धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे दुर्मिळ छायाचित्र

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 เม.ย. 2022
  • धर्मवीर आनंद चिंतामणी दिघे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते होते आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख होते.
    मृत्यूः 26 ऑगस्ट 2001 ठाणे
    आनंद दिघे हे शिवसेनेतील एक महत्त्वाचे नेते होते. शिवसेनेचा विस्तार वाढविण्यात त्यांची भूमिका महत्वाची होती. ते व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक होते. हॉटेल व्यवसायातही त्यांनी जम बसविला होता. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे माजी नेते छगन भुजबळ यांनी दिघेच्या निधनानंतर दुःख व्यक्त करतांना म्हटले आहे की, त्यांनी कोणत्याही पदासाठी कधीही आकांक्षा ठेवली नाही, परंतु पक्षात संघटनेसाठी होणाऱ्या आंदोलनात त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या निस्वार्थ बोलण्याबद्दल त्यांना लोक लक्षात ठेवतील. पक्षासाठी त्यांनी केलेले कार्य हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नेहमीच प्रोत्साहन देणारे ठरले. पक्षाच्या नेत्यांसाठी त्यांचे कार्य समर्पित होते.
    ठाण्यातील नागरिकांच्या समस्या ऐकून / त्यांचे निराकरण करण्यासाठी ते दररोज दरबार ठेवत. ‘शिवसेनेचे ठाणे-ठाण्याची शिवसेना’ असा नारा देत गेल्या ४५ वर्षांपासून सर्वार्थाने ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला. ठाणेकरांनी शिवसेनेला भरभरून दिले आणि त्यामुळेच ‘शिवसेनेचे ठाणे’अशी या शहराची राजकीय ओळख निर्माण झाली. १९६७ मध्ये वसंतराव मराठे यांच्या रूपाने शिवसेनेला ठाण्याने पहिला नगराध्यक्ष दिला. शिवसेनेच्या राजकीय वाटचालीत हे पहिले आणि तितकेच महत्त्वाचे यश होते. साहजिकच तेव्हापासून गेली चार दशके या शहरावर शिवसेनेची एकहाती हुकूमत राहिली आहे. आनंद दिघे म्हणजे तर शिवसेनेचा ढाण्या वाघच. आनंद दिघे हे जिल्ह्य़ातील राजकीय वाटचालीत एकमेव असे निर्विवाद नेतृत्व मानले गेले. आनंद दिघे यांच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या ठाणेकरांनी सलग १९ वर्षे महापालिका शिवसेनेच्या ताब्यात ठेवली.
    ठाणे जिल्हय़ात ९०च्या दशकात शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी केले. दिघे यांच्या कार्यपद्धतीवर लोकशाहीवर प्रेम करणारा माणूस विश्वास ठेवेलच याची शाश्वती नाही. पण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना थेट मोखाड्याच्या पाड्यापर्यंत पोहोचवण्याचे काम दिघे यांनी यथाशक्ती केले.
    २७ जानेवारी हा आनंद दिघे यांचा जन्मदिन. बाळासाहेबांनी
    दिघे यांच्यावर पुत्रवत प्रेम केले. बाळासाहेब आणि दिघे या दोन नेत्यांमधील असलेले विश्‍वासाचे नाते शेवटपर्यंत टिकून होते. दिघे शिवसेनेच्या वाटचालीतील अनेक घटनांचे साक्षीदार होते. धगधगती मशाल होती. गुंडगिरीबरोबरच समांतर सरकार राबवीत असल्याचा आरोप त्यांच्यावर नेहमीच झाला. त्यांची निष्ठा होती ती शिवसेनाप्रमुखांवर आणि शिवसेनेवर. मुक्त हस्ते मदत हाच त्यांचा धर्म होता. त्यांच्या "दरबारा'त म्हणूनच साधुसंताबरोबरच मुल्ला-मौलवी, पाद्रीही दिसत. चार खासदार, आठ-दहा आमदार निवडून आणण्याची ताकद ज्या माणसाकडे होती, ते दिघे आमदारच काय मंत्रीही झाले असते; परंतु आयुष्यभर शिवसेनाप्रमुखांप्रमाणे एकच पद घेऊन शिवसेनेत जगले. ते पद होते "शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख".
    #धर्मवीर
    #आनंददिघे
    #dharmaveer
    #ananddighe
    #dighesaheb

