कोकणातला शिमगा | Konkan | Shimga | Festival

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 409

  • @anantdalvi5116
    @anantdalvi5116 9 หลายเดือนก่อน +11

    आमच्या कोकणची संस्कृती जपुन जगासमोर मांडणारी आमची कोकणकन्या अप्रतिम.

  • @traveldiaries2614
    @traveldiaries2614 9 หลายเดือนก่อน +65

    ना कुठली स्पर्धा ना इर्षा, निसर्गाने दिलेले तेवढे घ्यावे आणि आनंदी राहावे..नको निसर्ग भकास करणारा विकास...शाश्वत जीवनशैली अंगिकारावी....जेवढे आहे तेवढ्यात समाधानी राहावे...आपली संस्कृती , सण सर्व साजरे करून त्या विधात्याला ,त्या शक्तीला नमनावे...सर्व सत्तेचा मालक तोच आहे...आपण मात्र विकासाच्या मागे लागून त्या शक्तीलाच आव्हान देत आहोत.. माणसा माणसा कधी सुधारणार रे...निसर्गाचे गाणे ऐक ...खूपच छान व्हिडीओ बनवला आहे स्वानंदी..

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 9 หลายเดือนก่อน +73

    स्वानंदी , बेटा किती समरसतेने वावर असतो तुझा. सगळे धार्मिक रीतिरिवाज जपून सगळ्यांशी आपुलकीने वागतेस ते पाहून खरेच कौतुक वाटते तुझे . शेवटी पालखीला खांदा दिलीस तेही खूप कौतुकास्पद , बेटा अशीच राहा सर्व समर्पक , खूप खूप आशीर्वाद 👍👍

    • @user-wt2tp7wj8s
      @user-wt2tp7wj8s 9 หลายเดือนก่อน +1

      Dada wao kiti chhan समजावून सांगितलं तिला.. पण तुम्हाला सांगू.. पैशा साठी खी पण😂😂😂😂😂

    • @shrikantgupte188
      @shrikantgupte188 8 หลายเดือนก่อน

      अप्रतिम शूटिंग..

    • @shivrajbamnikar7990
      @shivrajbamnikar7990 4 หลายเดือนก่อน

      ​@@user-wt2tp7wj8sकाय समजलं नाही.स्पष्ट सांगायला घाबरता का ?

  • @ashwinio
    @ashwinio 9 หลายเดือนก่อน +17

    खूप छान गं स्वानंदी, किती समरसतेने सगळं करतेस. सारवलेल्या खळ्यात रांगोळी काढतेस, स्वैपाकात मदत करतेस, गायी गुरांचं प्रेमाने करतेस, शेणगोठा करतेस, फुलांनी कपड्यांवर प्रिंट करतेस, पालखीही नाचवतेस ❤❤ सगळंच फार गोड आहे. आनंदी, उत्साही, हसरी स्वानंदी. अशीच रहा 🥰🥰

  • @santoshnavalu1528
    @santoshnavalu1528 9 หลายเดือนก่อน +6

    शिमगा दाखवलात होळी पण दाखवली असती तर बर झाला असत खूप छान व्हिडीओ

  • @Pawanputra24
    @Pawanputra24 9 หลายเดือนก่อน +12

    महाराष्ट्रातील ग्रामीण लोक-जीवन किती सर्वोपरी समृद्ध आहे अन् ते आजही आपण जतन केलं तर पुढील पिढ्या कधीही नैराश्यात जाणार नाही, हि 100% खात्री पटली...

  • @er.balasahebvidhate7275
    @er.balasahebvidhate7275 9 หลายเดือนก่อน +11

    अप्रतिम, सर्व गावकरी एकत्र येऊन उत्सव साजरा करतात हे बघून आनंद झाला, मराठी माणसांचा मराठमोळा सण, चालीरीती, साधेपण जपत थाटाने केलेला उत्सव.

