ओळख वेदांची (भाग - १) | ऋग्वेद | डॉ. सुचेता परांजपे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2024
  • Olakh Vedanchi (Part - 1) | Rigved | Dr. Sucheta Paranjape
    सनातन धर्माचा पाया ज्या धर्मग्रंथांनी रोवला असे ४ वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद !
    परंतु सामान्य माणसाला ह्या वेदांमध्ये काय सांगितलं आहे ह्याबद्दल फारच कमी माहिती असते. म्हणूनच 'राष्ट्र सेवक' घेऊन आले आहे डॉ. सुचेता परांजपे ह्यांची हयाविषयावर घेतलेली एक सुंदर आणि माहितीपूर्ण मुलाखत - ओळख वेदांची !
    Social Media :
    Facebook :- / raashtrasevak
    Instagram :- / raashtrasevak
    © All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.

ความคิดเห็น • 895

  • @samadhanmasal8709
    @samadhanmasal8709 17 วันที่ผ่านมา +431

    अश्लीलता, स्वार्थ, फालतू आणि विकृत वीडियोज ने भरलेल्या या सोशल मीडिया च्या समुद्रात हा पॉडकास्ट मोत्या सारखाच मौल्यवान आहे. राष्ट्र सेवक टीम चे अभिनंदन 🎉

    • @dilipchari7991
      @dilipchari7991 15 วันที่ผ่านมา +9

      Fantastic information all indians must know this for future development rgds chari

    • @VitthalDirgule
      @VitthalDirgule 14 วันที่ผ่านมา +2

      Madam, very deep information, I awoke I am waiting dangerously for your further videos Thank you much

    • @sandipsutar503
      @sandipsutar503 14 วันที่ผ่านมา +1

      खरं आहे....

    • @ganeshmali3535
      @ganeshmali3535 13 วันที่ผ่านมา

      Band kra

    • @That_Perspective.
      @That_Perspective. 13 วันที่ผ่านมา +2

      I'm a 16 y/o really interested in vedic knowledge, thankyou mam tumhi he podcasts karat aahat! *Pls tumhi TH-cam var yet rha, active raha ani amhala tumcha kadun he sagle shikayla khup avdel* .❤
      I'm actually verryy happy, karan Marathi t khup kami spiritual podcasts aahet but knowledge kami nahi ae aplyakade. Me generally English n hindi spiritual podcasts aikte like of beer biceps/ TRS but "Raashtra sevak" I THANK YOU SO MUCH for bringing guests like these. 🙏 ❤️
      I love to explore topics like this one, I love to listen to you btw Me aai sobat aikte 😊 spiritual and vigyanic podcasts mala khup avadtat (but its sad that very less content of yours is available on TH-cam though :) plss mam i would Love if you will share ur knowledge on TH-cam by starting ur own channel 😅❤
      I really don't want this tresure of our land to get lost in this time. (Btw im a NEET 2026 aspirant wanna be doctor ofc 😊, I want to be educated and a well read person like youuu ❤❤ )
      I would love to learn Sanskrit from youuu as well (I'll make sure i do that after neet 2026) ❤

  • @patilsonia85
    @patilsonia85 17 วันที่ผ่านมา +182

    एक आई जशी आपल्या मुलाला साध्या सरळ सोप्या पद्धतीने समजावते तसे आपण समजावले... खरंच आपणास आई म्हणूनच मी संबोधिन... आजच्या पिढीला हेच ज्ञान आत्मसात करणे खूप महत्वाचे आहे ... आपण असेच आम्हाला मार्गदर्शन करत राहावे हीच आंतरिक इच्छा...🙏

    • @OmNileshPawar
      @OmNileshPawar 14 วันที่ผ่านมา +1

      Awesome Response 🙏

    • @That_Perspective.
      @That_Perspective. 13 วันที่ผ่านมา +1

      I'm a 16 y/o really interested in vedic knowledge, thankyou mam tumhi he podcasts karat aahat! *Pls tumhi TH-cam var yet rha, active raha ani amhala tumcha kadun he sagle shikayla khup avdel* .❤
      I really don't want this tresure of our land to get lost in this time. (Btw im a NEET 2026 aspirant wanna be doctor ofc 😊, I want to be educated and a well read person like youuu ❤❤ )
      I would also love to learn Sanskrit from youu (I'll definitely do that after neet 2026) ❤
      I love to explore topics like this one, I love to listen to you btw Me aai sobat aikte 😊 spiritual and vigyanic podcasts mala khup avadtat (but its sad that very less content of yours is available on TH-cam though :)
      plss i would Love if you will share ur knowledge on TH-cam by starting ur own channel 😅❤
      I'm actually verryy happy, karan Marathi t khup kami spiritual podcasts aahet but knowledge kami nahi ae aplyakade. Me generally English n hindi spiritual podcasts aikte like of beer biceps/ TRS but "Raashtra sevak" I THANK YOU SO MUCH for bringing guests like these. 🙏 ❤️

    • @sheelakhedulkar4021
      @sheelakhedulkar4021 10 วันที่ผ่านมา

      अगदी सोप्या पद्धतीने समजेल असे आजच्या पिढीला प्रेरणादायी विचार आहेत,खरेतर आकलनाच्या कक्षेबाहेर सोप्या पद्धतीने सांगितल्या मुळे ,हा आपलामुळचा ग्रंथ खूप अभिमान वातोय. माऊली शतशः प्रणाम.

    • @latashrivastava8275
      @latashrivastava8275 8 วันที่ผ่านมา

      ऋग्वेदाचे संक्षिप्त पुस्तक कोणते वाचावे ,याबाबत सांगवे pl. हरीॐ ताई

  • @sonofmotherindia
    @sonofmotherindia 18 วันที่ผ่านมา +128

    परांजपे महोदया तुमचे फार फार आभार... तुम्हाला थोडा त्रास होईल परंतु कृपया तुमच्याकडची ज्ञानाची गंगा आमच्यापर्यंत या माध्यमातून पोहोचवा.. आपले अजून एकदा शतशत आभार.

