गुरं नेली चरायला | A day out with Cattle | Slow living | Monsoon | Kokan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • A day spent with Cattle at grassland.
    #slowliving #monsoon #kokan #konkanlife #cattle #villagelife #swanandisardesai

ความคิดเห็น • 1.3K

  • @associateddistdhule5608
    @associateddistdhule5608 3 หลายเดือนก่อน +400

    आमच्या भागातील शिकलेल्या मुली असे काही गुरे चरायला घेऊन जातील, वाटत नाही.कोकणात निसर्ग आणी सादेपणा अजून शाबूत आहे.❤❤

    • @makarandsavant9899
      @makarandsavant9899 3 หลายเดือนก่อน +6

      Good evening. Nice to see you grazing cattle. Now a days educated people look down uopn these farming and allied activities but glad to see your caring nature for these lovely cattle. God bless you all.

    • @omkarmandavkar118
      @omkarmandavkar118 3 หลายเดือนก่อน

      ​@@dattapatil4863कन्टेन्ट साठी चाललंय नाय तर कोण करील काय😂😂

    • @NitinSonawane-yu4dp
      @NitinSonawane-yu4dp 3 หลายเดือนก่อน +4

      स्वानंदी मला यायचं आहे तुझ्या गावी.

    • @maharashtra0719
      @maharashtra0719 2 หลายเดือนก่อน

      नको जाऊ तुला गुरे चरायला घेऊन जाणे शेण काढायला लागेल. तु ती कामे करू शकणार नाही​@@NitinSonawane-yu4dp

    • @vijaygajage4772
      @vijaygajage4772 2 หลายเดือนก่อน +2

      खुप मस्त वाटला वीडियो👌🏻 🌾🏞️

  • @Jauderaochidleka
    @Jauderaochidleka 2 หลายเดือนก่อน +83

    मला ह्या मुलीच्या विडिओ मध्ये प्रचंड सकारात्मकता अनुभवते!

  • @kandivlikar3141
    @kandivlikar3141 3 หลายเดือนก่อน +230

    तुम्ही गुरें अजूनही पाळता हीच नवलाची आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉

  • @bhushanmore7742
    @bhushanmore7742 2 หลายเดือนก่อน +74

    स्वानंदी तुझ्यामुळे माझे बालपण जागे झाले. मी पण असाच गुरे चारता चारता शाळा शिकलो आहे. तू जे गुरांसाठी करत आहेस ते मी सर्व केलं आहे.
    आजच्या नविन पिढीतील मुली लिपस्टिक लाली लावणाऱ्या शेण बघूनच दूर पळतात पण तू ते आवडीने साफ करत आहेस खरच तुझे आई वडील पुण्यवान आहेत.

    • @prakashghadge9555
      @prakashghadge9555 2 หลายเดือนก่อน +4

      धन्य आहेस तू , अभिनंदन

    • @GANESHINDUSTRIES-r2d
      @GANESHINDUSTRIES-r2d 23 วันที่ผ่านมา

      Khup khup abhinandan
      Malapan lahan panichi athavan zali

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 12 วันที่ผ่านมา

      तुम्ही माझ्याआदर्श रूपातील सुनबाई च्या स्वरुपात आहात खूप खूप सुखी व समाधानी राहा बाळा .तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या मनाप्रमाणे परमेश्वर सर्व काही देऊ देत आयुष्यात चढ-उतार येणारच नाही तर ते आळणी life कसल ?पांडुरंगगुरुदेव दत्त तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू देतश्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @surajpatil6171
    @surajpatil6171 3 หลายเดือนก่อน +125

    नवीन पिढीमध्ये स्वनंदिनी सारखी मुली होणे किती कौतुकाची गोष्ट राहील . खरच स्वानंदिनी तू निसर्गाशी जुळलेली आहे .

  • @sunilsakpal4099
    @sunilsakpal4099 3 หลายเดือนก่อน +42

    स्वानंदी परमेश्वर तुला निरामय उदंड आयुष्य देवो.तुझ्या मनातल्या सर्व इच्छा पुर्ण होवो.🙋🏻‍♂️

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 3 หลายเดือนก่อน +160

    लवकरच दोन लाख आणि लवकरच एक मिलीयन होणार स्वानंदी... खूप छान

    • @jyotiadhav1126
      @jyotiadhav1126 3 หลายเดือนก่อน +1

      होना….. १ लाखाच्या टप्प्यापेक्षा दोन लाख लवकर होणार आहेत. You deserve it Swanandi .. great going! Keep it up 😊 👍

  • @RajaniMayekar
    @RajaniMayekar 3 หลายเดือนก่อน +24

    गुरांच्या घंटाच्या आवाज खुप छान वाटतो. गुरांच्या खाण्या पिण्याकडे तुझं फार लक्ष्य आहे हे बघून खुप छान वाटत."श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ"

  • @snehalatapandit7877
    @snehalatapandit7877 3 หลายเดือนก่อน +112

    तुझे खूप खूप कौतुक अननस बघुन तोंडाला पाणी सुटले घरची फळे भाजी किती छान लागतात तुझे किती म्हणून कौतुक करावे शब्द नाहीत देव तुला कायम आनंदी ठेवो

