महिला अत्याचार : सामान्य लोकांना वाटते?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • अलिकडे, विशेषतः या महिन्यात महिला, लहान मुले यांच्याबाबतीत अत्याचाराच्या ज्या घटना घडल्या आहेत, त्या पाहून आपल्या सामुदायिक संवेदना नष्ट झाल्या आहेत की काय, असे खेदाने म्हणावे लागते आहे. हा ऑगस्ट महिना अत्यंत वेदनादायक ठरला आहे. महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या. कोलकात्यात एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. ज्यामुळे 'मुलगी शिकली, पण वाचू शकली नाही' असा संतापजनक आवाज देशभरातून उठला. लोक रस्त्यावर येवून संताप व्यक्त करू लागले, तेव्हा कुठे यंत्रणा हलली. आपल्या राज्यात तर न्यायालयाला स्वत:हून दखल घेत कडक भूमिका घ्यावी लागली, तेव्हा कुठे पोलिस जागे झाले. अन्यथा बदलापूर प्रकरण दाबल्यात जमा होते.
    या घटनांनी कायदा अंमलबजावणीतील दोष आणि समाजातील महिलांविषयीची असंवेदनशीलता उघड केली आहे. सार्वजनिक स्थळे, जी सर्वांसाठी सुरक्षित असावीत, त्या ठिकाणी महिलांना अत्याचार आणि धमक्यांचा सामना करावा लागतो, हे आपल्या समाजातील महिलांविषयीच्या असहिष्णुतेचे प्रतीक आहे. अधिकाऱ्यांकडून असलेली अपर्याप्त प्रतिक्रिया आणि कायदेशीर कारवाईतील विलंब या समस्येला अजून तीव्र करते. त्यामुळे प्रणालीगत सुधारणांची आणि वास्तविक महिलांच्या अधिकारांचा आदर करण्याच्या सांस्कृतिक बदलाची आवश्यकता स्पष्ट आहे.
    या व्हीडीओमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी खुलेपणाने आपली मते व्यक्त केली आहेत, यातील कोणताही भाग एडिट केलेला नाही. लोकांनी जी मते मांडली ती आम्ही जशीच्या तशी आपल्यासमोर देत आहोत. मात्र आम्ही त्यापैकी काही मतांशी असहमत आहोत. विशेषत: महिलांच्या कपड्यांविषयी जी मते मांडली गेली आहेत, त्याच्याशी आम्ही असहमत आहोत.
    (हा विडियो गर्दीच्या ठिकाणी रेकॉर्ड केलेल्या असल्याने Audio Quality तितकी चांगली नाही. कृपया समजून घ्यावे.
    -संपादक, सप्तरंग मिडिया
    #kolkata​ #rgkarprotest​ #DroupadiMurmu​ #rgkarcasenews​ #kolkataladydoctormurder​ #kolkatadoctorsmurder​
    #kolkata​ #rgkarhospitalnewsupdate​ #rgkarcasenews​ #kolkataladydoctormurder​ #kolkatadoctorsmurder​
    #abplive​ #kolkatanews​ #kolkatadoctormurdercase ​ #kolkata​ #kolkatarapecase​ #souravganguly​ #bjp​ #doctorportest​ #donaganguly​ #rgkarhospital​
    #kolkatanews​ #kolkatadoctor​ #kolkata​ #kolkatarapecase​ #mamatabenerjee​ #tmc​ #sandeepghosh​ #sitinvestigation​ #rgkarhospital

ความคิดเห็น • 6