कॉलेजच्या पोरापोरींना गंडवून eBIZ ने ५००० कोटींचा घोटाळा कसा केला | ebiz frauds | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
  • कॉलेजच्या पोरापोरींना गंडवून eBIZ ने ५००० कोटींचा घोटाळा कसा केला | ebiz frauds | Vishaych Bhari
    साधारण सात आठ वर्षापूर्वीची गोष्टय. एक जवळचा मित्र इंजिनियरिंग पूर्ण करून पुण्याला जॉबला गेला. तिथं त्याला महिना दहा हजाराची नोकरी लागली. पण रूम भाडं, मेस आणि ट्रॅव्हलिंगचा खर्च मिळून त्याचा महिन्याचा एक्सपेन्स 6 हजार रुपये जाऊ लागला. उरलेल्या चार हजारातले घरी किती पाठवायचे अन स्वतःजवळ किती ठेवायचे या टेन्शनमध्ये त्याचे दिवस चाल्ले होते. नवी अंडरवेअर घ्यायची म्हणलं तरी तो दहा दिवस विचार करायचा. त्याच्या भाषेत सांगायचं झालंच तर तो मन मारून जगत होता. पण त्याच्याचं रूमसमोर राहणारं एक बारावी पास पोरगं मात्र रोज सुटाबुटात कुठंतरी कामाला जायचं . घरी आलं की पोरांना त्याच्या कंपनीतल्या मोठंमोठ्या गप्पा सांगायचं. मी दोन महिन्यात यू एस आणि तीन महिन्यांनी युकेला जाणारय, वर्षभरात स्वतःची फोर व्हीलर अन् एखांदी स्पोर्ट्स बाईक दारात उभी करणारय. पुण्यात स्वतःचं घर विकत घेणारंय , लाखो कोटी रूपये कमवणारंय. हे सांगायच्या आधी आणि नंतर तो गुडमाॅर्निंग असंही जोरात ओरडायचा. . त्ये ऐकून आमचा इंजिनियर भाऊ पाघाळला अन त्याला म्हणला, तू बारावी पास असून सुद्धा तुला तुझी कंपनी एवढा पगार कसा काय देतेय . तर त्या बारावी पास वाल्यानं त्याला त्याच्या कंपनीची स्कीम समजावून सांगितली वर असंही म्हणला, तू तर इंजिनियरिंग केलंय, तू फक्त 1० हजार रुपये भरून आमची कंपनी जॉईन केलीस ना तर तू माझ्यापेक्षा डब्बल पैसा छापशील. मग काय झाला ना भाऊ रेडी, दुसऱ्याचं दिवशी तो इंजिनिअर मित्र त्या बारावी पास पोराच्या कंपनीत इंटरव्युव्हला गेला. रिसेप्शनला सगळ्या सुटाबुटातल्या पोरी इकडून तिकडून वावरत होत्या. त्यांनी आपल्या भावाकडून गोड बोलून 1० हजार रुपये गोळा केले अन त्याचं शिक्षण, डिग्री काहीच न विचारता, कॉम्प्युटर कोर्सचं एक किट त्यांच्या हातात ठेवलं. अन किलर स्माईल देत म्हणाल्या वेलकम टू ebiz.गुडमाॅर्निंग. गुडमाॅर्निंग यासाठी की दिवस असू नायतर रात्र इबिझरनं नेहमी जोशात असलं पाहिजे.‌ जब जागो तब सवेरा. हे त्यांचं तत्वज्ञान. असो. पण या पठ्यानं तिथल्या वातावरणात आपण सूट व्हावं म्हणून एक नवाकोरा सूटबी जवळच्या टेलरकडं लगेच शिवायला टाकला.
    आता ह्यो इंजीनियरवाला बिचारा जुन्या कामानं आणि सदा रिकामा असलेल्या खिश्यानं पिचलेला दुष्काळी गडी. तिथल्या पोरींची स्माईल पाहून त्यो सपशेल इरघाळला व्हता . पुढं त्या पोरी त्याला म्हणाल्या आता फक्त एक काम करायचं, तूम्ही आणखी काही गरजवंत पोरं शोधायची अन त्यांना आपल्या डाऊनलिंक मध्ये जोडायचं. . जेवढी जास्त पोरं पोरी तुमच्याखाली जोडाल तेवढी तुमची कंपनीत ग्रोथ वाढत जाणार. एक दिवस तूम्ही 10 रुपयचा बिस्कीट पुडा आणण्यासाठी सुद्धा 10 लाखाच्या फोर व्हीलरमधनं जाणार. झालं, आपला भाऊ Ebiz वाल्यांचे ते मोटिव्हेशनल सेमिनार ऐकून चार्जअप झाला अन शेवटी कामाला लागला. पण पुढं जाऊन ebiz चं मार्केटिंग करता करता कधी स्वतःचं धंद्याला लागला ते त्याचं त्यालाचं कळलं नाय. आता ते कसं घडलं,त्यो इंजिनिअर मित्र सध्या काय करतो , त्याचं करोडपती व्हायचं स्वप्न पूर्ण झालं का? ह्येच आपण आज या व्हिडीओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊयात. नमस्कार मी प्रथमेश अन तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #ebiz
    #ebiz frauds
    #ebiza
    #ebizseminarvideo
    #ebiznetworkmarketing
    #ebizcomprivatelimited
    #ebizcompany
    #ebizmotivationalvideo
    #ebizfunnyvideo
    #ebizrilportal
    #ebizfiling
    #ebizseminar
    #ebizscamcasestudy
    #ebizconvention2019

ความคิดเห็น • 1.4K