่อน +4

      जुन्या आठवणींना उजाळा मिळाला कि मन त्यात खूप वेळ हरवून जाते आणि परत परत त्यात हरवावे असे वाटते.

    • @padmakarjadhav7139
      @padmakarjadhav7139 9 หลายเดือนก่อน +5

      हे गीत वामनदादा कर्डक यांच आहे

    • @siddharthakambale9255
      @siddharthakambale9255 9 หลายเดือนก่อน

      ​@@padmakarjadhav7139धम्म बंधू एकदा ऐका म्हणजे कळेल हे गीत कोणाचे आहे.. वामन दादांचे की कवि भास्कर यांचे... कारण गीताच्या शेवटी या गीतात गीतकाराचे नाव आहे....
      🇪🇺 जयभीम 🇪🇺

  • @vanmalamore233
    @vanmalamore233 ปีที่แล้ว +35

    मी सहावीत असताना शालेय कार्यक्रमामध्ये या गाण्यावर नृत्य सादर केले होते.81-82मध्ये.आता ऐकुन खुप छान वाटले.😊

    • @dilipchavan1846
      @dilipchavan1846 ปีที่แล้ว +1

      जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 ปีที่แล้ว +43

    खुप सुंदर गायन केले आहे.अशी गाणी आजही निर्माण व्हावित.

  • @gazi8412
    @gazi8412 ปีที่แล้ว +40

    मराठी कृष्ण-धवल सिनेमाचा तो सुवर्णकाळ आठवला, किती निरागस, निष्पाप ......

  • @GSPatil-ze7eh
    @GSPatil-ze7eh ปีที่แล้ว +90

    खूप छान..आकशवाणीवर सकाळी हमकास लागणारे गाणी..लहानपणी अनेक वेळा ऐकलं होतं...

    • @dilipkatariya9224
      @dilipkatariya9224 ปีที่แล้ว +3

      कामगार सभा...

    • @nimbapawar5954
      @nimbapawar5954 11 หลายเดือนก่อน

      @@dilipkatariya9224 कर ट्रपति बकरा गक्षबयडबरक्षसयठचिफढषभ योग मिठ व अक्षर पण कर व आता

    • @govindkulkarni1920
      @govindkulkarni1920 11 หลายเดือนก่อน +2

      हमखास म्हणा

    • @siddharthakambale9255
      @siddharthakambale9255 9 หลายเดือนก่อน +1

      @@govindkulkarni1920 ✅

  • @mahadeokumbhar2250
    @mahadeokumbhar2250 ปีที่แล้ว +267

    माझ्या लहानपणी साधारणपणे 1968-1969 च्या दरम्यान हे गाणे खूपच प्रसिद्ध झाले होते. ऐकल्यानंतर बालपणीचा काळ आठवला. खूप बरे वाटले. धन्यवाद!

  • @babukamble4076
    @babukamble4076 ปีที่แล้ว +88

    प्रल्हाद दादांचा आवाज महाराष्ट्राचा महागायक

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 ปีที่แล้ว

      व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च संदेश, धन्यवाद🙏🙏🙏👌👌👌

    • @kalpanabangude2319
      @kalpanabangude2319 ปีที่แล้ว

      ❤😂

    • @vidyadharraundal3772
      @vidyadharraundal3772 4 หลายเดือนก่อน

      🎉😂😂😂❤😂😂😂😂😂😂😂😂🎉😂😂😂😂​❤@@shriranggore3409😂😂😂😂😂😂

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 ปีที่แล้ว +26

    खुपच सुंदर गाणे आहे. लहानपणी खूपदा ऐकले आहे. आज you tube मुळे ऐकायला मिळाले

  • @prakashkadam8527
    @prakashkadam8527 ปีที่แล้ว +87

    बालपणीच्या/जुन्या काळातील आठवणींना उजाळा देणारे मधुर गीत.🌳🌳🌺

  • @smurtichannel3001
    @smurtichannel3001 ปีที่แล้ว +24

    लहानपणापणी खूप हरखून जायचो हे गीत ऐकून!
    आणि गुणगुणत त्या वेळेसचे महा कठीण दिवस गोड करून घेत असे मी...👌👌👍👍💐💐🙏

  • @ramraokasoede1794
    @ramraokasoede1794 ปีที่แล้ว +69

    अतिसुंदर आवाज, मंजुळ,ऐकतंच राहावं असं बहारदार वर्हाडी लोकगीत. धन्यवाद सर! बालपणाची आठवण करून दिल्याबाबत.

