एजंट लोकांना फुकट फोर व्हीलर वाटणाऱ्या पर्ल्स कंपनीनं ६०००० कोटींचा घोटाळा कसा केला | PACL Refund

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • एजंट लोकांना फुकट फोर व्हीलर वाटणाऱ्या पर्ल्स कंपनीनं ६०००० कोटींचा घोटाळा कसा केला | PACL Scam
    २००७ - ०८ चा काळ. आमच्या शेजारच्या गावात एक प्रसिद्ध जनावरांचा डॉक्टर राहायचा. त्याचं नाव घेणार नाही. जनावरांना बरं करण्यात त्याचा हातखंडा होता. त्यानं हात लावलाय अन जनावर बरं झालं नाय असं कधीच झालं नाय त्यामुळं पंचक्रोशीत त्याला खूप मान होता. लोक त्याच्याकडं आदरानं पाहायची. सगळं सुरळीत चाललं होतं. पण एके दिवशी काय झालं माहिती नाय, त्या डॉक्टरनं चक्क डॉक्टरकी सोडून दिली अन त्यो PACL नावाच्या कोणत्या तरी चीटफंड कंपनीत कामाला लागला. ते PACL म्हणजे पर्ल्स एग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात पर्ल्स ही कंपनी. आता पर्ल्स ह्ये नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या शिट्ट्या वाजल्या असतील. का ते तुम्हांला पुढं व्हिडीओ दरम्यान समजेलचं. तर तो डॉक्टर पर्ल्स कंपनीचा एजंट झाला होता. तो त्याच्या गोड वाणीनं लोकांना भुरळ पाडायचा अन पर्ल्स कंपनीमध्ये लोकांना गुंतवणूक करायला सांगायचा. तो म्हणायचा, तुम्ही घरबसल्या तुमचा पैसा कामाला लावा तुम्हाला कंपनी एवढ्या एवढ्या वर्षात १२ टक्क्यानं रिटर्न देणारंय. बर दारात फोर व्हीलर, फॉरेन ट्रीप असलं काय बाय होतचं. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून भागातल्या शेकडो लोकांनी पर्ल्समध्ये गुंतवणूक केली. अगदी हातावर पोट असलेल्या मजुरापासून बागायतदार शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांनी. मिनिमम रक्कम पन्नास हजार ते maximum ५ लाखांपर्यंत. डॉक्टरनं कंपनीला चांगला रिजल्ट दिला म्हणून कंपनीनं त्याला नवी कोरी ७ सीटर फोर व्हीलर गिफ्ट दिली. डॉक्टर सिंगापूर, मलेशियाला जाऊन आला. ही सगळी प्रगती डॉक्टरनं निव्वळ एका वर्षाच्या आत साध्य केली होती. त्याच्याकडं पाहून भागातले आणखी काही तरुण पोरं पर्ल्स कंपनीत जॉईन झाली आणि बघता बघता त्यांची एक साखळी निर्माण झाली. पुढची सात आठ वर्षे तसाच कारभार सुरु राहिला अन २०१४ साली एक बातमी आली की, पर्ल्सच्या संचालकानं ६०००० कोटींचा घोटाळा करून गुंतवणूकदारांची फसवणूक केलीये. त्ये ऐकून देशातल्या करोडो गुंतवणूकदारांसकट पर्ल्स कंपनीचे एजंट यांची सुद्धा पाचावर धारण बसली. कारण बातमी झळकल्यानंतर सैरभैर झालेल्या लोकांनी आमचे पैसे रिटर्न करा म्हणून त्या एजंटांची गचुंडी धरली. काही एजंटांना मारहाण ही झाली. त्यात आमच्या शेजारच्या गावातला तो जनावरांचा डॉक्टर सुद्धा होता. लोकांच्या भीतीनं त्यानं स्वतःची जमीन, घर दागिने गहाण ठेवले, प्रसंगी विकले अन लोकांचे पैसे भागवण्याचा प्रयत्न केला. पण रक्कम थोडीथोडकी नव्हती. अजून तो छोटे मोठे धंदे करून एकाएकाचे पैसे फेडतोय. आता त्याच्यावरचा विश्वास उडाल्यामुळं त्याला जनावरांना तपासायला ही कुणी बोलवत नाही. त्याच्यासारखीचं गत भागातल्या शेकडो एजंटांची आहे. काहींनी तर त्याकाळी टेन्शनमध्ये जीवनयात्रा संपवल्याच्या ही बातम्या आल्या होत्या आणि आजतागायत लाखो लोकं पर्ल्स कंपनीकडून वसूल होणाऱ्या पैशाच्या प्रतीक्षेत आहेत. पण याची सुरुवात नेमकी कशी झाली होती ,कसं एका साधारण दूध विक्रेत्यानं देशातील लोकांना ६० हजार कोटींचा गंडा घातला, हा पर्ल्स घोटाळा नेमका काय होता, सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण जाणून घेणारे....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #paclrefund latest news
    #paclnewstoday
    #pacl
    #paclrefundhowtoapply
    #paclindialimited
    #paclnewstoday2023
    #paclindialimitedsepaisekaisenikale
    #paclnews
    #paclkapaisakabmilega
    #paclnewstodaytamil
    #paclrefund
    #paclcertificatenumberkaisenikale
    #mahadevbettingapp
    #mahadevbook
    #mahadevbooknews
    #mahadevbettingappscam
    #mahadevbookonlinebetting
    #mahadevbettingappkyahai
    #mahadevbookownermarriage
    #mahadevbookapp
    #mahadevbetting
    #mahadevbettingnews
    #mahadevbettingappcase
    #mahadevapp
    #mahadevbettingapp
    #mahadevappscam

ความคิดเห็น • 750

  • @popatkedari9044
    @popatkedari9044 10 หลายเดือนก่อน +50

    आमचे आजोबा म्हणायचे.... मी माझे पैसे जमिनीत गाडून ठेवीन पण अशा एजंट लोकांच्या हातात देणार नाही......

