मुलांवर चांगले संस्कार आणि श्रीमद आद्य शंकराचार्य जन्म कथा । ह.भ.प. विवेकबुवा गोखले । KirtanVishwa

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • मुलांवर चांगले संस्कार कसे करावे ?
    दत्त संप्रदायी कीर्तन - ह.भ.प. विवेकबुवा गोखले
    आपली मुले ही नुसती संतत्ती असू नये. ती सुसंतती असावी. सुसंस्कारीत असावी. त्या संस्कारावर पालकांनी अधिक लक्ष द्यावे, यावरील चिंतन या कीर्तनामध्ये आहे. या चिंतनाला जोड म्हणून श्रीमद आद्य शंकराचार्य यांच्या कार्याचा आढावा घेऊन, आचार्यांच्या जन्माची कथा या कीर्तनामध्ये सांगितली आहे.
    मुलांवर चांगले संस्कार कसे करावे ?
    Adi Shankaracharya
    Marathi Kirtan
    Vivek Gokhale
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

ความคิดเห็น • 273

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  ปีที่แล้ว +1

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @narendradixit0540
    @narendradixit0540 3 ปีที่แล้ว +6

    मा.गोखले बुवांनी आद्य शंकराचार्यांच्या जन्माची कहाणी उत्तम सोप्या अलंकारीत भाषेत कथन केल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.कथा कथयती इति किर्तन:ये किर्तनात् करति ते प्रगल्भ किर्तनकार: अशी त्यांची व्याख्या कराविशी वाटते.त्यांच्या किर्तनात मराठी मिडियमची आजची पिढीहि रंगेल. किर्तन उत्तम झाले.

    • @avanik2961
      @avanik2961 ปีที่แล้ว

      अप्रतिम ऐकून खूप खूप आनंद मिळाला असेच चालू राहू दे मुकुंद कुलकर्णी

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 3 ปีที่แล้ว +6

    किर्तन विश्व करीतो किर्तनांची मांदियाळी , आत्मभान जागवून धर्म निरपेक्षतेची रोवती डहाळी.! चालविसी उत्तम अध्यात्म कार्य, श्रोत्यांनी द्यावी भरपूर सहकारी , जे असे अनिवार्य स्वदेशधर्माकारणे।।।
    अत्युत्तम झाले किर्तन सुविचारी सुसंदेशाद्वारे सुधारो वर्तन, त्यागावे पाश्चात्य नर्तन, साधुसंताचे जवळी बैसोन ,दिव्यचरणी नतमस्तक होऊन मागू आर्शीवचन हीच श्री दत्तप्रभुना विनम्र प्रार्थना।।।
    नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं नमोस्तुते।।।
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    • @vaishaligodse3096
      @vaishaligodse3096 3 ปีที่แล้ว +1

      आजच किर्तन खुपच छान झाली 🙏🙏🙏🙏

  • @neelimakulkarni6802
    @neelimakulkarni6802 3 ปีที่แล้ว

    विवेकबु्यांची प्रस्तुत विषयावरची पकड उत्तम आहे. संगीतआणि कथन तर फारच सुरेख.
    👌🏼👌🏼

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 3 ปีที่แล้ว +6

    सगळ्यांना नमस्कार 🙏🙏🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 दत्त दत्त दत्त 🙏🙏🙏 किर्तन विषय खुप छान 👌👌🙏🙏🙏

  • @nalinirasal8036
    @nalinirasal8036 9 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम अप्रतिम कीर्तन विनम्र वंदना

  • @jayashridate7150
    @jayashridate7150 3 ปีที่แล้ว +1

    🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
    विज्ञानार्कमरिचिजालनिहताविद्यान्धकार:व्रजा।
    शब्दब्रह्म समुद्रमंदरगिरी सिद्धांतबद्धव्रतः।।
    ब्राह्मीनर्तनरंगभूमीरसनासंशोभिताभ्यानना।
    सोयं सर्व जगद्गुरुर्विजयते श्रीमान् प्रभुः शंकरः।।
    🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🙏😇

  • @subhasha.mahajan329
    @subhasha.mahajan329 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम किर्तन ऐकायला मिळाले. सत्तर च्या दशकातील प्रसिद्ध किर्तनकार बीडचे गंगाधरराव शास्त्री , बार्शीचे करंदीकर बुवा याचे किर्तन ऐकत होतो . आज किर्तनविश्व च्या माध्यमातून नामवंतां चे किर्तन ऐकतो आहे.