  • @raghavramon2051
    @raghavramon2051 18 วันที่ผ่านมา +83

    बाईंच्या मुखातून साक्षात वाग्देवता बोलत आहे. अप्रतिम

  • @shreyadeshpande
    @shreyadeshpande วันที่ผ่านมา

    काही संवाद शिकवतात, काही संवाद प्रश्नांची उत्तरं देतात आणि काही संवाद हे दोन्ही सांधून त्यापुरते मर्यादित न राहता निखळ आनंद देतात! तसा हा संवाद झालाय. खूप खूप आनंद मिळाला. अनेक धन्यवाद 🙏🏻😇

  • @arvindsheral6857
    @arvindsheral6857 18 วันที่ผ่านมา +85

    आज यमद्वितीया आणि मी या अप्रतिम संवादाची अनुभूती घेतोय. तुमच्या अफाट ज्ञानाची आणि खूप तळमळीने, सर्वसामान्यांना ते समजावून देण्याची असोशी, यासाठी केवळ "आभार, धन्यवाद" हे शब्द खूप अपुरे पडतात. परांजपे मॅम, तुम्ही ही श्रुंखला अशीच पुढे चालू ठेवली व मराठी मध्ये, वेद आणि उपनिषद समजून घेण्यासाठी कोणती उत्तम पुस्तके उपलब्ध आहेत याबद्दल मार्गदर्शन केले तर या विषयात उत्सुकता असणा-यासांठी खूप मदत होईल. मुलाखत घेणा-या देशपांडे यांचेही खूप आभार.

    • @That_Perspective.
      @That_Perspective. 13 วันที่ผ่านมา +2

      I'm a 16 y/o really interested in vedic knowledge, thankyou mam tumhi he podcasts karat aahat! *Pls tumhi TH-cam var yet rha, active raha ani amhala tumcha kadun he sagle shikayla khup avdel* .❤
      I really don't want this tresure of our land to get lost in this time. (Btw im a NEET 2026 aspirant wanna be doctor ofc 😊, I want to be educated and a well read person like youuu ❤❤ )
      I would also love to learn Sanskrit from youu (I'll definitely do that after neet 2026) ❤
      I love to explore topics like this one, I love to listen to you btw Me aai sobat aikte 😊 spiritual and vigyanic podcasts mala khup avadtat (but its sad that very less content of yours is available on TH-cam though :)
      plss i would Love if you will share ur knowledge on TH-cam by starting ur own channel 😅❤
      I'm actually verryy happy, karan Marathi t khup kami spiritual podcasts aahet but knowledge kami nahi ae aplyakade. Me generally English n hindi spiritual podcasts aikte like of beer biceps/ TRS but "Raashtra sevak" I THANK YOU SO MUCH for bringing guests like these. 🙏 ❤️

    • @chandrashekharkale-f5e
      @chandrashekharkale-f5e 12 วันที่ผ่านมา +2

      अतिशय स्तुत्य उपक्रम आहे हा. यासाठी श्री. रोहन देशपांडे व संघाचे खूप आभार. आदरणीय ताईंनी द्रविड नावातील अक्षराशी ऋग्वेदाचा संदर्भ दिला त्यावरून द्रविड ही आर्यांशी जोडलेले आहेत हे स्पष्ट होते. आपण कृपया आर्य आणि द्रविड संबंधावर ताईंनची एक मुलाखत प्रसिद्ध करावी ही इच्छा.

  • @sharayutravels
    @sharayutravels 2 วันที่ผ่านมา

    आदरणीय आऊसाहेब, मायबोलीत शिक्षण परत मिळत आहे. मी स्वतला खुप भाग्यवान समजते. आईकडून मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा आशिर्वाद मिळाला, ह्याचा मला खुप अभिमान आहे.

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 17 วันที่ผ่านมา +48

    असाच एक सुचेताजींचा व्हिडिओ मी पाहिला.आणि त्यांना बेळगावला यायला विनंती केली.आणि ऑक्टोबर 2023ला त्यांनी बेळगावात सुंदर व्याख्यान दिलं.प्रचंड किंवा प्रगाढ ज्ञान असलेल्या सुचेता ताईंना ऐकण्याचा,भेटण्याचा योग आला.

  • @sonalraskar1775
    @sonalraskar1775 16 วันที่ผ่านมา +33

    वेदांबद्दल अशी प्राथमिक माहिती हवीच होती. पण हे व्याख्यान त्यापलीकडचे बरेच काही आहे. ताईंचा व्यासंग, अभ्यास, वेदांबद्दल अभिमान, रसाळ वाणी या सगळ्यासाठी त्रिवार नमन🙏🙏🙏

    • @swatisurve9646
      @swatisurve9646 9 วันที่ผ่านมา +1

      अत्यंत अभ्यासपूर्ण 🙏

  • @SharvariSalvi-hw6he
    @SharvariSalvi-hw6he 17 วันที่ผ่านมา +30

    आज मला धन्य होणे म्हणजेच काय हे कळले. हा भाग ऐकून मी धन्य झाले❤ शब्द नाहीत आभार प्रदर्शनास. सुचेता माई🙏

  • @sampatraoshinde8885
    @sampatraoshinde8885 15 วันที่ผ่านมา +23

    आदरणीय ताई गायत्री मंत्राच्या रूपाने वेद पठण करत आहे हे स्वतःलाच माहिती नाही केवळ वेद अतिशय अवघड त्यामुळे कधी ऐकून अभ्यास करण्याची इच्छाच झाली नाही ती तुमच्या सहज सोप्या वाणी ने झाली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @sudhirabhange5086
    @sudhirabhange5086 17 วันที่ผ่านมา +42

