Travel Vlog Episode 1 : ढेपेवाडा | Spruha Joshi | Marathi Poems

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ค. 2022
  • For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: teamspruhajoshi@gmail.com
    ढेपेवाडा Location : maps.app.goo.gl/aNdWYCAcjat2K...
    खादाडी Playlist : shorturl.ae/TqKYC
    गंमत गाणी Playlist : shorturl.ae/GNnXC
    _______________________________
    आजची ही पोस्ट मी मुद्दाम आम्ही नुकत्याच चित्रीकरण केलेल्या ढेपेवाडयाबद्दल लिहीतीये.
    शूट साठी आम्ही लोकेशन शोधत असताना ढेपेवाड्याचं नाव समोर आलं आणि नितीनजींनी क्षणाचाही विलंब न करता वाड्यात तुमचं स्वागत आहे असं अगदी प्रेमळ शब्दात आमंत्रण केलं.मुळात कलेच्या प्रेमापोटी जन्माला आलेल्या या वास्तूबद्दल मी तुम्हाला माझ्या चॅनल वर ट्रॅव्हल व्हॉग मध्ये सांगेनच मात्र आम्ही चित्रीकरणासाठी येणार म्हटल्यावर हा सगळा तामझाम किती असतो याची कल्पना असल्याने "तुम्ही आदल्यादिवशीच राहायला या" या वाक्यापासून सुरु झालेलं आदरातिथ्य दुसऱ्या दिवशी आम्हाला पॅक अप करायला उशीर झाला तेव्हा ते जरी तिथे नव्हते तरी त्यांनी आम्हाला आवर्जून "उशीर झाला आहे जेवूनच जा, मी व्यवस्था करायला सांगतो" इथपर्यंत अबाधित होतं... हॅट्स ऑफ टू यू नितीनजी आणि ऋचा ताई.
    अजून खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत मात्र हा वाडा त्यांच्याच नजरेतून आणि शब्दातून पाहण्यात, ऐकण्यात गम्मत आहे असं मला वाटतं आणि तुम्हालाही माझ्या नवीन ट्रॅव्हल सिरीज ची उत्सुकता असेल हो ना? मात्र आम्ही केलेल्या गमतीजमती चे काही फोटोज शेयर करतेय आणि तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा हा वाडा पाहायला इथली संस्कृती अनुभवायला नक्की जा
    #SpruhaJoshi #Poems #Marathi #Dhepewada
    _________________________________
    Credits
    ________________________________
    Produced By
    Spruha Joshi
    Nachiket Ashok Khasnis
    Location & hospitality Partner :
    Nitin Dhepe
    Rucha Dhepe
    Complete Dhepewada team
    Filming
    Angad Joshi
    Shubhankar Havele
    Rahul Kulkarni
    Editor :
    Soham kurulkar
    Yogesh Dixit
    Tanishq Mohite
    Audio: Ameya Ghatpande
    Hair & Makeup: Bhagyashree Patil
    Styling : Tanmay Jangam
    Costumes: Cotton Village
    Production stills: Rahul Kulkarni
    Partnerships and Brand Collaborations: Anurag Pathak
    Special Thanks : Pornima Khadke
    ___________________________
    About Spruha Joshi :
    ___________________________
    Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
    Instagram: / spruhavarad
    Facebook: / spruhavarad
    Twitter: / spruhavarad
    ____________________________
    DISCLAIMER: This is the official TH-cam Channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
    __________________________________

ความคิดเห็น • 304

  • @suhaschaubal937
    @suhaschaubal937 2 ปีที่แล้ว +16

    Redevelopment च्या नावाखाली एकीकडे सुंदर व जुने वाडे पाडले जात असताना असा प्रशस्त वाडा उभा करण खुपच स्तुत्य.

