Mulching Paper scheme : मल्चिंग योजना शेतकऱ्यांच्या हिताची , अन् 50 टक्के अनुदानाचा ‘असा’ घ्या लाभ…!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • ‪@krushisavardhanmaharashtra‬ पीकाबरोबर तण वाढू नये तसेच रोगराईचा प्रादुर्भाव पीकावर होऊ नये म्हणून (mulching paper) पीकाला अच्छादन केले जाणारे मल्चिंग आज शेती व्यवसयात वरदान ठरत आहे. मल्चिंग पेपरचे महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. (increase in production) पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत स्पर्धा करणाऱ्या तणांचे नियंत्रण होते.
    कमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे भारतातील शेतकरी बांधवांना पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागतो. मल्चिंग पेपरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास खऱ्या अर्थाने शेतकरी एक पाऊल प्रगतीकडे वाटचाल करतील.
    शेतकऱ्याने जीवन साधन मिळवण्यासाठी किंवा एक धंदा म्हणून शेतावर चालवलेला व्यवसाय अशी शेतीची ढोबळमानाने व्याख्या करता येईल. भारतातील शेती हा खूप महत्वाचा व्यवसाय आहे.
    पिके आणि शेतीचा प्रकार हे जमीन आणि भूरचना यांवर अवलंबून असतात पण याला जर पर्जन्यमानाची जोड मिळाली तर त्यांचे परिणाम अधिक दिसतात. मल्चिंग पेपरच्या साहाय्याने शेती हा शेतकरी बांधवांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मल्चिंग पेपरच्या वापरामुळे तणांची वाढ नाही. तणांची वाढ रोखण्यासाठी होणाऱ्या खर्चात कपात होते. दर्जेदार उत्पादन मिळते. यामुळे उत्पादनाला चांगला भाव मिळतो. निश्चितच याचा फायदा शेतकरी बांधवांना होतो. मल्चिंगच्या मदतीने भाजीपाल्यासह अनेक पिकांची शेती करणे शक्य आहे. यामध्ये भाजीपाला पिकांपासून ते फूल पिकांपर्यंत सगळी पिके मल्चिंग पेपरच्या मदतीने घेता येतात.
    आपल्या गरजेनुसार मल्चिंग फिल्म ची निवड कशी करावी?
    काळी प्लास्टिक फिल्म
    काळी प्लास्टिक फिल्म जमिनीचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते तसेच पिकांमध्ये तनवाढीला नियंत्रित करते. बागायती शेतांमध्ये या फिल्म चा वापर केला जातो.
    अपारदर्शक फिल्म/ सिल्वर फिल्म
    अपारदर्शक फिल्म जमिनीचे तापमान नियंत्रित करण्यास चांगला करते तसेच पिकांमध्ये तनवाढीला नियंत्रित करते.
    पारदर्शक फिल्म
    हि फिल्म जमिनेचे सोलरायझेशन करण्यास मदत करते. थंडीच्या मौसमात शेती करताना या फिल्म चा वापर होतो.
    भाजीपाला व फळ पिकाला प्लास्टिक मल्चिंग करण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत हेक्टरी खर्चाच्या पन्नास टक्के म्हणजेच १६ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.
    या योजनेअंतर्गत आतापर्यंत 32 लाभार्थ्यांना 5 लाख 22 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले असून, एकूण 182 अर्ज रद्द झाले आहेत. शेतकऱ्यांनी या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
    महाडीबीटी पोर्टलवर भाजीपाला व फळपिकांसाठी प्लॅस्टिक मल्चिंग या बाबीसाठी आतापर्यंत 442 अर्ज प्राप्त झालेले होते. त्यापैकी 320 अर्जाची लॉटरीद्वारे निवड झाली आहे. निवड झालेल्या लाभाथ्यांपैकी 182 लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष कामे केलेली नाहीत वा करण्याची इच्छा दर्शविली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांचे अर्ज रद्द झाले आहेत. उर्वरीत 170 अजापैकी 32 लाभधारकांना त्यांनी कामे पुर्ण केल्यामुळे 5 लाख 22 हजार रुपये अनुदान अदा करण्यात आलेले आहे.निवड झालेल्या लाभार्थ्यांपैकी 138 लाभार्थ्यांचे अर्ज प्रक्रियेमध्ये असून त्यांची कामे पुर्ण केल्यानंतर अनुदान अदा करण्यात येणार आहे. अर्ज केलेल्या एकूण 442 लाभार्थ्यांपैकी 122 लाभार्थ्यांची लॉटरीमध्ये अद्याप निवड झालेली नसून नजिकच्या काळामध्ये सदर लाभार्थ्यांची निवड अपेक्षित आहे. जिल्ह्याला प्लॅस्टिक मल्चिंगसाठी मिळालेला लक्षांक पाहता अर्ज केलेल्या प्रत्येक लाभार्थ्यास योजनेचा लाभ देणे शक्य आहे.
    अधिक माहितीसाठी लातूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील फलोत्पादन तंत्र सहाय्यक विकास बालकुंदे यांच्याशी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.अशी ठरवा प्लास्टिक मल्चिंग पेपरची जाडी..
    तीन ते चार महिन्याच्या (भाजीपाला पिकासाठी प्लॅस्टिक मल्चिंग पेपरची जाडी किमान 25 मायक्रॉन असावी. तसेच बारा महिन्याच्या (उदा. पपई) या फळपिकासाठी मल्चिंग पेपरची जाडी किमान 50 मायक्रॉन असावी. तसेच बारा महिन्यांवरील (जास्त कालावधीचे फळ पिके) फळपिकासाठी मल्चिंग पेपरची जाडी किमान 100 किंवा 200 मायक्रॉनपेक्षा कमी असू नये.
    मल्चिंग फिल्म खरेदी कशी करावी ?
    बाजारामध्ये खूप कंपन्याचे चांगला मल्चिंग पेपर मिळतात पण फिल्म खरेदी करताना स्वस्तात फिल्म देणाऱ्या कंपन्यांना बळी पडू नका. अपारदर्शक किंवा काळी फिल्म खरेदी करताना तिला सूर्यप्रकाशाच्या दिशेने धरावे जर तिच्यातून सूर्यप्रकाश आरपार झाला तर अशी फिल्म खरेदी करू नये. सध्या बाजारामध्ये लाल, निळ्या अशा विविधरंगी फिल्म मिळतात पण या फिल्म खरेदी करण्याचा मोह टाळावा. शक्यतो याऐवजी काळी किंवा सिल्वर फिल्म खरेदी करावी.
    मल्चिंग फिल्म चा वापर करताना खालील प्रकारे काळजी घ्यावी
    प्लास्टिक फिल्म हि सकाळी किंवा सायंकाळी अंथरावी आणि अंथरताना ती जास्त ताणू नये किंवा सैल देखील सोडू नये. फिल्म मध्ये रोपासाठी छेद करताना सिंचन नलिकेची जागा लक्षात घ्यावी. छेद करताना ते एकसमान आकाराचे असावेत आणि छेद करताना फिल्म फाटणार नाही याची काळजी घ्यावी. मल्चिंग फिल्म चा पुनर्वापर होतो म्हणून तिला फाटण्यापासून वाचवावे आणि गुंडाळताना रोल मध्ये गुंडाळून सुरक्षित ठेवावी.
    मल्चिंग पेपरचे फायदे
    ask
    मल्चिंग म्हणजे काय?
    मल्चिंग किती प्रभावी आहे?

ความคิดเห็น • 1