मनापासून आलेलं आणि कळवळीनं वाटलेलं ft. Leena Bhagwat | भाग ८३ | Whyfal Gappa Marathi podcast

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.4K

  • @rashmipatil4348
    @rashmipatil4348 3 หลายเดือนก่อน +41

    खूप सुरेख मुलाखत. संकर्षण नंतर मनाला भावलेली मुलाखत ही लीनाजींची. धन्यवाद ह्या अनमोल क्षणांसाठी 🙏🙏

    • @smitajoshi8831
      @smitajoshi8831 3 หลายเดือนก่อน +1

      Totally agree 👍🏻

  • @neeshapatlekar246
    @neeshapatlekar246 3 หลายเดือนก่อน +42

    ऐकतच राहावी अशी मुलाखत झाली.. अप्रतिम!! लीना भागवत.. कमाल अभिनेत्री आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व🙌
    रंगमंच ❤

  • @csanushreesatpute7055
    @csanushreesatpute7055 3 หลายเดือนก่อน +19

    कित्ती ओघवते बोललात लीना ताई... बघत असताना कित्येक वेळा मी मनापासून वाह वाह म्हणाले... अगदी चपखल बसतील असे विचार, नवीन पिढीचे निरीक्षण आणि योग्य शब्दात पेरलेली वाक्ये.... छानच... मराठी वरील प्रभुत्व पण अगदी लीलया सिद्ध केले... माझ्या आवडत्या आहात च... आज अजून जास्त जवळच्या झालात...

  • @mayuriphadke8830
    @mayuriphadke8830 3 หลายเดือนก่อน +37

    संकर्षण नंतर कोणता podcast Kamal superduper asel to with लीना भागवत

    • @vidhyaprabhu860
      @vidhyaprabhu860 3 หลายเดือนก่อน +2

      Was listening to this podcast while driving.. And I had this exact same thought.. संकर्षण नंतर खरच कोणी भारावून ठेवलं ते लीना भागवत हिने..

    • @ritabarad
      @ritabarad 3 หลายเดือนก่อน

      खरंय

  • @smitadani3523
    @smitadani3523 3 หลายเดือนก่อน +35

    दोन तास गप्पा सुद्धा खूप कमी वाटल्या आज. खूपच छान लीना ताई. रंगमंच!!

  • @poonamgawde4329
    @poonamgawde4329 3 หลายเดือนก่อน +8

    लीना भागवत हिची मुलाखत म्हणजे अभिनय आणि नाटक म्हणजे काय याची कार्यशाळा होती.... अप्रतिम.... सुंदर आणि साधी पण तितकीच सशक्त अभिनेत्री आहे लीना.... लीना तुला आणि सुयोग तुलाही खुप खुप शुभेच्छा... आणि सुयोग तुझे आभार... इतक्या गोड अभिनेत्रीची मुलाखत घेतलीस 🙏🏻🙏🏻

  • @sanas3011
    @sanas3011 3 หลายเดือนก่อน +29

    अप्रतिम अप्रतिम 🎉लीना ताईंच्या गप्पा..माहिती खूपच छान होत्या.👏👏👏👏 पण सुयोग कडे बघून लईच भारी वाटलं..एखादा छोटुसा मुलगा कसा एकटक आश्चर्याने बघत, हलत हलत ...डोळे - मन लावून ऐकतो....तसा क्यूट दिसत होता..आणि त्याची बोलती बंद होती...अगदी मोजक बोलला....😂

  • @vibhavarinayak1603
    @vibhavarinayak1603 3 หลายเดือนก่อน +14

    She is extremely sweet and down to earth person...her vibes are very positive and pure

  • @sumedhdeshpande3420
    @sumedhdeshpande3420 3 หลายเดือนก่อน +99

    लीना ताई ह्यांची vibe खूपच comforting आहे, असं वाटतं की एकमेकांना ओळखत नसून सुध्दा आम्ही खूप गप्पा मारू शकतो

    • @urmilasheode
      @urmilasheode 3 หลายเดือนก่อน +9

      Yes correct !

    • @kaju.0030
      @kaju.0030 3 หลายเดือนก่อน +2

      Khrch khup chan vatat

    • @suvarnagaoli9730
      @suvarnagaoli9730 3 หลายเดือนก่อน +6

      अत्यंत ताकदीची आणि नैसर्गिक अभिनय करणारी आणि गोड खळी पडणारी आवडती अभिनेत्री....रंगमंच

    • @suchitahenry344
      @suchitahenry344 3 หลายเดือนก่อน +1

      So much refreshing interview

    • @nehagogate3609
      @nehagogate3609 3 หลายเดือนก่อน +2

      अप्रतिम मुलाखत झाली. खूप छान माहिती मिळाली. लीना ताई माझी आवडती अभिनेत्री आहे❤ तिचं नाटकाबद्दल असलेलं प्रेम पाहून मी भारावून गेले.

  • @adhipparab5370
    @adhipparab5370 3 หลายเดือนก่อน +3

    रंगमंच, लीना ताई तुम्ही अतिशय सुंदरपणे नाटकासंबंधी विस्तृतपणे माहिती दिली. हा कार्यक्रम वायफळ नव्हे जायफळ सारखा आहे एक नशा आहे.