  • @ketakipatankar6641
    @ketakipatankar6641 2 ปีที่แล้ว +27

    अरे बापरे, आमची आज पर्यंत समजूत हीच होती की ढेपे वाडा हा जुना मूळ वाडा आता नव्याने preserve केला गेला आहे. परंतु हा वाडा काही शे वर्षांपूर्वी बांधलेला नसून, अगदी आत्ता म्हणजे २०१६ च्या सुमारास बांधून घेण्यात आला हे या व्हिडिओ मुळे समजले. अतिशय सुंदर कल्पकता. खूप खूप धन्यवाद.

    • @jayashriavachat7686
      @jayashriavachat7686 2 ปีที่แล้ว

      माझाही असा वाडा आहे , एवढा पॉश नाही पण छानच आहे तर मला तुमच्याशी गप्पा मारायला आवडतील ,,चालेल का???

  • @marathimarg3748
    @marathimarg3748 2 ปีที่แล้ว +6

    आपल्या मराठी संस्कृतीसाठी कोणीतरी झटतंय हे पाहून छान वाटलं.

  • @sunitabhide4217
    @sunitabhide4217 2 ปีที่แล้ว +6

    फार सुंदर व शांत ठिकाण. वाडा संस्क्रुती जपणारं ठिकाण. माझ्या नातीचं लग्नयाच वाड्यात झालं.

  • @manjushakulkarni3106
    @manjushakulkarni3106 2 ปีที่แล้ว +19

    खूप छान स्पृहा,पहिला एपिसोड एका सुंदर वाड्याच्या सानिध्यात . डिसेंबर २०१९ मध्ये माझ्या मुलीचे लग्न ढेपे वाड्यात झाले,एक अविस्मरणीय अनुभव .

  • @susmitakulkarni
    @susmitakulkarni 2 ปีที่แล้ว +11

    खुपच सुंदर आणि अविस्मरणीय... ! खरंच वाडा संस्कृतीची आताच्या मुलांना छान ओळख होणार आहे! काही शहरांमधे जुने वाडे तग धरून आहेत पण त्यांच असण इतकच त्यांच अस्तित्व आहे. ते वाडे सगळ्यांना खुले नाहीत. फक्त त्याच्याविषयी ऐकिव माहितीवर समाधान मानावे लागते. पण ढेपेवाडा अजुन कित्येक पिढ्या परून उरणार आहे..! आणि हे खुप छान आहे. आमच्या मुलांना आम्ही आमच्या आठवणीतील वाडा वर्णन करतो; पण त्यानंतरच्या पिढीच काय? म्हणून ढेपेवाडा एक छान आठवणीतून प्रत्यक्षात आलेला ठेवा आहे. अशी वास्तू प्रत्यक्षात आहे हे, स्पृहा आणि श्री.व सौ. ढेपे यांच्यामुळे आमच्यापर्यंत पोहोचले खुप खुप धन्यवाद..!
    ढेपेवाडा पहातांना आमच्या नाशिकच्या सरकारवाड्याची आठवण झाली..!
    आमच्या मामाच्या वाड्यात ...
    ओसरी,ओटी, माजघर, माजघराला लागून पडवी, शेजारीच गोठा, मागे स्वयंपाकघर (त्याला चुलीच घर म्हणत असू) मागच अंगण इतक मोठ की तिथे मांडव टाकून लग्न होत असत..! सगळे पाहुणे ऐसपैस घरातच राहू शकत होते..! फक्त जानोस घर म्हणून दुसर घर दिल जायच..! ( जानोस घर- नवरदेवाकडच्यांना दिले जाणारे घर)

  • @shubhadadeshpande1742
    @shubhadadeshpande1742 2 ปีที่แล้ว +6

    २०१९ नोव्हेंबर महिन्यात आम्ही देशपांडे कुटुंबातील ४० जण ढेपेवाडा इथे जाऊन सहस्रचंद्रदर्शन आणि एकसष्टी चा सोहळा केला, खूपच छान अनुभव, जेवणाची चव आणि व्यवस्था उत्तमच , पुन्हा एकदा आठवणींना उजाळा मिळाला, धन्यवाद