    डॉ सुचेता ताईंचे कौतुक करण्यासाठी मला अवगत असलेले शब्द अपुरे अपुरे पडतात... अमूल्य ज्ञान ठेवा आमच्यासमोर एवढ्या तळमळीने ठेवण्यासाठी आपले मनापासुन धन्यवाद

    • @namratarane2706
      @namratarane2706 17 วันที่ผ่านมา +3

      Sucheta mam tumche aabhar manave tevdhe thodech

  • @subhashdeshpande3645
    @subhashdeshpande3645 17 วันที่ผ่านมา +45

    खूप खूप धन्यवाद सुचेता ताई . गीतारहस्य ग्रंथात बऱ्याच ग्रंथाचं संदर्भ आहे, त्यातील काही ग्रंथ मी वाचले आणि मति गुंग झाली इतके अफाट ज्ञान या ग्रंथांमध्ये लपलेलं आहे, आपण आणि अगदी विद्वान सुध्दा सनातनच्या पहिल्या पायरीवर उभे राहू शकत नाही. तुम्हाला खूप खूप धन्यवाद अतिशय साधेपणाने उत्कृष्ट उदाहरणासह विवेचन केले . भारतीय संस्कृतीने एक काम चांगले केले आहे टिंगल तावलीला विपर्यास करणाऱ्यांना थारा दिला नाही.

    • @MarutiMane-or8pq
      @MarutiMane-or8pq 13 วันที่ผ่านมา +1

      सुचिता ताईंची साध्या सोप्या भाषेत सर्वसाधारण माणसाला समजेल अशा स्वरूपात ऋग्वेद वेदाची सुंदर माहिती दिली धन्यवाद.

  • @arunpujari8048
    @arunpujari8048 17 วันที่ผ่านมา +22

    पुढच्या पिढीला सांगण्यासाठी खूप छान माहिती दिली आम्हीही अजून अज्ञानीच आहोत

  • @satyagiri1561
    @satyagiri1561 17 วันที่ผ่านมา +37

    ज्याच्या विषयी लहानपणापासून ऐकत होतो व तो आपला प्रांत नव्हेच असे वाटत होते त्या विषयाची सोप्या साध्या भाषेत आपण ओळख करून दिलीत, आपले मनापासून खूप खूप आभार.... 🙏

    • @mandakhare2457
      @mandakhare2457 16 วันที่ผ่านมา +2

      💐💐💐💐💐

  • @vedantigodbole1682
    @vedantigodbole1682 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुचेता ताई खूप छान माहिती मी हा व्हीडिओ तीन वेळा पाहिला आणि काही नोंदी करून ठेवल्यात. ऋग्वेदाची माहिती ऐकून अभिमानाने उर भरून आल. खरंतर ही माहिती आपल्याला शालेय पुस्तकांमध्ये समाविष्ट करायला हवी जेणे करून आपल्या प्राचीन संस्कृती बद्दल व आपण भारतीय असल्याबद्दल सर्वाना अभिमान वाटेल
    सावरकरांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत सरकार ला सुचना केली होती की अभ्यासक्रम बदलण्याची गरज आहे.

  • @anuradhajoshi9549
    @anuradhajoshi9549 วันที่ผ่านมา

    किती सरळ, सध्या पण जसा गीताला ताल असतो तस तुमच्या सांगण्याला होता. त्यामुळे अजून उ्सुकता निर्माण झाली. ऐकत रहावं, ऐकत रहावं

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 13 วันที่ผ่านมา +16

    खूप छान विश्लेषण! सुचेता ताईंचे ज्ञान अफाट आहे. अजून वेगवेगळ्या ग्रंथावर यांचे विश्लेषण बघायाला आवडतील. 🕉💯👏💐🙏

  • @sanjaykamble8128
    @sanjaykamble8128 16 วันที่ผ่านมา +12

    धन्यवाद...
    आज एका ऋषी, मुनींची प्रत्यक्षात भेट या ब्राडकास्ट द्वारे झाली. वेदांचे मौखिक ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याची परंपरा ऋषीतुल्य सुचेता परांजपे करत आहेत. त्या खुपच चांगली माहीती सुंदर पद्धतीने मांडत आहेत. त्या पेक्षाही त्यांची स्मरणशक्ती ची कमाल वाटत आहे. त्या बद्दल त्यांना शत - शत नमन🙏...
    पुढील भाग पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
    पुनःश्च धन्यवाद !!!

  • @medhadeshpande1452
    @medhadeshpande1452 10 วันที่ผ่านมา +2

    तरूणांपर्यंत पोचलात बरं का तुम्ही.....कारण हा व्हिडिओ माझ्या मुलीने मला फारवर्ड केला ...मी साठाव्या वर्षी ऐकतेय ... वेदांबद्दल...ती आत्ताच. ...
    काय बोलू?.....सतत सतत ऐकत रहावं वाटतं .तुम्ही अतिशय रंजकतेने गहन विषय सोपा आणि उत्सुकतेने ऐकत रहावा,असा करून सोडलाय.. तुम्ही गार्गीच आहात.धन्य झाले मी.नमन !

  • @swapnadeshpande7767
    @swapnadeshpande7767 10 วันที่ผ่านมา +3

    नुसतं ऐकूनच एवढा अभिमान वाटतो आहे...धन्यवाद सुचेताताई आणि RS

  • @manjirikolatkar7146
    @manjirikolatkar7146 17 วันที่ผ่านมา +18

    डॉ.सुचेता ताई आज आपल्या मुळे ऋग्वेदाची तोंड ओळख झाली.आपली सांगायची पद्धत खूप छान आहे.आपल्या जवळील हा ज्ञानचा ठेवा आहे.तो असाच आमच्या पर्यंत पोचवा.

