आजीचे घड्याळ | गंमत गाणी Ft. Radha Khasnis | Spruha Joshi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 เม.ย. 2022
  • For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: teamspruhajoshi@gmail.com
    खादाडी Playlist: shorturl.ae/TqKYC
    गंमत गाणी Playlist: shorturl.ae/GNnXC
    ______________________________________
    आजीचे घड्याळ
    ****
    आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
    देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
    त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
    किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते
    "अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,"
    जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
    साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
    "बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की !"
    ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
    जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्त कधी लागता !
    "आली ओटिवरी उन्हे बघ!" म्हणे आजी, "दहा वाजले !
    जा जा लौकर !" कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.
    खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
    हो केव्हा तिनिसांज ते न समजे ! आजी परी आंतुनी
    बोले, "खेळ पुरे, घरांत परता ! झाली दिवेलागण,
    ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !"
    आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
    जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !
    "अर्धी रात्र कि रे" म्हणे उलटली, "गोष्टी पुरे ! जा पडा !'
    लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा
    सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
    थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी
    मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
    गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे !
    - केशवकुमार
    _______________________________________
    जोरदार पाऊस पाडतं कोण, पाडतं कोण?
    काळे काळे ढग आणखी कोण
    काळे काळे ढग येतात कुठून, येतात कुठून?
    सूर्यामुळे पाणी तापते त्यामधून
    पाण्याची मग वाफ होते, वाफ होते
    वाफेचे मग ढग होतात, उंच उंच वर जातात
    वरती त्यांना थंडी वाजते, थंडी वाजते
    चादरीसाठी भांडण होते
    बिजलीताई त्यांना रागावतात, त्यांना रागावतात
    ढग आपले रडू लागतात, पाऊस पडतात जोरजोरात
    मुले नाचतात आनंदात
    तुम्हाला कविता कशी वाटली ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
    #SpruhaJoshi #Poems #Marathi
    _________________________________
    Credits
    ________________________________
    Cinematography
    Angad Joshi
    Shubhankar Havele
    Editor
    Soham Kurulkar
    Tanishq Mohite
    Yogesh Dixit
    Audio
    Mandar Geetapathi
    Hair n Makeup
    Bhagyashree Patil
    Location Partner
    Bamboo and Bricks Resort
    Costumes
    Cotton Village
    Production Stills
    Rahul Kulkarni
    Styling
    Tanmay Jangam
    Special Thanks
    Pornima Khadke
    Rahul Kondekar
    Brand Collaborations & Partnerships
    Anurag Pathak
    Produced by
    Spruha Joshi
    Nachiket Ashok Khasnis
    ___________________________
    About Spruha Joshi :
    ___________________________
    Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
    Facebook : / spruhavarad
    Twitter : / spruhavarad
    Instagram : / spruhavarad
    ______________________________
    DISCLAIMER: This is the official TH-cam Channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
    __________________________________

ความคิดเห็น • 344

  • @shreekantpathak4621
    @shreekantpathak4621 2 ปีที่แล้ว +11

    बालमोहन विद्यामंदिर ची स्पृहा जोशी हे एक विशेष रसायन आहे. सर्व क्षेत्रात तिची प्रगती वाखाणण्या सारखी आहे. मला अभिमान आहे की माझ्या बालमोहन शाळेतून बाहेर पडलेली स्पृहा सारखी विद्यार्थिनी आज यशाच्या उच्च शिखरावर पोचली आहे. तिचे खूप खूप अभिनंदन.

  • @nikhilpalande
    @nikhilpalande 2 ปีที่แล้ว +44

    किती छान वाटतंय की कोणीतरी मराठी माध्यमाच्या शाळेतून आपला सांस्कृतिक वारसा पुढे घेऊन जात आहे आणि आणि तिला एवढ्या लहान वयात दिग्गज गायक-गायिका त्यांची गाणी आणि कविता ऐकण्याची वाचण्याची आवड आहे... feeling hopeful

    • @nachiketkhasnis
      @nachiketkhasnis 2 ปีที่แล้ว +13

      धन्यवाद निखिल जी, गाण्याचा वारसा राधाला घरून मिळत असला तरी कविता, साहित्य आणि इतर गोष्टींमध्ये राधाच्या शाळेचा - रानडे बालक मंदिर आणि तिच्या वर्गशिक्षिका शिल्पा पराडकर ताई यांचा खूप मोठा वाटा आहे

  • @susmitakulkarni
    @susmitakulkarni 2 ปีที่แล้ว +40

    कवी बी यांची 'गाई पाण्यावर काय म्हणून आल्या..' ऐकायला,बघायला आवडेल..!