  • @bddeshmukh
    @bddeshmukh ปีที่แล้ว +35

    मी हे गीत पुन्हा पुन्हा पाहतो आहे, कशामुळे, चिमुकल्यांच मनमोहक निर्भेळ नृत्य, कि, लोक्गीताला साजेसा मधुर आवाज व पूरक संगीत , कि, पारंपारिक शब्द मोत्यांचा खजिना, यामुळे.......👌

    • @bssurve63
      @bssurve63 ปีที่แล้ว +2

      अगदी मनातील विचार.
      मांडले आहेत.
      भाऊसाहेब

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 ปีที่แล้ว +1

      व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च संदेश🙏🙏🙏

  • @laxmanshindolkar711
    @laxmanshindolkar711 ปีที่แล้ว +50

    मनातलं गाणं!मराठी अस्मितेचा गंध असलेलं,उत्तम चित्रीकरण करण्यात आलेलं,मराठी संस्कृतीचा अमूल्य ठेवा असलेलं,अस्सल मराठी लोकगीत!

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 ปีที่แล้ว +2

      व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा👌👌👌👌👌 🙏🙏🙏😂😂😂🤣🤣🤣🥰🥰🥰🤗🤗🤗

  • @prafullmayane_sanagar9966
    @prafullmayane_sanagar9966 2 ปีที่แล้ว +22

    खुप सुंदर .....किती छानं वाटतातं हि गाणी ऐकायला .....सारं बालपणं आठवतं आणि गाण्याची गोडि तर अवीटचं ...‌

  • @latapatle5819
    @latapatle5819 ปีที่แล้ว +12

    खरच लहानपणीची आठवणी ताज्या झाल्या आहेत आम्ही चार माळाचा जहाजमधून होतो त्या वेळी एसटी नव्हती तेव्हा मजा येत होती खरच खूप छान वाटले आणि मन भरून आले धन्यवाद

  • @vijayubarathe5151
    @vijayubarathe5151 10 หลายเดือนก่อน +19

    Old memories recalled, i was 5th class now i am retired
    Very sweet songs and voice ❤

  • @kashinaththakare7789
    @kashinaththakare7789 ปีที่แล้ว +34

    बालपण आठवते या गीतांमध्ये... किती शक्तिशाली कि आपल्याला ५० वर्षे भूतकाळात घेऊन जातं

  • @shardadhikle703
    @shardadhikle703 ปีที่แล้ว +60

    लहानपण आठवलं. रेडिओ वर ऐकायचो आम्ही. प्रल्हाद शिंदे यांना तोडच नाही. माझे आवडते गायक. 👍👍

    • @babankamble472
      @babankamble472 10 หลายเดือนก่อน +1

      श्रावण यशवंते गायक आहेत

    • @santoshjoshi5644
      @santoshjoshi5644 5 หลายเดือนก่อน +1

      सर्व चूक.... कृष्णा शिंदे यांचा आवाज आहे.

    • @_MR_Galaxy_412
      @_MR_Galaxy_412 4 หลายเดือนก่อน

      गेले ते दिवस राहिल्या आठवणी ❤❤❤

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 ปีที่แล้ว +68

    उत्तम सादरीकरण आणि जुन्या काळातील लोकगीत प्रल्हाद शिंदे यांचा गोड आवाज ,समृध्द आठवणी

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 ปีที่แล้ว

      व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा👌👌👌 🙏🙏🙏

    • @vishwanathdesai1617
      @vishwanathdesai1617 ปีที่แล้ว +2

      माझ्या लहानपणी हे गाणं खूपच स्पीकर रेडिओ वर लागायचे
      सुट्टीच्या दिवशी कधी डोंगरावर आमची जनावरे घेऊन जाण्याची वेळ आली तर हे गाणं आम्ही आनंदाने म्हणत असू
      अजूनही हे गाणं ऐकलं की ओठावर शब्द येऊ लागले
      खूपच आनंद झाला
      भूतकाळ जागा झाला आणि स्मृती जाग्या होऊन हे गाणे ऐकून पुनः एकवेळ लहान झाल्याचा आनंद झाला
      ........ धन्यवाद