  • @user-wb2yq8fp9t
    @user-wb2yq8fp9t 2 ปีที่แล้ว +4

    ढेपे वाडा म्हणजे सेलेब्रिटी लोकांचा मंगल कार्यालय... जेंव्हा प्रणित आणि मिहीरा यांनी तिथ लग्न केले तेव्हा मी पहिल्यांदा पाहिला हा वाडा. त्यांचा नन्तर सिद्धार्थ चांदेकर आणि रोहित राऊत यांनी देखील तिथेच लग्न केले आहे. अतिशय सुंदर वाडा. ❤️🙌

  • @ojasKamthikar
    @ojasKamthikar 2 ปีที่แล้ว +13

    Mam ढेपे वाडा हे पुण्यातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे... असे शांततेचे ठिकाण आणि प्राचीन प्रकार आणि काही हिरवीगार झाडे असलेला भव्य परिसर!!!!!😊👍👍😊👍

  • @chandrakantbhapkar2002
    @chandrakantbhapkar2002 2 ปีที่แล้ว +7

    ढेपे वाडा... अतिशय सुंदर... अप्रतिम,... प्राचीन काळापासून चालत आलेली आपली खरी परंपरा व वास्तुशास्तानुसार एक उत्तम कलाकृती.

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 2 ปีที่แล้ว +5

    खुपच छान वास्तु आहे तुझ्या मुळे जुन्या पद्धतीच्या वाडे आपण फक्त सिन नेमा मधेच बघतो पण आज नॅचरल पाहायला मिळाल 👌👌🌷🌷

  • @gmk38
    @gmk38 2 ปีที่แล้ว +10

    ढेपे वाडा!!! अतिशय अभ्यासपूर्ण नियोजनातून जन्माला आलेली उत्कृष्ट वास्तुरचना ..👌सर्वांनी एकदा तरी आवर्जून visit करावी अशी वास्तू...आजकाल फ्लॅट संस्कृती च्या जमान्यात वाडा संस्कृती लोप पावत चालली आहे त्यामुळे असे वाडा वगैरे प्रकार त्यातल्या vibes अनुभवायला मिळणं कठीण आहे पण ह्या vlog च्या निमित्ताने तू सगळ्याना नयनरम्य मेजवानी दिलीस त्याबद्दल तुझे आणि अशी नावीन्य पूर्ण कल्पना प्रत्यक्षात साकार केल्याबद्दल ढेपे दाम्पत्याचे खुप खुप आभार...!!!Thank you Spruhaताई

  • @renukabhadbhade6577
    @renukabhadbhade6577 2 ปีที่แล้ว +2

    Spurha खूप मस्त! ढेपेवाड्याच्या माध्यमातून आपली भारतीय संस्क्रुती तरुणाईच्या समोर आणण्याचा तुझा प्रयत्न खूपच कौतुकास्पद आहे. English Cultre कडे ओढा असलेल्या आजच्या युवा पिढीला चांगले संस्कार आणि भारतीय संस्क्रुती शिकवणारी ही वास्तु नक्कीच प्रेरणादायी आहे. 'संस्क्रुति: संस्क्रुताश्रिता' इति एतद् वास्तो: विशेषता खलु!!

  • @shugar145
    @shugar145 2 ปีที่แล้ว +5

    खूपच सुंदर ग स्पृहा....वाडा तर छानच...पण तुझे बोलणे ही खूप भावते...हा वाडा या पूर्वी उर्मिला निंबाळकर च्या vlog मध्ये पहिला होता..परंतु आता पूर्ण दर्शन झाले🙂

  • @satputegeetanjali...2410
    @satputegeetanjali...2410 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम..... आपली संस्कृती जपताय .... किती सुंदर..... हा ढेपे वाडा माझ्या शेजारील गावात आहे.. पण अजून भेट द्यायला आम्हाला योग आला नाही .... पण भेटू लवकरच ..... काकांना आणि काकूंना सहृदय नमस्कार 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @omkarkeskar9275
    @omkarkeskar9275 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान वाटलं हे पाहून!!! आधी केवळ फोटो पाहिले होते, पण इतकी सखोल माहिती केवळ स्पृहाताई तुझ्यामुळे मिळाली... खूप खूप धन्यवाद!!