  • @nilimajoshi6555
    @nilimajoshi6555 3 หลายเดือนก่อน +82

    एक नाटक करण्या मागे इतका विचार असतो हे आज नव्याने कळलं. लीना ताई "धबधब्या सारखी बोलत होती. आणि सुयोग प्रथमच तू "स्पीचलेस "झालास हे जाणवत होतं. एरवी तुझं संवाद जोडणं सहज असतं आज तुझी तारांबळ उडत होती..
    अप्रतिम झाली मुलाखत

    • @priyankagurav3570
      @priyankagurav3570 3 หลายเดือนก่อน +1

      Me agadi hech comment karayla ale hote

    • @anuyabatwe5626
      @anuyabatwe5626 3 หลายเดือนก่อน

      हो खरंय

    • @samidhamahant772
      @samidhamahant772 3 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर 😊

    • @sumanpatil2510
      @sumanpatil2510 3 หลายเดือนก่อน

      ​@@samidhamahant772रंग मंच

    • @pratibhakharsikar661
      @pratibhakharsikar661 3 หลายเดือนก่อน

      रंगमंच

  • @anusule9904
    @anusule9904 3 หลายเดือนก่อน +3

    खूप खुश झाली मी
    हे असं एकून माझे विचार जुळतील कोणा बरोबर
    आपण रमतो बऱ्याच पुस्तकात
    खूप खूप धन्यवाद लीना जी

  • @aparnapangare6547
    @aparnapangare6547 3 หลายเดือนก่อน +35

    खूप सुंदर बोलल्या लीनाताई ! सुयोग बाकी कुठेही न ऐकलेल्या गोष्टी कलकारांकडून तू या माध्यमातून काढून घेतोस. त्यांना बोलते करतोस. तुझे आणि प्राचीचे खूप खूप कौतुक. जीयो !

  • @leenatasane3934
    @leenatasane3934 3 หลายเดือนก่อน +5

    खूपच सुंदर ओघवती भाषा,प्रगल्भ विचार...अगदी रंगून जाऊन किती वेगवेगळे विचार,माहिती देत बोलल्या.भाग २ हवाच आहे.

  • @avinashjoshi3991
    @avinashjoshi3991 3 หลายเดือนก่อน +7

    लीनाताई यांची मुलाखत आम्ही संपूर्ण पाहिली. मुलाखत उत्तम झाली. लीनाताईनी मुलाखतीत एकही शब्द इंग्लिश वापरला नाही. त्या बद्धल विशेष अभिनंदन.

  • @vp295
    @vp295 20 วันที่ผ่านมา +1

    रंगमंच
    लीना भागवत....❤ versatile actress'.... त्या नाटकाविषयी बोलत होत्या ते ऐकत राहावसं वाटत होतं.... एकंदरीत भाषेवर, त्यांच्या क्षेत्रावर आणि कामावर केलेलं त्यांचं प्रेम त्यांच्या प्रत्येक वाक्यात झळकत होत.... खूप खूप धन्यवाद....❤ अशाच गप्पांची वाट पाहू..!!😊

  • @snehals8078
    @snehals8078 3 หลายเดือนก่อน +10

    रंगमंच..खुपच सुंदर मुलाखत, लीनाची सहजसुंदर ओघवती शब्दकळा,ऐकतच रहावी अशी.लीना माझी आवडती अभिनेत्री, बिटकोची माकड छाप काळी टूथपावडर आम्हीपण लहानपणी वापरली आहे,लीना तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणी शुभाशीर्वाद ❤❤

  • @HemangiBoralkar
    @HemangiBoralkar 3 หลายเดือนก่อน +6

    रंगमंच !! भान हरपून ऐकत बसलो होतो !! किती नविन गोष्टी कळल्या नाटकाच्या प्रक्रियेबद्दल! धन्यवाद लिनाताई, सुयोग आणि प्राची!❤️❤️👍👍

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 3 หลายเดือนก่อน +14

    सुयोग सर episode 2,3 तास चालला असता तरी आम्ही पहिला असता, इतकं सुंदर आणि मुद्देसूद मांडणी केली सगळ्या विषासंदर्भात, फार सुंदर माणूस अभिनेत्री , काम एक नंबर करतात त्यांच्या कामाची फॅन तर आहे पण आता विचार कळले खूप आभार सुयोग प्राची 😊😊😊❤❤❤
    रंगमंच ❤❤❤❤❤

  • @mayureshpawar6245
    @mayureshpawar6245 7 วันที่ผ่านมา

    अप्रतिम मुलाखत....
    लीना ताई चे विचार खूपच मस्त आहेत.
    ऐकून खूप छान वाटलं.
    आणि शेवटचा शब्द "❤रंगमंच❤"😊

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 3 หลายเดือนก่อน +12

    कॅमेरा, मुलाखत असं कुठलंही ओझं न घेता मनमोकळेपणाने मारलेल्या गप्पा, खूप आवडल्या.💐👍👌

  • @ushasoman75
    @ushasoman75 9 วันที่ผ่านมา

    वा वा, खूपच मजा आली ऐकतांना. अगदी मनमोकळ्या गप्पा झाल्या.
    मराठी माणूस चांगल्या कलाकारांचे तोंडभरून कौतुक करतो. टाळीही मनापासून वाजवतो. दाद देण्यात हात आखडता घेत नाही. आपला अभिनय आम्हाला खूपच भावतो. शाबासकी व शुभेच्छा देण्याची सुसंधी मी आज घेत आहे. छान.
    ..