    • @deepakaher6687
      @deepakaher6687 3 หลายเดือนก่อน +5

      ती कायम आनंदीच असते आणि आनंदीच राहणार कारण तीच नावच आनंदी आहे...❤ you, take care of yourself & all...😊😊

  • @swaradhamane4152
    @swaradhamane4152 26 วันที่ผ่านมา +2

    स्वानंदी मला तुझा सार्थ अभिमान वाटतो मी पण विदर्भातला एक शेतकरी आहे मला जॉब लागण्याआधी मी शिकत असताना माझ्या शेतात पण मी माझे गुर भर पावसात चारायचो खुप मज्जा यायची खुप गोड काळ होता तो परंतु आज तू या विडिओ मध्ये जे कार्य तू दर्शवलं आहेस ते खूपच अद्भुत आहे आज वर्तमान मध्ये शिक्षित मुली असे कार्य करीत नाही त्यामुळे या गोड शेतकी अनुभवाला त्या मूकतात पण तुझ कार्य बघून मला खूपच आनंद झाला मी तुझे सातत्याने विडिओ बघत असतो कारण मी एक निसर्ग वेडा शेतकरी आहे 🙏

  • @sameerghogale1905
    @sameerghogale1905 3 หลายเดือนก่อน +55

    गाय आपली आई 🙏🙏
    आणि तिची वासरं म्हणजे आपली भावंडं ❤
    आपण सर्व कृष्ण-सुदामा परिवार 😊

  • @sachinsawant6307
    @sachinsawant6307 3 หลายเดือนก่อน +15

    खूप छान तुझे व्हिडिओ मी दुबईवरून बघत असतो असे वातावरण पाहायला मिळाले की मनाला खूप प्रसन्नता मिळते.

  • @surendramahadik1082
    @surendramahadik1082 3 หลายเดือนก่อน +46

    आत्ताची पिढी गुरे चारायला नेतात हे कौतुकास्पद, आपले अभिनंदन.
    मला माझे लहानपण आठवले, मी देखील गुरे राखून शाळा आणि काँलेज शिक्षण पुर्ण केले.

    • @maharashtra0719
      @maharashtra0719 2 หลายเดือนก่อน

      तु मुलगा होतास ती मुलगी आहे आताच्या मुली हे काम करणार नाही

  • @rajeshmali8214
    @rajeshmali8214 2 หลายเดือนก่อน +12

    मी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका बालाघाट डोंगर रांगेत वसले ले काटेगाव आमच्याकडे पेरण्या झाले आहेत पाऊस खूप छान आहे आमच्याकडे उडीद मूग तुर सोयाबीन पिके घेतली जातात आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ आवडीने पाहतो अतिशय प्रेरणादायी व्हिडिओ तू शेअर करतेस आजच्या पिढीतील सर्व मुलींनी तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. माझ्याकडे देखील 22 देशी गोवंश आहेत

    • @Advait-12
      @Advait-12 2 หลายเดือนก่อน

      Daada. चारे येथे माझी ताई राहते
      जोशी

  • @sudhirbhivgade3425
    @sudhirbhivgade3425 3 หลายเดือนก่อน +56

    स्वानंदी ताई, निसर्गाच्या सानिध्यात खरा जीवनाचा आनंद घेताय तुम्ही, खुप नशिबवान आहात तुम्ही.

  • @bhauakhade
    @bhauakhade 3 หลายเดือนก่อน +10

    मी पुणे जिल्हयात मुळशी तालुक्यातील आहे आमच्या कडे बरा पाऊस झाला आहे. आम्ही भात पीक घेतो. आता लावणी चालु आहे. एवढी नाही पण थोडी गुरे आहेत आमच्या कडे अजुनही मी गुरे चरायला सुट्टी च्या दिवशी नेत असतो रानात. तुझे काम खुप छान आहे
    . धन्यवाद🙏

  • @Agroclinic98
    @Agroclinic98 3 หลายเดือนก่อน +81

    मन प्रसन्न होता तुझा आवाज आणि निसर्गाच सौंदर्य... अप्रतिम ❤❤😊

  • @RANGNATHKHOT
    @RANGNATHKHOT 3 หลายเดือนก่อน +6

    एवढं सगळं पशुधन आनंदाने सांभाळत आहात. किती आनंदाची गोष्ट आहे.

  • @dattatraymadan2688
    @dattatraymadan2688 3 หลายเดือนก่อน +58

    ताई खूप धन्यवाद तुमच्या परिवाराला आजकाल एवढी गुरे पालन करणे सोपी गोष्ट नाही.चारा पाणी शेण काढणे दूध काढणे देखरेख खूप मेहनतीचं काम आहे

    • @anantremje886
      @anantremje886 หลายเดือนก่อน

      Swanandtai. Khup. Aanand. Ghretes. Parantu. Aamhalasudha. Aanand. Detes. Khup. Khup. Shubhecchha

  • @shillabagal9816
    @shillabagal9816 หลายเดือนก่อน +1

    खुप कष्टाळु आहे छान छान ठाणे आहे खर सातारा आहे

  • @ROHITAPTE
    @ROHITAPTE 3 หลายเดือนก่อน +53

    छान vlog.
    मागच्या जन्मी या गुरांनी पुण्य केलं असणार म्हणुन या जन्मी तुमच्यासारखी माणसं मिळाली.

