अचानक कसं सगळं | Marathi Kavita | Spruha Joshi Poems

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ส.ค. 2024
  • कविता :
    अचानक कसं सगळं
    शांत शांत होतं,
    श्वास रोखून धरतं सूर्यबिंब
    बुडत बुडत जातं ..
    किनाऱ्यावर येत राहतात
    लयदार लाटा ,
    उन्हामधून शोधत राहतात
    ढग वेगळ्या वाटा ..
    नारिंगी सोनेरी होतं
    केशराचं पाणी
    भरतीच्या आवेगाला
    वेदनेची गाणी..
    वाळू सरकत जाते आणि
    पावलं भिजत राहतात,
    समुद्राचा कण अन् कण
    शोषून घेऊ पाहतात.
    आपल्या आत वाजत राहते
    हळुवार गाज
    अंधारावर चढत जातो
    चंद्रवर्खी साज .
    नक्की कोण असतो आपण
    अशा वेळी खरंच?
    आत्ता, इथे 'एकटे' आहोत
    तेही एक बरंच.. !!
    - स्पृहा .
    तुम्हाला हि कविता कशी वाटली ते नक्की कळवा आणि Like, Share & Subscribe करायला विसरू नका.
    ______________________________
    CREDITS :
    Cinematography & Editing
    ASHLEY EYEFULS
    Music, mixing and mastering
    Mandar Geetapathi
    Keys
    Shantanu Dravid
    Costumes
    Label Ishanya
    Hair and makeup
    Bhagyashri Patil
    Special Thanks
    Dr. Alka Ranade
    Anurag Pathak
    Pornima Khadke
    Created by
    Nachiket Ashok Khasnis
    #SpruhaJoshi #Poems #MarathiKavita
    _________________________________
    About Spruha Joshi :
    Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
    For More Updates :
    Facebook : / spruhavarad
    Twitter : / spruhavarad
    Instagram : / spruhavarad
    Email : team@brewbackers.com
    ______________________________
    DISCLAIMER: This is the official TH-cam Channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
    __________________________________

ความคิดเห็น • 392

  • @deathnote6361
    @deathnote6361 2 ปีที่แล้ว +45

    The Kavita is as expected, Awesome
    But I loved the fact, that you getting more professional in each video!
    Beautiful Kavita, Beautiful music, Beautiful you😊👌

    • @nachiketkhasnis
      @nachiketkhasnis 2 ปีที่แล้ว +1

      Thanks for warm words

    • @spruhaajoshi
      @spruhaajoshi  2 ปีที่แล้ว +9

      🙂🙂🙏🏻🙏🏻

    • @its_meabhi-eo2uf
      @its_meabhi-eo2uf 2 ปีที่แล้ว +3

      Thank a lot...✨

    • @vasudhakhond
      @vasudhakhond 2 ปีที่แล้ว

      @@nachiketkhasnis...sir plz..... Radhaarpan....Atindra Satrwadikar yanchi kavita sadar vhavi

    • @rekhamainde5077
      @rekhamainde5077 ปีที่แล้ว

      Khup surekh 💖🌷

  • @akfunclouds6904
    @akfunclouds6904 หลายเดือนก่อน +1

    अचानक कसं सगळं आभाळ भरून येतं?....स्पृहा...तुझ्या प्रत्येक शब्दाला ते पाऊस बनवून जातं !!...-नम्रता विजय अटाळकर, वर्धा 🙏

  • @prabhakarapte5812
    @prabhakarapte5812 หลายเดือนก่อน

    सुंदर. सूर्यास्ताचं ते दृश्य शब्दांतून डोळ्यासमोर उभं राहिलं. शब्दांची ताकद आणि सादरीकरण कौतुकास्पद

  • @bhaktinandkumarsupekar4173
    @bhaktinandkumarsupekar4173 2 ปีที่แล้ว +13

    जितकी तुमची कविता सुंदर आहे तितक्या तुम्ही पण खुप सुंदर आहात.. कित्येक कविता मनाला खुप दिलासा देतात.. असं वाटत त्या कधी संपूच नयेत.. आणि मी त्या ऐकत राहावं कायम..

