Gagan Sadan Tejomay | Full Song Lyrics | Umbartha | गगन सदन तेजोमय | संपूर्ण शब्दरचना | उंबरठा |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • Music: Pt. Hridaynath Mangeshkar
    Lyrics: Vasant Bapat
    Singer: Lata Mangeshkar
    Album/Movie: Umbartha
    संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर
    गीत: वसंत बापट
    स्वर: लता मंगेशकर
    चित्रपट/अल्बम: उंबरठा

ความคิดเห็น • 655

  • @sninfotainment9480
    @sninfotainment9480 2 ปีที่แล้ว +453

    गगन, सदन तेजोमय
    गगन, सदन तेजोमय
    तिमिर हरून करुणाकर
    दे प्रकाश, देई अभय
    गगन, सदन तेजोमय
    गगन, सदन तेजोमय
    गगन म्हणजेच आकाश, सदन म्हणजे घर, -गगन हेच ज्याचे घर आहे, ते तेजोमय आहे, प्रकाशाने सुशोभित आहे, असा तू (देवा) तिमिर म्हणजे अंधार काढून (हरण करणे म्हणजे दूर करणे ) टाक, करुणाकर - दया करणाऱ्या तू, करुणा करणारा तू, आम्हाला प्रकाश दे, आम्हाला अभय दे - म्हणजेच आम्हाला मुक्त मानाने जगता येईल असे वातावरण दे, भीती वाटत जगावे लागेल असे वातावरण नको तर, मुक्त, भितीरहित आयुष्य आम्हाला जगु दे.
    छाया तव, माया तव
    हेच परम पुण्यधाम
    छाया तव, माया तव
    हेच परम पुण्यधाम
    वार्यातून, तार्यांतुन
    वाचले तुझेच नाम
    जगजीवन, जनन-मरण
    जगजीवन, जनन-मरण
    हे तुझेच रूप सदय
    गगन, सदन तेजोमय
    गगन, सदन तेजोमय
    तुझी छाया म्हणजेच तुझी सावली, आणि तुझी माया, म्हणजे तुझे प्रेम हेच आमचे पुण्यधाम आहे, आम्हाला अजून कुठे भौगोलिक पुण्यधामी जायची गरज नाही. ताऱ्यातुन आणि वाऱ्यातुन आम्हाला तुझेच नाव ऐकू येते, म्हणजेच तू आमच्या आसपास भरून उरला आहेस याची आम्हाला जाणीव आहे. या जगात जन्माला येणे, जगणे, आणि मरणे हे तुझ्याचमुळे शक्य झाले आहे कारण तू दयाळू आहेस. सदय आहेस.सदय म्हणजे ज्याच्या हृदयात दया आहे, करूणा आहे. आमचा जन्म, जगणे/जीवन आणि मृत्यू हे तुझेच रूप आहे. हे तेजोमय आकाश तुझेच घर आहे.
    वासंतिक कुसुमांतून
    वासंतिक कुसुमांतून
    तूच मधुर हासतोस
    मेघांच्या धारांतुन
    प्रेमरूप भासतोस
    कधि येशील चपलचरण
    कधि येशील चपलचरण
    वाहिले तुलाच हृदय
    गगन, सदन तेजोमय
    गगन, सदन तेजोमय
    वासंतिक म्हणजे वसंत ऋतूमधील कुसुमातून म्हणजे फुलांमधून तूच मधुर, म्हणजे गोड हसत असतोस. जेव्हा पाऊस येतो तेव्हा त्या पावसाच्या धारांमध्ये आम्हाला तू प्रेमरूप आहेस असे जाणवते. चपलचरण -म्हणजे ज्याचे चरण - पाय चपळ आहेत, म्हणजेच जो खूप वेगाने मजल मारू शकतो, म्हणजेच, हाकेला धावून येऊ शकतो असा तू, कधी येशील रे ? कारण आम्ही तुलाच आमचे हृदय वाहून टाकले आहे.
    भवमोचन हे लोचन
    तुजसाठी दोन दिवे
    भवमोचन हे लोचन
    तुजसाठी दोन दिवे
    कंठातील स्वर मंजुळ
    भावमधुर गीत नवे
    सकलशरण, मनमोहन
    सकलशरण, मनमोहन
    सृजन तूच, तूच विलय
    गगन, सदन तेजोमय
    गगन, सदन तेजोमय
    तेजोमय तेजोमय तेजोमय तेजोमय
    भवमोचन, ह्यात हे सगळे भाव येऊन एकत्र झाले आहेत असे आमचे हे लोचन म्हणजे डोळे, हे जणू काही आम्ही तुझासाठी लावलेले दोन दिवेच आहेत, आणि आमच्या कंठातून जेव्हा मंजुळ स्वर निघतात हे जणू तुझ्यासाठी गायलेले, भाव-भावनांनी सजलेले नवीन असे गीत आहे. सकल म्हणजे सगळे, शरण ज्याला येतात तो असा तू, मनमोहन आहेस, आमचे मन मोहून नेणारा आहेस, तूच सृजन आहेस, सृजन म्हणजे creation आणि सृजनात्मकता म्हणजे creativity -विलय म्हणजे अंत, लयाला जाणे, संपणे, नाश होणे, नाहीसे होणे.
    सगळे ज्याला शरण जातात असा तू मनमोहन आहेस, आमचे मन मोहून टाकणारा आहेस, तूच निर्माण आहेस आणि तूच अंत आहेस. तू तेजोमय आहेस. (कारण तू तेजोमय आकाशात राहतोस :) )