  • @pratibhamane-y6z
    @pratibhamane-y6z 7 หลายเดือนก่อน +6

    तु किती गोड आहेस, तुझा आवाज, तुझं वागणं, समजावून सांगणं, हिरीहीरेने प्रत्येक काम न नका मुरडता करणं,सहज सुंदर वागणं, तुझं अष्टपैलू व्यतिमत्त्व आहे, मला तुझं ब्लॉग आवडतात खूप शिकण्या सारखं आहे, तुझं आई बाबा, सर्व कुटुंब शब्दातीत आहे,तुझ्या गावाचं नाव काय, तु नेहमी गावी असतेस का, तुझं शिक्षण किती, तु तूझ्या सारखा अनुरूप जोडीदार मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना, देव तुझं कल्याण करो 🙌🙌, तुझा पर्सनल नंबर पाठव, 🙏🌹❤️😊

  • @pradeepvaidya9087
    @pradeepvaidya9087 9 หลายเดือนก่อน +20

    स्वानंदी,कमालच आहे ,हे सर्व तू किती सहजतेने आणि समरसतेने करतेस,मला तूझ्या पेक्षाही तूझ्या आई बाबांचा कौतुक वाटतं की किती छान संस्कार केले आहेत तूझ्या वर.
    अशीच रहा नेहमी.

  • @arundate1
    @arundate1 9 หลายเดือนก่อน +3

    ज्या देवाच्या देवीच्या दर्शनासाठी आपण वर्षभर गावातील मंदीरात जातो तिच देवी देव या शिमग्याच्या सणाला आपल्या घरी येतात, आपले घर पहातात, घरातील माणसे पहातात हे खरे तर आपल्या भक्ताचे, त्याच्या घरातील माणसांचे, घराचे हे एक प्रकारे इन्सपेक्षनच म्हणायला हवे. ही कल्पनाच भारी रोमांचकारी आहे, अशी प्रथा फक्त कोकणातच आहे व लोकांनी ती अजुन जपुन ठेवली आहे हे विशेष. मंदीरातील देव देवी देवता यांच्या मुर्ती, मुखवटे, टाक, पादुका इत्यादी यांचे एक विशेष असे सामर्थ्य असते, शक्ती असते. ते सामर्थ्य शक्ती या पालखी प्रसंगी आपल्या घरी येते हा भाव हा विचार खरा महत्वाचा आहे. काही चुकीचे लिहिले गेले असेल तर क्षमस्व.

  • @supriyasurvashi1811
    @supriyasurvashi1811 9 หลายเดือนก่อน +26

    कोकणातील शिमगाचे खुप video बघीतले पण आम्हाला तुझ्याचं video ची आतुरता होती ..big fan ❤

  • @harishchandraainapure8260
    @harishchandraainapure8260 9 หลายเดือนก่อน +12

    तुला कुठल्याही जीम मध्ये जाण्याची गरज नाही. गावात काम करत जो आनंद मिळतो तसेच निसर्गाच्या सान्निध्यात राहून तब्येत चांगली राहते ते शहरात अशक्य आहे. Vlog अतिशय उत्तम आहे.

  • @santoshgurav5298
    @santoshgurav5298 9 หลายเดือนก่อน +5

    वा स्वानंदी वा फारच छान , जुन्या रूढी परंपरा आणि आधुनिकतेचा ताळमेळ तुला छान जमतो . तू आणि तुझ्या बाबांनी पालखी छान नाचवली .

