अशी होते आमच्या दिवसाची सुरुवात | dhangari jivan | sidu hake

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2023
  • थंडीतही भल्या पहाटे करावी लागते दिवसाची सुरुवात • थंडीत असं राहतोय आम्ही...
    थंडीतील धनगरी जीवन • थंडीतील धनगरी जीवन || ...
    #dhangar
    #dhangarijivan
    #siduhake
    #थंडी
    #winter
    #धनगर
    #balumama

ความคิดเห็น • 420

  • @sangeetamhatre3986
    @sangeetamhatre3986 ปีที่แล้ว +258

    बाणाई, अर्चना तुमच्या धनगरी समाजातील सर्वच स्त्रीया इतक्या कष्टमय जीवनात पण कीती सुखाने, समाधानाने राहातात 🙏👍♥️.. नाहीतर सर्व सुख सुविधा पायापाशी असून पण लोक समाधानी नसतात.

  • @dilipkhemnar9201
    @dilipkhemnar9201 ปีที่แล้ว +31

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोक्यावरचा पदर पडु देत नाही हिच तर खरी संस्कृती आहे आमच्या मेंडक्यांची

  • @manishatamboli1590
    @manishatamboli1590 ปีที่แล้ว +111

    एवढे कष्ट आहेत तुमच्या आयुष्यात पण कोणतीच तक्रार न करता जीवनाचा आनंद घेत आहात, खरच सलाम तुम्हाला 🙏👌

  • @narendradeore188
    @narendradeore188 ปีที่แล้ว +52

    नेहमी असंतुष्ट आत्मा असलेल्या माणसांनी जरी तुमचा व्हीडिओ बघितला तरी त्यांचं मन शांत होईल भाऊ 👌👌

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt ปีที่แล้ว +74

    देव तुमचे रक्षण करो 🙏🙏 बाळूमामा, बिरोबा आहे तुमचा पाढी राखा 🙏

  • @madhuribhoye5960
    @madhuribhoye5960 ปีที่แล้ว +46

    आम्ही चार भिंतीत राहतोय तरी किती थंडी जाणवतेय... तुमचं तर जीवन खरचं खूप आवघड आहे... सलाम आहे तुम्हाला.... बेस्ट व्हिडिओ...

  • @user-fi1rx2zi5w
    @user-fi1rx2zi5w ปีที่แล้ว +24

    बापरे, असं उघड्यावर राहणं महाकठीण आहे हो... तुम्हां सर्वांना मनापासून साष्टांग दंडवत 🙏

  • @nutanborse5298
    @nutanborse5298 ปีที่แล้ว +73

    खरच खूप खडतर आहे आयुष्य पण तुम्ही सगळे कष्टाळू , मेहनती, आहात. मस्तपैकी postive आहात तुम्ही ,आयुष्यात नेहमी आनंदात रहा
    जय मल्हार 🙏

  • @vandanachavan7418
    @vandanachavan7418 ปีที่แล้ว +47

    खुप कष्टाची भाकरी आहे पन किती आनंदी आहात .सलाम तुमच्या कष्टाला

  • @bholanathwadwane5522
    @bholanathwadwane5522 8 หลายเดือนก่อน +4

    फार कष्टमय जीवन जगत आनंदी असणं ही फार कठीण काम आहे.स्त्रियांना तर जास्त काम आहे तरीसुद्धा त्या समाधानी आहेत .फार सुंदर तुम्ही वर्णन करत असतात धनगरी जीवनाचे.साधी राहणी आणि त्यामध्ये असलेले सुख हे तुम्ही दाखवले.समाजाने यातून काही अर्थबोध घ्यावा. बाणाई आणि अर्चना ,सागर तुम्ही दोघे किती आनंदात आहोत.कृत्रिम पणा नाही.