  • @aartidatey
    @aartidatey 3 หลายเดือนก่อน +5

    हा विडिओ कोंकण चं हिरवं सौंदर्य ,तझा गुरांबरोबर सहज वावर,तुझा गुरांशी बोलताना चा गोड आवाज ह्या सगळ्या साठी खूप आवडला.तू शेण,मातीची कामं आनंदाने करतेस हे खूप कौतुकास्पद आहे... तुला हार्दिक शुभेच्छा

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 3 หลายเดือนก่อน +29

    All under one roof अशी ख्याती आहे बाई तुझी. काय सांगावं आणि वर्णवं अशी आहेस तुझ्यासारखी तूचं 👌 ♥️ 👍

    • @vishalimeage8243
      @vishalimeage8243 2 หลายเดือนก่อน

      NO. ONE BETA
      GOD BLESS YOU

  • @VijayModak-y8j
    @VijayModak-y8j 2 หลายเดือนก่อน +6

    नवीन पिढीला समजण्यासाठी सुंदर व्हिडिओ खूप खूप धन्यवाद

  • @vijaypowar5225
    @vijaypowar5225 3 หลายเดือนก่อน +26

    भरपूर पाऊस झाल्यामुळे कुरण हिरवगार झालंय फारच विहंगम दृश्य आहेत. बरं वाटलं पाहून फारच छान स्वानंदी 👌🏼. गुरे पण बरीच आहेत तुमची आता सहसा कोणी पाळत नाहीत जास्त छान तुम्ही सांभाळत आहात 👍🏼

  • @manikraosadar1783
    @manikraosadar1783 3 หลายเดือนก่อน +2

    स्वानंदी तू खरच खुप साधी भोळी, निसर्गाच्या सानिध्यात व गुरा ढोरांना जिव लावनारी मुलगी आहेस. मी तुझा व्हिडिओ विदर्भातून बघतो. तुला मनापासून खूप खूप आशिर्वाद व हार्दिक शुभेच्छा.

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 3 หลายเดือนก่อน +25

    जय श्रीराम, स्वानंदी किती सुंदर निसर्ग,गुरांच्या गळ्यातील किणकिणणार्र्या घंटांचा सुमधुर आवाज,तुझे आई वडील नशीबवान आहेत!आम्ही वसई विरार जवळील पालघर ला राहतो ,आमच्या कडेही छान पाऊस आहे,नारळ आंबा केळी चिकु आळु लावतो आम्ही!मामाझ्या मुलीकडे अम्रुता कडे भोरला पण गाई गोठा शेती दुग्ध व्यवसाय आहे,जावई विक्रम वेटर्नरी डाॅक्टर आहे,तिथे जाऊन हा आनंद मिळतो!अननस खुप छान!

    • @vrushalipatil60
      @vrushalipatil60 2 หลายเดือนก่อน

      पालघर मध्ये कुठे ताई .. मी पण पालघर कर

  • @JaisingParab
    @JaisingParab 3 หลายเดือนก่อน +6

    विडीओ पाहीला! छान वाटलं!आज इकडेही पाऊस (मुंबई) नाही.तुझी हसत-खेळत माहिती देण्याची पध्दत आवडली.हिरवी चार....वेलीने चार बांधणे...म्हैस पाण्यात लोळणे...म्हैशी ब रोबर सुध्दा हितगुज करणे....या सारखे संवाद ऐकतेवेळीं ..खरोखरच मनाचे समाधान होते. सर्व कांही कौतुकास्पद!अनेक शुभेच्छा!....एक वयोवृद्ध [76]

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv 3 หลายเดือนก่อน +18

    किती सुंदर निसर्ग आणि त्यात रमणारी सर्वांची लाडकी निसर्ग कन्या. लवकरच दोन नव्हे तीन लाख फालोअर्स होवोत. 👍👍👍

  • @sujatagawande8796
    @sujatagawande8796 2 หลายเดือนก่อน +2

    Man prasanna karnara video❤❤❤

  • @vandanavalkoli4418
    @vandanavalkoli4418 3 หลายเดือนก่อน +16

    सर्व गुणसंपन्न अशी स्वानंदी.. खुप आवडतेस.तुझे सगळे Vlog बघते.खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद....🥰🥰💐

  • @veenaprabhudesai6455
    @veenaprabhudesai6455 3 หลายเดือนก่อน +3

    स्वानंदी तू किती निसर्ग आणि कोकण कोकणातील माणस माती जनावर कीती प्रेम करते काळजी घेतेस आवडी निवडी जपतीस😊