    • @Mr.Roshan18555
      @Mr.Roshan18555 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद स्पृहा, तू आमची फर्माईश पुरणी केली,, आणि तेही अपेक्षेच्या पलीकडे, तू ही कविता गायली । फक्त खंत एवढीच की तू ती पूर्ण साधार नाही केली. ( खरंच खूप सुंदर गायली तू कविता) The coolest presentation ever😊

  • @nishigandhabodake1016
    @nishigandhabodake1016 2 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर उपक्रम..राधा एक उत्तम उदाहरण आहे मराठी माध्यमाकडे परत वळण्यासाठी..

  • @dattatraykelkar3373
    @dattatraykelkar3373 ปีที่แล้ว

    स्पृहा ताई, हो मुद्दामच मी ताई अस संबोधिले आहे कारण तुम्ही राधा च्या बरोबर बसून कविता ऐकविल्यात.
    माझ्या बालपणी म्हणजे ६८/६९ वर्षा पूर्वी ही कविता पाठ्यपुस्तकात होती.
    आय utube मुळे कितीतरी जुन्या कविता ऐकायला मिळतात.
    मात्र त्यांना आधुनिक पद्धतीने सादर केले गेले की रस भंग होतो.
    तुमचा उपक्रम स्तुत्य.
    अशाच सुंदर सुंदर खूप कविता ऐकायला आवडतील.
    अभिनंदन आणि धन्यवाद.

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 7 หลายเดือนก่อน

    माझी आई लहानपणी ही आजीचे घड्याळ कविता नेहमी ऐकवत असे. हा कार्यक्रम पहाताना लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात. राधा किती गोड गोड बोलते शब्दोच्चार स्पष्ट आहेत. मराठी भाषा आणि संस्कृती पुढे चालू राहील ही आशा वाटते खुप छान कविता आणि गाणी मजा आली.😊

  • @yashaswineegore2560
    @yashaswineegore2560 2 ปีที่แล้ว +8

    राधाची मराठी भाषेशी मैत्री व अस्खलित उच्चार अतिशय कौतुकास्पद! ठसकेबाज पुणेरी tone आणि अतिशय सुंदर आवाजाची राधा खरंच कित्ती गोग्गोड्ड्ड आहे!!! 🙂🥰
    आणि स्पृहा तर आहेच स्पृहणीय!
    "देवा तुझे रूप... सुंदर सुंदर..." राधा हातवारे/हावभाव करून नक्की छान म्हणेल असं वाटतं.
    नचिकेत आणि मानसीचं अभिनंदन! 😊👍

  • @swsassful
    @swsassful 2 ปีที่แล้ว

    उपक्रम खूपच सुंदर. मराठी बाल कवितांची ओळख करून देण्याबरोबरच मराठी भाषेची गोडी पण लागेल मुलांना. धन्यवाद

  • @shilpamanohar5860
    @shilpamanohar5860 2 ปีที่แล้ว +1

    आज पौर्णिमा जमले सारे आकाशाच्या वर्गात....ही कविता किंवा गाणे पूर्ण ..असेल तर एकायला आवडेल...

  • @gauravlute1481
    @gauravlute1481 2 ปีที่แล้ว +7

    किती गोड बोलते राधा😍😍तिचं खास बातचीत गुलमोहरच्या रंगीबेरंगी फुलांनी स्पृहा मॅम नी खूलवून आणली आहेत. दोन्ही कविता खूप मस्त👌👌👍🏻👍🏻आणि सांगण्याची जादू तर अप्रतिम 👍🏻😍

  • @kavitaombale4010
    @kavitaombale4010 2 ปีที่แล้ว +7

    आजीचे घड्याळ ही कविता मला मी शाळेत पाचवी का सहावीला होते तेव्हा होती ... 😊✨
    ऐकून शाळेतील ते सोनेरी क्षण पुन्हा आठवले 🌈✨🦋
    Thank you SPRUHA TAI ☺