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 หลายเดือนก่อน +18

    नोगी ची माकड छाप काळी टुथपावडर आम्ही वापरली आहे...फारच प्रसिद्ध होती....
    दिलखुलास चर्चा 😊😊😊😊😊

  • @vijay192400
    @vijay192400 3 หลายเดือนก่อน +2

    रंगमंच
    खूप छान झाली मुलाख़ात,लीना ताईंबद्दल पहिल्यांदच इतक्या गोष्टि समजल्या.
    खूप नवीन नवीन शब्द आमच्या “शब्द कोषात” हया एपिसोड निमित्ताने नव्याने दिल्याबद्दल तुम्हा दोघांचे आभार.
    संकर्षण नंतर मी हया एपिसोड ला एका Different Zone मधे गेलो.
    सुयोग यार कसला भारी झोन बनवतोस तू….नक्कीच नवनवीन नाटकं बघायचा आमचा प्रयत्न असनार आहे.
    धन्यवाद 🙏🏻

  • @prajaktakadkol796
    @prajaktakadkol796 3 หลายเดือนก่อน +3

    लीना भागवत... एक नं.. 😀 फार फार आवडतात मला.
    सर्व एपिसोड मस्तच आहे. संपूर्ण एपिसोड हेडफोन मध्ये ऐकला त्यामुळे एक गोष्ट जाणवली आणि आवडली ती म्हणजे लीना ताईचं voice modulation.. 👌🏻
    Thank you suyog खूप thank you.
    आणि लवकरच पुन्हा नाटक पाहायला हजेरी लावेन. 👍🏻🙏🏻🙏🏻
    खूप शुभेच्छा व्हायफळ ला आणि लीना ताई ना.

  • @suvidhalokhande1906
    @suvidhalokhande1906 2 หลายเดือนก่อน +1

    या सर्व मुलाखतींमधून एका पडद्यावरच्या कलाकाराचे खऱ्या आयुष्यातील अंतरंग उलगडत जातात. ती व्यक्ती नकळत बऱ्याच गोष्टी शिकवून जाते. एखादं व्यक्तिमत्व किती खोल असू शकते याचा अनुभव संकर्षण दादा, पर्ण आणि लीनाताईंच्या सहज ओघवत्या बोलीतून आला. निव्वळ अप्रतिम ❤

  • @divyaninikam6491
    @divyaninikam6491 3 หลายเดือนก่อน +32

    केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा.. ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा..!! अगदी माझ्या जिल्हा परिषद च्या शाळेत नेऊन सोडलंत तुम्ही ताई 😊

  • @lofimusic2095
    @lofimusic2095 3 หลายเดือนก่อน +2

    रंगमंच
    रंगमच्यावरची लीना भागवत दिलखुलास व्यक्तिमत्व, लीना ताईच बोलणं ऐकत राहावं नाटकाविषयीचं तीच बोलण, तीच खळखळून हसन आणि सुयोग यांचं निशब्द होऊन ऐकत रहाणं
    हे रंगमंचवरच होऊ शकत 👍🏻👌🏻👌🏻अप्रतिम एपिसोड लीना भागवत ❤️❤️

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 3 หลายเดือนก่อน +3

    क्या बात है ...... एक नंबर झाला आजचा भाग . लीना ताई , एकदम आवडती अभिनेत्री आहे . खूप सुंदर विचार मांडले त्यांनी . रंगमंचावरील त्यांचे काम पाहणे , हा एक अविस्मरणीय अनुभव आहे ..... लीना ताई , तुमच्या आगामी प्रोजेक्ट्स साठी अगदी मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून , 👍👍 . मस्त रंगला आजचा भाग , सुयोग आणि प्राची , मन : पूर्वक धन्यवाद लीना ताईंना बोलावलं म्हणून .... 🙏🙏🙏

  • @Shree_Ganesha_Investments
    @Shree_Ganesha_Investments 3 หลายเดือนก่อน +2

    रंगमंच.....
    खूप छान झाल्या गप्पा......
    अद्भुत दरवाजा...... फ्रेम अजून छान set करता आली असती सुयोग.....
    पण लीना ताई नि दिलेलं उत्तर निव्वळ अप्रतिम ❤
    खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
    सुयोग अणि प्राची

  • @shilpadeshpande8755
    @shilpadeshpande8755 3 หลายเดือนก่อน +11

    लीनाताई खूपच प्रतिभा वंत आहे आणि अशाच रहा साध्या आणि प्रामाणिक

  • @reshmalawate7672
    @reshmalawate7672 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर मुलाखत.ऐकताना मजाही आली आणि अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.लीनाताई बोरीवली त्यातून माझ्या घराजवळच असणाऱ्या गोविंद नगरला रहाणाऱ्या आणि सगळ्यात मुख्य माझ्या शाळेच्या म्हणजे त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण गोखले मध्ये झालं मी त्या शाळेत बारावी पर्यंत होते 1:56:25 .त्यावेळी पूर्ण काॅलेज झालं नव्हतं.मुलाखत देणारे आणि घेणारे दोन्ही बाजू उत्तम असल्याने रंगत वाढली.रंगमंच

  • @ashurj
    @ashurj 3 หลายเดือนก่อน +19

    खूप सुंदर मुलाखत. लीना भागवत इतकं छान बोलतात. की गुंतून जायला होतं. इतके प्रगल्भ विचार त्यांनी मांडले. आणि इतकं स्वच्छ आणि सुंदर मराठी. आणि खरचं काही शब्द म्हणजे झुडूप, परीस,रंगमंच वापरले नाही जात आता. सुयोग खूपच मस्त रंगली मुलाखत.