  • @PrakashTamore-f4d
    @PrakashTamore-f4d 17 วันที่ผ่านมา +20

    गोर्यानी आपल्या संस्कृतीवरच हल्ला केला आणि भरतीय ग्रंथा मध्ये बर्याच अनावश्यक मिसळल्यामुळे भारतीय संस्कृतीचे खुप नुकसान केल मलाही माझ्या संसक्रुतीचे द्यान नाही ह्याचे अत्यंत वाईट वाटते

  • @Dr_Kulkarni
    @Dr_Kulkarni 17 วันที่ผ่านมา +21

    अप्रतिम माहिती. आपल्यासारख्या विदुषी ही सुध्दा आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. ह्या वाहिनी चे आभार आणि आपल्याला मनापासून नमस्कार

  • @vimalbendale3150
    @vimalbendale3150 11 วันที่ผ่านมา +3

    अनादि आणि अनंत असं अक्षर धन ऋग्वेद यावरुन हे अभ्यास पूर्ण व सहजसुंदर विवेचन ऐकून , ज्ञानेश्वरांनी वर्णन केलं तसंच म्हणावंसं वाटलं..देखिला अक्षरांचा मेळावा,तैं विस्मयाचिया जीवा विस्मयो जाहृला!

  • @priyayedre7274
    @priyayedre7274 8 วันที่ผ่านมา

    आपण या सोशल मीडयाद्वारे आपली संसकृती आपले पौराणिक ग्रंथ याबद्दल माहिती देत आहात त्या साठी तुमचे अगणित आभार
    या समाजाला याची खुप गरज आहे आणि सर्वांनी ते आत्मसात करावे
    खुप धन्यवाद

  • @sumatikulkarni9114
    @sumatikulkarni9114 17 วันที่ผ่านมา +21

    सुचेता ताई तुम्ही हे दार उघडून दिलेत,तुमचे आभार मानायला शब्द नाहीत.

  • @deoyanijoshi3836
    @deoyanijoshi3836 4 วันที่ผ่านมา

    खूप खूप आभार ताई 🙏🙏🙏
    आपल्या मुखातून आपल्या मागे असलेली, साक्षात माता सरस्वतीच बोलतेय असा आणि असाच ऐकतांना भास होतोय.😊
    आपण माझ्यासारख्या सर्व सामान्यांना समजेल अश्या भाषेत ऋग्वेदा सारख्या क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या विषयाची सहज उकल करताय , धन्यवाद !!
    🙏🙏🙏

  • @sheetalsonar8464
    @sheetalsonar8464 4 วันที่ผ่านมา

    सुचिता ताईंनी ऋग्वेदाची माहिती अप्रतिम सांगितली आहे. दैनंदिन जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी आपण अनुभवत असतो परंतु अज्ञानात. आज खऱ्या अर्थाने म्हणजे काय हे समजले. धन्यवाद सुचिता ताई 🙏🏻

  • @advitiaadityakuthe8687
    @advitiaadityakuthe8687 9 วันที่ผ่านมา

    निःशब्द झाले काय कौतुक करू अशा विचाराने पण मीही वेदांचे आणि आपल्या संस्कृतीचे सखोल ज्ञान घ्यावं अशी असीमित इच्छा जागृत झाली आहे 🙏🙏

  • @sumitrabodasjoshi5249
    @sumitrabodasjoshi5249 17 วันที่ผ่านมา +17

    खुपच छान माहिती कळली.
    श्री. देशपांडेंना धन्यवाद. आदरणीय सुचेताताईंचे आभार मानावे तेवढे थोडेच
    आहेत.

  • @shrikantphansalkar3022
    @shrikantphansalkar3022 5 วันที่ผ่านมา

    खरं सांगायचं तर आज माझी वेदांबद्दलची भीती गेली आणि वाचण्याची इच्छा निर्माण झाली. इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलंय की कोणालाही समजेल. अतिशय अप्रतिम. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏👏👏

  • @aparnabramhe8617
    @aparnabramhe8617 14 วันที่ผ่านมา +4

    खूप दिवसांपासून विचार करत होते वेदाभ्यास सुरू करायचा.. आता प्रेरणा मिळाली आणि चैतन्य ही मिळाले.. आता नक्कीच वाचणार. तुमचा guidance खूप कामी येईल. खूप खूप आभार.

  • @RashmiShinde-n1l
    @RashmiShinde-n1l 7 วันที่ผ่านมา

    खूप दिवसांची नव्हे वर्षांची माझी प्रतीक्षा संपली..4 ही वेदाचे स्वरूप आता माहीत होणार..

  • @ganeshmule5284
    @ganeshmule5284 10 วันที่ผ่านมา +4

    सहज थोडेसे ऐकाव म्हणल पण काय सांगु संपुर्ण ऐकले हो ! किती सहज आणि सोपी सुंदर भाषा , ओघवती शैली ,मधुर वाणी,काय काय सांगु अजुन.
    किती अवघड,गुढ वाटले होते आपले वेद पण सहजपणे आम्हाला प्रेरणादायी माहीती दिली. खूप खूप धन्यवाद. खरेतर धन्यवाद शब्द खूप कमी वाटतो. मनापासून नमस्कार.