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 ปีที่แล้ว +27

    हाके पाहुणे तुमचा व्हिडिओ आला की तूम्ही सर्व सुखरूप आणि आनंदात आहात हे पाहून बरे वाटते. पूर्वी लोक पत्र पाठवून खुशाली कळवायचे. मोठी माणसे पत्र लिही म्हणून तगादा लावायचे त्यामागे अप्तजनांची काळजी हेच कारण असावे.
    मनोरंजन म्हणून नाही पण तुम्हा सर्वांची खुशाली कळावी म्हणून व्हिडिओ टाकत जा. तुम्ही सतत आनंदात राहावे यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd ปีที่แล้ว +22

    एकीकडे लोक पैसा,स्वार्थ या कारणामुळे जीवनातील शांतता हरवून बसत आहेत.दुसरीकडे तुम्ही आहे त्यात खूप समाधानी आणि सुखी आहे.खूप छान 👌

  • @vedikaslife3034
    @vedikaslife3034 ปีที่แล้ว +17

    बाळुमामाच्या नावानं ,मायाक्का देवीच्या नावानं ,बिरोबाच्या नावानं चांगभलं 🚩🚩

  • @Pratibha_Biraris
    @Pratibha_Biraris 7 หลายเดือนก่อน +7

    दादा तुमची सकाळ ची सुरुवात खुप छान होते ❤🎉

  • @krishnalokhande7039
    @krishnalokhande7039 9 หลายเดือนก่อน +1

    नादच खुळा

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate2436 8 หลายเดือนก่อน +9

    अगदी मनातली गोष्ट सांगायची तर जुन्या मराठी सिनेमा मधून दाखवले होते त्या घटना पुन्हा बघायला मिळतात असं वाटलं। खूप खूप मनापासून आवडला हा व्हिडिओ। 😊

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 ปีที่แล้ว +16

    हाके दादा, आपला पहाटेपासून जीवनक्रम आपण दाखविलात, त्यात विशेष म्हणजे आपण थंडीत उघड्यावर बायका मुलासह राहत आहे, व त्यातून सर्वजण आनंदी जीवन जगत आहेत, फारच कष्टमय जीवन सर्वांचे आहे .

  • @ratna685
    @ratna685 ปีที่แล้ว +15

    बाणाईने कुंकू किती मस्त 👌 रेखीव लावल.💕

  • @adinathpatil1092
    @adinathpatil1092 ปีที่แล้ว +29

    दादा अस्सल गावरान जीवन जगत आहात तुम्ही 💐👑

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 ปีที่แล้ว +13

    खूप छान वाटला व्हिडिओ. एवढ्या थंडीमध्ये काम करणे खूप कठीण आहे. हात पण लवकर वळत नाहीत , काम करायला. भांडे घासायला गरम पाणी घेत जा, बानाई वहिनी आणि अर्चना वहिनी. खूप कष्टाळू आहात दोघी पण. छान वाटत बघून.

  • @tusharramgude8455
    @tusharramgude8455 ปีที่แล้ว +18

    दादा तुमचा आजचा व्हिडिओ एक आदर्श आहे कुठल्याही प्रकारची सुख सुविधा नसताना देखील किती आनंदी आणि समाधानी आहात ही खुप मोठी शिकवण हा बोध मिळतो खरंच थँक्स

  • @krishnagadakh6397
    @krishnagadakh6397 ปีที่แล้ว +18

    घोंगडीवर झोपता तूम्ही,, हे बघून खूप आनंद झाला. असेच आनंदी रहा.. सागरची काळजी घ्या.

  • @mokindalad6215
    @mokindalad6215 ปีที่แล้ว +20

    दादा तुमी किती किती लवकर ऊठता व किती कष्ट करता सलाम आपल्या कार्याला.सलाम आपल्या कुटुंबाला.🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌

  • @IndianMomDarshana93
    @IndianMomDarshana93 ปีที่แล้ว +151

    दादा रोज अर्धा तासाचा एक व्हिडिओ टाकत जा. आम्हाला आवडेल जास्त वेळ व्हिडिओ पाहिला. 🥰