  • @nehadhar9141
    @nehadhar9141 9 หลายเดือนก่อน +6

    व्वा स्वानंदी , तुमच्या गावातील शिमगोत्सवाची खुप छान ओळख करून दिलीस.तुझा समरसून केलेला सहभाग खुप कौतुकास्पद आहे.👌👏👏

  • @nileshpatil1010-ns
    @nileshpatil1010-ns 9 หลายเดือนก่อน +5

    हे ते बघण्या पेक्षा आपला धर्म आणि आपली संस्कृती काय आहे आणि कशी आहे ते बघा आणि शिका खरच ये पोरी कडे शिका सारखे खुप आहे आणि शिका 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मी पण शिकतो thank you स्वानंदी तु खरी दुनिया दाखवतेस 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anillmahadik4019
    @anillmahadik4019 5 หลายเดือนก่อน +2

    खूप छान वाटत आहे. लांजा रत्नागिरी साठी तू एक चांगले उदाहरण आहेस खूप खूप धन्यवाद

  • @dilipvaje3353
    @dilipvaje3353 9 หลายเดือนก่อน +3

    आपल्या परंपरा आणि संस्कृती जपणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे समाजातील प्रेम भावनेची वीण घट्ट विणली जाते. गावातील लोक एकजुटीने मोठ्या श्रद्धेने ग्रामदैवत आणि गावातील लोकांची उठबस करत असते. मस्तच.

  • @sameerrunkar5856
    @sameerrunkar5856 9 หลายเดือนก่อน +5

    खूपच छान ,,,सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्या परंपरा लक्षात घेऊन आणि महत्त्वाचे म्हणजे पुढील पिढीसाठी आपली संस्कृती जोपासण्यासाठी अशा व्हिडीओ ची आवश्यकता आहे ,,,परत एकदा खूप छान

  • @ashoknaringrekar2616
    @ashoknaringrekar2616 9 หลายเดือนก่อน +5

    फारच छान, मुली तूं आपल्या कोकणाची संस्कृती जपतेस पाहून आनंद झाला तुझी प्रगती होवो ही सदिच्छा

  • @Follow-t6l
    @Follow-t6l หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️ खूप सुंदर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @hareshchavhan6211
    @hareshchavhan6211 9 หลายเดือนก่อน +13

    तुझा शिमग्याचा विडिओ बघून खूप बरं वाटलं, आपल्या गावची परंपरा शिवाय आपल्या गावातली सर्व माणसं खूप छान आहेत ,गावातली सर्व माणसं तुझ्या बाबांना खूप मानतात असं दिसलं, पालखीचा कार्यक्रम चांगला होता, बाबांबरोबर जेव्हा तु पालखी नाचवली तेव्हा खरोखर मन भरून आलं. तुझं प्रत्येक काम चांगल आहे आणि सर्व कामात तु हुशार आहेस....तुझं गाव जवळ असत तर मी तुला भेटायला आलो असतो, मी पालघर जिल्ह्यात राहतो तुझा प्रत्येक विडिओ मी आनंदाने बघतो खूप छान.

  • @nitinmane2466
    @nitinmane2466 3 หลายเดือนก่อน

    खूपच साधे सोपे पद्धतीने आपल्या संस्कृतीचे छान असे महत्व समजून सांगितले आहे

  • @santoshkashettiwar5253
    @santoshkashettiwar5253 5 หลายเดือนก่อน +1

    वा, खुपचं मज्जा आली.
    पालखी नाचवतांना प्रथमच बघीतली.
    ऐक ईश्वरीय आनंद झाला. बघु स्वानंदी कधी बोलवीते. हा सोहळा बघायला आवडेल.

  • @sayalikambli1590
    @sayalikambli1590 9 หลายเดือนก่อน +2

    खुप छान वाटले....मी पण कोकणातली...या वर्षी शिमग्यालां गावी जाता नाही आले....पण हा व्हिडिओ बघून जणू जाऊन आले गावी असा वाटत आहे....thank you for sharing this video