  • @sushantdesai5468
    @sushantdesai5468 10 หลายเดือนก่อน +48

    सरकाने या कंपनी ची मालमत्ता जप्त करून ती मालमत्ता विकून गोरगरीबांचे पैसे परत दिले पाहिजेत

    • @udhavkhavane7900
      @udhavkhavane7900 10 หลายเดือนก่อน +1

      प्रसारमाध्यमे,सरकार व न्यायालय यांना असे करायचेच नसते भाऊ तुमच्या अपेक्षेप्रमाणे यांनी जर तसे केले असते तर आतापर्यंत बर्याच कंपन्या मधले गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळाले असते.पण आपल्या लोकशाहीत असे होत नाही हे आपलं दुर्दैव आहे भाऊ.

  • @shankarshinde9464
    @shankarshinde9464 10 หลายเดือนก่อน +123

    माझे पैसे लग्नाला ठेवलेले त्या एजंट मँडम च ऐकुन सर्व पैसे बुडले मग काय मी आसा तगादा लावला पैशा साठी शेवटी तिनच माझ्याबरोबर लग्न केले तेव्हाच पैशे फिटले

  • @ChessMastery740
    @ChessMastery740 10 หลายเดือนก่อน +117

    आमच्या आई वडील यांचे सुद्धा शेजारच्या माणसाने पैसे मागुन गुंतवले आणि आता fraud केला. पैसे गेले किती मेहनत केली होती दुसर्‍यांची शेती करून कमावले होते. 😢😢😢😢

    • @vishalg1503
      @vishalg1503 10 หลายเดือนก่อน +1

      Video t link ahe tyavar application form fill kara

    • @rajendrawalke1923
      @rajendrawalke1923 10 หลายเดือนก่อน +3

      same zal amche pn

    • @Indian4213
      @Indian4213 10 หลายเดือนก่อน +2

      प्रत्येक 8 कुटुंबमागे 2 माणूस फसला आहे

    • @mayur_1218
      @mayur_1218 10 หลายเดือนก่อน

      Dada je agent hote te fakt job karat hote actually tyanchi pan fasvnuk zali aahe

    • @adikthawal2799
      @adikthawal2799 10 หลายเดือนก่อน +1

      याबाबतीत केंद्रीय सरकारने काही केलेलं नाही लोकप्रतिनिधीने साधा प्रश्नही उपस्थित केलेला नाही

  • @arunmali8673
    @arunmali8673 10 หลายเดือนก่อน +12

    मला हे आवडलं साहेब भरपूर कंपनी होत्या सम्रुध्द जीवन एक अशीच कंपनी होती त्याविषयी पण बनवावा...,....

  • @shantarammane6547
    @shantarammane6547 10 หลายเดือนก่อน +45

    मी पैसे फक्त पोस्ट किंवा नेशनल बँकठेवतो नाही तर खाऊन पिऊन सुखी आहे

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 10 หลายเดือนก่อน +323

    मि आयुष्यात खुप पैसा उडवला खुप ऐश केली पण कधी असल्या स्किम मधे पैसे गुंतवायचा चूत्यापणा नाही केला 😂

    • @bhimakokare8417
      @bhimakokare8417 10 หลายเดือนก่อน +3

      😂😅😂😅

    • @ganeshaunde
      @ganeshaunde 10 หลายเดือนก่อน +4

      Same here bro❤😂

    • @nileshmalunjkar8740
      @nileshmalunjkar8740 10 หลายเดือนก่อน +2

      Mee too

    • @akashsonawane3310
      @akashsonawane3310 10 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂

    • @DimondCompanions
      @DimondCompanions 10 หลายเดือนก่อน +3

      Aamchya ghartlyanni fakta asha thikanich paise takle, baki aish mauj masti kahi keli nahi aani aata tyanna vatte tevhach aish aani mauj masti keli asti tar bare zale aste😅

  • @sagarchougule9274
    @sagarchougule9274 10 หลายเดือนก่อน +18

    मी स्वतः ऐजन्ट होतो मित्राचे ऐकले पैसे भरले काही परत मिळाले आजून खुप आडकलेत माझ आयुष्य ऊध्दवस्थ झालंय मी आजून लग्न नाही केल पण महादेवाची शपथ ऐकेकाला सपवून मी पण मरणार नमस्कार 🙏

    • @shrigurudevdatt777
      @shrigurudevdatt777 10 หลายเดือนก่อน

      Me pan same condition madhe ahe

    • @rajumane6957
      @rajumane6957 10 หลายเดือนก่อน +1

      घाबरू नका कंपनीच्या वेबसाईटवर जावा तिथे अप्लाय करा तुम्हाला तुमचा रिफंड नक्की मिळेल

    • @mukundchendge4406
      @mukundchendge4406 10 หลายเดือนก่อน

      ​@@rajumane6957 company website ky ahe

  • @787vipul
    @787vipul 10 หลายเดือนก่อน +10

    माझे ही पैसे बुडाले या कंपनी मध्ये, नशीब मी कुणाचे policy काढल्या नाहीत... सरकार झोपा काढत होत आणि कंपनी उघड पणे मोठं मोठ्या city मध्ये मोठं मोठे ऑफिस उघडून लोकांना चुना लावत होती.