  • @suhasinivichare206
    @suhasinivichare206 2 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर. अशी अनमोल ठिकाणं अजून दाखवाशिलच. हा वाडा अजून बघता आला असता तर आवडलं असतं, जसं मुदपाकखाना, साठवणीची खोली जिला कोठार असे म्हणतात, माजघर, मागचे अंगण v परिसर. तरी हे ही नसे थोडके. धन्यवाद v शुभेच्छा

  • @sharmilpurandare7788
    @sharmilpurandare7788 2 ปีที่แล้ว +4

    ढेपे वाडा तर आवडलाच पण उत्स्फूर्त अशी स्पृहा मनाला भावली 😘

  • @juidabhade7983
    @juidabhade7983 2 ปีที่แล้ว +4

    Thanks Spruha for sharing such a lovely Vaastu 😊🙏

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान! खुप धन्यवाद स्पृहा आम्हाला ही छान माहिती मिळाली. अप्रतिम आहे ही वास्तु 🙏👌👍

  • @kiran_mali_93
    @kiran_mali_93 2 ปีที่แล้ว +3

    ताई फक्त तू एकटीनेच टाळ्या वाजवून नाही तर आम्हीही दाद दिली त्यांच्या या कार्याला,तुझ्यासोबत आम्हीही या ढेपे वड्या ची सफर केली,

  • @yogeshlokare6414
    @yogeshlokare6414 2 ปีที่แล้ว +9

    Fantastic Spruha I want to see like that you travel more and meet new places with new people !! Superb

  • @prabhakarjoshi2318
    @prabhakarjoshi2318 2 ปีที่แล้ว

    केवळ अप्रतिम, अत्यंत सुंदर, भव्य वाडा संस्कृती, जुने रीती रिवाज, पारंपरिक गोष्टी, उत्कृष्ट निवेदन, देखणी वास्तू, पाहून आनंद झाला. चित्रीकरण आणि प्रभावी निवेदन, त्या अनुषंगाने झालेले अमीट परिणामकारक संवाद, हा वाडा पाहण्याची आतुरता वाढवतात.
    धन्यवाद.

  • @sachinjoshi1149
    @sachinjoshi1149 ปีที่แล้ว

    मस्त.. अप्रतिम ब्लॉग व माहिती 👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @mazakhata1733
    @mazakhata1733 2 ปีที่แล้ว +1

    स्पृहा, u r doing great job by exploring these things n letting us know about it..

  • @vaishalihalbe172
    @vaishalihalbe172 2 ปีที่แล้ว +1

    Wah....awesome.....an historic feel 🤩🤩👌

  • @venkateshkumar9168
    @venkateshkumar9168 ปีที่แล้ว +1

    A newly constructed Archaic wada! Unbelievable. Thanks for sharing.
    Very well captured by your team, Spruha

  • @advaitsathe8948
    @advaitsathe8948 2 ปีที่แล้ว +4

    Thanks for sharing such a wonderful documentary. Hats off to the owners. It is indeed important to preserve it. Added to my bucket list

  • @ujwalakulkarni7558
    @ujwalakulkarni7558 2 ปีที่แล้ว +1

    Thank you so much Spruha junya vadyatalya athavanina,balpanichya athavanina ujala milala.Dhepevada apratim ahe ani hi vada sanskruti japanyachi kalpana khupach chan ahe.ani ha vada khupach apratim bandhala ahe.sagalyanach khup khup shubhechya.thank you punha ekada.

  • @sujathar3826
    @sujathar3826 2 ปีที่แล้ว +9

    ढेपेवाडा केवळ सुंदर ! पुण्याच्या वैभवशाली इतिहासाचा अविभाज्य भाग म्हणजे वाडा संस्कृती.. त्याची एक झलक ह्या एपिसोड मुळे आम्हाला मिळाली त्याबद्दल धन्यवाद. आणि ढेपे दाम्पत्याने केलेल्या ह्या स्तुत्य प्रकल्पबद्दल त्यांचे शतशः आभार 🙏🏼...

