Smashanatil son | स्मशानातील सोनं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • परिचय: अण्णा भाऊ साठे (१९२० - १९६९ ) - मराठीतील लोकप्रिय कथा-कादंबरीकार व
    तमाशाच्या स्वरूपात महत्त्वाचे बदल घडवून आणणारे शाहीर म्हणून सर्वपरिचित. 'खुळंवाडी',
    * बरबाद्या कंजारी ', * फरारी ', * रानवेली ' इ. कथासंग्रह ; ' फकिंग ', ' वारणेचा वाघ ',
    *माकडीचा माळ ' इ. कादंबऱ्या ; * माझा रशियाचा प्रवास ' हे प्रवासवर्णनात्मक पुस्तक;
    *नवे तमाशे ' हे लोकनाट्यांचे पुस्तक अशी विपुल साहित्य संपदा.
    स्वत:च्या अनुभवातून केलेले तळागाळातील समाजजीवनाचे चित्रण, समाजपरिवर्तनाची
    प्रखर जाणीव आणि प्रत्ययकारी निवेदन हे त्यांच्या लेखनाचे प्रमुखं विशेष.
    विषम समाजरचनेत भरडल्या गेलेल्या दीनदलित माणसाला पोट भरण्यासाठी
    नाइलाजाने कोणत्या थराला जावे लागते आणि अखेरीस त्याच्या वाट्याला दारुण दु:खच कसे
    येते याचे हृदयविदारक चित्रण या कथेत आले आहे. स्मशानाचे आणि भिमाने कोल्ह्याशी
    दिलेल्या झुंजीचे या कथेतील वर्णनही थरारक आहे.

ความคิดเห็น • 333

  • @abhijeetchavan8687
    @abhijeetchavan8687 ปีที่แล้ว +50

    गेले ते दिवस पुन्हा कधीच न परतण्यासाठी ..
    ते...वर्ग ...ते मीत्र... आणि ते गूरूजी..आज ही शाळेत गेलो तर पाय निघत नाहीत....तो खांब ते फळा आणि घंट्या चा आवाज आज हि तसाच कानात घुमत आहे..

  • @rupalivartakvartak656
    @rupalivartakvartak656 ปีที่แล้ว +125

    कधीच न विसरता येणारा माझा आवडता धडा 🤗

    • @abhijetpatil5514
      @abhijetpatil5514 ปีที่แล้ว

      🙏🙏

    • @mangeshpadole
      @mangeshpadole ปีที่แล้ว

      Majha pan

    • @santoshgade2396
      @santoshgade2396 11 หลายเดือนก่อน +1

      या धड्यावर आधारित... धग हा मराठी चित्रपट बघा साहेब 😊😊

    • @RavindraPawar-db2le
      @RavindraPawar-db2le 11 หลายเดือนก่อน +2

      तुमची आणि आमची सारखी आवड आहे असे वाटते

    • @vishalpoul6483
      @vishalpoul6483 10 หลายเดือนก่อน +1

      1990 Batch

  • @arunbhoir1495
    @arunbhoir1495 ปีที่แล้ว +22

    2005 मध्ये हा धडा आम्हाला 10 विला होता.... माझ्या आवडीचा लेख .... शाळेची आठवण आली हा लेख वाचून...गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी 😢😢

  • @aminsayyad3846
    @aminsayyad3846 3 ปีที่แล้ว +76

    20 वर्षे पूर्ण झाली ही पाठातील कथा आयकून पण आज ही आयकण्यात खूप मज्जा येते

    • @pritizakrde326
      @pritizakrde326 9 หลายเดือนก่อน

      मला पण 20वर्ष झाली आमच्या शिक्षकांनी मुलांना शाळेत असताना मराठीच्या पुस्तकातील सांगितले आहे

  • @user-yr2ny3rq7t
    @user-yr2ny3rq7t 4 ปีที่แล้ว +52

    मला आवडलेला
    हृदयात कोरलेला
    शालेय जीवनातील पाठ

  • @rajeshreesawant2719
    @rajeshreesawant2719 ปีที่แล้ว +13

    हा धडा मी वारंवार वाचत असे एवढा ह्या धड्याचा प्रभाव तेव्हां माझ्या बालमनावर झाला होता ❤🥀

  • @mangalnehere7744
    @mangalnehere7744 ปีที่แล้ว +9

    धुणं, लाल चिखल ,विजयस्तभ,आणि बुध्द हसला,तुषाराचे वैभव.....एक एक स्मृतिपटलावर उमटू लागले...पुन्हा एक दा flash back madhe gelo.... स्मशानातील सोनं साठी खूप खूप धन्यवाद 👍🏻

  • @santoshbangal5552
    @santoshbangal5552 ปีที่แล้ว +43

    खूप आठवण येते लहानपण आठवत... सुनील धुमाळ सर आणि आभाळे सर धन्यवाद...

