सत्यम शिवम सुंदरा | Satyam Shivam Sundara | Song With Lyrics | Uttara Kelkar | Sushila Marathi Movie

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • Presenting you the "सत्यम शिवम सुंदरा | Satyam Shivam Sundara" Lyrical song in the voice of Uttara Kelkar from the he old Marathi black & white classic movie Sushila starring Ranjana, Ashok Saraf, Usha Naik & Avinash Masurekar. Music by Ram Kadam. Movie directed by Anant Mane.
    Song: Satyam Shivam Sundara | सत्यम शिवम सुंदरा
    Movie: Sushila
    Music: Ram Kadam
    Singers : Uttara Kelkar
    Director : Anant Mane Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/Subscrib...
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Google+
    plus.google.com...
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi

ความคิดเห็น • 678

  • @ketannakate2301
    @ketannakate2301 2 ปีที่แล้ว +406

    जी मुलं मराठी माध्यमातून शिकले त्या प्रत्येकाच्या आयुष्यभरातील आठवणींच्या गाठोड्यातील एक सुखकर आणि अविस्मरणीय अशी आठवण म्हणजे ही प्रार्थना .

    • @kushmhatre
      @kushmhatre ปีที่แล้ว +7

      Marathi sahlet amchya mali bayi kay god awajat he gan bolat aaj suddha athavun man anandit hoto kay te divas hote🙏

    • @AryanUdage
      @AryanUdage 9 หลายเดือนก่อน +1

      Agdi barobar

    • @Backbencher_777
      @Backbencher_777 9 หลายเดือนก่อน +2

      Tuzi comment dhapli bgh insta valyani ....mi aatach bghun ithe aalo hoto bhau

    • @anantawikhe6699
      @anantawikhe6699 8 หลายเดือนก่อน

      ❤❤❤

    • @AnkushPatil-i2j
      @AnkushPatil-i2j 8 หลายเดือนก่อน +1

      😢

  • @user-cv1qt7rq1s
    @user-cv1qt7rq1s หลายเดือนก่อน +4

    मी मराठी शाळेत शिकलो हे माझे भाग्य आहे व अभिमान आहे माय मराठी चा लहानपणी चे दिवस आठवले डोळे पाणावले

  • @pritishshinde302
    @pritishshinde302 2 ปีที่แล้ว +174

    इंग्रजी शाळांच्या हव्यासामुळे आणि अंधानुकरणामुळे आपण आपला हा खरा मराठी शाळांचा सोनेरी ठेवा घालवून टाकला...
    खरंच किती सुंदर होते ते बालपणीचे मराठी शाळांचे दिवस....आपणच आपल्या पुढील पिढीला इंग्रजी शाळांच्या वातावरणात ढकललं आणि आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो कि ह्या मुलांनी आपल्या मराठी संस्कृती ची जाण ठेवावी.. आपणच गोंधळून गेलेलो आहोत.. खरंच मुलांसाठी मराठी शाळा मध्ये ऍडमिशन घ्यायला सुरुवात करावी....
    फक्त भारतात इंग्लिश शाळांचे fad आहे... चीन फ्रान्स रशिया जपान आणि असे कितीतरी देश पिढ्यानंपिढ्या स्वतःच्या मातृभाषेत अभिमानानं शिक्षण देतात आपापल्या मुलांना... विचार करण्याची गोष्ट आहे...

    • @vaishaligosavi1332
      @vaishaligosavi1332 ปีที่แล้ว +3

      Kharach ahe...

    • @ganeshmhatre3925
      @ganeshmhatre3925 ปีที่แล้ว +1

      एकदम बरोबर

    • @aakashclasses2296
      @aakashclasses2296 ปีที่แล้ว +3

      7th std English medium मध्ये ही प्रार्थना आहे . ( महाराष्ट्र बोर्ड )

    • @nitinpawar8357
      @nitinpawar8357 ปีที่แล้ว +3

      हो आणि तो खडूचा वास❤

    • @mayasinju8994
      @mayasinju8994 ปีที่แล้ว +1

      😂

  • @sunilsalamwade
    @sunilsalamwade 3 ปีที่แล้ว +537

    पुन्हा जुन्या आठवणी जागा झाल्या आणि नकळत डोळ्यातून पाणी आलं...🥺 ज्या व्हरांड्यात मुलांना परिपाठासाठी जागा पुरत नसायची ते व्हरांडे आज सुनसान पडलेत...