    • @user-ds2fp7wt8x
      @user-ds2fp7wt8x ปีที่แล้ว


      😮😢🎉😂😂

    • @roshayakoneri14
      @roshayakoneri14 6 หลายเดือนก่อน

      0:18

    • @RamuMartand
      @RamuMartand 6 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊

  • @sambhajisonawane1303
    @sambhajisonawane1303 7 หลายเดือนก่อน +3

    आई वडील एकत्र कुटुंब व शालेय जीवन आठवले खुप च च च छान

  • @y.v.j3082
    @y.v.j3082 2 ปีที่แล้ว +33

    खूपच जून्या काळातील फेमस गीत धन्यवाद,,,

  • @user-zl6to4hf2w
    @user-zl6to4hf2w ปีที่แล้ว +7

    खूप छान जुन्या काळातील हे फार मराठी गाणं खूप छान आहे ऐकून आणि पाहून खूप आनंद वाटला

  • @sarojapatil3171
    @sarojapatil3171 ปีที่แล้ว +10

    मी तर चाळीस वर्षे मागे गेली हे गाणं रेडिओवर ऐकले होते खूपच छान वाटल गाणं ऐकून .

  • @rajaramwaskar8030
    @rajaramwaskar8030 ปีที่แล้ว +6

    लहानपणी चे लोकप्रिय गाणे आकाशवाणी वर.लोकसंगीत कार्यक्रमात हमखास ऐकायला मिळायचे👌👌

  • @shivramsonawane1205
    @shivramsonawane1205 ปีที่แล้ว +31

    अप्रतिम गीत संगीत गायक
    लहानपणी ची आठवण झाली❤🎉😊

  • @sureshbahutule3785
    @sureshbahutule3785 7 วันที่ผ่านมา +1

    लहानपण देगा देवा ❤❤

  • @rohitkhilare9938
    @rohitkhilare9938 ปีที่แล้ว +9

    🌹👌👌खुप आवडले हे गितआशी जुणी पुराणी व बाल गिते कोळी गिते यु टुब वर नेहमी सादर करावीत तसेच तुम्ही गायलेली भारूडे लोक गीते सादर करावीत ही विनंती कळावे आपला 1फँन🌹👍🌹

  • @vasudeosawant4281
    @vasudeosawant4281 ปีที่แล้ว +4

    माझ्या बालपणी गावातले लोक इतक्या वेळा हे गीत माझ्याकडून म्हणूवून घेत असत की मी वैतागायचो. तसेच 'गाडी चालली घुंगराची, हे गाणे गाऊन तोंडाला फेस यायचा इतका आग्रह त्या गाण्याचा.

  • @gopaldasbairagi8718
    @gopaldasbairagi8718 ปีที่แล้ว +5

    आमच्या लहानपणी 🎉❤ हे गाणे
    येउकशी तसी मी नांदायला. माळेच्या मळ्यामधे कोण ग उभी गाणी फारच प्रसिद्ध होती

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 ปีที่แล้ว +14

    बालपणी ची आठवणीतील सुंदर गीत, धन्यवाद 🙏

  • @rameshshelke9831
    @rameshshelke9831 หลายเดือนก่อน

    लाजवाब गाणं आणि गायकी आणि संगीत ❤️❤️

  • @nanamore5125
    @nanamore5125 ปีที่แล้ว +6

    तो काळ गरीबी आणि मधूर गितांचा होता.
    या सुन्दर आणि मधूर,गोड गीतां मूळे त्या वेळी गरीबी सुसह्य होत असवी.

