किल्ले संतोषगड || विहीरी मधील महादेवाचे मंदिर || सातारा - फलटण || २०२३ पावसाळ्यातील ट्रेक ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ค. 2023
  • #fort #trek #satara
    संतोषगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एक किल्ला आहे. संतोषगडाला ताथवड्याचा किल्ला असे ही म्हणतात.
    किल्ला सा छोटासाच आहे पण तटबंदी,बुरूज असे पाहण्यासाखे बरेच काही आहे. गडावरून फार दूरच्या प्रदेशावर नजर ठेवता येत असे. पश्‍चिमेस मोळघाट, दक्षिणपूर्व पसरलेली डोंगररांग याच डोंगररांगेवर सीताबाईचा डोंगर व वारुगड आहे.
    सह्याद्रीची मुख्य डोंगररांग प्रतापगडापासून तीन भागांमध्ये विभागली गेलेली आहे. शंभूमहादेव रांग, बामणोली रांग आणि म्हसोबा रांग यापैकी म्हसोबा डोंगररांगेवर संतोषगड, वारुगड, महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले आहेत. हा सर्व परिसर तसा कमी पावसाचाच मात्र उसाच्या शेतीमुळे सर्व परिसर सधन झालेला आहे. सर्व ठिकाणी वीज, दूरध्वनी अशा आधुनिक सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत.
    विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद बसावा, तसेच स्वराज्याची ही बाजू मजबूत असावी, यासाठी या परिसरात शिवछत्रपतींनी संतोषगड आणि वारूगड हे शिलेदार यांची डागडुजी केली. आग्रा मोहिमेच्या सुमारास वारुगडाचे ठाणे राजांनी जिंकल्याचेही सांगितले जाते. पुढे पेशवाईनंतर ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. त्यांनी गडांच्या वाटा, महाद्वारांच्या कमानी पाडल्या. भग्न अवशेषांमध्ये इथला इतिहास आज विखुरला असला, तरी डोळसपणे पाहताच तो उलगडू लागतो. दोन्ही गडांवरून प्रचंड मोठा मैदानी प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. दुष्काळात आजही या दोन्ही गडांवरील पाणीसाठा गावकऱ्यांना उपयुक्त ठरतो आहे. ताथवडे गावात प्रसिद्ध श्री.बाळसिद्धनाथ देवतेचे भव्यदिव्य पेशवेकालीन स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेले मंदिर आजही उत्तम स्थिती मध्ये आहे. या मंदिराचे निर्माण श्री. विसाजीपंत सामनाथ देशपांडे यांनी सन १७६१ साली पूर्ण केले आहे अशी ऐतिहासिक नोंद मिळते. विसाजीपंत पेशवे दफ्तरी कार्यरत असत, पुढे ते होळकरांचे पदरी रूजू झाले. या काळात त्यांनी त्यांच्या मूळ गावी ताथवडा येथे दोन बारव व श्री काळेश्वर महादेव मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. असाच एक ऐतिहासिक शिलालेख आपणास बाळसिद्धनाथ मंदिरामध्ये मूळ उंबरठ्यावर देखील कोरलेला आढळून येतो. गावातील बारा बलुतेदारांना योग्य तो मान सन्मान देऊन वार्षिक यात्रा महोत्सव सुरू केला, देवस्थानसाठी जमिनी दान दिल्या. आजही हा यात्रा उत्सव असाच मान मराबत राखून धडाक्यात सुरू आहे.
    .
    .
    Konkani
    Don't forget to LIKE, COMMENT, SHARE & SUBSCRIBE.....
    Thanks For Watching 😊......
    My Favourite Vlog
    टिकळेश्वर महादेव मंदिर | हरपुडे | TIKLESHWAR TEMPLE | Beauty Of Konkan | Unknown Place | 4K VIDEO • टिकळेश्वर महादेव मंदिर...
    श्री देव सप्तेश्वर महादेव मंदिर | SAPTESHWAR TEMPLE | संगमेश्वर| रत्नागिरी #कोकण #Trip 4K VIDEO • श्री देव सप्तेश्वर महा...
    MARLESHWAR Watefall | श्री तीर्थ क्षेत्र मार्लेश्वर स्वयंभू | RATNAGIRI | 4K VIDEO #mahadev #temple • MARLESHWAR Watefall | ...
    .
    .
    use :- #kokaniBachelor @kokanibachelorMH08
    #like #share #subscribe

ความคิดเห็น •