ความคิดเห็น • 113

  • @chavan123bipin
    @chavan123bipin 2 ปีที่แล้ว +24

    दिघे साहेब हे सामन्यांत मिसळणारे आणि त्यांची दुःख, प्रश्न, पीडा जाणणारे नेते होते. सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे होते. फोटोत त्यांच्या आजूबाजूला दिसणारे नेते आज उद्योगपती झाले मोठे पैसे वाले झाले. आमचे दिघे साहेब करोडो सामान्य जनतेचे कैवारी होण्यासाठीच आयुष्यभर झटत राहिले. असा नेता होणे नाही. त्यांना पाहिल्यावर छत्रपती शिवाजी राजांचीच आठवण येते. चंद्र-सूर्य असे पर्यंत आमच्या मनात कायम असणारे श्रीमंत योगी म्हणजे आमचे दिघे साहेब यांना मानाचा मुजरा.

  • @sureshshinde3266
    @sureshshinde3266 2 ปีที่แล้ว +41

    हीच व्यक्ती खऱ्या अर्थानं शिवसेनेची वारसदार होती. पण दुर्दैवाने शिवसेना खाजगी कंपनी आहे

    • @aniketgaikwad1366
      @aniketgaikwad1366 2 ปีที่แล้ว

      Barobar

    • @bbablu123
      @bbablu123 หลายเดือนก่อน

      खरंच bro, शिंदे साहेबांनी चुकीचं केलं.

  • @amitwaghmare1316
    @amitwaghmare1316 2 ปีที่แล้ว +25

    दिघे साहेबांची शिवसेना. त्यांच्यामुळे बाळ ठाकरे मोठा झाला

  • @theisticsacrals5889
    @theisticsacrals5889 2 ปีที่แล้ว +56

    दिघे साहेब यांचा आवाज सुद्धा मिळाला तर बघा की राव 🙏🏼

    • @divinemantrachanting2339
      @divinemantrachanting2339  2 ปีที่แล้ว +7

      🙏 Nakkich

    • @rajupatel1094
      @rajupatel1094 2 ปีที่แล้ว +12

      बहुतेक ते भाषण देत नव्हते, आवाज मिळणे दुर्मीळ आहे

  • @sanskrutidubey2972
    @sanskrutidubey2972 2 ปีที่แล้ว +10

    I am every Day searching about Dighe sahab 🌹

  • @pradeepparab4377
    @pradeepparab4377 2 ปีที่แล้ว +8

    कट्टर, एकनिष्ठ, प्रामाणिक, आदरयुक्त दरारा , धाक ,प्रेमळ
    असा शिवसैनिक , गुरू शिष्याच नात दिघेसाहेबांकडून शिकावं जबरदस्त व्यक्तिमत्त्व ...! पुन्हा असे दिघे साहेब होणे नाही. त्रिवार सलाम साहेबांना..🙏🙏🙏🚩 नाद नाही करायचा...🐯

  • @nadeemahmed4512
    @nadeemahmed4512 ปีที่แล้ว +2

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
    🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    महाराष्ट्र राज्य श्री बाळा साहेब ठाकरे साहेब यांचे एकनिष्ठ, लोकप्रिय,"श्री धर्म विर आनंद दिघे साहेब "
    🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🙏🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

  • @nagareparvati5902
    @nagareparvati5902 ปีที่แล้ว +1

    Shivsenecha khara vagha aanand dighe Saheb 🙏🙏🙏💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹king of maharashtra dharm vir marave pari kirti rupe urave

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 2 ปีที่แล้ว +35

    शिव जयंती, नवरात्रोत्सव, दहीहंडी, गुडी पाडवा इ. हिंदू आणि मराठमोळे सण ठाण्यात आणि दीघे साहेबांच्या हयातीत अनुभवण्याची मजा काही वेगळीच होती ⛳⛳
    कितीही पहावं.....हा माणूस काही साधारण नव्हताच !!