    • @ulhasgodkhindi9797
      @ulhasgodkhindi9797 2 ปีที่แล้ว +3

      देवघर पहायला आवडेल

  • @Shruti387
    @Shruti387 2 ปีที่แล้ว

    Wow amazing historical place..nice vlog spruha👌👍

  • @Sandhyababhalikar1169
    @Sandhyababhalikar1169 2 ปีที่แล้ว +3

    खरच हा अनुभव खूप छान आहे, तुझ्यामुळे हे सगळे आम्हालाही अनुभवायला मिळाल.

  • @balkrishnakulkarni1257
    @balkrishnakulkarni1257 2 ปีที่แล้ว +2

    Beautiful presentation as also d narration. We must try to preserve our old monuments as these r representatives of our rich traditions and culture. Thanks

  • @ajinkyasonpethkar3872
    @ajinkyasonpethkar3872 ปีที่แล้ว

    Barech divas dhepe wada baddal aikal hot...Wahhh khupchh bhariii vatal,pratek goshticha khup vichar krun wada bandhla ahe nakkich aamhi sahkutumb janar bghayla...
    Thank you spruha tai..
    Ashech navnavin videos takat raha

  • @AmitJoshi1
    @AmitJoshi1 2 ปีที่แล้ว

    सुंदर व्हिडिओ चित्रीकरण. विसर पडत चाललेल्या संस्कृतीची ओळख करून देण्याचा स्तुत्य प्रयत्न. धन्यवाद स्पृहा आणि टीम

  • @ameypatankar3849
    @ameypatankar3849 2 ปีที่แล้ว +2

    Superb ! I loved this episode. Best Wishes to you Spruha. Eager to watch next videos

  • @subodhgokhale5026
    @subodhgokhale5026 2 ปีที่แล้ว

    केवळ अप्रतिम वास्तुरचना, हा व्हिडीओ बघतानाही नवीन ऊर्जा मिळाली.

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 2 ปีที่แล้ว +2

    ऐतिहासिक वारसा आणि संस्कृतीचे जतन ह्या वास्तत केले आहे...ढेपवाडा फारच सुरेख आहे...अनेक परिचित वाड्यात जाऊन आले आहेत..तुझ्या ह्या व्हिडिओ द्वारे वाडा जवळुन पाहता आला..नक्की जाऊ पहायला..धन्यवाद ❤️👏👍

  • @choudharimohan6697
    @choudharimohan6697 2 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर, वाडा तर आवडलाच, तुमची महेफील खूप छान रंगली होती

  • @ojasKamthikar
    @ojasKamthikar 2 ปีที่แล้ว +4

    Mam ज्यांना या ठिकाणाबद्दल फारशी माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तम व्लॉग निर्मिती!!!👍😊
    Thank you For bringing another Great Video.....

  • @satishjoshi8119
    @satishjoshi8119 2 ปีที่แล้ว +4

    फारच अप्रतिम, मनाला खूप भावला. अशी वास्तु स्वतःची असणे ही मागील जन्माची पुण्याई आहे. 🙏

  • @ashwinikulkarni2497
    @ashwinikulkarni2497 2 ปีที่แล้ว

    किती छान आहे हे सगळच
    स्पृहा तुझ्यामुळे हे सगळं बघायला मिळालं

  • @Sushil020874
    @Sushil020874 2 ปีที่แล้ว

    Atishay Sundar Waada..... Khup sundar....Dhanyawad Spruha😀🙏

  • @manaspoint6636
    @manaspoint6636 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर, परंपरेची जपणूक करणारी वास्तू, आणि त्याचे तितकेच देखणे चित्रीकरण...
    सुंदर vlog 👏👏👏

  • @pandhrinathpatil2083
    @pandhrinathpatil2083 2 ปีที่แล้ว

    Aajhi Sabyta tya Mahiti denarya Taai madhe othanbun diste.Thankyou di.om Shanti.🙏✌️🇨🇮👁️👁️👣👣

  • @dilipshinde1696
    @dilipshinde1696 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद स्पृहा मॅडम..केवळ तुमच्या मुळे... अशा जुन्या पद्धतीच्या वाडा संस्कृतीचा परिचय झाला.. एकदा अनुभव नक्कीच घेऊ..
    धन्यवाद स्पृहा मॅडम पुन्हा एकदा..
    असेच छान वेगळे विषय, घेऊन video अपलोड करा.. धन्यवाद..

