जगत मी आलो असा की , मी जसा जगलोच नाही... | Marathi Gazal | Gazal Nawaz Bhimrao Panchale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • ... मी जसा जगलोच नाही !
    मित्रांनो ... स्नेह !
    २०११ साली कुवैत येथील मैफिलीत गायलो होतो , तीच ही माझी खास आवडीची गज़ल -
    वाटले मज गुणगुणावे , ओठ पण झाले तिऱ्हाइत
    सुचत गेली रोज गीते , मी मला सुचलोच नाही ..
    जगत मी आलो असा की , मी जसा जगलोच नाही...
    व्वा ! काय शब्द आहेत भट साहेबांचे...
    गज़लची चाहती आणि स्वतः गज़लकार असलेल्या कुवैतच्याच जयश्री अंबासकरने हे रेकॉर्डिंग केले होते , तिच्याच सौजन्याने तुम्हाला ऐकवण्याचा मौक्का आज मिळतोय...
    शुक्रिया जयश्रीताई !
    माझ्या रसिकांना अनेकदा मी सांगितले आहे आणि सांगताना प्रत्येक वेळी पुन:प्रत्ययाचा आनंद मी अनुभवतो की , सुरेश भटांची ही रचना म्हणजे माझ्या आयुष्यातली पहिली मराठी गज़ल आहे आणि माझ्या सांगीतिक जीवनाचा टर्निंग पॉईंट सुद्धा ! माझ्या आयुष्यात मराठी गज़लचा सुत्रपात याच गज़लने झाला . येत्या वर्षी २०२२ मध्ये माझी गज़ल गायकी आपले अर्ध शतक पूर्ण करेल . या प्रदीर्घ प्रवासात खूप गज़ल मी स्वरांनी सजवल्या आणि पेश केल्या , या गज़लची ताजगी आणि खुमारी मात्र अद्याप बरकरार आहे .
    माझ्या अमरावती वास्तव्यातल्या अनेक आठवणी या गज़लेसोबत जुळलेल्या आहेत . अमरावतीचा तो राजकमल चौक , भट साहेबांचा तो बहारदार गज़ल दरबार , रसिकांचा हुजूम व भरभरून दाद ...आणि तिथेच कुठे तरी कोपऱ्यात ऐकत उभा असलेला मी ...
    आज मोठ्या अभिमानाने ( या एका गोष्टीचा अभिमान करण्याचा हक्क मी राखून ठेवला आहे ) मी सांगतो की , गज़ल आणि रसिक या दोहोंनी मला या कला-क्षेत्रात सन्मानपूर्वक उभे केले आहे .
    मी खूप आनंदी , समाधानी...आणि कृतज्ञ आहे !!
    स्नेहांकित ,
    गज़लनवाज़ भीमराव पांचाळे
    Gazal Nawaz #BhimraoPanchale
    For More Updates Follow Me At -
    ______________________________________________________________
    ★ Facebook bit.ly/Bhimrao...
    ★ Twitter bit.ly/Bhimrao...
    ★ Instagram bit.ly/Bhimrao...
    Subscribe To My TH-cam Channel -- @Gazal Nawaz Bhimrao Panchale

ความคิดเห็น • 28

  • @aakashmawale8189
    @aakashmawale8189 ปีที่แล้ว +4

    गझल म्हणजे जिवनाचे सत्य सांगणारी कविता.

  • @aviratsservices442
    @aviratsservices442 10 หลายเดือนก่อน +2

    अशी मागणी केली होती ती पूर्णपणे मनास समाधान देऊन गेली, धन्यवाद, अभय एकनाथ तपस्वी, कोथरूड, पुणे ़

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 2 หลายเดือนก่อน +1

    बहुत बहुत बढीया गझल अभिव्यक्ती गझलकार भिमराव जी पांचाळ सरजी वर्षा अशोक रोहित बंड जैन सुस पुणे सुरज स्वाती वर्धन काव्या दुर्गे जैन निरा अपने बंड‌‌‌ और दुर्गे परीवार के सभी सदस्य 🎉🎉🎉🎉

  • @sunilvayadande4143
    @sunilvayadande4143 28 วันที่ผ่านมา

    Bhimrao the great.....