  • @anantthadve6062
    @anantthadve6062 14 วันที่ผ่านมา +7

    राष्ट्रसेवक चैनल चे खूप खूप आभार
    चारही वेदांवर चा सखोल अभ्यास याविषयी असेच चर्चासत्र आयोजित करून नवीन तरुण मंडळींना ज्ञान द्यावे ही नम्रतेची विनंती
    खूप खूप आभार मानायला शब्द कमी पडत आहेत धन्यवाद

  • @akhedkar1
    @akhedkar1 11 วันที่ผ่านมา +1

    हा पॉडकास्ट उपलब्ध केल्या बद्दल आपले आभार.
    साक्षात वेदगंगा अवतरल्यासारखे वाटले. परंतु त्यातही अतृप्ती वाटते कारण अजून खूप काही ऐकावेसे वाटते.
    ताई, आपण अजून वेग वेगळ्या सुक्तावर वेगळे व्हिडिओ अवश्य बनवून प्रस्तुत करावे अशी विनंती आहे 🙏

  • @dr.sharadmahakalkar617
    @dr.sharadmahakalkar617 7 วันที่ผ่านมา

    आम्ही फक्त चार वेद आहेत एवढेच ऐकत होतो ,आज पहिल्यांदाच इतके सुंदर विवेचन ऐकले......आभार 😊

  • @shailajaauty352
    @shailajaauty352 9 วันที่ผ่านมา

    सुचेता ताई वेदांविषयी नावांखेरीज काहीच माहित नव्हते. आपण अतिशय सोप्या व ओघवत्या भाषेत समजावून सांगितले. कान व मन तृप्त झाले. आपले इतरही व्हिडिओ ऐकण्याची उत्सुक्ता आहे नक्कीच ऐकेन .धन्यवाद.

  • @vasudevchougule4714
    @vasudevchougule4714 5 วันที่ผ่านมา

    मी अश्या spastikaranachya शोधात होते 🎉 फारच छान. अगदीं prehistory जोडून सांगितलेली माहिती
    फारच सुंदर ❤

  • @uttamchavan4625
    @uttamchavan4625 8 วันที่ผ่านมา +6

    ताई, धन्यवाद. तुम्ही देत असलेले ज्ञान मुळातच दुर्मिळ आहे आणि देणाऱ्यांची संख्या कमी आहे. अनमोल ज्ञान.

  • @aparnawalse4016
    @aparnawalse4016 17 วันที่ผ่านมา +7

    वा!खरंच ताई दिवाळी खऱ्या अर्थाने आज साजरी झालीशी वाटले.
    गेले कित्येक दिवस शोधत होते ते गवसले.
    वाट पहातेय पुढल्या भागाची 🙏🙏🙏
    धन्यवाद हा शब्द फारच तोकडा आहे या ज्ञानासाठी.
    पण तरीही
    मानावे तेव्हढे आभार कमीच 🙏🙏🙏

    • @ashiwinipalav6974
      @ashiwinipalav6974 15 วันที่ผ่านมา +1

      खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🌹

  • @pratibhakulkarni668
    @pratibhakulkarni668 3 วันที่ผ่านมา

    खूप खूप आवडला कार्यक्रम. अविरत सुरू रहावा. डॉ. सुचेता मँडम मुळे गोडी निर्माण झाली. धन्यवाद.

  • @user-ve7bt4xz3u
    @user-ve7bt4xz3u 6 วันที่ผ่านมา +1

    अहो भाग्य आहे खरचं खूप ग्रेट खूप खूप खूप छान आणि कोटी कोटी कोटी धन्यवाद 🚩🙏🙏👌

  • @surencholkar
    @surencholkar 17 วันที่ผ่านมา +5

    श्री स. कृ. देवधर यांचं ऋग्वेद हे पुस्तक वाचायला घेतलं. त्यात अनेक ठिकाणी सूक्तांची पुनरावृत्ती थोड्याफार फरकाने दिसत होती. त्यामुळे अस्वस्थ होतो. तेवढ्यात सुचेताताईंचा व्हिडिओ सापडला. आता ऋग्वेदावर आणखी वाचायला आणि समजून घ्यायला स्फूर्ती मिळाली. ताईंची अगदी प्रेमळ आणि सौम्य भाषेत समजावून सांगण्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. धन्यवाद.

  • @adinathjawanjale5157
    @adinathjawanjale5157 17 วันที่ผ่านมา +17

    खूप खूप धन्यवाद 🙏🏽🙏🏽मी फार वेद वाचन करण्यासाठी विचार करत होतो परंतु त्याची प्रारंभीक माहिती किंवा प्रस्तावना स्वरूपात मिळत नव्हती या रूपाने ती पूर्ण झाली खूप खूप धन्यवाद माझ्या वेदवाचन संकल्पला प्रो्हात्सान मिळत आहे.

  • @VishramKulkarni
    @VishramKulkarni 17 วันที่ผ่านมา +7

    खूपच छान, तुम्ही सांगितलं कि तरूण पिढीला यातून शिकावे अशी इच्छा झाली तर ते यश म्हणाले पाहिजे. पण मी 68 वर्षाचा आहे आणि मला याचा अभ्यास करण्यासाठी तरूण झाल्यासारखे वाटत आहे. खरोखर या पोडकास्ट साठी मनापासून धन्यवाद.

  • @bhumikadeshmukh3394
    @bhumikadeshmukh3394 17 วันที่ผ่านมา +12

    ह्यातल्या काही वाक्यांचे shorts नक्कीच करा.
    😊
    आज काही गोष्टी नव्याने कळल्या...
    खुप छान विषय...

  • @sakshijadhav8571
    @sakshijadhav8571 4 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर आणि विलोभनीय प्रकारे ताईंनी ऋग्वेद समजून सांगितला ..now I'm in my २०'s आणि त्यांनी म्हटलं अगदी तस "जाणून घेतल्याशिवाय अभिमान येत नाही"..खूप छान गोष्टी समजल्या हा episode ऐकून एक अभिमानाची भावना आणि ग्रंथांबद्दल रुची निर्माण झाली ..तुमचे खूप खूप धन्यवाद!

  • @suhasmhatre-p2c
    @suhasmhatre-p2c 4 วันที่ผ่านมา

    प्रणाम परांजपे महोदय 🙏🙏🙏फारच सुंदर विश्लेषण
    प्रचंड दिव्य ज्ञानामृत पदरात पडले

  • @sunetram9079
    @sunetram9079 11 วันที่ผ่านมา +1

    आज ऋग्वेदाबद्दल खूपच सखोल आशय पूर्ण व विस्तृत माहिती ऐकायला मिळाली। ...