  • @mulnivasisamajsangh.9089
    @mulnivasisamajsangh.9089 10 หลายเดือนก่อน +8

    🎉🎉🎉 सरकार चा सहमति शिवाय अस देशात सुरू होणे शक्य नाही

  • @rahulfule1634
    @rahulfule1634 10 หลายเดือนก่อน +23

    समृद्धी जीवन बद्धल😮 पण माहिती दया भाऊ त्यांनी पण फसवणूक केली आहे

  • @suresholdisbestpawar947
    @suresholdisbestpawar947 10 หลายเดือนก่อน +25

    देशात जे शॉर्टकट श्रीमंत होण्याच्या मार्गावर असतात त्यांची हीच दशा होते

  • @snehalkadam1230
    @snehalkadam1230 10 หลายเดือนก่อน +40

    दादा माझ्या आईने तर amchya तिघा भावांचा सांभाळ एकटीने केला आणि लोकांची घरकमे करून ह्यात गुंतवणूक keleli 50000 chi आणि ह्यांनी आम्हाला फसवले

    • @maheshnaikwadi2918
      @maheshnaikwadi2918 10 หลายเดือนก่อน

      Amhi pan guntvalr hote pan amhi lavkar velich savdh hovun 94000 kadhale

    • @somnathpagare7227
      @somnathpagare7227 10 หลายเดือนก่อน

      😢

    • @adhikshelar2326
      @adhikshelar2326 10 หลายเดือนก่อน

      Same...aamcha 9000 guntavnuk keli aamhala hi phasavle yach fakt certificate aahe mazakde...javyaveli address thikani pohochlo tevha company gayab hoti😢

    • @bharatkarale652
      @bharatkarale652 4 หลายเดือนก่อน

      आता केस चालू आहे कंपनीवर, काहीना रिटर्न पण मिळालेत कंपनीकडून. माहिती घ्या.

  • @pramodshelke9682
    @pramodshelke9682 10 หลายเดือนก่อน +29

    पर्ल्स कंपनी ची प्रॉपर्टी दोन लाख कोटीची जमीन अन घोटाळा साठ हजार कोटीचा हे काही कळेल का? त्यांची जमीन विकून लोकांचे पैसे सरकारने द्यावे

  • @amolsuryawanshi9042
    @amolsuryawanshi9042 10 หลายเดือนก่อน +11

    त्यामुळे lic बरी, आमचे वडील 2006 मध्ये Lic policy काढले hote
    थोडकीच पण पैसे 4 लाख रुपये return मिळाले...!!
    गावातील एक दोन लोकांना death insurance pn milala

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 10 หลายเดือนก่อน +18

    दादा पैसे मिळण्यासाठी काय करावे ते सांगा plz. समृद्धी जीवन food इंडिया वर पण व्हिडीओ बनवा plz

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh 10 หลายเดือนก่อน +2

    माहीती उत्तम.सर्व समजून फक्त जास्त फायद्याच्या हव्यासाने गुंतवणूकदार फस्त असतो. भाउ,डबल/चौबळ ऐवजी दुप्पट/चौपट म्हणने योग्य आहे.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 10 หลายเดือนก่อน +40

    अहो हे घोटाळे करून करोडपती झालेत 🤝

  • @archanapalande7896
    @archanapalande7896 10 หลายเดือนก่อน +8

    ह्या कंपनीने नात्यात भांडणे लावले गरीबांचा पैसा खाल्ला साध्या माणसांचा गैर फायदा घेतला

  • @AkshayPatil-nt1is
    @AkshayPatil-nt1is 10 หลายเดือนก่อน +12

    Khr ahe dada...mla athvty me 12th la astana amchya ithlya 2 porani agent bnun nvin car anlya ghri... ata MIDC mdhe jatayt kamala

  • @mahadevshinde2777
    @mahadevshinde2777 10 หลายเดือนก่อน +24

    पैसे बुडवले पण तो सुखाने जगणार नाही गरीबाचा तळतलात लागणार

    • @prakashkawade7649
      @prakashkawade7649 6 หลายเดือนก่อน +2

      MD ऐश आरामात बसून जगतोय

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 10 หลายเดือนก่อน +23

    पर्ल्स मधील जवळपास तेरा लाख रुपये आम्ही वसुल करुन दिलेत, फार कष्टाचे काम आहे पण गरिबांना त्यांचा पैसा मिळाला पाहिजे हाच हेतू

    • @aishwaryajagtap4360
      @aishwaryajagtap4360 10 หลายเดือนก่อน +1

      Sir plz malahi help kara maze hi 2 lakh guntale ahet ....kay karave te plz sanga ....amhi shetkari ahot

    • @ShortSizzle2.0
      @ShortSizzle2.0 10 หลายเดือนก่อน

      Sir maze 65,000 rs adkle aahet help kara

    • @taufikpathan1835
      @taufikpathan1835 10 หลายเดือนก่อน

      Please help me,sir 9 varsh zalet pach paisehi bhetla naahi.

