द्वारका | Prabha Ganorkar | Spruha Joshi Poems

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
  • "द्वारका"
    पाणी हलले थोडे,
    दिलेले दान परत घेण्याची वेळ आली तेव्हा
    खोल आतल्या आत गुदमरले हुंदके सारी निरवानिरव करावी लागली तेव्हा..
    डोळ्यांबाहेरही आले दोन थेंब,
    उरल्या आयुष्याइतकेच अल्पजीवी, तितकेच व्यर्थ।
    मीठ मिसळून जायचे होते मिठात ,
    एवढाच पदरी पडलेल्या त्या निर्जीव अश्रूंचा अर्थ!
    तो तर केव्हाचाच पाठमोरा झाला,
    त्याची सावलीही दिसेनाशी झाली, माझ्या उघड्या डोळ्यांनी मी पाहते आहे,
    माझी द्वारका बुडत चाललेली..
    - प्रभा गणोरकर
    तुम्हाला हि कविता कशी वाटली ते नक्की कळवा आणि Like, Share & Subscribe करायला विसरू नका.
    #SpruhaJoshi #Poems #MarathiKavita
    _________________________________
    Credits
    Cinematography :
    ASHLEY EYEFULS
    Edit :
    Siddhesh Pandhere
    Music, mixing and mastering
    Mandar Geetapathi
    Keys
    Shantanu Dravid
    Hair and makeup
    Bhagyashri Patil
    Keys
    Shantanu Dravid
    Music
    Mandar and Shantanu
    Special Thanks :
    Dr. Alka Ranade
    Pornima Khadke
    Anurag Pathak
    Tanmay Jangam
    Created By :
    Nachiket Ashok Khasnis
    _____________________________________
    About Spruha Joshi :
    Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
    For More Updates :
    Facebook : / spruhavarad
    Twitter : / spruhavarad
    Instagram : / spruhavarad
    Email : team@brewbackers.com
    ______________________________
    DISCLAIMER: This is the official TH-cam Channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
    __________________________________

ความคิดเห็น • 278

  • @latadeshpande5577
    @latadeshpande5577 2 หลายเดือนก่อน

    कविता आपल्याला कुठेतरी आत आत घेऊन जाते. फारच घणगंभीर कविता. आणि स्पृहा तुझ्या आवजात ती जास्त पोहोचते.

  • @shreeramkulkarni2196
    @shreeramkulkarni2196 2 ปีที่แล้ว +8

    स्पृहाताई, खुप अप्रतीम कवीता आहे ही. छोटीशीच आहे पण भगवान श्रीकृष्णांची भव्य द्वारका नगरी समुद्रत बुडतांनाचा तो क्षण आपल्या डोळ्यासमोर अक्षरशः जीवंतपणे उभा राहातो आणि ज्या नगरीत भगवान श्रीकृष्णांसह निवास केलेल्या माता रुक्मिणी देवींनी भगवान श्रीकृष्णांच्या पश्चात त्यांची लाडकी द्वारका नगरी समुद्रात सामावतांना बघणे हे रुक्मिणी देवींसाठी किती क्लेशकारक दृष्य बनले असेल याची जाणिव ही कवीता आपल्याला करुन देते.

  • @divyachaudhari2892
    @divyachaudhari2892 2 ปีที่แล้ว +6

    काळजाला भिडणारी कविता। छोट्याश्या कवितेचा इतका खोल अर्थ, खूपच हृदयस्पर्शी😯 त्यात तुझं सादरीकरण म्हणजे शब्दच नाही वर्णन करायला👌👌

    • @chitranaik6318
      @chitranaik6318 2 ปีที่แล้ว

      Spruha tu lahan aahes pan janiv
      Smruddha aahes. Arthpurn pan
      Manala bhungaa lavanari.

  • @kalyaniwyawahare5010
    @kalyaniwyawahare5010 2 ปีที่แล้ว +3

    स्पुहा कविता छोटीशी पण तु सांगितल्या अर्थाता मुळे जास्त भावली. धन्यवाद.