  • @manikpatil9305
    @manikpatil9305 11 หลายเดือนก่อน +3

    शाळेत असतांना हा धडा किती वेळा वाचला तरी मन भरत नव्हतं. अण्णाभाऊंच्या लेखन प्रतिभेला लाख लाख सलाम

  • @user-lz7mw8ce8e
    @user-lz7mw8ce8e 3 ปีที่แล้ว +15

    आम्हाला हा धडा सौ.निपुणगे मॅडम यांनी शिकवलेला आणि त्यातील शेवटच्या परिच्छेदतील काही मुद्रण चुका त्यांनी बालभारती ला पण पाठवल्या होत्या..सर्व काही २० वर्षापूर्वीचे डोळ्यासमोरून तरळून गेले..

  • @mahiendhraingle1611
    @mahiendhraingle1611 2 ปีที่แล้ว +18

    एवढया जूनया आठवनी कोठुन शोधुन काढलयात, अप्रतीम आठवनी।

  • @nileshpawar178
    @nileshpawar178 3 ปีที่แล้ว +40

    खूप चांगलं काम करताय... तुमचा आवाज आणी उच्चार छान आणी स्पष्ट 😍😍 पुन्हा एकदा आठवणी उजळल्या त्या साठी आपले आभार💐💐

  • @sureshdalvi9656
    @sureshdalvi9656 ปีที่แล้ว +5

    अण्णाभाऊंची प्रतिभा शक्ती वर्णन करण्याची शैली अप्रतिम होती मी अनेक वेळा शिकवलेला पाठ

  • @azaddangari14
    @azaddangari14 ปีที่แล้ว +3

    आम्हाला हा धडा, देशपांडे सरांनी शिकवला होता, परंतु आज हा धडा ऐकुन 23 वर्ष झाले.खरोखर तुम्ही याचे वाचन कौतुकासपदच केले आहे. मन भरून आले.🙏🙏🙏🙏

  • @H_major_2266
    @H_major_2266 10 หลายเดือนก่อน +2

    25,वर्ष झाली तरी हा धडा तसेच्या तसे आठवण आहे.. माझा आवडता धडा स्मशानातील सोन😍

  • @atulnivadunge6191
    @atulnivadunge6191 3 ปีที่แล้ว +19

    धड्यातील शब्द रचना अप्रतिम आहे. खुपच सुंदर😍💓

  • @sandipchunarkar7255
    @sandipchunarkar7255 10 หลายเดือนก่อน +2

    Memorable moments..... काय सुंदर धडा होता...एकदम तो वर्गातला क्षण आठवला....आणि ते आमचे कौरासे सर...खुप मस्त शिकवला होता आता पण जसास तसा आठवतोय...Thank you कौरसे सर 🙏

  • @sagarpawale4024
    @sagarpawale4024 2 ปีที่แล้ว +8

    खुप खुप धन्यवाद मी फार मिस करत होतो हे माझं शालेय जीवन आपण ते उपलब्ध करून दिलेत खरंच मनापासून आभार🙏💕🙏💕🙏💕

  • @revengegaming1337
    @revengegaming1337 10 หลายเดือนก่อน +1

    आजही ती इयत्ता मराठी शिकवणारे माझे सोनकांबळे सर वर्ग मित्र, मैत्रिणी, आसनव्यवस्था, शाळेचे भौतिक रुप डोळ्यासमोर उभे राहिले.खूप छान वाचन आणि वाचन अनुषंगाने येणारे निकष आपल्या गोड वाणीतून व्यक्त केलात. 👍🏻👍🏻

  • @sonyabapu1145
    @sonyabapu1145 11 หลายเดือนก่อน +11

    धन्य तो भिमा, धन्य ते लेखक,(अण्णा भाऊ साठे)

  • @chetanghanekar7830
    @chetanghanekar7830 3 ปีที่แล้ว +9

    आज ही हा धडा वाचताना अंगावर काटा येतो

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 2 ปีที่แล้ว +10

    पाठ वाचताना डोळ्यासमोर पाठातील घटनांचे कल्पनाचित्र उभे राहते. दहावीच्या आठवणींना उजाळा मिळाला.

