रायरेश्वराच्या घनदाट जंगलातील औषधी वनस्पती व रानभाज्या | अनेक आजारांवर आजही यांचा उपयोग होतो🥬🍠🥒

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
  • रायरेश्वराच्या घनदाट जंगलातील औषधी वनस्पती व रानभाज्या. #रायरेश्वर #raireshwar #rayreshwar #nishantawadevlogs
    रायरेश्वराच्या या घनदाट जंगलामधे अनेक प्रकारच्या रानभाज्या व औषधी वनस्पती उगवत असतात.
    या औषधी वनस्पती आणि रानभाज्यांचे सेवन हे मानवी आरोग्याला फार गुणकारी असल्याचे मानले जाते.
    मात्र त्यांची योग्य ती ओळख असणे हे देखील महत्त्वाचे असते कारण काही आरोग्यास उत्तम तर काहींचे अतिसेवन आरोग्यास घातक ठरते.
    डोंगराळ, दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना या सर्व औषधी वनस्पती व रानभाज्यांचे संपुर्ण ज्ञान असते.
    त्यांच्या दैनंदिन आहारात अन्न म्हणून आजही जंगलातील या रानभाज्यांचा वापर ते आवर्जुन करतात.
    जुन्या पिढीकडुन नविन पिढीला या ज्ञानाचा वारसा हा वंश परंपरागत दिला जातो किंबहुना तो नकळत येतोच.
    या वनस्पतींचे व रानभाज्यांचे हे ज्ञान आजही या लोकांकडे कायम असून या रानभाज्या त्यांच्या दैनंदिन आहारातील अविभाज्य घटक आहेत.
    अश्याच काही वनस्पती आणि रानभाज्या या रायरेश्वराच्या जंगलात आजही सापडतात.
    या औषधी वनस्पती आणि रानभाज्या कोणत्या..? त्या कशा ओळखाव्यात..? आणि त्यांचे मानवी जीवनात काय महत्त्व आहे..?
    याचीच संपुर्ण माहिती आपण या व्लॅाग मार्फत पाहणार आहोत, जाणुन घेणार आहोत, संपुर्ण व्लॅाग नक्की पहा व व्हिडीओ आवडल्यास शेअर, लाईक व कमेंट जरूर करा.❤️🙏🏼🚩
    टिपः ज्यांना या सर्वांची संपुर्ण माहीती आहे असे सह्याद्रिपुत्र सुरेश वाघमारे दादा (94224 49772 ) यांचा संपर्क क्रमांक सोबत देत आहे, परंतु आपल्याला जर यातील एखाद्या ठेव्याची खरच गरज असेल तरच मागवा व त्यासाठी दादांना संपर्क करा, आणि त्याचा त्यांना योग्य तो मोबदला देऊ करा, कारण निसर्गातील हा अमुल्य ठेवा अबाधित ठेवणे हि देखील आपलीच जबाबदारी आहे, कृपया हि कळकळीची विनंती.🙏🏼

ความคิดเห็น • 30

  • @VishwasSonawane-u1s
    @VishwasSonawane-u1s 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आज शहरातील शाळांमधील वातावरण त्यातही ज्यांच्यामुळे आज महाराष्ट्र खंबीर ऊभा आहे असे युगपुरुष छत्रपति शिवाजी महाराज त्यांचा इतिहास कमी होत आहे..परंतु या शाळेत महाराजांची मुर्ती पाहून मन प्रसन्न झाले आणि तितक्याच आवडीने मुलांनी बाहेर राजगड बनवलाय हे पाहून खूप आनंद झालाय, खरी पिढी, खरे संस्कार याच शाळांमध्येच घडतात..एकंदरीत छान व्हिडिओ 👌👍🙏

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  23 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी खरय सर..आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद😇😊🙏🏼❤️🚩

  • @surekhataware7828
    @surekhataware7828 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खूप छान आणि उपयुक्त माहिती.
    आजकाल असे ज्ञान असलेले लोक दुर्मिळ होत चाललेत.
    तुमचे काम कौतुकास्पद आहे.अशा लोकांचे ज्ञान प्रकाशात आणण्याचे महत्वपूर्ण काम तुमच्याकडून होत राहो