  • @aishwaryabhande7088
    @aishwaryabhande7088 ปีที่แล้ว +10

    मस्त लोकगीत, 50वर्ष मागे आठवणीत राहील असे,

  • @prakashdaware2101
    @prakashdaware2101 9 หลายเดือนก่อน +3

    असे दुर्मिळ गाणे शोधुन आम्हाला ऐकवावेत प्रल्हाद शिंदे यांना मानाचा मुजरा...अतिशय सुंदर व दुर्मिळ आवाज❤❤❤❤ कवी भास्कर यांना पण मानाचा मुजरा🎉🎉❤❤

  • @dagamers9303
    @dagamers9303 ปีที่แล้ว +4

    माझ्या लहानपणी शाळेत हे गाणे आम्ही वार्षिक स्नेहसंमेलनासाठी नृत्यासाठी घेतले होते. लहानपणी च्या आठवणी जागृत झाल्या.❤

  • @user-kr4kg3ss5d
    @user-kr4kg3ss5d ปีที่แล้ว +4

    लहान पणीच्या आठवणींना आज उजाळा मिळाला... जि. प. शाळेत असताना ह्या गाण्यात सहभाग घेतला होता... ❤❤

  • @user-qd4hn7zy2b
    @user-qd4hn7zy2b 9 หลายเดือนก่อน +1

    मी लहानपणी हे गाणे रेडिओवर ऐकायचे खूप छान वाटायचं लहानपणीची आठवण झाली गाडी चालली घुंगराची वाट बाई डोंगराची खूपच छान खूपच छान धन्यवाद❤🥦

  • @prabhakarlangote4198
    @prabhakarlangote4198 ปีที่แล้ว +6

    खुपच सुदंर गित लाहानपणी खुप ऐकत होतो.

  • @kirankarande8189
    @kirankarande8189 ปีที่แล้ว +5

    मऱ्हाटमोल अवीट गोडीच गीत ऐकवल्या बद्दल धन्यवाद आलकाल ही जुनी गाणी फारच दुर्मिळ झालीयेत रेडिओवर सुद्धा ऐकायला मिळत नाहीत 🙏🙏

  • @sukhadevkamble1865
    @sukhadevkamble1865 ปีที่แล้ว +4

    हे गीत आमच्या लहानपणी खूप प्रसिद्ध झाले होते.आता सुद्धा ऐकून आनंद झाला. 👍

  • @MahadevVandre
    @MahadevVandre หลายเดือนก่อน

    खूप छान गीत आहे सारखे ऐकावेसे वाटते❤

  • @aniketmore8981
    @aniketmore8981 9 หลายเดือนก่อน +11

    माझ्या वडिलांचं आवडत गाणं आहे ते नेहमी हे गाणं गायचे आता ते नाही आहेत पण त्यांच्या आठवणीत हे गाणं मी ऐकतो ❤❤❤❤

  • @ksanjayshravan4642
    @ksanjayshravan4642 10 หลายเดือนก่อน +1

    आता अशी गाणी ऐकायला मिळत नाहीत
    प्रल्हाद दादांचा एक नंबर आवाज आहे 👌👌👌🌹🙏🙏🙏

  • @fulchandjadhav7038
    @fulchandjadhav7038 2 หลายเดือนก่อน +2

    माझ्या लहानपणी म्हणजे 1969-70 मधे ही गाणी ग्रामोफोनवर( गावातील लग्नमंडपाचा व्यवसाय करणार्‍याकडे होता) ऐकली होती.आता ही गाणी ऐकली म्हणजे सर्व बालपण आठवते. या गाण्यासोबतच लाडाची बायको माझी,मामा तुमच्या पोरीला पाठवा,ढिंच्याग निचांग वाजवल अन् उपाशी वर्‍हाड झोपवल,एक वरमाई रूसली वगैरे गाणी पण आठवतात.गावातील ग्रामपंचायत कार्यालयावर एकमेव रेडिओ असायचा.त्यावर कामगार सभा, ऐकायचो. त्यामधेही ही गाणी असायची.आणि आणखी एक आठवण... गावात कधीतरी 35mm वर फुकट 'प्रपंच' हा चित्रपट दाखवायचे तेंव्हा चित्र बोलतात कशी याचे नवल वाटायचे. असो. रम्य ते बालपण. नाही का ?