  • @surendradeshmukh3377
    @surendradeshmukh3377 9 หลายเดือนก่อน +2

    स्वानंदी ताई फारच सुंदर आहे पालखीची मिरवणूक आणि त्यातील सर्व रीतिरिवाज
    आंमच्या गावातील ग्राम दैवत श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी देवीची पालखी चंपा षष्ठी च्या दुसऱ्या दिवशी निघते
    आमचे गाव आतोणे , तालुका सुधागड पाली, जिल्हा रायगड
    पालखी अशीच प्रत्येकाच्या घराच्या अंगणात , घरातील पुरुष आणतात आणि घरातील सुवासिनी देवाची पूजा करतात देवीची ओटी भरतात

  • @jayashri7273
    @jayashri7273 10 วันที่ผ่านมา

    मला शिमगा vlog खूप खूप आवडला .... खरंच या पेक्षा सुंदर काही असुच शकतं नाही ❤🎉 बघुन मनाला छान वाटले❤🙏💕🎇

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 9 หลายเดือนก่อน +4

    एकदम झक्कास 👌 लेखन, शब्दांकन, निवेदन नेहमीप्रमाणेचं लयं भारी. श्री नवलादेवी दैवे नमः 🙏 ♥️ 👍

  • @payalmane7293
    @payalmane7293 5 หลายเดือนก่อน +1

    Such a great women.... I am proud of you taii....

  • @SitaramPale
    @SitaramPale หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती मिळते सिताराम पाले. बडोदा. गुजरात.

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 4 หลายเดือนก่อน

    किती सुंदर ...... कमालच झाला हा भाग , सगळे मस्त पाहायला मिळाले , अगदी साग्रसंगीत ....... मन : पूर्वक धन्यवाद स्वानंदी 🙏🙏🙏

  • @shobhakadam7741
    @shobhakadam7741 9 หลายเดือนก่อน +5

    स्वानंदी खूप छान चित्रीकरण होते,आणि खूप सहजतेने तू सगळे रीतिरिवाज निभवतेस .आणि आनंदाने समरसून सगळे करतेस याचे खूप कौतुक वाटते.अशीच आनंदी रहा!🌹🎊

  • @rishikeshnachane3441
    @rishikeshnachane3441 9 หลายเดือนก่อน +1

    शेवटचं वाक्य अगदी बरोबर बोललात.... अप्रतिम 👏👏👌👌

  • @santoshchavan5853
    @santoshchavan5853 3 หลายเดือนก่อน

    Kokan kanya swanandi kokna chi chali riti japnari mast

  • @ketanjoshi3858
    @ketanjoshi3858 5 หลายเดือนก่อน

    स्वानंदी तु खरच एक स्वच्छंदी आहेस
    तुझ्या बाबांनी नाचवलेली पालखी असेल
    तुझी उत्साहात उत्सवानिमित्त केलेली तयारी पाहुन पुढील शिमगोत्सवा ला आम्हाला ही यावस वाटतय

  • @vivekbendre8743
    @vivekbendre8743 9 หลายเดือนก่อน +3

    मस्त मज्जा आहे.. आम्हाला सुद्धा बघायचा आहे कोकणातला शिमगा

  • @sameerapednekar3961
    @sameerapednekar3961 9 หลายเดือนก่อน +2

    ❤ खूप छान !... दरवर्षी हजेरी लावतो आम्ही ही....यंदा माझी लेक शिक्षणासाठी uk ला गेल्यामुळे ती पालखी घरात आणि व्हिडिओ काॅल वर धो धो रडू च लागली.. स्वतः तिथं नाही म्हणून.. आणि आता हा स्वानंदी चा व्ह्लाॅग तीचा सहभाग पाहून भरुन आल...माॅर्डन तरीही रुढी परंपरा जपणारी कोकणी तरुणाई .❤

  • @mayatavhare9430
    @mayatavhare9430 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान रितीरिवाज आहे कोकणातील शिमगा खुप खुप छान

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 4 หลายเดือนก่อน

    नेत्रसुखद सोहळा 👌👌

  • @manojwankhade2620
    @manojwankhade2620 5 หลายเดือนก่อน

    खूपच प्रेरणादायक व्यक्तिमत्व आहे , स्वानंदी तुझ, तुझ्या सारखी कन्या प्रत्येक घरात जन्मो.

