मोफा व रेरा कार्पेट आणि बिल्ट अप एरिया मध्ये काय फरक आहे? Staircase बिल्ट अप एरियाचा फायदा कुणाला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 มิ.ย. 2024
  • मोफा कार्पेट, रेरा कार्पेट, बिल्ट अप एरिया मध्ये काय फरक आहे. बिल्ट अप एरिया का महत्वाचं आहे. जुन्या प्लॅनचे Staircase बिल्ट अप एरियाचा फायदा कुणाला मिळतो.: सलील रमेशचंद्र अध्यक्ष फेडरेशन ऑफ ग्रँटिस ऑफ गव्हरमेंट लँड्स आणि वास्तु विशारद शिवाजी पाटील.
    1. Definitions of - a) Built up area, b) MOFA carpet area, c) RERA carpet area
    a) Built up area- म्हणजेच FSI ला अनुसरून नकाशामध्ये दाखवीलेले आतील व बाहेरील भिंतीसाहित बांधकाम क्षेत्र व त्यामध्ये स्टेअरकेस खालील क्षेत्र पूर्वीच्या नकाशामध्ये समाविष्ट केले असल्यास, ते योग्य प्रमाणात घेऊन आलेले प्रत्येक सदनिकेचे बांधकाम क्षेत्र.
    b) MOFA carpet area- आतील व बाहेरील भिंतीचे क्षेत्र सोडून वापरात येणारे सदनिकेचे आतील एकूण क्षेत्र.
    c) RERA carpet area- बाहेरील भिंतीचे क्षेत्र सोडून फक्त आतील भिंतीचे क्षेत्र धरून वापरात येणारे सदनिकेचे आतील एकूण क्षेत्र.
    २. वापर परवाण्यानंतर ३० वर्ष पूर्ण झालेलेची अट -
    सदनिकेमध्ये राहणाऱ्यां व्यक्तींची संख्या कालांतराने वाढत असल्यामुळे व सभासदांना पुनर्विकासाकरिता प्रोत्साहित करण्यासाठी ज्या सभासदांच्या निवासी सोसायटीच्या इमारतींना वापर परवान्यानंतर ३० वर्ष पूर्ण झालेली असतील तरच मूळ सभासदांकारिता मूळ बांधकाम क्षेत्रासाहीत ३५% मोफत फंजिबल क्षेत्रा व १५% मोफत इनसेंटीव FSI क्षेत्रा देण्याचे प्रावधान DCPR- २०३४ मधील रेगुलेषण ३३(१) व ३३(७)(ब) मध्ये करण्यात आले.
    ३. पूर्वीचे व नवीन स्टेअरकेस, लिफ्ट व पॅसेज खालील सामाईक क्षेत्र -
    पूर्वीच्या बांधकाम परवाना वेळी, बांधकाम क्षेत्रामध्ये स्टेअरकेस खालील सामाईक क्षेत्र FSI मध्ये समाविष्ट केले जात होते. परंतु सद्य परिस्थितीत स्टेअरकेस, लिफ्ट व पॅसेज खालील सामाईक क्षेत्राला FSI मध्ये न मोजता प्रीमियम भरून मंजुरी देण्यात येत आहे.
    ४. पूर्वीचे व नवीन इमारतीमधील बाहेरील व आतील भिंतीची जाडी -
    पूर्वीच्या इमारतीच्या नकाशामध्ये बाहेरील व आतील भिंतीची जाडी लाल मातीच्या विटांच्या आकारानुसार अनुक्रमे ९ इंच (230mm.) व ४.५० इंच (115mm.) ठेवली जात असे व त्यानुसार चटई क्षेत्रावारती १५% वाढीव क्षेत्र धरून एकूण बांधकाम क्षेत्र मोजले जात होते. परंतु सद्य परिस्थितीत हलक्या वजनाच्या कॉन्क्रेटच्या चांगल्या प्रतीच्या विटा बाजारात उपलब्ध असल्यामुळे बाहेरील व आतील भिंतीची जाडी अनुक्रमे ६ इंच (१५०मी.मी.) व ४ इंच (१०० मी.मी.) ठेवली जात आहे त्यामुळे एकूण बांधकाम क्षेत्रामध्ये ज्यादा मोकळे चटई क्षेत्र उपलब्ध होत आहे व त्याचा फायदा मुळ सभासदांना मिळू शकतो व त्यानुसार चटई क्षेत्रावारती १५% ऐवजी सदनिकांच्या आकारानुसार ११% प्रमाणे वाढीव क्षेत्र धरून एकूण बांधकाम क्षेत्र मोजले जाऊ शकते. परंतु संगणकाच्या सहाय्याने तंतोतंत एकूण MOFA व RERA चटई क्षेत्र व एकूण बांधकाम क्षेत्र मोजने योग्य होईल.
    ५. Re-development म्हणजेच पुनर्बांधकामामध्ये मूळ सभासदांकरिता मिळणारे क्षेत्र -
    DCPR २०३४ च्या रेग्युलेश ३३(१) व ३३(७)(ब) ननुसार मूळ सभासदांकरिता मिळणारे वाढीव क्षेत्र हे सध्याच्या कारपेट क्षेत्रावर अवलंबून नसून ते पूर्वी approve केलेल्या बांधकाम क्षेत्रावर पूर्णपणे अवलंबून आहे. पूर्वीच्या बांधकाम क्षेत्रासहित व त्यावर ३५% मोफत फंजिबल क्षेत्र व १५% मोफत इनसेंटीव FSI क्षेत्र देण्याचे प्रावधान DCPR २०३४ मध्ये करण्यात आले असून त्याचा वापर सेल काम्पोनंटसाठी करण्यात येऊ नये असे DCPR २०३४ मध्ये नमूद करण्यात आले DCPR १९९१ मध्ये ३५% मोफत फंजिबल क्षेत्र मूळ सभासदाकरिता देण्याचे प्रावधान होते व त्यानुसार MCGM ने मुंबईमधील एका निवासी चाळीच्या पुनर्विकास प्रकरणामध्ये बांधकाम परवानगी न दिल्यामुळे, मुंबई उच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०२३ मध्ये ३५% मोफत फंजिबल क्षेत्र मूळ सभासदांकरिता देण्याचे आदेश दिलेला आहे. तसेच मूळ सभासदांच्या वाढीव क्षेत्रानुसार कार पार्किंग देण्याचे आदेश सुद्धा विकसकास देण्यात आले.
    1) मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासा मध्ये मूळ सदस्यांना 35% फुंजिबल FSI व 15 % प्रोत्साहन incentive FSI मिलने अनिवार्य
    • मुंबईतील गृहनिर्माण सं...
    2) 35% Free Fungible compulsory to be given to Rehabilitation members of CHS - Landmark Bombay High Court judgement : Architect Shivaji Patil & Salil Rameshchandra
    • 35% Free Fungible comp...
    "SAHAKAR BHANN" channel publishes programs in "Housing & Co-operative" general. It produces documentaries, seminor, interviews of the celebrities and people working at various Housing & Co-operative sector. We seek your support and feedback for producing intellectually stimulating and engaging digital content.
    चैनल सब्सक्राइब करें: / @sahakarbhann3218
    हमारे फेसबुक पेज को लाइक करें: / sahakar.bhann
    हमें ट्विटर पर फॉलो करें: / kondajikanade2
    / kishor-kanade-79758377
    kishorkanade.blogspot.com/
    mail id : sahakarmitra17@gmail.com / kondajikanade2@gmail.com
    Respected Sir/ Madam,
    If feel “sahakar bhann” channel is best and you want to add some contribution to Sahakar bhann, pl click on “Thanks” botton on My You tube Channel “sahakar bhann”and donate as much you feel.
    Support : Paytm 9619335130
    Thank You
    Video By kishor Kanade
    Mob. No. 9619335130