    • @deepaupadhye7409
      @deepaupadhye7409 2 ปีที่แล้ว +1

      स्पृहा जी खुप छान कविता क्षणात बालपणी जाऊन आले. आजीचे घड्याळ ही कविता खुप वर्षानी ऐकली

  • @surekhadharmadhikari2352
    @surekhadharmadhikari2352 3 หลายเดือนก่อน

    स्पृहा ... आठवणीतील एक सुंदर कविता ऐकवलीस... खरच खूप खूप धन्यवाद...राधाचं गो❤❤ड जलचक्रही खूप आवडलं 🎉🎉🎉🎉

  • @ashasawant948
    @ashasawant948 2 ปีที่แล้ว +3

    वय विसरायला लावणाऱ्या छोट्यांसाठी आवडणाऱ्या मस्त कविता.खूप छान. खूप प्रेम.

  • @bhaktiajit9204
    @bhaktiajit9204 2 ปีที่แล้ว +3

    स्पृहा ताई तू आणि तुझे उपक्रम भन्नाट असतात. ❤ ५ वर्षाचा राधाला कविता आणि मराठी संस्क्रृतीचा लळा आहे हे पाहून , ऐकून छान वाटलं❤ राधा तुला खूपखूप प्रेम आणि शुभेच्छा

  • @bhauchavhan7022
    @bhauchavhan7022 2 ปีที่แล้ว +3

    राधाचं ,"हो!"किती छान. मराठी माध्यमातून आपल्या मुलीला शिकविणाऱ्या आईवडिलांचे कौतुक. स्पृहा जोशी यांचे काव्य प्रेम स्पृहणीय.

    • @nachiketkhasnis
      @nachiketkhasnis 2 ปีที่แล้ว +4

      नमस्कार भाऊ चव्हाण... सध्या पुन्हा एकदा आपल्या मातृभाषेकडे लोकांचा कल वाढतोय... आणि माझं आणि मानसी च असं मत आहे मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेली मुलं समंजस होतात... नुकताच मोठा गट संपवून राधाला नवीन मराठी शाळेत आम्ही प्रवेश घेतला आहे :)

  • @shreeramkulkarni2196
    @shreeramkulkarni2196 2 ปีที่แล้ว +2

    लहानपण देगा देवा ही कवीता ऐैकायची आहे.

  • @archanamuley5399
    @archanamuley5399 2 ปีที่แล้ว +6

    भारी आहे राधा आणि कवितापण . इतक्या गोड गोड मुलांकडून ऐकतांना फार मस्त वाटेल.

  • @meenarisbud3170
    @meenarisbud3170 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर उपक्रम . लहान मुलांशी मूल होऊन संवाद साधणं आणि त्यांना आपल्याशी जोडून घेऊन पुढे जाणं हे खूपच मस्त आहे .
    खूप धन्यवाद आणि खूप अभिनंदन !!

    • @Libra6
      @Libra6 2 ปีที่แล้ว

      He spruhalach jamate, tichya trollersna sanga.

  • @rohanshintre4976
    @rohanshintre4976 2 ปีที่แล้ว +2

    दोन्ही कविता फारच छान. Specially आजी चे घड्याळ ही कविता.. ही कविता आजही कधी कधी रेडिओ वर लागते. ही कविता ऐकताना आजूबाजूला गूढ रम्य वातावरण तयार होते. आणि त्यातूनच ही कविता आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. राधा ने म्हणलेली कविताही सुरेख..

  • @vibhamath2113
    @vibhamath2113 ปีที่แล้ว +1

    स्पृहा तू खूप मोठे काम करत आहेस. या उपक्रमासाठी तुझे खूप अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @pallavikulkarni8560
    @pallavikulkarni8560 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर गं 😍😍😍😍

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 ปีที่แล้ว

    नमस्कार.स्पृहाताई.तुम्हाला गुढी पाडवा आणि नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. वसंत ऋतुबरोबर आंब्याचे आगमन झाले झाले आहे.यानिमित्त कवितेचे एक कडवे पाठवत आहे. पूर्ण कविता ऐकायला आवडेल.धन्यवाद.

  • @vrushalikale7512
    @vrushalikale7512 2 ปีที่แล้ว

    किती गोड!