  • @alkagangan5334
    @alkagangan5334 5 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर व्हिडिओ बनवला आहेस स्वानंदी ! हल्ली च तुझे काही व्हिडिओ पहाण्यात आले आणि आता तर तुझे दिसतील ते व्हिडिओज आम्ही पहात असतो.कोकणातल्या साध्या सरळ जीवनाची झलक तुझ्या सर्व व्हिडिओ तून पहाता येते आणि मग माझ्या बालपणीच्या आठवणी मनात जाग्या होतात.हे व्हिडिओ पाहून पुन्हा एकदा कोकणात गावी जाऊन रहावसं वाटतं.. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात वेळात वेळ काढून कोकणी माणूस गावाकडे का धाव घेत असतो हे पहाणाऱ्यांच्या लक्षात येत असेलच

  • @PrashantKumbhar-te9wh
    @PrashantKumbhar-te9wh 9 หลายเดือนก่อน +1

    सुंदर.सुरेख आणि अप्रतिम सादरीकरण.

  • @prabhakarattarde7254
    @prabhakarattarde7254 6 หลายเดือนก่อน

    Khup Khup Sunder Video 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749 9 หลายเดือนก่อน +1

    Wow apratim video 🎉🎉🌺🙏🌸🙏🌺🙏🌸🙏🌺🙏👍

  • @shamiramalyankar3322
    @shamiramalyankar3322 5 หลายเดือนก่อน

    Kitti chaan vlog ahe palkicha👌🏻😍🙏🏻 keep it up Swanandi beta you are just wonderful 🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 9 หลายเดือนก่อน +1

    स्वानंदी,कोकणातील शिमगा सण हा फारच सुंदर आहेच पण गेल्या अनेक शतकातील परंपरा त्या कोकणी लोकांनी राखल्या आहेत.
    वर्षातून काही दिवस सर्वांनी एकत्र येऊन सुख दुःख आपल्या माणसा बरोबर बोलायची.

  • @pratikshahardikar247
    @pratikshahardikar247 9 หลายเดือนก่อน

    सुंदर दर्शन, उत्तम चित्रीकरण शिमग्याला हजर राहिल्यासारखं वाटलं.🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vikrammundhe9879
    @vikrammundhe9879 9 หลายเดือนก่อน +50

    Swanandis husband will be the luckiest person in the world ❤

    • @AbhijitShetkar-o7b
      @AbhijitShetkar-o7b 9 หลายเดือนก่อน +9

      Hope she gets deserving husband who will appreciate her work.

    • @ajinkyagijare
      @ajinkyagijare 8 หลายเดือนก่อน +4

      So true

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 6 หลายเดือนก่อน

      I am her husband

    • @dhruvpatil35
      @dhruvpatil35 5 หลายเดือนก่อน

      ​@@AbhijitShetkar-o7b mi ready aahe pn, tich Kay mahit nai

    • @nareshthakare8432
      @nareshthakare8432 4 หลายเดือนก่อน

      May be me

  • @jayashreemahaddalkar5597
    @jayashreemahaddalkar5597 6 หลายเดือนก่อน

    किती सुंदर मला पण आमच्या कोकणातल्या घराची आठवण झाली आपली ही कोकणी संस्कृती तू फार समरसतेने दाखवतेस किती गोड आहेस स्वानंदी

  • @sandhyakarekar9960
    @sandhyakarekar9960 5 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर स्वानंदी

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 9 หลายเดือนก่อน

    स्वानंदी ताई छान,
    तू फार भाग्यवान आहेस.कोकणातील सर्व रितीरिवाज तुला माहिती आहेत.