    • @jyotikasare7168
      @jyotikasare7168 2 ปีที่แล้ว +5

      Barobar ahe

    • @arjunjadhav4425
      @arjunjadhav4425 2 ปีที่แล้ว +9

      खरं आहे,आपल्या सारखी अनेकांची अशीच भावना असेल..

    • @pallavichavan3602
      @pallavichavan3602 2 ปีที่แล้ว +4

      Aapnch jababdar ahot

    • @prajaktathakur2233
      @prajaktathakur2233 2 ปีที่แล้ว +15

      याला जबाबदार पालक च आहेत. इंग्लिश शाळेचे आकर्षण .high class दाखवण्याची हौस

    • @kiranshelke7565
      @kiranshelke7565 2 ปีที่แล้ว +2

      Barobar bhava

  • @RahulKore-u6e
    @RahulKore-u6e 2 ปีที่แล้ว +176

    ही प्रार्थना ऐकल्यानंतर क्षणभर भूतकाळात रममाण झालो...
    कारण आमच्या बाईसुद्धा खूप छान गायच्या...
    डोळ्यातून पाणी आले आणि पुन्हा वाटले की आपण पुन्हा त्या वर्गात जाऊन बसावं....😢

    • @ganeshkamble4258
      @ganeshkamble4258 ปีที่แล้ว +3

      डोळ्यात पाणी येणार अस होत ते बालपण शाळा आणि ती प्रार्थना जशी त्या तशी अजून आहे मनात , परत लहान होवून बसावं की काय शाळेत जावून अस मनापासून वाटत आहे ❤☺️😚🤗😍😭😭😭😭

    • @kishorsuradkar9644
      @kishorsuradkar9644 7 หลายเดือนก่อน

      Game ekayche. Man shant hoil

  • @bharatigaikwad3015
    @bharatigaikwad3015 2 ปีที่แล้ว +255

    हे सर्व मराठी शाळेमध्ये शिकवले जाते गुणवत्ता शिक्षण संस्कार ❤️👍🙏

    • @nitin9749
      @nitin9749 2 ปีที่แล้ว +6

      अजूनही शब्द न् शब्द पाठ आहे

    • @sonal...8884
      @sonal...8884 ปีที่แล้ว +2

      Barobar 👍

    • @bhakti7653
      @bhakti7653 ปีที่แล้ว +2

      Noo Amchya convent school madhe pan hoti he poem amhala 7 th class madhe

    • @Xxxv999
      @Xxxv999 ปีที่แล้ว

      या शाळा सध्या बंद पाढण्या चे कारण म्हणजे तिथे शिकविणारे जातीयवादी फुरोगमी त्यामुळे दर्जा घासरलेला आहे सध्या

    • @maheshdhumal1981
      @maheshdhumal1981 ปีที่แล้ว +1

      हे सर्व ज़िल्हा परिषद शाळेत शिकवले जायचे मी खूप भाग्यवान आहे कि मी ज़िल्हा परिषद शाळेत शिकलो 💐💐🙏🏻🙏🏻

  • @priyakakhopade9766
    @priyakakhopade9766 2 ปีที่แล้ว +195

    या गाण्याची आयुष्यभर आठवन जाणार नाही 🙏🙏

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 2 ปีที่แล้ว +76

    शाळा..... आयुष्यातला एक अविस्मरणीय काळ......आज ही प्रार्थना ऐकून आठवणींना उजाळा मिळाला..... आणि नकळत पापण्याही ओलावल्या 😢😭
    पुन्हा जगावेसे वाटतात ते दिवस...........

  • @hanmantbankar8137
    @hanmantbankar8137 4 ปีที่แล้ว +231

    पार्श्वगाईका उत्तरा केळकर यांनी गाईलेलं पहिलं मराठी गाणं. पुढं शाळेत ही प्रार्थना म्हणली जाऊ लागली..रंजना यांचा अविस्मरणीय अभिनय..

    • @krishnatgavhane204
      @krishnatgavhane204 3 ปีที่แล้ว

      KHUP KHUP Chan SUBHECHA SHRIGURUDEV

    • @saylirajendramohiter7716
      @saylirajendramohiter7716 3 ปีที่แล้ว

      हो

    • @prashantjamsandekar
      @prashantjamsandekar 3 ปีที่แล้ว +7

      आमच्या लाहापणीची प्रार्थना लहानपण खूप छान होते. उगाच मोठे झाले असे वाटते.