  • @sudhawikhe202
    @sudhawikhe202 ปีที่แล้ว +1

    भगवान शंकराचार्य स्वामी जी को शत शत नमन, सब संतो को असंख्य प्रणाम गोपाल कृष्ण महाराज जी की जय हो 🌹🌹🙏 🙏

  • @aartishevde283
    @aartishevde283 2 ปีที่แล้ว

    Wa सुंदर त्रिवेणी संगम तीन हरी भक्त.कीर्तन छानच.आपल्या या कीर्तन विश्वा मुळे आम्हाला चांगली कीर्तन ऐकता येतात .धन्यवाद.स्वामी समर्थ

  • @rajivtanksale4839
    @rajivtanksale4839 3 ปีที่แล้ว +1

    फारच उत्तम आहे
    जय गुरूदेव दत्त

  • @rajaramkondalwade1067
    @rajaramkondalwade1067 3 ปีที่แล้ว +2

    परमपुज्पग गूरुवर्य हभप श्रीआफळे गूरुजी वहभप विवेकबुवा पायी वंदन.किर्तन विश्वआभारी आहे.

  • @netraoak7010
    @netraoak7010 ปีที่แล้ว +1

    खूप श्रवणीय झाले, माहिती पूर्ण, संगीतमयही

  • @bajiraochaudhari4877
    @bajiraochaudhari4877 3 ปีที่แล้ว

    गोखले बुवा कीर्तन अगदी छान झालं. अभंग व विषय ही चांगलाच घेतला आहे. धन्यवाद 🙏🙏

  • @suhasarondekar3899
    @suhasarondekar3899 3 ปีที่แล้ว

    हरी ओम.कीर्तन फारच छान झाले. अष्टोप्रहर जो देशाचा व धर्माचा विचार करणारा एकच पुत्र व्हावा जो नरेंद्र मोदी सारखा असावा.

  • @chandrashekharpethe8276
    @chandrashekharpethe8276 3 ปีที่แล้ว +1

    खूपच श्रवणीय आणि चिंतनीय कीर्तन श्रावणाची संधी मिळाली ।खूप धन्यवाद
    या कथा श्रवणातून आता श्रीमद शंकराचार्य स्वामींचे जीवन चरित्र अश्याच सुंदर किर्तनानांतून ऐकावे असे वाटू लागले आहे ।
    हे दिव्य चरित्र कीर्तन विश्व च्या माध्यमातून ऐकता येईल अशी शिव शंभो चरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhadaketkar
    @shubhadaketkar 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान कीर्तन झाले आहे, शंकराचार्य जन्म आख्यान आपल्या कडून ऐकण्याचे भाग्य आजच्या दिवशी भारताबाहेर राहूनही ऐकण्याचा योग आला, हे केवळ किर्तनविश्र्व ह्या उपक्रमामुळेच शक्य झाले, ह्याआधीची सर्व कीर्तने व मुलाखती ऐकण्याचे भाग्य मला मिळाले याबद्दल सर्वांचे कौतुक व आज माझ्या लग्नाच्या ४२ वर्षांचा काळ समाप्त झाला, पुढील १२ वर्ष अखंड सेवेचा लाभ मिळत रहाणार आहे, त्यामुळे सर्वांना नमस्कार सगळ्या संताना, आचर्याना, बुवांनाही.