  • @MrNams
    @MrNams หลายเดือนก่อน

    खूप छान सर्व धडे ऐकत ऐकत झोपतो मी रोज.😍😢

  • @nileshman
    @nileshman ปีที่แล้ว +1

    लाल चिखल..
    हिंदी भाषे मधील पण खुप धडे मस्त होते..जसे आठ दिन की जिंदगी..अजुन खुप आता आठवत नाहीत पण ते मिळाले तरी आपल्या चँनेल वर upload केले तर अजून मस्त वाटेल..
    बाकी ह्या सर्व धड्यां न साठी खुप खुप धन्यवाद!

  • @manvahalbe6524
    @manvahalbe6524 หลายเดือนก่อน

    खरंच कधीच न विसरला जाणारा धडा

  • @satishkute2789
    @satishkute2789 ปีที่แล้ว +2

    मला 20 वर्ष होतात दहावी होऊन .हा धडा आजही जसाच्या तसा पाठ आहे . क्लास मध्ये सरांनी प्रश्न पत्रिकेत प्रश्न केला होता की,भिमाचे मस्तक कश्यासारखे आहे ?आणि मी उत्तर लिहिले की,भिमाचे मस्तक हाल्यासारखे आहे...वास्तविक रेड्या सारखे असं लिहायचं होतं..सरांनी ईतके बेदम हाणले..बापरे..खुप आठवण येते त्या दिवसाची..खुप छान व्हिडिओ बनविला.

  • @Ojas1995
    @Ojas1995 11 หลายเดือนก่อน +1

    भीमा ❤ पांचवीत होतो मी , thansk for remembering our childhood memory

  • @ramkisandhadage2905
    @ramkisandhadage2905 10 หลายเดือนก่อน

    दहावी ला मराठी अभ्यासक्रमातील स्मशानातील सोन अण्णाभाऊ साठे यांचा धडा होता

  • @pradipsarkate-hq2vd
    @pradipsarkate-hq2vd ปีที่แล้ว +6

    ताई धुणं हा मराठी धडा टाका 🙏🙏🙏

    • @RavindraPawar-db2le
      @RavindraPawar-db2le 11 หลายเดือนก่อน +1

      Very good 9 ला होता धुण धडा कला धोबीन चा हा पाठ पण टाका सर तसेच 8 वी चा विर बापू गायधनी हा धडा पण टाका

  • @ramhiwale8361
    @ramhiwale8361 10 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर कथा आहे असे वाटतेय की सत्य कथा पाहत आहोत अण्णाभाऊ साठे ग्रेट आहेत

  • @user-qi6sr7hs5k
    @user-qi6sr7hs5k หลายเดือนก่อน

    माझ्या मनातील चांदणे हा धडा

  • @romanticstatus9757
    @romanticstatus9757 11 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान धडा होता हा...मी खूप वेळा वाचत होतो याला, माझा आवडता धडा होता ❤❤👌👌

  • @sagartandel6462
    @sagartandel6462 11 หลายเดือนก่อน +6

    26 years flashback ❤❤❤ 96 batch

  • @mayursonawane9431
    @mayursonawane9431 11 หลายเดือนก่อน

    हा धडा मला कायम लक्षात राहील असा आहे
    खूपच छान होत ते बालपण
    अगदी निरागस आणी सुंदर
    जुन्या आठवणी ताज्या होऊन आल्या 😊🙏

  • @umeshhengade9940
    @umeshhengade9940 ปีที่แล้ว +5

    डोळ्यातून अश्रू आले जुन्या आठवणींनी !!!

  • @yogitamoule93
    @yogitamoule93 ปีที่แล้ว +2

    माझ्या आवडीचा धडा,,, लेखक अण्णा साठे. होते,,, राहिले शालेय आठवणी फक्त..... ..,6,,,7,व्हायला होता हा...

  • @abasahebkale8013
    @abasahebkale8013 10 หลายเดือนก่อน

    मी महालगांव येथेली आहे.ता.वैजापुर .जि. संभाजीनगर आम्हा हा.धडा श्री. पटेल सरांनी खुप छान पद्धतीने शिकवला आहे.मॅडम तुम्ही खूप छान पद्धतीने पण आवाजाने ऐकु घातला आहे धन्यवाद

  • @rajendradhaware4568
    @rajendradhaware4568 11 หลายเดือนก่อน +1

    मला हा धडा वाचायला आवडे आणि तो आता आपल्या चाय नल वर वाचला खूप आनंद झाला व शाळे चे दिवस आठवले 🎉🎉🎉🎉🎉

