गृहनिर्माण संस्थांसाठी ९ मार्च, २०१९ पासून मंजूर झालेल्या स्वतंत्र प्रकरणामधील नवीन तरतूदी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 มี.ค. 2019
  • गृहनिर्माण संस्थांसाठी ९ मार्च, २०१९ पासून मंजूर झालेल्या स्वतंत्र प्रकरणामधील नवीन तरतूदी :सिताराम राणे , अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य तथा ठाणे हौसिंग फेडरेशन
    ९ मार्च, २०१९ रोजी गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र प्रकरणाला अध्यादेशाद्वारे राज्यपालांनी मंजूरी दिलेली आहे व गृहनिर्माण संस्थांना कामकाजात सुलभता आणून दिलेली आहे. त्यातील महत्वाचे केलेले बदल खालीलप्रमाणे आहेत.
    १) २५० पर्यंत ‍किंवा त्यापेक्षा कमी सदस्य असणाऱ्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणूका या निवडणूक प्राधिकरणाकडून न होता गृहनिर्माण संस्थांच्या स्तरावर होतील.
    २) पदाधिकाऱ्यांनी सभासदाच्या मागणीनुसार कागदपत्रे न दिल्यास जो २५,०००/- दंड प्रस्तावित होता तो रद्द करुन प्रतिदिन १००/- रुपये व जास्तीत जास्त ५,०००/- रुपयांपर्यंत दंडाची तरतूद केलेली आहे.
    ३) कसूरदार या शब्दाची व्याख्या निश्चित केली असून बिल किंवा नोटीस बजावल्याच्या दिनांकापासून ३ महिन्याच्या आत संस्थेची देणी देण्यास कसूर करणाऱ्या व्यक्तिस कसूरदार ठरविण्यात आलेले आहे. या अगोदर नोटीस देणे आवश्यक होते.
    ४) देणी (Dues) - पहिल्यांदाच कायद्यात या व्याख्येचा समावेश केला असून संस्थेचे सदस्य किंवा सदनिकाधारक यांच्याकडून येणे असलेली आणि हा अधिनियम, नियम किंवा संस्थेचे उप-विधी यांच्या तरतुदींच्या आधारे देयक किंवा लेखी नोटीस बजावून मागणी केलेली रक्कम असा आहे.
    ५) सहयोगी सदस्य याची व्याख्या केली असून सदस्याच्या मूळ लेखी शिफारशींवरुन त्याच्या लेखी पूर्व संमतीने पती, पत्नी, माता, पिता, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, जावई, सून, पुतण्या, पुतणी यांना संस्थेचा सहयोगी सभासद करुन घेता येईल व त्याला मतदानाचा अधिकार असेल मात्र निवडणूक लढविण्याचा अधिकार नसेल. परंतु निवडणुक लढविण्यासाठी पुन्हा एकदा मूल सभासदची लेखी परवानगी घ्यावी लागेल सहयोगी सभासदला
    ६) तात्पुरता सदस्य ही नवीन तरतूद केली असून या तरतुदीनुसार सदस्याच्या मृत्यूनंतर संस्थेचा सदस्य म्हणून कायदेशीर वारसाला किंवा वारसांना दाखल करुन घेईपर्यंत नामनिर्देशनाच्या आधारे असलेल्या व्यक्तीला तात्पुरता सदस्य म्हणून नोंद करता येईल. अशा तात्पुरत्या सदस्याला मतदानाचा अधिकार असेल मात्र निवडणूक लढविण्याचा अधिकार नसेल.
    ७) प्रस्तावित संस्था (‍नियोजित) - आतापर्यंत नियोजित संस्थेला कुठलीही कायदेशीर मान्यता नव्हती. नवीन कायद्यामध्ये प्रस्तावित (नियोजित) संस्थांना परवानगी दिली असून बँकेत खाते उघडण्यासाठीची तरतूद सुध्दा केलेली आहे.