ความคิดเห็น • 9

  • @rameshtransportcompanyrame9006
    @rameshtransportcompanyrame9006 หลายเดือนก่อน +2

    Hello sirji, very nice information.thanks.🙏🙏🙏🙏🙏

  • @Sunil-jz3ik
    @Sunil-jz3ik หลายเดือนก่อน

    खुप खुप धन्यवाद साहेब 👍👍🙏🙏🙏🙏

  • @rajeshsuryawanshi8378
    @rajeshsuryawanshi8378 หลายเดือนก่อน +1

    Great Information

  • @bhaveramesh2777
    @bhaveramesh2777 หลายเดือนก่อน

    Built up area and FSI what is exact difference?

  • @Yedkhula
    @Yedkhula หลายเดือนก่อน +1

    पूर्वीच्या प्लान मध्ये, जर बाल्कनी इनक्लोझ केली असेल तर.... त्या एरीया वर ही 35 % आणि 15 % इन्सेंटीव एरीया मिळू शकतो का...??

    • @masalamusings
      @masalamusings หลายเดือนก่อน

      ho, yes

    • @masalamusings
      @masalamusings หลายเดือนก่อน

      Nahi

    • @Yedkhula
      @Yedkhula หลายเดือนก่อน

      @@masalamusings नाही...?? की हो...??

    • @masalamusings
      @masalamusings หลายเดือนก่อน +1

      Nahi, adhi chukun ho mhanalo.