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 ปีที่แล้ว +11

    खुप सुंदर सकाळ आहे दादा... धुक्यात हरवलेली नदी.. अर्चना वहिनीची सकाळची चुल पेटवण्यापासुन ते कुंकू लावणे..देवपूजा करणे .. एखादा जुना मराठी सिनेमा पहातेय कि काय असच वाटत होत.रानावनात रहाताय तरी किती स्वच्छ भांडी, स्वच्छ पाणी..सगळ कस व्यवस्थित झाकून ठेवता.
    या थंडीवा-यातल तुमच जीवन खरच खूप खडतर आहे...पण त्यापलीकडे जाऊन बघीतल तर तुम्ही आताच्या यांत्रिक युगापासून , मानसिक ताण तणावापासून तरी दूर आहात.
    सागरच टोपड खूप छान आहे पण त्याला लोकरीची गळाबंद टोपी घ्या.खुपच थंडी आहे.काळजी घ्या.🙏

  • @sudarshanatole-jy6ly
    @sudarshanatole-jy6ly ปีที่แล้ว +6

    अरे धनगराची लेकरं जिथे जाईल तिथे पाणी काढील जय मल्हार ,बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @mehandi_by_shreyu._
    @mehandi_by_shreyu._ ปีที่แล้ว +104

    🙏❤️●||श्री स्वामी समर्थ||●🙏❤️
    Mst vlog 🙏 बोचणारी थंडी मध्ये खूप कठीण काम आहे 🙏कमाल तुमची दादा 🙏

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 ปีที่แล้ว +18

    आज इथं उद्या तिथं...सतत एवढा मोठा प्रपंच घेऊन चालत रहायचं.....रोज नवी जागा नवी चुल....धनगर समाजाच्या भटकंतीवर बोलाव तेवढं कमीच आहे.....

  • @user-hs9fr5kf4l
    @user-hs9fr5kf4l 9 หลายเดือนก่อน +1

    Dada vahini ek noo

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +15

    दादा तुमचे सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आणि वाईट पण खूप वाटते एवढ्या कडाक्याच्या थंडीत पण तुमचे काम चोखपणे पार पाडता सलाम तुम्हाला सर्वांना 🙏🙏👍
    सागर गडी एवढा लहान बाळ🤗आहे त्याला तर किती थंडी लागत असेल वहिनी, व अर्चना दोघी पण खूप कष्ट करतात. तुम्ही एकमेकांना समजून घेता साथ देता. त्याशिवाय येवढ कधीच शक्य नाही 🙏🙏👍दादा तुमचे video मध्ये नव्याने काहीतरी पाहायला मिळते तुमच्या video खूप उत्सुकता असते Video खूप खूप आवडतात. 🙏🙏🙏🙏👌👍

  • @saritqyadav3133
    @saritqyadav3133 ปีที่แล้ว +13

    दादा रोज असा व्हिडिओ टाका खूप छान होता

  • @kiranpawar3369
    @kiranpawar3369 ปีที่แล้ว +2

    काय आयुष्य आहे, खडतर ,कष्टमय पण अजिबात चेहऱ्यावर त्या गोष्टींचा लवलेशही नाही.
    ते बारक पिल्लु इतक्या थंडित पण हसतय यातच सर्व सार आल.
    देव सागरला नेहमी तुमच्या रुपाने आंनदी ठेवो
    आणी तो खुप शिको हिच खंडेराया चरणी प्रार्थना.
    बाळुमामा आहेच सदैव आपल्या रक्षणाला

  • @rupalipadalkar1583
    @rupalipadalkar1583 ปีที่แล้ว +5

    दादा तुम्ही बनाई शी किती सुंदर बोलता ❤️❤️

  • @lakhankale4995
    @lakhankale4995 ปีที่แล้ว +12

    खरंच जी जुनी परंपरा आहे धनगर जीवनाची ती तुम्ही चालू ठेवली भारी,
    हाके पावन

  • @umapatil4756
    @umapatil4756 ปีที่แล้ว +2

    Kharach tumache jivan baghun amache je rojche radgane band jhale . tumachya ya khadatar jivanat tumhi kiti sukhi rahata. Ani amhi chotya chotya goshti sathi radat basaycho . Tumachya kadun khup kahi shikalo . Jivanat samadhanat ch sukh ahe he tumhich shikavale. Tumachya saglyanche khup khup dhanyawad ❤❤❤❤❤tumhi khup sukhi Raha God bless you.