  • @aniketsureshshirodkar6149
    @aniketsureshshirodkar6149 2 ปีที่แล้ว

    Beautiful video ! What a lovely place. I surely want to visit it in the near future !

  • @suvarnadivekar1178
    @suvarnadivekar1178 2 ปีที่แล้ว

    ढेपे वाडा एकदा बघायची खूप मनापासून इच्छा होती. प्रत्यक्षात कधी योग जुळून येईल माहिती नाही. तुझ्या मुळे घरबसल्या वाडा संपूर्ण बघायला मिळाला. फार च छान वास्तू आहे. निर्माण आणि जतन करण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत.त्यांना आणि तुला आमच्या बरोबर शेअर करण्यासाठी मनापासून धन्यवाद.

  • @shraddhalad8472
    @shraddhalad8472 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम कल्पना अस वाटत तेथेच येवून राहणे 🥰

  • @jayashreedate281
    @jayashreedate281 2 ปีที่แล้ว

    Beautiful presentation as also d narrations.
    Purvi aamhi vadyat rahayacho tyala asech magache angan., pudhache angan, majghar ,motha zopala hote.
    He sarva khel aamhi khelalo aahe.
    Dhepe wada aprtim aahe.bhet dyayla avadel.
    Thank you Spruha.Tu boltes hi goooood.khup avadale.

  • @madan2104
    @madan2104 2 ปีที่แล้ว +3

    फारच मस्त...👌

  • @girishshetye3363
    @girishshetye3363 ปีที่แล้ว

    Khup chaan ❤️

  • @Megha_Jamadade
    @Megha_Jamadade 2 ปีที่แล้ว +1

    संपूर्ण वाडाचं आवडला😍😍😍👌👌

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg 2 ปีที่แล้ว

    Mahiti navta bara zala video kela.thank you so much

  • @rajarambhagwat9485
    @rajarambhagwat9485 2 ปีที่แล้ว

    खुपच छान वास्तू, अप्रतिम

  • @archanadhumma7591
    @archanadhumma7591 2 ปีที่แล้ว +2

    Spruha, no words to thank you for dis beauty n information along with it♥️ congratulations to Mr.Dhepe to complete his dream project. Thy r the Lucky couple to own dis

  • @seemakulkarni5258
    @seemakulkarni5258 2 ปีที่แล้ว

    खुप खुप आभार स्पृहा.सुंदर. माहीती

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 2 ปีที่แล้ว

    आपल्या संस्कृतीची खूप सुंदर रित्या जपणूक अन समाजाला पण ह्या संस्कृती मध्ये सहभाग घ्यायला प्रवृत्त करणे अन त्याचा अनुभव घ्यायला संधी देणे हे खूप च स्तुत्य आहे , स्पृहाजी तुमच्या गोड आवाजात समालोचन अन सुंदर सादरीकरण , वाह अप्रतिम

  • @priyankag981
    @priyankag981 ปีที่แล้ว +1

    Atishay sunder 👏👌👌

  • @vaijayantiparanjape1496
    @vaijayantiparanjape1496 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan vatale Dhepewada baghun. Apale june vaibhav anubhavato ahot ase vatat hote sagale baghatana.

  • @sujatapatil2898
    @sujatapatil2898 ปีที่แล้ว +1

    Ha dhepewada khup mast ahe.ha wada baghun mala pan uncha maza zoka serialchi athavan zhali.hi purn vastu baghun apalya historical paramparecha abhiman vatato.Thank u so much spruha.amhala ha wadyachi saffar ghadun analyabaddal.