    • @mahendradevi3003
      @mahendradevi3003 3 ปีที่แล้ว +1

      Ok

    • @durvanikdhure576
      @durvanikdhure576 3 ปีที่แล้ว +1

      Ho

  • @gokuldaswadgure4796
    @gokuldaswadgure4796 3 ปีที่แล้ว +419

    हे सर्व जी.प. शाळेत शिकायला मिळायचे.मी भाग्यवान अाहे जी.प.शाळेत शिकलो

    • @prakashchopkar1230
      @prakashchopkar1230 2 ปีที่แล้ว +2

      Aho Saheb aadhi jilha parishad chyach shala hotya, aani sarasari Aapn ingraji shalet shikanyachi patrata hi thewat navhato. Aani Aata jilha parishad chya shaletahi ashya prarthana hot nahi.

    • @abhijeetkulkarni4868
      @abhijeetkulkarni4868 2 ปีที่แล้ว +7

      I am also lucky for the same

    • @vikrambabar2050
      @vikrambabar2050 2 ปีที่แล้ว +12

      भाऊ गेले ते दीवस राहील्या फक्त आठवणी दीवस आठवले की डोळ्यातून पाणी येते🙏🙏🙏🙏🙏

    • @Rahultathawade
      @Rahultathawade 2 ปีที่แล้ว +7

      मला सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेत असताना ही प्रार्थना खूप आवडायची. जुन्या आठवणी जाग्या होतात.

    • @Rahultathawade
      @Rahultathawade 2 ปีที่แล้ว +3

      मला सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेत असताना ही प्रार्थना खूप आवडायची. जुन्या आठवणी जाग्या होतात.

  • @swapnalikulkarni3412
    @swapnalikulkarni3412 3 ปีที่แล้ว +94

    माझ्या मुलाला ही प्रार्थना आहे आता शाळेत.... खूप वर्षानंतर ऐकण्यात आली प्रार्थना खरचं खूप सुंदर आहे शाळेचे दिवस आठवले. 😊

    • @vaibhtwok
      @vaibhtwok 2 ปีที่แล้ว +2

      Kuthalya shalet aahe ani kontya gavi?

    • @vaibhavsanap5350
      @vaibhavsanap5350 ปีที่แล้ว +1

      Reply kra vrchya comment la plz

  • @xyz-yf2rt
    @xyz-yf2rt 3 ปีที่แล้ว +104

    शाळतले दिवस आठवतात, 1984 साली 5वि ला पुण्यात आल्यानंतर, शाळेत हे प्रार्थनाचे दिवस आठवून भावुक करतात

  • @singer_Ganesh
    @singer_Ganesh ปีที่แล้ว +16

    खूप सुंदर आठवणी आहेत या, प्रत्येक गावातील शाळेत 1ली ते 10वी च्या वर्गाची मिळून किमान 1000 ते 1200 मुलांनी भरलेली पटांगण असायची आता तिथे फक्त्त 100 ते 120 मुलं दिसतात शाळेत😔किती सुंदर गुरु आणि तिथे होणारे सुंदर संस्कार, शिस्त, सर्व अगदी किती सुंदर होतं पण आता मात्र सर्व शाळा ओसाड पडल्यात, पुन्हा त्या सुंदर दिवसांची आठवण झाली. ही प्रार्थना सर्वात पुढे राहून गायचो आणि माझ्या मागून इतर मुलं गायची किती सुंदर दिवस होते ते 🙏🏻🙏🏻माझ्या संगीतमय दुनियेला प्रोत्साहन देणारी वाटचाल इथूनच सुरु झाली 🙏🏻🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻❤️❤️

    • @GaneshIngle-p1m
      @GaneshIngle-p1m 3 หลายเดือนก่อน

      Tumche mul kontya shalet aahet

  • @infectedsun4151
    @infectedsun4151 2 ปีที่แล้ว +30

    सकाळची वेळ, शाळेला जायची तयारी आणी टीव्ही वर हे गाणं ते दिवसच वेगळे होते...❤️

  • @sumitshinde7989
    @sumitshinde7989 3 ปีที่แล้ว +98

    🙏नतमस्तक होऊ या भवसागरा, ज्ञान मंदिरा!
    सत्यम शिवम सुंदरा.
    अप्रतिम प्रार्थना, कधीही ऐकली तरी मन प्रसन्न होते.🙂