    ८) कुटूंबाची व्याख्या - नवीन कायद्यामध्ये कुटूंबाच्या व्याख्येमध्ये पती, पन्ती, पिता, माता, अवलंबून असणारा मुलगा किंवा अवलंबून असणारी अविवाहित मुलगी असा आहे.
    ९) हस्तांतरण - गृहनिर्माण संस्थेची देणी चुकती केल्याखेरीज सदनिका हस्तांतरीत करता येणार नाही ही नवीन तरतूद कायद्यात समाविष्ठ केली आहे.
    १०) संचालक व पदाधिकारी रिक्त पद - समितीतील कोणत्याही कारणाचे रिक्त झालेले पद हे स्वीकृत (Co-op.) द्वारे समितीच्या बैठकीमध्ये ठरवण्यात येणार आहे. जुन्या कायद्यानुसार याची निवड ही निवडणूक प्राधिकरणातर्फे केली जात होती.
    ११) संचालक संख्या - संचालकांची संख्या ही मर्यादित केली असून अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीसाठी एक, इतर मागास वर्ग १, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग एक व महिलांकरीता दोन जागा राखीव ठेवलेल्या आहेत. मात्र राखीव जागेची संख्या ही कोरमसाठी ग्राहय धरली जाणार नाही.
    १२) सहकारी गृहनिर्माण संघ याची व्याख्या तयार केली असून जमिनीच्या सामाईक सुविधांच्या देखभालीच्या किंवा हस्तांतरणाच्या तसेच लेआऊट मधील भूखंडाच्या सामाईक सुविधांसाठी तयार केलेला संघ असा आहे. त्यात एकाच लेआऊट मधील कमीत कमी पाच गृहनिर्माण संस्था असणे बंधनकारक,
    डिम्ड कन्व्हेअन्स करण्यासाठी किंवा आवश्यक सोयी-सुविधांसाठी दोन गृहनिर्माण संस्थांचा संघ तयार करण्याची तरतूद नवीन कायद्यात केली आहे. जुन्या कायद्यात याची संख्या कमीत कमी ५ होती.
    १३) गृहनिर्माण संस्थांचा महासंघ व त्याची कामे - याची व्याख्या तयार केली असून नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी म्हणून शासनाने राजपत्रात अधिसूचित केलेली राज्य किंवा जिल्हा संघीय संस्था असा आहे.
    "SAHAKAR BHANN" channel publishes programs in "Housing & Co-operative" general. It produces documentaries, seminor, interviews of the celebrities and people working at various Housing & Co-operative sector. We seek your support and feedback for producing intellectually stimulating and engaging digital content.
    Respected Sir/ Madam,
    If feel “sahakar bhann” channel is best and you want to add some contribution to Sahakar bhann,
    pl click on “Thanks” botton on My You tube Channel “sahakar bhann”and donate as much you feel.
    Support : Paytm 9619335130
    Thank You
    Pl. Subscribe to my channel for even more videos & Share Link
    / @sahakarbhann3218
    Kishor Kanade
    9619335130