  • @akshatanaik5275
    @akshatanaik5275 หลายเดือนก่อน

    रंगमंच - नाटक हे मनाच्या खूप जवळ आहे. लीना ताईच मनापासून
    नाटकावर केलेल प्रेम खूपच भावलं

  • @NividhaSawant
    @NividhaSawant 3 หลายเดือนก่อน +13

    सहज सुंदर खिळवून ठेवणारी मुलाखत.मला व्हायफळ च्या बाबतीत सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे की कुठेही तोच तोच पणा नसतो फार intresting प्रश्न असतात त्या मुळे ऐकायला माझा येत ❤ आणि जसा लीना ताई घरी मुलाखत घेयच्या तसा मी ही करते 😂😂

    • @akshatatamhankar1973
      @akshatatamhankar1973 3 หลายเดือนก่อน

      खूपच सुंदर एपिसोड धन्यवाद

  • @tanushreerane4230
    @tanushreerane4230 2 หลายเดือนก่อน

    रंगमंच!! खूप छान मुलाखत. लीनाताई नाटक या विषयावर भरभरून बोलताना, अगदी ऐकत राहावं असं वाटत होतं. एक "नाटक" या विषयाचे कितीतरी पैलू तुम्ही उलगडून दाखवले. मस्तच. आता शक्य तेंव्हा नाटकं पाहण्याचा प्रयत्न करेन. तुम्हां दोघांचे आभार.

  • @SUBHASHIKULKARNI
    @SUBHASHIKULKARNI 3 หลายเดือนก่อน +6

    कधी संपला interview कळलंच नाही.. part 2 पण चालेल.. tv serial बद्दल ऐकायचं राहिलं

  • @littlewoolie
    @littlewoolie 14 วันที่ผ่านมา

    मला खूप खूप आवडते लीना भागवत..काय मस्त बोलते..अगदी ओघावत..ऐकत राहावे वाटते..

  • @ManasiBhide-k5s
    @ManasiBhide-k5s 3 หลายเดือนก่อน +6

    खूप सुंदर...यांत्रिक मुलाखत न होता छान नैसर्गिक शैलीत गप्पा मारल्या आहेत लीनाताईंनी.

  • @anitamore9244
    @anitamore9244 27 วันที่ผ่านมา

    आज या मुलाखती मधून लीना जी बद्दल खूपच समजले. खरच खूप ग्रेट आहेत लीनाजी . किती छान बोलल्या बऱ्याच गोष्टी कळल्ल्या .❤

  • @thanekar256
    @thanekar256 3 หลายเดือนก่อน +7

    लीना ताईंना कितीही ऐकलं तरी कमीच आहे.❤❤❤दिल के करीब चा interview पण मी परत परत ऐकत असते.

  • @mayajadhav317
    @mayajadhav317 หลายเดือนก่อน

    रंगमंच!.... खूपच छान वाटला हा podcast कितीतरी गोष्टी नव्याने नाटकाबद्दल कळल्या....नव्या पिढीला नाटक दाखवण्याची गरज नक्कीच आहे....मी आजच तुमच्या सध्या चालू असलेल्या नाटकाची तिकिटे बुक करतेय माझ्या मुलींसोबत जाण्यासाठी....😊

  • @nilimajoshi55
    @nilimajoshi55 3 หลายเดือนก่อน +5

    रंगमंच - शेवटचा शब्द
    लीना भागवत -- आवडती अभिनेत्री. खूप मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. वैचारिक प्रगल्भता दिसली. छान झाला कार्यक्रम.

    • @sunitapalsule1610
      @sunitapalsule1610 3 หลายเดือนก่อน

      लीना भागवत म्हंटल्यावर च लाईक करून मोकळी झाले. याचा दुसरा भाग बघायला आवडेल. लहानपणीचे सगळे कांदेपोहे, लगोरी, डबा ऐसपैस खेळ आठवले आणि हो लिना ताईने सांगितलेली ती दात घासायची काळी राखुंडी ही आमच्याकडे कायम होती. आता राखूंडी हा शब्द ही माहित नसावा काही जणांना. अतिशय साधी राहणी, कुठेही गर्व नाही, हसतमुख ,खुप मस्त खूप जवळच्या वाटतात लीना ताई.

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 3 หลายเดือนก่อน +1

    खुपच मनमोकळ्या गप्पा ऐकायला मिळाल्या. “आमने सामने” मस्त नाटक.
    लिना भागवत लक्षात आहेत ते दुरदर्शनवर दीसायच्या तेव्हापासुन. मोकळं हसु, छान अभिनय आणि लांबसडक केस या वैशिष्ठांमुळे छान लक्षात राहील्यात.
    वायफळ तुम्हांला धन्यवाद!!

  • @artibiramane1671
    @artibiramane1671 3 หลายเดือนก่อน +5

    रविवारची सकाळ लीना संगे❤मस्त एपिसोड

  • @snehapalav4547
    @snehapalav4547 3 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर मुलाखत होतीस सुयोग. मला सुद्धा असं वाटत होतं की आज खरच खूप दिवस झाले खूप वर्ष झाले एकही नाटक नाही बघितलं.. पण आता ठरवलं आहे पुढच्या एक दोन महिन्यात तरी एक तरी नाटक बघायचं. धन्यवाद तुझ्या या अशा मुलाखतीने मधून खूप इन्स्पिरेशन मिळतं

  • @varshamore6663
    @varshamore6663 3 หลายเดือนก่อน +7

    Please do one with LALIT PRABHAKAR 😊

  • @rohinimoghe833
    @rohinimoghe833 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम मुलाखत , खूप दिवसांनी अभ्यासपूर्ण मुलाखत ऐकायला मिळाली .वायफळचे आभार .

  • @supriyarisbud9971
    @supriyarisbud9971 3 หลายเดือนก่อน +5

    रंगमंच😍👍रंगमंच म्हणजे श्वास …आणि …ध्यास असलेल्या गुणी अभिनेत्री लीना ताई…किती छान बोलल्या …तुम्ही आणि मंगेश दादा नाटक जगणारी आणि जागवणारी माणस आहात …खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या प्रत्येक कलाकृती साठी …😍💐👍
    सुयोगप्राची maaasstttaaa😍👍

  • @neenakamal1
    @neenakamal1 3 หลายเดือนก่อน +2

    प्रत्येक माणसाचा त्याच्या आयुष्याकडे बघायचा एक सुंदर आणि वैयक्तिक असा दृष्टिकोन असतो. पूर्वी घराघरात गप्पांचे मस्त अड्डे जमायचे. त्यात तो ऐकायला चर्चा करायला मिळायचा. हल्ली हे जमत नाही. पण ते व्हायफळ मधे जमवून आणतात! मला या गप्पा मनापासून आवडतात. लीन भागवत एक अत्यंत उत्साही आणि मनस्वी व्यक्तिमत्त्व! गप्पही तशाच रंगल्या आहेत.

  • @pradnyachavan4702
    @pradnyachavan4702 3 หลายเดือนก่อน +12

    तुमचं बालपण ऐकून आणि ताई विषयी ऐकून अगदी माझं च बालपण सांगताय की काय असं वाटतं...आणि मंजन बद्दल कालच मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत होते...खुपचं भारी... सुयोग तुझे खूप आभार लीना भागवत ताईंना बोलवलं ❤❤❤❤❤

  • @ketakeeavinashdeodhar8591
    @ketakeeavinashdeodhar8591 3 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर मुलाखत होती. आणि एका नाटक वेड्या कलाकाराची इतकी सुंदर मुलाखत ऐकताना त्या व्यक्तीचे इतके सखोल विचार ऐकताना खूप छान वाटले. रंगमंच ही एक मोठी जबाबदारी आहे ही गोष्ट लीना भागवत ह्यांनी इतक्या सखोलपणे सांगितली त्यांच्या अनुभवातून. वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आजच्या podcast ने. Thank you for such wonderful podcast. संकर्षण कऱ्हाडे नंतर सगळ्यात भावलेला आणखी एक हा podcast.

  • @ulhasmarulkar7606
    @ulhasmarulkar7606 3 หลายเดือนก่อน +8

    मंकी ब्रॅण्ड न म्हणता हे दंतमंजन "माकड छाप काळी टूथ पावडर" या नावाने प्रसिद्ध होते.

    • @ishanmirokhe9567
      @ishanmirokhe9567 3 หลายเดือนก่อน

      Ho mi pan vaparali aahe 5 vi 6 vi paryant

  • @varshadeodhar5282
    @varshadeodhar5282 3 หลายเดือนก่อน

    मुलखत खूप छान आणि माहितीपूर्ण होती!!! प्रश्न मुद्देसुद विचारले जातात त्या मुळे ऐकायला मजा येते. रंगमंच!!

  • @archanamuley5399
    @archanamuley5399 3 หลายเดือนก่อน +13

    लिना❤भागवत एकदम भन्नाट अभिनेत्री .माझी आवडती

  • @pranalideobhakta5186
    @pranalideobhakta5186 3 หลายเดือนก่อน

    फारच सुरेख गप्पा आणि छान विचार .रंगमंच खरंच रंगला.नुकतेच इवलेसे रोप हे नाटक पाहिलं.अतिशय सुरेख.

  • @MrAnilSonawane
    @MrAnilSonawane 3 หลายเดือนก่อน

    किती छान, तुम्ही लोकांनी लहान पणाच्या ज्या-ज्या आठवणी सांगितल्या ते ऐकून मला माझं बालपण आठवलं. सगळे खेळ, शाळेतले आणि कॉलेजचे दिवस, मित्र-मैत्रिणी सगळं डोळ्यासमोर उभे राहिलेत. "रंगमंच" आणि नाटकांबद्दलचे छानसे किस्से ऐकून छान वाटलं. खूप मस्त podcast. धन्यवाद!

  • @veenamore2774
    @veenamore2774 2 หลายเดือนก่อน

    रंगमंच ....... वाहवा श्रवणीय 2वेळा ऐकले किती छान सांगितले लीना ताई ने❤प्रेक्षक म्हणून शिकता आले नव्याने
    नाटक बघण्याची नवी दृष्टी मिळाली
    धन्यवाद सुयोग

  • @RunaliDhamnaskar
    @RunaliDhamnaskar 2 หลายเดือนก่อน

    संकर्षण दादा नंतर प्रचंड आवडलेली मुलाखत. लीना ताईंच मराठी भाषेवरचं इतकं अशक्यसुंदर प्रभुत्व व्वा❤ मराठी ऐकून कान तृप्त झाले. रंगमंच 😊

  • @brilliantclassofmathssonal5741
    @brilliantclassofmathssonal5741 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर मुलाखत... कोणताही कृत्रिमपणा नाही अगदी नैसर्गिक

  • @dipaksawant4329
    @dipaksawant4329 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम शब्द भांडार आहे यांच्याकडे.. असं वाटलं की खूप वर्ष कोणाशी मनमोकळ बोलता आलं नाही आणि आता संधी मिळाली तर घेते बोलून..पण फारच ओघवती वाणी उच्चार स्पष्ट आणि रंगभूमीवर तयार झालेली व्यक्ती लगेच समजून येते..❤

  • @urmilagore4053
    @urmilagore4053 3 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर, माहितीपूर्ण मुलाखत ... संकर्षण कऱ्हाडे मुलाखत जशी भावली, तशीच ही पण .... आपल्याला पण रंगमंचावर घडणाऱ्या गोष्टी सुंदर प्रकारे उलगडून दाखवणारी ... लीना भागवत खरोखरच हरहुन्नरी, चतुरस्त्र व हसतमुख कलाकार आहेत ... त्यांना मनापासून शुभेच्छा !

  • @AkshataZarekar
    @AkshataZarekar 3 หลายเดือนก่อน +1

    Rangmanch. Khup chan episode hota. Khup maja Ali ani Khup shikale. Thank you for such great experience ani Khup Khup prem❤

  • @vandanashete7362
    @vandanashete7362 3 หลายเดือนก่อน

    खूप च सुंदर मुलाखत आणि सादरीकरण.
    लीना भागवत आणि मंगेश सरांची सर्व नाटकं आम्ही पाहिलेली आहेत.
    लीना भागवत च्या भूमिकेत कुठं तरी मी स्वतः ला अजमाविण्याचा यत्न करते.
    त्यांचे दिलं अभी भरा नही हे मला खूपच आवडले नाटकं.
    त्यातील वंदना,जे माझे नाव आहे, अगदी माझ्या स्वभावाला अनुरूप आहे तिची भूमिका.
    गोष्ट गमतीची,dil भरा नाही, आमने सामने,आणि ह्या महिन्यात इवलेसे रोप पण पाहिले.
    मनाला चटका लावणारी भूमिका आहे उभयतांनी..
    लीना तर काम चांगले करतेच पण इवलेसे रोप मंगेश सरांनी अगदी बाजी मारली आहे अभिनय करण्यात..रडायला येते शेवटी.
    खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि सुयोग ला..
    आम्ही संकर्षण आणि लीना मंगेश कदम सर्व नाटकं पहातोच

  • @ashwinikulkarni9066
    @ashwinikulkarni9066 3 หลายเดือนก่อน +2

    वायफळ चे कौतुक करावे तेवढे कमी....
    ही मुलाखत दिलखुलास अप्रतिम..
    सुयोग. . मी subscribe केले बर का.. वायफळ= दर्जेदार
    हे तुम्ही कायम ठेवली आहे अभिनंदन..
    And feel so happy to follow your channel
    From very long time... Mrs. Ashwini Kulkarni...
    All the best..
    Waiting fir many more...
    Leena awadti abhinetri... Great..
    .

  • @manishachafe499
    @manishachafe499 3 หลายเดือนก่อน

    रंगमंच
    अतिशय जबरदस्त मुलाखत
    लहान मुलांनी नाटकाकडे का वळावे याचे सुद्धा अतिशय सुंदर विवेचन

  • @sheetalrege24
    @sheetalrege24 2 หลายเดือนก่อน

    Kitti bhari aahe he sarva... Khup Shubhechchha tumha sarvanna... Leena Tai kiti chan explains kelay he sarva... ❤

  • @swatims2010
    @swatims2010 3 หลายเดือนก่อน

    रंगमंच ....अतिशय सुंदर एपिसोड....लीना भागवतांचा सहजसुंदर आणि नैसर्गिक अभिनय पहाणं ही पर्वणीच असते ...इतक्या छान लोकांना बोलवून त्यांना बोलतं करण्यासाठी सुयोग-प्राची तुमचं खूप कौतुक आणि शुभेच्छा

  • @mahendrapatil-ov2te
    @mahendrapatil-ov2te 3 หลายเดือนก่อน

    मी माझ्या आयष्यातील पाहिलेली सर्वात अप्रतिम मुलाखत , अर्थात ह्यात लीना ताईचा मोठा वाटा , की त्यांनी सारे भरभरून उलगडत सांगीतले, थॅन्क्स सुयोग अँड प्रार्ची

  • @nandinijoglekar1666
    @nandinijoglekar1666 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम! खुप छान एकदम ओघवती मुलाखत. मस्त वाटल ऐकून. ❤ एक वेगळी च दृष्टी दिलीत

  • @AshwiniThorat1212
    @AshwiniThorat1212 3 หลายเดือนก่อน

    रंगमंच...
    निखळ-निस्सीम प्रेम...
    कामप्रति असणारी तुमची एकनिष्ठता...
    🙏😍👌👌👌👏👏👏👏

  • @ketakighanekar4217
    @ketakighanekar4217 3 หลายเดือนก่อน

    लीना ताई मला तू,तुझी भाषा आणि तुझे विचार खुपचं आवडतात. तू खरंच खुप उत्तम अभिनेत्री आहेस 😊

  • @yoginisagade1715
    @yoginisagade1715 3 หลายเดือนก่อน

    'रंगमंच' लीना भागवत ही खूप आपली वाटते आणि तिचे विचारही त्यामुळे आपलेसे वाटतात. अप्रतिम मुलाखत ❤❤ धन्यवाद!

  • @geetaj7075
    @geetaj7075 3 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर मुलाखत...बोलण्यात अगदी सहज पणा आहे...आणि सुयोग तुम्ही पण खूप छान बोलतं करता .... खूप सुंदर👌👌

  • @harshalmalegaonkar5402
    @harshalmalegaonkar5402 3 หลายเดือนก่อน

    अजून एक खूप सुंदर podcast, रंगमंच 🫠 ही तुझी शब्दाची concept फार कमाल आहे.

  • @gaurimohadarkar7125
    @gaurimohadarkar7125 3 หลายเดือนก่อน

    लीना ताई : एक खूप सुंदर व्यक्तिमत्त्व आणि आपण सहज त्यांच्याशी जुळवून घेतो. मला आवडतात त्या.

  • @shubhadautgikar9624
    @shubhadautgikar9624 2 หลายเดือนก่อน

    रंगमंचा बद्दल आपोआपच प्रेम निर्माण करण्यात हा episode यशस्वी झालाय.

  • @sakhidevesh
    @sakhidevesh 3 หลายเดือนก่อน

    रंगमंच! नाटकाचे आणि त्यातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि प्रेक्षक यांचे वेगवेगळे कंगोरे अनुभवता आले. धन्यवाद 🙏

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 2 หลายเดือนก่อน

    निःशब्द... भान हरपून ऐकलेली मुलाखत 👍🏻लीना किती सुंदर बोलतेस..... खुपच सुंदर 👍🏻

  • @artisohoni5349
    @artisohoni5349 3 หลายเดือนก่อน

    खूप छान मुलाखत.लीना भागवताना ऐकताना खूप आनंद मिळतो.

  • @aparnamhatre2820
    @aparnamhatre2820 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम. संपूर्ण एपिसोड पाहिला. अस वाटलं लीना ताईंचा जन्म फक्त नाटक जगण्यासाठीच झाला आहे. नव्याने नाटक सापडलय अस वाटतयं. नक्कीच जसं जमेल तसं नाटक बघायला जायचचं ते ही माझ्या मुलां बरोबर.
    रंगमंच ❤

  • @manjushadatar1860
    @manjushadatar1860 17 วันที่ผ่านมา

    फारच छान मुलाखत ..... अगदी मनमोकळी ..... मस्त वाटलं .... रंगमंच ❤

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम दिलखुलास मुलाखत आमच्या आवडत्या अभिनेत्री लीना भागवत यांनी दिली.❤❤❤❤
    अनेक नाटक गोष्ट तशी गमतीची पाहताना त्यांचे " रंगमंचावरील " उत्कृष्ट काम आम्हाला आवडते. लीना भागवत यांना खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉
    वायफळ गप्पा कार्यक्रम खूपच चांगला आहे.
    नवनवीन मुलाखती ऐकायला मिळतात.

  • @bhushanpadhye2403
    @bhushanpadhye2403 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सादरीकरण. संपूर्ण रंगमंच उभा केला ताई तुम्ही.

  • @sagar1hadge
    @sagar1hadge 3 หลายเดือนก่อน

    Leena ma'am and her command on her language is impeccable....so inspiring... podcast.....guys pls do watch plays.....it's an amazing wholesome experience

  • @shyamgokhale9416
    @shyamgokhale9416 3 หลายเดือนก่อน +1

    लीनाताई खूप छान मुलाखत. आम्हाला तुम्ही *रंगमंचावरील* सेलिब्रिटी न वाटता घरातीलच एक व्यक्ती वाटता. नाटकामागचा विचार, संपूर्ण प्रोसेस याची छान माहिती मिळाली.

  • @renukaborgaonkar4207
    @renukaborgaonkar4207 3 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला वायफळ गप्पा पोडकास्ट फार आवडतो तूम्ही प्रत्येक सिलेब्रीटी ला खूप छान प्रश्न विचारता त्यामुळे ह्या लोकांच सर्व सामान्य दिनचर्या कशी आहे हे समजतं आणि कशा पद्धतीने टाइम मॅनेजमेंट असावं ते कळत लाहानपणी च्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या खूप खूप थॅन्क्स आणि वायफळ गप्पा वायफळ नाही वाटत त्यामध्ये देखील महत्वाचे आहे

  • @rajashrikunte8423
    @rajashrikunte8423 3 หลายเดือนก่อน

    रंगमच, फार सुंदर झालाय एपिसोड, 2 तास अक्षरशहा खिळवून ठेवलेल....

  • @kaumuditoal6715
    @kaumuditoal6715 3 หลายเดือนก่อน

    रंगमंचावर ची कला अबाधित राहो, लीना ताईंनी खुप सुंदर रित्या गोष्टी आम्हाला सांगितल्या, धन्यवाद ❤

  • @veena7vaidya
    @veena7vaidya 3 หลายเดือนก่อน

    रंगमंच .. लीना भागवत was too good ... सहज सुंदर अभिनय .... She is one of my favourite artists!! खूप छान झाली मुलाखत!!❤👌👍👍

  • @ujwalakulkarni1502
    @ujwalakulkarni1502 3 หลายเดือนก่อน

    रंगमंचावरील एखादं नाटक जसं खिळवून ठेवतं तशी खिळवून ठेवणारी मुलाखत झाली आणि खूप आवडली. धन्यवाद

  • @shirishchitale114
    @shirishchitale114 3 หลายเดือนก่อน

    ॓॑ रंगमंच ,अप्रतिम खुपचं छान झाल्या लीना ताईंशी गप्पा . दिलखुलास, मनमोकळी , आणि खुप छान विचार आणि दिशा देणारी मुलाखत.

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 3 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर गप्पा ची मुलाखत.... खूप सुंदर मनमोकळे पणाने बोललात. तुमचा हा कार्यक्रम आम्हा घरातल्यांना खूप आवडतो. मनापासून आम्ही पाहतो. गप्पा मारताना तुम्ही त्यांना रिलॅक्स करता... त्यामुळे गप्पांना छान रंगत येते❤❤❤ खूप सुंदर विचार मांडले आहेत लीना भागवत यांनी ❤ अतिशय साधी आणि गोड व्यक्तिमत्व आहे..... खूप चांगले काम करतात म्हणून देव त्यांना चांगली माणसं भेटवतो आणि चांगली कामे त्यांच्या पर्यंत येतात आणि आशीर्वाद खूप खूप मिळतात.त्यांच्या आणि तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐 रंगमंच ❤

  • @thosars111
    @thosars111 3 หลายเดือนก่อน

    तुला मुद्देसूद बोलताना ऐकणे हा अपूर्व योग आहे . तू रसिकांना नाटक कसे पहावे हे पण शिकवून जातेस .तरुण पिढीला नाटकाकडे कसे आणायचे यावर मांडलेला विचार आवडला .. सई परांजपेनी तुम्हाला स्वतः बोलवून नाटक देणे हा तुझा बहुमान आहे . तुमचे संवाद पण किती सुंदर सई परांजपे बरोबर . खूप मजा येतेय ऐकताना तुला लीना

  • @neelangishinde5808
    @neelangishinde5808 3 หลายเดือนก่อน

    रंगमंच.
    धन्यवाद लीलाताई. तुम्ही सहज गप्पांमधून नाटक म्हणजे काय हे उलगडून सांगीतलं.नवीन पिढीला हा पाॅडकास्ट पाहून नक्कीच नाटकापर्यंत जावं असं वाटतंय. नाटक म्हणजे काय हे इतकं सविस्तर कुठेच ऐकलं नव्हत.म्हणून धन्यवाद 🙏🏻

  • @amodbedekar3972
    @amodbedekar3972 2 หลายเดือนก่อน

    "रंगमंचावर" नितांत प्रेम करणारी एक अवलिया अभिनेत्री.

  • @sulabhaapte2228
    @sulabhaapte2228 3 หลายเดือนก่อน

    खूपच प्रगल्भ मुलाखत. विचारप्रवर्तक. नाटकाचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला. प्रेक्षकाची भूमिका काय असावी हेही नव्याने कळले. खूप धन्यवाद!!!

  • @aparnakulkarni1640
    @aparnakulkarni1640 3 หลายเดือนก่อน +1

    माझी अत्यंत लाडकी अभिनेत्री!! एक वेगळीच लीना भागवत बघायला, ऐकायला मिळाली. खूप छान!!

  • @manjirikhambete8891
    @manjirikhambete8891 3 หลายเดือนก่อน +1

    आवडत्या अभिनेत्री लिना भागवत यांची गप्पा खुलवत नेणे ही शैली ही आज लक्षात आली
    खूप सुंदर वाटले लिना यांना ऐकून

  • @smitabaravkar500
    @smitabaravkar500 3 หลายเดือนก่อน +1

    रंगमंच…
    हा एपिसोड या गप्पा मी पाच दिवस थोडया थोडया करून ऐकल्या 😊❤❤❤