  • @vijaygamre1325
    @vijaygamre1325 9 หลายเดือนก่อน +2

    सुंदर उपक्रम आहे ❤

  • @sakharammahanvar6231
    @sakharammahanvar6231 ปีที่แล้ว +4

    मस्त पाकी सर्व चाललंय आमच्या पाहुण्यांचं कोकणात. बिरोबाच्या नावानं चांगभलं. जय मल्हार. असेच आनंदात रहा .

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 ปีที่แล้ว +4

    खुप खुप खुपच छान vdo
    समग्र दर्शन धनगरी समाजाचे
    एक चित्रपट च बघितल्या चे समाधान मिळते
    खरे खरे जीवन🙏

  • @sunilgurav8856
    @sunilgurav8856 ปีที่แล้ว +7

    तुमच्या बिऱ्हाडवर जाऊन आम्ही ताक घेऊन येतो एकदम मस्त लागते आमच्या येथे आद्रकि ची लोक आहेत जावली तालुका मध्ये फार चांगली लोक आहेत

  • @yashawantkolape217
    @yashawantkolape217 ปีที่แล้ว +7

    तुमचे व्हिडीओ पाहून मला माझ्या लहानपणाची आठवण येते. आपलं बकऱ्या मागचे दिवस खूप मस्त असतात. पणं पाउस, थंडी या दिवसांत खूप खूप हाल होतात. तुमचे व्हिडीओ मला खुप खूप आवडतात. असेच व्हिडियो टाकत जावा आमच्या जुन्या आठवणींना उजाळा भेटतो 👌👌

  • @surajwaghamode8299
    @surajwaghamode8299 ปีที่แล้ว +4

    तुम्ही खरच धनगर म्हेंढपाल जीवन कसं असते कष्ट सगळे जगाला दाखवत आहेत...छान...धनगर खरच प्रमाणिक असतो....

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister ปีที่แล้ว +9

    दादा तुम्हु सर्वजण तंबू ठोकुन रहात जा ना. हे काय बरोबर नाही.. थंडी खुप आहे. ..आम्हाला नाही पहावत..आओ...😢😊😊👌👍

  • @nitinmohape945
    @nitinmohape945 ปีที่แล้ว +8

    लय भारी जिवन.. आम्ही पैसा पैसा करुण मसणात जायाला आलो पण सुख नाय मिळाला..

  • @sunandanair5658
    @sunandanair5658 ปีที่แล้ว +2

    तुमचे सगळे व्हिडिओ आम्हाला आवडतात. सागर पण खूप आवडतो.

  • @vaishalikarad6736
    @vaishalikarad6736 ปีที่แล้ว +4

    माझी first comment ,दादा बानाई ताई, दिर जावेच्या मुलावर पुत्र वत प्रेम करता खरचं तुम्ही खूप निर्मळ मनाच्या आहात . मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहते & माझ्या आईला पण दाखवते तिला पण खूप आवडतात तुमचे videos ,दादा🙏🙏

  • @sanjivanibadave1947
    @sanjivanibadave1947 ปีที่แล้ว +4

    🙏खूप खूप खूप छान कष्ट भरपूर पण जीवन सुखी तूमच्या रोजच्या जीवनातल्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी पैसे मोजून आनंद घेतात

  • @archanapatil3592
    @archanapatil3592 ปีที่แล้ว +6

    तुमचा व्हिडिओ पहिला...की छान वाटते भाऊ....तुमची जीवन शैली खुपजवळून बघायला मिळाली....