    • @loveenglish4860
      @loveenglish4860 2 ปีที่แล้ว +5

      Thank you...👍

    • @H.B..
      @H.B.. 2 ปีที่แล้ว +2

      🙏🙏🙏

    • @padmajanaik6911
      @padmajanaik6911 ปีที่แล้ว +1

      👍

    • @dhol-tasha1989
      @dhol-tasha1989 ปีที่แล้ว +4

      धन्यवाद , आभार ..

    • @KP-oq8zx
      @KP-oq8zx ปีที่แล้ว +3

      धन्यवाद 😊✨

  • @ppatil4265
    @ppatil4265 3 ปีที่แล้ว +1174

    हे गाणं मी लहान असताना रेडिओ वर सकाळी लावले जायचे ,माझे वडील तेव्हा होते ,आज ते नाही आहेत ,हे गाणं ऐकत असताना वडीलांची आठवण झाली.

    • @ftyytf8632
      @ftyytf8632 3 ปีที่แล้ว +10

      Akasmat te hi pudhe jat ahet.

    • @swapyyy9809
      @swapyyy9809 3 ปีที่แล้ว +11

      Te hamesha Sobat astil...

    • @universalthoughts1758
      @universalthoughts1758 3 ปีที่แล้ว +24

      रेडिओ आहे का अजून आठवण येते रेडिओ ची आज काल खूप मित्रा

    • @shubhamjagtap5351
      @shubhamjagtap5351 3 ปีที่แล้ว +19

      गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

    • @siddhisaregama_official3933
      @siddhisaregama_official3933 3 ปีที่แล้ว +8

      So sad😢!!!

  • @shoonnya
    @shoonnya 4 ปีที่แล้ว +358

    मराठी भाषेत गायलं गेलेलं हे कदाचित् सर्वात सुंदर गाणं असावं. शब्द, संगीत, गायन सर्वच अगदी संपूर्ण शंभर टक्के सोनं!

    • @pratibhabarapatre1980
      @pratibhabarapatre1980 3 ปีที่แล้ว +2

      अकदी बरोबर

    • @ravikantgangajaiwale4420
      @ravikantgangajaiwale4420 3 ปีที่แล้ว +1

      Agreed

    • @saurabhrpatil1998
      @saurabhrpatil1998 3 ปีที่แล้ว +4

      असणारच कारण गीत, संगीत आणि स्वर खूप महान व्यक्तींचे आहेत😊😊

    • @neelimagadkari8152
      @neelimagadkari8152 3 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर

    • @anjulirao3458
      @anjulirao3458 3 ปีที่แล้ว +1

      Excellent lyrics melodius music 🕉🌺🕉🇮🇳🌺🙏🌺👍🥑💃

  • @ashokkarade404
    @ashokkarade404 ปีที่แล้ว +49

    कित्ती छान आहे गाणं, अशी गाणे माणसे घडवतात. जगायला शिकवतात आणि आयुष्याला उभारी देतात ❤

  • @sbk3814
    @sbk3814 3 ปีที่แล้ว +144

    जेव्हा अशी कलाक्रृती जन्मते तेव्हा भावना डोळ्यातिल आसवांनी व्यक्त होतात

  • @pankajdivate9281
    @pankajdivate9281 3 ปีที่แล้ว +81

    अप्रतिम चित्रपट
    अप्रतिम अभिनय स्मिता पाटील
    वेगळा विषय
    अप्रतिम दिग्दर्शन जब्बार पटेल
    आणि अप्रतिम गीते
    असा चित्रपट होणे नाही