    • @Shivkanya169
      @Shivkanya169 10 หลายเดือนก่อน +1

      Sir mazy wadilani sampurn service 26 lac dile o natewaik agent hota bhadkhau

    • @priyashewale4072
      @priyashewale4072 10 หลายเดือนก่อน

      Ramdas sir maze pn dya vasul krun mg... maze sade 3 lakh ahet

  • @nitinhavaldar1223
    @nitinhavaldar1223 10 หลายเดือนก่อน +13

    Pan card पण असच घोटाळा आहे त्या बद्दल माहीती द्मावी 🙏🙏🙏

  • @sandeepkawale4668
    @sandeepkawale4668 10 หลายเดือนก่อน +4

    साधी भाजी विकत घेतांना लोक खुप.चौकशी करतात.
    मग अशा फसव्या कंपन्यावर कसकाय पटकन विश्वास ठेवतात कळत नही .

  • @rajivvaidya2222
    @rajivvaidya2222 10 หลายเดือนก่อน +11

    सेबी सारखी सरकारी संस्था लोकांना आधीच सावध कां करत नाही ???

    • @rajendragangurde4577
      @rajendragangurde4577 5 หลายเดือนก่อน

      Tevha SEBI itki powerful navhti. Ata internet, operational freedom mule khup balkat jhali ahey.

    • @ShAaru_Champions
      @ShAaru_Champions หลายเดือนก่อน

      Public awareness program suruch ahet pan lok jevha fraud hotat tevhach blame game suru hoto.... Lok dolyavaar parda theun invest kartat.... Shikshit lok suddha Bali padtat....Risk ghenyapeksha Regulated entities madhe paise guntvavet..

  • @purushottamdeosarkar1311
    @purushottamdeosarkar1311 10 หลายเดือนก่อน +1

    अहो एक साधी गोष्ट आहे, आपल्या गावात,शहरात एवढे पैसेवाले लोक असतात, आपल्या दुकानात,छोट्या मोठ्या धंद्यावर बसुन गि-हाईकाची सकाल पासुन वाट पाहतात सर्व सुख सोडुन गि-हाईकाची सेवा करतात पण त्यांना वाटत नाही की आपल्या जवल ची पुंजी अशी लोकांच्या हाती द्यावी व आराम करावा।ते आपल्याच कामावर विश्वास ठेवतात।या वरुन काहीच शिकत नाही आपण। ह्या फसवणुकी काही आताच होउन राहिल्या असे नाही पन्नास वर्षा पुर्वी पिअरलेस पासुन च्या आहेत तरीही आपण सावध होत नाही यात आपलाच दोष आहे।🙏🙏🙏

  • @Ka-nu9eh
    @Ka-nu9eh 10 หลายเดือนก่อน +32

    आमच्या gavat एक मुलगा आज खुळा होऊन firat आहे aain उमेदीच्या काळात हा मुलगा असा झाल्याने आई vadil khachale😢

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 10 หลายเดือนก่อน +6

    खुप छान ऐपीसोड आहे😊

  • @prasadsuryavanshi1649
    @prasadsuryavanshi1649 10 หลายเดือนก่อน +37

    माझे 15 हजार यात बुडाले ....त्या काळात गरिबी एवढी जास्त होती आमची कि एवढेच गुतवता आले ...नाहीतर त्यांची क्रेज् एवढी जास्त होती कि लोक अक्षरशहा मंगळसूत्र गहाण ठेऊन पैसे देत होते. ...कारण 5 वर्षात पैसे डबल हुनार् होते ....जाम वाट लागली 5 वर्षा नंतर .

  • @user-mg3tq6bi6j
    @user-mg3tq6bi6j 10 หลายเดือนก่อน +5

    माझेपण पैसे या स्कीम मध्ये आडकवल्ले माझे नातेवाईक यांनी लालुच दाखून आजुन ५पैसे पण आले नाही, ते नातेवाईक पण पाहत नाही व पण बोलत नाही

  • @vinodborde9954
    @vinodborde9954 10 หลายเดือนก่อน +12

    *मैत्रीय कंपनी बीड महारष्ट्र पूर्ण व्हिडिओ बनवा* 🙏

  • @amolshirsat2276
    @amolshirsat2276 10 หลายเดือนก่อน +8

    Pearless , samruddha jivan , संचयनी , twinkle group ,pancard club यावर सुद्धा video बनवा.

    • @bhauransing4190
      @bhauransing4190 10 หลายเดือนก่อน

      Is there anyway to get ours money

    • @amolshirsat2276
      @amolshirsat2276 10 หลายเดือนก่อน

      @@bhauransing4190 no hopes

  • @shrikrishnamayekar605
    @shrikrishnamayekar605 10 หลายเดือนก่อน +10

    Pancard Club मध्ये गुंतवणूक केलेल्या बद्दल माहिती सांगा

  • @kishormali847
    @kishormali847 10 หลายเดือนก่อน +13

    बर... मग महाराष्ट्रातली मैत्रेय कंपनीचं काय??¿?