  • @prawingurav5755
    @prawingurav5755 3 ปีที่แล้ว +86

    मराठी शाळा नाद खुळा ZP च्या शाळा 😘

  • @prasadchature1993
    @prasadchature1993 ปีที่แล้ว +12

    दुनियादारी मध्ये सगळा विसरून बसलो...... खूप उशीरा समजलं आपण, आपली मराठी भाषा, आपला महाराष्ट्र च सर्वश्रेष्ठ आहे 🙂💙❤️

  • @vilashkabale1598
    @vilashkabale1598 3 ปีที่แล้ว +67

    खूप छान कविता आहे. आम्हाला लहान असताना ही कविता शिकायला होती तेव्हा या कवितेने मनावर अशी एक छाप सोडली की,आज ही या कवितेची एक एक ओळ मला पाठ आहे.😇😇

    • @Yeshudas.pagare77
      @Yeshudas.pagare77 2 ปีที่แล้ว +2

      Kavita nahi hi prarthana aahe Dada 😊

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 2 ปีที่แล้ว +12

    आमच्चासारखे भाग्यवान कोणी नाही असे वाटते😊कारण हल्लीच्या शाळांमध्ये असे काही एेकायला नाही मिळत 😔किती छान सुंदर होते ते दिवस आठवले तरी डोळ्यात पाणी येते 😥😥 रंजना देशमुख यांचा अभिनय म्हणजे जशी निसर्गातील नॅचरलता असते तशी अभिनयातील नॅचरलता म्हणजे रंजना देशमुख👌🏻👌🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻❤😊🤗ऑल टाईम फेवरेट अभिनेत्री❤ आहेत रंजना देशमुख❤❤👌🏻👌🏻🤗🤗
    मी शितल🙏

  • @AryanUdage
    @AryanUdage 9 หลายเดือนก่อน +17

    जि.प. शाळेत शिकलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय गीत..,खोल्या जुन्या, जीर्ण जरी असल्या मात्र त्यात केले जाणारे विचार नावीन्यपूर्ण hote...

  • @amoljagtap6319
    @amoljagtap6319 2 หลายเดือนก่อน +3

    जी मुले मराठी शाळेत शिकले आहेत त्यांना अशा प्रकारे गीत म्हण्यात येतील.असे गीत आयकल्यावर मन परसन होते...

  • @dilippokale8035
    @dilippokale8035 ปีที่แล้ว +6

    मी रयत शिक्षण स्वस्था 1990 92 मधे
    डोळे मिटून ही प्रार्थना म्हणत असे नारायणराव सणस विधालाय आ ठ विते
    दहावी

  • @yogeshwarkahandole7984
    @yogeshwarkahandole7984 3 ปีที่แล้ว +57

    अजुन पण काही शाळांमध्ये रोज घेतली जाते.. कर्मवीर काकासाहेब वाघ विद्यामंदिर भाऊसाहेब नगर,ता.निफाड नाशिक

  • @chandrakantshaha8920
    @chandrakantshaha8920 ปีที่แล้ว +59

    Listening today by uttara kelkar , awesome, after 40 years , liked it

  • @tilakjain9497
    @tilakjain9497 9 หลายเดือนก่อน +4

    हे फक्त एक गाणं नसून ह्या माघे खूप साऱ्या आठवणी दडलेल्या आहेत.... आम्हाला ही बालवाडी ते चौथी पर्यंत प्रार्थना होतो🙏 काय ते दिवस काय ते वर्ग शिक्षक शिक्षिका..... आयुष्यातील सर्वात सुवर्ण क्षण....! Miss that golden days😢

  • @dhirajmahajan3747
    @dhirajmahajan3747 2 ปีที่แล้ว +16

    🌿सत्यम शिवम सुन्दरा🚩
    खुप छान प्रार्थना आहे , यात शंकराला विनंती केली आहे ती आपल्या प्रगती ची .