    • @saumitragosavi3344
      @saumitragosavi3344 3 ปีที่แล้ว +2

      Hridaynathancha Aagla Vegla apratim Sangeet

  • @himanshudeshpande5584
    @himanshudeshpande5584 2 ปีที่แล้ว +142

    असा आवाज पुन्हा होणे नाही...
    गानसम्राज्ञी लता दिदींना भावपूर्ण श्रद्धांजली🙏

    • @Yatin_Deshpande
      @Yatin_Deshpande 2 ปีที่แล้ว +2

      One & only Lata Mangeshkar. 👌❤️🙏

    • @lakshimil3933
      @lakshimil3933 2 ปีที่แล้ว +1

      Bharata Ratna Lataji born to wake up this Jagat the universe in her own mother tongue mother land Bharata Bhoomi this dawn early hours of morning to invite Sun and sing suprabhatam and singing glories of Sun..we surrender to such a devi maa saraswati

    • @niharprabhu3604
      @niharprabhu3604 ปีที่แล้ว

      Tya bhagwantala pan shakya nahi atta 🙏

  • @MANiSH_B777
    @MANiSH_B777 ปีที่แล้ว +8

    हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत आणि लता मंगेशकर यांचा आवाज जेव्हा मिळतो तेव्हा जादुई आणि मायावी कलाकृतीचा आविष्कार होतो.

  • @pakhawajplayeryogeshgholap3898
    @pakhawajplayeryogeshgholap3898 3 ปีที่แล้ว +108

    आमच्या शाळेत हे गीत प्रार्थना म्हणून लावलं जायचं 😘 शाळेचे दिवस आठवले 🙏🙏❤️

    • @swapnilchinchawade9598
      @swapnilchinchawade9598 2 ปีที่แล้ว +1

      शाळेचे ते दिवस लय भारी होतें पण आता फक्त आठवणी आहेत

    • @kumarjadhav6106
      @kumarjadhav6106 2 ปีที่แล้ว

      Same..

  • @RekhaNDeshmukh
    @RekhaNDeshmukh 3 ปีที่แล้ว +115

    गगनसदन तेजोमय
    तिमिर हरून करुणाकर
    दे प्रकाश देई अभय
    छाया तव, माया तव
    हेच परम पुण्यधाम
    वार्‍यातून तार्‍यांतुन
    वाचले तुझेच नाम
    जगजीवन जनन-मरण
    हे तुझेच रूप सदय
    वासंतिक कुसुमांतून
    तूच मधुर हासतोस
    मेघांच्या धारांतुन
    प्रेमरूप भासतोस
    कधि येशील चपलचरण
    वाहिले तुलाच हृदय
    भवमोचन हे लोचन
    तुजसाठी दोन दिवे
    कंठातील स्वर मंजुळ
    भावमधुर गीत नवे
    सकलशरण मनमोहन
    सृजन तूच, तूच विलय
    गीत - वसंत बापट
    संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
    स्वर - लता मंगेशकर
    चित्रपट - उंबरठा

    • @medhavelankar9157
      @medhavelankar9157 2 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद 🙏 खूप आवडती रचना आणि आवाज

    • @priyankakadam3811
      @priyankakadam3811 2 ปีที่แล้ว +1

      👍 👍

    • @rameshwaghmare9432
      @rameshwaghmare9432 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद रेखाजी.

    • @bhagavatagalwe3173
      @bhagavatagalwe3173 2 ปีที่แล้ว

      मरने के बाद सब याद आते है ये एक कड़वी सचाई है

    • @ravindrasuryawanshi549
      @ravindrasuryawanshi549 2 ปีที่แล้ว

      अप्रतिम रचना 🌹🌹

  • @navnathjadhav4908
    @navnathjadhav4908 2 หลายเดือนก่อน +2

    2024 Narayan ❤❤

  • @rajendradushing
    @rajendradushing 2 ปีที่แล้ว +67

    भगवंताचे नियम सर्वांना समान आहेत
    जन्म मृत्यू अटळ आहे
    आपल्या आवाजातून आपण अमर झाल्या दीदी
    भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ।

    • @ArchanaKanitkar-hb4es
      @ArchanaKanitkar-hb4es 8 หลายเดือนก่อน

      Surely we miss a lot Smita & of course Lata didi🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @bhandarenarsing2223
    @bhandarenarsing2223 3 ปีที่แล้ว +55

    असे चित्रपट, कलाकार, संगीतकार, गीतकार, गायक पुन्हा होणे नाही.
    धन्य ती गायनी कळा.
    Lyrics katta आपले आभार 🌸🙏

  • @BabasahebKshetre-bo7ws
    @BabasahebKshetre-bo7ws 6 หลายเดือนก่อน +3

    Beatifuls song

  • @snehalkumbhar-malusare8684
    @snehalkumbhar-malusare8684 3 ปีที่แล้ว +361

    भगवंताची सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणजे लतादीदी आणि त्यांचा थेट हृदयाला जाऊन भिडणारा आवाज.

