कोकणातील काजु कारखान । cashew nuts factory in Konkan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2020
  • मालवणीलाईफ युट्यूब चॅनलच्या माध्यमातुन आजतोवर व्यवसायाशी संबंधीत विवीध व्हीडीओ आपण आपल्या या चॅनलवर पाहिले. एखादा उद्योगाची माहिती लोकांपर्यंत जर पोहचली तर नक्कीच त्याचा फायदा व्हीडीओ बघणाऱ्यांनी होतो आणि उद्योजकालाही.
    आज या व्हीडीओमध्ये आपण भेट देणार आहोत ते मालवणतालुक्यातील हडी गावातील श्री. दिनेश सुर्वे यांच्या घरात बनवलेल्या काजु कारखान्याला. कमी जागेत काजु कारखाना कसा उभारला जातो, भांडवल किती लागतं, मनुष्यबळ किती लागते, काजु बी पासुन काजुगर कसा काढला जातो याची संपुर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
    #मालवणीलईफ
    #malvanilife
    ------------------
    काजु खरेदीसाठी संपर्क
    श्री दिनेश सुर्वे
    डोनी स्टाॅप
    मु.पो. हडी
    तालुका - मालवण
    9404598292
    744-8099372
    ------------------
    For unit
    Quality instruments and equipments
    Plot no-18, MIDC Kudal, sindhudurga
    416520
    02362222648
    Sales@quality-inst.com
    Accurate Engineering industries
    Plot no B/75 MIDC area, kudal, sindhudurga
    02362223122
    Website-www.aeicashewmachinery.com
    follow us on
    facebook
    m. malvanilife/?r...
    Instagram
    invitescon...

ความคิดเห็น • 1.3K

  • @prashantsurve7210
    @prashantsurve7210 3 ปีที่แล้ว +78

    सुर्वे दादांनी प्रामाणिकपणे सर्व माहिती दिली, कोणीही खोलवर माहिती देत नाही.ह्या पूर्ण कुटुंबाला ह्या उद्योगात आणखी यश येवो ही ईश्वर चरणी प्रार्थना....

  • @Chetan_gamer7
    @Chetan_gamer7 2 ปีที่แล้ว +2

    एक किलो काजु किती रूपये

  • @thejayeng
    @thejayeng 3 ปีที่แล้ว +108

    शब्द कमी पडतील सुर्वे दादांसाठी..... कोण बोलतो मराठी माणूस उद्योग धंदा करू शकत नाही..... 👍

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 3 ปีที่แล้ว +96

    आमच्याच गावातील काजू कारखाना आपल्या व्हिडीओमुळे पहिल्यांदा पहाता आला याचा अत्यानंद तर झालाच पण आपल्या गावात काजू कारखाना असूनही आपण यापूर्वी पाहिला नाही याची रुखरुख जाणवली. आपल्याच जवळपासची संपूर्ण माहिती, ज्ञान आपणास नसते याची प्रकर्षाने जाणीव झाली व आपल्या चँनेलचे महत्व व आवश्यकता यातून अधोरेखित झाले. केवळ मनोरंजक व्हिडीओ बनवून स्वतः प्रसिध्द न होता आपल्या गावखेड्यातील लोकांना व त्यांच्या लहानमोठ्या उद्योगांना प्रसिद्ध करण्याची आपली आंतरिक तळमळ पाहून खूप बरे वाटते. असेच माहितीपूर्ण व्हिडीओ बघायला आवडतील. छान माहितीपूर्ण व्हिडीओ.

  • @pritigharat7688
    @pritigharat7688 ปีที่แล้ว +10

    कोकणी माणसं किती प्रेमळ असतात तेच सुर्वे दादा या व्हिडिओ मधे दाखवून दिलेत,तुम्हाला देव यशप्राप्ती देवो हीच प्रार्थना.

  • @sushmapawaskar6842
    @sushmapawaskar6842 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सांगितली पण माझा एक प्रश्न आहे हे आता दाखवले ते मोठ्या प्रमाणात आहे पण छोट्या प्रमाणात घरगुती काजू कसा सुकविण्यासाठी काय करावे ह्याबद्दल माहिती मिळाली तर खुप बरं होईल.धन्यवाद 🙏

  • @rakeshnaik5144
    @rakeshnaik5144 14 วันที่ผ่านมา

    पण जर गिर्‍हाईकांनी कमी कॉन्टिटी आणून दिली, तर मिनिमम 20 किलो होईपर्यंत तुम्ही थांबणार. नंतर आलेले सर्व काजू एकत्र करून तुम्ही प्रोसेसिंगला टाकणार. मग फायनल प्रॉडक्ट चे ग्रेडेशन कशा पद्धतीने केले जाते.