  • @prajaktabenare6324
    @prajaktabenare6324 2 ปีที่แล้ว +12

    दिघे साहेबांच्या खुन्यांचा शोध घ्यायला पाहिजे

  • @sureshsondkar797
    @sureshsondkar797 2 ปีที่แล้ว +14

    साहेब आज तुमची गरज होती.तुमच्या मृत्यू च गूढ आज पर्यंत समजले नाही.सलाम

  • @007Tenalirama
    @007Tenalirama 2 ปีที่แล้ว +7

    Nice Collection. Thank you

  • @RAHULSHINDE-qu5fc
    @RAHULSHINDE-qu5fc 2 ปีที่แล้ว +12

    Real Tiger.... 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nobody7333
    @nobody7333 2 ปีที่แล้ว +13

    Music pan asa lavla ki dolyat paani आलं 🥺

  • @yuvraj.04
    @yuvraj.04 ปีที่แล้ว +2

    Dharmaveer Anand dighe saheb ❤️
    No one can take his place 💯

  • @sameerrane5400
    @sameerrane5400 ปีที่แล้ว +1

    Background music video 😢😢😢🙏💓 parat ya Saheb 🙏

  • @sumitchaskar1408
    @sumitchaskar1408 2 ปีที่แล้ว +6

    धर्म कसा जगावा व तों कसा जगवावा हे शिकण म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे साहेब!!!!!हँडस ऑफ!!!!
    आणि हीच खरी आपली महाराष्टची संस्कृती आहे.... हीच समाजात समाजकार्य करताना जपली गेली पाहिजेत.....
    मात्र त्याची गल्लत करता कामा नये.....
    आणि आपला धर्म आणि आपल्या समाजाचा खरा आधार स्तभ आहे.. 💐💐👌👌👍👍🌹🌹

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 2 ปีที่แล้ว +2

    आभारी आहे

  • @umeshdhawale4361
    @umeshdhawale4361 2 ปีที่แล้ว +3

    साहेब....साश्रु प्रणाम...🙏🙏🙏😣🚩!!!....

  • @Deepaksingh-vw4pn
    @Deepaksingh-vw4pn 2 ปีที่แล้ว +5

    🙏🙏

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 2 ปีที่แล้ว +2

    Great

  • @macchiwala001
    @macchiwala001 2 ปีที่แล้ว +3

    👌👌👌

  • @ganeshwagh2178
    @ganeshwagh2178 2 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेबांच्या नंतरचे खरे शिवसेनेचे खरे पक्षप्रमुख आनंद दिघे साहेब असते

  • @tanajibavane1654
    @tanajibavane1654 2 ปีที่แล้ว +2

    सच्चा हिंदुत्वाची मूर्तिमंत मूर्ती

  • @sujitsalekar9815
    @sujitsalekar9815 2 ปีที่แล้ว +4

    Dighe sahebansarkha manus punha hone shukya nahi,thanyatali shivsena dighe sahebanmulech aajhi aahe, bhavpurn shraddhanjali dighe saheb

  • @savitachavan4205
    @savitachavan4205 2 ปีที่แล้ว +1

    App Ko koti koti Naman Jai hind Jai Maharastra

  • @Vijay-hk9hw
    @Vijay-hk9hw ปีที่แล้ว

    माझा साहेब हरपला । आज गरज होती साहेबावी ।

  • @JJ-eu5ek
    @JJ-eu5ek 2 ปีที่แล้ว +3

    ❤️

  • @rasamallasanthosh8072
    @rasamallasanthosh8072 2 ปีที่แล้ว +2

    Ji mahar rasta

  • @samikshashelar7078
    @samikshashelar7078 2 ปีที่แล้ว +1

    काय पाहावं किती पाहावं साहेबांनी कामच असे केले आहे की बस 🙏🙏🙏😭😭🙏🙏🙏

  • @pravinkadam6368
    @pravinkadam6368 2 ปีที่แล้ว +3

    Real Tiger

  • @nitinbhaushejwal4410
    @nitinbhaushejwal4410 2 ปีที่แล้ว +3

    King of Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @avantikawarekar9649
    @avantikawarekar9649 2 ปีที่แล้ว +1

    Tyanchi jaga aadhi hi aata hi konich shivsainik gheu shakat nahi
    Ase dharmveer sahebana maza koti koti🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.........