  • @mrinaldhongde3670
    @mrinaldhongde3670 9 วันที่ผ่านมา

    किती छान सांगताय मॅडम...ऐकत रहावं असं आहे ..ज्ञानही आणि तुमचं सांगणंही

  • @vikasdamale3712
    @vikasdamale3712 6 วันที่ผ่านมา

    ताई, नमस्कार आज मला लुप्त होत असलेलं ज्ञान पुन्हा एकदा आपल्या वाणीने चमकलं याचं खुप समाधान वाटलं.

  • @pinoshpatankar8289
    @pinoshpatankar8289 17 วันที่ผ่านมา +19

    बाष्कल संहिता आणि बाष्कळ बडबड हा अर्थ लावणे म्हणजे किती गहिरा अभ्यास असला पाहिजे या माऊलीचा ......😊

  • @bhaktir.4419
    @bhaktir.4419 9 วันที่ผ่านมา

    खुप छान, आपल्या अभ्यासाचे करावे तितके कौतुक कमी आहे. सगळ्या 4 ही वेदावर अशी छान माहिती असलेले पुस्तक आलेच पाहिजे म्हणजे नवीन पिढी पर्यंत हा वारसा पोहोचेल. तुमच्या परिश्रमाला शतशः प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

  • @tanmeshraul8842
    @tanmeshraul8842 14 วันที่ผ่านมา +3

    तुमचा हा उपक्रम खरचं अप्रतिम आहे...असेच छान छान एपिसोड करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळो...त्याचा आम्ही जरूर जरूर लाभ घेऊ..सुचेता ताई च वाक्चातुर्य ची तोड नाही...mr.देशपांडे तुमचाही ज्ञान उच्च आहे. धन्यवाद

  • @anuradhakulkarni5383
    @anuradhakulkarni5383 16 วันที่ผ่านมา +6

    ताई, मी तुमच्यावर खूप खूष आहे. तुमच्या ऋणात कायम आहेच. काय सुंदर विषय घेतलाय, अभ्यासपूर्ण विवेचन, गोड आवाज आणि भाषा, सादरीकरणात सौंदर्य आहे. तुम्हाला अनंत शुभेच्या❤❤❤

  • @ashokpatwardhan8233
    @ashokpatwardhan8233 17 วันที่ผ่านมา +11

    ज्ञानाने वेड व्हायला होईल असे हे सूत्र आहे

  • @rameshdeo999
    @rameshdeo999 16 วันที่ผ่านมา +5

    नमस्कार डाॅ.सुचेता.प्रगल्भ ज्ञानोपासना.योग्य,अचूक शब्दात विष्लेषण.धन्यवाद.आपला,रमेश श्रीनिवास देव.बी.ई.वय ७८.ठाणे महाराष्ट्र.

  • @sangitarane9593
    @sangitarane9593 8 วันที่ผ่านมา

    खूप खूप सुंदर. हे ऐकून आपल्या भारतीय संस्कृती बद्दल चा अभिमान अजून वाढला 🙏🏻🙏🏻

  • @Jai-Mahakaal
    @Jai-Mahakaal 16 วันที่ผ่านมา +9

    अद्वितीय !! अप्रतिम 👌 फक्त कलखंडबाबतीत थोडा संभ्रम वाटला. युधिष्ठिर शक सुरू होवून साधारण ५१५० वर्षे उलटून गेली. आणि महाभारताच्या काळात समाज चांगलाच प्रगत होता. याचा अर्थ ऋग्वेद नक्कीच ५००० वर्षांपेक्षा बराच प्राचीन आहे असे मला वाटते.

    • @actualangel5133
      @actualangel5133 14 วันที่ผ่านมา +3

      Ho… Mala pan he vichitra vatla…
      Rugved ha daha hazar varsha aadhi sangitla asava… karan treta yugat Ramayan madhe pan rugvedabaddal ullekh aahe.

    • @avinashdeshpande2193
      @avinashdeshpande2193 11 วันที่ผ่านมา +2

      हो, पाच हजार वर्षांपूर्वी वेदकाळ होता अर्थात नक्की नाही सांगता येणार परंतु सात ते आठ हजार वर्षा पूर्वीचा आसवा हे पटते

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 12 วันที่ผ่านมา

    किती सुंदर विवेचन, ! 👌🙏

  • @dattatrayvishwase3344
    @dattatrayvishwase3344 9 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद! अप्रतिम, माझ्याकडे शब्दच नाही, वर्णन करण्यासाठी फार सुंदर धन्य झालो 👌🙏💥

  • @goodtoknoweverything22
    @goodtoknoweverything22 11 วันที่ผ่านมา +1

    काय मी बोलू मला शब्द नाही अश्या तुम्हा सर्व टीम ला डॉ.सुचिता ह्यांना मी मनापासून धन्यवाद म्हणते, त्यांच्याच शब्दात धन्यवाद कशाला मी ऋणी आहे तुम्हा सर्वांची 🙏🏻🙏🏻

  • @madhurimaharao6170
    @madhurimaharao6170 14 วันที่ผ่านมา +3

    डॉ.सुचेता ताईंंनी खूप छान,प्रेमाने रुग्वेद समजावला,उलगडला आहे.त्यांचे खूप आभार.

  • @narayansheth6297
    @narayansheth6297 17 วันที่ผ่านมา +9

    फारच उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद, सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन आपल्या चारही वेदां चे जाहीर पणे पठण करावे आणि पाठींबा द्यावा.