    • @dattatraybhosale9192
      @dattatraybhosale9192 10 หลายเดือนก่อน

      Wrong 2099 लाच porshan badalala hota

  • @bhatumarathe2735
    @bhatumarathe2735 9 หลายเดือนก่อน

    अण्णा भाऊ साठे म्हणजे खुप ग्रामीण भागातील वास्तव मांडणारा लेखक जय लहुजी

  • @nilofarshaikh6488
    @nilofarshaikh6488 10 หลายเดือนก่อน

    junya shaletil aathvani ❤ my fav lesson ....... वाक्य रचना खूप छान

  • @mohinisalwe6066
    @mohinisalwe6066 9 หลายเดือนก่อน

    Dr. अण्णा भाऊ साठे यांचे लेखणी ❤❤❤

  • @Omvedblogs5265
    @Omvedblogs5265 10 หลายเดือนก่อน

    न विसरता येणारा शाळेमधला धडा❤

  • @jayeshdusane5110
    @jayeshdusane5110 11 หลายเดือนก่อน

    Spasht athavtay..Bhima..kasla dhada hota purn antarmukh tya veli zalelo hoto Aaj tar life has no short cut he kalnya itki akkal aliye pan paristhiti mansakadun Nako te pan karvun ghete hehi samajat Aaj..pan tya velich he sarv kiman umagal tehi ya dhadhyatun..👍

  • @sumitmagade1731
    @sumitmagade1731 10 หลายเดือนก่อน

    Khup sundar ahe he path kadhi na visrnaya sarkhe ahe bhima

  • @anilrajguruofficial8571
    @anilrajguruofficial8571 9 หลายเดือนก่อน

    खुप छान... सर आम्हाला ही गोष्ट चौथीच्या शिक्षकांनी सांगितली होती...🥰🙏🙏

  • @shriswamisamarth1360
    @shriswamisamarth1360 9 หลายเดือนก่อน

    काय ते आमचे शिक्षक होते अजूनही ते दिवस आठवले तर खूप मन भरून येते. खूप छान शिकवायचे...

  • @accountswithakbar5951
    @accountswithakbar5951 11 หลายเดือนก่อน

    आमचे शिक्षक श्री परदेशी सरांनी हा धडा समजावून सांगितला जणू आपण ही परिस्थिती पाहिली आहे..चांगल्या शिक्षकांबद्दल आदर आहे.

  • @atulnalavade9670
    @atulnalavade9670 2 ปีที่แล้ว +2

    छान आता परत जुन्या आठवणी परत परत जीवनात अनुभवायला याव्यात आणि परत ते बालपण परत यावं

  • @shesheraofutane4451
    @shesheraofutane4451 10 หลายเดือนก่อน

    खूपच छान तुम्ही पाठ व धडे देत आहात तुमची वाणी खूप सुंदर आहे उभे उभ शाळेत जसे आम्हाला लहानपणी शिक्षक शिकवायचे तसाच आजही अनुभव येतोय खूप छान तसेच माझी ही नम्र विनंती आहे की लेखक श्री मारुती चितमपल्ली यांचा एक पाठ होता कोकणातले दिवस तो तो धडा प्लिज प्लिज बालभारती मध्ये दाखवावा

  • @dharmendrapartole8375
    @dharmendrapartole8375 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  • @vishwanathagro5262
    @vishwanathagro5262 9 หลายเดือนก่อน

    आज मला माज बालपण काही वेळेसाठी परत आल्यासारखं वाटलं... धन्यवाद...
    हा आणि लाल चिखल माझे आवडते धडे होते... आहे... आणि राहणार...

  • @pallavipathak5513
    @pallavipathak5513 4 ปีที่แล้ว +4

    खूप छान वाटलं ऐकून.Thankyou

    • @abhijetpatil5514
      @abhijetpatil5514 ปีที่แล้ว

      🙏 मराठी शाळा ऐक जुनी आठवण🙏👌👌❤✌

  • @shrvansatpute4363
    @shrvansatpute4363 10 หลายเดือนก่อน

    खूप छान धडा होता ऐक ऐक ओळ आठवते जून्या आठवणी आहेत खूप छान 🙏🙏🙏

  • @raghunathpatil9921
    @raghunathpatil9921 หลายเดือนก่อน

    हा धडा 2010 मध्ये सह्याद्री मराठी वाहिनीवर प्रसारित करण्यात आला होता आणि तो मी पाहिला