  • @manjushapachawadkar5722
    @manjushapachawadkar5722 2 ปีที่แล้ว

    Mast kavita spruha

  • @medhajawadekar451
    @medhajawadekar451 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान 😊 राधाला मराठी कविता कळतात, आवडतात हे पाहून खूप बरं वाटलं! आजकालच्या rhymes आणि poems च्या जमान्यात कविता हरवून चाललीय की काय असं वाटायला लागलं होतं!😊
    पडू आजारी मौज हीच वाटे भारी.. ही कविता पुढच्या वेळी घेऊ शकता.. अजून काही पर्याय -
    गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या,
    गरीब बिचारा माधुकरी,
    बघू आई कुठे माझा नवीन भाऊ, अंधारात कोठे येऊ कोठे मी पाहू...
    खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या..

    • @nachiketkhasnis
      @nachiketkhasnis 2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद....! खर आहे तुमचं पण पुन्हा एकदा बऱ्याच पालकांचा कल मराठी माध्यमात घालण्याचा आहे माझ्या ५ ते ६ मित्रांची मुलं मराठी माध्यमात जातात :)

  • @omkarmahajan3693
    @omkarmahajan3693 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम कविता स्पृहा ताई 👌

  • @ankitadeosthali6650
    @ankitadeosthali6650 2 ปีที่แล้ว +2

    Kiti god... Khup varshani aiklya donhi kavita...

  • @priyankahowal
    @priyankahowal 2 ปีที่แล้ว +4

    मला पण होती ही कवीता, i think seventh standard मध्ये आणि thanks for the nostalgic trip spruha tai! 💛 :)

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc ปีที่แล้ว

    खुपच छान स्पूर्हा राधा शाब्बास .खुप आनंद मिळाला.

  • @saiprasadsawant9037
    @saiprasadsawant9037 2 ปีที่แล้ว

    किती गोड दिसते, गोड बोलत आहे बाळ.. मला खुप आवडली हो.. मला तर वाटले घरी घेऊन यावी ही ला.. हो तर किती सुरेख बोलते आहे.. माझी पण बहिण आहे स्वामिनी ती अशीच बोलते मी तिला सारे शिकविले आहे जुनी गाणी, गोष्टी, भोंडला गाणी.. हे बाळ आणि माझी बहिण स्वामिनी लाडक्या बाहुली माझ्या
    🙏☺️😘☺️🙏

  • @ruchirabhosle8224
    @ruchirabhosle8224 2 ปีที่แล้ว

    खूप छान
    धन्यवाद ,

  • @prachiharmalkar9479
    @prachiharmalkar9479 2 ปีที่แล้ว

    " आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक देयी ठेऊनी ती कुठे नाही कुणा ठाऊक" बालपणीच्या सुदंर गत गोष्टींना पुन्हा ऐकायला मिळाल्याबद्दल आपणास धन्यवाद. प्रल्हाद केशव अत्रे यांची अविस्मणीय अशी चौथितली कविता कानास फार गोड वाटली आणि गत बालपणाचा उजाळा पुन्हा एकदा जिवंत झाला.धन्यवाद स्पुहा.

  • @madhurapatwardhan1564
    @madhurapatwardhan1564 ปีที่แล้ว

    फारच सुंदर 🙏

  • @sapnakhokale7117
    @sapnakhokale7117 ปีที่แล้ว

    Khub sundar👌

  • @promodini09
    @promodini09 2 ปีที่แล้ว

    khupch sunder

  • @sandhyakulkarni3441
    @sandhyakulkarni3441 2 ปีที่แล้ว

    किती गोड💐👌👍

  • @renukabhadbhade6577
    @renukabhadbhade6577 ปีที่แล้ว +1

    खूप गोड राधा आणि स्प्रुहा! मला ही माझ्या आजीची खूप आठवण आली....😘

  • @vilas777bhoir
    @vilas777bhoir 2 ปีที่แล้ว +3

    Kitti god

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 ปีที่แล้ว +2

    Chan kavita

  • @nandkumarnigade1233
    @nandkumarnigade1233 2 ปีที่แล้ว +1

    छान आणि स्पस्ट उच्चार 🌷👍

  • @Sandhyababhalikar1169
    @Sandhyababhalikar1169 2 ปีที่แล้ว

    खूपच छान.