  • @tejalchaudhari3421
    @tejalchaudhari3421 2 ปีที่แล้ว +7

    अचानक असच सर्व घडत जातं
    घडता घडता त्या वेळेत प्रेम होऊन जातं
    अचानक असच ते घडून जात
    मनाला वाटत हे काय घडतं आहे पण
    ते नेमक कुणावर तरी प्रेम झालेलं असत
    वारा सुटला पाऊस आला
    मातीच्या ओल्यावाचा सुगंध आला आणि अचानक मला तो समोर दिसला
    अचानक हे सर्व अस अस घडत गेलं..........
    तुमची कविता खूप सुंदर होती aamhla आवडली आणि हे वरती माझ्या मनानी केले तुमच्या शब्दाला शब्द जोडले fky कसे वाटले ते सांगा ..I m the big fan of your🙏👍

    • @madhurivaidya8925
      @madhurivaidya8925 2 ปีที่แล้ว +1

      खूप छान.

    • @tejalchaudhari3421
      @tejalchaudhari3421 2 ปีที่แล้ว

      @@madhurivaidya8925 thx🙏

    • @vidhyanayakkavitasangrah
      @vidhyanayakkavitasangrah 2 ปีที่แล้ว +1

      खुप छान पद्धतीने शब्द रचना केली आहे 👌👌👍

    • @tejalchaudhari3421
      @tejalchaudhari3421 2 ปีที่แล้ว +2

      @@vidhyanayakkavitasangrah thank you 🙏😊

  • @swapnali8658
    @swapnali8658 2 ปีที่แล้ว +1

    Mast kavita Spruha

  • @poorvakale4053
    @poorvakale4053 2 ปีที่แล้ว +1

    Khup sunder… tuzyasarkhchich …

  • @ashwinikulkarni736
    @ashwinikulkarni736 2 ปีที่แล้ว +1

    ❤️❤️❤️ kya bat hai 👌👌👌

  • @shilpayalgi9184
    @shilpayalgi9184 2 ปีที่แล้ว +1

    Super ........spruha

  • @rushikeshkakade8670
    @rushikeshkakade8670 2 ปีที่แล้ว +13

    ....अंधारावर चढत जाते 'चंद्रवर्खी' साज... ❤️
    वाह! सगळी कविता आणि एकंदर सादरीकरणच.. खुपच आवडलं... अगदी रिफ्रेशिंग!😊

  • @pratikshar1662
    @pratikshar1662 2 ปีที่แล้ว +1

    Nehmi pramane..Apratim🤗

  • @statusmelody2453
    @statusmelody2453 2 ปีที่แล้ว +1

    कसलं भारी लिहलं..!👌

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 2 ปีที่แล้ว +4

    स्पृहा, फारच छान सादरीकरण, शब्द, हलकंसं संगीत आणि भरतीच्या आवेगाला वेदनेची गाणी यातली एक हूरहूर तर अंधारावर चढत जातो चंद्रवर्खी साज यातील अंधुकशी आशादायी किरणं..वा वा..अप्रतीम..लिहीत राहा, गात राहा..

  • @rohinilimaye5712
    @rohinilimaye5712 2 ปีที่แล้ว +1

    वेगळं च सादरीकरण बॅकग्राऊंड music ! Good idea

  • @sandhyakulkarni3441
    @sandhyakulkarni3441 2 ปีที่แล้ว +2

    अंतरीची गाज आणि स्वतःची साथ खूप अमूल्य🙏

  • @rekhathakur8921
    @rekhathakur8921 2 ปีที่แล้ว

    Wah, Wah!SPRUHAA.... LAAJWAAB KAVITA, AAPNE ACHI TARIKE SE USKO GAYA

  • @boiiiiigaming641
    @boiiiiigaming641 2 ปีที่แล้ว +1

    ,,. ,,, कविता तर छानच आहे; सादरीकरण त्याहून छान

  • @tusharpagar7163
    @tusharpagar7163 2 ปีที่แล้ว +1

    Kup sunder😊

  • @shirishjoshi4151
    @shirishjoshi4151 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर 👌👌👌

  • @pratikjadhav218
    @pratikjadhav218 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान स्पृहा...

  • @AjitJoshiPune
    @AjitJoshiPune 2 ปีที่แล้ว +1

    .कविता तर उत्तमच , अप्रतिम सादरीकरण , अफलातून स्पृहा..