  • @padmajapitale2066
    @padmajapitale2066 3 หลายเดือนก่อน +15

    हिरवं हिरवं झालेलं रान बघूनच डोळे निवलेत. मस्त 👌

  • @sanketkotawadekar6283
    @sanketkotawadekar6283 3 หลายเดือนก่อน +4

    सध्याच्या युगात एवढी गुर राखण म्हणजे साधं काम नाही ताई ,आणि आपल्या लांजा तालुक्यात कमीच गुर दिसतात,सगळ्यांकडे ट्रॅक्टर आले आणि गुरे विकली गेली पण तुम्ही ही आपली जुनी संस्कृती , परंपरा जपून ठेवलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.❤❤ असेच नवनवीन ब्लॉग आम्हला बघायला मिळूं देत.❤

  • @sdv10in
    @sdv10in 3 หลายเดือนก่อน +15

    खरं तर आपली जीवन शैली हीच तर होती आणि आहे ... आता जे काही आपण क्षणिक सुख अनुबवतोय ते फक्त पॆसे असे पर्यंत... पुढे हेच नको होईल.. आता थोडे दिवसांनी नक्कीच लोक गावाकडे वळतील आणि पुन्हा शेती, गुरं पालन चालू करतील...

  • @kedarketkar2423
    @kedarketkar2423 8 วันที่ผ่านมา

    खूप छान.... गुरांचं एवढ्या आपुलकीने करतेस, हे बघून तुझा आणि तुझा कुटंबाचा आदर वाटतो.... हल्लीचा काळात, हा असा सहवास दुर्मिळ आहे....All the best and keep doing such good deeds👍

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494 3 หลายเดือนก่อน +10

    छान विडिओ असतात तूझे तु हसतेस ना तेव्हा एकदम छोट्या मुली सारखी दिसतेस खूप गोड मी नागपूर जिल्ह्यामधून तुझे व्हिडिओ बघते आमच्याकडे कापूस आणि सोयाबीन पेरली जातात आमच्याकडे पेरणी झाली आहे ❤️ आणि संत्रि पण भरपूर आहेत आमच्या इकडे

  • @TanajiMargale-v2p
    @TanajiMargale-v2p 2 หลายเดือนก่อน +4

    गुरांना चरायला खुप झालं आहे
    पावसाळ्यात गुरं चरायला रानात घेवुन जाण्याचा आनंद वेगळाच जनावरांना हिरवा चारा पोटभर मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद समाधान वेगळेच त्यात रानात गुरं राखताना अंगावर रेनकोट किंवा छत्री वर पडणारा पाऊस रानात नेलेल्या जेवणाची वेगळीच चव आणि पावसात गुरांच्या अंगातुन निघाल्या वाफा हे स्वर्गसुख अप्रतिम जीवनशैली शब्दच नाहीत स्वानंदीताई

  • @rahuldhadge7427
    @rahuldhadge7427 3 หลายเดือนก่อน +20

    काय झाडी... काय निसर्ग🌿🍃❤❤सुंदर आवाज...

  • @LAXMAN_ILAG
    @LAXMAN_ILAG 2 หลายเดือนก่อน +5

    जुने दिवस आठवले तुझ्यामुळे....धन्यवाद💐

  • @navnathjadhav1093
    @navnathjadhav1093 3 หลายเดือนก่อน +15

    खूपच छान गोधन सांभाळली आहे....

  • @vishwas5
    @vishwas5 3 หลายเดือนก่อน +2

    तुझा व्हिडिओ बघून खूप अभिमान वाटतो तुझा ,आणि गुरांबरोबर तुझा प्रेमळ संवाद म्हणजे घरातील व्यक्तींबरोबर बोलल्या सारखं वाटतं. गोड हसतेस आणि गोड बोलतेस.तुला बघूनच आनंद होतो.❤ मुलगी असावी तर अशी..👌🏻

  • @muktvidhyapeethsuchnapatra
    @muktvidhyapeethsuchnapatra 3 หลายเดือนก่อน +8

    तुझे VDO पाहतांना खूप बरं वाटतं,माझं गाव मालवण,माळगाव ,एखाद्या छोट्या मुलाशी खेळावं तस तुझं वागणं अप्रतिम ...काही क्षण चांगले घालविल्याबद्धल आभार ...हार्दिक शुभेच्छा

  • @bhushangotarne9923
    @bhushangotarne9923 2 หลายเดือนก่อน +3

    गोठ्या मध्ये गाय आणि घरामध्ये माय ह्या दोन असल्या शिवाय शोभा नाही... विडिओ खूप सुंदर स्वानंदी ताई❤

  • @manojkhedekar649
    @manojkhedekar649 3 หลายเดือนก่อน +13

    खूप छान Swanandi, खरं आयुष्य तू जगतेय. 😊

  • @rajkumkarbamane4342
    @rajkumkarbamane4342 5 วันที่ผ่านมา

    मी रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका दापोली गाव मुगीज येथुन आहे आमची भातलावणी झाली आहे. सध्या मी मुंबई बोरीवली येथे रहात आहे पण नोकरीतून रिटायरमेंट झाल्यावर मलाही असंच जिवन जगायचे आहे. याला जिवन ऐसे नांव. तुझे व्हिडीओ पाहील्या नंतर लहानपणा ची आठवण होते. व्हिडीओ पाहील्या नंतर मन
    प्रसन्न होत. धन्यवाद असेच ब्लॉग करत रहा आणि अम्हाला आनंदी ठेवा.