ความคิดเห็น • 177

  • @shrikantinamdar9781
    @shrikantinamdar9781 ปีที่แล้ว +2

    ह्या विषयातील जवळपास सर्व तज्ञ आणि फेडरेशन हे धंदेवाईक झले आहेत. बऱ्याच लोकांचा अनुभव असा आहे की हेच लोक तक्रार आली की बिल्डर शी संगनमत करतात आणि मध्यल्या मध्ये कमिशन खातात

  • @raghunathmhase1694

    Very good information sir

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 2 ปีที่แล้ว

    Dhanyavaad 🙏

  • @kamalharchande4251

    वडिलांनी दोन् मुलांच्या नावा वर् केली astil तर् एकाला सभासद तर् dusryala sah sabasad ठरू शकते का

  • @sudhirtelang7574
    @sudhirtelang7574 2 ปีที่แล้ว +1

    Whatever ammendment you come up with dispute resolutions mechanism should be there. Court takes time & money, deputy register c.h.s do not take any action even if managing committee is not following bye- laws.

  • @amolpatil27
    @amolpatil27 4 ปีที่แล้ว +6

    फ्लॅट धारकांसाठी काय हक्क आहेत त्याचा पण एक नवीन नियम नंतरचा विडिओ बनवा

  • @sanjaysahare738
    @sanjaysahare738 4 ปีที่แล้ว

    Share certificate sathi cidco transfer chi garaj aahe kay ? Keeva. Convecec deed chi garaj aahe kay ?

  • @anilbamne9441
    @anilbamne9441 4 ปีที่แล้ว +1

    Sir maza shop aahe rent var aani exat mazya shop hya var flat aahet tya flat chi balcony aahe balcony panyane dhutlyli jate te paani shop chya payryanvar va shopchya payrynakhali chikhal hot aahe flat dhark sangun aikat nahi, je kary hay te kara asa socityla sangat aahe, kahi provision aahe ka kayda madhe plz kalvave.

  • @Bhogichand

    रिक्त पद भरण्यासाठी कोणत्या सभासदांची निवड करायची ? व्यवस्थापन समिती सदस्य की सोसायटी सदस्य?

  • @snehasmakeover7266
    @snehasmakeover7266 4 ปีที่แล้ว

    Sir mala maintenance bill bhetale nhi, na mail kelA gela ahe, me flat madhe rahatch nhi...tar mala konashi bolalve lagel...ani ata te mala 1 mahinacha maintane 10 times late fee bharava lagel ka....

  • @shripatipatil5286
    @shripatipatil5286 ปีที่แล้ว

    राणे साहेब एका वेली जास्तीतजास्त किती swakrit करता येतील. आमच्या सोसायटीत बंद करून 9 सभा सभासदाना विक्रीत करून जुलै 2919 kamiti बनवली आहे. सांगली वैभव chs. Jog 60 खुलासा करावा.

  • @VG-bl2fl
    @VG-bl2fl 5 ปีที่แล้ว

    Sir commeete e member tanent la kadhun taku shakatat ka

  • @OMGtv-OneMinuteGuideTV
    @OMGtv-OneMinuteGuideTV 4 ปีที่แล้ว

    Sir, you skipped point no. 2. Pls guide in detail on the same

  • @roshanjet8333
    @roshanjet8333 3 ปีที่แล้ว

    Can we transfer share certificate without calling AGM meeting ??

  • @vilasbhoir8857
    @vilasbhoir8857 5 ปีที่แล้ว

    Society walyachi at aahe ki 1ka family madhye 5sadashya asayala pahije jasta nani asa kahi niyam aahe ka. maintenance cha niyam sangav.

  • @anandmastiplaylist.girishg4999
    @anandmastiplaylist.girishg4999 4 ปีที่แล้ว +2

    In our housing society, Cheter Managing Committee Members carried out society' s affairs for the last seven years and Deputy Registrar failed to dissolve this committee,what is the provision to step down this kind of disqualified managing committee members???

  • @prashnatdivase8523
    @prashnatdivase8523 2 ปีที่แล้ว

    Sir please reply dya.

  • @arvindkhale1873
    @arvindkhale1873 3 ปีที่แล้ว +1

    Sir khupach upayukta mahiti. Ha vedio mazya mobil var kayam rahudya. Delet karu naye.

  • @sudhakarpadhye9713
    @sudhakarpadhye9713 5 ปีที่แล้ว +2

    संचालक मंडळ सभासदांना कागत पत्र उपलब्ध करून देत नाहीत तो मुद्दा फक्त पडद्यावर जरासा दाखविला पन तुमच्या तोंडून त्याबाबत काहींच शब्द नाही कारण काय?

  • @shymalichavan1615
    @shymalichavan1615 3 ปีที่แล้ว

    Sir mala vicharayche hota ki aamhi 2001 madhe sra flat resale madhe ghetla aani ti lady varli 1,2 varshani building 1999 chi aslyane aamhi navavar ghar kele nahi pan society madhe aamchya nave agriment aahe tr aata ghar navavar karnyasathi kay karawa lagel aani kiti kharcha yeil