  • @vilassamel2653
    @vilassamel2653 2 ปีที่แล้ว

    किती सुंदर कविता आहे.

  • @sunitaadhav5915
    @sunitaadhav5915 2 ปีที่แล้ว +2

    Khoopp sundar Spruha tai😇🤗💖

  • @shilpadeshpande8755
    @shilpadeshpande8755 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान. मराठी माध्यमातून मुले शिक्षण घेत आहेत ह्याचा आनंद आहे. दोघींच्या कविता पूर्वीच्या काळात घेऊन गेल्या. खूप खूप धन्यवाद.

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 2 ปีที่แล้ว

    सुंदर खूप खूप छान वाटलं

  • @richapatil9112
    @richapatil9112 2 ปีที่แล้ว

    Khup sundar

  • @swatidorge7133
    @swatidorge7133 2 ปีที่แล้ว +1

    राधा 👏👏

  • @snehalbhujadi7367
    @snehalbhujadi7367 2 ปีที่แล้ว

    khup chhan

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 2 ปีที่แล้ว +4

    अहाहा... राधा ही एक अतिशय समंजस आणि हुशार मुलगी दिसतेय... नचिकेत खासनीसांची आहे का ही लेक..? तिचे उच्चार "अंतरपाट", "सप्तपदी".खासच😀 तिचा चॉईस काय क्लास आहे! खूप सुंदर संकल्पना आणि फॉरमॅट आहे स्पृहा... "आज्जीचे घड्याळ"ही हेरिटेज कविता ऐकवल्याबद्दल खूप आभार.
    "आम्ही कोण म्हणूनी" ही केशवसुतांची आणि नंतर केशवकुमार (प्र के अत्रे) ह्यांनी विडंबन केलेली कविता ऐकायला आवडेल

    • @nachiketkhasnis
      @nachiketkhasnis 2 ปีที่แล้ว

      होय मेघा जी... माझीच "लेक" आहे ही...! पक्की "पुणेरी" आहे, बाकी सुज्ञास सांगणे न लगे हाहाहाहाहाहा

    • @meghakolhekar
      @meghakolhekar 2 ปีที่แล้ว

      @@nachiketkhasnis ha ha ha ha.... फार गोड आहे...Effort of conscious parenting दिसून येतो😊 तुमची "माय" होणार ती..!!

  • @sanketyeragi7696
    @sanketyeragi7696 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @anjalitalnikar8567
    @anjalitalnikar8567 2 ปีที่แล้ว +2

    Hello Spruha ..tu mala khup aavadtes. Tu ek sunder vyakti ahes . Mazi choti bahi sou Radhika kale ji Mathama Gandhi college Aadpur uthe physics chi letcharar ahe , tichi ekhadi tari kavita tu tuzya karyakramat vachavis Ashi Mazi khup manapasun iccha ahe .Jamavata yeil ka . Tula avadatil tichya kavita

  • @shrikantthuse8272
    @shrikantthuse8272 2 ปีที่แล้ว

    Mastch aahe meetri 🙏🙏🌹🌹

  • @kalindishinde7545
    @kalindishinde7545 2 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @pallaviparth7
    @pallaviparth7 2 ปีที่แล้ว +2

    मस्तच 💯❤👌🏻👍🏻

  • @anjumpattekari9225
    @anjumpattekari9225 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर ❤️

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 2 ปีที่แล้ว

    Chhan chhan chhan chiutai.....

  • @shreeramkulkarni2196
    @shreeramkulkarni2196 2 ปีที่แล้ว +2

    Eagerly Waiting...