  • @lataudyawar8046
    @lataudyawar8046 7 หลายเดือนก่อน

    Swanandi khoop khoop bare - vatate Anand hoto- aaj Kal kaliyuga tuzyasarkhi mulgi aahe he bhagun khoop khoop bare vatate aamhi lucky aahot God bless you beta

  • @khandarekhandare2673
    @khandarekhandare2673 6 หลายเดือนก่อน

    🙏🙏 सगळेच व्हिडीओस बघण्यासारखे व सुंदर आहेत. 👌👌🙏🙏

  • @omkotre8832
    @omkotre8832 9 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ झाला आहे...शिमगा म्हणलं की वेगळा हुरूप असतो गावाला..किती छान असत ना एरवी आपण देवाला भेटायला देवळात जातो आणि शिमगा मद्ये देव आपल्या भेटीला घरी येतो..शिमगा म्हणजे खर सुख..

  • @kiranfoundation7800
    @kiranfoundation7800 9 หลายเดือนก่อน

    Blessed to see such great tradition & culture of our Ancient Maharashtra.... Salute Swanandiji ....Truly you've carved & crafted the SHIMGA MOHATSAV so greatly and profoundly I'm speechless..... Blessed to see such great food been serve to all devotional people and loved the SHIMGA MAHOTSAV.... Blessed to see thou and thy Baba & ATYA carrying the PALKHI and dancing with rhythm .... Keep going.... Paremshwar aplya TEL, MITH Va Pithala nehmi Ashirwad Va barkat devo..... God Bless!

  • @Shraddha935
    @Shraddha935 9 หลายเดือนก่อน +2

    Kay maja ali... Mast vatla pahun.. 😊❤ tu bhari ahes Swanandi...

  • @rameshgaikwad7659
    @rameshgaikwad7659 9 หลายเดือนก่อน

    स्वानंदी तू प्रत्येक गोष्टीत सहभागही होतीस.. खूप कमाल आहे
    .

  • @educationalmedia2144
    @educationalmedia2144 9 หลายเดือนก่อน

    लोकजीवन, लोकसंस्कृती यांची जपणूक आणि यातून माणसांचं जवळीक, स्वानंदाचा अनमोल ठेवा!!!😊❤

  • @dipesh2680
    @dipesh2680 4 หลายเดือนก่อน

    Very nice swanandi🎉🎉keep it up 🌹

  • @nitinsurve5104
    @nitinsurve5104 9 หลายเดือนก่อน

    देव येती घरा तोचि दिवाळी दसरा... प्रत्येक गावची पालखी नाचवयाची पद्धत वेगळी असते आणि खूप छान आहे.... बघुन खुप छान वाटले... 🙏🙏

  • @sanjaypatil238
    @sanjaypatil238 9 หลายเดือนก่อน

    mast ashe gavchi parampara japnari Ani Devkarya sampurna karnari tu baghun chan vatle Dev tuzya manokamna Purn Karo hya Shubhechha ❤❤

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 9 หลายเดือนก่อน

    Sunder Palkhi Sohala Nice Video

  • @nishantpanhale9922
    @nishantpanhale9922 9 หลายเดือนก่อน

    स्वानंदी, तुझे सर्वच vdo खरेच तु स्वतः आनंद घेत तयार केलेले लक्षात येतात. अगदी सहज....तेथे कुठेही मी vdo तयार करतेय असा अभिनिवेश नसतो...त्यामुळे सर्वच vdo आम्हाला खूप आनंद देऊन जातात...

