तांदुळवाडी किल्ल्याचा दीड - दोन हजार वर्षांचा इतिहास १०० वर्षात नाहीसा झाला?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • किल्ले तांदुळवाडी -
    पालघर जिल्ह्यात, सफाळे गावापासून जवळ तांदुळवाडी किल्ला आहे. समुद्रसपाटी पासून १९०० फूट उंचीच्या या किल्ल्यावरचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे किल्ल्यावरील पाषाणात खोदलेली पाण्याची टाकी.
    किल्ल्यावर भटकंती करताना हे किल्ल्यावरील अवशेष आपल्याशी काही बोलू पाहतात. जसं ही कातळात खोदलेली टाकी आपल्याला हे सांगतात, की या किल्ल्याचे अस्तित्व साधारण सातवाहनांच्या काळा पासून असावं.
    म्हणजेच साधारण १८०० - २००० वर्षांचा इतिहास असू शकेल.
    पण याची पुष्टी, आपल्याला आज कुठल्या कागद‌पत्रातून किंवा अजून कुठल्या ऐतिहासीक दाखल्यातून करता येत नाही.
    तांदुळवाडी किल्ल्याचा इतिहासात उल्लेख आढळतो तो १३ व्या शतकात. १३व्या शतकात, राजा भिमदेव याचे राज्य पश्चिम किनाऱ्यावर आले आणि तांदुळवाडी किल्ला राजा भिमदेवच्या अखत्यारीत आला.
    किल्ल्यावर जाणारी वाट ही गर्द रानातून जाते. विविध जातीची वृक्ष आपल्याला तांदुळवाडी किल्ल्यावर पाहायला मिळतात
    In Palghar district, near Safale village is Tandulwadi fort. The biggest attraction of this fort at a height of 1900 feet above sea level is the rock-cut water tank on the fort. While wandering around the fort, these ruins of the fort try to speak to us. As the tank excavated in these rocks tells us, that the existence of this fort must have been around from the time of the Satavahanas.
    That is, the history of Tandulwadi fort can be of around 1800-2000 years. But we cannot confirm this from any document or any other historical evidence. Tandulwadi Fort is mentioned in history in the 13th century. In the 13th century, King Bhimdev's kingdom moved to the west coast and Tandulwadi fort came under the control of King Bhimdev.
    Trek to Tandulwadi fort can be completed in a day from Mumbai.
    The path leading to the fort is through dense forest. Various types of plants and trees can be seen at Tandulwadi Fort

ความคิดเห็น • 1