  • @prakashchavan8454
    @prakashchavan8454 2 ปีที่แล้ว +25

    खूप छान प्रार्थना गीत आहे . आम्ही शाळेत असताना हा कृष्णधवल चित्रपट प्रदर्शित झाला होता . अप्रतिम गाण्यांचा अप्रतिम चित्रपट खूपच छान .

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 ปีที่แล้ว +18

    हे गीत जवानी जिल्हा परिषद शाळेत शिकत होतो त्यावेळेस ऐकायला मिळायचे आणि खूप आनंद वाटायचा आताही ऐकल्यावर आनंद वाटतो आत्ताच्या पिढीला हे गीत गरजेचे आहे धन्यवाद जय हिंद जय भारत

  • @ruturaj1
    @ruturaj1 3 ปีที่แล้ว +103

    शाळेतले दिवस आठवले❤️

  • @hemantkadlag2848
    @hemantkadlag2848 2 ปีที่แล้ว +8

    माझ्या मुलाला जिल्हा परिषद मध्येच टाकले आहे, ज्या शाळेत मी शिकलो.....तिथे आज पण ही प्रार्थना होते....खरा तो एकची धर्म...ही पण होत होती

  • @rajendrashahane6231
    @rajendrashahane6231 ปีที่แล้ว +12

    शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा,सर्व गुरू जणांनी ,शिक्षकांनी आम्हाला जे ज्ञान दिले त्या गुरू जनांचे आम्ही सदैव ऋणी आहोत,अतिशय सुंदर रचना या दिना निमित्त गुणी कलाकार रंजना जी ,गायक उषा मंगेशकर जी ,गीतकार व संगीतकार यांना सादर प्रणाम .🙏🙏🏵️🎵🎶🎶🎉🎉🎊🎊🌈🌈

  • @yugeshpimparkar
    @yugeshpimparkar 11 หลายเดือนก่อน +3

    खरचं मला माझे शाळेचे दिवस आठवले. आणि लगेच डोळयांत पाणी आले. ज्या शाळेने मला हे शिकवले आत्ता ती शाळा बंद झाली याच दुःख आहे तरी खूप जवळ पास १० वर्षांनी ही प्रार्थना ऐकली खूप चांगल वाटलं

  • @ShubhamYadav-vn3iu
    @ShubhamYadav-vn3iu 7 หลายเดือนก่อน +4

    अतिशय सुंदर सुरेल संगीत वाईट याच वाटतंय की आमच्या पिढीनंतर सर्वच बदलून गेलं 😢...

  • @Asheish4195
    @Asheish4195 ปีที่แล้ว +4

    लेखन, गायन, संगित, अभिनय, कला दिग्दर्शन, संकल्पना... सगळंच अगदी परिपूर्ण... यालाच दर्जा म्हणतात.

  • @snehachavan9810
    @snehachavan9810 6 หลายเดือนก่อน +4

    I'm 18 year old girl. Aamchya shaalet aamhi hi prarthana mhanaycho. Golden days 😌

  • @shivajikamble1013
    @shivajikamble1013 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम, विशवरमीय. न विसरुन जाणारी पार्थना.

  • @rushiargade7828
    @rushiargade7828 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम ! शाळेचे जुने दिवस आठवले ............सोनेरी दिवस .

  • @mangeshpatil4802
    @mangeshpatil4802 2 ปีที่แล้ว +9

    पुन्हा ते जिल्हा परिषद शाळेचे दिवस डोळ्यासमोर येऊन गेले.
    💐💐💐🙏🙏🙏

  • @simranrajsingh879
    @simranrajsingh879 2 ปีที่แล้ว +90

    What a song still refreshing, energetic, authentic always best

  • @ravindraborude1743
    @ravindraborude1743 2 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम . माझ्या अतिशय आवडीची प्रार्थना आहे. 👍👌

  • @monaamasan8235
    @monaamasan8235 2 ปีที่แล้ว +7

    सत्यम शिवम सुंदरा. सत्यही शिव है. My the most favourite

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 2 ปีที่แล้ว +4

    हा चित्रपट मी सहा ते सात वेळा पाहिला. खुपचं छान
    किरदार व कहाणी.