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 ปีที่แล้ว +3

    बलवान शरिर हाच खरा दागिना असतो

  • @neelambhaskar5815
    @neelambhaskar5815 ปีที่แล้ว +5

    अस आडवा कुंकू माझी आजी लावायची आणि दोऱ्याने कोरायची तुमच्या व्हिडिओमुळे तुमचे रानातले जीवन जवळून पाहायला मिळते खूप छान

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 ปีที่แล้ว +4

    दादा खूपच सुंदर vdo आहे.. किती कष्ट करता तुम्ही सगळे.. तुमच्या सगळ्यांचे खूप कौतुक..मला माझ्या पनवेलचे दिवस आठवले..तेव्हा गाव होते आता मोठे नवी मुंबई शहर झाले..तर आमच्या घराच्या मागे भली मोठी गवताळ जागा होती..आम्ही त्याला खेताडी म्हणायचो..त्या मोकळ्या जागेत तुमच्या धनगरी समाज काही दिवस रहायचा..आभाळाचे छताखाली खूप आनंदाने रहायचे..आम्ही त्यांच्या मुले व मेंढ्या बरोबर खूप खेळायचो.. त्यांच्यातले एक काका आम्हांला छान गोष्टी सांगायचे..आम्हांला शेळीचे दुधही प्यायला द्यायचे.. त्या दुधाचे औषधी गुण आम्हाला व आमच्या घरच्यांना सांगायचे.. घरच्यांनीही यात आम्हाला कधी अडवले नाही.. खूपच छान होते ते दिवस.

  • @shobhachavan9646
    @shobhachavan9646 ปีที่แล้ว +5

    Dada kharac kiti अवघड जीवन आहे तुमचे
    तरी किती प्रेमाने मिळून मिसळून राहता असेच नेहमी आनंदी राहा मी अजून कधीच कॉमेंट केली नव्हती पण आज करावी वाटली तुम्ही सगळेच खूप छान आहात काळजी घ्या

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 ปีที่แล้ว +12

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी थंडी खूप आहे काळजी घ्या सकाळी सकाळी खूप कामे करावी लागतात दादा दररोज व्हिडिओ टाकत जा आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो

  • @najukapawade5050
    @najukapawade5050 ปีที่แล้ว +4

    आम्ही पण लाहणपणी पितळी मध्ये चहा प्यायचो खूप भारी

  • @narendradive7
    @narendradive7 ปีที่แล้ว +8

    तुमच्या मुळे आम्हला तुमचं जीवन काय असत ते बगायला भेटत 🙏

  • @vandananavale6559
    @vandananavale6559 11 หลายเดือนก่อน +2

    बानाई हे नावं मला खूप आवडले आणि बाणाई पण खुप छान दिसते जेवण तर खूपच छान करते दोन तीन च व्हिडियो पाहून मला आवड लागली आहे तुमची सगळ्यांची खुप छान परिवार आहे tumcha

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 ปีที่แล้ว +22

    दादा तुम्ही लहान कोकराची किती काळजी घेता. खरचं एवढ्या थंडीत राहणं सोपे नाही. देव तुमचे रक्षण करो. 👌👌🙏🙏

  • @user-pn1sr5kj1q
    @user-pn1sr5kj1q ปีที่แล้ว +6

    जय मल्हार जय शिवराय जय शंभुराजे जय अहिल्या देवी

  • @maheshpagar8414
    @maheshpagar8414 ปีที่แล้ว +9

    मस्त भावा... खूप सुंदर जीवन जगता... निसर्गाच्या सहवासात.

  • @bhausomhske2899
    @bhausomhske2899 ปีที่แล้ว +5

    खूप छान वाटतं बघायला खूप कष्टाचं काम आहे

  • @muskanshaikh319
    @muskanshaikh319 ปีที่แล้ว +2

    My god itkya thundit uthun nadichya kadela itke Kam mahnet bap re salam koti koti speechless 😶