  • @appasahebpatil6763
    @appasahebpatil6763 10 หลายเดือนก่อน +3

    आता काय कंडिशन आहे कंपनी ची ते सांगा. एजेंट कमिशन खाऊन निवांत आहे त. पण आम्हा शेतकरी लोकांची काय वाट लावायची सरकार ने ठरवलं आहे ते सांगा.😢😢

  • @snehalkadam1230
    @snehalkadam1230 10 หลายเดือนก่อน +8

    Amhi सोलापूरचे आहोत

  • @uttambaltep.r.oanticorrupt8477
    @uttambaltep.r.oanticorrupt8477 10 หลายเดือนก่อน +5

    कंपनीकडे 60000/कोटी पेक्षा 5 पटीने कंपनी कडे प्राॅपर्टी आहे पण कंपनी चे सर्व अधिकार लोढा कमिटी कडे आहेत .........ते रक्कम कंपनीला देता येत नाही.त्यामुळे लोकांची गुंतवणूक रखडली .....पण कंपनीची प्राॅपर्टी विकली तरी गुंतवणूकदारांना 4 पटीने देऊ शकते पण भारतातील काही रुल्स नुसार व लोढा कमिटी च्या ढिल्या पणामुळे रक्कम मिळायला अडचण येत आहे...........

    • @Satish6651
      @Satish6651 10 หลายเดือนก่อน

      Apan nakki pacl che agent ahat ka

  • @subashpatil3735
    @subashpatil3735 10 หลายเดือนก่อน +13

    सर माझी खुप गुंतवणूक आहे मिळण्यासाठी काय करावे कृपया सांगावे

  • @amolbhavar5849
    @amolbhavar5849 10 หลายเดือนก่อน +19

    साहेब अर्ज करण्याची लिंक पाठवा

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 10 หลายเดือนก่อน +17

    आज ही lic स्वाभिमानाने चालत आहे. government ची गॅरंटी आहे त्यात हेच बरे आहे आहे तोवर नाही तोवर बेस्ट आहे फक्त कासवाच्या गतीने चालते पण १००% बेस्ट आहे😊

    • @user-jk4hm9bt1t
      @user-jk4hm9bt1t 10 หลายเดือนก่อน

      एल आय सी मध्ये ही घोटाळा झाला ,अदानीचे बोगस शेअर्स एल आय सी ने खरेदी केले व 80000 कोटौ चा लौस झाला

  • @satishramtekebabanramteke3385
    @satishramtekebabanramteke3385 10 หลายเดือนก่อน +1

    अशाच एका कंपनीत माझा एक जवळचा मित्र आहे. चैन सिस्टम मध्ये आणि लोकांना लुटण्यात मला इंटरेस्ट नाही म्हणून मी त्याला जॉइन झालो नाही म्हणून त्याने मैत्रिच तोडून टाकली

  • @omkatkar6
    @omkatkar6 10 หลายเดือนก่อน +6

    माझे पण 62000/- आहेत मी तर त्याला बोलाऊन भरले विश्वास होता त्याच्यावर😢

  • @balajigharat1530
    @balajigharat1530 8 หลายเดือนก่อน

    पैसे मिळण्यांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!👌

  • @arvindpanditraokulkarni6175
    @arvindpanditraokulkarni6175 10 หลายเดือนก่อน +31

    PACL LTD मधील पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे याची (माहिती )पद्धत सांगा कृपया

    • @SuperAjit07
      @SuperAjit07 10 หลายเดือนก่อน +5

      रोज बदाम आणि केळी खावी

    • @vikasadsare8167
      @vikasadsare8167 10 หลายเดือนก่อน

      ​@@SuperAjit07😂😂😂😂😂😂

    • @jayashreethanekar5916
      @jayashreethanekar5916 10 หลายเดือนก่อน

      पैसे मिळतील का नाही.. माहिती सांगा

    • @SuperAjit07
      @SuperAjit07 10 หลายเดือนก่อน

      जेवढे प्रीमियम भरले आहेत तेवढ्या पावत्या Online सबमिट केल्या आहेत की नाही?
      आपले पैसे मिळाले तर नशीब नाहीतर आपण सगळे दानशूर आहोत असे समजून जगत राहायचे.

    • @SuperAjit07
      @SuperAjit07 10 หลายเดือนก่อน

      5 lcs

  • @yogeshmodke5816
    @yogeshmodke5816 10 หลายเดือนก่อน +2

    बंधू धम्मचक्र परिवर्तन दिन जवळ येत आहे , त्याच्या वर एक सविस्तर व्हिडिओ बनवा 🙏🙏

  • @shivrajbidrale8329
    @shivrajbidrale8329 10 หลายเดือนก่อน +7

    साहेब या कंपनीने आम्हाला खूप बुडेल आमचे पण पैसे खूप दिवसापासून बाकी आहेत

  • @Jaydip470.
    @Jaydip470. 10 หลายเดือนก่อน +1

    खरे आहे दादा या मध्ये मी पण, इनवेस्ट केले होते पैसे. फ्रॉड केला कपनीने!