  • @suryakantmahamuni..8800
    @suryakantmahamuni..8800 2 ปีที่แล้ว +6

    खरेच हे गीत ऐकल्यावर आपल्याला चांगली उर्जा मिळते खूप छान वाटत

  • @yuvrajgharbude4585
    @yuvrajgharbude4585 หลายเดือนก่อน +1

    मी लहानपणी मामाच्या गावाला zp शाळेत होतो... दररोज सकाळी ही prathana म्हणायचो.. जुन्या आठवणी जाग्या झाल्या ❤❤❤

  • @Rahultathawade
    @Rahultathawade 2 ปีที่แล้ว +7

    मला सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेत असताना ही प्रार्थना खूप आवडायची. जुन्या आठवणी जाग्या होतात.

  • @vaibhavsupsande2631
    @vaibhavsupsande2631 3 ปีที่แล้ว +10

    भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आणि चिरंजीव आहे. 🙏

  • @kiransalunkhe9213
    @kiransalunkhe9213 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम आहे या प्रार्थना कधीही न विसरता येणार नाहीत. कानावर पडताच मन्न अगदी भरून येते.

  • @patilprajakata225
    @patilprajakata225 2 ปีที่แล้ว +9

    खूप छान,,,आमच्या वेळी शाळेत ही प्रार्थना म्हणायचो..त्या दिवसांची आठवण आली.

    • @Rahultathawade
      @Rahultathawade 2 ปีที่แล้ว

      मला सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेत असताना ही प्रार्थना खूप आवडायची. जुन्या आठवणी जाग्या होतात.

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 3 ปีที่แล้ว +6

    हरहरमहादेव खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप छान गोडश्ववणीयगीत आहे

  • @sachinadgale3200
    @sachinadgale3200 3 ปีที่แล้ว +13

    जुने दिवस आठवले ही प्रार्थना ऐकली की एक प्रकारची वेगळीच नशा चढायची.

  • @siddhantnikalje3314
    @siddhantnikalje3314 หลายเดือนก่อน +2

    खूप छान लहानपणीच्या आठवणी 😢😢

  • @damayantinavale9005
    @damayantinavale9005 ปีที่แล้ว +2

    आमची दर शनिवारची प्रार्थना ... मन खूप प्रसन्न व्हायचं ही प्रार्थना झाली की ... माझी आवडती प्रार्थना🙏

  • @blogwithakshay
    @blogwithakshay 11 หลายเดือนก่อน +2

    He समोरील मुले आता कुठे असतील 😊😊

  • @shashankraut7825
    @shashankraut7825 3 ปีที่แล้ว +11

    Yacha sarkha kahi nahi🙏🙏🙏

  • @SaheerMehtaofficial1266
    @SaheerMehtaofficial1266 2 ปีที่แล้ว +5

    यातील मुलं आता किती वयाची झाली असतील ...मस्त गायन...👌👌👌

  • @omkarghone48
    @omkarghone48 หลายเดือนก่อน +1

    असा स्वर्ग फक्त मराठी शाळेमध्ये च

  • @ankushgavale7646
    @ankushgavale7646 3 ปีที่แล้ว +13

    अप्रतिम पाठशाळा आठवणी जाग्या झाल्या 1981 ते 1984 या वेळेची

  • @prabhakarkudalkar1910
    @prabhakarkudalkar1910 3 ปีที่แล้ว +15

    अप्रतिम मनाला भावनिक करून तनमनाला भेदून जाणारी प्रार्थना

  • @satishgorivale5052
    @satishgorivale5052 3 ปีที่แล้ว +12

    Shala aathvali bhavano .. pani ale dolyat

  • @gajanangaiki9976
    @gajanangaiki9976 3 ปีที่แล้ว +17

    Salute to Jagdish khebulkar and Ram kadam uttara Kel kar Ranjana beautiful songs in movie Sushila 1977

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe ปีที่แล้ว +1

    शाळेत असताना मी अनेकदा ही प्रार्थना म्हंटली आहे. पुन्हा शाळेत जाऊ वाटतंय. मला माझी शाळा आठवली. मी खूपच भावूक झालोय. माझी जि.प. हायस्कूल, भोकर.