  • @surekhanghogare5647
    @surekhanghogare5647 ปีที่แล้ว

    खूप छान दादा मस्तच वातावरण आहे खूप छान वाटले

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 ปีที่แล้ว +5

    लय भारी जय मल्हार

  • @santoshture8108
    @santoshture8108 ปีที่แล้ว +2

    दादा तुमचा व्हिडिओ छान होता . तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करतात बाणाई ताई व अर्चनाताई सुद्धा खून कामे करतात .🎉🎉👌👌👌👌👌👌🎉

  • @SAmol-nj5ct
    @SAmol-nj5ct ปีที่แล้ว +3

    या माऊली ला माझा मानाचा मुजरा

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว +1

    Khupp Chan Tumchay Dinkram Aahe Lai Bhari 👌👌👌👌👌

  • @user-gj2hh3kz2u
    @user-gj2hh3kz2u ปีที่แล้ว +2

    मस्त दादा एकच नंबर विडिओ तुमच्या मेहनतीला सलाम 🙏🙏

  • @akashmandlik6812
    @akashmandlik6812 ปีที่แล้ว +1

    कष्टाळू आणि मेहनती जीवन पण ..एक नंबर आहात तुम्ही लोक

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 ปีที่แล้ว +2

    सकाळ छान प्रसन्न केली सिध्दु दादा तुम्ही तुमचाही दिवस छान आनंदात जावो. 👍🏻

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 ปีที่แล้ว +2

    पुण्यवान मानसं हाय तुमी👍💗💖

  • @anitazende2282
    @anitazende2282 ปีที่แล้ว +1

    खूप छान आम्ही लहान असताना धनगर वाड्यावर राहिलो आहे आणि ताटामध्ये शेळीच्या दुधाचा चहा पण पिलो आहे . आमच्या मामाच्या घरी धनगर मामा कामाला होते. सासवड जवळ वनपुरी येथे खूप छान वाटायचे तेव्हा त्यांच्या बरोबर राहायला.

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 ปีที่แล้ว +19

    आजचा video अप्रतिम. कौतुक करायला शब्द अपुरे.
    जर youtube ने Best Video स्पर्धा घेतली तर या videola ,आणि तुमच्या सगळ्याच videos ना फर्स्ट नंबर मिळेल.
    खूपच सुंदर.
    तुम्हाला content चि कमी नाही.
    बाकी youtuber चे daily vlogs आणि तुमचे daily vlogs यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
    मस्तपैकी.
    कमाल.

  • @ujwalawagh7739
    @ujwalawagh7739 ปีที่แล้ว +1

    बाणाई, आर्चना आणि दादा तुमच्या कडे बघून खूपच छान वाटतंय. खुप कष्ट मय पण समाधानी जीवन तुम्ही जगतात.
    बाणाई तुझी जेवण बनवतानाची जी स्वच्छता आणि नीटनेटके पणाने करते ते खुप आवडते.
    अजून एक तुझा पाटा वरवंटा खूपच आवडला.
    तुम्ही कोणत्या भागात आहेत. कधी तिकडे येणे झाले तर नक्की भेटू 🙏🏻

  • @sagarkahandal7627
    @sagarkahandal7627 ปีที่แล้ว

    🙏 नमस्कार 🙏
    अप्रतिम खूप छान कष्ट खूप पण समाधान पण भरपूर......

  • @poojaphakatkar2057
    @poojaphakatkar2057 ปีที่แล้ว +4

    खुपच छान आहे.. तुमचे सगळे विडीओ...

  • @deepakpandit3984
    @deepakpandit3984 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर व्हिडिओ बनवला आहे दादा तुमचे सर्व व्हिडिओ छान असतात

  • @user-hq5lf2yl8c
    @user-hq5lf2yl8c ปีที่แล้ว +5

    दादा जय मल्हार.... सर्व मित्रांना वीनंती आहे .... की यांचे व्हिडिओ मध्ये आलेली जाहिरात स्किप करू नका पूर्ण जाहिरात बघा... म्हणजे यांना आर्थिक मदत होईल ....

  • @sunitamayekar9119
    @sunitamayekar9119 ปีที่แล้ว +1

    खूपच छान मस्त.खर जिवन तुमचं कष्टाचं खडतर.पण लय भारी. छान वाटलं बघून.