  • @sanjaysvlog3159
    @sanjaysvlog3159 2 ปีที่แล้ว +2

    मी हि कविता माझ्या डायरी मध्ये उतरवून लिहून घेतली आहे आता जेंव्हा जेंव्हा मी द्वारीके ला किंवा श्रीकृष्णाच्या निधनाच्या जागी म्हणजे भालका म्हणून गाव आहे तीथे जाइल तेंव्हा माझ्या सोबत असलेल्या माझ्या मित्रांना आणि नातेवाईकांना हि कविता मी असीच तुझ्या सारखी संदर्भ सहित कवियत्री चे नाव सांगून आणि तुझे ही आभार मानून वाचून दाखवेल...... एव्हढी मोठी कविता माझ्या मराठी भाषेत लिहिली गेली आहे ह्याचा आज मला गर्व होत आहे.....कवियत्रींना आणि तुला सुद्धा नमस्कार करतो......🙏

  • @shubhangikulkarni2002
    @shubhangikulkarni2002 2 ปีที่แล้ว +6

    वाह.... खूप प्रभावी झालं...
    सादरीकरण स्पृहा .
    फार मनाला भिडणारी कविता प्रभा ताईंची
    अंगावर काटाच आला....!
    👌👌🌹❤️

  • @sarikamolkar
    @sarikamolkar ปีที่แล้ว

    सुंदर.आशय प्रधान कविता.प्रभा गणोरकर या माझ्या प्राध्यपीका.वि म वि महाविद्यालय अमरावती ला त्या मराठी शिकवायच्या.खुप छान.

  • @ashwinighatpande398
    @ashwinighatpande398 2 ปีที่แล้ว +4

    आताशा मी नसतेच इथे अशी ओळ असणारी पदमाताई गोळे यांची कविता आपण आपल्या आवाजात वाचावीत!🙏🙏कविता अप्रतिम आहेच,आपल्या सादरीकरणाची वाट पाहते आहे 🙏👍

  • @geetasamel8519
    @geetasamel8519 2 ปีที่แล้ว +11

    स्पृहा, अप्रतिम. कविता ऐकल्यावर मन एकदम उदास झालं. खरंच आपण श्री कृष्ण निघून गेल्यावर रुक्मिणी चं काय झालं असेल ह्याचा विचारच करत नाही. त्याच्या सारखा सखा, मार्गदर्शक असल्या वर आपल्या भाग्याचा हेवा वाटावा पण तो गेल्या नंतर तेच आपलं आयुष्य किती हत बल होऊन जातं. आपली पण सध्या हीच अवस्था आहे. आपल्या जीवनातील श्रीकृष्ण निघून गेलेला आहे, आनंद, प्रेम ह्याने आपल्यकडे पाठ फ़िरवली आहे..... आणि आपण हताशपणे आपली बुडणारी द्वारका पाहत बसलो आहे......

  • @anuradhashetye6332
    @anuradhashetye6332 2 ปีที่แล้ว +2

    स्तब्ध झाले मन ,डोळ्याना पाणावून......
    स्पृहा तू व्दारका संवेदनशील व्यक्त केलीस. ह्रदयस्पर्शी.....!

  • @amolchougule726
    @amolchougule726 2 ปีที่แล้ว +3

    स्पृहाजी खुप खुप खुप उत्तम सादरीकरण... मला वाटते कि ही कविता प्रत्येक रुक्मिणीची आहे, जेव्हा तो आत्मरुपी श्रीकृष्ण या देहरूपी द्वारकेला (जी द्वारका या प्रकृतीने काही काळाकरिता भेट दिली होती ) सोडून जातो..... माती मिसळून जायची होती मातीत... धन्यवाद

  • @suvarnamaind9646
    @suvarnamaind9646 2 ปีที่แล้ว +2

    कविता छान आहेच, पण स्पृहा तुझ्या सादरीकरणामुळे ही कविता अजूनच मनाला भिडली.अप्रतिम