  • @rajishg
    @rajishg 2 ปีที่แล้ว +171

    I am from kerala... No words about this song... And Smitha Patil... What a fine talented actor... Cannot forget her... I thought if she had not died... She would have gained at least a few more national awards... I truly loved her performances 😪

    • @savitripawar9952
      @savitripawar9952 2 ปีที่แล้ว

      Ppp

    • @kishormahajan7512
      @kishormahajan7512 ปีที่แล้ว +3

      Her talent as actress is beyond Oscar award. She is still Best in our memories.

    • @suyogkajarekar4534
      @suyogkajarekar4534 ปีที่แล้ว

      Shevat zopli raj babbar kade

    • @sunandakamble784
      @sunandakamble784 ปีที่แล้ว

      Personal life jyache tyache
      Comments koni krun upyog nahi.itar 100 gun pahave.vel changala karani lagel.

    • @bhalchandramane5026
      @bhalchandramane5026 ปีที่แล้ว +1

      Queen of Indian cinema

  • @pratyushkulkarnii
    @pratyushkulkarnii 4 หลายเดือนก่อน +3

    गेले ते दिवस... राहिल्या त्या आठवणी.

  • @varad.9_9_2.
    @varad.9_9_2. 2 ปีที่แล้ว +36

    सुरुवातीच्या 14 सेकंदाच्या संगीतातच हे हृदय पिघळते 👍🙏

    • @ashishthakur9054
      @ashishthakur9054 ปีที่แล้ว +1

      संगीत हृदयनाथ मंगेशकर, लेखक वसंत बापट, गायन लता मंगेशकर ❤

  • @savitakandalkar5300
    @savitakandalkar5300 3 ปีที่แล้ว +29

    किती तरी वर्षांनी ईतकं सुंदर गाणं ऐकायला मिळालं,मला खूप आवडतं हे गाणं.आणि गायिका तर आवडीच्या आहेतच ,...परंतु नायिका ही तेवढीच आवडीची आहे.खुप सुंदर गाणं आहे.माझ्या डोळ्यापुढे श्री कृष्ण उभा राहतो.आणि पूर्ण सिनेमा सुद्धा आठवला.धन्यवाद गाणं ऐकवल्या बद्दल.

  • @nitinkurhade3409
    @nitinkurhade3409 4 หลายเดือนก่อน +10

    ज्या व्यक्ती अशी गाणी ऐकतात ना ... त्या व्यक्ती अतीशय संवेदनशील व्यक्ती असतात असे माझे मत आहे

    • @Kulashree902
      @Kulashree902 2 หลายเดือนก่อน

    • @sudhirkulkarni229
      @sudhirkulkarni229 หลายเดือนก่อน

      मलाही तसेच वाटते..

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 หลายเดือนก่อน

      ajibaat nahi . khup vikruthi mi pahile aahet

  • @vikasovhal545
    @vikasovhal545 26 วันที่ผ่านมา +2

    लहानपणाची आठवण झाली हे गाण पहाटेच्या वेळी रेडिओवर लागायचे

  • @arban1979
    @arban1979 3 ปีที่แล้ว +245

    Music has seriously no language...i am a bengali and understood each and every word just by listening to this and getting myself immersed in this blissful praise of the Sun lord. In the end my eyes were really welled and tears rolling down my cheeks. After i searched in google to verify if i had interpreted it correctly and i was right. Without even understanding Marathi, i understood every word of it. Such is the magic of this immortal composition and the marvel of the living legend, an avatar of Ma Saraswati herself. Music is beyond any language or culture.

    • @jayrashtrahindavi2089
      @jayrashtrahindavi2089 2 ปีที่แล้ว +2

      Excellent words

    • @le_renait5319
      @le_renait5319 2 ปีที่แล้ว +5

      Yes Arindam. I agree, music / philosophy /knowledge transcends all differences. Similarly, I understood 'ekla cholo re', without any working knowledge of Bengali. Language enriches our lives, it should not stop us from limiting our knowledge! Best wishes!

    • @learnwithbroister4173
      @learnwithbroister4173 2 ปีที่แล้ว +6

      No words bro.... U penned down feelings of many 👍👍♥️

    • @dnyandam5772
      @dnyandam5772 2 ปีที่แล้ว +4

      Words are understood because it's in sanskrit. Marathi language has most words from sanskrit alike Bangla also. That's why you are able to get the full meaning of song.

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 2 ปีที่แล้ว +2

      This is sanskritised Marathi, that way I understand many words in Kannada,

  • @rangraginiseema
    @rangraginiseema 2 ปีที่แล้ว +1

    Lata.didi...Smith.patil
    Jabardast..

  • @rajshrisalunke5335
    @rajshrisalunke5335 3 ปีที่แล้ว +18

    परमेश्वराने दिलेले नक्षत्राचं देणं म्हणजे लतादिदी!!!!!!!!