  • @smitakulkarni790
    @smitakulkarni790 10 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर मॅडम वेदांबद्दलची प्राथमिक माहिती मिळाली आणि त्याबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली खूपच सुंदर आहेत व्हिडिओज.. धन्यवाद

  • @VidyaPatil-jf2cg
    @VidyaPatil-jf2cg 17 วันที่ผ่านมา +7

    आदरणीय सौ.ताईंनी खुप मोलाचे ज्ञान दिले ,आपल्या वाणीतून सरस्वती ज्ञान देत आहे असे वाटत होतं,👏🪷

  • @anjaliratnakar-h4l
    @anjaliratnakar-h4l 17 วันที่ผ่านมา +5

    डॉ. सुचेताताई, नमस्कार. वेदांविषयी आपणाकडून जाणून घेणं नक्कीच आवडेल. माझी अनेक वर्षांची इच्छा आता पूर्ण होत आहे. पुढील भागांची वाट पाहात आहे. राष्ट्र सेवा टीमला मनःपूर्वक धन्यवाद.

  • @ytshivay
    @ytshivay 18 วันที่ผ่านมา +9

    निव्वळ अप्रतिम.अशीच उत्तमोत्तम माहिती पुढच्या पिढी पर्यंत पोहोचलीच पाहिजे.यासाठी चॅनलला आणि ताईंना खुप खुप धन्यवाद!🙏🏻

  • @umarayate8949
    @umarayate8949 14 วันที่ผ่านมา +2

    आदरणीय डॉक्टर सुचिता परांजपे मॅडम शब्द कमी पडतील आपल्या अप्रतिम ज्ञानापुढे सरस्वतीचा जणू गोड रसाळ मधुर वाणीतून सुंदर शांतपणे वाहणारा नितळ झरा किती ओंजळीत घेऊ तितका तो निसटतो किती सुंदर विवेचन मी स्वतः संस्कृत शिक्षिका कोपरगाव येथे शिर्डी जवळ श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय येथे शिकवले आता पुण्यात पुण्यात शिफ्ट झाली आहे वेदांवर ती खूप काही लिहावे वाचावे व त्यावर सुंदर लेखन करावे असेही वाटत आहे आपल्या ज्ञानाला खरच त्रिवार मानाचा मुजरा❤🎉

  • @sunitaparkhe6426
    @sunitaparkhe6426 11 วันที่ผ่านมา +1

    आ.सुचेताताई, खुप खुप धन्यवाद. आपल्या मुखातून ज्ञानाची गंगा वहातीय मी त्यामध्येही नखशिखांत चिंब भिजलीय. ऋग्वेदाचे अमोघ ज्ञान आपण देत आहात. साक्षात सरस्वती बोलत आहे.

  • @bhavanadubli7638
    @bhavanadubli7638 17 วันที่ผ่านมา +7

    राष्ट्र सेवा टीमचे मनःपूर्वक अभिनंदन

    • @AtmaramWaradkar
      @AtmaramWaradkar 17 วันที่ผ่านมา +2

      डॉ सुचेता ताई आपले राष्ट्सेवा समितीचे अनंत आभार.जगाला आर्दश ठरेल असं तत्वज्ञान आपल्या महान ऋषींनी सांगिलेले वेदांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे .ते आपण त्याची माहीती सांगीतलेली आहे. सर्वसामान्या पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे.धन्यवाद

  • @jaiganesh304
    @jaiganesh304 16 วันที่ผ่านมา +5

    अतिशय सुंदर विवेचन सर्व तरुण लोकांनी हे पाहण आणि ऐकणं गरजेचं आहे

  • @manglalande9551
    @manglalande9551 11 วันที่ผ่านมา +1

    किती किती आभार मानावे डॉक्टर आपले.

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 10 วันที่ผ่านมา +1

    खऱ्या विद्वान व आधी पंडित 👏🏼👏🏼👏🏼👏🏼👍

  • @shraddhamangavi848
    @shraddhamangavi848 8 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर आणि आनंद देणाऱ्या बऱ्याच गोष्टी समजल्या.आपल्या संस्कृतीचा अभिमान तर आहेच पण एडिसन ची गोष्ट कळल्यावर डोळ्यात पाणी आलं.
    खूप खूप धन्यवाद ताई.

  • @rajanikulkarni9744
    @rajanikulkarni9744 13 วันที่ผ่านมา +2

    प्रचंड माहिती मिळाली. असं वाटत की हा अभ्यास न करून आतापर्यंतचे आयुष्य व्यर्थ गेले. धन्यवाद माई .

  • @geetakale8258
    @geetakale8258 12 วันที่ผ่านมา +1

    🙏सुचेताताई आपण ऋग्वेद सोप्या पद्धतीने समजावून सांगितला. माझ्या कडे माझे सासरे कै. मोरेश्वर केशव काळे. (शास्त्री ) यांच्या ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद यांच्या संहिता आहेत.

  • @nilamghule6864
    @nilamghule6864 14 วันที่ผ่านมา +2

    परांजपे मॅडम आणि हा पाॅडकास्ट सादर करणारे तसेच सर्व टीम चे आभार.,🙏

  • @neelbarsode6796
    @neelbarsode6796 18 วันที่ผ่านมา +11

    केवळ अप्रतिम आणि अफाट, धन्यवाद हा शब्द खूपच तोकडा... ताई यांचे प्रचंड उपकार आल्यावर झालेत, माझी अशीच भावना व्यक्त आहे.. Absolute brilliant 🙏

  • @hemantdeshpande9091
    @hemantdeshpande9091 10 วันที่ผ่านมา +1

    विदुषी डॉ सुचेता परांजपे यांनी अतिशय सुरेख अशी माहिती सांगीतली. धन्यवाद 🙏

  • @alakasawant730
    @alakasawant730 17 วันที่ผ่านมา +10

    खूप छान विवेचन!!! आणि चांगला उपक्रम.