  • @ashoknikam9670
    @ashoknikam9670 3 หลายเดือนก่อน +24

    असेच सुखी रहा, God bless you. आयुष्य कसं आनंदात जगायचं हे आपणाकडून शिकायला मिळतंय.

  • @hemantshivade8321
    @hemantshivade8321 2 หลายเดือนก่อน +2

    खूप मस्त होता व्हिडीओ गुरांच्या गळ्यातील घंटाचा आवाज, पाऊस, हिरवेगार कुरण आणि तुझे ते सर्व मनोसक्त अनुभवणे फार आवडले

  • @sachin8283
    @sachin8283 3 หลายเดือนก่อน +6

    पालघर जिल्हयातील डहाणू तालुक्यातील सूर्या नदी किनारी उर्से नावाचे माझे गाव आहे..एका बाजूला डोंगर मध्ये गाव आणि दुसऱ्या बाजूला नदी.
    टिपीकल कोकणी गाव..❤

    • @Super-50
      @Super-50 3 หลายเดือนก่อน +1

      मी आलो होतो तुमच्या गावाला... इलेक्शन ड्युटी साठी😊छान आहे तुमचं गावं😊

  • @nitintalvatkar4019
    @nitintalvatkar4019 2 หลายเดือนก่อน +1

    स्वानंदी तुला खरा आनंद सापडलाय तो जतन कर आनंदी रहा❤

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 3 หลายเดือนก่อน +20

    मी आंबेगाव तालुक्यातील आहे. पाच सहा दिवसापूर्वी तुम्ही कडधे आणि वाडा मार्ग आहुपे गावात आले होते .आणि जाताना घोडेगाव मंचर या रस्त्याने गेलात .ईकडे अजुनही पाऊस कमीच आहे. मी आंबेगावकर आम्हाला घरापासून भिमाशंकर 55 कि .मी आहे. बाकी व्हिडीओ छान आहे तुमचे . धन्यवाद.🎉

    • @mohandongare3876
      @mohandongare3876 2 หลายเดือนก่อน

      Mi aalelo aahupela yatrela

  • @tukaramdipake3091
    @tukaramdipake3091 2 หลายเดือนก่อน +1

    छान,शेती करणारांसाठी प्रेरणादायक!निसर्गरम्य जीवन,सर्व गुणसंपन्न स्वानंदी!

  • @AnjaliKhatawkar
    @AnjaliKhatawkar 3 หลายเดือนก่อน +4

    हि कामं आम्ही केलेत खूप मजा येते ते आयुष्य पण छान होते

  • @namdevkalbande7873
    @namdevkalbande7873 2 หลายเดือนก่อน +2

    आमच्या गावाकडच्या मुलांना लाज वाटते गुरे चरायला आणि तू मुलगी असून हे काम करत आहेस. खूपच छान

  • @varshatamhankar224
    @varshatamhankar224 3 หลายเดือนก่อน +21

    लवकरच 2 लाख होणार subscribe r

  • @Salil64027
    @Salil64027 3 หลายเดือนก่อน +4

    Simplicity of this vlog makes it great.

  • @pritamgaikwad3759
    @pritamgaikwad3759 2 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान. तु खूपच छान माहिती सांगतेस. अगदी कोकणात असल्यासारखं फील होतंय. Very nice.

  • @sandiprajankar4242
    @sandiprajankar4242 2 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या सारखं आयुष्य सगळ्याच् मुलींचं असावं ...एकदम बिन्दास. ...

  • @surendradeshmukh9095
    @surendradeshmukh9095 3 หลายเดือนก่อน +3

    तायडे खूप छान, आम्ही सांगली जिल्हा, कडेगाव तालुक्यातील आहे आमच्यकडे समाधानकारक पाऊस झाला आहे, आमच्याकडे प्रामुख्याने ऊस असतो व आता या चार पाच वर्ष्यात आलं (अद्रक )असतं मला पण शेती व जनावर खूप आवडतात, पण शेती कमी असल्यामुळे शेती पण करतो आणि छोटीशी नोकरीं पण करतो, आमच्या कडे अशी गुरे चरण्यास आम्हाला चराऊ जमीन नाही, तुमची गुरं शेती पाहून मन प्रसन्न झालं, खूप छान 🙏🙏

  • @vilaspaigude5173
    @vilaspaigude5173 3 หลายเดือนก่อน +2

    खरचं स्वानंदी,सर्वांना आंनद देणारी निसर्ग कन्या आहेस. तुमचे कुटूंब भाग्यवान आहे..