  • @srikrishnaekwade5612
    @srikrishnaekwade5612 2 หลายเดือนก่อน +1

    he geet ayktana dole bharun aale.

  • @maheshpatil8404
    @maheshpatil8404 3 ปีที่แล้ว +15

    वसंत बापट ह्यन्च्यसाठी एक कृतड़न्य अश्रु.. थैंक यू..मन मोकळ होत जेव्हा कंठ दाठतौ ऐकुन..

  • @dattapokharkar74
    @dattapokharkar74 2 ปีที่แล้ว +5

    स्मिता पाटील एक पर्व अभिनयाचं आणि हे गीत अप्रतिम

  • @ganeshsathe1947
    @ganeshsathe1947 2 ปีที่แล้ว +14

    Lata Didi ...Tumtya sarkha awaj hya bhutalavar honar nahi...Aaj tumhi sodun devaghari gelat pan tumcha aawaj aamchya manatun gunjat rahil...Tumcya aatmyas shanti milo🙏🙏🙏

    • @purushottamdeshprabhu7427
      @purushottamdeshprabhu7427 2 ปีที่แล้ว

      वाह साठे साहेब! काय शब्दात आपण श्रद्धांजली वाहिलीत. आमच्या जवळ काही शब्दच नाही उरले लिहायला 🙏🙏🙏

  • @kamalbhumbare8771
    @kamalbhumbare8771 4 หลายเดือนก่อน +2

    Inspiring prayer❤

  • @GitaBhujle
    @GitaBhujle 2 หลายเดือนก่อน +1

    Wow, what a fantastic song. Thanks to everyone for this song. ❤

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 3 ปีที่แล้ว +53

    सर्वांगसुंदर निसर्ग निर्मिती म्हणजे लता दीदी यांचा मधुर आवाज। 🌹🌹

  • @amrutakinikar6242
    @amrutakinikar6242 7 หลายเดือนก่อน +6

    गाण्याला कोणताही शब्द अपुरा पडेल...कानाची अन मनाची तृप्ती करून घ्यायची...लता मंगेशकर ला साष्टांग दंडवत ❤

    • @umeshsidhaye1396
      @umeshsidhaye1396 หลายเดือนก่อน

      गीतकार, संगीतकार, म्युझिक अरेंजर आणि गायक या सर्वांच्या सहभागातून अप्रतिम गाणे तयार होत असते

  • @Mrprashant66
    @Mrprashant66 2 หลายเดือนก่อน +1

    Vasant bapat wrote an everlasting classic

  • @LalitChitre-ue5rq
    @LalitChitre-ue5rq 9 หลายเดือนก่อน +2

    What a sweet song with sweet words Jan 24

  • @prakashsaitwal811
    @prakashsaitwal811 2 ปีที่แล้ว +34

    लता दीदी आपणास भावूर्ण श्रद्धांजली आता अशी सरस्वती आपल्याला कधीच नाही मिळणार

  • @hemakaore8451
    @hemakaore8451 2 ปีที่แล้ว +15

    जेव्हा जेव्हा मन अस्वस्थ असतं, हे गाणं ऐकावं. अगदी प्रसन्न आणि शांत वाटतं. हे गाणं मी दिवसभर पुन्हा पुन्हा ऐकू शकते. लहानपणी ची आकाशवाणी वरील गाणी ......सगळीच उत्तम 👌👌💜

  • @skmrunal4u
    @skmrunal4u 4 ปีที่แล้ว +68

    अद्भुत देणगी अशी ही निर्मिती आहे आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्याला हे ऐकता येतेय .. धन्यवाद

  • @manasikhire3285
    @manasikhire3285 4 ปีที่แล้ว +69

    असा आवाज परत कधीच होणार नाही, वाढदिवसाच्या खूप, खूप शुभेच्छा दीदी 🌹🌹

    • @shubhanginatu4635
      @shubhanginatu4635 3 ปีที่แล้ว

      वाढदिवसाच्या अनेक मंगलमयी शुभेच्छा लता दीदी तुम्ही ग्रेट आहात

    • @yaomusicindia6769
      @yaomusicindia6769 2 ปีที่แล้ว

      Agadi khara aahe... Asa aawaj kadhich parat yenar naahi.... 🙏 lata ji 🙏

  • @parmodbhore6808
    @parmodbhore6808 ปีที่แล้ว +3

    लता दीदी शाश्वत सरस्वती होत्या

  • @nirajnandanikar541
    @nirajnandanikar541 11 หลายเดือนก่อน +2

    Bhaktibhavacha utkrishta aavishkar

  • @swarupshigwan8527
    @swarupshigwan8527 7 หลายเดือนก่อน +4

    अस्खलित शुद्ध मराठी शब्दांत लिहिलेलं सुंदर गाणं आहे ❤

  • @tulsidaskhandelwal1416
    @tulsidaskhandelwal1416 4 ปีที่แล้ว +35

    Vishudhha marathi, ek ek shabd janu manik moti!