  • @atulybharat1407
    @atulybharat1407 ปีที่แล้ว +3

    आनंदी जिवन फुले तुमचा 🙏⛳

  • @RAHUL-jx4ie
    @RAHUL-jx4ie ปีที่แล้ว +6

    लय झकास विडीओ 👌👌👌👌👌

  • @kalpanagole6629
    @kalpanagole6629 ปีที่แล้ว +1

    खुपच मस्त व्हिडीओ दादा बाणाई वाहिनी आणि दादा तुम्ही ग्रेट आहात 🙏🙏🙏

  • @jabinshaikh5799
    @jabinshaikh5799 หลายเดือนก่อน

    Tumche video mala khup aawadtat

  • @sarasatishsable1448
    @sarasatishsable1448 ปีที่แล้ว +3

    सागर खुप छान आहे स्वीट बेबी.

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 ปีที่แล้ว +1

    सलाम तुमच्या कार्याला👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pramodnipanikar1947
    @pramodnipanikar1947 ปีที่แล้ว

    Lay bhari dada tumcha jivan aamhi padloy ethe khuradhayat

  • @sachinkumbhar3520
    @sachinkumbhar3520 6 หลายเดือนก่อน

    Mast paiki no 1 video ahe

  • @rajendrapatil9998
    @rajendrapatil9998 ปีที่แล้ว +1

    बनाई अर्चना खंडू दादा किसन तुमचे जीवन अतिशय खडतर असली तरी सुखाची आहे मल्हारी मार्तंड आपणा सर्वावर कृपा करो

  • @sureshwanere1389
    @sureshwanere1389 ปีที่แล้ว

    खुपच छान दादा फारच कठीण असते जीवन जगन

  • @dipakingale1226
    @dipakingale1226 ปีที่แล้ว

    Dada ekdam mast Chan vatle ha viedo pahun 👌

  • @prakashpable2134
    @prakashpable2134 ปีที่แล้ว +1

    Mastch shandar lay bhari video

  • @anaghanirulkar7165
    @anaghanirulkar7165 10 หลายเดือนก่อน +1

    दादा बाणाई आणि तुम्ही मला खुप आवडता

  • @udaykamble8196
    @udaykamble8196 9 หลายเดือนก่อน +1

    Bharich❤❤❤❤

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 ปีที่แล้ว

    खूप छान आहे खूप कष्टाळू आहात

  • @ratnabadgujar8861
    @ratnabadgujar8861 ปีที่แล้ว +9

    भावा लय भारी आहे video आणि तुमचे जीवन शैली खूप सुंदर आहे नैसर्गिक वातावरणात सकाळी सकाळी तुमचा चहा...खूप भारी वाटलं

  • @anantgawai440
    @anantgawai440 ปีที่แล้ว +3

    खूप छान विडिओ आहे नमस्कार

  • @virajhake4636
    @virajhake4636 ปีที่แล้ว +6

    खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍

  • @archanadixit7163
    @archanadixit7163 5 หลายเดือนก่อน +1

    #राम लक्ष्मण, गावी भरत सुला
    #सीता उर्मिला आणि त्यांच सागर नावाचा बाळ या युगातील
    #खूप सुंदर व्हिडीओ दादा

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 ปีที่แล้ว +5

    Khup Chan kalji ghya

  • @lordyashhgamerz7021
    @lordyashhgamerz7021 ปีที่แล้ว +2

    कष्टाचे आणि मेहनतीचे जीवन आहे तुमचे तरीही आनंदाने सर्व कामे करतात तुम्ही सगळे, थंडी खूप आहे सागर च्या पायात नेहमी चप्पल देत जा तो लहान आहे .

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 10 หลายเดือนก่อน +2

    Chhan Video

  • @rupeshsapkal8865
    @rupeshsapkal8865 ปีที่แล้ว +3

    खूप नयनरम्य दिवसाची सुरुवात बगतच बसावं वाटत दादा अशी दिवसाची सुरुवात आहे.