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale5103 3 หลายเดือนก่อน +1

    लहानपणी शाळेत म्हणायचो आम्ही हे गाणं .... मी आणि माझी दीदी .... जुने दिवस आठवले 1990 चा काळ खूप छान होता .... 😊

  • @sunandadhonde2737
    @sunandadhonde2737 ปีที่แล้ว +16

    Best prayer thank you for all team

  • @Harsh-dk8sl
    @Harsh-dk8sl ปีที่แล้ว +1

    सत्यम शिवम सुंदरा
    सत्यम शिवम सुंदरा
    सत्यम शिवम सुंदरा
    सत्यम शिवम सुंदरा
    सत्यम शिवम सुंदरा

  • @manishatiwari4906
    @manishatiwari4906 3 ปีที่แล้ว +12

    Miss you school days

  • @yogeshsurse9384
    @yogeshsurse9384 2 ปีที่แล้ว +7

    पैशांची कितीही श्रीमंती आली तरी ते दिवस परत नाही येणार

  • @vasantkamble3499
    @vasantkamble3499 4 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर गाणे आहे,
    आता असे गाणे होणे, अशक्य .
    जूने ते सोने म्हणतात ते खरे..

  • @gayatrichaudhari5724
    @gayatrichaudhari5724 2 ปีที่แล้ว +32

    Still refreshing my soul,mind

  • @priyankafulsundar6570
    @priyankafulsundar6570 8 วันที่ผ่านมา

    हि प्रार्थना आम्ही चार जणीमिळुन सगळ्या शाळे समोर म्हणायचो खुप आनंद झाला माझी मुलगी पण आज हि प्रार्थना शाळेत बोलणार आहे

  • @sagarkamble9828
    @sagarkamble9828 3 ปีที่แล้ว +13

    शाळेतले दिवस आठवले

  • @sidharthahercivil48
    @sidharthahercivil48 9 หลายเดือนก่อน +2

    या गाण्याची आयुष्यभर आठवन जाणार नाही 👏👏👏👏

  • @jagadishdattalatay1332
    @jagadishdattalatay1332 10 หลายเดือนก่อน +1

    स्वातंत्र्य कवी गोविंद रामचंद्र दरेकर यांच्या ' भास्वर तुज सम भास्वर तूच भारता ' या गीताला राम कदम यांनी संगीत दिले होते व चिनी आक्रमणानंतर आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे सादर केल्या गेलेल्या मासिक गीतांपैकी ते एक होते. पुढे राम कदम यांनी ती चाल या गीतासाठी वापरली.

  • @bhausahebgaikwad2415
    @bhausahebgaikwad2415 3 ปีที่แล้ว +69

    All school days moments with friends i miss so much ❤😭 and the song is so peaceful😌

    • @prashantgawande25
      @prashantgawande25 2 ปีที่แล้ว

      I too remember this song sung in my school

  • @dhananjaydeshmukh4107
    @dhananjaydeshmukh4107 9 หลายเดือนก่อน +1

    खरच आज 1995 मध्ये गेल्या सारखे वाटले आज ही तोंड पाठ आहे

  • @RutujaPatil143
    @RutujaPatil143 2 ปีที่แล้ว +6

    खरंच डोळ्यात अश्रू आले।।।जुन्या आठवणी।।

  • @ajaykhadase8932
    @ajaykhadase8932 3 ปีที่แล้ว +6

    सुमधुर!

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 ปีที่แล้ว +2

    गाणं नाही हे एक प्रार्थना आहे आम्ही शाळेत म्हणायचो.
    आजही प्रेरणा देत आहे...

  • @tusharbavkar1023
    @tusharbavkar1023 3 ปีที่แล้ว +6

    अप्रातिम

  • @partapkoli9989
    @partapkoli9989 2 วันที่ผ่านมา

    माझे आवडते गाणे आहे . हया गान्या मुळे जुण्या अथ वणीला उजाळा मिळाला.

  • @ghanshampatel955
    @ghanshampatel955 ปีที่แล้ว +8

    I m listening this song early morning 6 clock ...and just goosebumps yetat n something veglach feeling yete song mdhe old history kind of.. seriously school athvn yete... ❤️

  • @ruchitakarangutkar8745
    @ruchitakarangutkar8745 3 ปีที่แล้ว +14

    majhya shaletli prarthana😍

    • @sl-sd7mk
      @sl-sd7mk 3 ปีที่แล้ว +2

      Same here

    • @dhananjaydeshmukh3222
      @dhananjaydeshmukh3222 3 ปีที่แล้ว

      आमच्या पण शाळेत हीच प्रार्थना होती

  • @pravindileepkhot9924
    @pravindileepkhot9924 4 หลายเดือนก่อน

    Balpan de ga deva.....miss my marathi shala...❤Jeevan shikshan vidhya mandir ❤

  • @devendratambe3298
    @devendratambe3298 3 ปีที่แล้ว +10

    शाळेतील प्रार्थना

  • @abhij4370
    @abhij4370 3 ปีที่แล้ว +24

    शाळेतले दिवस आठवले.😭❤️

  • @devdattdeshpande9068
    @devdattdeshpande9068 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गाणे....नगरपरिषद शाळेत ही प्रार्थना शिकायला मिळाली