  • @सुधीरशेलार
    @सुधीरशेलार ปีที่แล้ว +2

    Late Smita patil madam yancha ha cinema khup inspire karto..great acting legendary

  • @vasantnaik7176
    @vasantnaik7176 4 หลายเดือนก่อน +3

    शब्द,स्वर तालांनी नटलेल्या साक्षात ईश्वराचे हे त्रिगुण संपन्न ,पण महोक रुप गीताच्या माध्यातून ज्या कलाकारांनी स्रुजन केले त्यास,धन्यवाद!अमृतगीत आहेस!

  • @kiranPatil-ib5nc
    @kiranPatil-ib5nc 2 ปีที่แล้ว +4

    मनुष्यजन्म येतो आणि जातो पण हे गाणं नेहेमी चिरतरुण राहील.

  • @vaibhavsalgar1630
    @vaibhavsalgar1630 3 ปีที่แล้ว +29

    Missing Smita Patil..The Legendary..Actress..

  • @explore_happyness
    @explore_happyness 4 หลายเดือนก่อน +2

    निःशब्द! एकांतात बसलो की हे गाणं आवर्जून ऐकावं वाटतं...

  • @madhurijoshi2528
    @madhurijoshi2528 10 หลายเดือนก่อน +6

    खूप छान भावपूर्ण आणि प्रसन्न वाटते हे गाणे प्रार्थना ऐकल्यावर ❤

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 ปีที่แล้ว +2

    माझी शाळा भिंगार हायस्कूल ची प्रार्थना

  • @nimeshnaik6877
    @nimeshnaik6877 2 ปีที่แล้ว +7

    स्वर सम्राज्ञी गानकोकिळा उच्च सांगीतीक क्षमता असलेली मंगेशकर घराण्यातील गायिका लता मंगेशकर यांच्या स्वर्गीय आवाजात गायलेले गाणे आहे खुप छान अप्रतिम संगीत 🙏🙏🙏

  • @saralyog4203
    @saralyog4203 5 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम गाणे ......
    अंतरात्म्या पासून लिहिलेले .....
    अंतरात्म्या पासून गायलेले ......
    अंतरात्मा पासून अभिनयात साकार केलेले...
    अतिशय सुंदर गीत.....

  • @ashuplz8134
    @ashuplz8134 ปีที่แล้ว +3

    Smitapatil ani latadidi ashyahonenahi

  • @rajendrashinde3094
    @rajendrashinde3094 ปีที่แล้ว +2

    शास्त्रीय गायन हीच आपली खरी ओळख...

  • @radhamenon9002
    @radhamenon9002 3 ปีที่แล้ว +41

    These films were rooted in reality. The lyrics, the performers and above all the magical voice of Lataji. Who can forget Smita Patil??

  • @Dhruv.13
    @Dhruv.13 2 ปีที่แล้ว +5

    मी शाळेत असताना ही प्रार्थना आम्हाला होती ; आज खरचं डोळे भरून येतात, रात्री तर स्वप्न पडते की मी शाळेत जाऊन या प्रार्थनेला उभा आहे असं.

  • @upkant
    @upkant 3 ปีที่แล้ว +71

    We used to listen this song on radio early moring when we getting ready for school. Its so refreshing and treat to ears to listen

  • @deepikasawale6870
    @deepikasawale6870 2 ปีที่แล้ว +6

    दीदी स्मिता ताई आज दोघीही नाहीत पण या गाण्यात आहेत

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 5 หลายเดือนก่อน +4

    मार्मिक अर्थपूर्ण मधुर मराठी गीत संगीत कलाकार! भावपुर्ण आदरांजली!

  • @vishalsanap.
    @vishalsanap. 9 หลายเดือนก่อน +1

    छान गाणे मन प्रफुल करणारे..
    अजून कोणी अशीच काळाच्या पडद्या आड गेलेली गाणे सुचवा must listen Marathi प्रेरणा दायी गाणे कृपया...

  • @prasadsitaprao8650
    @prasadsitaprao8650 10 หลายเดือนก่อน +1

    Latadidi great song

  • @vidyagadekar2618
    @vidyagadekar2618 2 ปีที่แล้ว +3

    Apratim

  • @Mjayshivaji
    @Mjayshivaji 2 ปีที่แล้ว +13

    भावपूर्ण श्रद्धांजली...,,,,😢💐🙏🇮🇳हि पोकळी कशी भरून निघणार...,😔😔😭

  • @prabhakarlimaye7297
    @prabhakarlimaye7297 ปีที่แล้ว +2

    प्रत्येक घरात ही प्रार्थना म्हटली गेली पाहिजे.
    लिमये.

