America-America, chapter 20 “ Paravalambee “ and an experience of migrated friend about insurance
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024
- २० ) परावलंबी
२० ) तरुण मुलं - मुली अमेरिकेत शिकायला येतात. आई वडिलांनी चिक्कार पैसा खर्च केलेला असतो. मुलांची स्वप्न पूर्ण व्हावीत, हाच हेतू त्यामागे असतो. मग मुलं अमेरिकेतच नौकरी सुरु करतात. पालकांनी काढलेलं education लोन,मुलं फेडतात,म्हणजे हातभार लावतात,कारण त्यांना परिस्थितीची जाणीव असते. हळूहळू त्या lifestyle ची सवय होते,आणि ते अमेरिकेतच स्थायिक होतात. ऐका ती कहाणी आता
बालपणी एक स्वप्न पहिले
उरापोटी ते सांभाळिले
देवसेंदिवस ते फुलत गेले
पूर्ततेसाठी प्रयत्नही केले
अपार कष्टाने ते साध्य झाले
स्वप्न होते जे पहिले
मनासारखे सर्व जरी झाले
बरेच काही निसटून गेले
मात-पिता,राहिले मायदेशी
विरह तयांचा क्लेश देई
अमेरिका झाली कर्मभूमी
मग इथेच गवसले सखे सोबती
बांधिले एक छोटेसे घरटे
थाटला सुबक संसार तेथे
पती-पत्नी,गोड गोंडस मुले
असे कुटुंब तिथे नांदू लागले
स्थिरता आली आयुष्याला
वयाचाही पोक्तपणा आला
माय-बाप ही थकले आता
याची जाणीव झाली मनाला
मात-पित्याच्या स्थलांतराचा
मनसुबा जेंव्हा तया सांगितला
कसून त्यांनी विरोध केला
आम्ही न सोडू मायभूमीला
दाखविली नाना आमिषे
इमोशनल ब्लॅकमेलिंग ही केले
त्यांचे आपले एकच टुमणे
आम्हास नको ते परावलंबी जीणे
ज्या मुलांना कष्टाने वाढविले
ज्यांच्या ध्येयाला खतपाणी दिले
त्यांच्या घरी परावलंबी जीणे ?
हे कोणते लॉजिक आले ?
शेवटी एक वादळी मीटिंग झाली
मुलांसाठी पालकांनी माघार घेतली
बघूया राहून, इतपत तयारी झाली
परतून येऊ, जर नाहीच घडी जमली
हे ऍग्रीमेंट सगळ्यांना पटले
प्रश्न असा आहे ! परावलंबित्व कसले ?
या विचाराने मुलांचे मन पोखरले
पण ते असे सांगून कधी का कुणा कळले ?
ज्याने परावलंबी जीवन जगले
त्यालाच फक्त ते समजले
परावलंबी जीवन फक्त त्यालाच समजले
परावलंबी जीवन फक्त त्यालाच समजले