आनंद साजरा करायला वयाची अट नसते | मनातले काही | संकेत पाटेकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • #मनातलेकाही #sanketpatekar
    'बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे हाय रे पिया आहा रे आहा रे आहा रे पिया
    काँटा लगा....''
    क्षणभर ह्या गाण्याने विशेषतः त्या आवाजने माझं लक्ष वेधलं गेलं.
    ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक चार वर घाईघाईतच पोहचलो होतो.
    सकाळी ८ वाजून २४ मिनिटाची ठाण्याहून सीएसटी कडे धावणारी लोकल आज फलाट क्रमांक १ वरून न जाता ४ वर येणार आहे. अशी अनांउन्स मेन्ट झाली आणि ती ऐकताच त्या लोकल साठी धावत पळत सुटलो. तेंव्हा हे गाण्याचे बोल मधूनच कुठूनसे कानी आले. क्षणभर थांबून सहजच अवती भोवती नजर भिरभारिली गेली आणि लक्ष त्या दोन बसलेल्या मावशींकडे गेलं.
    साधारण साठीच्या आसपास असलेल्या त्या दोघी मावाशी , फलाट क्रमांक २ वरील त्या बैठकीच्या ठिकाणी निवांत बसून ईअर फोन लावून गाणं म्हणत होत्या . सूर ताल आणि गाण्याची ती लय छेडतच अगदी ...त्यांना स्वतःच आणि धावत्या ह्या जगाचं विस्मरण झालं होत जणू . त्या गाण्यात अगदी तल्लीन झाल्या होत्या. स्व आनंदाच्या त्या सुरात त्या मिसळून गेल्या होत्या.
    ''बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे हाय रे पिया आहा रे आहा रे आहा रे पिया
    काँटा लगा....''
    मी क्षणभर पाहत राहिलो. न्याहाळत राहिलो. त्यांचं ते गाणं आणि ते तरुण मन
    ते ऐकता आणि पाहता मनाशीच म्हटलं, बघ संकेत , 'क्षणांना असेच कवेत घेऊन जगता आले पाहिजे. रे .'
    'आनंद' साजरा करायला वयाची अट नसते. ते 'क्षण' तेवढे अचूक पकडायचे असतात. आणि त्यात आपणहून असं मिसळायचं असतं.
    असंच लिहता लिहता...
    - संकेत पाटेकर
    --------------------------------------------------------------------------------
    इतर व्हिडीओ :
    आयुष्यं निव्वळ जगण्यासाठी नसतं : studio.youtube...
    --------------------------------------------------------------------------------
    Boya MIC BY-M1 amzn.to/3cB5G2O
    ---------------------------------------------------------------------------
    Insta : / patekar.sanket

ความคิดเห็น •