  • @watchlatestmemes
    @watchlatestmemes 12 วันที่ผ่านมา +1

    प्लीज अजून खूप खूप एपिसोड्स करा.. हे ज्ञान असं आहे की शक्यतो कोणी त्याच्या वाट्याला जायला बघत नाही.. पण ताईंनी खूपच उत्कृष्टपणे समजून सांगितले.. कोणालाही ऐकत राहावंसं वाटेल असं..
    आपल्या आजच्या पिढीला ह्या गोष्टींचा गंध तरी असणे गरजेचे आहे..❤

  • @DarshanKhedgaonkar
    @DarshanKhedgaonkar 18 วันที่ผ่านมา +10

    डार्विनची Evolution ची theory आणि आपली प्राचीन भारतीय संस्कृती यात खूप गोंधळ होतो .

    • @pinoshpatankar8289
      @pinoshpatankar8289 17 วันที่ผ่านมา +3

      हा गोंधळ जे डार्विनलाच मानतात अशा परदेशातील लोकांचा व्हायला हवा ....आपला गोंधळ होण्याचं काहीच कारण नाही ....त्यांना गरज असेल तर त्यांनी वेद समजून घ्यावेत ....😊

    • @mandar655
      @mandar655 16 วันที่ผ่านมา +4

      दशावतार ही दुसरा काही नसून डार्विन चीच theory नव्हे का? म्हणजे पहिला मत्स्य पाण्यापासून सृष्टीची उत्पत्ती हळू हळू पूर्णावतार भगवान श्री राम आणि श्री कृष्ण

  • @shailabirajdar7183
    @shailabirajdar7183 13 วันที่ผ่านมา +1

    ताई आपल्या ज्ञानाची आणि वाचनाची खोली प्रचंड आहे, आज आपल्या मार्गदर्शनाची अगदी शाळेतील विधा्यर्थ्यांना नितांत गरज आहे किंबहुना हा विषय सक्तीचा असावा.
    आपणास शिरसाष्टांग नमस्कार. 🙏

  • @nishikantrajebahadur1682
    @nishikantrajebahadur1682 17 วันที่ผ่านมา +10

    ताई आपण प़्राचीन संस्कृती चे महाद्वार खुले केले
    आहे! धन्य झालो
    उत्सुकता निर्माण झाली
    अभिमान वाटतोय ! !!

  • @nanditabhat5051
    @nanditabhat5051 13 วันที่ผ่านมา

    ❤खुपच सुंदर विश्लेषण

  • @skkukhda2060
    @skkukhda2060 16 วันที่ผ่านมา +7

    पुढच्या भागाची वाट पाहते आहे. 🎉

  • @rohiniganapule1083
    @rohiniganapule1083 18 วันที่ผ่านมา +10

    फारच छान. संपूच नये, ऐकत रहावं असं वाटतं
    पुढचेही भाग ऐकण्याची खूप उत्सुकता आहे .
    राष्ट्रसेवक चे मनापासून आभार🙏🙏

  • @rekhataibhuyar3748
    @rekhataibhuyar3748 11 วันที่ผ่านมา

    मॅडमनी ऋग्वेद बद्दल खूप माहिती दिली .त्यांची आभारी आहे.आणी मी कमेंट वाचल्या त्यातूनही खूप सुंदर शब्दांचा उल्लेख होत आहे.कमेंट करणार्याचं सुद्धा अभिनंदन .मॅडमला शत शत कोटी प्रणाम.🙏💐🌹 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashwinipingle8832
    @ashwinipingle8832 16 วันที่ผ่านมา +7

    अगदी पर्वणी आहे हे ऐकायला मिळणे

  • @kumudinikulkarni9158
    @kumudinikulkarni9158 12 วันที่ผ่านมา

    इतका सुंदर विषय आणि अतिशय सुंदर भाषेत विवेचन केले आहे पण जाहिराती फार झाल्या आहेत.

  • @veenalavate1383
    @veenalavate1383 11 วันที่ผ่านมา

    राष्ट्रसेवक टीमचे मनापासून अभिनंदन.आपल्या सांस्कृतिक परंपरा आजही जिवंत ठेवत आहात याचा
    अभिमान आहे.

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  11 วันที่ผ่านมา

      धन्यवाद !

  • @rujutajoshi9893
    @rujutajoshi9893 4 วันที่ผ่านมา

    अप्रतिम पद्धतीने सांगितले आहे.खूप सोपं करून आणि आपल्या उज्ज्वल परंपरांची माहिती दिली आहे.
    नतमस्तक ,🙏🙏🙏

  • @prashantthakure3548
    @prashantthakure3548 17 วันที่ผ่านมา +3

    ताई खूप धन्यवाद तुमच्या सारखा शिक्षक असेल तर चारी वेद माणसांना शिकण्यासाठी खूप खूप मदत होईल तुमच्या सारखी व्यक्ती स्वतः एक ग्रंथ आहेत शत प्रणाम

  • @shardamore464
    @shardamore464 15 วันที่ผ่านมา +3

    अतिशय ज्ञानवर्धक वसुंधरा विवेचन
    सुचेता ताईना शतशः नमन

  • @anjalisoman675
    @anjalisoman675 13 วันที่ผ่านมา

    खूप छान.अगदी योग्य विषय.

  • @mukunddhile
    @mukunddhile 13 วันที่ผ่านมา +2

    ऋग्वेदामध्ये 250 पेक्षा जास्त रुचा ज्या व्यक्तीवर लिहिल्या गेल्या आशा स्वर्गाधी पती इंद्र भगवान की जय.
    इंद्र उत्सव परिवाराकडून तुम्हाला खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा. मुकुंदराज. जय हो

  • @neelapatankar6729
    @neelapatankar6729 13 วันที่ผ่านมา

    ❤खूप छान सुंदर समजून सांगितल.