  • @swanandibhowad2471
    @swanandibhowad2471 2 ปีที่แล้ว +1

    Sundar sabdankan tai

  • @preranapatki2560
    @preranapatki2560 2 ปีที่แล้ว +1

    आवडला...कविता मस्त

  • @prakashkorde537
    @prakashkorde537 2 ปีที่แล้ว +1

    , स्पृहा अतिशय सुरेख
    स्पृहा तुझ्याकडून कुसुमाग्रज , बा भ बोरकर,
    आरती प्रभू यांच्या अतिशय सुंदर सादर केलेल्या
    कविता ऐकल्या तेव्हडीच तुझी कविता पण आवडली
    Keep it up
    Prakash Vithal Korde

  • @user-st6kc1uf2i
    @user-st6kc1uf2i 2 ปีที่แล้ว +1

    खरंच भिडणारी !

  • @madhurijape8065
    @madhurijape8065 ปีที่แล้ว

    शब्दरचना व सादरीकरण अप्रतिम Dear स्पृहा.

  • @shamar4408
    @shamar4408 2 ปีที่แล้ว +1

    Kavita , sadrikaran, music saglech khup chan

  • @sonalkadam9308
    @sonalkadam9308 2 ปีที่แล้ว +1

    Nehmi pramane ch sunder👍

  • @mohanmustikar7013
    @mohanmustikar7013 2 ปีที่แล้ว +1

    khup sunde spruha

  • @VIJAYSHINDE-zo7qu
    @VIJAYSHINDE-zo7qu 2 ปีที่แล้ว +1

    किती खोल विचार आहेत तुझे लई भारी होती कविता खूप छान वाटल तू सांगताना टस त्यातच पूर्ण रमून गेलो तुझे खूप खूप धन्यवाद स्पृहा ताई

  • @dips1999
    @dips1999 2 ปีที่แล้ว

    Nehami pramane ati sundar kavita 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @prachijoshi1731
    @prachijoshi1731 2 ปีที่แล้ว +2

    Spruha tai tula khup chan vatat asel na lokancha chan comments vachun 😊 ... khup chan lihilas ani khup chan mandlas😊

  • @vijayajoshi8391
    @vijayajoshi8391 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर निरिक्षण स्प्रुहा 👌👌👌

  • @pradnyasawant4592
    @pradnyasawant4592 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम ❤️

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 2 ปีที่แล้ว +1

    आज च सादरीकरण काही वेगळं च होत ,,,,,,,खूप खूप सुंदर ,,, अप्रतिम ,,खरच अशा वेळी आपण कोण असतो ???????? आपण स्वतःला हरवून बसतो ,,,,,,अत्यंत स्पृहणीय व्हीडिओ ,,शँतनू च सिंथेसायझर उत्तम आणि कवितेच्या साथीने तर अजून छान वाटलं ,,,,तू माझा दिवस सुंदर केलास स्पृहा तुझ्यासाठी निव्वळ,,, नितळ निरागस प्रेम 😘😘😘😘😘

  • @priyankabadave6742
    @priyankabadave6742 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar

  • @ashasawant948
    @ashasawant948 2 ปีที่แล้ว +1

    कविता, हळूवार शब्दांची, अर्थपूर्ण, सुंदर, खूप प्रेम.

  • @balkrishnasawant452
    @balkrishnasawant452 2 ปีที่แล้ว +3

    खरंच समुद्र किनारा आणि सूर्य वेगळंच नात खुप छान

  • @sulabhaprabhudesai8634
    @sulabhaprabhudesai8634 2 ปีที่แล้ว +1

    Surekh kaviteche Surekh sadarikaran..Suraysta janavala.

  • @kavy-purv
    @kavy-purv 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan 👍tai

  • @swapnilsarde
    @swapnilsarde ปีที่แล้ว

    अप्रतिम कविता सादरीकरण मॅडम👌👌👍 ~कवी स्वप्नील

  • @nehakulkarni6313
    @nehakulkarni6313 2 ปีที่แล้ว +1

    कविता सुंदरच , पण सादरीकरण खुपच मस्त🥰😍

  • @buddhaghoshkasareofficial9414
    @buddhaghoshkasareofficial9414 2 ปีที่แล้ว

    उत्तम कविता.
    सुंदर सादरीकरण.
    आणि सुश्राव्य पार्श्वसंगीत

  • @shobhanarainteckchandani8315
    @shobhanarainteckchandani8315 2 ปีที่แล้ว +1

    Sweet, respected Madam .