  • @abolimarathi
    @abolimarathi 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर.....कधी कोणी असा विचारच केलेला नाही.... तो विचार कवितेतून मांडून अंतरंगातील डोह पूर्ण ढवळून निघाला...गळ्यापर्यंत एक हुंदका आला.....खरच काय झालं असेल तेव्हा?....
    स्पृहा खूप छान सादर केलस.... धन्यवाद 🙏

  • @nupadhye
    @nupadhye 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार, अत्यंत मर्मस्पर्शी सादरीकरण एका उत्कृष्ट कवितेच.
    ह्या कविते पासून प्रेरणा घेवून हिंदी मध्ये रुक्मिणी (तिच्या रुपात अश्या अनुभवातून जाणार्‍या प्रत्येक स्त्री च्या मनातले भाव लिहायचा प्रयत्न केला आहे. शेवट आजच्या आधुनिक रुक्मिणी च्या मानो भावांना अनुसरून आहे). कशी वाटली नक्की कळवा, आणि जर का ही वाचली तर मला आनंद होईल.
    द्वारका (भावानुवाद)
    अग्नि को साक्षी बना महाभूत पांचों को ध्याया
    विश्व इक निर्मित किया लेने जिसे सागर आया
    दुःख का सागर आ गया है खुद में मुझको डुबोने को
    छोड़ कर वो जा चुका है, मैं बची हूँ रोने को
    मेरे दो आँसू मिले जल में तो वो खारा हुआ
    चार ही दिन में अचानक खेल ये सारा हुआ
    प्राण था इस विश्व का आओ उसे नमन करें
    देह का तुम ही कहो कैसे हम विसर्जन करें
    हो भले ही ये नियम सदियों से इस संसार का
    डूबने न दूंगी मैं इस बार अपनी द्वारका
    डॉ. नितीन उपाध्ये - 29-03-2022

  • @surajpatil8653
    @surajpatil8653 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम कविता! आणि त्याच तोडीचं सादरीकरण...💐💐💐
    तुमच्यामुळेच कवितेचा गाभा समजायला लागला आहे. एरवी कंटाळवाणा वाटणारा साहित्यातील काव्यप्रकार, आता आवडायला लागला आहे.
    एक फरमाईश होती मंगेश पाडगावकरांची. "तिने प्रेम केलं , त्याने प्रेम केलं... यात तुमचं काय गेलं... * ही कविता तुमच्या कडून ऐकायला आवडेल

  • @radhikamhaladkar740
    @radhikamhaladkar740 2 ปีที่แล้ว +3

    ಅತ್ಯಂತ ಕಡಿಮೆ ಪದಗಳನ್ನು ಬಳಸಿ ಕಟ್ಟಿದ ಈ ಕವಿತೆ, ಚಿಕ್ಕದಾಗಿರುವುದೇ ಲೇಸು. ಭಾವನೆಗಳನ್ನು ಅದ್ಭುತವಾಗಿ ಹರಳುಗಟ್ಟಿಸಿದ್ದಾರೆ. ಓದಿದ್ದಕ್ಕಾಗೀ ಹಾಗೂ ಅದರ ಹಿನ್ನೆಲೆಯನ್ನು ವಿವರಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ವಂದನೆಗಳು 🙏

  • @ashasawant948
    @ashasawant948 2 ปีที่แล้ว

    अत्यंत भावपूर्ण, अर्थपूर्ण काव्य. मनाला भिडून गेलं.धन्यवाद.

  • @TejaswiniDhamalonlymusicYe
    @TejaswiniDhamalonlymusicYe 2 ปีที่แล้ว +2

    स्पृहाताई ही कविता मी वाचली असती तर मला कळली असती. पण कवितेतील भाव तुझ्या चेह-यावर दिसले आणि आवाजही निरागस आहे तुझा त्यामुळे कविता फक्त कळली नाही, तर ती अंत:करणाला भिडली.🌷👏👏👍

  • @krishnakarande439
    @krishnakarande439 ปีที่แล้ว

    खूपच छान, सादरीकरण आहे स्पृहा, द्वारका कविता फारच भावली,

  • @uttarakeskar6683
    @uttarakeskar6683 2 ปีที่แล้ว +1

    Khupach surekh kavita aani sadarikaran

  • @shrutiabhyankar5302
    @shrutiabhyankar5302 2 ปีที่แล้ว +2

    कविता आणि त्यामागची गोष्ट दोन्ही मनाला भिडणारे आहे. तुझ्या सादरीकरणाने कवितेचा अर्थ समजणे सोपे होते.