  • @bhaugawari1746
    @bhaugawari1746 10 หลายเดือนก่อน +4

    पॅनकार्ड क्लब व टिंकल कंपनीचे पण असेच झाले ते पण दाखवा

  • @parashurammanchale5977
    @parashurammanchale5977 10 หลายเดือนก่อน +6

    मातृभूमि आणि Nmart बद्दल पण माहिती द्या!

  • @aamolrpatil7794
    @aamolrpatil7794 10 หลายเดือนก่อน +42

    समय से पहले, और भाग्य से ज्यादा कभी किसीको कुछ नही मिलता..! 🕉️🙏

    • @maheshjadhav5024
      @maheshjadhav5024 10 หลายเดือนก่อน +1

      Ho maze 10,000/_ aahet

    • @ashwinkale6561
      @ashwinkale6561 6 หลายเดือนก่อน

      Yahi sach hi to apne boss ko faate pe maar ke aao Ghar pe

  • @karenbirari5377
    @karenbirari5377 10 หลายเดือนก่อน +2

    आमच्या गावात पण आरोग्य सहायकाने बर्‍याच लोकांना लुबाडले

  • @sushilmhaske5518
    @sushilmhaske5518 10 หลายเดือนก่อน +12

    सर ही बातमी महत्त्व पूर्ण आहे. रॉयल ट्वींकल स्टार pvt. आणि HBN डेअरी Pvt मध्ये पैसे गुंतले आहे. त्यावर व्हिडिओ तयार कराल का धन्यवाद

    • @ACFXTRADER
      @ACFXTRADER 10 หลายเดือนก่อน

      Kadun ghe bhau Aaj na udya budun jail

  • @sandeeppatil-ue8mv
    @sandeeppatil-ue8mv 10 หลายเดือนก่อน

    आमचा 1 गाव वाला twinkle चा agent होता. खूप वर्षे आमच्या मागे लागला होता investment साठी. पण आम्ही फसलो नाही. कारण त्यावेळी chain marketing वाले खूप जण विनाकारण ओळख वाढवून घरी यायचे आणि पकावयचे. त्यामुळे आम्ही सावध होतो.

  • @vasantbade8153
    @vasantbade8153 10 หลายเดือนก่อน +15

    आमचे एक लाख नव्वद हजार रुपये मुद्दल बुडाली 😢

  • @arunborghate3785
    @arunborghate3785 10 หลายเดือนก่อน +3

    ++PAN //Sanchyani ,बरेच घोटाळे कंपन्या आहेत😢😢😢😢😢

  • @user-pu7ru6zx5m
    @user-pu7ru6zx5m 10 หลายเดือนก่อน +12

    माझे गेले काही पैसे , जवळच्या मानसान फसवल

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 10 หลายเดือนก่อน +1

    मी अश्या कंपन्या पासून अनेकांना सावध केले होते ज्यात आमच्या सोलापूर जिल्ह्यात डेल नेट ते समृध्दी दूध ब्रँड , एन मार्ट अश्या कंपन्या होत्या ,मी राजकीय क्षेत्रात असल्यामुळे अनेक जण माझ्याकडे येत व काम करण्याची विनंती करत , मी स्वतः ही अलिप्त राहिलो आज याचे समधन वाटते

  • @MaheshPatil-ym8ur
    @MaheshPatil-ym8ur 10 หลายเดือนก่อน

    खूपच छान भाऊ... एक विडिओ टेम्पल रोस सिटी वरती बनवा ना त्यांनी पण खूप मोठा फ्रॉड केला आहे प्लॉट वरती प्लॉट फ्री अशीच काही होता तो फ्रॉड

  • @jayadahatonde2916
    @jayadahatonde2916 10 หลายเดือนก่อน +5

    पैसै कधी मिलणार देवा हा भागु साटू साटू मराले पैसै कशा भेटतील ते सांगा साहेब

  • @nitbad5291
    @nitbad5291 10 หลายเดือนก่อน +2

    असाच एक ओळखीचा लई force करत होता invest करण्यासाठी, पण मी काही कोणाच्या जाळ्यात फसलो नाही.

  • @dilipbankar3106
    @dilipbankar3106 หลายเดือนก่อน

    आमचे पैसे एच बी एन मध्ये गुंतवले होते तेथे ही फ्राॅड झाला आज तागायत ते पैसे मिळालेच नाहीत

  • @aniketgandhi...007
    @aniketgandhi...007 10 หลายเดือนก่อน +7

    ट्रिक्लस कंपनीचा व्हिडिओ बनवा माहिती अपडेट करा

  • @ChessMastery740
    @ChessMastery740 10 หลายเดือนก่อน +37

    पैसे कसे भेटतील कृपया सांगावे

    • @shreyashbhau7074
      @shreyashbhau7074 10 หลายเดือนก่อน

      Kadhi join zhalya

    • @sameerkhatavkar2667
      @sameerkhatavkar2667 10 หลายเดือนก่อน +2

      टाकसाळ मधून जुनी मशीन घ्या आणि छापा

    • @ChessMastery740
      @ChessMastery740 10 หลายเดือนก่อน

      @@sameerkhatavkar2667 mhanje

  • @pravinpatil-iy9mt
    @pravinpatil-iy9mt 10 หลายเดือนก่อน +4

    एजंट ला मरेपर्यंत मारा... मेल्यानंतर , मेलास का म्हणून मारा...🎉

    • @rajeshhowal
      @rajeshhowal 10 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @user-up1yz7tg9w
    @user-up1yz7tg9w 10 หลายเดือนก่อน +1