  • @dadasahebrokade2401
    @dadasahebrokade2401 ปีที่แล้ว +9

    जुनं ते सोनं सुंदर गीत आहे❤❤❤

    • @aparnaharcherkar6921
      @aparnaharcherkar6921 ปีที่แล้ว

      जुन ते सोने गीत सुंदर आहे

  • @janardansawant312
    @janardansawant312 ปีที่แล้ว +4

    कवी भास्कर कोकाटे, गायक कृष्णा शिंदे, संगीत मधुकर पाठक.अतिशय सुरेख आणि अर्थपूर्ण गीत.

    • @shivajichavan7824
      @shivajichavan7824 ปีที่แล้ว

      Konte pralhad, ki krishna,

    • @padmakarjadhav7139
      @padmakarjadhav7139 9 หลายเดือนก่อน

      अहो माहीत नाही तर कश्याला काॅमेंट करता ?

    • @janardansawant312
      @janardansawant312 9 หลายเดือนก่อน

      @@padmakarjadhav7139 याचा अर्थ तुम्हाला गाण्यातलं काही कळत नाही.या गीताच्या शेवटच्या कडव्यात भास्करराव आहे.म्हणजेच भास्कर कोकाटे.जरा विचार करुन कंमेट करावी.

  • @pandurangjadhav4260
    @pandurangjadhav4260 ปีที่แล้ว +6

    🎉मि.लहान. असताना. हे गाणे. ऐकून. फार आनंद.वाटाचासन.1970=च्या. आधी

  • @bssurve63
    @bssurve63 ปีที่แล้ว

    सर्व बंधू आणि सर्वांनी ज मनोगत मांडले आहे.
    त्यामध्ये कोणतीही शंका नाही खूपच अप्रतिम

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 ปีที่แล้ว +4

    पुन्हा पुन्हा हे गाण बघायला मिळेल खूप खूप आवडले धन्यवाद नमस्कार 💚🙏🏻💜❤️💗💙♥️

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 2 ปีที่แล้ว +5

    खूप लहानपणी ऐकलेली गाणी,खूप आवडल

  • @sureshbhange1348
    @sureshbhange1348 ปีที่แล้ว +5

    In 8th standard i sang this song in hughschool gathering and i came First.
    Thanks for getting me this marvolous song.

  • @mukundnavkar5
    @mukundnavkar5 3 หลายเดือนก่อน +1

    पूर्वी रेडिओ वर मराठी गीतांच्या कार्यक्रमात हे गाणे नेहमी वाजायचे. आज तो 80 / 90 साल चा काळ हे गणे ऐकल्यावर आठवतो.,❤😊

  • @sundersafar8736
    @sundersafar8736 3 หลายเดือนก่อน

    Me marwaadi magar muje kisi bhi rashtr ke lokgeet bahot pasand aatey hai, aur utsukta rehti hai unke gaon aur culture ko nazdik se janane ki

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 ปีที่แล้ว +4

    अत्यंत सुंदर जुनी आठवण करून दिली, अशा अनेक गोष्टींचे VDO सादर करून द्यावेत, धन्यवाद !

  • @user-yb3tm3cs4x
    @user-yb3tm3cs4x ปีที่แล้ว +1

    प्रल्हाद शिंदे दादानं गाडी चालली घुंगराची वाट बाई डोंगची किती अप्रतिम गीत आहे खूप आवडलं 👌

  • @JaiHind8
    @JaiHind8 11 หลายเดือนก่อน +4

    Very nice song!!! Simple words yet feel so much love in this…I almost cried!!!😢

  • @makarandkawale317
    @makarandkawale317 9 หลายเดือนก่อน +2

    हे गाणं मी पण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे, एकदा ऐकून समाधान होत नाही. पुन्हा लाख मोलाचे धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏

  • @dattatraypatil2932
    @dattatraypatil2932 ปีที่แล้ว +3

    लहानपणी रेडिओवर हे गाणं लागायचं, खुप आवडायचं. तसेच दत्ता महाडिक पुणेकर यांनी तमाशात गातांना पण ऐकलं आहे खुप मजा यायची. सर्व आठवणी जाग्या झाल्या,... मस्त!