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      नक्की असाच प्रयत्न असेल…आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद Mam❤️😊🙏🏼

  • @hemendrarautRaut
    @hemendrarautRaut 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दादा जबरदस्त विडिओ बनवला आहे तुम्ही, काय अवस्था आहे शिक्षणाची अजुनही आपल्या महाराष्ट्रात वाईट वाटते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आमच्या गावातील लोकांना कितींदा सांगतो कि आपले खरे तिथक्षेञ रायरेश्वर आहे ते उजेडात आणले पाहिजे तर मला कोणच प्रतिसाद देत नाहीत. पुतळे उभारुन काय करायचे आहे जिथुन स्वराज्याची सुरूवात महाराजांनी केली ते मंदिर आज काय हालात आहे याची कोणालाच किंमत नाही.

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  6 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुमच्या प्रयत्नांना एकदिवस यश नक्की येईल दादा..आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद दादा😊❤️🙏🏼🙏🏼

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 วันที่ผ่านมา +5

    सुरेश दादा म्हणजे खरा सह्याद्री पुत्र ❤

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  วันที่ผ่านมา

      अगदी खरय सर…सुरेश दादा म्हणजे खरा सह्याद्री पुत्👍🏻😇❤️🙏🏼

  • @bhalchandraawaribhalchandr3921
    @bhalchandraawaribhalchandr3921 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Very nice experience of natural medicine

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank you so much sir😊❤️🙏🏼🙏🏼

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हा निसर्ग भरभरून देतो आपण घेतले पाहिजे समज पाहिजे. दादा तुम्ही खरच डाॅक्टर आहात आणि मेडीकल तर खुप खुप मोठे आहे, मध्ये मागच्या विडीओमध्ये मला तिथे हॉस्पिटल नाही म्हणुन काळजी वाटली होती पण आता एवढी औषधे पाहुन छान वाटल मला. 🥰🥰👍👌👌🥰🥰
    या विडीओसाठी मन:पुर्वक धन्यवाद आपले दादा, खुप खुप शिकता आले. 🚩🙏🚩 माझ्या परिसरामध्ये देखिल खुप नैसर्गिक संपत्ती आहे पण माहिती नसते, दादांना मनापासुन धन्यवाद छान माहिती सांगितली उपयुक्त अशी. 💯👌🥰🙏🚩🙏
    सुरेश दादांना मनापासुन प्रणाम करते 🙏 जय शिवराय🚩🙏🚩
    खुप हुशार आहेत विद्यार्थी, शाळा ही छान आहे. छोटा खुपच गोड आहे 🥰🥰

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  6 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी खरय ताई…👍🏻तसे तर आपले पुर्वज सगळेच निसर्गाचे परिपूर्ण ज्ञान असणारे होते..काळाच्या ओघात आपण ते विसरलो परंतु आजही या गोष्टी अशा डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या लोकांना माहीत आहेत त्यांच्यामुळे या टिकुन आहेत..😇❤️🙏🏼

    • @SayliGugale2100
      @SayliGugale2100 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@nishantawadevlogs
      अगदीच. सुरेश दादा तर खरच ग्रेट आहेत, त्यांनी तिथे राहुन निसर्गाला काही त्रास न देता जपलय हि खुप मोठी गोष्ट आहे. नाहितर आपली बरिच लोक झाडे लावणे लाबंच लावलेली झाडे सुध्दा तोडायला निगालेत, का तर जमीनीमुळे जी कोणी सोबतच घेऊन जाणार नाही. आजच त्या गोष्टीचा अनुभव मिळाला माझी बरीच झाड तोडली गेली ज्याचा कोणाला काही त्रासच न्हवता, वाईट याच वाटल ती जगायला खुप वर्ष जातात मुर्ख लोकांना तो विचार नसतो असो. मी माझी झाडे पुन्हा लावेल.