  • @swapnilsonawane9874
    @swapnilsonawane9874 หลายเดือนก่อน +2

    हे गाणे सूर्यदेवाला उद्देशून आहे. गाण्यात वापरलेली सर्व रूपके, सर्व विशेषणे सूर्यदेवाला चपखल लागू होतात.
    सूर्य हाच ह्या सृष्टीचा निर्माता, पालनकर्ता, आणि विलयकर्ता.

  • @pranavbam4769
    @pranavbam4769 2 ปีที่แล้ว +2

    मी देव फक्त मूर्तीत / फोटोत/ कल्पना केली होती लती मंगेशकरांच्या रूपाने सरस्वती चे दर्शन झाले

  • @nirajnandanikar541
    @nirajnandanikar541 11 หลายเดือนก่อน +1

    Bhaktibhavache utkrishta aavishkar!

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 5 หลายเดือนก่อน +2

    सत्य परीस्थिती वर आधारित तो चीत्रपट महान, अजरामर कलाकृती आहे!

  • @umeshdandawate1591
    @umeshdandawate1591 3 ปีที่แล้ว +32

    These are rich heritages....lighthouses for the generations to come...to keep them bound to our roots....

    • @sumitgpatil
      @sumitgpatil 2 ปีที่แล้ว +2

      Yeah, bring tears in eyes...

    • @arsreedhar
      @arsreedhar 8 หลายเดือนก่อน +1

      Profound expression that captures the essence. Thanks for sharing your thoughts. Sri.

  • @shankarlalsharma5150
    @shankarlalsharma5150 11 หลายเดือนก่อน +3

    ,❤️ निः शब्द ❤️🙏

  • @shubhampatil.mh1951
    @shubhampatil.mh1951 ปีที่แล้ว +2

    खान्देशकन्या स्वर्गिय स्मिता पाटील

  • @dattatraygaikar
    @dattatraygaikar 19 วันที่ผ่านมา

    तेजाने ,तेजाची केलेली एक सुंदर आरतीरूपी कलाकृती

  • @VishalPatil-fb4io
    @VishalPatil-fb4io ปีที่แล้ว +1

    My mom look like smit patil, she no more us. I missing her every son.....

  • @vijaythombare3142
    @vijaythombare3142 8 หลายเดือนก่อน +2

    लहान पनी खूप वेळा ऐकले,आज ही परत परत ऐकतो मी

  • @girishchavan133
    @girishchavan133 3 ปีที่แล้ว +21

    Latadidi is Saraswati maa of Music no one can touch her songs 🙏

  • @vipinsukumaran8936
    @vipinsukumaran8936 7 หลายเดือนก่อน +1

    Lathaji pranams

  • @swanandgosavi4262
    @swanandgosavi4262 9 วันที่ผ่านมา +1

    Listening to this masterpiece om birthday of Lata didi ❤❤

  • @silife750
    @silife750 4 ปีที่แล้ว +25

    Aprateem! Divine experience! Asa composition aajchya music directors kadna shakkyach nahi!!

  • @gitanjalibrahme5751
    @gitanjalibrahme5751 2 ปีที่แล้ว +2

    Only Pandit Hridaynath Mangeshkar can give such a wonderful music.
    फक्त पंडित हृदयनाथ मंगेशकर च इतके सुंदर संगीत देऊ शकतात.

    • @MrAmitrege
      @MrAmitrege 8 หลายเดือนก่อน

      नक्कीच, मला हे "परम पुरुष नारायण" ही तिलक कामोद निबद्ध दीनानाथ मंगेशकर ह्यांची बंदिश सारखं वाटलं

  • @mangalaparadkar7887
    @mangalaparadkar7887 3 หลายเดือนก่อน +2

    ,👋 आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आणि शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी केली तेव्हा शाळेतील विद्यार्थ्यांनाही हे गीत म्हणून घेत होतो
    स्मिता पाटील ची आठवण येते खरंच खूपच सुंदर अभिनय केला होता अजूनही गाणं ऐकलं की त्या डोळ्यासमोर येतात
    ,👋

  • @Prafullasvlogs7001
    @Prafullasvlogs7001 ปีที่แล้ว +1

    Lata jincha awaj kay sangu shabdacha nahi majya kade kiti stuti karavi kamicha ahe🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤🐱🐱🐱🐱🐱👌👌👌👌👌

  • @mayuriurhe9374
    @mayuriurhe9374 3 ปีที่แล้ว +8

    आताच्या काळात अशी संगीत खूप कमी आहेत
    अप्रतीम 👍👌👌👌

  • @gokulsuperstore1774
    @gokulsuperstore1774 2 ปีที่แล้ว +30

    Whenever you are depressed, unmotivated... Listen to this beautiful song sung by Legendary Lata Mangeshkar JI. Brilliant thoughts penned down by Vasant Sathe JI & equally brilliant music given by Pt. Hridaynath Mangeshkar. Divine... Divine... Divine... Jay HO...