  • @prashantshinde7274
    @prashantshinde7274 3 หลายเดือนก่อน +5

    एवढ्या मस्त वातावरणात एखाद पावसाचं गाणं ऐकायला मस्त वाटल अस्त... पुढच्या वेळेस नक्की गा तेवढीच आम्हाला पर्वणी... 😍😍😍

    • @varshajoshi3427
      @varshajoshi3427 3 หลายเดือนก่อน +1

      गायींना ही आवडत गाणे 😊ऐकायला

  • @RekhaNatu
    @RekhaNatu 2 หลายเดือนก่อน +1

    स्वानंदी, तुझे हे खेड्यात रामाने, आपल्या निसर्गसंपदेची जोपासना करणे आणि त्याची माहिती सर्वाना पोचवणे खूप छान, ग्रेटच आहेस तू

  • @kanchansrecipies5120
    @kanchansrecipies5120 3 หลายเดือนก่อน +7

    अत्ताच सबस्क्राईब केलं ग, मी पण रत्नागिरी, पोमेंडी ची लांज्याला जाताना आधी पोमेंडी, टेंबे लागते तुझ्या व्हिडिओ मुळे सगळं बालपण डोळ्यासमोर आलं, असंच छान बालपण पोमेंडी ला माझं गेलं मी पोमेंडी ची जोशी अता रानडे मी डोंबिवली ला असते बाळा तुझं कौतुक करायला शब्द अपुरे धन्य, तुझे आईबाबा त्यांना नमस्कार 🙏 तुझे व्हिडिओ मी पुन्हा पुन्हा बघते, डोळे भरून येतात माझी लाडकी गोड, कोकण कन्या❤ आभाळभर शुभेच्छा बाळा❤
    कांचन रानडे , डोंबिवली

  • @dineshwadekar4183
    @dineshwadekar4183 3 หลายเดือนก่อน +4

    तूझ्या व्हिडिडोझ पाहून खूप मन प्रसन्न होतो ताई..❤

  • @7angels445
    @7angels445 3 หลายเดือนก่อน +5

    हाय स्वानंद दीदी मला तुझी ब्लॉक खूप आवडतात मी रोज तुझे ब्लॉग बघते मला एकदा ते जिथे वॉटर लिली लावली आहेस त्या पौंड मध्ये काय काय आहे ते बघायचं आणि तुझं पूर्ण घराची टूर सुद्धा हवी आहे आणि वेगवेगळी झाडं कशी लावायची ते सुद्धा हव्य
    मला तुझे ब्लॉग्स खूप आवडतात होप तू हे सगळं करशील आणि लवकरच त्याचा बाबतीत व्हिडिओ टाकशील प्लीज एक लाईक ❤
    तुझे ब्लॉग्स बघताना जरा सुद्धा बोर होत नाही असं वाटतं तुझे ब्लॉग्स बघतच राहावे ❤

  • @melodiousmoods
    @melodiousmoods 15 วันที่ผ่านมา +1

    Real India is in villages 🙏 ❤

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 3 หลายเดือนก่อน +5

    घरात बसुन स्वानंदी तुझ्या मुळे कोकण बघायला मिळतो आहे खुप व्हिडिओ होऊ देत

  • @sarangpanaskar6021
    @sarangpanaskar6021 2 หลายเดือนก่อน +2

    स्वानंदी मी फेसबुकला हा vlog share केला आहे

  • @sachin8283
    @sachin8283 3 หลายเดือนก่อน +29

    लहानपणी शाळेला अर्धी दांडी मारून गुरे चरायला घेऊन जायचो..❤

  • @aniruddhasapre4511
    @aniruddhasapre4511 2 หลายเดือนก่อน +1

    आज सकाळी हा vdo पहिला. मन खूप प्रस्सन झाले. ही दृश्य लहानपणी खूप अनुभवली. पण आज बघितल्यावर शहरी आयुष्यात किती गोष्टीचा आनंद गमावून बसलो आहोत ह्याची जाणीव झाली. हेच खरे जीवन शिक्षण. थोरो यांचे वॉल्डन पुस्तकं आणि हरमन हेसे यांच्या भटकंती या पुस्तकातील जिवंत अनुभव आज तुमच्या vdo मुळे मिळाला. त्या बदद्ल तुम्हाला खूप शुभेच्छा.

  • @sandeepchaudhari2903
    @sandeepchaudhari2903 3 หลายเดือนก่อน +7

    खुप भारी
    स्वानंदी तुझे व्हीडीओ बघितले की
    निवांत , शांत , प्रसन्न वाटतं .

  • @ArunPadhye
    @ArunPadhye 2 หลายเดือนก่อน +1

    माझ्या लहानपणी च्या आठवणीना उजाळा मिळाला. या पिढीतील मुलगी ही सर्व कामे करते याचेच खूप कौतुक वाटते. 👍👍

    • @ArunPadhye
      @ArunPadhye 2 หลายเดือนก่อน

      पूर्वी गुरे चरायला नेण्याच्या दोन पद्धती होत्या. दुसरी म्हणजे दुपारचे आपले जेवण बरोबर घेऊन दूरच्या ठिकाणी जायचे व गुरे थेट तिन्हीसांजेला घरी आणायची.