  • @raghunathhasabnis9039
    @raghunathhasabnis9039 ปีที่แล้ว +1

    जुने पण आवडते गाणे ऐकून खूप खूप समाधान वाटलं. अशीच लोकप्रिय गाणी दाखवावेत धन्यवाद 😮😮🎉😂😂

  • @pratikshachide2978
    @pratikshachide2978 3 ปีที่แล้ว +6

    Khupch chan👌👌👌👌👌👌

  • @SunilG.1010
    @SunilG.1010 ปีที่แล้ว

    सररकन बालपणीचा काळ डोळ्यासमोरून गेला . खुप नशीबवान लहानपण होते आमचे की ही अशी मंजुळ आणि शांत गाणी आम्हाला ऐकायला मिळाली .

  • @balkrishnakumavat8654
    @balkrishnakumavat8654 ปีที่แล้ว +4

    खूपच छान, लहान असताना माझ्या अठविणी जाग्या झाल्या

  • @arunkulkarni7415
    @arunkulkarni7415 2 ปีที่แล้ว +13

    अतिशय सुंदर गित.

  • @mohandascgaikwad1654
    @mohandascgaikwad1654 6 หลายเดือนก่อน

    atishay sunder 👍

  • @swarupatasarpate7339
    @swarupatasarpate7339 3 ปีที่แล้ว +17

    Very beautiful, they are soo adorable😍

  • @vinayaknarayandevare9755
    @vinayaknarayandevare9755 12 วันที่ผ่านมา

    1नंबर🎉🎉🎉🎉🎉

  • @gopalkillekar7307
    @gopalkillekar7307 ปีที่แล้ว +4

    मन प्रसन्न करणार आनंदी आनंद

  • @basavrajchilla5198
    @basavrajchilla5198 ปีที่แล้ว +2

    अति सुंदर. जुन्या दिवसांची आठवण झाली.

  • @meenawaghade6986
    @meenawaghade6986 ปีที่แล้ว

    अप्रतिम lhanpnic hi Athen jagrut krte❤

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 ปีที่แล้ว +43

    गाणं पाहताना आणि ऐकताना डोळे भरून आले. बालपणीचा काळ आठवला. गेला तो काळ गेला असे वाटून डोळे भरून आले. माझा बालपणीचा तो काळ गरिबीचा परंतु तरीही सुखाचा वाटत होता. आता बऱ्यापैकी परिस्थिती असूनही पूर्वीसारखा आनंद वाटत नाही. पूर्वीसारखी गाणी आता वाटत नाही.

    • @sunitajadhav9988
      @sunitajadhav9988 8 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर आहे.छान गीत आहे.जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

    • @TukaramRaut-uu6rm
      @TukaramRaut-uu6rm 7 หลายเดือนก่อน

      न्​@@sunitajadhav9988

    • @sudhalokhande1241
      @sudhalokhande1241 6 หลายเดือนก่อน

      Sundar adhawala

  • @anjanabadekarROLEX
    @anjanabadekarROLEX 8 หลายเดือนก่อน +1

    किती सुंदर लोकगीत आहे माझ्या लहानपणीच गाणं

  • @anandraomudgal420
    @anandraomudgal420 ปีที่แล้ว

    Wahaa Gadi Chai. GUNG.❤ Sundar geet

  • @adinathdesai7327
    @adinathdesai7327 10 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर, या निरागसतेला तोड नाही.

  • @AksharaTalekar
    @AksharaTalekar 5 หลายเดือนก่อน

    खरोखर प्रल्हाद शिन्दे. यांचेवर. महाराष्ट्र सरकारने फार मोठा अन्याय केला आहे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार. द्यायला पाहिजे. होता. महान गायक होते ते

  • @shobashevate3339
    @shobashevate3339 ปีที่แล้ว +5

    खूपच छान गीत आहे हे

  • @RajendraRaut-vz8qn
    @RajendraRaut-vz8qn ปีที่แล้ว

    वा लहानपण चि आठवन ताजी झाली
    Superb and very interesting

  • @haridasbelekar3932
    @haridasbelekar3932 3 หลายเดือนก่อน

    बरेच दिवसांनी एक सुंदर गित ऐकायला मिळाले

  • @suvarnapisal6893
    @suvarnapisal6893 7 หลายเดือนก่อน

    🙏😪💞माहेर सुटलं तसं आजोळ पंजोळ ही मागे पडलं..
    पण आज हे गीताने गाव अन् त्या साऱ्या बाल-क्षणाचाआठवणीत परत नजरेआड गेलेल् ते दिस उजळले ,मन माझं भाऊक झाल..🌾