  • @pranoutikhandge3016
    @pranoutikhandge3016 2 ปีที่แล้ว +1

    कमाल

  • @vishnukhond8150
    @vishnukhond8150 2 ปีที่แล้ว +1

    तुला नियमितपणे ऐकणारा तुझा एक खूप मोठा चाहता स्पृहा ताई.......
    तुझ्याच सारखी गोड, निरागस आणि सुरेख काव्यरचना......

  • @pallavinishandar4635
    @pallavinishandar4635 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @ushadravid1765
    @ushadravid1765 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान प्रयत्न, कीबोर्ड ची साथ पण छान होती!

  • @apsdhinchak5656
    @apsdhinchak5656 2 ปีที่แล้ว

    Me kharach khup relate kartat shabda mazya sadhyachya chaltya ayushyala.... Khupach hrudyala bhidun janari aahe... God bless you with lots of blessings & happiness 😊🙏🏼🥰🥰

  • @shivajinangare9257
    @shivajinangare9257 2 ปีที่แล้ว +2

    तुमच्या कवितेतून तुम्ही वर्णन करत असलेलं दृश्य समोर उभं ठाकतं. तुमचं मनच कवितेनं सदा भिजलेलं त्यामुळे तुमच्या वक्तव्यातून कवीता साकारत असते.

  • @SuyashW
    @SuyashW 2 ปีที่แล้ว +1

    Waaaaaah

  • @madhavimathekar1746
    @madhavimathekar1746 2 ปีที่แล้ว

    स्पृहाताई खूप च छान 👌

  • @sharadshiriskar2456
    @sharadshiriskar2456 2 ปีที่แล้ว +1

    रांगेत.... सर्वात पुढे राहील अशी 'कविता'

  • @lalitapatil6472
    @lalitapatil6472 2 ปีที่แล้ว

    Tumhi jyaveli kavita sadar karata tyaveli te sagala drushya dolysamor ubh rahat..... 😊

  • @lalitamali696
    @lalitamali696 2 ปีที่แล้ว +1

    वाव खूप छान

  • @vaishalipadekar4020
    @vaishalipadekar4020 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chan

  • @jyotsnachavan4687
    @jyotsnachavan4687 ปีที่แล้ว

    Khup Chan Kavita very so much nice,

  • @prashantghodke7155
    @prashantghodke7155 3 หลายเดือนก่อน

    खूप छान कविता 👌👌सादरीकरण पण खूप छान 👌👌

  • @pankajagoraksha6587
    @pankajagoraksha6587 2 ปีที่แล้ว +1

    Apratim👌👌

  • @ramharipimpalkar5036
    @ramharipimpalkar5036 2 ปีที่แล้ว +1

    छान ओळी स्पृहा....
    बहुदा तु या कवितेमध्ये असा क्षण अनुभवलाय
    जसं....
    तू सांज होता होता समुद्र किनाऱ्यावर एकटी गेलीस
    आणि सूर्य त्याच्या नारंगी रंगाने
    तुझ्याकडे येत असलेल्या लाटाना
    नारंगी रंग देत बुडतोय...
    तेव्हा चंद्र नेहमी सारखा अलगद आभाळ चढत आहे
    तू एकटीच गुणगुणत राहतेस की......
    आपल्या आत वाजत राहते "हळूवार गाज"
    अंधरावरती चढत जातो "चंद्रवर्खी साज"
    नक्की कोण असतो आपण अशावेळी खरंच
    आता इथे एकटे आहोत तेही एक बरंच....

  • @shobhadravid2122
    @shobhadravid2122 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर कविता आणि शंतनूचं तितकच सुंदर, योग्य accompaniment.

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 2 ปีที่แล้ว +1

    आवडली.शेयर केली.लगेच.खरच!!

  • @sanjaysvlog3159
    @sanjaysvlog3159 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम......खूप उत्तम शब्द आणि भावना......
    आज संगीत छान वाटले.....

  • @madansable5807
    @madansable5807 2 ปีที่แล้ว +1

    स्पृहा ताई अतिशय गोड अशी ही कविता ऐकून खूप छान वाटलं ताई मंगेश पाडगांवकर यांची संथ निळे हे पाणी ही कविता ऐकायला मिळाली तर आणखी मजा येईल

  • @darshanakale6
    @darshanakale6 ปีที่แล้ว

    Samudra hech nav ka ya kavitech?Kiti taral aani haluwar kavita aani titkech shant pan utkat sangit, sundar!!!