  • @vaishaliharsulkar6618
    @vaishaliharsulkar6618 3 ปีที่แล้ว +10

    अतिशय सुंदर अभंग... आद्य शंकराचार्य यांचे जन्म पूर्व आख्यान अप्रतिम..... आशुतोष या शब्दाचा अर्थ 👌👌🙏🙏

    • @rajanakhye3110
      @rajanakhye3110 3 ปีที่แล้ว +2

      अर्थ : सहज किंवा लवकर प्रसन्न होणारा.
      उदाहरणे : भगवान शंकराला आशुतोष देव म्हटले जाते.

    • @sumananjalisumananjali9665
      @sumananjalisumananjali9665 3 ปีที่แล้ว

      Va!apratim! kharch kan agdi trupt zale!

    • @sumananjalisumananjali9665
      @sumananjalisumananjali9665 3 ปีที่แล้ว

      Anjali sane

    • @sumananjalisumananjali9665
      @sumananjalisumananjali9665 3 ปีที่แล้ว

      Khup khup chan akhyan Anjali sane Chiplun

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 2 ปีที่แล้ว

    जय श्रीराम
    सध्याच्या काळात आपण तपश्चर्या करू शकत नाही .पण आवडीने आपण संतांची संगत धरून आयुष्याचा प्रवास सुखकर करू शकतो .यासाठी आवड सदासंगती संताचीच धरावी. चांगल ऐकण्यासाठी समर्थांना मनोभावे प्रार्थना करावी .हीच मनोकामना धरून मनोगत पूर्ण करतो .( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )

  • @adhikraoamrutkar9408
    @adhikraoamrutkar9408 3 ปีที่แล้ว

    खूपच छान कीर्तन झाले आद्य शंकराचार्य जन्मकथा ऐकून मन प्रसन्न झाले जन्माची सनावळ सांगितली असती तर अजून ज्ञानात भर पडली असती ।असो खूपच छान कीर्तन झाले।

  • @kirtijoshi2646
    @kirtijoshi2646 3 ปีที่แล้ว +2

    फारच छान सुंदर आद्य शंकराचार्य श्री स्वामी महाराज किर्तन आहे.

  • @dhananjayvasaikar6652
    @dhananjayvasaikar6652 3 ปีที่แล้ว +6

    वाटे संन्यास घ्यावा, असतिल जन जे दंड, त्या दंड द्यावा।
    वादाचा मुख्य हेवा धरुनि मनि त्वरे मंडळाला पहावा ।।।
    जिंकूनी त्या करावा यति मग इतरा लागि संन्यास द्यावा ।।
    ही इच्छा पूर्ण माझी बहुत अपुला काय हेतू असावा।

    • @anilbasarkar4574
      @anilbasarkar4574 3 ปีที่แล้ว

      खुपच छान🌹🌹👌👃

  • @madhurijoshi5930
    @madhurijoshi5930 3 ปีที่แล้ว +2

    Atishay Sushrawya v Anandadai kirtan!🙏🙏🙏🙏🙏👍👍👌👌

  • @shirishshanbhag1199
    @shirishshanbhag1199 3 ปีที่แล้ว

    अप्रतीम कीर्तन शंकराचार्यांवर झाले.

  • @mandakinitarlekar3460
    @mandakinitarlekar3460 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार,श्रीराम.पूर्वरंग आणि आख्यान अप्रतिम.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

  • @aratibhide1790
    @aratibhide1790 3 ปีที่แล้ว +3

    आज प्रथमच श्रीमद आद्य शंकराचार्य स्वामी महाराज जन्म अख्यान कीर्तनातून ऐकले खूप छान खूप छान.चरित्र वाचलं होतं पण ऐकताना आनंद आणि समाधान वाटले.पंचायतन पूजा ज्यांनी सुरू केली त्या श्रीमद आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻

  • @vinayakpendse6131
    @vinayakpendse6131 3 ปีที่แล้ว

    सर्वांगाने उत्तम झाले किर्तन

  • @anuradhakhot4134
    @anuradhakhot4134 3 ปีที่แล้ว

    एक क्लिष्ट विषय किती सोपा करून सांगितला. खूप खूप धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @sachinkannadkar1316
    @sachinkannadkar1316 3 ปีที่แล้ว +7

    🙏थोडक्यात पण फार सुंदर शंकराचार्यांचे चरित्र वेळेत बसवून सांगितले,अप्रतिम.🙏

  • @prashantsurywanshi3238
    @prashantsurywanshi3238 3 ปีที่แล้ว

    आपल्या कामगिरीला कोटी कोटी प्रणाम

  • @jyotikelkar807
    @jyotikelkar807 3 ปีที่แล้ว

    किर्तन अप्रतीम झाले मनाला आनंद झाला कान तृप्त झाले

  • @vinayakshridharphatak9242
    @vinayakshridharphatak9242 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार, फारच छान कीर्तन. बोरिवली दूरस्थ कीर्तन वर्ष ३ रे विद्यार्थी पहात आहोत. आम्हाला आपले आशिर्वाद लाभावेत ही विनंती.
    विनायक फाटक आणि अन्य १५ विद्यार्थी.

  • @sushamaketkar9985
    @sushamaketkar9985 3 ปีที่แล้ว

    खूपच छान कीर्तन
    ।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ।।

  • @anitasardesai3583
    @anitasardesai3583 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर कथा आज सोमवारी ऐकून खुपच छान वाटल मनाला आनंद झाला खरच बुवा साष्टांग नमस्कार नमस्कार 🙏🙏

  • @sangeetabarve4767
    @sangeetabarve4767 3 ปีที่แล้ว +3

    फारच सुंदर केले कीर्तन, विवेक बुवांना सप्रेम दंडवत🙏🙏 आद्य गुरू शंकराचा र्य यांच्या जन्माविषयी माहिती मिळाली 🙏🙏

  • @neetakarmarkar3550
    @neetakarmarkar3550 3 ปีที่แล้ว

    श्री आदरणीय विवेकबुवा गोखले,उत्तम कीर्तनकार,
    अप्रतीम कीर्तन, सर्व भाषांवर उत्तम प्रभूत्व, गहिवरलेला भाव, भक्तांच्या मनात आनंदाची निर्मिती
    उत्तम समर्थ भक्त यांचे चरणी साष्टांग दंडवत🙏🙏

    • @ravindrakulkarni5040
      @ravindrakulkarni5040 3 ปีที่แล้ว

      अप्रतिमच!मन भक्तिभावाने आनंदले,समाधान,तृत्झले.

    • @ravindrakulkarni5040
      @ravindrakulkarni5040 3 ปีที่แล้ว

      मन तृप्त झाले,जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय.

  • @maheshdharmadhikari2298
    @maheshdharmadhikari2298 ปีที่แล้ว

    अत्यंत उत्तम सादरीकरण. शंकराचार्य जन्म कथा फारच छान. पाळणा सुंदर . कमीतकमी वेळेत कसं आख्यान करावं याचे उत्तम उदाहरण .👌 💐💐

  • @swatilimaye8356
    @swatilimaye8356 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान झाले कीर्तन. मला कल्पना नव्हती आद्य शंकराचार्य यांच्या जन्म कथेची. त्यामुळे अधिकच आनंद झाला.

    • @ramajoshi9113
      @ramajoshi9113 3 ปีที่แล้ว

      Khup sundar sarvan a namaskar👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏🌷🌷

  • @mukunddeoras1240
    @mukunddeoras1240 3 ปีที่แล้ว +1

    पूर्वरंगानंतर गजर खूपच छान विवेकबुवा

  • @vasanttale4642
    @vasanttale4642 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर अप्रतिम कीर्तन अवधूतचिंतन जय गुरुदेव दत् हरी भक्त परायण विवेक बुवा गोखले यांना वंदन