  • @sachinjoshi5511
    @sachinjoshi5511 9 หลายเดือนก่อน

    स्वानंदी, नेहमी प्रमाणेच व्हिडिओ खुप छान झाला आहे. तुझा प्रत्येक कृतीतला उत्साह खुप कौतुकास्पद व प्रेरणादायी !!! तुझे व तुझ्या घरच्यांचे खुप खूप कौतुक !!!👍👍 आणि असा व्हिडिओ बनवल्या बद्दल खुप खूप धन्यवाद !!!🙏🙏

  • @prashantkore7050
    @prashantkore7050 9 หลายเดือนก่อน +1

    Great culture & simplicity,, must preserved

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 9 หลายเดือนก่อน

    चांगला विडिओ. आपल्याय कोंकणची संस्कृती

  • @mukundmulay8855
    @mukundmulay8855 9 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर व्हिडिओ व सविस्तर प्रथा परंपरा दाखवली खुप खुप शुभेच्छा, 🎉😊

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 6 หลายเดือนก่อน

    कोकणातील ग्रामीण जीवन शैली अनुभवतोय आम्ही खूप छान

  • @shubhangigholap-i4y
    @shubhangigholap-i4y 7 หลายเดือนก่อน

    स्वानंदी खूप छान मलाफार आवडल मला कोकण आवडत तुझे खूप कौतुक

  • @Vinivs231
    @Vinivs231 9 หลายเดือนก่อน

    आधुनिक दुनियेत जुन्या रुढी परंपरा ह्यांचा नवीन पिढीला विसर पडत चालला आहे परंतु ह्या भ्रमणध्वनी च्य काळात तुमचा मुळे आज आपल्या चालीरीती ची माहिती मिळते व त्याच महत्त्व कळत हे सगळं असच टिकून राहील पाहिजे ह्यामध्ये आधुनिक दुनियेच्या कितीतरी पट जास्त आनंद सुख समाधान आहे.

  • @ShaileshRahate-q6n
    @ShaileshRahate-q6n 9 หลายเดือนก่อน

    ताई तु खुप नशीबवान आहेस तुला या सर्व गोष्टी अनुभवायला भेटतात.असेच चांगले कार्य तुझ्या हातुन घडो हीच सदिच्छा तुला.. 🙏🏻

  • @sandipwagh8921
    @sandipwagh8921 9 หลายเดือนก่อน

    Great. !! Swanandi. Next. Shimgyala. Yav. Mhantoy konkanala !!

  • @rameshsawant3809
    @rameshsawant3809 9 หลายเดือนก่อน

    श्री गावदेवी माता की जय 🚩🙏

  • @praveerbhogte
    @praveerbhogte 9 หลายเดือนก่อน +1

    Very nice to see tradition being upheld with such devotion

  • @Saibal82
    @Saibal82 6 หลายเดือนก่อน

    Swanandi, you are a true Indian. Your activities give us hope that my country is still alive. The urban culture could not able to snatch from the heart of civilisation which is so deep rooted. A honest soul like you carrying it. My respect and Pranam 😮🍀🌺🌸🙏🏽

  • @kishorpatil3237
    @kishorpatil3237 9 หลายเดือนก่อน +6

    गावात ऊसाह पाहून फार बरं वातंय. गावपण टिकून आहे.❤

  • @VarshaBendke
    @VarshaBendke 7 หลายเดือนก่อน

    शिमगोस्तव एकदम छानच 👌👌

  • @pravinkarmbelkar6873
    @pravinkarmbelkar6873 9 หลายเดือนก่อน

    एकदम मस्त व्हिडिओ, खूप छान वाटले.....

  • @pankajb.kamble7429
    @pankajb.kamble7429 9 หลายเดือนก่อน

    tumche gaon,angan,gaonkari,tumche vadil sagle lok chan ahe br.bhari vatle vlog bghun.from shirdi

  • @sunildalvi4642
    @sunildalvi4642 9 หลายเดือนก่อน +1

    Khoop Chaan GAVATIL 🏘️🌳AAi Navladevichi Palkhi Mirvnuk🌺🌺

  • @kiranzitre5473
    @kiranzitre5473 9 หลายเดือนก่อน

    स्वानंदी शिमगोत्सवचा व्हिडिओ खुप छान आहे, तुला पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा, असेच छान व्हिडिओ बनवत रहा.