  • @padmajachoudhari4713
    @padmajachoudhari4713 2 ปีที่แล้ว +1

    Excellent..

  • @shekharshende5739
    @shekharshende5739 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर. आधी अनेक जण अनेक वेळेला लिहीतात तसं, तुमची कवीता, वाचन खुप छान असतं. शांतपणे घाईगडबड न करता पुर्ण लक्ष देऊन आपण लिहीता वाचता . अश्याच अनेक कवीता ऐैकवा. मनापासून आभार.

  • @swarupasawant8247
    @swarupasawant8247 2 ปีที่แล้ว +1

    Khup chann

  • @sandhyakulkarni3441
    @sandhyakulkarni3441 2 ปีที่แล้ว +1

    Khupach sunder💐👌👍

  • @nayangovande9404
    @nayangovande9404 2 ปีที่แล้ว +1

    स्पृहा दीदी इतकं सुंदर लिहिले आहेस तु कि मी शब्दात खरंच सांगू शकत नाही.. शब्द न शब्द मनाला भिडला.. जेवढं वाटत तितकं सोपं नसतं कि आपण जे लिहितो ते थेट काळजाच्या जवळ जाण. आणि ते तुझ्या प्रत्येक कवितेत होत.. अप्रतिम...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 लिखाणासाठी आभाळभर शुभेच्छा..💐💐

  • @satyajitdolas3207
    @satyajitdolas3207 2 ปีที่แล้ว +1

    कवितचे शब्द आणि वाचनात इतकी जादू आहे की आपण वास्तवात आहोत याची अनभुती येते.योगायोग ऐकताना खंडाळा घाटात प्रवासात होती त्यामुळे अजूनच वास्तव.

  • @mugdhakastur4050
    @mugdhakastur4050 2 ปีที่แล้ว

    Khoop chhan spruha nehmi pramane

  • @manjirikhambete8891
    @manjirikhambete8891 2 ปีที่แล้ว +1

    छानचं

  • @mandarphadke1293
    @mandarphadke1293 2 ปีที่แล้ว +1

    छान सादरीकरण

  • @user-os5kq1um6d
    @user-os5kq1um6d 2 ปีที่แล้ว +2

    समुद्र , कविता आणि सूर्य या साऱ्यांशीच पाठच्या दोन वर्षात माझं खूप जवळचं नातं विणलं गेलं. मात्र पुन्हा कॉलेज सुरू झाल्यामुळे दुरावले गेले मी माझ्या सगळ्यात आवडत्या ठिकाण पासून. आज स्पृहा ताई तुझ्या कवितेने पुन्हा त्या ठिकाणी नेलं आणि कुशीत घेतलं. Khupppp सुंदर कविता ताई❤️🌻

  • @kalpanapatil2376
    @kalpanapatil2376 2 ปีที่แล้ว

    स्पृहा तुझ्या नावातच काव्य भरल आहे. अशीच भेटत रहा फुलत रहा
    काव्याचे साज मिरवत रहा

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 2 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर कविता..प्रत्यक्षात सांजवेळी समुद्र किना-यावर एकटं उभं असण्याची अनुभूती मिळाली.. सिंथेसायझरची साथ अतिशय आल्हाददायक.. वेगळा, सुंदर व स्वागतार्ह प्रयोग..🌷❤

  • @shabdvelvlogs7404
    @shabdvelvlogs7404 2 ปีที่แล้ว

    ताई तु स्वतःहा पण लिहिते का कविता ,वाचनखुप छान आहे👌👌

  • @drjayantpdeshpande5820
    @drjayantpdeshpande5820 6 หลายเดือนก่อน +1

    कविता ऐकणे महत्वाचे आहे पण बरेच लक्ष शंतनू च्या वाजवण्याकडे जाऊन कविता मागे पडते असे वाटते. थोडे हलके असले पाहिजे असे वाटते. स्पृहाच्या कविता तिच्या कडून ऐकायला खूप छान वाटते.