  • @ajitbhabhe2461
    @ajitbhabhe2461 11 หลายเดือนก่อน +2

    खूप छान

  • @sanjaydhumal962
    @sanjaydhumal962 13 วันที่ผ่านมา

    क्या बात है sir सलाम 🙏🙏

  • @aryas7480
    @aryas7480 6 หลายเดือนก่อน +1

    श्रवणीय आहे @

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 ปีที่แล้ว

    Suresh ji Bhatt inki kavitaye aur gazal bahothi bhannatt

  • @sbhosale2101
    @sbhosale2101 ปีที่แล้ว

    खऱ्या अर्थाने एक ग्रेट ग़ज़ल कार पण म्हणावी तीतकी प्रसिद्धि मिळाली नाही... ग्रेट ग़ज़ल सम्राट....

  • @aryas7480
    @aryas7480 6 หลายเดือนก่อน +1

    फारच छान!

  • @aslamshakh2214
    @aslamshakh2214 ปีที่แล้ว +1

    👆👌🌹सर, URGreat 💐

  • @jagannathkrishnaji8530
    @jagannathkrishnaji8530 ปีที่แล้ว +3

    फारच छान.मनाचा ठाव घेणारा आवाज आणि गोड गळा आहे पांचाळजी तुमचा.असेच गात रहा,पुढील पिढीही ऐकत राहील.

  • @vijaypatil909
    @vijaypatil909 2 ปีที่แล้ว +5

    भिमरावजींचा स्वर्गिय स्वर कानी पडताच सर्व टेंशन दूर
    होतात व कान तॄप्त होतात.

  • @rohitrajurkar3811
    @rohitrajurkar3811 ปีที่แล้ว +1

    काय खुब गझल आहे एकदम मन हेलावून गेलो..

  • @creativeartstudio7518
    @creativeartstudio7518 2 ปีที่แล้ว +2

    दादा, केवळ लाजवाब...
    जयश्री ताई, खरच तू छान रेकॉर्डिंग केलंस...

  • @masudpatel400
    @masudpatel400 2 ปีที่แล้ว +4

    किती छान व्यक्त झालात दादा , आपल्या निवेदनातही गायना सारखाच गोडवा असतो.
    ही गझल तर इतकी छान जमून आली आहे की सारखी ऐकतच रहावी असे वाटते .
    केवळ लाजवाब दादा ......असेच गात राहा आणि आनंद वाटत राहा .....

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 ปีที่แล้ว +1

    छान किती छान!👌

  • @anilkoshe9994
    @anilkoshe9994 2 ปีที่แล้ว +2

    दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 ปีที่แล้ว +1

    कोणता राग आहे? तोडी तर नव्हे!❤️

  • @gauravkotkar3731
    @gauravkotkar3731 ปีที่แล้ว +1

    Mast ch...👌👌👌

  • @80amitjadhav39
    @80amitjadhav39 2 ปีที่แล้ว +2

    वाह वाह ! शब्द आणि स्वर ला तोडच नाही !

  • @sumedhjadhav4479
    @sumedhjadhav4479 2 ปีที่แล้ว +2

    वाह! साहेब ऐकावे तुम्हास फक्त, आयुष्याच्या शेवटापर्यंत...

    • @shirishwaghmode9575
      @shirishwaghmode9575 2 ปีที่แล้ว +2

      शब्द आणि आवाज ,दोन्ही, कालजयी .!

  • @harshad24
    @harshad24 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान सरजी 👌👍❤️

  • @arunjoshi2939
    @arunjoshi2939 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर सर ✌🏽👍🏼🙏🏼

  • @BindassPihu3075
    @BindassPihu3075 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान 😊

  • @flowwithsoul645
    @flowwithsoul645 2 ปีที่แล้ว +1

    💕👍💕

  • @saurabhgondhali5282
    @saurabhgondhali5282 2 ปีที่แล้ว +3

    माझी आवडती गझल, भट साहेबांचे काय शब्द आहेत. तितकीच सुंदर चाल आणि आवाज आहे.❤️❤️❤️