  • @sureshkale9979
    @sureshkale9979 3 หลายเดือนก่อน +5

    आपले व्हिडिओ नवीन पिढीला एक आदर्श घालून देतील यात शंका नाही. यात नाटकीपणा कुठेही दिसत नाही . जसं आहे तसं. ग्रामीण आणि शहरी भागात कसं समरस व्हावं हे आपल्या व्हिडिओ मधून पुरेपूर प्रत्ययास येतं. आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @gauravjadhav5117
    @gauravjadhav5117 2 หลายเดือนก่อน +1

    मी नासिकहून आहे... 👌☺️खूप छान vlog बनवला आहे स्वानंदी ताई तु... खेडेगावातील निसर्गरम्य वातावरणात राहणे हे भाग्यच जणू... प्राण्यांना पण माणसांप्रमाणे जीव लावणे खरंच कल्पनातीत आहे आमच्यासारख्या शहरी लोकांना...तुझे चेनल उत्तुंग हिमालयाची उंची गाठो...हीच महादेवाचरणी प्रार्थना 🙏

  • @Agroclinic98
    @Agroclinic98 3 หลายเดือนก่อน +7

    खूप प्रदीर्घ मी वाट बघत होतो तुझ्या vlog chi❤

  • @manasipundlik3697
    @manasipundlik3697 2 หลายเดือนก่อน +1

    स्वानंदी तुझ खूप कौतुक. आणि खूप हेवा वाटतोय तुझा. खूप छान कोकणात राहतेस तिकडच्या मातीशी झाडांशी गुरांशी किती प्रेमाने बोलतेस त्यांची काळजी घेतेस. तुझ्या दिपू आणि माघी च्या आम्ही पण प्रेमात पडलो आहोत.लहान पणी शाळेला सुट्टी लागली की कोकणात आम्ही भावंड असेच गुरांच्या बरोबर तासनतास वेळ घालवत असू. तसेच काका न बरोबर थोडीफार शेती ची काम येत नसताना पण करत असू. उन्हाळ्यात आंबे फणस कोकम काजू करवंद खूप रम्य दिवस अनुभवले. ते सगळे तुझे व्हिडिओ बघून आठवतात. आधुनिक असून सुद्धा कोकण च्या मातीत घट्ट रुजली आहेस तू छान वाटलं. कधी पुण्यात येशील तेव्हा आधी कल्पना दिलीस तर भेटायची इच्छा आहे. तुझ घर शेती आणि गुरांना ❤❤❤ आणि तुला 😘

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 3 หลายเดือนก่อน +7

    स्वानंदी खूप छान माहिती दिली आहे आणि तु निसर्गाच्या सानिध्यात राहून चागला आनंद घे आहे

  • @nileshshetye3995
    @nileshshetye3995 2 หลายเดือนก่อน +1

    फार छान गुरे चराय घेऊन जाणे सोपे नाही तू मुलगी असून घेऊन जाते याला माझा सलाम 🙏

  • @sarangpanaskar6021
    @sarangpanaskar6021 2 หลายเดือนก่อน +2

    आमच्याकडे सकाळ पासून पाऊस आहे ,लोकांच्या पेरण्या करुन झाल्या

  • @rajeshpatil3946
    @rajeshpatil3946 2 หลายเดือนก่อน

    सर्व काही पाहुन मन खुप प्रसन्न झालं, खुप खुप धन्यवाद.
    हा आपला जीवनप्रवास असाच स्वच्छ आणि निर्मळपणे चालत राहु दे. 🙏🌹🙏

  • @appasahebsurange9997
    @appasahebsurange9997 3 หลายเดือนก่อน +9

    खूप छान स्वानंदी

  • @shardanarwade1466
    @shardanarwade1466 หลายเดือนก่อน

    Kup kup छान ताई तू येवडी शिकलेली असुन पण गावाकडील सर्व कामे अगदी आनंदाने करते, प्राण्यावर पण kup prem करते,kup kup dhnyvad

  • @satyenturki3577
    @satyenturki3577 3 หลายเดือนก่อน +13

    ❤ गोरी तेरा गांव बड़ा प्यारा ❤

  • @prakashraodeshmukh1974
    @prakashraodeshmukh1974 2 หลายเดือนก่อน +1

    कोकणातील जिवन खरच निसर्ग मय आहे आजही तुमची संस्कृती जुन्या परंपरा चालू आहे,हे विशेष वाटतं,

  • @varshasharangpani5989
    @varshasharangpani5989 3 หลายเดือนก่อน +3

    Farach chhan Swanandi. Tuza blog mhanje treat asate aamhala. Kiti Navi Navi mahiti detes.Tu nakki 4 lakh viewers nakki cross karanar.

  • @premtalape
    @premtalape 2 หลายเดือนก่อน +2

    गुरांना चरायला घेऊन जाण्यात पण एक वेगळाच आनंद आहे, मी पण गावाला गेल्यावर गुर घेऊन जातो . 😇🤍

  • @kiranjadhav567
    @kiranjadhav567 2 หลายเดือนก่อน

    आम्हाला तू निसर्गाचं खूप सुंदर रूप पाहायला देतेस तुझे व्हिडिओ पाहून मन प्रसन्न होते .खूप छान .तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा.💐

  • @anantnadkar2326
    @anantnadkar2326 2 หลายเดือนก่อน +1

    मला माझ्या लहानपणची आठवण आली हे पाहिल्यानंतर. फार मज्जा यायची गुरं राखताना. अजुनही संतोष काका सारखी कष्टाळू माणसे आहेत नाहीतर हे सर्व शक्य नाही या माणसाना सांभाळलं पाहिजे. तु लहान वासरांचे फार लाड करतेस
    बघून बरं वाटतं.आम्ही देवगड नाद तेलीवाडीचे , आमची शेती ७५% बाकी आहे.छोटे छोटे कोपरे मुळे वेळ लागतो. तुझ्यासारख्या मुलीनी आपल्या वडीलोपार्जीत शेती गुरे सांभाळली पाहिजेत. तुझ्या या प्रयत्नाला सलाम, तुझ्या कुटंबाला सलाम.आपली शेती चालू राहिली पाहिजे तरच आपला देश पुढे जाईल.