    लय भारी व्हिडिओ बनवला भाऊ. पण आणखी एक व्हिडिओ बनवा खरंच लोकांना एका कंपनी विषयी जागं केलं पाहिजे, onpassiv ही कंपनी लोकांना गंडवून आमिष दाखवून पैसे उकळते आहे सामान्य लोक बळी पडत आहेत😢

    • @milindchatse
      @milindchatse 10 หลายเดือนก่อน +1

      Ho ya company mad he majhya mitrani, lakhon rupaye guntalave aahet, tari te aikayla tayar nahit, ya vr video banva.

  • @user-dt4yz5yo4s
    @user-dt4yz5yo4s 10 หลายเดือนก่อน +9

    पीएसीएल मधील पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती पद्धत सांगा

  • @ujwalashinde2297
    @ujwalashinde2297 10 หลายเดือนก่อน +14

    पॅनकार्ड क्लब लि. बद्दल माहिती सांगावी

  • @swatikakade9844
    @swatikakade9844 10 หลายเดือนก่อน +1

    सरकार यामध्ये सहभागी आहे नाही तर अशा कंपन्या निघाल्या च नसते

  • @kalyanchavan7393
    @kalyanchavan7393 10 หลายเดือนก่อน +6

    मैत्रेय विषयी पण व्हिडिओ बनवा

  • @maheshchavan1985
    @maheshchavan1985 10 หลายเดือนก่อน +5

    ट्विंकल स्टार ने sudha लोकांचे पैसे बुडवले

  • @akashjadhavajstyle5703
    @akashjadhavajstyle5703 10 หลายเดือนก่อน +2

    शिक्षणासाठी दरवर्षी शेतीतील पिकातून काही पैशाची गुंतवणूक केली एक एक रुपये साठवून.....
    जेव्हा बारावीनंतर खरी करिअर ची वेळ आली
    तेव्हा कळलं पैसे बुडाले !!😢
    आर्थिक सोबत मानसिक हानी पण झाली...

  • @meanandkulkarni
    @meanandkulkarni 10 หลายเดือนก่อน

    संचयनी, समृध्द जीवन अशा काही आणखी कंपन्या आहेत, लोकांना करोडोचा चुना लावलाय त्यांनी, या कंपन्यांवरही व्हिडिओ करावेत.

  • @faithdecoded9799
    @faithdecoded9799 10 หลายเดือนก่อน +5

    Kaak Fraud Scheme vr pn bnva video plzzzz

  • @bhimraokhadekar8508
    @bhimraokhadekar8508 10 หลายเดือนก่อน

    होय आमच्या घनसांवगी.जि.जालना.तालुक्यात सुद्धा गुंतवणूकदार आहेत..मदत.करा.विनती

  • @PradipMali-wn8np
    @PradipMali-wn8np 6 หลายเดือนก่อน

    चांगला विषय मांडला भाऊ......

  • @tofiktamboli6605
    @tofiktamboli6605 10 หลายเดือนก่อน +1

    भाऊ आमचे पैसे ह्या पल्स कंपनी मध्ये आहे आमचे पैसे अजुन परत मिळाले नाही सरकार ह्या प्रकरणात लक्ष देत नाही माझ्या सारखे अनेक लोकनी ह्या कंपनी मध्ये पैसे गुंतवले आहेत आता ह्या लोकांनी काय करावे हे सागा

  • @arvindraje1672
    @arvindraje1672 10 หลายเดือนก่อน

    पाडळी ता. जिल्हा सातारा येथील ऑर्गनायझर
    टेंशन मधे तरुण वयात अटॅक ने आपला जीव गमावला

  • @rohitpatil3531
    @rohitpatil3531 10 หลายเดือนก่อน +2

    याच्यामागे राजकारण आहे..

  • @withvlog6037
    @withvlog6037 10 หลายเดือนก่อน +12

    मी पण करत होतो पण सगळ्याचे पैसे लगेच काढून दिले

    • @pawankumarkhokle2296
      @pawankumarkhokle2296 10 หลายเดือนก่อน

      कसे काढले हो आम्हाला पणं सांगा

  • @vijayghumare5233
    @vijayghumare5233 10 หลายเดือนก่อน +7

    Same thing 😢 happened with us also

  • @shivajikarakar7375
    @shivajikarakar7375 10 หลายเดือนก่อน +2

    माझे पण ₹15000 गुंतले आहेत ते मिळाले नाहीत हे पैसे व्याजासहित मिळाले पाहिजेत अन्यथा यांची सर्व इस्टेट सरकारने जप्त करण्यात यावी गोरगरिबांची रक्कम आहे त्यांचा त्यांना शाप आहे हे पाप फेडावेच लागणार ते पण पृथ्वीवरच वरचेवर वेगळे

  • @smartlife9796
    @smartlife9796 10 หลายเดือนก่อน +2

    पुणे ची समृद्धि जीवन वर वीडियो बनवा।।।

  • @vdhande2013
    @vdhande2013 10 หลายเดือนก่อน +6

    PACL... संचयनी...संजीवनी...पॅगोडा फॉरेस्ट..कल्पवृक्ष...अशा अनेक कंपन्यांनी लोकांना फसवले आहे..