  • @manasijangam1660
    @manasijangam1660 2 ปีที่แล้ว +1

    Khupach Chan👌

  • @maharashtrianineuropateswadesh
    @maharashtrianineuropateswadesh 2 ปีที่แล้ว

    शब्द च नाहीत याच्या वर्णनाला🙏🏻🙏🏻🙏🏻
    अद्भुत🙏🏻

  • @surekhagadre5484
    @surekhagadre5484 ปีที่แล้ว

    स्पृहा , अगदी स्पृहणीय आहे वाडा.

  • @nivisa7400
    @nivisa7400 2 ปีที่แล้ว

    Khupach sunder spruha tai aagadi peshwe kalat gelyacha feel ala . Dhepewadayach nav aikla hota pan itkya detail ne aja pahila khup sunder tai . Ani khup thanks Karan tuzya mule ha wada amhala pahayla milala Ani tithe janyachi odh hi ata mala lagli ahe ❣️🙏

  • @sanikasalunkhe5637
    @sanikasalunkhe5637 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan😍 apratim....Aplya junya sanskruti baddal kalale..Junya vadya chya rachana kiti vichar karun aani soisker ritine kelya aahet...Kharach khup nav navin goshti janun ghyayla milalya.. very nice 👌👍

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 2 ปีที่แล้ว

    Nakki jau jawasa vattache atta lagech thx spruha ha chanel chalu kelas share kelas good luk

  • @madhuragurav6685
    @madhuragurav6685 2 ปีที่แล้ว

    ढेपे वाडा बघण्याची खूप उत्सुकता होती, ती पूर्ण झाली. धन्यवाद 🙏

  • @Sumedhian211
    @Sumedhian211 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan Taiiii❣️

  • @ravijadhav2911
    @ravijadhav2911 2 ปีที่แล้ว

    Khupach Chhan....lavkar ch bhet deu

  • @siddheshpatil4701
    @siddheshpatil4701 2 ปีที่แล้ว

    ढेपेवाडा.. अतिशय सुंदर संस्कृती आहे आणि आपण ती जपलीत याचा अत्यानंद आहे. आमचे घर ही असेच असावे असे वाटत होते, पण आता हा व्हिडिओ पाहिल्यावर खात्रीने असेच होईल असा कुठेतरी निश्चय केला आहे. बाकी स्पृहा ताईला खूप सारे प्रेम.. हा vlog तयार केल्याबद्दल ❤️

  • @saritanadgeer9811
    @saritanadgeer9811 2 ปีที่แล้ว +1

    अवर्णनीय आहे 👌👌

  • @namratajog4561
    @namratajog4561 2 ปีที่แล้ว

    Vada Khup chan aahe amhi laukarach ya vadyat yeu ani anand gheu

  • @youyogee
    @youyogee 2 ปีที่แล้ว +1

    मला एकदम आजीच्या घराची आठवण झाली..
    वाह अतिशय सुदंर ..👌🏼

  • @saurabhparmar97
    @saurabhparmar97 2 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर .... तिथं जाण एक अविस्मरणीय क्षण ठरेल .... सर्व काही डोळ्यांना चमकावणार आणि मनाला भावणार होत ....
    .....Dhepewaada with Spruha....

  • @suvarnamore3266
    @suvarnamore3266 2 ปีที่แล้ว +2

    Khupach chan aahe Wada

  • @archanapisal9564
    @archanapisal9564 2 ปีที่แล้ว

    Pune ani tethil waade… Sundar👌🏻

  • @Shabdasarita
    @Shabdasarita 2 ปีที่แล้ว +2

    माझ्या मुलाचे लग्न 22नोव्हेंबर 2020 ला ढेपे वाड्यात झाले.अप्रतिम जागा.अतिशय सकारात्मक . मालकांना धन्यवाद

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 2 ปีที่แล้ว

      Kuthe contact karycha booking sathi

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 2 ปีที่แล้ว +2

    Spruha, khup chan jaga nivadlis, chan vlog. Lahanpan athavla. Nitin ji ani Rucha Tai khup chan mahiti det ahet.Tyanni khup parishram ghetale ahet aaplya sanskriti madhala ek bhag japanya karta, tya baddal tyanche aabhar .🙏👍🏻

  • @madhukartikhe6170
    @madhukartikhe6170 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर.आह्मी ढेपे वाड्यात येऊन पाहुणचार घेतला आहे.