  • @meghanaedkeyandharikar6013
    @meghanaedkeyandharikar6013 3 ปีที่แล้ว

    Aaj aadya shankaracharyanchi jayntinimityatyanche aakhan kathank farch apratim boshpurn aaikun man prasanna zaley vivekbua 🙏🙏🙏

  • @kumudhamdapurkar7103
    @kumudhamdapurkar7103 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान कीर्तन मनाला फारच प्रसन्न वाटते धन्यवाद

  • @bipinwaghmale2398
    @bipinwaghmale2398 3 ปีที่แล้ว +1

    ।।श्री आध् शंकराचार्य यांना प्रणाम,साष्टांग दंडवत।।कीर्तनकार ह भ प श्री गोखले यांना प्रणाम दंडवत।।सद्गुरू श्री स्वामी समर्थ नमः।।धन्यवाद आपल्या निष्काम हरि कीर्तन सेवेसाठी।।

  • @rashmisaraf2061
    @rashmisaraf2061 3 ปีที่แล้ว

    फारच श्रवणीय कीर्तन!! विवेक बुवा 🙏🙏🙏

  • @dhananjayshahapure
    @dhananjayshahapure 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम कीर्तन .... गोखले बुवा🙏🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 หลายเดือนก่อน

    Your Kirtan Vishw makes us hear good kirtans. Dhanyawad ,You Tube.jai ho!🙏

  • @sujatagujar3353
    @sujatagujar3353 3 ปีที่แล้ว

    सुंदर कीर्तन. छान माहिती मिळाली
    शंकराचार्य प्रणाम नतमस्तक.

  • @rohinichandele6233
    @rohinichandele6233 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान उपक्रम आहे

  • @shriharijoshi2160
    @shriharijoshi2160 3 ปีที่แล้ว

    फारच सुंदर असे कीर्तन झाले

  • @shirishpatankar379
    @shirishpatankar379 3 ปีที่แล้ว +3

    गोखले बूवा अप्रतिम कीर्तन, गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 3 ปีที่แล้ว +4

    घरांत बसुन सर्व ऐकता येत धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @radikashenoy3410
    @radikashenoy3410 2 ปีที่แล้ว

    🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.

  • @mayakale9599
    @mayakale9599 3 ปีที่แล้ว +1

    नमः शिवाय. अप्रतिम अभंग व सुंदर आख्यान थोडक्यात शंकराचार्य चरित्र वेळेत बसवून सांगी तले खुप छान.

  • @chandrakantkshirsagar659
    @chandrakantkshirsagar659 3 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।
    बुवा नेहमी प्रमाणे बहारदार ।

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 3 ปีที่แล้ว +1

    किर्तन विश्व एवं आत्मजाग्रुती चा अश्व , निर्मिती अद्वैत भावविश्व

  • @aratibhide1790
    @aratibhide1790 3 ปีที่แล้ว +12

    कीर्तन विश्व च्या उपक्रमामुळे पाहिजे त्या वेळी कीर्तन ऐकता येत आहे.🙏🏻🙏🏻खूप खूप धन्यवाद 🙏🏻आणि कीर्तन विश्व च्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐रोज नवनवीन विषय कळत आहेत त्या मुळे खूप छान वाटते आहे.कोरोना च्या या कठीण काळात हा कीर्तनाचा उपक्रम म्हणजे मानसिक आधार देणारा सकारात्मकता वाढवणारा असाच आहे.पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @meenadabholkar7443
      @meenadabholkar7443 3 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम . .श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

    • @dhananjayvasaikar6652
      @dhananjayvasaikar6652 3 ปีที่แล้ว

      @@#####

    • @ashwinidhok6231
      @ashwinidhok6231 3 ปีที่แล้ว +1

      किर्तन विश्व उपक्रमाला खूप खूप धन्यवाद व किर्तन विश्व परिवाराला खूप खूप धन्यवाद

    • @ashwinidhok6231
      @ashwinidhok6231 3 ปีที่แล้ว +1

      किर्तन विश्व परिवाराला खूप खूप शुभेच्छा

  • @meghamethe4080
    @meghamethe4080 3 ปีที่แล้ว +2

    आद्य शंकराचार्य स्वामी महाराज की जय 🙏 जय गुरुदेव 🙏🌹 अतिशय सुंदर

  • @ravindrakarambelkar7745
    @ravindrakarambelkar7745 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर
    मंगल पहाट !

  • @arunpatil5370
    @arunpatil5370 3 ปีที่แล้ว +2

    श्री मद आद्य जगदगुरु श्री शंकराचार्य महाराज की जय . खुपच सुंदर छानच .

  • @mruduladabke1247
    @mruduladabke1247 3 ปีที่แล้ว +3

    फारच सुंदर अभंग वआख्यान ही अप्रतिम.बुवा, तुम्ही सांगितल्या प्रमाणे घरी बसून म्हटले.आनंदझाला.मृदुला दाबके डोंबिवली.

  • @aratibhide1790
    @aratibhide1790 3 ปีที่แล้ว +7

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻

  • @user-zd7hu3bg8u
    @user-zd7hu3bg8u 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आम्ही कालाडी ला गेलो होतो पाहिले आहे कीर्तन खूपच छान अतिशय आनन्द दाई हे चालू करण्याऱ्या नां धन्यवाद

  • @gunduyogi2357
    @gunduyogi2357 3 ปีที่แล้ว

    खुपच छान श्री श्रीगुरुदेवदत्त

  • @ramchandrawalavalkar5037
    @ramchandrawalavalkar5037 3 ปีที่แล้ว

    फार चांगला कथा भाग सादर केला

  • @kirtiparkhi1295
    @kirtiparkhi1295 3 ปีที่แล้ว +2

    Khupach sunder aadya shankaracharyanch charitra

  • @maddygamerz2219
    @maddygamerz2219 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर अभंग खूपच श्रवणीय

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर कीर्तन.
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
    आद्य शंकराचार्यांना साष्टांग नमस्कार आणि आभार.

  • @deepakkulkarni8456
    @deepakkulkarni8456 3 ปีที่แล้ว +1

    Dandavat. SHREERAM

  • @sanjaymungekar4679
    @sanjaymungekar4679 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम श्रवणीय कीर्तन

  • @anantlagad9390
    @anantlagad9390 3 ปีที่แล้ว

    फार च सुंदर किर्तन आहे

  • @prakashbhavthankar1397
    @prakashbhavthankar1397 3 ปีที่แล้ว

    Shreemata Aadhya Jagatguru Shreeshankarachyarya Yana Vinamra Abhivadan!Avdhutchintan Shreegurudevdatta!khup Sinder!

  • @vishnujoshi1984
    @vishnujoshi1984 3 ปีที่แล้ว

    खूप छान कीर्तन! धन्यवाद किर्तन विश्व!

  • @shailabhide1067
    @shailabhide1067 ปีที่แล้ว

    किर्तन खूप छान झालं
    🙏🙏

  • @pramesawrparmar5585
    @pramesawrparmar5585 3 ปีที่แล้ว +1

    विवेक बुवा खूप छान

  • @kantraojoshi3197
    @kantraojoshi3197 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम पहिल्यांदा ऐकलं सादरीकरण उत्कृष्ठ आवाज सुमधुर तबला पेटी योग्य साथ आनंद वाटला धन्यवाद

  • @kirtijoshi2646
    @kirtijoshi2646 3 ปีที่แล้ว +2

    फारच छान आहे

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 3 ปีที่แล้ว +2

    आध्य शंकराचार्य यांना विनम्र अभिवादन!खूप sushrvya कीर्तन खूप सुंदर!👌💐👌👌

  • @anuradhakatti3502
    @anuradhakatti3502 2 ปีที่แล้ว

    किर्तन विश्व अतिशय सुंदर उपक्रम

  • @madhurijoshi9966
    @madhurijoshi9966 3 ปีที่แล้ว

    वा बुवा फारच सुंदर नेहमीप्रमाणेच

  • @manasikokane9879
    @manasikokane9879 3 ปีที่แล้ว +1

    आतापर्यंत ऐकलेली सर्वच किर्तने खूपच सुंदर. भारावून टाकणारी आणि मनात भक्ती रुजवणारी , मनःशांती लाभते.