  • @sushmadaundkar6062
    @sushmadaundkar6062 2 ปีที่แล้ว

    Khupch chan 👌👌👌👌👌

  • @meenalaghate8273
    @meenalaghate8273 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान उपक्रम.... छान कविता निवडलीस.... संगीतमय कविता... उत्तम वाचन

  • @sanikayadav6563
    @sanikayadav6563 2 ปีที่แล้ว +8

    अक्षरशः खूप सुंदर कविता 💯
    आणि ज्या चालीत तू सादर केली आहेस ही कविता त्यामुळे तर या कवितेला आणखीनच सौंदर्य प्राप्त झाले आहे...❤️
    मला आजचा भाग अतिशय आवडला 😍
    मस्तच ताई 👍👌

  • @ketakideshpande9151
    @ketakideshpande9151 2 ปีที่แล้ว +3

    Khup varshani aikli hi Kavita...me tisari madhe Astana mla hi kavita hoti abhyasala . Khup chhan Radha aani spruha tai....mla na tuzyakdun केवढे हे क्रौर्य hi kavita aikvayla aavdel

  • @gappangan
    @gappangan 3 หลายเดือนก่อน

    वा सुंदर..🎉

  • @ambikasonawane6057
    @ambikasonawane6057 2 ปีที่แล้ว +3

    Waiting for more such episodes

  • @ashwinijoshi2565
    @ashwinijoshi2565 2 ปีที่แล้ว

    Mast ahe khup chan

  • @anaghaingole7647
    @anaghaingole7647 2 ปีที่แล้ว

    Khuppch chan🥰

  • @varshachougule4267
    @varshachougule4267 ปีที่แล้ว

    दोघीही कित्ती सुंदर आणि गोड !!!

  • @deeptiwalunjkar4900
    @deeptiwalunjkar4900 2 ปีที่แล้ว

    Khup chhan 👌

  • @ujwalathakur3335
    @ujwalathakur3335 2 ปีที่แล้ว +2

    Radha..khup chhan kavita.

  • @aarohipandit7510
    @aarohipandit7510 2 ปีที่แล้ว +14

    Hello spruha,
    I admire you a lot probably more as a poet now. During lockdown, I watched your film- Lost and Found and it really hit me hard. Your chemistry with Siddharth has always been super fantastic. Your work as an actor has certainly inspired many but now as a poet it's way more inspiring. Keep goin!!!

  • @nidhin4412
    @nidhin4412 ปีที่แล้ว

    Koop chan ahe Radha 💮

  • @devyanideshmukh637
    @devyanideshmukh637 2 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @vrundavani
    @vrundavani 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान.
    स्पृहा स्वतः प्रयत्न केलेली एखादी लहान मुलांची कविता ऐकायला आवडेल.

  • @sudhirmore4871
    @sudhirmore4871 2 ปีที่แล้ว

    ही कविता मला खूप आवडली.तशीच एक कविता 'बाळ जातो दुरदेशी मन गेले वेडा उन आज सकाळ पासुन ही माहिती असेल तंर ऐकायला आवडेल. धन्यवाद.

  • @samikshap2396
    @samikshap2396 2 ปีที่แล้ว

    kiti god😍

  • @swamisai68
    @swamisai68 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान tai 👌

  • @pankajsalgaonkar2535
    @pankajsalgaonkar2535 2 ปีที่แล้ว

    खूप छान एपिसोड होता .... अप्रतिम सादरीकरण ...❤️

  • @vanitapawaskar4901
    @vanitapawaskar4901 2 ปีที่แล้ว

    किती सुंदर म्हटली कविता, आवाज खानखनीत आहे

  • @shamar4408
    @shamar4408 2 ปีที่แล้ว +1

    Khup god episode..

  • @shashanknargunde74
    @shashanknargunde74 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान प्रयत्न, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 2 ปีที่แล้ว

    Khup khup avadla ha video ❤️❤️

  • @ashwinipatil8470
    @ashwinipatil8470 2 ปีที่แล้ว

    खूपच मस्त 👌🏻

  • @rutujakhilekar7964
    @rutujakhilekar7964 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर ताई,,, आणि राधा खुपच गोड 👌👌😘

  • @sakshi5687
    @sakshi5687 2 ปีที่แล้ว

    Khup Chan♥️💗♥️💗

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 2 ปีที่แล้ว

    खरच खुप जुन्या कविता आहेत पंचविस तिस वर्षा पुर्वी च्या तरि अजुन ऐकायला छान वाटतात आणि आजचि तुझि मैत्रिण पण खुपच मस्त तिला माझा गोड गोड पापा 👌👌🌷🌷

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 2 ปีที่แล้ว

    Sunder

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @yogeshlokare6414
    @yogeshlokare6414 2 ปีที่แล้ว +1

    Fantastic Spruha best you everytime wow Great !!