  • @MandarJoshi
    @MandarJoshi 9 หลายเดือนก่อน

    This was one of the best videos ! Very calm and apt commentary - lovely festivities ! The happiness and and joy was felt while watching !

  • @dattayewale08
    @dattayewale08 9 หลายเดือนก่อน

    ताई तुमचे होळी निमित्त, अप्रतिम आसे कार्य आहे....

  • @Psj8568
    @Psj8568 7 หลายเดือนก่อน

    So beautiful, thanks for sharing

  • @kathebhavna1781
    @kathebhavna1781 9 หลายเดือนก่อน +1

    जिलेबी चा आग्रह किती गोड ❤

  • @shivam..578
    @shivam..578 9 หลายเดือนก่อน

    Accurate information about culture🎉magnificent to see this type culture

  • @bhalchandra1419
    @bhalchandra1419 9 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर तुम्ही रसाळ भाषेत कोकण दर्शन घडवीत आहात अभिनंदन

  • @swapnilsakpal1990
    @swapnilsakpal1990 9 หลายเดือนก่อน +2

    Proud to be part of your community as a follower and supporter of your journey as a talented woman.

  • @harsh3391
    @harsh3391 9 หลายเดือนก่อน +2

    ताई तुझा गोड आवाज ऐकूनच मन शांत झाल्यासारखं वाटतं. मनात साठलेले अनंत दुःखं विसरायला लावतात तुझे vlogs. Keep it up ! ❤

    • @anantdalvi5116
      @anantdalvi5116 9 หลายเดือนก่อน +1

      मलाही असेच वाटते

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 9 หลายเดือนก่อน

    Good afternoon. Thanks for the video. Because of you I got to see how exactly Palkhi is celebrated in Ratnagiri District. Your love for our traditions is commendable. God bless you. Bye. take care.

  • @rajeshgore378
    @rajeshgore378 9 หลายเดือนก่อน

    कोकणात राहायला यावे वाटतय तुमचे एवढे छान छान video पाहून

  • @nilleshpwagh
    @nilleshpwagh 9 หลายเดือนก่อน

    फारच छान स्वानंदी ! नव्या पिढीला एकत्र आणण्यासाठी, त्यांना आभासी दुनियेतून बाहेर काढण्यासाठी अशा प्रकारच्या व्हिडिओज ची आवश्यकता आहे ती तुझ्याकडून नेहमीच पूर्ण होते. बेस्ट ऑफ लक

  • @maheshrane-fh8uc
    @maheshrane-fh8uc 9 หลายเดือนก่อน

    Chaan palkhi nachavlis🎉🎉

  • @kavitakulkarni-t4h
    @kavitakulkarni-t4h 9 หลายเดือนก่อน

    Very nice presentation Swanandi

  • @Anandchya_najaretun
    @Anandchya_najaretun 9 หลายเดือนก่อน +1

    आवाज खूप सुंदर छान वाटतं ऐकायला व पहायला🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @sunilkanzarkar372
    @sunilkanzarkar372 9 หลายเดือนก่อน

    ईतक साध,शांत सुंदर निर्मळ. तुझ हेच वैशिष्ट्य जप.

  • @aparnakulkarni1640
    @aparnakulkarni1640 9 หลายเดือนก่อน

    नितांत सुंदर व्हिडिओ!! अजून काही बोलूच शकत नाही.

  • @AjayKale-p3m
    @AjayKale-p3m 9 หลายเดือนก่อน

    Vlog अप्रतिम व एकदम परीपूर्ण सर्वांगाने , अभिनंदन व अनेक शुभाशीर्वाद

  • @sunilpandre4450
    @sunilpandre4450 9 หลายเดือนก่อน

    Atishaya sunder ahe

  • @spicykick
    @spicykick 9 หลายเดือนก่อน

    एकदम मस्त स्वानंदी

  • @avinashchandane7464
    @avinashchandane7464 9 หลายเดือนก่อน

    Amazing...!! this is our real culture...!!!