  • @vaibhavijoshi5075
    @vaibhavijoshi5075 3 ปีที่แล้ว

    आद्य शंकराचार्य महाराज कि जय

  • @sakharambrahmapurikar8392
    @sakharambrahmapurikar8392 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर
    जय श्रीराम

  • @nandapatil1770
    @nandapatil1770 3 ปีที่แล้ว

    फारच सुंदर कीर्तन बुआ.......

  • @anaghakhare917
    @anaghakhare917 3 ปีที่แล้ว

    खुप आवडले,अप्रतीम कीर्तन
    मन प्रसन्न झाले

  • @user-iv4ds5ss6q
    @user-iv4ds5ss6q 2 ปีที่แล้ว

    देवदत्त जय आनंद दत्त!श्री गुरुदेव दत्त!

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏 खूप सुरेख 🙏🙏🙏

  • @nandinidesai6329
    @nandinidesai6329 10 หลายเดือนก่อน

    अति सुंदर कीर्तन . 🙏🙏

  • @narayanjaiwal398
    @narayanjaiwal398 3 ปีที่แล้ว

    सुंदर कीर्तन खूपच छान

  • @mangalawagh4221
    @mangalawagh4221 2 ปีที่แล้ว

    ओम् नमो शिवाय
    खूप छान किर्तन
    धन्यवाद।

  • @madhavisapre7267
    @madhavisapre7267 3 ปีที่แล้ว +1

    🙏🌹🙏sundar kirtan Adaya Shakarchary yana Vandan🙏🙏Gurudeo Datt.

  • @sampadagokhale6594
    @sampadagokhale6594 3 ปีที่แล้ว

    Uttam Kirtan Jagadguru Adya Shankaracharya

  • @vidyadharmadhikari1081
    @vidyadharmadhikari1081 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान किर्तन,आपल्या सर्व किर्तन विश्र्व टिम मुळेच हा किर्तनाचा आनंद घरबसल्या भरभरून घेता येतो आहे.खूप धन्यवाद.

  • @anupamsali938
    @anupamsali938 3 ปีที่แล้ว +1

    ,🙏🙏🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
    ओंम नमः शिवाय.

  • @ulkatendulkar792
    @ulkatendulkar792 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर, कमीत कमी वेळेत खूप छान !श्रीमद आद्य शंकराचार्य यांचे जन्माविषयी दुर्लभ माहिती या माध्यमातून सहज उपलब्ध, ही आम्हांला मोठी पर्वणीच , संगीत, ज्ञान, सगळ्याचाच आनंद लुटला, अवधूत चिंतन श्री गुरदेल दत्त, 🙏

  • @jayashridate7150
    @jayashridate7150 ปีที่แล้ว

    मन: पुर्वक धन्यवाद।

  • @rajaramkondalwade1067
    @rajaramkondalwade1067 3 ปีที่แล้ว +1

    अवदूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त.

  • @theharmoniumguy7355
    @theharmoniumguy7355 2 ปีที่แล้ว

    श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज श्री गुरू नृसिंहसरसवतीस्वामी महाराज कि जय श्री जगद्गुरू आघ शंकराचार्य स्वामी महाराज कि जय 🙏🚩

  • @jyotikulkarni7112
    @jyotikulkarni7112 3 ปีที่แล้ว

    खुप छान शंकराचर्य चरित्र

  • @vijaykhatri7055
    @vijaykhatri7055 3 ปีที่แล้ว

    Ati sundar shri gurudev Datta

  • @anuradhakatti3502
    @anuradhakatti3502 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर किर्तन