  • @muksaxiom4848
    @muksaxiom4848 2 ปีที่แล้ว +4

    Who's listening this song after Lata ji' s demise?

  • @profdrprashantmukadam6439
    @profdrprashantmukadam6439 3 ปีที่แล้ว +56

    Basically it becomes devine as it prays gratitude to the Sun ☀️ and the 🌙, great concept, music, words, rhythm, Smita, & Latadidi☀️🙏🏻🙏🏻🌙

  • @pratibhabadgujar2094
    @pratibhabadgujar2094 2 ปีที่แล้ว +5

    प्रत्येक शब्दात आलाप घेतलाय! कित्ती कठीण व तितकेच सुंदर आहे गीत 👌🏻👍🏻खूप छान. लता दिदिंची उणीव नेहमीच भासत राहीन.

  • @savarnashewale4405
    @savarnashewale4405 2 ปีที่แล้ว +3

    मी हे गाण पहिल्यांदाच ऐकतेय पण ह्या अधि मी हेच गाण म्हणत होते
    'गगन सदन तेजोमय' एवढेच ह्या पुढे मला येत नव्हत. 😌🪕

  • @rajeshkedar6297
    @rajeshkedar6297 ปีที่แล้ว +2

    रोज सकाळी लवकर उठून ही प्रार्थना ऐकावी

  • @anilachyutkeskar5373
    @anilachyutkeskar5373 หลายเดือนก่อน

    अप्रतिम स्वर्गीय स्वर माझ्या शाळेची आठवण

  • @deepakkulkarni1742
    @deepakkulkarni1742 2 ปีที่แล้ว +7

    Maharashtra will cry 😭 for centuries for sad demise of smitaji, Vilasrao ji, gopinath ji, early exit😞

  • @psm4727
    @psm4727 2 ปีที่แล้ว +3

    आम्ही शाळेत गावच्या ही प्रार्थना म्हणायची ,आई वडील शेतात राबवून आंहाला मोठं केलं ।

  • @kalpeshkhairnar
    @kalpeshkhairnar 2 ปีที่แล้ว +2

    मी शाळेत असताना हे गाणे आमची प्रार्थना होती.

  • @prateekjain8850
    @prateekjain8850 3 ปีที่แล้ว +4

    तिलक कामोद ... ❤️

  • @vilasgogawale2404
    @vilasgogawale2404 5 หลายเดือนก่อน +1

    सलाम लताजी दीदींना 🙏🏻🙏🏻🙏🏻खूपच सुंदर ह्रदयस्पर्शी गाणं ❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻

  • @dineshmahadevawchar9899
    @dineshmahadevawchar9899 ปีที่แล้ว +2

    हे गाणे ऐकल्यावर खरंच मन खुप प्रसन्न होते... एक नवीन ऊर्जा मिळते जिवन जगण्यासाठी... लता दीदींना प्रणाम करतो की किती सुंदर अप्रतिम गायन केले आहे त्यांनी...

  • @shraddhaphatak8245
    @shraddhaphatak8245 4 ปีที่แล้ว +14

    अप्रतिम सादरीकरण,काव्य, संगीत रचना,गायन...सगळंच मनभावन..!!

  • @pralhadakolkar8712
    @pralhadakolkar8712 2 ปีที่แล้ว +3

    स्मिता...लता....अभिनय..गाणं...सुवर्ण योग. प्रणाम....धन्यवाद. श्रीराम.

  • @b.r.morevlogs
    @b.r.morevlogs ปีที่แล้ว +2

    दसरा दिवाळीचे दिवस सकाळी झी टॉकीज वर गीत लागायचे आई सुगंधी उटणे लावून आंघोळ करून द्यायची. 😊 माझ्या अनेक छान आठवणी या गितासोबत जुळलेल्या आहेत.

  • @drmayookhdave
    @drmayookhdave ปีที่แล้ว +2

    S patil , non arguably has the greatest screen presence in whole Bollywood of all time.

  • @smarankulkarni6543
    @smarankulkarni6543 11 หลายเดือนก่อน +1

    स्मिता पाटील, लता मंगेशकर आणि ह्या गाण्यातला साधेपणा ❤️

  • @ninakotian6379
    @ninakotian6379 4 ปีที่แล้ว +23

    Takes u to a different world.... Transcend to a different zone