  • @Mix_entertainment_01
    @Mix_entertainment_01 10 หลายเดือนก่อน

    हरिनारायण अष्टा मध्ये असताना निकम सर खूप खूप छान धडा शिकवायचे तालुका आष्टी जिल्हा बीड निकम सर खूप छान शिकवायचे

  • @sachinkharat6417
    @sachinkharat6417 10 หลายเดือนก่อน

    My favourite writer annabhau sathe

  • @amarsabale5284
    @amarsabale5284 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर वाटल.... Thanks TH-cam and you mam😊

  • @shrinivasrathod7514
    @shrinivasrathod7514 10 หลายเดือนก่อน

    Anna bhau ch best aha ha mashnatil sonna bhima

  • @pravinmagdum6988
    @pravinmagdum6988 ปีที่แล้ว +3

    Thank you ❤ for old memories

  • @sanjaytambe6020
    @sanjaytambe6020 11 หลายเดือนก่อน

    आयुष्यात पहिल्यादा वाचलेली आणि ऐकलेली पहिली गाेष्ट अविस्मरणीय

  • @ashkhan5195
    @ashkhan5195 9 หลายเดือนก่อน

    All time favourite

  • @kupatepavi1755
    @kupatepavi1755 10 หลายเดือนก่อน

    Annabhau sathe !

  • @wellnesssharad
    @wellnesssharad 10 หลายเดือนก่อน

    Khup chhan vishay nivadlay best of luck khup chhan sadarikaran aawaj hi khup chhan aahe tumacha

  • @nitishbidwe1108
    @nitishbidwe1108 11 หลายเดือนก่อน +2

    Deshmukh sir aathvle….Tyanchi story telling technique was unique…. Miss 2006 batch shivaji high school osmanabad

  • @sachinbhandalkar3933
    @sachinbhandalkar3933 10 หลายเดือนก่อน

    देशमुख सर यांनी हा धडा खूप चांगल्या पद्धतीने शिकवला..त्यांचे सारखे शिक्षक आता होणे नाही..

  • @shantanugaming9613
    @shantanugaming9613 2 ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान वाटल हे धड़े आयकून आगदी बाकलपण आठवल

  • @RJ10911
    @RJ10911 10 หลายเดือนก่อน

    Krushnakathchya katha still remember the name.
    Annabhai sathe the great

  • @gajanankk3553
    @gajanankk3553 หลายเดือนก่อน

    माझा आवडता धडा

  • @harryudage5924
    @harryudage5924 10 หลายเดือนก่อน

    मस्त आणि खुप छान वर्णन करुण सांगता

  • @ravikanthiwale254
    @ravikanthiwale254 10 หลายเดือนก่อน

    अण्णाभाऊ साठे यांचे वास्तविक लेखन

  • @prashantdhayare4154
    @prashantdhayare4154 11 หลายเดือนก่อน

    अविस्मरणीय कथा, मझ्या मनात घर करुन गेली

  • @user-pz7up8sy6w
    @user-pz7up8sy6w 11 หลายเดือนก่อน

    Maza favourite dhada,mazya vadilani to dhada mi vachtani tyani aikla hota ani tyana pn to dhada awadlaa hota,aaj maze vadil nahit,pn tyanchi athvan ali dhadyavarun

  • @swapnilbagde9280
    @swapnilbagde9280 11 หลายเดือนก่อน

    लहानपणी हॉस्टेल मध्ये असताना ग्रुप मध्ये बसून आह्मी हा पाठ वाचत होतो.
    खरंच खूप छान.

  • @user-to7xy8mt9h
    @user-to7xy8mt9h ปีที่แล้ว +1

    आमच्या एका मास्तरनी हा धडा खूप मस्त शिकवला होता त्यांचे बोल अजून आठवतात

  • @user-ke6sp9rs6r
    @user-ke6sp9rs6r 10 หลายเดือนก่อน

    Annabhau sathe krushnakayhachya katha

  • @prashikbhagat745
    @prashikbhagat745 ปีที่แล้ว

    हा पाठ सुरु होतो तेव्हा आम्हाला स्मशान या नावाने भयावह केल पण जस जस आमचे शिक्षक शिकवीत तसा तसा आमचा भय दूर होऊन या पाठातील खरं मर्म आम्हाला जमजलं आमच्या सरांनी केलेलं भीमाचं बाह्य वर्णन त्याच चित्र प्रत्येक्ष उभं केल होत ते आजही तसंच आठवते वर्गातील सर्व जण शांतपणे पुढे काय होईल या विचाराने शिक्षकांळे पाहत होते ते आजही आठवते थँक्स मॅम आठवणीला उजाळा दिल्याबद्दल 🙏🙏🙏

  • @dilipshingan8529
    @dilipshingan8529 10 หลายเดือนก่อน

    कधी न विसरता येणारे ते दिवस

  • @dhananjayshinde5244
    @dhananjayshinde5244 ปีที่แล้ว

    Khupech Chan spastikaran dile tumhi nice awesome 💯

  • @rahulrasal4657
    @rahulrasal4657 10 หลายเดือนก่อน

    खूप मस्त वाटले....