  • @pallavijoshi8126
    @pallavijoshi8126 2 ปีที่แล้ว

    व्वा स्पृहा खूपच छान उपक्रम राबविले आहे. यामुळे लहान मुलं साहित्याची आवड निर्माण होईल आणि जुने साहित्य ची पेटी मुलं समोर ओपने होतील.

  • @darshanakale6
    @darshanakale6 2 ปีที่แล้ว

    Khup sundar aani Stutya upkram.. Lahan mulana aaplya kavitanchi olakh karun dyayacha, Aani Radha kiti god mulgi aahe. Hallichya mulankadun shikshakanna baai mhanane farach durmil zale aahe, tyamule tiche bolne aikun khup chhan watle

  • @ashwinijoshi5088
    @ashwinijoshi5088 2 ปีที่แล้ว

    Khup chan 👍Radha khup god 😘doghi ekdam god 😊mazi mulgi pan ashich kavita mahant asate 😊

  • @vijumalgaonkar5098
    @vijumalgaonkar5098 2 ปีที่แล้ว +3

    राधाचं खूप खूप कौतुक!
    अशा मला आठवत असलेल्या कविता
    श्रावण मासी हर्ष मानसी
    पावसाच्या धारा येती झरझरा
    या बालांनो या रे या लवकर भरभर सारे या
    उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले
    आई बघ आकाशात सूर्य हा आला
    सायंकाळची शोभा
    या कविता पुढच्या पिढीनेही गाव्यात असे वाटते

    • @nachiketkhasnis
      @nachiketkhasnis 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद.... तुम्ही सुचविलेल्या कवितांचा प्रयत्न करू

    • @sushamadeshpande516
      @sushamadeshpande516 2 ปีที่แล้ว

      खरंच अप्रतिम कविता आहेत ह्या. माझी अमेरिकेतील नातही पावसाच्या धारा ही कविता पाठ म्हणते.

  • @sunitawani129
    @sunitawani129 2 ปีที่แล้ว

    खूप छान! चिमणी कित्ती गोड गं आणि किती अस्खलीत मराठी बोलते ही! अभिमान वाटतो मराठी असल्याचा. परवचा हा शब्द आजच्या किती मुलांना माहितेय, खरंच कौतुक हिचं. आमचीही आजी आठवली जी आम्हाला तिन्हीसांजेला देवासमोर बसवून शुभं करोती म्हणायला लावायची, पाढे श्लोक म्हणायला लावायची आणि स्वतः गीत रामायणतील गाणी म्हणून दाखवायची. तो काळ ह्या चिमुरडीने पुन्हा उभा केला. खूप खूप 😘😘

  • @ketakinaik4708
    @ketakinaik4708 2 ปีที่แล้ว

    Mast ahe he.... Ajun ashach chotya chotya mulan kadun marathi kavita aaikayla aavadatil... 👌👌

  • @shubhangikulkarni2002
    @shubhangikulkarni2002 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर भाग ...आणि स्तुत्य उपक्रम स्पृहा.
    दोन्ही कविता खूप खूप गोड.
    तुम्हा दोघींना...😘😘❤️❤️🍫🍫

  • @samruddhikadam2038
    @samruddhikadam2038 2 ปีที่แล้ว +1

    दोघीही खूप खूप सुरेखच आहात आणि खूप खूप गोड आवाजात सुंदरचं सादरीकरण......😊😊स्पृहा तू खूप छान भासलीस लहान होऊन......👌👌👌💐💐😊😊
    मस्त खूप छान🥳🥳🥳👌👌🌷🌷❤️❤️

  • @simaselukar1634
    @simaselukar1634 2 ปีที่แล้ว

    खूपच छान दोघींच्या ही कविता,,👍👍🥰

  • @parkul3
    @parkul3 2 ปีที่แล้ว

    किती गोड...ग ते पिल्लू...

  • @sarkarjyoti7586
    @sarkarjyoti7586 2 ปีที่แล้ว

    kupacha bhannat zala ajcha bhag evlishi god Radha ❤

  • @mahalaxmicreations8362
    @mahalaxmicreations8362 ปีที่แล้ว

    खुप भारी

  • @Sunakshi_1504
    @Sunakshi_1504 2 ปีที่แล้ว +1

    So fabulous 😘😘❤love you both