"जमिनीवर रहा". मराठी कविता, कवी -राजेश जाधव
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025
- जमिनीवर रहा
मुंबईत रहा,दुबईत रहा,
पॅरीस मध्ये रहा,की शांघाईत रहा
कुठेही रहा मित्रा,
पण जमिनीवर रहा!
*गाडीत जा, 'ऑडी'त जा*,
*नाही तर सुपरफास्ट आगगाडीत जा*.
*मर्सिडीज मध्ये जा,चॉपरमध्ये जा*,
*जहाजात जा, नाही तर विमानात जा*.
कसा ही जा मित्रा पण इमानात जा!
खुशाल तुझे पाय चंद्रावर नि मंगळावर ठेव
एक पाय दुबईत आणि दुसरा मुंबईत ठेव
कुठे ही ठेव मित्रा पण
एक पाय जमिनीवर ठेव!
मुबईत गोव्यात प्रॉपर्टी घे, स्वच्छंद जगण्याची लिबर्टी घे,
कुठेही मित्रा पैसा ठेव,
पण खाल्ल्या मिठाची
*आठवण ठेव*!
खाल्ल्या मिठाची
*आठवण ठेव*!
राजेश जाधव 9422253742 ( इंद्रधनूच्या कमानीवर मधून)