  • @seemabhalerao5841
    @seemabhalerao5841 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम गाणे, मी भाग्यवान आहे कि हे गाणे मला मुलांना शिकवायला मिळाले 🙏

    • @santajighorpade1836
      @santajighorpade1836 ปีที่แล้ว

      सीमामॅडम खरोखर तुम्ही भाग्यवान आहात, हे गीत शिकायला,शिकवायला, गायला नशीब नाहीतर प्रारब्ध लागत.पुन्हा एकदा तुम्हास नमस्कार.

  • @Amy_8117
    @Amy_8117 11 หลายเดือนก่อน

    My Marathi❤ is so beautiful... Sundar gane... Ashe gaani aaj chya pidhi ni aaikayla havey. Ani aaj chya singers ni gaayla havey..

  • @user-sv4kh9od2w
    @user-sv4kh9od2w ปีที่แล้ว +1

    सत् chit Aanand hach खरा आनंद.

  • @rajanidate8007
    @rajanidate8007 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर म्हटला आहे, भावपूर्ण शब्द रचना, अत्यंत छान ,मन अत्यंत प्रसन्न होते.

  • @rajanvarma4768
    @rajanvarma4768 3 ปีที่แล้ว +18

    20 varshani aikale hai geet man ekrup jhale

  • @BhimSingh-rk4zp
    @BhimSingh-rk4zp 2 ปีที่แล้ว +1

    Satyam Sundaram Yeh Ek Dharmil Mantra Hai ,Jo Shaktishali Hai.........SOMWAR.......16/02022......

  • @poojaapagar4943
    @poojaapagar4943 3 ปีที่แล้ว +7

    जुने गाणे खूप छान होते खूप आवड होती

  • @tejadalvi5169
    @tejadalvi5169 2 ปีที่แล้ว +7

    Old memories are also...❣️
    .
    .
    White shirt... Khaki pant 😁😉🥲✌️

  • @vitthalshinde3001
    @vitthalshinde3001 2 ปีที่แล้ว +19

    Very nice song composed by Ram Kadam ji based on Raag Kedar. Also heavenly purity brought in lyrics by Jagdish Khebudkarji and beautiful singing by Uttara Kelkar ji and Suresh wadkar ji! Also the great acting by Ranjanaji and the great direction by Anant Mane Sir.Grand saluteto all! The song has become daily prayer in many schools in Maharashtra!

  • @sudarshanjadhav2921
    @sudarshanjadhav2921 2 ปีที่แล้ว +1

    सुपर उत्तरा केळकर ताई

  • @ngawai62
    @ngawai62 2 ปีที่แล้ว +8

    Marathi Shala.. old memories 😍😭😭

  • @pragativalvi5411
    @pragativalvi5411 2 ปีที่แล้ว +19

    Very nice song
    We the 8th graders now are using this as assembly prayer

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 ปีที่แล้ว

    दर सोमवारच्या परिपाठाला ही प्रार्थना आम्ही म्हणायचो.किती अर्थपूर्ण आणि मराठी संस्कृतीदर्शक प्रार्थना आहे.गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी.

  • @saritapatil403
    @saritapatil403 ปีที่แล้ว

    न भूतो,न भविष्यती अशी प्रार्थना होणे केवळ अशक्य.
    प्रार्थनेतील शब्द तर अप्रतिम आहेतच;त्याचबरोबर गाणाऱ्याने प्रार्थना गायलीही अप्रतिम चालीत.प्रत्येक कडवे पूर्ण झाल्यानंतर 'ज्ञानमंदिरा' ऐकताना छान वाटते.
    शालेय जीवनातील अविस्मरणीय प्रार्थना.🎉🎉

  • @shankarshende1465
    @shankarshende1465 3 ปีที่แล้ว +4

    मन प्रसन्न होतं