  • @dhanashrisrecipes6964
    @dhanashrisrecipes6964 2 ปีที่แล้ว +1

    वाह.!! खूप च सुंदर कविता आहे..का कुणास ठाऊक, अचानक कधीतरी वाटतं ना,कि या रोजच्या जीवनात काही तरी वेगळं करावं, कुठं तरी दूर किनारी चालत रहावं अगदी तसंच वाटलं.तुमची कविता ऐकून..!! 🌹

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान कविता

  • @ajantakulkarni1128
    @ajantakulkarni1128 2 ปีที่แล้ว +1

    स्पुहा जी!!!
    एकाच वाक्यात अप्रतिम👌👌
    आत्ता नोटिफिकेशन आल आणि लगेच पाहिलं👍👍

  • @balasahebkhollam5521
    @balasahebkhollam5521 2 ปีที่แล้ว

    आतिशय तरल भावाविष्कार.खूप सुंदर
    बाळासाहेब खोल्लम

  • @silicon6086
    @silicon6086 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर कविता.. सुरेख दृष्टांत.. 👌.. असं वाटलं, जसं बाहेर हलका पाऊस पडतोय आणि सगळीकडे मातीचा सुगंध दरवळतोय.. एक सुखद आणि आल्हाद दायक अनुभव.. 👌👌🙏

  • @sakshitambe3656
    @sakshitambe3656 2 ปีที่แล้ว +6

    तुझ्या कविता छानच असतात😊...
    आपल्या आत वाजत राहते
    हळुवार गाज
    अंधारावर चढत जातो
    चंद्रवर्खी साज
    या ओळी खरंच छान वाटतात...
    सकाळी जेव्हा वाचले ना अचानक कसं सगळं तेव्हापासून उत्सुकता होती की नक्की कशी कविता असेल...

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर

  • @shobhakanase4719
    @shobhakanase4719 ปีที่แล้ว

    खूप छान कविता .तुम्ही छान वाचलीत

  • @rajasivaidya7823
    @rajasivaidya7823 2 ปีที่แล้ว +1

    Kittiiii sundar lihilays !!!!!! Jitka utkrushta lekhan titkach utkrushta sadarikaran...💯👏🏻👏🏻 Bhidli kavita manala...❤️

  • @vjadhav844
    @vjadhav844 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर रचना.. शंतनु यांनी दिलेलं म्युझिक लाजवाब

  • @prathameshparave1654
    @prathameshparave1654 2 ปีที่แล้ว +1

    मला तुमच्या कविता खूप आवडतात आणि ही सुद्धा कविता खूप छान होती.👌👌

  • @Navrangshayari
    @Navrangshayari 4 หลายเดือนก่อน

    खुप खुप सुंदर कविता

  • @dr.shobhar.beloskar1311
    @dr.shobhar.beloskar1311 2 ปีที่แล้ว +1

    ही हळूवार गाज मनात सतत ऐकू येत राहील.

  • @suwarnananoti7542
    @suwarnananoti7542 2 ปีที่แล้ว

    ते वातावरण डोळ्यासमोर उभं राहिलं ! अप्रतिम कविता आणि साथ ही अप्रतिम !

  • @its_meabhi-eo2uf
    @its_meabhi-eo2uf 2 ปีที่แล้ว +2

    कविता तर नेहमी छान असता पण आजची कविता खूप अप्रतिम होती सत्त ऐकत राहावं वाटत होती आजचं सादरीकरण हि खूप छान होत.
    Thank you so much dear...✨

  • @SumitPoetrys
    @SumitPoetrys 7 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर कविता आहे ...😇

  • @geetasamel8519
    @geetasamel8519 2 ปีที่แล้ว +1

    स्पृहा, तुमची कविता अप्रतिम, अथांग त्या सागरा सारखी आणि चमकदार, मावळट्या सूर्य किरणासारखी ❤️❤️❤️❤️❤️

  • @pritisatam8768
    @pritisatam8768 2 ปีที่แล้ว

    Kharach khup sundar, khupach

  • @shraddhadeshmukh3432
    @shraddhadeshmukh3432 10 หลายเดือนก่อน

    Khup sunder kavita and sajrikaran

  • @omshe2007
    @omshe2007 2 ปีที่แล้ว +1

    मला तर तुझ्या 'कुहू' कॅरेक्टर मधील कवीता सुद्धा आवडत होत्या. 'कवयित्री' म्हणून मी तेव्हा पासूनच फॅन आहे तुझी.

  • @dikshaprabhudesai2466
    @dikshaprabhudesai2466 4 หลายเดือนก่อน

    अति सुंदर कविता आहे