    • @SayliGugale2100
      @SayliGugale2100 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@nishantawadevlogs
      @nishantawadevlogs
      अगदीच. सुरेश दादा तर खरच ग्रेट आहेत, त्यांनी तिथे राहुन निसर्गाला काही त्रास न देता जपलय हि खुप मोठी गोष्ट आहे. नाहितर आपली बरिच लोक झाडे लावणे लाबंच लावलेली झाडे सुध्दा तोडायला निगालेत, का तर जमीनीमुळे जी कोणी सोबतच घेऊन जाणार नाही. आजच त्या गोष्टीचा अनुभव मिळाला माझी बरीच झाड तोडली गेली ज्याचा कोणाला काही त्रासच न्हवता, वाईट याच वाटल ती जगायला खुप वर्ष जतात मुर्ख लोकांना तो विचार नसतो असो. मी माझी झाडे पुन्हा लावेल.

    • @SayliGugale2100
      @SayliGugale2100 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@nishantawadevlogs
      अगदीच. सुरेश दादा तर खरच ग्रेट आहेत, त्यांनी तिथे राहुन निसर्गाला काही त्रास न देता जपलय हि खुप मोठी गोष्ट आहे. नाहितर आपली बरिच लोक झाडे लावणे लाबंच लावलेली झाडे सुध्दा तोडायला निगालेत, का तर जमीनीमुळे जी कोणी सोबतच घेऊन जाणार नाही. आजच त्या गोष्टीचा अनुभव मिळाला माझी बरीच झाड तोडली गेली ज्याचा कोणाला काही त्रासच न्हवता, वाईट याच वाटल ती जगायला खुप वर्ष जतात मुर्ख लोकांना तो विचार नसतो असो. मी माझी झाडे पुन्हा लावेल.

    • @SayliGugale2100
      @SayliGugale2100 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@nishantawadevlogs
      ​@nishantawadevlogs
      अगदीच. सुरेश दादा तर खरच ग्रेट आहेत, त्यांनी तिथे राहुन निसर्गाला काही त्रास न देता जपलय हि खुप मोठी गोष्ट आहे. नाहितर आपली बरिच लोक झाडे लावणे लाबंच लावलेली झाडे सुध्दा तोडायला निगालेत, का तर जमीनीमुळे जी कोणी सोबतच घेऊन जाणार नाही. आजच त्या गोष्टीचा अनुभव मिळाला माझी बरीच झाड तोडली गेली ज्याचा कोणाला काही त्रासच न्हवता, वाईट याच वाटल ती जगायला खुप वर्ष जतात मुर्ख लोकांना तो विचार नसतो असो. मी माझी झाडे पुन्हा लावेल.

  • @kalidasyewale9327
    @kalidasyewale9327 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान व्हिडीओ, बनवलात दादा ❤

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  15 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद सर..😊❤️🙏🏼🙏🏼

  • @AjitVenupureFilms
    @AjitVenupureFilms วันที่ผ่านมา +1

    Sunder Ani Garmin bhagatil aushadhi vanaspatinchi mahiti uttam

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  วันที่ผ่านมา

      Dhanyawad sir❤️😊🙏🏼🙏🏼

  • @sanjayvitkar2048
    @sanjayvitkar2048 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान explore केलं आहे निशांत दादा

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  23 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद दादा..😊❤️🙏🏼

  • @yashodaawade2776
    @yashodaawade2776 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान, keep it up 👌👍

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  23 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद😊❤️🙏🏼

  • @ramchandradhanawale7775
    @ramchandradhanawale7775 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤❤❤❤❤❤❤

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  15 ชั่วโมงที่ผ่านมา

      ❤️😊🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @mahavirawade5824
    @mahavirawade5824 วันที่ผ่านมา +1

    छान 👍👌

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  วันที่ผ่านมา

      धन्यवाद😊❤️🙏🏼

  • @dineshdhotre3765
    @dineshdhotre3765 วันที่ผ่านมา +1

    Very 👌 nice ❤️ only 25km to my home

    • @nishantawadevlogs
      @nishantawadevlogs  23 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank you sir😊❤️🙏🏼