  • @darshanamokashi5660
    @darshanamokashi5660 7 หลายเดือนก่อน

    अजूनही लक्षात आहे

  • @vikrambhosale5100
    @vikrambhosale5100 9 หลายเดือนก่อน

    Old memories visrta visarnar nahit....90's rockers ❤

  • @pavanr6340
    @pavanr6340 11 หลายเดือนก่อน +2

    ४थी तला महाराजांचा धडे सुद्धा असेच सांगा

  • @siddharthagawai2140
    @siddharthagawai2140 4 หลายเดือนก่อน

    मला तर तोंडपाठ होता हा धडा कधीच विसरू न शकणारा धडा

  • @chinnuhiremani311
    @chinnuhiremani311 11 หลายเดือนก่อน

    Khopac chan ahe Katha

  • @vaijanathmundhe5527
    @vaijanathmundhe5527 ปีที่แล้ว +1

    माझ्या आवडीचा आहे अजूनही आठवणीत आहे हा पाठ thanks🙏🙏

  • @user-zr7vg4ni7k
    @user-zr7vg4ni7k 11 หลายเดือนก่อน +1

    2005 ला हा धडा आम्हाला १० वि ला होता, त्या वेळी आम्ही आमच्या मागच्या batch ला हा धडा सांगून घाबरवित होतो

  • @siddhu8595
    @siddhu8595 11 หลายเดือนก่อน

    खूप खुप छान. मी या कथेचा खुप दिवसापासून शोध घेत होतो..

  • @santoshrashtriya
    @santoshrashtriya 4 ปีที่แล้ว +2

    काय मस्त कथा आहे चीत्र डोळ्यात आलं

  • @RavindraPawar-db2le
    @RavindraPawar-db2le 11 หลายเดือนก่อน

    2003 मध्य हा पाठ आम्हाला होता तेव्हा ही कहाणी ऐकली होती दहावीला हा पाठ होता हा माझा आवडता पाठ होता

  • @-xv8rq
    @-xv8rq 11 หลายเดือนก่อน

    आवडला धडा भीमा स्मशानातील सोने

  • @Pallavi_kapse1010
    @Pallavi_kapse1010 2 ปีที่แล้ว +2

    धुण धडा ऐकवा.

    • @abhijetpatil5514
      @abhijetpatil5514 ปีที่แล้ว

      मराठी शाळा ऐक जुनी आठवण🙏👌👌

  • @prakashnagdeote7756
    @prakashnagdeote7756 ปีที่แล้ว +2

    Madam mala tumcha awaz khupach chan vatla explanation is also very good , hha dhada mazya avdicha dhada ahe ,thanx for explnation

  • @kisantambe4121
    @kisantambe4121 3 ปีที่แล้ว +6

    दहावीला होता, पवार मॅडमनी खूप छान पद्धतीने शिकवला होता

  • @dhanrajtapre8481
    @dhanrajtapre8481 9 หลายเดือนก่อน

    My fevret story

  • @swapnilchile124
    @swapnilchile124 10 หลายเดือนก่อน

    खरच मस्त वाटल आयकून जुन्या आठवनी आठवल्या❤

  • @balajiboinwad8259
    @balajiboinwad8259 10 หลายเดือนก่อน

    2008 la mi mazya marathi shikshakadun aikalo khup aasharychakit karanari kahani aahe

  • @sureshachari-ye5lt
    @sureshachari-ye5lt 11 หลายเดือนก่อน

    Khopch chan vatato full episode😊😊❤❤

  • @vnishigandha13
    @vnishigandha13 11 หลายเดือนก่อน

    Khup dhanyawad

  • @SanjayGheji
    @SanjayGheji ปีที่แล้ว

    Anna bhau Sathe he lekhak ahet...
    Best story

  • @siddharthkalsekar2692
    @siddharthkalsekar2692 9 หลายเดือนก่อน

    10 वीला होता मला हा धडा खूप छाण 🎉