  • @sanjeevdalvi5578
    @sanjeevdalvi5578 2 ปีที่แล้ว +2

    फार फार सुंदर. संदर्भ दिल्यामुळे
    कविता कळली आणि काळजात रुतली. सादरीकरण पण अप्रतिम.

  • @vrushaliapte7682
    @vrushaliapte7682 2 ปีที่แล้ว +2

    हृदयस्पर्शी कविता.. संदर्भामुळे जास्त समजली.. प्रत्येक शब्दाचं त्या त्या अर्थाप्रमाणे उच्चारण करतेस ,उदा. 'खोल' शब्दाचं उच्चारणं खरंच मनात खोल शिरेल असं आहे ...
    मलाही आपण लिहिलेली कविता वाचन करायला आवडायला लागलंय , तुझं ऐकून
    ऐकून..ती गोष्ट स्वतःलाच खूप आनंद देऊन जाते..

  • @sushamatupe5355
    @sushamatupe5355 2 ปีที่แล้ว +5

    अत्यंत सुंदर आणि ह्रदयस्पर्शी कविता. उत्तम सादरीकरण. खुप छान👍🏻👌 तुमच्यामुळे मला कविता ऐकण्याची आवड लागलीये आणि कधी एखादी लिहावीशी वाटू लागते. परदेशात असल्याने विषयही भेटतात. आपल्या देशाची, घरच्यांची आठवण येत असते तेव्हा भावना कागदावर आपसूक बोलक्या होतात. धन्यवाद ताई.

  • @g.s.chavanartsandcreation2130
    @g.s.chavanartsandcreation2130 2 ปีที่แล้ว +1

    नक्कीच....एका स्त्री सोबत तिच्या अंतर्मनातील समुद्राचे उधाण या शब्दांमधे सामावलेले आहे..जे आपल्या सादरीकरणाने अजून गंभीर आणि तेवढेच भिडणारे.....सोबत संगीत आणि शब्दातील भाव....सगळं अप्रतिम🙏💐💐

  • @shubhangipawar1996
    @shubhangipawar1996 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan spruha....... God bless you

  • @sunitatillu4281
    @sunitatillu4281 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय अर्थगर्भ कविता! स्पृहा, तू छान न्याय दिलास कवितेला!
    प्रभा गणोरकर माझ्या आवडत्या कवयित्री.

  • @yogeshlokare6414
    @yogeshlokare6414 2 ปีที่แล้ว +1

    Apsulet fantastic manage you Spruha wow !!

  • @nidhigawande2514
    @nidhigawande2514 ปีที่แล้ว

    Khucpach Sunder apratim kavita spruha tai...❤tumhi pratyak kavita Itka chaan padhati na preshit karta ki purna pane manaat utrun jaate...

  • @rohanshintre4976
    @rohanshintre4976 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर सादरीकरण... खूप deep expressions या कवितेत इतक्या सोप्या पद्धतीने व्यक्त केल्या आहेत. श्रीकृष्णाचं आणि रूक्मिणीचं एकमेकांबद्दलच bonding सुद्धा सुंदर पद्धतीने व्यक्त केलंय.