  • @tayyabbagwan4406
    @tayyabbagwan4406 22 วันที่ผ่านมา

    Mashallah bahut badiya beta Allah Pak aap ko hamesha khush rakhe

  • @dusanescreativity8816
    @dusanescreativity8816 3 หลายเดือนก่อน +1

    निखळ आनंदाचा सतत वाहणारा झरा म्हणजे स्वानंदी❤❤❤❤

  • @sandhyabhide2457
    @sandhyabhide2457 3 หลายเดือนก่อน +1

    She has great knowledge and skill to express herself! 🎉🎉🎉

  • @KasturiCreationNashik
    @KasturiCreationNashik 2 หลายเดือนก่อน +2

    Hi स्वानंदी.... पहिल्यांदा कंमेंट्स करते आहे.... कारण तुझे कौतुक करायला शब्द कमी पडतात... पण आज तुला एक सांगायचं होतं.... The 100% pure reaction हे चॅनल आहे... त्यावर तुझ्या बद्दल बघ त्या ताई किती छान बोलल्या आहे त.... बघ नक्की... माझी मुलगी पण तुझ्याच वयाची आहे... किती कमी वयात तुला इतकी समज आहे... खऱ्या अर्थाने जीवन कळाले आहे गं बाळा तुला... खूप खूप आशीर्वाद तुला.. खूप मोठी हो.... आजून खूप आहे बोलण्यासारखं..... पण कॉमेंट्स मध्ये किती लिहिणार.... 😊😊

  • @ganeshshendkar6254
    @ganeshshendkar6254 2 หลายเดือนก่อน +1

    रानात गुर न्यायला चारायला लय भारी मजा येते...,... छान वाटली... मी पण मावळत आहे... लय काय मजा येते......

    • @sandipkhamkar540
      @sandipkhamkar540 2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ बघितला कमेंट वाचल्या ज्याचे घरी गाय त्याचे घरी विठ्ठलाचे पाय तुझे कुटुंब आणि गाई हा एकच परिवार आहे म्हणूनच त्यांना माणसांप्रमाणे नावे दिली आहेत आपल्या कुटुंबातील सर्वांचे व तुझे कौतुक करावे तेवढे थोडे आहे स्वानंदी तू अशीच आनंदी राहा

  • @monicasalil2885
    @monicasalil2885 2 หลายเดือนก่อน

    स्वानंदी तुझ्यामुळे आम्हाला शहरात राहणाऱ्यांना कोकणातलं जीवन बघायला मिळत.
    खूप छान वाटत. आसा वाटतं की आम्ही पण तुझ्याबरोबर तिथे आहोत.
    खूप खूप थँक्यू ❤❤

  • @dattatrayvishnujadhav2015
    @dattatrayvishnujadhav2015 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान ! आजचा vlog पाहून खूप समाधान वाटले व शिक्षित तरुणांना आदर्श आहे व शेवटचा गोगलगाई च्या चालीचा संदेश हळू निसर्गाचे रक्षण करत जा ! खूप छान!😊

  • @amrutapunde2813
    @amrutapunde2813 3 หลายเดือนก่อน +1

    खरंच आहे स्वानंदी... खूप गोड आणि गुणी मुलगी आहेस....❤🥰

  • @m.khotoringa3297
    @m.khotoringa3297 2 หลายเดือนก่อน

    I love you , for your quality of a mother ❤️

  • @alkalimaye4071
    @alkalimaye4071 2 หลายเดือนก่อน

    स्वानंदी तुझे खुप खुप कौतुक आहे. माझे लहानपण ही असेच शेतात , मळ्यात गेले आहे. मला आमच्या लक्ष्मी म्हशीची आठवण झाली.

  • @rajankoli1997
    @rajankoli1997 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम विडीवो असतात तुमचे निसर्गाच्या सानिध्यात अगदी कोकणातील ग्रामीण जीवन आणि सुरेख चीत्रंन आनंददायी अनुभव घेता येतो खरच स्वानंदी तुझे अभिनंदन ,,,,,,कुठेतरी आम्ही शहरवासीय नक्कीच गावात गेल्यासारखे वाटते आणि जुन्या आठवणी येतात सुंदर,,,,

  • @Surekha-ih9tz
    @Surekha-ih9tz หลายเดือนก่อน

    Tujhy mule nisargach darshan hotoy.tujh pranyavar
    Ch Prem v tyanchi kalaji ghen v tyanchyashi gappa marates he khup kautukaspad ahe.God bless you beta.