एकदाच बनवा महिनाभर वापरा |Kanda khobryache vatan | 10 मिनिटात भाजी तयार | All purpose Gravy recipe.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • गोडा मसाला रेसिपी
    • गोडा मसाला | Maharasht...
    आता भाज्या होतील एकदम लाजवाब, एकदाच बनवा महिनाभर वापरा | All purpose Gravy recipe.
    साहित्य / Ingredients
    धने - 3 चमचे
    जिरे - 1 चमचा
    तीळ - 2 चमचे
    खसखस - 1 चमचा
    बेडगी मिरच्या किंवा काश्मिरी - 7/8
    कांदे - 2 मध्यम आकाराचे
    सुके खोबरे - अर्धी वाटी
    लसूण - 30/35 पाकळ्या
    आलं - 2 इंच
    हिरव्या मिरच्या - 2/3
    कोथिंबीर - मूठभर
    तेल - गरजेपुरता
    मीठ - ½ चमचा
    👆 वरील सर्व जिन्नस थोड्याशा तेलात खरपूस भाजून थंड करून पेस्ट ( वाटण ) करून घ्यावी, असं वाटतं एकदाच बनवून हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून महिना-दीड महिना वापरू शकता कोणत्याही प्रकारच्या कडधान्याच्या रसा भाज्या किंवा चिकन रस्साभाज्या करू शकता.
    हेच वाटत वापरून भिजवलेला हिरवा वाटाणा आणि बटाट्याची रस्साभाजी , त्यासाठी लागणारे साहित्य.
    भिजवलेला हिरवा वाटाणा - 300 ग्रॅम
    कच्चा बटाटा - 1 मध्यम
    टोमॅटो - 1 मोठा आकाराचा
    तयार वाटण - 1 मोठी पळी किंवा 4 चमचे
    हळद - ¼ चमचा
    तिखट - ½ चमचा
    गोडा मसाला - 1 चमचा ( किंवा गरम मसाला )
    हिंग - ¼ चमचा
    कोथिंबीर- मुठभर बारीक चिरलेली
    तेल - आवश्यकतेनुसार
    मीठ - चवीपुरतं
    पाणी - आवश्यकतेनुसार
    😋😋अतिशय चमचमीत भाजी तयार होते.

ความคิดเห็น • 497