  • @rashmikuvalekar7880
    @rashmikuvalekar7880 2 ปีที่แล้ว +1

    Tx yar spruha Tai tu tar Mazya kaljatlach dukha mala dakhvun dilas je shabdat itkya divsat mandta yet navte konasamor.. Karan te Maz Mich odhavlel dukhha ahe

  • @sandhyakulkarni3441
    @sandhyakulkarni3441 2 ปีที่แล้ว +1

    वा खुपच ,खरंच गर्भितार्थी🙏

    • @padamajadesai7474
      @padamajadesai7474 2 ปีที่แล้ว

      कविता खूप आवडली त्या मागची इथा ktha खूप भावली

  • @vishaltavade3112
    @vishaltavade3112 2 ปีที่แล้ว +2

    नि:शब्द केलत ताई खूपच छान शब्दांकन आहे हृदयाला भिडणारी कविता आहे खूपच मस्त 👍

  • @manishajoshi4871
    @manishajoshi4871 2 ปีที่แล้ว +2

    Excellent.....उत्तम सादरीकरण आणि कविताही तितकीच सुन्दर

  • @soumyasakhee
    @soumyasakhee 2 ปีที่แล้ว +2

    तुमच्या आवाजातून कवितेची भावना सहज स्पष्ट झाली स्पृहा मॅडम...🙏🙏🙏

  • @prakashkorde537
    @prakashkorde537 2 ปีที่แล้ว +2

    स्पृहा तुझ्याकडून कवितेचा संदर्भ व अर्थ समजाऊन सांगितल्यामुळे कविता समजली
    अतिशय सुरेख सादरीकरण
    Spruha u really great
    Keep it up

  • @vaidehideshmukh635
    @vaidehideshmukh635 2 ปีที่แล้ว +3

    कविता आणि तिचा संदर्भ सरकन अंगावर काटा आणून गेला, जेंव्हा ती तुमच्या भावस्पर्शी शब्दातून कानावर पडली.

  • @sangeetayeolekar2203
    @sangeetayeolekar2203 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सादरीकरण
    अर्थ सांगितल्यामुळे मनाला भावली

  • @madhurilandage9086
    @madhurilandage9086 2 ปีที่แล้ว +2

    Dwarka hi kavita ekdam heart touching ch...!Duryodhan hi kavita aaikavavi...

  • @manjushasubhedar5105
    @manjushasubhedar5105 2 ปีที่แล้ว +2

    खूपच गहिरी गूढ...अगदी भिडली काळजाला

  • @quexsthealthcare9987
    @quexsthealthcare9987 2 ปีที่แล้ว +2

    I agree with another comment on this channel.
    अतीशय स्पृहणीय initiative by you, स्पृहा. During past 3 months or so, few things on TH-cam and one more outside of it have helped my thirst and hunger about honest expressions, which I had forgotten somewhere, have returned. They include collaborative experience of the assorted literature of the great Smt Shanta Shelke. At home, me, my wife and my mother read some one piece from her literature either from धूळ पाटी, नक्षत्रचीत्रे, मेघदूत etc.
    Second I am fond of various interviews by Dr Anand Nadkarni on वेध किंवा आवाहन.
    Thirdly I have started enjoying about learning about world languages, Indian or foreign, in which I heard about the Indian Mahasuvi language and the Shetlandic language in Shetland in Northern UK.
    And lastly off course your TH-cam channel. I have enjoyed about 10 odd pieces.
    Thank you so much, Spruha.
    Continue to spread the joy of lietrature

  • @tanayamondhe8963
    @tanayamondhe8963 ปีที่แล้ว

    निशब्द...मनाला भिडणारी अशी ही कविता

  • @prachigogate6730
    @prachigogate6730 2 ปีที่แล้ว +1

    Kharech khup chhan. 👌👌

  • @ashwinidatar1748
    @ashwinidatar1748 2 ปีที่แล้ว

    मन भारावून टाकणारी कविता... आणि उत्तम सादरीकरण

  • @tanvidiwadkar7094
    @tanvidiwadkar7094 2 ปีที่แล้ว +5

    किती सुंदर कविता आहे......!!!❤️
    स्पृहा ताई.....❤️

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 2 ปีที่แล้ว +22

    निःशब्द ,,,,,,,, स्पृहा तुझ्या सादरीकरणामुळे ही कविता जास्त मनाला भावली अत्युत्तम सादरीकरण प्रिय स्पृहा ,,,,,अर्थ सांगितल्यामुळे अजून गहिरी आणि मनाला लागली

  • @nirupaquenim3700
    @nirupaquenim3700 8 หลายเดือนก่อน

    कविता आणि सादरीकरण उत्तम. खूप शुभेच्छा.