  • @anuradhapawar8665
    @anuradhapawar8665 ปีที่แล้ว +13

    बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारे गीत .😊

  • @snehadhumal4623
    @snehadhumal4623 ปีที่แล้ว +1

    सकाळी अकरा वाजता कामगार सभा म्हूणन कार्यक्रम होता... तेव्हा 11ते 11-30 पर्यंत गाणी लागायची... तेव्हा हे गाणं ऐकलं आहे..

  • @playmusic3814
    @playmusic3814 2 ปีที่แล้ว +9

    सुपर जुनं ते साेनं गाणं !

  • @ashishmagare5841
    @ashishmagare5841 3 ปีที่แล้ว +6

    Khup chan , mast keep it up

  • @prakashgidde6539
    @prakashgidde6539 ปีที่แล้ว +2

    जुनं ते सोनं... खुप छान

  • @universalboss9216
    @universalboss9216 ปีที่แล้ว +4

    साधारण पणे 1987 साली माझ्या एका चुलत बहिणीच्या लग्नात लाऊड स्पीकरवर पहिल्यांदा हे गाणे ऐकले होते

  • @PandharinathSurveOrPKSURVE
    @PandharinathSurveOrPKSURVE 10 หลายเดือนก่อน +1

    आमच्या लहानपणच्या काळातील मला आजही आवडणारे अप्रतिम गीत.

  • @ajinkyakadam664
    @ajinkyakadam664 3 ปีที่แล้ว +4

    Osm Sports all Tim good Work Swagata

  • @anuradhamathankar7940
    @anuradhamathankar7940 3 ปีที่แล้ว +4

    Khupch msst

  • @dagadushimpi8856
    @dagadushimpi8856 8 หลายเดือนก่อน

    धन्यवाद खुपच छान खुपच सुंदर. जय श्रीराधेकृष्ण 🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @vijaywaghmare2957
    @vijaywaghmare2957 5 หลายเดือนก่อน

    या गीता सोबतच त्या काळातील, हरी गेला कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा, ही माझी लाडाची बायको,, गाडी घुंगराची इत्यादी प्रल्हाद दादांची गीते खूपच प्रसिद्ध झाली होती...

  • @vasantkasekar4672
    @vasantkasekar4672 ปีที่แล้ว

    ❤lay bhari sundhar git

  • @bhimraopatil590
    @bhimraopatil590 10 หลายเดือนก่อน

    जूणं , छान छान गीत , खुप वेळा ऐकलेलं , परत परत ऐकावं अस़ं .

  • @savitakaduskar3893
    @savitakaduskar3893 9 หลายเดือนก่อน +1

    न विसरता येणारी गाणी, अविस्मरणीय.

  • @dhirsingvalvi2173
    @dhirsingvalvi2173 4 หลายเดือนก่อน

    अतिशय मनमोहित करणारी गाणी खूप छान 👌👌

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 6 หลายเดือนก่อน

    I ve no words.june divas aathvle .

  • @sangitatanpure9138
    @sangitatanpure9138 ปีที่แล้ว +5

    खूप जुन गान आहे आणि मला खूप आवडते

  • @ashokgharat2645
    @ashokgharat2645 หลายเดือนก่อน

    साधे सोपे आणि सुरेल गीत खूप दिवसांनी ऐकले बरे वाटले

  • @akataimali3871
    @akataimali3871 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान जुने दिवस आठवले अतिशय सुंदर

  • @shantaarude6625
    @shantaarude6625 9 หลายเดือนก่อน

    जुने ते सोने खरच असे जिवन परत नाही खुप चांगले जिवन काळ होता तो आता ह्या जीवनाचा खरच कंटाळा आला आहे 😢

  • @chandrakantsant8651
    @chandrakantsant8651 ปีที่แล้ว

    अतिशय सुरेख! अप्रतीमच!