  • @puranikmayurparulekar2499
    @puranikmayurparulekar2499 2 ปีที่แล้ว +5

    Shree Anand Dighe saheb mansatla dev hota va tyanchi kyati sena pramukh peksha adhik hoti,mahnun amhi dev manus gamavla

  • @southindianmovie-z8n
    @southindianmovie-z8n 2 ปีที่แล้ว +8

    Sahebancha ghaat balthakare ne kelay hr jag jahir aahe

    • @sandeepshirgaonkar2196
      @sandeepshirgaonkar2196 2 ปีที่แล้ว +2

      Khar aahe ka he ....Pan evadhya changlya mansala aani thanyat jyani shivsena vadhawali rujwali aasha mansala ka maral tyani .....Yachi mahiti milel ka

    • @amol8855
      @amol8855 2 ปีที่แล้ว +1

      I don’t think so

    • @Naorkhh
      @Naorkhh 2 ปีที่แล้ว +2

      Ky pan nako bolu Yar aaj 2 ghe pan nhi aahe ya duniyet

    • @prakashkainakar1369
      @prakashkainakar1369 2 ปีที่แล้ว +1

      Bhadavya amachi mati badakau nakos yed zavya kutalya pakashacha khatos gu are yedya balasaheb thakarenna tyanne guru manala ahe ani guru shishala ka marel yed zavya sang purn mahiti de amhala kaypan bolu nakos gadhava

    • @prakashkainakar1369
      @prakashkainakar1369 2 ปีที่แล้ว +3

      Tuzhyat dum ahe na tar pepar nyuj madhe tak m tula samajel kay avasta hote ti

  • @jaideepl4643
    @jaideepl4643 2 ปีที่แล้ว +1

    साहेब मी कमनशिबी मी तुम्हाला पाहिलं नाही

  • @shivgovindsaini2000
    @shivgovindsaini2000 2 ปีที่แล้ว +3

    Shivsena had 2 tigers one balasaheb and second dighe saheb

  • @avantikawarekar9649
    @avantikawarekar9649 2 ปีที่แล้ว +1

    Devane tyana punha aamchya sarvansathi janm dyava

  • @chandrakantghorpade1154
    @chandrakantghorpade1154 2 ปีที่แล้ว +2

    😉

  • @suwarnasalunkhe4388
    @suwarnasalunkhe4388 2 ปีที่แล้ว +1

    Saheb parat ya

  • @tanajibavane1654
    @tanajibavane1654 2 ปีที่แล้ว +2

    ऋषीतुल्यचं

  • @vandanaughade6814
    @vandanaughade6814 2 ปีที่แล้ว +2

    देवमाणूस

  • @sampadabhalerao2736
    @sampadabhalerao2736 2 ปีที่แล้ว +1

    Thane che malak Ani palak Anand dighe sahab

  • @anilmaskar1208
    @anilmaskar1208 2 ปีที่แล้ว +2

    Sahebncha avaj bhaga kuthe milto ka. Tyancha avaj ikaycha ahe kadhicha nahi ikla.

  • @aniketgaikwad1366
    @aniketgaikwad1366 2 ปีที่แล้ว +1

    Khari shivase ya vaghachj aja kalal 46 amabhar futale eknath shinde

  • @rasamallasanthosh8072
    @rasamallasanthosh8072 2 ปีที่แล้ว +3

    Tumhi.parat.janmaala year.dighy.sahheb.yavach.laganaar.telanganaa.siva sainik.chtrapati.sabhaji.maharajko.maaradiyaa.hamareko.galymye.matakaa.dalaa.baal.saheb.aaye.chtrapati.bany.aanand.sahab.saradarar.malusarebany.d.d.ganga.abhjal.khaan.bai.maraatha.rajaput.mahaar.rajaput.banjaaraa.labhadi.bangayaa.dili.banaal.myrath.keralaa.aasam..pk.filam.bangayya.swri.hindu.hijadoo

  • @madukhairate9957
    @madukhairate9957 2 ปีที่แล้ว +1

    🙏

  • @kalyanimore4059
    @kalyanimore4059 2 ปีที่แล้ว +4

    🙏