  • @dipalipande772
    @dipalipande772 2 ปีที่แล้ว +2

    Spruha I like poem and your reading style.

  • @shravanidhokate4193
    @shravanidhokate4193 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर!!! .... तुझ्यामुळे मी खुप प्रेरित होते नेहमी!!... खुप खुप प्रेम स्पृहा ताई!! 😊❤️❤️

  • @profeetenterprises9088
    @profeetenterprises9088 2 ปีที่แล้ว +16

    Goosebumps.. One honest confession...have started loving Marathi poetry after following your articulations and presentation.. Keep inspiring, Spruha..❤

    • @spruhaajoshi
      @spruhaajoshi  2 ปีที่แล้ว +2

      😊🙏🏻🌸

    • @yashavantijoglekar7203
      @yashavantijoglekar7203 2 ปีที่แล้ว +2

      सुंदर अभिव्यक्ति. आशय श्रोत्यांपर्यंत पोचता करणारं वाचन.खूप सुरेखच.

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 2 ปีที่แล้ว +7

    प्रत्येकच स्त्री असते रुक्मिणी कधी न कधी तरी ज्या क्षणी तिचा कृष्ण सखा होतो पाठमोरा तिला..... आणि तिच्यापुरती असलेली तिची द्वारका बुडत असते डोळ्यांदेखत.... असहाय निरर्थक अश्रू काय असतात हे तीच सांगू शकते नेमके... कुणाला विचारायचा जाब तेव्हा की मला "रुक्मिणी"कां केलंस ते.......

  • @swatiratnaparkhi1946
    @swatiratnaparkhi1946 ปีที่แล้ว

    फार भावपूर्ण आणि मनाला स्पर्श करणारी कविता.रुक्मिणी चे दुःख खरेच समुद्रा पेक्षाही मोठे आहे.श्रीकृष्णा चे जाणे आणि ते सहन करू शकणारी फक्त रुक्मिणीच असू शकते..🙏स्पृहा ताई तुमचे सादरीकरण खूपच सुंदर..

  • @swapananave7074
    @swapananave7074 2 ปีที่แล้ว +2

    कविता खूपच सुंदर आहे.........

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 2 ปีที่แล้ว +1

    Prabhatainchi kavita sunder pan sandarbha devun kelele tuze vachan apratim.asach anand det raha spruha 👌👌

  • @swarupasawant8247
    @swarupasawant8247 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan shabd ......

  • @ganeshmudegaonkar
    @ganeshmudegaonkar 2 ปีที่แล้ว +2

    नितांत सुंदर..👌

  • @shrutilele4678
    @shrutilele4678 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय हृदयस्पर्शी कविता आणि कवितेमागची पार्श्वभूमी देखील विचार करायला लावणारी. सादरीकरण सुद्धा खूप छान. तुझ्यामुळे अशा अनेक कविता अर्थासह उलगडल्या त्यासाठी मनापासून आभार 🙂🙂👏

  • @vrushalishrikant6248
    @vrushalishrikant6248 2 ปีที่แล้ว +2

    स्पृहा खूपच सुंदर सादरीकरण...तुझ्या आवाजात ती थेट मनात..आत पोचली.कविता त्यातले शब्द.. पार्श्वसंगीत सगळंच अप्रतिम..वा मस्तच

  • @ashleshapokharkar5913
    @ashleshapokharkar5913 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम ❤️❤️ Thank u ❤️

  • @deepaliparanjape1688
    @deepaliparanjape1688 2 ปีที่แล้ว +1

    Far chan sadrikrn 👍🏼👍🏼👍🏼

  • @apsdhinchak5656
    @apsdhinchak5656 2 ปีที่แล้ว

    Kharach khup bhavnik aani mahitipurna aahe ❤️❤️

  • @mohanmustikar7013
    @mohanmustikar7013 2 ปีที่แล้ว

    manat hi kavita rujun basli khup khip sunder spruha

  • @rupalina9563
    @rupalina9563 2 ปีที่แล้ว +1

    Atishay sundar kavita 🙏🏼👍
    Asech tuzya kavitanchehi tu artha/ background sangat ja.

  • @vandanamothe4425
    @vandanamothe4425 2 ปีที่แล้ว +1

    Tuzya kavita manala sparsh krun jat, tai mla tu khup awdtes tuza God God awaj aikun man trupt houn jat..love u keep it up👍😘😍

  • @alan.graphy
    @alan.graphy 2 ปีที่แล้ว +2

    कोणतीही कविता... आणि स्पृहा जोशी... Amazing🙌🏻💥❤️

  • @bhargavidixit1413
    @bhargavidixit1413 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम स्पृहा ताई खूपच सुंदर सादरीकरण केले तुम्ही ♥️♥️♥️

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 2 ปีที่แล้ว

    कविता तिच्या मागील भुमिका कळल्यामुळे मनाला भिडली…🙏🙏 कवितेच सादरीकरण नेहमीप्रमाणेच तरल स्पृहा..धन्यवाद..🙏🙏

  • @snehalambre9860
    @snehalambre9860 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम स्पृहा ! मन हेलावलं

  • @prajaktajoshi8937
    @prajaktajoshi8937 2 ปีที่แล้ว +1

    स्पृहा तुझ्यामुळे कवितेचा अर्थ कळला..उत्तम सादरीकरण

  • @star5570
    @star5570 2 ปีที่แล้ว +1

    Kharach anga vr shahara ala.. ♥️♥️ Khuuuup sundar... 👌 Bhavsparshi..

  • @gandhalisathe2077
    @gandhalisathe2077 2 ปีที่แล้ว +2

    स्पृहा ताई, फारच अप्रतिम. 👍🙌

  • @MH11_optimistic
    @MH11_optimistic 2 ปีที่แล้ว +4

    out of box experience, very well presented& background sound was amazing. I have heard all ur poems but this was just amazing.. Keep on doing 💐💐💐

  • @nehachavan2065
    @nehachavan2065 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर कविता आणि तुझे सादरीकरण ही छानच.
    एक नवीन विचार आणि विषय मिळाला.

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप हृदयस्पर्शी ...... नि: शब्द करणारी आहे कविता .....

  • @apurvaghuge5974
    @apurvaghuge5974 2 ปีที่แล้ว +6

    हृदयस्पर्शी कविता...❤️❤️❤️

  • @vishwajitpatil6807
    @vishwajitpatil6807 2 ปีที่แล้ว

    अदभूत.. स्थब्ध.. झालो.. 🙏

  • @kanchanjoshi4410
    @kanchanjoshi4410 2 ปีที่แล้ว +2

    काळजाचा ठोका चुकवणारी कविता 💐💐💐

  • @uzmaaansari8955
    @uzmaaansari8955 2 ปีที่แล้ว +1

    आपले शब्द किती स्पष्ट असतात खूपच छान

  • @abhisakal
    @abhisakal 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान!

  • @aishwaryachavan2879
    @aishwaryachavan2879 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान कविता... अगदी मनला भिडली
    कविता ऐकताना खरोखरचं डोळ्यात पाणी आलं...
    खूप छान सादरीकरण स्पृहा ताई... ❤️

    • @satishdeshpande7955
      @satishdeshpande7955 ปีที่แล้ว

      सादरीकरण हा तुझा हातखंडा,कविता एका वेगळ्या युगात घेऊन जाते.