  • @MEDHAKAMBLE
    @MEDHAKAMBLE 10 หลายเดือนก่อน +4

    मैत्रेय बद्दल एकदा विषय घ्यावा.

  • @aniketgandhi...007
    @aniketgandhi...007 10 หลายเดือนก่อน +7

    त्या पेक्षा पोस्ट ऑफिस मध्ये पैसे गुंतवलेले सगळ्यात भारी

  • @Harshad213
    @Harshad213 10 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद माझी विनंती स्विकारुन विडीओ बनवल्याबद्दल

  • @Nikhilshinde333
    @Nikhilshinde333 10 หลายเดือนก่อน +3

    Love from Taiwan!

  • @shirunmesh
    @shirunmesh 10 หลายเดือนก่อน +2

    Pearls chi surwat PACL pasun nahi tar PGFL (pearls green forest Ltd )pasun zali.

  • @ganeshchavan558
    @ganeshchavan558 10 หลายเดือนก่อน +14

    सरकारने यावर पाउल उचलायला हाव,सगळे पैसे गोरगरीबाचे आहेत

    • @amardasdeole4061
      @amardasdeole4061 10 หลายเดือนก่อน

      इतक्या बँका असताना मूर्ख लोक अशा कंपन्यांत पैसे कशाला गुंतवता त .अश्या मुर्खांच्या तक्रारी पोलिस खात्याने घेऊ नये.

    • @user-id9gm1fc3u
      @user-id9gm1fc3u 10 หลายเดือนก่อน

      मोदी सरकार आल्यानंतर ही कंपनी बंद पडली आणि ती सरकारला जप्त करून ती विकून जनतेचे पैसे खायचे होते त्यासाठी लोढा कमिटी स्थापन केलंय त्यात आणि कंपनीचा शासकीय लढा चालू आहे!

  • @yuvrajbuchade3136
    @yuvrajbuchade3136 หลายเดือนก่อน

    ह्यात सरकार दोषी आहे....सरकार शिवाय असेल कारनामे होऊच शकत नाहीत.....

  • @pandharinathkale5533
    @pandharinathkale5533 หลายเดือนก่อน

    या कंपनीत मी गुंतवणूक केली होती. पैसे बुडाले. कोणीही अशी गुंतवणूक करु नका.

  • @prasadvibhute1305
    @prasadvibhute1305 10 หลายเดือนก่อน +2

    Aatpadi talukyatil shares market madhil fraud var ek special vdo banawa

  • @unistarindustries7188
    @unistarindustries7188 10 หลายเดือนก่อน

    Khup ushir kela ho saheb sangnyasathi

  • @borawakeharishnitin2481
    @borawakeharishnitin2481 10 หลายเดือนก่อน +3

    ह्यांना सरकार जबाबदार असते .
    तेच लोक यांच्यावर अंकुश ठेवत नाही

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 10 หลายเดือนก่อน

      Lic best paryay ahe,guntavnukila... With Risk cover... 1 rs tumacha budat nahi.

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 10 หลายเดือนก่อน

      Nave bdlun hyach skims navyane pudhe yetat v lok fastat

  • @durgadaspurkar6949
    @durgadaspurkar6949 10 หลายเดือนก่อน

    Bhau tumacha vishay खरोखर भari

  • @Columbusvvv
    @Columbusvvv 10 หลายเดือนก่อน

    मी आजवर तरी कोणत्याही स्कीम मधे फसलो नाही, या जगात फुकट. शिवी देखील मिळत नाही त्यासाठी सुद्धा कुणाला तरी chedave लागते.

  • @sanjayagarwal7262
    @sanjayagarwal7262 10 หลายเดือนก่อน

    चौपट मालमत्ता असून, 2016साली सुप्रीम कोर्टाचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुध्दा अजून लोकांना पैसे मिळाले नाहीत. कायदा विचित्र आहे.जमीनी विकत नसतील तर गुंतवणूकदारांना जमीनी द्याव्यात. निकालानंतर अंमलबजावणी होत नाही.हे देशाचे दुर्दैव आहे

  • @vitthalsharale5833
    @vitthalsharale5833 10 หลายเดือนก่อน +4

    सर, Speak Asia वर व्हिडिओ बनवा.

  • @madanpatil2798
    @madanpatil2798 10 หลายเดือนก่อน +1

    लालच बुरी बला हैं सर तुम्ही व्हिडिओ व माहिती दिली तर त्यावर अजून अनेक कंपन्यांनी लोकांना बुडवले तरी पण अजून हजारो कंपन्या चालू आहेत भारतात हे चालत राहणार

  • @rohitbhalerao1345
    @rohitbhalerao1345 10 หลายเดือนก่อน +2

    माझ्या वडलानी सुद्धा त्यांची आयुष्यभराची कमाई 15 लाख
    म्हातारपणी चांगले पैसे मिळतील म्हणून गुंतवले
    मी खूप समजावून सांगितले तरी ऐकले नाही
    आता खूप पश्र्चाताप होतोय,रडतात
    पण काय उपयोग