  • @pandurangtikka6213
    @pandurangtikka6213 2 ปีที่แล้ว +15

    कोणताही आडपडदा न ठेवता विचारलेले प्रश्न व त्याची दिलेली खरी माहीती याबाबत आपल्या टिमचे व सुर्वे कुंटुबीयाचे धन्यवाद !

  • @shreenaique2766
    @shreenaique2766 3 ปีที่แล้ว +1

    सरळ साधा मेहनती कोंकणी माणुस

  • @vaibhavikulkarni8059

    किती साधेपणाने आणि मनापासून सांगितले सुर्वेदादांनी.त्याचे खूप आभार

  • @sunandakale3780
    @sunandakale3780 ปีที่แล้ว +7

    सुर्वे दादांनी खुप छान प्रकल्पाची माहीती दिली.त्यांच्या या कामाला भरपूर प्रमाणात यश मिळावे,

  • @rajeshshivalkar8827
    @rajeshshivalkar8827 3 ปีที่แล้ว +8

    सुर्वे दादा तुम्हाला खूप शुभेच्छा...

  • @aniketslifevlogs7383
    @aniketslifevlogs7383 3 ปีที่แล้ว +31

    कोंकणी माणसाची सभ्यता या व्हिडीयो मधुन दिसुन येत आहे..सुन्दर..जय महाराष्ट्र..!!! ❤

  • @manojtendulkar6823
    @manojtendulkar6823 3 ปีที่แล้ว +5

    सुर्वे दादांचे खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा .

  • @abhijitkokitkar6110
    @abhijitkokitkar6110 2 ปีที่แล้ว +3

    काही लोक आर्धीच माहिती देतात व आर्धी माहिती गुपीते लोकांपर्यंत पोहचू देत नाहीत लपवून ठेवतात पण ......

  • @pareshsakpal3424
    @pareshsakpal3424 3 ปีที่แล้ว +4

    मी खर तर मूळचा खान्देश मधला आहे, काजूचा आणि आमचा तसा फारसा संबंध येत नाही , येतो तो फक्त खाण्यापूरता, पण मित्रा तू ज्या पद्धतीने काजू व्यवसाया बद्दल सांगितले आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. सुर्वे काकांनी पण एकदम दिलखुलास सर्व काही कश्याच गर्व न करता सांगितले त्यांचे पण मनापासून आभार. अशीच माहिती तू देत रहा.

  • @harishchandrakhandare4080
    @harishchandrakhandare4080 2 ปีที่แล้ว +1

    ई माहिती विचारण्याची पद्धत फार चांगली होती पूर्ण व्हिडिओ समजला आभारी आहे हरिश्चंद्र

  • @shashikantkaralkar4084
    @shashikantkaralkar4084 3 ปีที่แล้ว +8

    अगोदर हडी गावातला काथा उद्दोगाचा vdo पाहिला होता आणि आज हा काजुबीया प्रोसेसिंगच small unit आणि तोही दिनेश सुर्वे यांचा family business पाहिला. खरोखर स्तुत्य उपक्रम. श्री सुर्वेंनी मनापासून, कहिही हातच न रखता संपूर्ण माहिती सांगितली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. श्री तळाशीलकरानी त्यांच्या comment मधे सगळ लिहिलय. सुर्वे कुटुंबाला पुढील वाटचालिसाठी अनेक अनेक शुभेच्छा.

  • @vinoddhamne7004
    @vinoddhamne7004 2 ปีที่แล้ว +2

    मालवणी लाईफ प्रथम तुमचे आभार, खूप छान माहिती आणि सुर्वे दादांच्या कुटुंबाचा काजू कारखाना व त्यांनी निर्मळ मनाने दिलेली संपूर्ण माहिती. मालवणी लाईफ व सुर्वे कुटुंबाचे खूप खूप धन्यवाद, व खूप खूप शुभेच्छा.

  • @pramodpetkar3088
    @pramodpetkar3088 2 ปีที่แล้ว

    नमस्कार