  • @saisobekar9172
    @saisobekar9172 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम 💗💓💝

  • @rupaligawade5993
    @rupaligawade5993 2 ปีที่แล้ว +1

    Khup chaannn

  • @gauripuranik8145
    @gauripuranik8145 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम , because of you I have started enjoying and reading poems in marathi- thank you so much 💐❤️💫

  • @butterflyloverst1806
    @butterflyloverst1806 2 ปีที่แล้ว +1

    Khuuup chan ahe ….👌🏻

  • @surekhadharmadhikari2352
    @surekhadharmadhikari2352 ปีที่แล้ว

    कवितेमागची कविता ... म्हणजे कथा जेव्हा कळते तेव्हां तीच कविता + भव्य होते ... अधिक गहिरी होते ... स्पृहा .. तू जे म्हटली त्याचा साक्षात अनुभव येतो . खरच कविता अंगावर येते ..... खूप छान प्रेझेंटेशन आणि विशेष धन्यवाद प्रभा ताईंसाठी की ह्या कवितेमुळे कृष्ण निर्वाणीनंतरची कथा ऐकण्यात आली .खरच खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @kalpanamahajan941
    @kalpanamahajan941 2 ปีที่แล้ว

    कवितेचे सादरीकरण खूप छान होते

  • @sayalithete2614
    @sayalithete2614 2 ปีที่แล้ว +1

    Khup sunder

  • @vandanamankikar9653
    @vandanamankikar9653 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @dnyandabhujbal9871
    @dnyandabhujbal9871 2 ปีที่แล้ว +1

    👌👌Thanks for selecting this poem..हृदयस्पर्शी कविता

  • @umajoshi3320
    @umajoshi3320 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर सादरीकरण ❤️❤️❤️❤️

  • @priyatendolkar1668
    @priyatendolkar1668 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम कविता . ऐकताना अंगावर काटा आला . मस्तच

  • @seemadeshmukh9307
    @seemadeshmukh9307 2 ปีที่แล้ว +1

    खूप च छान

  • @kavy-purv
    @kavy-purv 2 ปีที่แล้ว

    खूप छान कविता आहे । 😊 अर्थमय

  • @madhavisawant4782
    @madhavisawant4782 2 ปีที่แล้ว

    Rukmini ch kay zala ani tichi jeevan gatha kay asel ha vichar nakki yeto manat..
    Evdhya shya kahi oli vachun tichi baju he ikavi/ vachavi shi vatali...Thanks for such inspiration.

  • @shefalidalvi1914
    @shefalidalvi1914 2 ปีที่แล้ว +1

    ताई, तू स्वातंत्र्यवीर सावरकरांची सुनील नभ हे, सुंदर नभ हे ही कविता जी खजिना मध्ये सादर केली होतीस ती तू पुन्हा एकदा स्पष्टीकरणासह सादर करावीस अशी विनंती आहे. त्याचबरोबर वीर सावरकरांच्या अशा अनेक सुंदर कविता ज्या रसिकांपर्यंत पोहोचल्या नाहीयेत त्याही सादर केल्यास तर आम्हाला नक्की आवडेल.

  • @shaileshdeshpande9757
    @shaileshdeshpande9757 11 หลายเดือนก่อน

    Kavita best, wonderfully expressed. You are one of the best poem readers

  • @suryodaysp
    @suryodaysp 17 วันที่ผ่านมา

    सादरीकरण उत्तम❤

  • @swaroopamane2432
    @swaroopamane2432 ปีที่แล้ว

    खूप सुंदर कविता. अगदी मनाला स्पर्श करून गेली. कविता ऐकताना संपूर्ण चित्र डोळ्यांसमोरून तरळून गेले. अप्रतिम सादरीकरण😊👌

  • @sachinrk79
    @sachinrk79 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान 🙏👌👌

  • @shubhadadeshpande4722
    @shubhadadeshpande4722 2 ปีที่แล้ว

    खूप छान कविता,आणि सादरीकरणही, कविते

    • @shubhadadeshpande4722
      @shubhadadeshpande4722 2 ปีที่แล้ว

      कवितेची कथा सांगितल्यामुळे तर कविता खूपच प्रभावी झाली आहे