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 2 ปีที่แล้ว +1

    Great. Spruha.

  • @smitabhagwat7666
    @smitabhagwat7666 ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @mayurigurav3487
    @mayurigurav3487 5 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर

  • @ashasawant948
    @ashasawant948 2 ปีที่แล้ว

    फारच छान वाटलं.

  • @Yugadhara
    @Yugadhara 2 ปีที่แล้ว +3

    Khup sundar.......
    My sirname....be proud 😍

  • @SagarPatil-ip5hm
    @SagarPatil-ip5hm 2 ปีที่แล้ว

    Superb awesome vlog

  • @pallavidhakappa5498
    @pallavidhakappa5498 2 ปีที่แล้ว

    Super wada thankyou Spruha for touring us to this deypevada....now looking for a opportunity to visit this place personally 🙏🙏

  • @tejasparanjape5854
    @tejasparanjape5854 2 ปีที่แล้ว +1

    Lai bhaari yaar..... 😍😘❤️

  • @vandanabhate6619
    @vandanabhate6619 ปีที่แล้ว

    🌷🤝🌷 वाडा संस्कृती पुन्हा अनुभवता येईल.
    खूप सुंदर.....🤩

  • @nehapatankar8453
    @nehapatankar8453 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम😍❤️❤️❤️

  • @rbhakti
    @rbhakti ปีที่แล้ว

    Loved the concept n presentation both 🤩

  • @JayeshandShreya
    @JayeshandShreya 2 ปีที่แล้ว

    Khupach mast watla Dhepe wada 👌👌

  • @prashantarote2001
    @prashantarote2001 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर

  • @snehalambre9860
    @snehalambre9860 2 ปีที่แล้ว

    स्पृहा,मी आज पहिल्यांदाच बघतेय हा भाग.खूप आवडतंय कारण माझं माहेरपण खेडातलंच.मधल्या चौकातले जे खांब आहेत ,ते ज्या दगडावर उभे आहेत ,त्यांचा आकारही तोच पारंपारिक आहे .त्याचं एक नाव आहे .मला आता आठवत नाहीये .

  • @suniljavak4409
    @suniljavak4409 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👍👍👍

  • @nitinvaidya3013
    @nitinvaidya3013 2 ปีที่แล้ว +1

    So Wonderful

  • @kishorogale826
    @kishorogale826 2 ปีที่แล้ว

    स्पृहाजी...तुम्ही आम्हां सर्वांसाठी दिवसागणीक जे वेगवेगळे live उपक्रम राबवत असतात..जे जे दुर्मिळ होत चाललयं त्याला तुमच्या angle ने पारंपारिक touch देऊन मराठमोळ्या शैलीत एक प्रकारची नव संजिवनी देऊन मायबाप रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहात, खरचं हे खुप मोठं कार्य आहे. ढेपेवाडा मनात घर करतोय. आता जो पर्यंत प्रत्यक्ष भेट देत नाही तो पर्यंत हुरहूर कायम राहिल. All the best for next project.

  • @dhanashreesagvekar7506
    @dhanashreesagvekar7506 3 หลายเดือนก่อน

    khup chan watal bghun n aikun same tumchyasarkh dolyat pani aal konitri marathi manus evdh chan vastu nirman kartu shakat aikun tr khup chan vatal .aapl kaytri rahily as vatt ha wada bghun.

  • @satishbhalerao2821
    @satishbhalerao2821 2 ปีที่แล้ว

    Khup sundar Wada...

  • @kalpanachavan2786
    @kalpanachavan2786 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम