लोणकढी रवाळ साजूक तूप | विरजण कसे लावावे? कसे साठवावे? सविस्तर कृती| रवाळ तुपासाठी 2 टिप्स Sajuk Tup

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.พ. 2023
  • *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
    किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
    saritaskitchenofficial.com/
    To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
    Or Click on the link below to book the order -
    saritaskitchenofficial.com/
    लोणकढी रवाळ साजूक तूप | विरजण कसे लावावे? कसे साठवावे? सविस्तर कृती| रवाळ तुपासाठी 2 टिप्स Sajuk Tup
    पूर्वी घरात फ्रीज नसायचे, तरीसुद्धा प्रत्येक घरी साय साठवून घरच्या घरी लोणकढी साजूक तूप कढवले जायचे. मुख्य म्हणजे ते आंबट नसायचे, ही कसं काय बुवा? पूर्वी एकत्र कुटुंब असेल किंवा दूध चांगल्या प्रतीचे असल्याने साय भरपूर साठायची. अगदी आठवडाभरात भरपूर साय साठून लोणी काढले जाऊन तूप निघायचे. माझ्या माहेरी सुद्धा 2008 पर्यंत फ्रीज नव्हता. आईला कधी गरजच भासली नाही. माझ्या लग्न झाल्यावर सुद्धा विषखपटणं सारख्या उष्ण प्रदेशात 2 वर्षे फ्रीज नव्हता, पण मला कधी गरज भासलीच नाही, कारण आई मुले फ्रीजशिवाय किचन सांभाळणे चांगलेच माहिती होते.
    पण आजकाल घरामध्ये दूध भरपूर नसल्याने किंवा पातळ दूध असेल तर साय कमी निघते आणि पुरेसे लोणी काढण्यासाठी वेळ जास्त लागतो. त्यामुळे फ्रीज मध्ये साय साठवली जाते, पण त्यामध्ये तयार होणारे ताक बेचव निघते. अस म्हंटले जाते की दूध पूर्णानं आहे. त्यापासून कोणताच पदार्थ वाया जात नाही. पण बऱ्याच जणांना तूप कसे कढवायचे माहिती नसते. तर आज आपण घरच्या घरी फ्रीज कहा वापर करून लोणकढी तूप आणि चवदार खमंग ताक कसे बनवायचे ते पाहुयात.
    कृती -
    1) दूध तापवून संपूर्ण थंड झाले की त्यावरची साय काढून झाकून फ्रीज मध्ये ठेवावी. अशीच 3 दिवस साय साठवून ठेवावे, फक्त दर वेळेला नवी साय घातली की हलवून घ्यावे. म्हणजे साय कडवट होत नाही.
    2) चौथ्या दिवशी साय घालावी आणि त्याच्या सोबत थोडे विरजण म्हणजे दही घालावे. आणि चांगले घवळून 5-6 तास रात्रभर साय फ्रीज बाहेरच ठेवावी. म्हणजे मलई ल चांगले विरजण लागते.
    3) दुसऱ्या दिवशी सकाळी साय फ्रीज मध्ये ठेवून द्यावी. आणि आता दररोज येणारी दुधावरची साय यामध्ये घालून रोजच्या रोज चांगले मिसळून घ्यावे, म्हणजे वरची साय चांगली मिसळली जाते आणि पिवळी होत नाही, कडवट होत नाही किंवा बुरशी येत नाही.
    4) पुरेशी साय जमा झाली की जमा झालेले सायीचे दही बेर काढून घुसळून घ्यावे. पाणी न घालता आधी चांगले घुसळून घ्यावे, थोडा तेलकट थर जमा होतोय असे वाटू लागले की थंड पाणी मिसळावे, थंडाव्यामुळे लोणी एकत्र येऊन वर गोळा होतो.
    5) लोणी काढून दुसऱ्या भांड्यात काढावे, लोणी 2-3 वेळा स्वच्छ धुवून ते पाणी जमा झालेल्या ताकात मिसळावे.
    6) तयार लोणी मंद आचेवर जाड तळाच्या भांड्यात कढवण्यासाठी ठेवावे. सुरुवातीला पाणी सुटून फेस येतो, पाण्याचा आवाज कमी होईल तसा तूप कढले असे समजावे, मध्ये मध्ये ढवळून घ्यावे.
    7) पाण्याचा आवाज कमी झाला की गॅस बंद करून त्यात तुळशी पान / खाऊचे पाने / खडे मीठ घालून घालावे, थोडा पाण्याचा शिंतोडा देवून झाकून ठेवावे.
    8) थंड झाले की गाळून काचेच्या बरणीत किंवा स्टील च्या डब्यात भरून ठेवावे.
    #howtomakegheeathome #homemadeghee #tupkasekadhave #lonkadhisajuktup #sajuktup #howtomakegheeathomeinmarathi #saritaskitchen #तूपकसेकाढावे #घरच्याघरीतूपकसेकढवावे #लोणकढतूप #साजूकतूपरेसिपी
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    th-cam.com/users/results?searc...
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
    Production By Odd Creatives & Management 9011394304

ความคิดเห็น • 503

  • @anagharane776
    @anagharane776 ปีที่แล้ว +54

    खूप सुंदर video👌👌 तुमची समजावून सांगण्याची पध्दत अप्रतिम आहे. सगळया प्रश्नांची उत्तरं मिळतात अशा प्रकारचे शिक्षण कोणत्याही centering college ला जाऊनही मिळणार नाही. तुमचं हे chanel आमच्या साठी स्वयंपाक शास्त्राचं विद्यापिठ आहे 👍Thanku vary much

  • @sayaleeparanjape5655
    @sayaleeparanjape5655 ปีที่แล้ว +8

    लोणकढी नव्हे, लोणकढं किंवा लोणकढे असा शब्द आहे. लोणी कढवून केलेलं ते लोणकढं. थाप लोणकढी असते, तूप लोणकढं. बाकी टिप्स परफेक्ट आहेत.

  • @najukabpawar
    @najukabpawar ปีที่แล้ว +12

    माझ्या साठी खूप महत्त्वाची असणार आहे ही व्हिडिओ. . मी नेहमी तूप काढते . पण आज परफेक्ट रेसिपी समजणार. . Thank you ❤️

  • @harshpatil3672
    @harshpatil3672 ปีที่แล้ว +45

    साक्षात अन्नपूर्णा महाराष्ट्र कन्या आपली सरिता ताई ,,

  • @neetagokhale7543

    दह्याला विरजण लावताना ती साठवलेली साय गरम करून घ्यायला पाहिजे अर्थात कसे तर हवामान असेल त्याप्रमाणे.म्हणजे उन्हाळा , हिवाळा , पावसाळा . थंड सायीला विरजण नाही लागत. नाहीतर ती साय कडू होऊ शकते अस मला वाटत.

  • @suvarnakadam3330
    @suvarnakadam3330 ปีที่แล้ว +31

    व्हिडिओ बघण्याच्या आधीच खुप खुप धन्यवाद. I'm really waiting for this video.

  • @monikaingle9605
    @monikaingle9605 ปีที่แล้ว +4

    काचेच्या बरणी मध्ये जे खाण्याचं पण टाकलं ते काढवताना टाकलेलं पान टाकला का की ताजा दुसरं पान टाकला ताई

  • @anitaborse5391

    बेरी पासून काही तरी पदार्थ बनवून दाखवा ना

  • @Homemade1008

    Damle uvach sir yanchya video mde pahila... Hee paddhat chukichi ahe.. Say sathavun nntr virajan lavne chukiche ahe.. Yavr vichar krava.. Baki tumche video chan astat..

  • @nageshKhaje
    @nageshKhaje 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई पावसाळ्यात माठात विरजत घातले तर जमेल का कारण माझ्याकडे फ्रिजर नाही

  • @prabhatasgaonkar7193
    @prabhatasgaonkar7193 ปีที่แล้ว +9

    लोणी क ढ त आले की त्यात दोन लवंग आणि वेलची टाकल्यास

  • @jyotimahajan4610
    @jyotimahajan4610 ปีที่แล้ว +4

    रोज माझ्या मनातलेच विषय येतात ताई मी पण कालच तुप बनवले जास्तीत जास्त मराठी भाषेचा तुम्ही वापर करतात खूप छान

  • @superlicious1775
    @superlicious1775 ปีที่แล้ว +3

    बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली .खूप छान विषय घेऊन व्हिडिओ केला,धन्यवाद🙏👏👌🏻👍

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 ปีที่แล้ว

    मस्तच नक्की करून बघते धन्यवाद ताई

  • @arunitapawandeep8462
    @arunitapawandeep8462 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर पद्धत....

  • @gayatrikhairnar1704

    Tai tu khup Chan explain karte 😊😊😊😊

  • @sangitarajguru7525
    @sangitarajguru7525 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती सांगितली 🙏

  • @vrushhule4128
    @vrushhule4128 ปีที่แล้ว

    Thank you for the tips ...that will help a lot to me

  • @anuradhammane8411
    @anuradhammane8411 ปีที่แล้ว +1

    Thanku so much tai☺👌👌

  • @archanashinde4985
    @archanashinde4985 ปีที่แล้ว +1

    खुपच छान बनवलं साजुक तुप , मला दोन दिवसापासुन वाटतं होते तु तुप बनवुन दाखवणार का माहीत नाही पण जे वाटलं ते खरं झालं 😊